वाटीभर भडंग

भडंगाची रेसिपी टाकायची म्हणजे हा शुद्ध आगाऊपणा!

भडंग करण्यात काहीही नावीन्य नाही. म्हणजे बायकांना अर्ध्या रात्री उठून भडंग कर म्हणलं तरी त्या डोळे झाकून करतील! अगदी बेचा पाढा म्हणण्यासारखी याच्यासाठी ही सरावाची गोष्ट आहे. भडंगासाठी लागणारा ज्याला आमच्या उस्मानाबादकडे चुरमुरा, पुण्याकडे कुरमुरा, इतर महाराष्ट्रातला मुरमुरा म्हणतात. हा पोकळ नसून भरीव असतो, पृथ्वीतलावर फक्त तो सातारा, सांगली, कोल्हापूर इकडेच मिळतो. पुण्यात जशी बाकरवडी तशी या तीन जिल्ह्यांमध्ये भडंग.

भडंग

मी उस्मानाबादची आणि उस्मानाबादमध्ये आम्हाला या भडंगच फार अप्रूप. वडील शिक्षकी पेशातले, कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत, सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांची सगळी सेवा ही तुळजापूर आणि उस्मानाबाद येथेच झाली. बालपणीच्या काही गोष्टी आपल्या मनात अश्या कोरलेल्या असतात की त्याचा कधी विसर पडत नाही त्यातलीच ही भडंग. वडील कोल्हापूरला त्यांच्या संस्थेत कुठल्या मिटींगला गेले की येताना ज्योतिबाचा गुलाल, दवणा आणि पोतभर भडंग घेऊन यायचे.

पुढे काय...मी कोल्हापूरची सूनच झाले! मग मग काय दूधो न्हाओ भडंग से!!!

मला एक पितळेचं भलं मोठं पातेलं सासूबाईंकडून खास भडंग हलवण्यासाठी मिळालंय! फोटोत दिसेलच. (त्याच्या कळकटलेपणावर जाऊ नका कारण 'बायको गेली माहेरी काम करी पितांबरी' हे मागचं वर्षभर करोनाच्या कृपेनुळे झालेलंच नाही :प) ही भडंग माझ्या अशी मदतीला धावून येते की तीची किंमत मीच जाणो. बाजीप्रभूंनी जशी दोन्ही हातात तलवार घेऊन पावन खिंड लढवली तश्या मी वाटीभर भडंगच्या जोरावर अनेक खिंडी लढवलेल्या आहेत. अचानक घरी टपकलेले पाहुणे, वेळी-अवेळी लागणारी भूक, काहीतरी खमंग चटपटीत खायचंय, आता काय खाऊ ? या सगळ्यावर एकच रामबाण उत्तर- वाटीभर भडंग!!!

भडंगाचे टिपिकल चुरमुरे आणि लसूण, कढीपत्ता, हिंग आणि शेंगदाणे यांत लपलेला त्यांचा प्राण! याशिवाय त्याला भडंग म्हणणं हे पापच. इथे ओरिसात मला भडंगासाठी लागणारे टिपिकल चुरमुरे मिळत नाहीत.

काही गोष्टी मिळतच नाहीत; त्यात माझी मुलं यातले शेंगदाणे खात नाहीत म्हणून मी या शेंगदाण्यांना फाटा दिलाय. मग मजबूरी का नाम... म्हणत मी जे काय करते त्यालाच भडंग म्हणतेय.

उडिया भाषेत चूरमुऱ्यांना मुडी म्हणतात. दारावर भाजी विकायला यावी तशी इकडे गावोगावी, शहरोशहरी मुडीचं पोतं सायकलला बांधून मुडीवाला दारावर मुडी विकायला येतो. ठरावीक रुपयांना ठरावीक आकाराच्या डब्याचं माप, अशी ती मोजून मिळते. आज सकाळी मी चाळीस रुपयाची मुडी विकत घेतलेलीय आणि या वाटीभर मुडीचा घाट घातलाय.

 • साधारण दोन ते तीन गड्डे सोललेला लसूण
 • भरपूर हिरवागार ताजा-ताजा (हे ऑप्शनल आहे) कढीपत्ता
 • चिरुन उन्हात वाळवलेला कांदा (तो मी करून ठेवलेला होता.)
 • जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ आणि पिठीसाखर

मसाला

कढईत अंदाजे वाटीभर तेल गरम करायचं; त्यात अगोदर सोललेला लसूण ओबडधोबड चेचून घेऊन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा; तळून घेतलेला हा लसूण चुरमुरयावर एका बाजूला ओतून ठेवायचा.

तळलेला कांदा

त्याच तेलात कढीपत्ता तळून घ्यायचा. गरम तेलात कढीपत्ता टाकल्याबरोबर तेल उडतं तेव्हा एका हातात कढीपत्ता आणि दुसऱ्या हातात एक ताटली घ्यायचीच. कडीपत्ता टाकला रे टाकला की दुसऱ्या हातातली ताटली त्या कढईवर धरायची जेणेकरून तेलाचा भपकारा सगळ्या घरभर उडणार नाही.

कढीपत्ता तळून घेतल्यानंतर तेलाचा ताव बर्‍यापैकी कमी झालेला असतो, त्याच आचेवर वाळवलेला कांदा तळून घ्यायचा. तो काळा होणार नाही याची पुरती काळजी घ्यायची.

हे तिन्ही जिन्नस चुरमुऱ्यांवर वेगवेगळ्या बाजूंना ओतून ठेवायचं.

भडंगांवर कांदा, लसून कढीपत्ता

त्यानंतर गॅस बंद करून गरम तेलात एकानंतर एक जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि अजून एकदोन मिनिटांनी लाल तिखट घालायचं.

ही फोडणी अशीच बाजूला ठेवून, दुसऱ्या बाजूला जेणेकरून आपल्या हाताला पोळणार नाही यासाठी एक कॅरीबॅग हातात घालून चुरमुरयावर ओतलेले कढीपत्ता-लसूण-कांदा याचे ढीग कुस्करून घ्यायचे.

प्लास्टिक

आता कढईतील तेलाची फोडणी या चुरमुऱ्यांवर टाकून हे सगळं चांगलं घोळून घ्यायचं.

शेवटी मीठ आणि पिठीसाखर पेरून हे सगळं प्रकरण एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू या ठेक्यावर पखडल्यासारखं झेलत राहायचं.

तळलेला कढीपत्ता, लसूण, कांदा, हिंग यांचा जो दरवळ घरभर पसरलेला असतो त्यावरून सगळ्यांना अंदाज येतोच की ही बाई तिची वाटीभर भडंग घेऊन पुढचे काही दिवस खिंड लढवायला तयार झालेली आहे!

पातेलंभर भडंग

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ही शुद्ध फसवणूक आहे. वाटीभर भडंग असं नाव देऊन ही बाई पातेलंभर भडंग दाखवत्ये!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाटीभर हे परिमाण किती खायचे याकरिता आहे; किती बनवायचे याकरिता नव्हे.

(कोण म्हणतो संयम सोपा असतो म्हणून?)

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सांगलीहून सुट्टीत गावी जाताना एक बॅग भडंगासाठी घ्यावी लागायची. कांदा घातलेले भडंग करून बघायला पहीजे. फोटो पाहून तों पा सु

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

ईथ नवशिकया जनतेसाठी साध सोप लाईक अस सांगायची काही सोय नाही ठेवलेली अध्यक्ष महोदय/महोदयेने
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या लाइक बटणाची एवढी सवय झालीये की बास. इथे आवर्जून लाइक दिल्याबद्दल धन्यवाद‌‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

फक्त हळद, तिखट घातलेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित सवयीचा परिणाम असेल, परंतु मलाही साधीच भडंग आवडते. बोले तो, कितीही तिखट केली, तरी वांदा नाही, परंतु, एरवी जरी लसणीचे अजिबात वावडे नसले, तरीसुद्धा, भडंगेत लसूण घातली, की काहीशी चमत्कारिक चव उत्पन्न होते, असे निदान माझे तरी मत आहे. अर्थात, पिण्डे पिण्डे रुचिर्भिन्ना...

बाकी, भडंग पुल्लिंगी की स्त्रीलिंगी? (मी तरी नेहमी स्त्रीलिंगीच वापरीत तथा ऐकीत आलेलो आहे. (चूभूद्याघ्या.))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(फोटोवरून) एंड प्रॉडक्ट खूपच रोचक तथा आकर्षक दिसतो आहे!

भडंगाचे टिपिकल चुरमुरे आणि लसूण, कढीपत्ता, हिंग आणि शेंगदाणे यांत लपलेला त्यांचा प्राण! याशिवाय त्याला भडंग म्हणणं हे पापच. इथे ओरिसात मला भडंगासाठी लागणारे टिपिकल चुरमुरे मिळत नाहीत.

गंमत आहे. इथे अटलांटात बसून मला सांगलीची भडंग (भारतातून कोणाला पाठवायला न सांगता) मिळू शकते. ('पटेल' हे आडनाव धारण करणारी जमात अत्यंत एंटरप्रायझिंग!) परंतु, (सांगलीहून तुलनेने पुष्कळच जवळ असलेल्या) ओदिशात नाही??? हा दैवदुर्विलास आहे!!! म्हणजे, गोरे बंधू (नि आणखी कोणकोण जे असतील ते) आपला माल अमेरिकेस निर्यात करतील, परंतु ओदिशास पाठवणार नाहीत! मग ओदिशातल्या मराठी बांधवाची (भडंग न मिळाल्यामुळे) परवड का होईना! हा सरासर अन्याय आहे. (शेवटी मराठी बांधवच मराठी बांधवास नाडतो, तो असा!) ओदिशातल्या मराठी मंडळींनी स्वतंत्र ओदिशा राष्ट्रासाठी आंदोलन केले पाहिजे! (किंवा, गेला बाजार, ओदिशाचे चलन बदलून भारतीय रुपयाऐवजी यूएस डॉलर करण्याची मागणी केली पाहिजे.) तरच त्यांच्यावरील अन्यायाचे निवारण होऊ शकेल.

काही गोष्टी मिळतच नाहीत; त्यात माझी मुलं यातले शेंगदाणे खात नाहीत म्हणून मी या शेंगदाण्यांना फाटा दिलाय.

!!!

खरपूस भाजलेल्या (लालसर सालीसकट) शेंगदाण्यांखेरीज भडंगेस काय मजा? शेंगदाण्यांची ॲलर्जी वगैरे असल्याखेरीज कोणी भडंगेतील शेंगदाणे का खाऊ नये, हे निदान माझ्या तरी आकलनाबाहेरचे आहे. (परंतु, उलटपक्षी, कोणी काय खावे, नि कोणी काय खाऊ नये, हे मी कोण ठरवणार, हा झाला एक भाग. दुसरे म्हणजे, मुलांच्या आवडीनिवडी चमत्कारिक असतात, हे वैश्विक सत्य आहे. (कधीकाळी मीदेखील मुलगा होतो, नि तूर्तास मुलाचा बाप आहे. त्यामुळे, समजू शकतो.) तर ते एक असो.)

ठीक आहे; हरकत नाही. त्या शेंगदाण्यांचे काय करायचे, हीच जर अडचण असेल, तर इकडे पाठवून दिलेत, तरी चालतील. (वास्तविक, आमचे जॉर्जिया राज्य हे शेंगदाण्यांचे माहेरघर आहे. त्यामुळे, इथे तुटवडा नाही. परंतु तरीही.)

बाकी,

मग मजबूरी का नाम... म्हणत मी जे काय करते त्यालाच भडंग म्हणतेय.

हा जो वाक्प्रचार आपण (अर्धवट का होईना, परंतु) वापरलात, तो उत्तरेकडला (बहुधा दिल्लीच्या बाजूचा; चूभूद्याघ्या.) एक अत्यंत लोकप्रिय, परंतु तितक्याच अश्लील अर्थाने वापरला जाणारा वाक्प्रचार आहे. (अधिक तपशिलात शिरत नाही, परंतु, संपूर्ण वाक्प्रचार 'मजबूरी का नाम महात्मा गाँधी' असा असून, त्याला काही लैंगिक connotations आहेत, एवढेच नमूद करू इच्छितो.)

नाही म्हणजे, वाक्प्रचार वापरल्याबद्दल आक्षेप नाही, परंतु, त्याचा उद्गम तथा त्यामागील अर्थमीमांसा आपणांस बहुधा ठाऊक नसावी, तथा, ठाऊक असती, तर आपण तो बहुधा वापरला नसता, अशी शंका आल्याकारणाने या उल्लेखाचे प्रयोजन. (उलटपक्षी, अर्थ ठाऊक असून आपण तो वापरला असल्यास, गृहीतकाबद्दल आगाऊ क्षमस्व.)

असो.

----------

तळटीपा:

अवांतर: पीनट ॲलर्जी हा एक अत्यंत जीवघेणा प्रकार असू शकतो!

किंवा शेंगदाणे घातलेली भडंग. (अतिअवांतर: एखाद्याला शेंगदाण्यांची जर खरोखरच ॲलर्जी असेल, तर भडंगेतले शेंगदाणे काढून टाकून उरलेली भडंग खाणे हेदेखील चालत नाही. शेंगदाण्यांचा नुसता संपर्क त्या खाद्यवस्तूशी आला होता, एवढे कारण पुरते!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोताची कॉफी पुण्या-मुंबईत कोणेएकेकाळीतरी सहज मिळत नसे. ऑस्टिनात सहज मिळते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणास एंड-प्रॉडक्टचा फोटो पाहून बिर्याणीची आठवण आली, किंवा कसे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाकृ, पदार्थ, पद्धत आणि लेखनशैली आवडली.

धन्यवाद.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी भडंग म्हणून जे खाल्लं त्यातले चुरमुरे हे राक्षसी आकाराचे होते. तसे चुरमुरे कुठे मिळतात ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चुरमुरे हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे पातळ, लांब. त्यांना चुरमुरे/मुरमुरे वगैरे म्हणतात. दुसरे जे बुटके, लठ्ठ असतात त्यांना भडंग म्हणतात. वरील खाद्यपदार्थ हा साधारणपणे मसाला भडंग वगैरे म्हणता येईल. हे सगळे विवेचन माझ्या माहितीबरहुकूम बरं का! चुभुदेघे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालच इथे मेतकूट व भडंग दोन्ही अनवट पदार्थ मिळाले. मेतकूट मिळाल्याने तर स्वर्गं २ बोटे ठेंगणा झाला. मुलीला तूप-मीठ-मेतकूट भात दिला व अर्थात मी ही खाल्ला. आता मी मरायला मोकळी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'शुभस्य शीघ्रम्' असे टंकणार होतो, परंतु हात आवरता घेतला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा
कावळ्याच्या .... वगैरे वगैरे Wink

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसऱ्या बाजूला जेणेकरून आपल्या हाताला पोळणार नाही यासाठी एक कॅरीबॅग हातात घालून चुरमुरयावर ओतलेले कढीपत्ता-लसूण-कांदा याचे ढीग कुस्करून घ्यायचे.

ही युक्ती माहीत नव्हती. मस्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धाग्याच्या सुरुवातीलाच कोल्हापुरी चिरमुऱ्यांचा उल्लेख वाचून वाटलं - सांगली कोल्हापूर साईडच्या लाल भडंगाची रेसिपी असेल.
ही रेसिपी त्या भेंडीच्या दाण्यांपेक्षा निश्चितच कारणेबल आहे पण तरी तळणे  वगैरे प्रकार असल्यामुळे आपला पास. बाकी जयसिंगपूरच्या अंबा भडंगाची आठवण येऊन अं ह झाले. 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि