कन्टेन्टचा सुकाळ आणि लॉज ४९

मी काही वर्षांपूर्वी जालावरचा रोचक कंटेंट : कुठे, कसा आणि कधी शोधायचा? हा धागा उघडला होता. अर्थात तेव्हाच्या त्रिशतकी धाग्यांच्या तुलनेत हा धागा लहानखुराच ठरला. आताच्या तुलनेत मात्र तो ऐसीच्या सुवर्णकाळातला वाटतो.
अलिकडं चित्रपटांनी आणि TV शोंनी overwhelm झाल्यासारखं वाटतंय. Netflix हळूहळू जोजेवांच्छीलतोते म्हणत एकसे एक रद्दड चित्रपट आणि शोज आणून भसाभस ओततंय. भारतीय वेब सिरिज आणि वेब फिल्म्स तर थेट डोक्यात जातात. एकजात कृतक आहेत. माझे Netflix, CuriosityStreams, Nebula, Prime Video, Hotstar, Rakuten Viki अशा बऱ्याच ठिकाणी खाती आहेत. तरीही मला सध्या प्रचंड प्रचंड स्क्रीनसंपृक्तत्ता आलेली आहे. आणि कंटाळा. Content पाहण्यापेक्षा तो शोधण्यातच जास्त वेळ जातो. मला जे हवं आहे, ते कुणीही “थांब, हे धर” म्हणून हातात ठेवत नाही.
एखादं रत्न हाती सापडावं तसा एखादा शो सापडतो. आणि हे असलं शोधून काढायला मी किती चाळण्या लावतो ते पाहा.
The Movie DB ह्या मुक्त आणि मुफ्त डेटाबेसच्या वर मी लिहिलेले दोन wrappers मी दर आठवड्याला चालवतो. ते थोडक्यात माझ्या आवडी नुसार मला शो निवडून देतात. तुम्ही TMDB च्या संकेतस्थळावरदेखील हे करू शकता. पण तिथे माझे निकष अधिक कडक करता येत नाहीत मी म्हणून मी हा उपद्व्याप केला. हे झालं TMDBचं. याआधी मी movieo.me वापरत असे. आताही वापरतो, पण अगदी क्वचित. नंतर rotten tomatoes वरती एकदा नजर टाकतो. मग IMDB वरती एकदा फेरी.
मध्यंतरी “तुम्हाला हे आवडत असेल हेही आवडेल” अशा पॉलिसीवर चालणाऱ्या अनेक सुचवण्या देणाऱ्या वेबसाईट्स आल्या होत्या. त्या सगळ्यांवर माझी अगणित खाती आहेत.
त्यानंतर पाळी आहे My Drama List, My Anime List यांची. yts.mx चाही यथायोग्य उपयोग (ॲडब्लॉकर लावून) केला तरी खूप चांगला माल सापडू शकतो. ओझु वगैरे मंडळी मला तिकडेच प्रथम सापडली होती. तेही संपले की मग शेवटी reddit वर प्रश्न विचारणे.
आणि इतकं सगळं केल्यावर सत्राशे साठ प्लॅटफॉर्मस आहेतच त्यांच्या त्यांच्या चाळण्या घेऊन. पण हे OTT प्लॅटफॉर्म्स मात्र खूप चोखंदळ होऊ देत नाहीत.
इतकं सगळं करूनही कितीतरी टन गाळ उपसावा लागतोच. मग जाऊन एखादं कमळ Lodge 49 सारखं कमळ सापडतं. रेडिटवर मला एका फॅनक्लबने मग Northen Exposure पाहायला सांगितलं. Thomas Pynchon वाचायला सांगितलं. My Kind Of Shit सापडल्यावर आनंद होतोय. Whisper Of The Heart मधल्या शिजुकुला रत्नांची गुहा सापडल्यावर जी अवस्था अनुभवावी लागली असेल तसं माझं झालं होतं ते NHK World मुळे. NHK world मला असंच कधीतरी एका स्वच्छ मोकळ्या दुपारी सापडलं होतं. तसा आनंद Pattson Und Findus सारखी ॲनिमेशन मालिका सापडल्यावरही झाला होता.

तर आता Lodge 49 बद्दल.
प्लॉटचा सारांश - टाळतो.
तिच्या तिच्या मस्तीत चालणारी आणि योग्य तिथे बोअर करुन उत्सुकता कायम ठेवणारी ही सेरिज आहे. नशीब - मानवी कर्तुत्व, कंटाळवाणे आणि भांडवली अर्थव्यवस्थांचे अपरिहार्य भाग असलेले mundane जॉब (भलेही ते खालच्या स्तरातले असोत की अगदी वरच्या) - सृजन आणि कामाचं स्वातंत्र्य असल्या विरोधाभासांच्या झुल्यांवर बिनदिक्कत एक चकार शब्द न काढता झुलणारी परंतु चुकुनही कंठाळी, प्रचारकी आणि दाखवायचे म्हणून दाखवायचे अशी मोंताजी कलात्मक न होणारी मालिका आहे. चमत्काराच्या (फिक्शनच्या) / शास्त्रीय सत्याच्या (वास्तवाच्या) सीमेवर डुलत डुलत थोडी सैल अशी पटकथा आहे आणि हे सगळे धागे मालिका पाहत असताना जाणवतही नाहीत इतकी ती हुश्यार आहे.
AMC नावाच्या नेटवर्कने काही मालिका बंद करून माझ्यावर आणि जगावर प्रचंड उपकार केले आहेत. मालिका बंडल असतात म्हणून मी “उपकार केले” म्हणत नाही. एखाद्या चांगल्या शोचा मोसमी रतीब थांबतो हा खरा फायदा. तथापि, ही मालिका गुंडाळावी लागल्यामुळे शेवट जरा नाटकी झाला आहे. पण चलता है. Thomas Pynchon चा जबरदस्त प्रभाव आहे मालिकाकर्त्यांवर.

image

या लॉज ४९ नंतर काय पाहावं असा पुन्हा निर्वात तयार झाला. मग Dispatches From Elsewhere ही मालिका पाहिली. How I met your mother या राक्षसी लोकप्रिय सिटकॉममधला Json Segel हा नट भरजरी लेखकपण आहे हे कळाल्यावर अधिकच आवडतो. (डेवीड फॉस्टर वॉलेस ची जबरदस्त भूमिका करणारा त्याचा the end of tour हा चित्रपट पाहिल्यावर या नटाची कपॅसिटी लक्षात आली होती )

Dispatches From Elsewhere या मालिकेतली गाणी लई आवडली. विशेषत: हे गाणं लगेच कानात लूपवर आलं.

Song for Zula जॉनी कॅशच्या Ring of Fire या गाण्यावर अवलंबून आहे. त्या गाण्याचं कव्हर नाही. हे गाणं सुपरस्टोअर नावाच्या एका मालिकेच्या फिनाले मध्ये आहे त्यामुळे अधिकच लोकप्रिय झालेलं दिसतंय. Adam Curtis च्या डॉक्युमेंटरीचाही या गाण्याशी काहीतरी संबंध आहे असं दिसतंय. (अधिक खोलात गेलेलो नाही.)
दोन्ही गाण्यांची पार्श्वभूमी सर्कशीतल्या थरारक खेळांची आहे. जॉनी कॅशचं गाणं अगदी उडत्या चालीचं, भरपूर ऑर्केस्ट्रा असलेलं त्या काळाला साजेलंसं असंच आहे. ( मदनमोहन यांची अशी फॅशनधार्जिणी, उडत्या चालीची गाणी ऐकवत नाहीत. मला कॅशचं गाणं ऐकून तसंच वाटलं.)
Phosphorescentच्या गाण्यात मला सर्वात आधी शब्द आवडले. मग गायकाचा पोत. आणि मग संगीत. कॅश जळत्या वर्तुळाच्या प्रतिमेतच अडकतो. पण Phosphorescent मात्र पिंजऱ्याकडे, तिकडून रात्रीच्या वाळवंटी पसाऱ्याकडे जातो. मुचाचो या अल्बम मधलं हे गीत इथे देतो.
---------------------------------------------------------------------
Some say love is a burning thing
That it makes a fiery ring
Oh but I know love as a fading thing
Just as fickle as a feather in a stream
See, honey, I saw love. You see, it came to me
It put its face up to my face so I could see
Yeah then I saw love disfigure me
Into something I am not recognizing
See, the cage, it called. I said, "Come on in"
I will not open myself up this way again
Nor lay my face to the soil, nor my teeth to the sand
I will not lay like this for days now upon end
You will not see me fall, nor see me struggle to stand
To be acknowledge by some touch from his gnarled hands
You see, the cage, it called. I said, "Come on in"
I will not open myself up this way again
You see, the moon is bright in that treetop night
I see the shadows that we cast in the cold, clean light
My feet are gold. My heart is white
And we race out on the desert plains all night
See, honey, I am not some broken thing
I do not lay here in the dark waiting for thee
No my heart is gold. My feet are light
And I am racing out on the desert plains all night
So some say love is a burning thing
That it makes a fiery ring
Oh but I know love as a caging thing
Just a killer come to call from some awful dream
O and all you folks, you come to see
You just stand there in the glass looking at me
But my heart is wild. And my bones are steam
And I could kill you with my bare hands if I was free
---------------------------------------------------------------------
सर्कशीतल्या उपमा मी आपल्या कवितांत अगदी क्वचित वाचल्या आहेत. त्यात ताकदीचा वापर तर फार दुर्मिळ. वरचं काव्य Dispatches from elsewhere मध्ये प्रेमासंदर्भातच वापरलं आहे. कोलटकरांच्या एका कवितेत शून्याकार आग आणि जळती मोकळीक आली आहे -
----------------------------------------
या जळत्या वर्तुळातून उडी मारून जा
आरपार
इकडून तिकडे
नि पुनः तिकडून इकडे
ही शून्याकार आग, ही जळती मोकळीक
रोजचीच आहे
ही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे..
---------------------------------------
हे अवांतरच आहे. तर, मला हे Song for Zula दीर्घकाळ लक्षात राहणार आहे. हे झुला प्रकरण काय आहे यात मी अजूनही शिरलो नाहीये. गाण्याचा प्रथमज्वर ओसरल्यावर शिरेन बहुदा!

एका मागुन एक असे हे मोहक गुंते योगायोगाने सापडताहेत. आणि हा कठीण काळ सुसह्य होतोय. रुमडाला सुम आल्यागत अचानक या निर्दयी साथीच्या काळात हताश झालेल्या मनाला टवटवी आली.

field_vote: 
0
No votes yet

इतके शोज तयार होत असतात की काय पाहाण्यासारखं आहे हे शोधून काढणं महामुष्किल, हे म्हणणं पटलं. फारच थोड्या सीरीज 'ब्रेकिंग बॅड'सारख्या नितांतसुंदर असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्यातलं काहीच न पाहिल्याने पास - पण Thomas Pynchon हा प्रकार इंट्रेस्टिंग वाटतोय - लायब्ररीतून मागवतो.
थँक्स!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भेंडी! यातली बरीच नावं मी प्रथमच ऐकली. शोधतो एकेक करून सगळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.