"वेदन -विरहित"

वेदन-विरहित सोफ्यावरती
वेदन -विरहित बसणे
आणि स्वच्छ त्या फरशीवरती
वेदन -विरहित उठणे.

वेदन -विरहित त्या फ्रिजमध्ये
मटण -कोंबडी नसणे
वरण -भात तो खाता खाता
वेदन -विरहित हसणे .

प्रसिद्ध लेखक बनणे सुद्धा
क्षितिजावरती नसणे
वेदन-विरहित जुने सिनेमे
पहाता पहाता हसणे!

कसे करावे जीवन अपुले
वेदन-विरहित आता?
विचारात त्या पडलो आहे
चिवडा खाता खाता!
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

व्वा! क्या बात है.
हा माझा पण वेदन-विरहित,जाणीव विरहित प्रतिसाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0