शेजारच्या काकूंच्या विनोदावर कुणीही चिडले नाहीत.

फेसबुक, ३ ऑक्टोबर

शेजारच्या काकूंनी दसऱ्याचं निमित्त साधून, अनेक वेगवेगळ्या लोकांच्या वृत्तींची टिंगल करणारा विनोद लिहिला.

सगळ्यात आधी मोदीभक्त त्यावर चिडतील असं त्यांना वाटलं होतं. कारण सुरुवातीला २ ऑक्टोबरच्या संदर्भात शास्त्रीजींचा उल्लेख न करता, गांधीजींचा उल्लेख होता. मग द्वेष्टेही चिडतील असं वाटलं होतं. कारण काकूंनी त्यात गांधीजींच्या स्त्रीवादाबद्दल कॉमेंट केली होती. पुढे तरुण, तडफदार आंबेडकरवाद्यांबद्दलही त्यांना किंचित शंका आणि किंचित आशा होती. या तीन राजकीय गटांपैकी किमान दोन गटातले लोक तरी काकूंच्या जोकवर चिडतील अशी काकूंची अटकळ होती. पूर्ण चोवीस तास झाले तरी या गटांतल्या कुठल्याही फार परिचित नसणाऱ्या व्यक्तींनी काकूंच्या नावानं शंख, ट्रोलिंग काहीही केलं नव्हतं.

काकूंची पुढची भिस्त त्यांच्या परिचित आणि मित्रमंडळावर होती. त्यांच्या जोकमध्ये ओळखीतल्या काही स्त्री-पुरुषांचेही नाव न घेता उल्लेख होते. कुणाचे चश्मे, तर कुणाच्या टोप्या उडवल्या होत्या. पण त्यांच्या परिचित आणि मित्रमंडळानंही त्यांच्या जोकमुळे भावना दुखावून घेतल्या नाहीत. जोक करून चोवीस तास झाले तरीही कुणी त्यांना व्हॉट्सॅपवर खाजगी संवादाचे, आणि या संवादांत काकूंना नावं ठेवल्याचे स्क्रीनशॉट पाठवले नाहीत. होलसेलात भावना दुखावून घेण्याची महासाथ भारतात पसरलेली असताना आपल्या जोकनंतर जणू भावनादुखीविरोधी लस घेतल्यासारख्या सगळ्यांच्या कातड्या ब्रिटिशांसारख्या जाड झाल्याचं बघून काकू अत्यंत त्रस्त झाल्या होत्या. आता जोक करणंच सोडून द्यावं असं काकूंना वाटायला लागलं, आणि त्यांना दरदरून घाम फुटला.

मिसो आणि राणी

शेजारच्या काकूंनी फेसबुकवर, ब्रिटिश चॅनल ४नं इंग्लिश राणीची वाभरट टिंगल करणारा व्हिडिओ बघितला, आणि त्या जागच्या जागी सोफ्यावरच लवंडल्या. लोकांच्या स्वप्नात मिलिंद सोमण, अँटोनियो बँडारेस, आणि ते नाही तर किमान पक्षी जिमचे ट्रेनर येतात. काकूंच्या स्वप्नांवरही मध्यमवर्गीय मर्यादा असल्याचं काकूंनी मान्य केलं आणि पुढचा जोक लिहायला बसल्या.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

शेजारचे काका आणि काकू हटाव्!!

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

+१. लैच रटाळ.
'द अनियन' ही ह्याची प्रेरणा आहे असं कुठे तरी वाचलं. अनियन (बऱ्याचदा) विनोदी असतं हा फरक नमूद करू इच्छितो.

छे. तुम्हाला काही सृजनशिलतेचं कवतिकच नाही.

शेजारचे काका काकू हे एक अचानक डिजिटल विश्वात गटांगळ्या खाणाऱ्यांचं प्रातिनिधिक रूपक आहे.
काही जण पिंपात मेल्या ओल्या उंदराच्या काळातच वावरत आहेत. साहित्यातील कालवर्णन किती दिवस कोसला आणि गारंबिचा बापू चौकात घुटमळणार?

शेजारचे काका काकू हे एक अचानक डिजिटल विश्वात गटांगळ्या खाणाऱ्यांचं प्रातिनिधिक रूपक आहे.
काही जण पिंपात मेल्या ओल्या उंदराच्या काळातच वावरत आहेत. साहित्यातील कालवर्णन किती दिवस कोसला आणि गारंबिचा बापू चौकात घुटमळणार?

आदिती मॅडम विविध विषयावर अत्यंत गंभीर पने लेखन करू शकतात.त्यांनी विविध विषयावर माहितीपर लेखन करावे.
गंभीर लेखन करावे
काका,काकू मध्ये अडकून राहू नये.
जे वाटले ते मांडले

लिही गं. मराठीत लिखाण होतय हे अतिशय महत्वाचे आहे. शिवाय मला आवडतय कारण एक काहीतरी मजेशीरपणा आहे जो मला पिनपॉइन्ट करता येत नाहीये. एक कसला तरी वेगळाच ह्युमर आहे. ते अनिअन वाचलेले नाही. पण तशा प्रकारचा असावा असा कयास.
शिवाय हे प्रयोग कधी फसतात तर कधी पळतात. ते चालायचेच.

काकूंच्या स्वप्नांवरही मध्यमवर्गीय मर्यादा असल्याचं काकूंनी मान्य केलं आणि पुढचा जोक लिहायला बसल्या.

हाहाहा!!!

अदिती, तुला असले लेख लिहायला कोण भाग पाडतंय जरा नाव सांग बरे.
.
एक लिहिलास तर मज्बूरी म्हणून ठिक आहे पण रेगुलरली असे टॉर्चर बरे नाही असे सांग त्यांना.