वसंत साठये Wed, 10/11/2021 - 15:29 आपलं असणं असं असावं जगणाऱ्या जीवा जशी हवा सर्वांतरीं, हृदयांत घुसावं न देता आस्तित्व जाणिवा आपलं नसणं असं असावं कुणाचं काहीही न अडावं प्रसंगीं कधी येता आठव त्यानं केवळ सुखच व्हावं त्यानं केवळ सुखच व्हावं वसंत साठये 10-11-2021 Like Dislike Log in or register to post comments