मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०९

Questions issues queries problems

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

field_vote: 
0
No votes yet

सातवाहनाच्या काळात डौलाने जगभर प्रवास करणारे साहसवीर नंतर कुठे गेले? व्यापाराचा एवढा मोठा वारसा आपण अचानक कसा सोडला? नंतर जवळजवळ दीड सहस्त्रक आपण नौकानयनाची विद्या पुरती गमावूनच बसलो होतो की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बंदर आणि गंगा राज्य. तिथून कंबोडिया वगैरे ठिकाणी व्यापारी गेले / जात होते. नंतर काय झाले कुणास ठाऊक. समुद्र पार करणे पापांंत नोंदले गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विचार आहे हे मला माहीत नाही .पण एक विचार माझ्या मनात नेहमी येतो.
जरा विस्ताराने सांगतो.

अणू स्फोटाची चाचणी घेतली की संबंधित देशातील नागरिकांना अभिमान वाटतो(हे पुढे असेच समजावे)
१)विनाशिका निर्माण केल्या की देश वासी आनंदी होतात.
३) अतिशय तीव्र क्षमतेचा विनाश करणारी सैन्याची ताकत असली की देश वासिय लोकांना गर्व वाटतो.
४) रोबोटिक सैन्य

५) drone
आणि असे अनंत हत्यार ,सैन्य दलाकडे असावीत.
पोलिस कडे असावीत
असे लोकांना वाटते.
पण हीच सर्व विनाशकारी अस्त्र , शस्त्र, ही दुसऱ्या देश सोडा हुकूमशाही वृत्ती चा नालायक माणूस देशाचा नेता झाला तर स्वतःच्या जनते विरूद्ध वापरेल.
सामान्य जनता त्याला विरोध करू शकणार नाही..
काहीच व्यक्ती करोडो लोकांना गुलाम बनवतील.
हा विचार माझ्या मनात नेहमी येतो.
स्पेस मध्ये राहून काही शे च लोक पृथ्वी वासियांचे मालक असतील असे पण मला नेहमी वाटते.
यांत्रिक मानव बनवणे हा अंतिम उद्देश च नाही.
मानवी मेंदू चे कार्य कसे घडते आणि मानवी मेंदू वर नियंत्रण प्राप्त करून माणसाला नियंत्रित करणे शक्य आहे का?
हाच अंतिम उद्देश आहे .
हाच हेतू बलाढ्य सक्षम लोकांचा आहे.
ही नेहमीच शंका येत असते.
निर्मिती खर्च झीरो आणि फुकटात साधन तयार होईल.

आणि हवं तेव्हा त्याचा विनाश पण करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सुमार नाही हेच खरे

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी होळीतली बोंब "अमक्या तमक्याच्या बैलाला घो/ ढोल/आणखी काही" चा अर्थ काय असावा?
इतर ठिकाणी म्हणजे राज्यातल्या आणि देशातल्या ठिकाणी बोंबलताय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या डिवाइसमध्ये बरोबर दिसते, पण दुसरीकडे पाठवल्यास ब्राह्मी लिपीसारखी अक्षरे दिसतात.
तर Unicode आणि बाइनरीकरण झालेले utf8 वगैरेसंबंधी लेख वाचले. पण प्रश्न असा आहे की अगोदरच्या फाइलमधले encoding कोणते होते व ते दुसरीकडच्या रीडरला न दाखवता येण्याचे कारण शोधता येईल का? म्हणजे कुठेतरी settings बदल करायचे व ते कोणते?

शिवाय एखादी text file - pdf मध्ये बदलू गेल्यास तिकडे विचित्र क्यारेक्टर उमटतात. याचेही कारण शोधायचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डिव्हाईस कुठलं, काय, त्यावर फाँट कुठले, त्यावर सॉफ्टवेअर कुठलं, वगैरे तपशील असल्याखेरीज रामदेवबाबासुद्धा तुम्हाला मदत करू शकणार नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण रजनीकांत नक्की करू शकेल. रामदेवबाबा रजनीकांतकडून औषधे घेतो, हे माहिती आहे कां?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

Android phone.
वेगवेगळ्या app आणि ओनलाईन साईट्समधून conversion करून पाहिल्यावर समजलं की काही ठिकाणी हा प्रकार होतो. zamzar dot com ने व्यवस्थित केली पीडीएफ.. बाकी आपला मजकूर कोणत्या encoding चा आहे हे समजलं तर बरं होईल. काही notepad editors ते auto detect करतात. ( Unicode/ANSIचे विविध फ्लेवर असतात.)

-------
१ - zamzam स्वर्गातला झरा .
Zamar - हिब्रू भाषेत देवाची स्तुती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0