दिलासा

अहा गळाले, गळाले ते पान
नव्हते झाले ते पुरेसेही जून
रंग हिरवा होता गडदलेला
न पिकल्या खुणा दिसल्या

दृष्टीला जवळी दूरचे ते जरी
उंचावर होते, डोले वाऱ्यावरी
सोसले ते ऊन देतांना सावली
देठांशी दोन फुले विसावली

दिले आईला जीवनभान
कायम हो त्याने भरभरून
तो श्वास-प्रकाश-अन्न-प्राण
सौंदर्य उत्साह यांचीही खूण

मागे उरलेल्यां येई रितेपण
न नभ पुरे टाकण्या भरून
कोवळे कोंब दिसताना काहीसा
सर्वांना मिळे थोडासा दिलासा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0