दखल
थॉमस चषक स्पर्धेतील ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय बॅडमिंटन चमूचे हार्दिक अभिनंदन!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२१
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ मे
जन्मदिवस : पर्शियन कवी उमर खय्याम (१०४८), छ. संभाजी आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू (१६८२), गणितज्ञ, क्रियाशील विचारवंत, युद्धविरोधी प्रचारक, नोबेलविजेता बर्ट्रांड रसल (१८७२), कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर (१८८५), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१८९७), पिच्युटरी ग्रंथीतील स्त्रावांवर संशोधन करणारे नोबेलविजेते व्हिन्सेंट द्यु व्हिन्यो (१९०१), माजी पंतप्रधान एच्. डी. देवेगौडा (१९३३), अभिनेत्री फरीदा जलाल (१९४९), क्रिकेटपटू ग्रॅहॅम डिली (१९५९)
मृत्युदिवस : मलेरियाचे रोगजंतू शोधून काढणारे नोबेलविजेते आल्फोंस लाव्हेराँ (१९२२), नागार्जुनसागर धरणाचे स्थापत्य अभियंता कानुरी लक्ष्मण राव (१९८६), पहिल्या भारतीय सिनेअभिनेत्री कमलाबाई गोखले (१९९७), पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे (१९९४)
---
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस.
आंतरराष्ट्रीय एड्स लसीकरण दिवस.
१९१० : पृथ्वी हॅले या धूमकेतूच्या शेपटातून गेली.
१९१२ : दादासाहेब तोरणे यांचे नाट्यचित्रीकरण "श्री पुंडलिक"चे मुंबईत प्रदर्शन.
१९४० : 'संत ज्ञानेश्वर' चित्रपट मुंबई-पुण्यात प्रदर्शित.
१९४४ : क्रीमिआतील तातार लोकांना सोव्हिएत रशियाने हाकलून लावले. उझबेकिस्तान व इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतर केले. त्यामुळे आज क्रीमिआत रशियन लोकांचे प्रमाण अधिक आहे.
१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.
१९७४ : पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी; आण्विक शस्त्र असणारा भारत जगातला सहावा देश बनला.
१९९८ : पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक ठरला.
दिवाळी अंक २०२१
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सुनील
प्रतिक्रिया
ब्रह्मांड
संपूर्ण ब्रह्मांडात फिरवून आणण्याची ताकद असलेली ही कविता, तिसऱ्या ओळीत आम्हां मर्त्य मानवांना IPL मध्ये पोचवते.
?
स्वत:ला आवडलेल्या स्वत:च्या कवितांचा तुम्ही एक संग्रह का नाही करत? मी म्हणेन की तसं काहीतरी करून त्याची पीडीएफ करून स्वत:च्या जन्मदत्त नावाने आर्काईव्ह्स वर टाकून द्या आणि विसरून जा. लोक वाचतील. ज्यांना त्या आवडतील त्यांना आवडतील. कविता त्यासाठीच असतात.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
!
यावरून एक जुना विनोद आठवला.
एकदा एक मनुष्य आपल्याशीच मोठ्याने गाणे म्हणत असता त्याच्या मित्राने ते ऐकले, नि त्यासि वदता झाला: “मित्रा, तू रेडिओवर का बरे गात नाहीस?”
मनुष्य, खूष होत्साता: “का रे बुवा? मी इतका चांगला गातो काय?”
“तसे नव्हे रे! परंतु, रेडिओ बंद करता येतो.”
—————
(अवांतर: रेडिओ त्यासाठीच असतो.)
!?
स्वयंघोषित गायकाची मुंडी पिरगळून त्यास गप्प करण्याने जितके समाधान मिळेल तेवढे रेडिओची खुंटी पिरगळून तो बंद करण्याने मिळेल काय?
(अवांतर: मित्राच्या समाधानासाठी कायपण)
अर्थातच नाही!
अर्थातच नाही!
त्या परमोच्च सुखाची सर दुसऱ्या कशालाच नाही.
मात्र, समाजात काही गोष्टी करता येत नाहीत. सबब, कशाचीतरी तहान दुसऱ्या (समाजमान्य) कशानेतरी भागवावी लागते, झाले.१
(या प्रकारास sublimation असे संबोधले जाते.)
असो चालायचेच.
—————
१ “तुझे अपना नहीं सकता, मगर इतना भी क्या कम है, कि कुछ घड़ियाँ तेरे ख़्वाबों में खो कर जी लिया मैं ने?”? (साहिर लुधियानवी.)