मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ११०
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
ॲपल आयपॉड अखेरीस बंद
आयपॉड हे मी ॲपलचे विकत घेतलेले पहिले प्रॉडक्ट. मी स्वतःला ॲपल फॅन समजत नाही पण ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलची दणकट बॉडी, अत्यंत भरवशाचे स्क्रोलव्हील, सुंदर आवाज, दिवसेंदिवस चालणारी बॅटरी या सगळ्या गोष्टींमुळे वापरायला खूप मजा आली. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या एका मित्राला बाबापुता करुन आणायला लावला. विकत घेतला तेव्हा मी माझे नाव त्यावर कोरुन घेतले होते. खिशात जवळपास २०००० गाणी ठेवू देणारा हा म्युझिक प्लेअर मी जवळपास १० वर्षे वापरला. हिंजवडी ते चिंचवड अशा पायपिटी करताना आयपॉडने साथ दिली. मराठी, हिंदी, इंग्रजी, नवी, जुनी गाणी, पु.ल. देशपांडे, शंकर पाटील, बाबामहाराज सातारकर वगैरे बरंच काही ऐकलं. यात गाणी मॅनेज करण्यासाठी ॲपलचे आयट्यून हे अतिभयानक साॅफ्टवेअर वापरावे लागे. तो एक प्रकार सोडला तर आयपॉड मस्तच होता. फोनवरच गाणी ऐकता येऊ लागल्यामुळे आयपॉडची गरज राहिली नाही तेव्हा विकून टाकल्यानंतर आयपॉडबाबत गेली अनेक वर्षे काही वाचले नव्हते. उरलेला माल संपल्यावर आयपॉडची विक्री अखेरीस बंद होणार ही बातमी वाचल्यावर अचानक आयपॉडबद्दल आठवले.
ॲपल
ॲपल या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरल्यावर या कंपनीची कशी उगाचच हवा निर्माण केली गेली आहे ते लक्षांत येते. आयपॉड साठी आयट्यून वापरण्याची सक्ती ही त्रासदायकच होती. तसेच त्यांचा आयपॅड हा सुरवातीला प्रचंड लोकप्रिय झालेला प्रॉडक्ट वापरताना असे लक्षांत आले की तो दिवसेंदिवस स्लो होत जातो. आणि शेवटी वापरण्यायोग्य रहातच नाही. शिवाय ॲपस च्या बाबतीत मोनोपोली, इतर प्रॉडक्टसशी नॉन - कॉम्पॅटिबिलिटी हे त्रासदायक ठरतात. सध्याच्या संपूर्ण सॉलिड स्टेट पीसींपुढे तर हे प्रॉडक्टस कासव ठरतात.
माझा अनुभव थोडा वेगळा आहे
आयपॉड वापरल्यानंतर सुमारे दहाएक वर्षे मी ऍपलचे एकही प्रॉडक्ट वापरले नाही. मात्र गेली पाचएक वर्षें मॅकबुक आणि आयपॅड वापरतोय. काही महिन्यांपासून आयफोन वापरतोय. पीसीच्या मानाने मॅकबुक खूपच चांगला आहे. आयपॅड ठीक ठाक. अजून जाणवण्याइतका स्लो झालेला नाही. आयफोन मात्र आवडला नाही.
!
wow!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आमचं लाडकं द अनियन
Apple Discontinuing iPod After 21 Years
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अमेरीकेत
अमेरीकेत ऍपल च्या उत्पादनाची काय किंमत आहे ?भारताशी तुलना नको.तेथील अर्थ व्यवस्था नुसार..
आणि भारतात किती आहे ते माहीत च आहे.
खुप वर्ष पूर्वी माझ्या मित्राने ऍपल चा मोबाईल घेतला होता किंमत ४० हजार पण त्या मध्ये व्हिडिओ play होत नसे.
बाकी किरकोळ मोबाईल मध्ये व्हिडिओ play होत होता..१९ ते २० वर्ष पूर्वी ची घटना असावी.
किंमत
मागच्या वर्षी मी (बायको फारच मागे लागली होती म्हणून, नि त्या निमित्ताने ही शिंची आयफोन, आयफोन म्हणतात ती भानगड नेमकी असते तरी काय, ते पाहावे, म्हणून) तीन आयफोन-१२ (स्वतःसाठी, बायकोसाठी, मुलासाठी) घेतले. प्रत्येकी $८००च्या आसपास या दराने जवळपास $२,४००चा फटका बसला. (तरी बरे, लेटेष्ट आयफोन-१३ घेतला नाही, नाहीतर आणखी मोठा फटका बसला असता. सामान्यतः माझी मजल ही $१००-२००दरम्यानचा स्वस्तातला अँड्रॉइड घेण्याकडे असते. या वेळी बायको जरा जास्तच मागे लागली, म्हणून…)
माझे प्रामाणिक मत: उगाच जास्त पैसे मोजून एक अत्यंत convoluted प्रकार स्वतःच्याच गळ्यात मारून घेण्याचा वायझेडपणा आहे. असो चालायचेच.
(अपेक्षित श्रेणी: माहितीपूर्ण.)
कोणाला हा प्रश्न पडत नाही पण मला पडतो
भारताच्या स्वतंत्र लं ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत हा काळ काही खूप मोठा नाही.
भारताच्या स्वांतंत्र लढ्यात सहभागी असणारे,स्वतंत्र भारत कसा असावा हे ठरवणारे नेते.
महात्मा गांधी.
Dr Babasaheb.
भगत सिंग,राजगुरू,सुखदेव,नाना पाटील ,झासी ची राणी असे खूप सारें
स्वतंत्र भारताचे वय ७५ वर्ष.जास्तीतजास्त दोन पिढ्या होवून गेल्या.
आपल्याला माहीत असणाऱ्या प्रसिद्ध स्वतंत्र योध्ये,धोरण ठरवणारे.
ह्यांची मुल सत्तेत का नाहीत ? हा पहिला प्रश्न.
ही सर्व लोक खरेच लोकप्रिय असतील तर त्यांची एक पिढी तरी सत्तेत असती.
भारतात निवडणुका चालू झाल्या ह्यांचे वारस का निवडून आले नाहीत हा दुसरा प्रश्न.
आदरणीय होते ना देशाला
नेहरू घराणे मात्र आता पर्यंत सत्तेत होते त्यांचा त्याग मोठा होता का?
खुप किचकट प्रश्न मला पडतो.
अगदी सरदार पटेल चे पण वारसदार सत्तेत नाहीत.
पण स्वतंत्र नंतर सत्तेत आलेल्या लोकांच्या जे देशाच्या स्वतंत्र लढ्यात सहभागी नव्हते,ह्यांनी बिलकुल कोणता ही त्याग केला नव्हता.
खोलवर अभ्यास केला तर त्यांचे पूर्वज ब्रिटिश लोकांचे हित चिंतक च असतील.
अशा लोकांच्या घरात मात्र पिढ्यान् पिढ्या सत्ता आहे.
लोक मूर्ख आहेत का निवडून देणारी?
स्त्री लं दैवत्व बहाल करून तिला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवून तिचे शोषण करण्याची जी पद्धत समाजात आहे
तसाच हा प्रकार तर नाही ना?
" xxxx यांना पडून
इतरांना अनुत्तरित करणारे प्रश्न व xxx यांना सुचणारे चिंतनीय विचार" असा धागा त्वरेने काढण्याचा विचार ऐसीचे कर्तेधर्ते का करत नाहीत?
म्हणजे राजेशजींना तुम्ही xxx
म्हणजे राजेशजींना तुम्ही xxx म्हणताय?
लंकेची पनवती
स्वर्गाहूनी रम्य म्हणवली जाणारी लंका इतक्या अधोगतीस कशी काय प्राप्त करती झाली? श्रीलंका अवघ्या दशकभरापुर्वी जवळजवळ सर्व मानांकनात सर्व सार्क देशांत सर्वात आघाडीवर असे. सर्वत्र माजलेले अराजक लंकेस आणखी काय काय दिवस दाखवणार आहे ते त्या दशाननालाच ठाऊक.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
???
मग काय, लंकेत रामराज्य यावे अशी तुमची इच्छा आहे?
काय फरक आहे
राम राज्य काय आणि रावण राज्य काय दोन्ही राज्य समृध्द च होती.
राम चे नाव घेवून मिळणारी सत्ता काय आणि रावणाचे नाव घेवून मिळणारी सत्ता काय.
एकच असते दोन्ही.
लोकशाही सत्ता पद्धती मध्ये
देशाचे ,राज्याचे राज्य करते म्हणजे लोक प्रतिनिधी.
देश आणि राज्याच्या गरजा काय
१)सर्वांना समान न्याय जात,धर्म,आर्थिक स्थिती,प्रतिष्ठा ,प्रांत, लिंग ह्याच्या शी काही देणेघणे नसावे.
२)देश आणि राज्य ह्यांची प्रगती व्हावी आणि ह्या प्रगतीत समजतील सर्व घटक समाविष्ट असावेत.
३) पर राष्ट्र धोरण
कोणते देश आपल्याला योग्य सहाया करत आहेत ह्याची ओळख पटवणे आणि त्यांच्या शी मैत्री करणे.
काय दिसतं आहे आज.
लोकप्रतिनिधी कसे निवडले जातात
त्यांची जात कोणती आहे,त्यांचा धर्म कोणता आहे,ते कोणती भाषा बोलतात,त्यांचा प्रांत कोणता आहे.अजून तरी लिंग कोणते आहे हे बघून मत दिले जात नाही पण पुढे सांगता येणार नाही.
पुढे स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे शत्रू होवू शकतात.
ह्या विचार श्रेणी मुळे
गाढव असणारा मूर्ख व्यक्ती पण लोकप्रतिनिधी म्हणजे सत्ता धारी होत आहे .
फक्त जात,धर्म,भाषा ह्या मतदार लोकांची संख्या जास्त असल्या मुळे.
ह्या अशा गाढव सत्ता धारी कडून देश हीत होणारच नाही..
लोक प्रतिनिधी गाढव असतील तर त्यांना निवडून देणारे महा गाढव आहेत.
नवीन अंध श्रद्धा.
जातीचा लोकप्रतिनिधी च आपल्या जाती च भले करेल.
आपल्या धर्माचा लोक प्रतिनिधी आपल्या धर्माचे भले करेल.
आर्थिक स्थिती वर हा नियम लागू नाही.
उच्च आर्थिक घटकातील लोक प्रतिनिधी गरीब लोकांचे कधीच भल करणार नाही..