"चाळिशीचे पुरुष"

एक एक दरवाजा
पुन्हा न उघडण्यासाठी
बंद करीत करीत
पुरुष चाळीस वर्षाचे होतात.

चाळीस वर्षाचे पुरुष असतात
मुलगा कमी , बाप अधिक
दाढी करताना त्यांच्या आरशात चमकून जातो
बापाच्या रेझरने रक्ताळलेल्या गालांचा
पाच वर्षाचा पोरगा .

संध्याकाळी बाल्कनीतून अंधार बघताना
काहीतरी अंधारे , जडशीळ साचत जाते
हप्तेबंदीने खरेदी केलेल्या
त्यांच्या घराच्या सभोवताली.
xxx
(आधारित).

field_vote: 
0
No votes yet