तक्रारविल

हार्ड आणि पॉर्नी इमेजीचं, पोएटिक क्रिएशन
तुझ्यावरती फुगा फुटल्यासारखं येऊन आदळतं,
आणि तुझ्या अनावधनाची सिचुएशन साधून
कडव्यांमुळे तुटलेल्या जालथ्रेडचं
निमित्त साधून एक जण
बाहेर काढतो अलगद फेसबुकी ओळख.

तिथून मी पॅन करतो तर
खरडीवर आणि थ्रेडवर स्ट्रीम होत होत
तू रतिब घातलेल्या, पझलवलेल्या
कवितांच्या अर्थावर काही मिनिटे आणि
घाम गाळून, ऑफिस विसरुन
चौकटीत बडबड पिंका टाकणार्‍या
एका वाचनात कळेनाशी होतेस.

आम्ही वाचक अवाक्.
आमचे मॉडरेटर अवाक्.
आमच्या साइटवर, प्रतिसादात
आम्ही सारेच दात दाबून
स्तब्ध.

तू एका हींट ने आम्हाला
सॉलिड अर्थ
पाठव.

आम्ही सारेच जंतू -
तुझ्या डेट्यामध्ये
साठव.

लागलेला वेळः दोन मिनिटांपेक्षा कमी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वर आणत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टैपींगसकट लागलेला टैम द्यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0