Publish and be damned

'नेचर' या नियतकालिकामधला अग्रलेख Publish and be damned यावर आधारित.

पदार्थविज्ञानाच्या जगात 'नेचर' या नियतकालिकाला सर्वाधिक मान आहे. सामान्यतः संशोधनातली पद्धत अशी की एखाद्या वैज्ञानिकाने किंवा वैज्ञानिकांच्या गटाने काही प्रयोग करावेत, काही सिद्धांतांचा अभ्यास करावा आणि त्यातून जे काही नवीन आकलन होते ते कोणत्याही (मान्यताप्राप्त) नियतकालिकामधे छापून आणावे. यामुळे त्या त्या काय संशोधन सुरू आहे हे इतर वैज्ञानिकांना समजते, त्यातून काही नवीन कल्पना डोक्यात येतात शिवाय मूळ संशोधन करणार्‍या संशोधकांना प्रसिद्धी, पुढची नोकरी, पगारवाढ इ. इहलोकीचे फायदे मिळतात.

गेल्या वर्षी सप्टेंबरमधे प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे कण शोधल्याचं संशोधन ऑपरा, Oscillation Project with Emulsion-tRacking Apparatus, या गटाने प्रसिद्ध केले होते. पुढच्याच काही महिन्यात त्यांनी आणखी एक निवेदन प्रसृत केले. मागचे निकाल चूक असल्याचं हे निवेदन होतं. अशा प्रकारच्या अनेक छोट्या-मोठ्या घटना वैज्ञानिक जगात आत्तापर्यंत घडलेल्या आहेत आणि पुढेही घडत रहातील. पण या घटनेला एक वेगळी मितीही आहे, प्रसिद्धी आणि माध्यमांची.

निर्वात पोकळीतला प्रकाश विश्वात सर्वांत वेगवान आहे हे गृहीतक आईनस्टाईनचा विशेष सापेक्षता सिद्धांताचा (special relativistic theory) एक पाया आहे. या सापेक्षता सिद्धांताचे सामान्यांच्या रोजच्या आयुष्यातले महत्त्व आजच्या काळातल्या जीपीएस प्रणालीमुळे आहे. न्यूटनचे गतीविषयक नियम, आईनस्टाईनचा सापेक्षता सिद्धांत, स्टीफन हॉकिंगचा विश्वरचनेसंदर्भातले सिद्धांत (उदा: कृष्णविवरांसंदर्भातलं हॉकिंग रेडीएशन) इत्यादी गोष्टी व्यवहारात फार उपयुक्त नसतील, समजल्या नाही तरीही सामान्यांना माहित असतात. (एका प्रकारे देव किंवा बाबाच.) तर अशा आईनस्टाईनचा सापेक्षता सिद्धांत योग्य आहे का अयोग्य याची चाचपणी अनेक प्रयोगांतून भौतिकशास्त्रज्ञ करत असतात. या सापेक्षता सिद्धांताच्या मुख्य गृहीतकाला तडा जाणारे निकाल ऑपराच्या टीमने गेल्या वर्षी सप्टेंबरमधे घोषित केले होते.

ऑपरा या नावाखाली शास्त्रज्ञांचा गट न्यूट्रीनोवर काम करतो. हे भूतासारखे गुणधर्म असणारे कण असतात. नाव न्यूट्रॉनप्रमाणेच, आणि दोन्ही कणांचा विद्युतभार शून्य असतो. इथेच हे साधर्म्य संपतं. न्यूट्रीनो हे कण अतिशय कमी किंवा नगण्य वस्तूमान असणारे असतात. हे कण पदार्थांशी फारसे इंटरॅक्ट (मराठी?) करत नाहीत. आत्ता हे वाक्य वाचतानाही तुमच्या शरीरातून असंख्य न्यूट्रीनो कण जात आहेत. किंवा आपलं शरीर न्यूट्रीनो कणांसाठी पारदर्शक आहे. सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा आणि मोठा न्यूट्रीनोचा नैसर्गिक स्रोत. सूर्यातून निघालेले न्यूट्रीनो शोधण्यासाठी जमिनीखाली, कित्येक किलोमीटर आत, एखादा वापरात नसलेल्या खाणीत डिटेक्टर्स ठेवतात. सर्न या प्रयोगशाळेत या कणांचा इतर काही संदर्भात अभ्यास सुरू असताना न्यूट्रीनो प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करत आहेत असं लक्षात आलं.

सामान्यतः शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या प्रचलित सिद्धांतांच्या खंडन-मंडनास नेहेमीच तयार असतात. पण गेली १०० वर्ष जो सिद्धांत भौतिकशास्त्राचा भक्कम आधार म्हणून काम करतो आहे, तो झटक्यात झटकून टाकायला कोणी सहज तयार होत नाही. उपरोल्लेखित निकालात न्यूट्रीनोंची प्रकाशापेक्षा अधिक गती दिसली तरीही त्याचे कोणतेही वैध स्पष्टीकरण मिळाले नाही. हे निकाल तरीही प्रसृत झाले. त्यापुढच्या, त्याच प्रकारच्या पण थोड्या वेगळ्या ICARUS नामक प्रयोगात उलट ऑपराच्या निष्कर्षाच्या उलट आणि सापेक्षता सिद्धांताला पुष्टी देणारेच निष्कर्ष (इकॅरसचा पेपर) मिळाले.

या वर्षी फेब्रुवारीत ऑपराच्या टीमने त्यांच्या निरीक्षणात त्रुटी असण्याची दोन कारणं जाहीर केली. त्यातलं महत्त्वाचं कारण निघालं ऑप्टीकल फायबर मधला दोष. त्यामुळे त्यांचे मूळ मोजमाप अपेक्षेपेक्षा ६० नॅनोसेकंदांनी कमी येत होते परिणामतः न्यूट्रीनोंचा वेग प्रकाशापेक्षा अधिक आहे असं दिसत होतं. ऑप्टीकल फायबरमधील बिघाडापेक्षा, न्यूट्रीनो वेगळ्या मितीतून प्रवास करत असल्यामुळे अपेक्षेच्या आधीच पोहोचत होते हे स्पष्टीकरण शास्त्रज्ञांना अधिक रोमँटीक वाटत होतं, पण ते प्रत्यक्षातलं कारण नव्हतं. २०० लोकांच्या गटात ही बातमी गुप्त रहाणं कठीणच होतं; काही शास्त्रज्ञांनी या कमी रोमँटीक किंवा अरोचक स्पष्टीकरणाच्या बातमीतून अंग काढून घेतले. पण या बातमीमुळे पुन्हा एकदा प्रायोगिक आणि/किंवा निरीक्षक शास्त्रज्ञांनी आपली उपकरणं, analysis, errors (मराठी?) याबद्दल अतिशय जागरूक असावं ही गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट होते आहे. शंभर वर्षांपूर्वी लॉर्ड रॅले किंवा लॉर्ड केल्व्हीन आपले शोध, त्यातील त्रुटी याच 'नेचर'मधे प्रकाशित करत आणि लगेच पुढच्या अंकातही त्याबद्दल काही विचार किंवा सरळ उत्तरच कोणी ना कोणी मांडत असे. आज मात्र अनेक लोकांच्या कोलॅबोरेशनमधे प्रयोग होतात आणि त्यातून निघणारे निष्कर्ष अनेक चाळण्यांमधून पुढे गेल्यानंतरच प्रकाशित होतात.

'नेचर'चं संपादक मंडळ पुढे म्हणतं, ऑपरा गटाने त्यांचे निष्कर्ष प्रकाशित केले आणि ते मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. घडल्या प्रकारानंतर ऑपराच्या प्रमुखांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यांच्या गटाचं नेतृत्त्व कोणी करावं हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. पण त्यांनी या प्रकारातून जो खुलेपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांची टवाळी होऊ नये. सध्याच्या चालू कल्पनांपैकी एखाद्या कल्पना, सिद्धांताला धक्का देणारे निष्कर्ष मिळाले तर फक्त प्रचलित स्पष्टीकरणांच्या दृष्टीने अडचणीचा मामला असल्यामुळे असे निष्कर्ष दुर्लक्षित होऊ नयेत. ऑपरामुळे सैद्धांतिक भौतिकशास्त्राची झालेली अडचण प्रसिद्धीच्या प्रकाशात आणि सामान्यजनांच्या नजरेसमोरच सोडवली गेली. त्यातून निघालेले निष्कर्ष फार उत्कंठाजनक, रोमँटिक भले नाहीत, पण त्यामुळे विज्ञानात आवश्यक असणारी प्रयोगशीलता आणि कष्ट घेण्याची तयारी यांचे महत्त्व लक्षात यावे. झालेल्या चुका आणि धक्के पचवणे हीच पुढे जाण्याची उत्तम सुरूवात असते. सचोटीला पर्याय नाही.

१. प्रथितयश संशोधक ज्या प्रकाशनांमधे संपादक म्हणून काम करतात. वर्तमानपत्रं, स्थानिक पातळीवरची इतर प्रकाशानं नव्हेत.
२. अशा प्रकारच्या गतीला superluminal motion असं नाव आहे.

---
अ. शास्त्रीय संज्ञा इंग्लिशमधे देण्याचं कारण इंटरनेटवर त्याबद्दल अधिक माहिती शोधणे सोपे जावे.
आ. सदर लिखाणाकडे माहिती म्हणून पहावं का चर्चाविषय याचा निर्णय वाचकांनी घ्यावा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

Interact = आन्तरक्रिया / अन्योन्यक्रिया
Analysis = विश्लेषण [पृथक्करण (?)]
Error = त्रुटि / अधिक-उणे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील लिखाणावरून 'कोल्ड फ्यूजन' ची आठवण झाली. ते असेच काही होते काय?

'ब्लूम बॉक्स' २ वर्षांपूर्वी असेच गाजले होते आणि 60 Minutes ने त्यावर २० मिनिटे खर्चहि केली होती. त्याचे पुढे काय झाले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला म्हंजे शास्त्रज्ञलोक केलेल्या चुकांची जाहिर कबुली देतात तर! Smile चांगलंय
मात्र जर तो शोध सत्य निघाला असता तर आधुनिक विज्ञानात होऊ शकणार्‍या उलथापालथीची कल्पना करतोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चला म्हंजे शास्त्रज्ञलोक केलेल्या चुकांची जाहिर कबुली देतात तर! (स्माईल) चांगलंय

होय तर. असे पेपर्स अधूनमधून दिसत रहातात. (एक एप्रिलला न चुकता एक मजेशीर पेपर येतोच येतो. आणि त्यावरही प्रचंड मेहेनत केल्याचं समजतं.)
माझ्या एका एक्स कलीगचं मत होतं, "पीएचडी थिसीसमधे केलेला दावा कधी ना कधी खोडून काढला जातोच. तो पहिल्या पोस्टडॉकमधे स्वतःच खोडून काढण्यातली मजा मला मिळते आहे."

मात्र जर तो शोध सत्य निघाला असता तर आधुनिक विज्ञानात होऊ शकणार्‍या उलथापालथीची कल्पना करतोय

फार प्रचंड उलथापालथ आत्ताच झाली असती असं वाटत नाही. न्यूटनच्या नियमांना जशी मर्यादा आहे तशी काही मर्यादा कदाचित सापेक्षतावादालाही आली असती. सापेक्षतावादाने इतर अनेक गोष्टी सिद्ध करता येतात, त्यांचे अन्य काही स्पष्टीकरण शोधणं कठीण गेलं असतं; त्यापेक्षा मर्यादा घालून पुढचा सिद्धांत मांडणं सोपं असावं.
"ब्लडी थिअरिस्ट"नी याबद्दल काही बोलावं. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला पण "मात्र जर तो शोध सत्य निघाला असता तर आधुनिक विज्ञानात होऊ शकणार्‍या उलथापालथीची कल्पना करतोय" असेच वाटून गेले.
त्यावरचे अदितीचे स्पष्टिकरणही पटले. बाकी जास्त या विषयातलं काही कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

>>त्यांनी या प्रकारातून जो खुलेपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांची टवाळी होऊ नये.

>>झालेल्या चुका आणि धक्के पचवणे हीच पुढे जाण्याची उत्तम सुरूवात असते. सचोटीला पर्याय नाही.

मराठी आंतरजालावर खुलेपणा दाखवा न दाखवा, टवाळी होतेच. सचोटी आणि पारदर्शकता वगैरेंच्या गप्पा केल्या तर धागे उडतात किंवा आय.डी बॅन होतात. थोडक्यात, शास्त्रज्ञांनी मराठी आंतरजालावर वावरू नये. Wink
(हां, 'सत्यमेव जयते' मात्र पाहावं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रोचक..:)

>पण त्यांनी या प्रकारातून जो खुलेपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांची टवाळी होऊ नये.
खुलेपणाबद्दल टवाळी न होता, झालेल्या बिनडोकपणासाठी होईल/झाला असेल, अर्थात ती टवाळी करणारे त्या लायकीचे असावेत ही माफक अपेक्षा योग्य असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक संशोधक स्वतःचीच टवाळी करतात हे बर्‍याचदा लक्षात येतं. शास्त्रज्ञांच्या वापरातल्या सर्व्हर्स-कंप्यूटर्सची नावं, लिहीलेल्या सॉफ्टवर्सची नावंसुद्धा अनेकदा मजेशीर असतात.

कोणाची टवाळी मनावर घ्यायची आणि मनावर घेऊन पुढे काय करावं हे समजलं की झालं, नाही का? बाकीची टवाळी "शब्द बापुडे केवळ वारा". श्रेणी द्या आणि पुढे चला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख अर्थातच आवडला. याबाबतच्या टाइम्स मधल्या दोन्ही बातम्या त्यावेळी वाचल्याचे आठवल्याने स्वतःची पाठ थोपटून घेतली. (म्हणजे अजूनही माझा विज्ञानाशी संबंध आहे तर!)
'न्यूट्रीनो' बद्दल जास्त वाचायला आवडेल अदिती. कारण हल्ली येऊन गेलेल्या जगबुडीच्या सिनेमांमधे यावर बरीच फेकाफेक केलेली आठवते.
न्यूट्रीनो चा विद्युतभार शून्य असतो हे समजले. त्यांना काही वजन असते का ? ते आपल्या माहितीच्या कुठल्या अ‍ॅटम मधे असू शकतात का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

ओपेराने ज्या प्रकारे न्यूट्रीनो प्रयोग प्रकाशित केला होता तो चांगल्या प्रकारे केला, असे माझे मत आहे. "यात काय त्रुटी असू शकते" असे त्यांनी मूळ निबंधातच मुख्य कुतूहल म्हणून मांडले होते. आणि अधिक शोधता त्रुटी निघाल्या, हेसुद्धा ठीकच आहे.

अनपेक्षित निरीक्षणे, त्यातल्या त्यात जर सहजरीत्या त्रुटी सापडत नसतील तर प्रकाशित करावीत. जेणेकरून अधिक लोकांच्या परीक्षणामुळे एक तर त्रुटी सापडेल, किंवा सिद्धांत बदलण्यास चालना मिळेल.

"सहजरीत्या त्रुटी सापडत नसतील तर" असे का म्हटले? निरीक्षण करणार्‍या चमूने स्वतःहून त्रुटी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर फसलेली निरीक्षणे आणि फसलेले प्रयोग फार असतात. त्यातील त्रुटी शोधण्याचे काम "क्राउडसोर्स" करणे ठीक नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ इङग्रजी लेख वाचला. अनेक गमतीशीर गोष्टी कळल्या तरी त्याबद्दल बातमी देण्याची (करण्याची) 'नेचर' च्या सम्पादकाञ्ची भूमिका नीट समजली नाही. हाच लेख अवैज्ञानिक वार्तापत्राने दिला असता तर समजते.
Controversial and out-of-line results should not be discarded or hidden — even though revealing them may come at some recriminatory cost, as the OPERA collaboration has discovered - हा मूळ लेखाचा मथळा आहे. येथे out-of-line results म्हणजे काय ? प्रचलीत सङ्कल्पना / सिद्धान्त म्हणजे इन-लाईन असे आहे काय ?

दुसरे असे की मथळ्यातून संपादक हे सांगत आहेत की तुमचे निष्कर्ष जरी वादग्रस्त असतील तरी ते छापायला मागेपुढे पाहू नका जरी नंतर ( ते चुकीचे निघाले तर ) त्याची किंमत मोजावी लागणार असेल. हे 'नेचर'च्या संपादकाना आताच का सांगावे लागत आहे ?
तसेच, जर विज्ञान - नियतकालिके ही नवीन (चूक असोत वा बरोबर) निष्कर्ष छापायची माध्यमे नसतील तर त्याबद्दलचा खल कुठल्या माध्यमातून होणार ?

या लेखात नमूद केल्याप्रमाणे, एका प्रयोग करणाऱ्या गटाने काही नवे निष्कर्ष छापले आणि काही काळाने आपले मागे घेतले या बातमीचा उहापोह केला आहे. या दोनही गोष्टी नियतकालिकाच्या आणि वैज्ञानिक प्रथेत बसतात. आता प्रयोग गटाच्या काही प्रमुखांनी राजीनामे दिले त्याचा 'नेचर'शी काही संबंध नाही.

मूळ लेख तीनदा वाचला आणि प्रत्येक वेळी संपादकाला काहीतरी वेगळे म्हणायचे आहे असे वाटले. शेवटी नुसत्या मथळ्यावरून असे वाटले की संपादक ते मूळ शोधपत्र 'नेचर'मध्ये प्रकाशित झाले याबद्दल प्रतिष्ठा वाचविण्यासाठी सारवासारव करीत आहेत की काय ?
ज्यांना लेख कळला ते यावर प्रकाश टाकू शकतील काय ? कदाचित माझ्या विज्ञानाच्या संकल्पना वेगळ्या असू शकतील.

१. सिद्धांताला धक्का देणारे निष्कर्ष मिळाले तर फक्त प्रचलित स्पष्टीकरणांच्या दृष्टीने अडचणीचा मामला असल्यामुळे असे निष्कर्ष दुर्लक्षित होऊ नयेत -
एखादे गृहीतक / स्पष्टीकरण जे अनेक वर्षे अबाधित आहे ते 'सहजासहजी' फेकून द्यायला शास्त्रज्ञ तयार नसतात. असे असेल तर यावरून हे स्पष्ट होते की वैज्ञानिक मूळ विज्ञानाचा पाया विसरत चालले आहेत. एक म्हणजे प्रयोग करून मिळालेले आकडे हे महत्त्वाचे असतात. त्यामागचे स्पष्टीकरण ही मानवाने निर्माण केलेली कहाणी असते आणि गणिताच्या भाषेत मांडलेली असते हे कायम ध्यानात ठेवले पाहिजे. दुसरे असे की एखादा सिद्धांत निसर्गाचे स्पष्टीकरण देण्यासाठी कितीही अनिकूल असला किंवा गणिताच्या वा सङकल्पनेच्या दृष्टीने कितीही छान असला किंवा तार्कीकतेत चपखल बसत असला तरीही एखादा प्रयोग जो त्या सिद्धान्ताच्या विरोधी आकडे देतो तो जर योग्य असेल तर सिद्धान्त योग्य त्या रीतीने बाजूस सारला पाहिजे. जर हे 'नेचर'च्या सम्पादकान्ना एका लेखाद्वारे आता सांगावे लागत असेल तर जागतिक विज्ञानाचे कल्याण असो.

२. शीर्षकाविषयी - " Publish and perish " (प्रकाशित करा आणि नष्ट व्हा) हे उद्गार जिओर्दानो ब्रुनो या १६००व्या शतकातील इतालिअन विचारवन्ताचे आहेत. त्याने या विश्वात आपल्या सूर्याव्यतिरिक्त अनेक सूर्य आहेत आणि आपल्यासारख्या अनेक वसाहती आहेत असा सिद्धान्त प्रथम मांडला होता आणि हे मत त्यावेळच्या देवाच्या सङकल्पनेविरुद्ध असल्याने त्याला रोमन साम्राज्यकारांनी जिवन्त जाळले. त्यामुळे त्याच्या या उद्गाराना त्याच्या मृत्यूनन्तर महत्त्व आले. या ऐतिहासिक घटनेचा आधार या लेखाच्या 'publish and be damned' शीर्षकाला आहे असे दिसते. यातून हे साङगायचे आहे काय की पूर्वी लोक वैज्ञानिक निष्ठेसाठी जीव द्यायला मागे पुढे पाहत नसत आणि आता ती परिस्थिती राहिलेली नाही पण तरीसुद्धा 'ऑपरा'ची घटना हे एक सौम्य उदाहरण आहे ?

३. ऑपराचे प्रयोग हे असे प्रयोग आहेत की जे जगात बाकी कोणी पडताळून पाहू शकत नाहीत. त्याची सत्यासत्यता पडताळायची तर तुम्हाला तोच प्रयोग त्याच ठिकाणी करून बघावा लागेल. मग त्यानी चुकीचे निष्कर्ष जाहीर केले आणि मग मागे घेतले यात नवल ते काय ? हा वैज्ञानिक सचोटीचा भाग झाला, जी अपेक्षित आहे. थोडक्यात, या बाबीचे एक लेख लिहून अवडम्बर माजवण्याचा सम्पादकाञ्चा हेतू कळला नाही. अश्या घटना घडतच असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Publish and be damned साठी संदर्भः

His response in 1824 to John Joseph Stockdale who threatened to publish anecdotes of Wellington and his mistress Harriette Wilson, as quoted in Wellington — The Years of the Sword (1969) by Elizabeth Longford. This has commonly been recounted as a response made to Wilson herself, in response to a threat to publish her memoirs and his letters. This account of events seems to have started with Confessions of Julia Johnstone In Contradiction to the Fables of Harriette Wilson (1825), where she makes such an accusation, and states that his reply had been "write and be damned".

आत्ता घाईत आहे, बाकी सवडीने लिहीते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या लेखाला प्रतिसाद द्यायचं बरेच दिवस म्हणत होतो पण राहून जात होतं.

मला एकंदरीत ऑपेरा प्रकरणावरून वैज्ञानिक विश्व कसं चालतं हे पुन्हा एकदा दिसून आलं. एक म्हणजे वैज्ञानिक विश्वात कुणालाही देवत्व नाही. अगदी आइन्स्टाइनलाही नाही. आत्ता झालेल्या व्यंगचित्राच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर तरी हा फरक उठून दिसतो. समाजकारण-राजकारणातली 'सत्यं' ही काही लोकांच्या मानण्यावर असतात. धार्मिक बाबतीतली 'सत्य' तर पूर्णपणे तशीच असतात. 'कोणी काहीही म्हणो माझा अमुकतमुक विभुतीवर विश्वास आहे' हे वैज्ञानिक जगतात चालत नाही. त्यामुळे संशोधनाचा विदा जगासमोर आला, त्यात त्रुटी शोधून काढावी किंवा तसाच प्रयोग करून बघावा असं जाहीर आवाहन झालं. तसाच दुसरा प्रयोग करून बघण्यात आला. दोन प्रयोगांचे निष्कर्ष जुळले नाहीत तेव्हा नक्की कुठे चूक आहे हे तपासून बघण्यात आलं. ती चूक सापडली, आणि जाहीरही झाली. इतकी पारदर्शकता जगात फार कुठल्या बाबतीत दिसत नाही. यात कोणत्या व्यक्ती काय म्हणत आहेत यापेक्षा निष्कर्ष काय आहेत, प्रयोगपद्धती काय आहे यावर संपूर्ण भर होता. इतकी वस्तुनिष्ठताही कुठे दिसत नाही.

ऑपेरा प्रकल्पापैकी काहींना राजीनामे द्यावे लागले हे मात्र दुर्दैवाचं आहे. वैज्ञानिक पद्धत त्यांनी पूर्णपणे अंगिकारली होती, व त्यांचं कर्तव्य त्यांनी बजावलं. त्यात पश्चात दृष्टीने चुकीचे ठरल्याबद्दल त्यांना शिक्षा होणं अन्याय्य वाटतं. पण इथे आपण विज्ञान सोडून समाजकारण-राजकारण क्षेत्रात शिरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पटकन निष्कर्षावर येण्याची घाई सगळ्याच क्षेत्रात दिसते - त्याचा हा परिणाम का? एखादी प्रक्रिया घडवून आणण्यातला, त्या प्रक्रियेचे साक्षी असण्यातला आनंद आणि एखादा परिणाम साधल्याचा आनंद या दोन गोष्टी एकाच गुणवत्तेच्या आहेत असं मला वाटत होतं - पण माझ मत तपासून पाहायला पाहिजे हे अशा घटना वाचल्या की लक्षात येत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकूणात सगळे असे आहे तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २