माझी पाककृती

तसा मला स्वैपाक करण्याचा नेहमीच कंटाळा येतो.

आई-बाबांचे घर सोडून, सासरी आल्यावर नाईलाजाने चुलीची संगत धरावी लागली. अनेक वर्षांच्या सरावानंतर आता कुठलाही पदार्थ करणे तितकेसे अवघड वाटत नाही. तरीही कधी कधी जुनी नावड डोके वर काढतेच. विरंगुळा म्हणून ही सोप्पी पाककृती.

नाव : बटाटा फ्राईज (नावावरून कळले असेलच की पाककृती सुपरहिट असणार.)

याला फ्रेंच फ्राईज असेही म्हणतात. (का ते कुणाला माहिती आहे का?)

मी चीन पासून अमेरिकेपर्यंत ज्या ज्या देशात प्रवास केला, तिथे मला हा पदार्थ मिळाला. काही ठिकाणी तर अनेक अनोळखी पदार्थांची नावे वाचून.. हे नक्की काय असेल हे कळेनासे झालेले असताना, फ्राईज दिसल्यावर कुणीतरी ओळखीचे भेटल्या प्रमाणे आनंद झाल्याचे स्मरते.

तर आता प्रस्तावना पुरे झाली.

साहित्य:

(१) बाजारात तयार मिळणारे फ्रोजन फ्राइज. मी फार्मलॅन्ड चे क्रिंकल कट आणले. सरळ पण मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या ब्रॅण्डचे विकत आणा. काही पाककुशल व्यक्ती घरी देखिल तयार करू शकतात.

(२) एअर फ्रायर - पाककृती आरोग्यदायी, तेलविरहित करायची म्हणून. अन्यथा मोठ्या लोखंडी कढई मध्ये तेल तापवून स्टेनलेस स्टीलच्या झाऱ्याने तळले तरी चालते. (खरं म्हणजे तळलेले जास्त चांगले लागतात, पण असो)

(3) मीठ -- "नमक हो टाटाका -- टाटा नमक" (माझा स्वदेशी बाणा)

कृती : फ्रोजन फ्राइज डीफ्रॉस्ट करून घ्या. फ्रायरच्या बास्केट मध्ये त्या ठेवा, परंतु बास्केट शिगोशीग भरू नका (नाहीतर खालचे फ्राइज ओलसर आणि कच्चे राहू शकतात ). साधारण २० मिनिटे - १८० तापमानावर ठेवा. 20 मिनिटा नंतर बास्केट बाहेर काढून पहा. पाहिजे असल्यास अजून ५मिनिटे ठेवा .

तयार झालेले फ्राइज प्लेटमध्ये काढून त्यावर मीठ पसरवा ( प्रमाण: आवडीनुसार)

टोमॅटो-चिली सॉस बरोबर जास्तं चांगले लागतात.

या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे .. उरलेला पदार्थ वेगळ्या डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवण्याची उस्तवार करावी लागत नाही. कारण कितीही केले तरी संपून जातातच. वाटणी करताना संयम आणि शांतता राखा नाहीतर वादावादी (भांडणे) होण्याची शक्यता असते.

आहे की नाही सोप्पी आणि आरोग्यपूर्ण पाककृती?

तयार करण्यासाठी लागणारा कालावधी फक्तं ३० मिनिटे.

(छायाचित्रे आहेत परंतु चिकटवता आली नाहीत म्हणून क्षमस्व)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

केवढी ती किचकट पाकृ!! त्यापेक्षा माझी पिझाची पाकृ बरी.

साहित्य -

मैदा - १ वाटी
मोझरेला चीज - १/२ वाटी
यीस्ट - १ चमचा
साखर - १ चमचा
मीठ - चवीनुसारे
कांदा - १ (चकत्या करून)
टोमॅटो - १ (चकत्या करून)

वरील साहित्याखेरीज अन्य साहित्य आवडीनुसारे - जसे की, मश्रूम, भोपळी मिरची, चिकन, पेपरोनीच्या चकत्या इत्यादी.

सर्व साहित्य ओट्यावर मांडून ठेवावे आणि एकदा डोळे भरून त्याकडे पाहून घ्यावे.

मग सोफ्यावर जाऊन डॉमिनो, पिझा हट वा तत्सम विक्रेत्याला फोन लावावा आणि ऑर्डर द्यावी. किती वेळ लागेल ते आवर्जून विचारून घ्यावे आणि तोवर फ्रीजमधून बीयरचा एक कॅन घेऊन टीवी पहात बसावा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयडिया बेस्ट आहे.

डॉमिनोज चा पिझ्झा मागवणार असाल तर त्या बरोबर त्यांचा चोकोलाव्हा पण नक्की ट्राय करा.
पिझ्झाहट च्या पिझ्झासोबत गार्लिक ब्रेड किंवा चिझ स्टिक्स मागवलेले उत्तम.

इथे कॅनेडियन पिझ्झा मिळतो. पूर्वी एकावर एक फ्री असायचा (आता माहिती नाही). पण पिझ्झा चांगला असतो.

तुम्ही ओट्यावर मांडून ठेवलेले साहित्य, (कधीतरी) ओव्हन मधे जाउन त्यास सद्गती मिळो ही शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

Fries तयार दुकानातून आणलेल्या.तुम्ही फक्त तळले (की स्वयंपाक करायचे टाळले)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की तुम्ही काय केले
Fries तयार दुकानातून आणलेल्या.तुम्ही फक्त तळले (की स्वयंपाक करायचे टाळले)

😂

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाजारातून ते विकत आणले, फ्रायर चे टायमिंग सेट केले. प्लेटमधे काढून मीठ मिसळले. चिली सॉस घेतला...
तसे काम भरपूर करावे लागते.
सर्व साहित्य, विविध ठिकाणाहून एकाजागी जमविणे, हे देखिल वाटते तितके सोपे नाही बरं का.

असो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

सध्या अतिप्रदीर्घप्रतिसादमात्र उरलेल्या एका आयडीने दुसर्‍या एका मराठी संस्थळावर फार्फार वर्षांपूर्वी (अर्थात वेगळ्या आयडी नावाने) अंडे उकडविण्याची अतिशय कष्टसाध्य अशी पाकृ टाकली होती त्याची आठवण आली. असो. चालायचेच. धाग्यातील पदार्थ करण्याचा /खाण्याचा प्रयत्न करणार्‍याना शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला आठवते ती पाकृ., आणि कुणीतरी (थंड) पाणी गरम करण्याची पाकृ. पण दिली होती. त्या मानाने माझी पाकृ. अतीसामान्य आहे याची जाणीव आहे.
शुभेच्छांबद्दल धन्यवाद!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

फार्फार वर्षांपूर्वी (अर्थात वेगळ्या आयडी नावाने) अंडे उकडविण्याची अतिशय कष्टसाध्य अशी पाकृ टाकली होती

दुवा द्या ना प्लीज.

कुणीतरी (थंड) पाणी गरम करण्याची पाकृ. पण दिली होती.

दुवा द्या ना प्लीज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार्फार वर्षांपूर्वी (अर्थात वेगळ्या आयडी नावाने) अंडे उकडविण्याची अतिशय कष्टसाध्य अशी पाकृ टाकली होती

दुवा द्या ना प्लीज.

प्रस्तुत पाककृती माझीच (परंतु अर्थात दुसऱ्या आयडीने) असल्याकारणाने (दोष सर्वस्वी माझा!), या पाककृतीचा दुवा देऊ शकतो. हा घ्या. (१५ वर्षांपूर्वीचा धागा आहे.)

–––––

त्या दुसऱ्या पाककृतीबद्दल मात्र (इदं न मम, त्यामुळे) कल्पना नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुव्याबद्धल धन्स.

ही पाकृ तुमचीच असणार अशी शंका मला "सध्या अतिप्रदीर्घप्रतिसादमात्र उरलेल्या एका आयडीने" या वर्णनाने आली होतीच.

बाकी तुमचा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद आणि मग त्यावरून दुसरेच काही शोधणे / सापडणे यातून हा एक, आधी न वाचलेला धागा हाती लागला.

https://www.maayboli.com/node/23196

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यात तुम्ही गरम पाणी ओतून द्यायला सांगितलं आहेत! हे गरम पाणी घासायच्या भांड्यांत ओतावं, विशेषतः तेलकट, ओशट भांड्यांत. किंवा ते पाणी गार झालं की झाडांत ओतावं. घर म्हणून काही काटकसर नको का करायला!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते पाणी नीट झाकुन ठेवावे.. आणि दुसऱ्या दिवशीचे अंडे उकडायला उपयोगी पडेल की.
किंवा शेजाऱ्याला/शेजारणीला विचारावे तुला अंडे उकडायला पाणी हवे आहे का म्हणून .. शेजारधर्माचे पालन केल्याचे पुण्यही लाभेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

बाकी ही अतिशय भन्नाट पाकृ आवडल्या गेली आहे हं!

😉

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मन:पूर्वक आभार !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

ही पाककृती अंडे(/अंडी) घालून बनविता येईल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बनविता यायला काही हरकत नसावी असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

उपवासाची पावभाजी
https://www.maayboli.com/node/49900

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

स्वयंपाक करण्यासाठी एका वेळचे 500 रुपये कमीत कमी घेतात..आणि तो जेवण बनवणारा अर्ध शिक्षित असतो.
.उत्तम जेवण बनवणे हे खूप अवघड आहे.
लाखो ची नोकरी करणारे अनंत भेटतील पण उत्तम जेवण बनवणारे दुर्मिळ असतात.
फक्त त्यांचे मार्केटिंग कमी पडत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1