RRR च्या निमित्ताने : टेस्ट आणि ट्रॅश

#संकल्पना #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

RRR च्या निमित्ताने : टेस्ट आणि ट्रॅश

- हृषिकेश आर्वीकर

रिकाम्या जागा भरा...

आज RRRने अनेक जुने आणि जोडलेले प्रश्न नव्याने उभे केले आहेत – अभिरुची काय आहे आणि कचरा, गाळ काय? सिनेमाचा गाळीव इतिहास काय? गाळीव इतिहासाचा सिनेमा कुठला? हा चित्रपट एकाच वेळी भंपक आणि गंभीर दोन्ही आहे. हॉलिवूडमध्ये सध्या एक मोठी यंत्रणा ह्या चित्रपटाच्या मागे उभी आहे. तांत्रिक बाबी, कलात्मकता, आर्थिक व्यवहार्यता असे निकष लावून ही यंत्रणा चित्रपटाला ऑस्करच्या स्पर्धेत उतरवत आहे. RRRसाठी ही यंत्रणा ६ कोटी डॉलर्सचा खर्च केवळ 'पब्लिसिटी'वर करत आहे. काही शब्द महत्त्वाचे – यंत्रणा, तंत्र, कला, गुण, पब्लिसिटी!

सिनेमा म्हणजे ...

सिनेमा हा एकाच वेळी माध्यम, विक्रेय वस्तू (object आणि commodity दोन्ही अर्थाने), जनमानसाचा कलाव्यवहार (mass art form) असतो. ह्या मूलभूत गुणांमध्ये सिनेमा रूप बदलत राहतो. कधी कुठले रूप कार्यरत आहे, व्यक्त होत आहे हे पाहणे संशोधकांचे काम आहे. तर हॉलिवूडला RRRची काही का पडली असावी? ह्या वर्षी दोन जागतिक ब्लॉकबस्टर झालेत – एक टॉप गन मॅव्हरिक. दुसरा RRR. तर ग्लोबल नॉर्थचा अमेरिकी वर्चस्वाला धोका असल्याच्या भ्रामक भूमिकेतून उभा केलेला हेरगिरीपट एकीकडे आणि वसाहतवादाला वैतागलेल्या ग्लोबल साऊथचा स्वातंत्र्यासाठी प्रतिकारात्मक भूमिका घेणारा चित्रपट दुसरीकडे. आता चीन, रशिया या ढोबळ अर्थाने कम्युनिस्ट देशांना बगल देऊन ह्या जोडगोळीला (टॉप गन आणि RRR) हॉलिवूडची भांडवलशाही बाजार सूत्रात (market formula) बदलू पाहते आहे. ही बगल देताना भारतासारख्या 'थर्ड वर्ल्ड' देशाच्या सिनेमात गुंतवणूक करणे अमेरिकी पद्धतीला साजेसे आहे. हॉलिवूडमध्ये कौतुक झाले की आपल्याला पावती मिळाल्याचे समाधान मिळते. RRR च्या ह्या भव्य प्रदर्शनाने एक spectacle उभा केलाय. ऑस्करच्या उत्सवीकरणात सामील करून RRRवाल्यांना आपले छोटे मोठे विजय जाहीर करता येतील. त्याने मग नाव, देश, भाषा, जमातीची कसलीही छटा देताच येते.

ब्लॉकबस्टर म्हणजे काय रे भाऊ ?

ब्लॉक बुकिंग 'बस्ट' करणारा – म्हणजे चालू यंत्रणेला तडा देऊन काहीतरी नवीन मांडणारा चित्रपट – अशी साधी भूमिका ब्लॉकबस्टर या शब्दामागे होती. पण अल्गोरिदमचा वापर करून, जास्तीत जास्त स्क्रीन मिळवून, इतर कुठल्याही चित्रपटाला स्पर्धेत डावलून टाकणारा आजच्या मल्टिप्लेक्स आणि ओटीटी जगातला ब्लॉकबस्टर हा त्या जुन्या व्याख्येच्या पलीकडला आहे. हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी राजामौलीने आधीपासून फिल्डिंग लावली होती. बाहुबलीच्या मागे करण जोहर होता. बाहुबलीला मिळालेल्या आर्थिक यशाबद्दल काही म्हणायला नको. ते आपल्याला माहीत असेलच. बाहुबली ते RRR यांच्या मधल्या काळात राजामौली अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटला जाऊन आले आहेत. तिथे भाषणं देऊन आले आहेत. ते पुढचा चित्रपट हॉलिवूडमध्ये बनवणार आहेत. त्यात महेश बाबू आणि रायन गॉसलिंग असतील असे सध्या म्हणले जात आहे.

मिथक – नाणं आणि नेणीव

इथे जरा जागतिक भांडवलशाहीच्या राजकारणापासून थोडं RRRच्या विषयाकडे येऊ यात. मिथक एवढे चलनी नाणे का आहे ह्याबद्दल अनेक कारणे देता येतील. चित्रपट बनवताना कथेची फूटपट्टी इतिहासामार्गे मध्ययुगीन आणि पुरातन काळात खेचली की उलट मार्गाने मिथक सळसळत 'आज'मध्ये येते. कारण सिनेमाचे राजकारण हे नेहमी 'आज'चे असते. आपल्या मनातली कृष्णाची प्रतिमा ही सिनेमातल्या कृष्णाच्या प्रतिमेने प्रभावित आहे हे आपल्याला माहीत आहे. पण दक्षिणेतला कृष्ण वेगळा, वैष्णव वेगळा, मथुरेचा वेगळा – त्यामुळे सिनेमा काल्पनिक स्मृती बनवत जातो. सिनेमा माध्यमात एक प्लास्टिकपणा, लवचिकपणा आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रपट हा सिनेमा ह्या व्यवस्थेशी, रचनेशी, सामाजिक संस्थेशी जोडून प्लस-वन आर्ट होतो (Badiou Alain, Handbook of Inaesthetics, 2004). चित्रपट स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, चित्रकला, संगीत, साहित्य, नाटक ह्यांच्या मिश्रणाने बनतो. कधी एखादा कलाप्रकार अग्रभागी येतो, आणि एखादा पार्श्वभूमी ठरतो. आणि ह्या कलाप्रकारांच्या एकत्र येण्यातून जे तयार होते ते प्लस-वन आहे. सगळे चित्रपट कोणत्या ना कोणत्या मार्गाने एकमेकांशी जोडलेले असतात. एक मार्ग माध्यमाच्या 'आंतरिक स्मृती'चा (intertextual memory) आहे. नवीन माध्यम आले किंवा त्यात मूलभूत तांत्रिक बदल झाले की पहिल्या घटकेला मिथक दाखवले जाते. इतिहास काढून बघा – फाळके-राजा हरिश्चंद्र (१९१३), दृक-श्राव्य तंत्र आले तेव्हा (१९३१) – आलम आरा, शिरीन फरहाद, (परत प्रभातचा) अयोध्येचा राजा, संत सखू , मग – सिनेमास्कोप (१९५९)- रामायण-महाभारताचे अंश, आणि त्यांची अनेक आवर्तने, विडिओ/टीव्ही (१९९०च्या आसपास) रुळल्यावर – सागर बंधूंचे, बी.आर.चोप्रांचे रामायण-महाभारत. द्रौपदी वस्त्रहरण सगळ्यांनी चार आठवडे टीव्हीवर पाहिले, हे पूर्णिमा माणकेकर ह्यांच्या Screening Culture, Viewing Politics An Ethnography of Television, Womanhood, and Nation in Postcolonial India नावाच्या पुस्तकात दिसेल. डिजिटल आणि सी.जी.आय.ने (२०००नंतर) गेम ऑफ थ्रोन्स-छाप ग्रीन स्क्रीनची खोली वाढवून सैन्य, राजे राजवाडे, जंगल – म्हणजे थोडक्यात सांस्कृतिक (civilizational ह्या अर्थाने) युद्धं – उभी करायला मदत केली.

हिरवा पडदा आणि भव्यता

सततच्या वाढत्या पटाची असीम खोली

त्या खोलीने रचित संस्कृतीचा पट वाढवत नेला. मग त्यात अमाप सैन्य, असंख्य घोडे, आलिशान महाल हे सुशोभीकरण दिसत गेले. हे चित्रपटाच्या पार्श्वभूमीचे उदाहरण जरा अजून खोलात शिरून बघू. ह्यात समकालीन आणि त्याआधी नव्वदोत्तर काळात बनणाऱ्या सिनेमाचीही भूमिका आहे. नव्वदोत्तर बडजात्या-छाप चित्रपटांत पॅनोरॅमिक इंटिरियर आहे असं रंजनी मुझुमदार नमूद करतात (Bombay Cinema, An Archive of the City, 2007). उदाहरण बघा : चित्रपटामध्ये कशाचा-तरी-बिजनेस (कसला हे बहुदा अस्पष्टच असते) करणाऱ्या लोकांची घातांकीय विस्तार करत जाणारी अनेक घरे आपण पहिली आहेत. पण ह्यालाही इतिहास आहे. थोडं अजून मागे गेलो तर इंटेरिअरला १९४०च्या चित्रपटांच्या सेट्सचा संदर्भ आहे. पुढील वर्णन पाहा, कुठे तरी पाहिलं आहे असे वाटेल – पाईप ओढणारे बिसनेसमॅन 'पप्पा', त्यांची नाठाळ मुलगी, किंवा दारू आणि जुगारात वाया गेलेला मुलगा, असे मूलाकार (archetype) असलेली पात्ररचना असताना ऐश्वर्य दाखवणारा नागमोडी जिना, त्यावरून पाईप ओढत, कसल्यातरी चिंतेत उतरणारे वडील. हे कुठे पाहिले आहे असे स्वतःला विचारा.

के. एन. सिंग

पाईपवाला

जंगी जिना

सिनेरसिक नसाल तर कदाचित चटकन आठवणार नाही. कारण असंख्य चित्रपटांत हे उदाहरण आहे. ते १९४०-५०च्या हिंदी नाही तर ८०च्या दशकात मराठी सिनेमामध्ये हंटर असलेले पप्पा, सैन्यातून निवृत्ती घेतलेले पप्पा ह्या वर टिपलेल्या वर्णनात फिट बसतात. आणि ते कुठेतरी आपल्या नेणिवेत असणार. लोकप्रिय सिनेमामध्ये काहीतरी सामान्य व्यापक, काहीतरी generic असते ते अश्या साचेबद्ध नागमोडी जिन्यात, किंवा पाईपवाल्या पप्पांच्या पात्रामुळे चित्रपटाच्या भाषेला एक सहजता देते. पण ह्या साधेपणाला अपरिवर्तित stereotypeमध्ये अडकण्यात वेळ लागत नाही. RRRची पात्रे थेटही आहेत आणि नागमोडीही! त्यांचे हेतू साफ पण एकमेकांपासून लपलेले. तुम्हाला आम्हाला बाहेरून बघताना सहज दिसणारे, कथेत ह्या लपलेल्या हेतूमुळे रोमहर्षकता येते. कारण आपल्याला जे प्रेक्षक म्हणून माहीत आहे, ते पात्रांना माहीत नाही आहे. जेव्हा एखादी नाट्यमय गोष्ट अचानक घडते तेव्हा आपल्याला ती माहीत असूनसुद्धा आपण त्यांच्या विस्मयात सामील होतो.

साम्राज्य विरुद्ध प्रदेश

सरधोपटपणे चित्रपटकर्ते आपल्याकडल्या अनादी-अनंत, (खासकरून) हिंदू संस्कृतीला वांशिक प्रवाहाने (ethnoscape) नेत, महाकाव्यातले तुकडे निवडून अनुक्रमित (sequel आणि prequel) मालिका स्वरूपाची विक्रेय वस्तू म्हणून बाजारात आणतात. वांशिकतेचे भूत मध्ययुगातून ब्रिटिश साम्राज्यवादामार्गे येताना ते सिनेमाच्या मानगुटीवर बसते. असे होते तेव्हा अनेक genreमध्ये (त्यात costume, ऐतिहासिक, मिथ्य, संतचरित्र) साम्राज्य विरुद्ध प्रदेश असा सर्वात महत्त्वाचा झगडा दिसतो. तसा तो RRRमध्येही दिसतो. एकीकडे गोंड नायक भीम प्रदेशाचे / निसर्गाचे प्रातिनिधित्व करतो. दुसरीकडे राष्ट्रवादाचे प्रातिनिधित्व करणारा पोलीस खात्यातला नायक अल्लू सीताराम राजू आहे. त्याला राष्ट्रवादाची अशी धुंदी आहे की गोंड जमातीच्या मल्लीचे दिल्लीच्या प्रदेशातल्या पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या अपहरणाचे त्याला काहीच वाटत नाही. भीम तिला वाचवायला दिल्लीत आला आहे. त्याने अख्तर नावाचे मेकॅनिकचे सोंग घेतले आहे. राजूने पण पोलिसाचे सोंग घेतले आहे. तोही एका जमातीच्या लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध खरं तर उभा आहे (ते फ्लॅशबॅकमध्ये कळते.) पण त्याचा डाव असा की ब्रिटिश अधिकारी बक्सटनचे मन जिंकायचे आणि योग्य वेळी दारूगोळा, बंदूक-गोळ्या पळवून ब्रिटिश साम्राज्य संपवायचे. स्वातंत्र्य हे राजूचे स्वप्न आहे. मल्लीला वाचवणे हा त्याचा हेतू नव्हे. म्हणजे त्याच्या लेखी राष्ट्रवाद महत्त्वाचा आणि आदिवासींची जमीन आणि मुलगी कमतर. ह्या अडकलेल्या भूमिकेतून सुटका कशी करावी? तर त्याचे उत्तर आहे घेतलेल्या सोंगाची उकल होणे. दोघांचेही सोंग घेणे मजेशीर आहे. आपल्याला खरोखर, मनापासून आपल्या मूळ स्वभावासारखे वागायचे असेल तर कोणी तरी दुसरे व्हायला लागते. त्याने आपण आकस्मिक समाजाने लादलेल्या भूमिकेतून मुक्त होतो. अख्तरचे सोंग उघडे पडल्यावर राष्ट्रवादी नायक त्याचा छळ करतो. राष्ट्रवाद प्रादेशिकतेशी हाणामारी करतो, त्याची गळचेपी करतो. एक बारीक मुद्दा असा की पोलिसाला अख्तर मुस्लीम नाहीच ह्याचा राग आला आहे का? का तो फक्त सरकारी नोकरी करतो आहे? का तो जातीच्या फरकाला धर्मापेक्षा जास्त महत्त्व देतो? हे कधीच कळत नाही (हे आपल्याला सगळीकडे आपल्या आजूबाजूला घडताना दिसेल.) भारत म्हणजे शेवटी प्रदेशांची गोळाबेरीजच आहे अशी सुटसुटीत भूमिका घेतली की सर्व मार्ग मोकळे. म्हणून शेवटच्या गाण्यात वेगवेगळ्या प्रदेशांतल्या वीरांचे गुणगान आहे.

आरारारमधला शिवाजी

जल, जंगल, जमीन हे कोमाराम भीमाचे ब्रीदवाक्यही दिसते. मागच्या एका झारखंडच्या निवडणुकीत भा.ज.प ला हरवायला हा शब्दप्रयोग वापरला होता.

जल, जंगल, जमीन

काल्पनिक इतिहास आणि स्थलाकृती

हे दोघे (भीम/राजू) कधीच भेटल्याची इतिहासात नोंद नाही. त्यांची भेट राजामौलीने घडवली आहे. त्याच्या कल्पनाविलासाने! चित्रपटातली महत्त्वाची स्थित्यंतरे दोन भौगालिक भागात घडतात – हैद्राबाद आणि दिल्ली. भाग ह्यासाठी म्हणतो आहे कारण कथेचे काही महत्त्वाचे अंश जंगलात घडताना दिसतात. तर जंगल/आदिवासी-वसाहत/विकासवाद, गाव/शहर, आणि द्वैध शासन (म्हणजे निझाम आणि ब्रिटिश) ह्या तीनही गुंतागुंतीच्या स्थलाकृतींमध्ये कथा घडते. आधी मुघल राजवट पाहिलेले, नंतर ब्रिटिश काळात राजकीय उलथापालथ घडवून आणणारे, त्याहीनंतर भारताची राजधानी म्हणून मिरवणारे शहर दिल्ली हे मुख्य location आहे. दोघेही दक्षिणेचे हिरो 'दिल्ली'च्या राजवटीला आव्हान देतात. हा द्रविड-आर्यन प्रश्न आहेच. जेनीचा अपवाद सोडला तर सगळे ब्रिटिश मंडळी लगान-छाप वागतात. (तुम्हाला आठवत असेल – 'तुम साला कुत्ता लोग … हमारी जुती के नीचे राहेगा') थोडक्यात, ब्रिटिश दुष्ट आहेत. त्यांच्या पात्ररचनेत काही मार्मिकता नाही.

पाहू रे किती वाट ....

जेनीच्या भेटीचे प्रसंगही आपण अनेक चित्रपटांत हजारदा पाहिले असतील. कार पंक्चर होणे, मुलगा लिफ्ट देणे वगैरे. हे सगळे इतके ढोबळ आणि साधारण आहे की त्यात काहीतरी महत्त्वाचे असेल असे शोधत बसायला नको. आलिया भटला तर अजय देवगनएवढीही भूमिका नाही. आणि त्याला दोनच सीन आहेत. ती waiting woman च्या भूमिकेत आहे. आपण युरोपियन-स्वीडिश-भारतीय 'आर्ट' सिनेमात (म्हणजे बर्गमन, मणी कौल, कुमार शहानी) waiting woman बघतो तिथे आपण बिलकुल प्रश्न विचारत नाही की ही अशी का? कुणाची वाट बघते आहे? का बघते आहे? ते धीरगंभीर सिनेमे आहेत, पण म्हणून RRRच्या आलियाच्या पात्राची हेटाळणी करायला नको. ते पात्र एकांगी आहे हे खरंच आहे. पण कौल, आणि शहानींच्या सिनेमातली waiting woman कुठल्या अर्थाने अजून गहिरी आणि बहुआयामी आहे? निदान ह्या दोघांच्या पहिल्या दोन-तीन चित्रपटांत waiting womanचे शोषण होते ह्या पलीकडे फार काही हाती लागत नाही. तिच्या 'स्व'ला शेवटी निष्क्रियतेची आणि हीनपणाची, abjectionची भावना आहेच. 'स्वत्वाचे अनेक पदर उलगडणारे' चित्रपट म्हणून त्यांच्या चित्रपटाकडे का पाहावे ? साधारणपणे आर्ट सिनेमात स्त्रीच्या 'स्व'त्वाला निष्क्रियता, अडकलेपण, अधीनता, शरण जाणे, आज्ञाधारकपणा बांधून ठेवतात हे खरे आहे. आपण जो प्रश्न लोकप्रिय सिनेमाला विचारतो तोच प्रश्न आपण कलात्मक चित्रपटाला विचारतो का? तसा विचारणे कुठे योग्य आहे आणि कुठे योग्य नाही? पात्रांवर प्रगतिशील असण्याची जबाबदारी आहे का? सोपे उत्तर असे की पात्र प्रगतीशील असो का प्रतिगामी असो, चित्रपटकर्ते त्या पात्राबद्दल टीका करू शकतात आणि सोबतच सहानुभूतीही दाखवू शकतात. कारण नुसती धडाडीची बाई दाखवली (अंकुर, मिर्च मसाला, भूमिका) म्हणजे सामाजिक प्रश्न सुटतील असे नाही. Wokeपणा म्हणजे एक सततची सामाजिक विषमतेबद्दलची प्रगतिशील पण मर्यादित जागृतावस्था, एक सततची भळभळणारी जखम आहे! तर असा wokeपणा असला म्हणजे योग्य किंवा न्याय्य भूमिका घेतली जातेच असेही नाही.

टेस्ट आणि ट्रॅश

मग आपण चित्रपटाबद्दल काही general टीका ऐकतो ती साधारण अशी –

प्रश्न : काय यार असं कुठे होतं का?

उत्तर असे असावे की “नाही होत इतर कुठे म्हणून ते सिनेमात होतं.”

असेच बेजबाबदार टाकलेले वाक्य : पण ते realistic नाही ना वाटत मग..

उत्तर/प्रतिप्रश्न : सगळं realistic का हवं आहे?

आळशी मत : पण आपल्याकडला चित्रपट म्हणजे नाचगाणे.

उत्तर : ते तसे का आहे ह्याचा अभ्यास करायला हवा मग...

उदार मत : बाकी काही म्हटलं तरी अमक्याची style म्हणजे एहे… कमाल… आणि actingपण चांगली करतो.

उत्तर : नटाला कामगार, स्टार, विक्रेते, प्लॅटफॉर्म चालवणारे अशी वेगवेगळी रूपे घ्यावी लागतात… आणि एका माध्यमावरून दुसरीकडे सहज जाणे हे त्याच्या रोजच्या जगण्याचा भाग असते.

पाठ थोपटणे / छाती ठोकणे type टिप्पणी : खरं तर लोकांना आधी जेव्हा अमका दिग्दर्शक आवडत नव्हता, तेव्हापासून मला तो आवडतो.

उत्तर/प्रतिप्रश्न : ह्यात तुम्ही दिग्दर्शकाचे कौतुक करत आहेत का स्वतःचे?

पांढरपेशा मत : ह्या गोविंदा-कोंडके-मिथुनने वाट लावली… काही तरी cheap करायचे ते. थिल्लरपणा नुसता.

उत्तर : मग रिक्षावाल्याला विचारा त्याला हे सिनेमे का आवडतात? सलूनमध्ये जाऊन बघा कुठला सिनेमा चालू आहे आता… जत्रेत बॅकग्राऊंडला कुठले गाणे चालू आहे?

सांस्कृतिक वर्चस्व / विषमता मत : अमकी नटी परदेशात तमका कोर्स करून आली आहे.

उत्तर : बायजी, नायकीण, तवायफ – काहीही नाव द्या… ह्या पहिल्या ग्रामोफोन रेकॉर्डस्मध्ये गायल्या होत्या. सिनेमा बोलू लागला तेव्हा ध्वनी आणि संगीत चाचण्यांसाठी परत त्यांनीच आवाज दिला. त्यांची फार अडचण असेल तर मंगेशकर कुटुंबाचा इतिहास बघा, सुब्बुलक्ष्मीचे घर, कुल, घराणे कुठले? किंवा संजय दत्तचे मातृवंशीय धर्मांतरण कसे होते ते पहा.

राष्ट्रवादी सिनेमा विश्लेषक मत : पण काही म्हणा, फाळके ग्रेटच होते.

उत्तर : फाळकेंनी 'तसल्या' बाईला सिनेमात घेतो असे ठरवले होते, पण तिचा शेठ तिला सोडवून घेऊन गेला. पुढे वीस वर्षांत चित्रपटात कुलीन, सुशिक्षित स्त्रियांनी कामे करावीत, हिंदू कथानक हिंदू दिग्दर्शकाने हाताळावे, असले १४-१५ कलमी पत्र त्यांनी एका मासिकात दिले होते. हे सुमार विचार 'ग्रेट' फाळकेंच्या डोक्यातूनच आले होते.

Morality आणि ethics ह्या दोन्ही परस्परांशी जोडलेल्या, पण काही अर्थी भिन्न गोष्टी आहेत. मराठीत दोन्ही जास्त जवळचे वाटतात, कारण नैतिकतेमध्ये दोन्ही भाग येतात. पण moralism प्रशासकीय होऊ शकतो, ethics हे तत्त्वावर अवलंबून असतात. एखादी गोष्ट कला की कचरा हे मत बनवताना आपल्याला त्याविषयी काय माहीत आहे? किती माहीत असावे? माहीत नसताना कुठे आणि किती मतप्रदर्शन करावे? आपले आणि इतरांचे मत ह्यात फरक, तफावत असेल तर आपण स्वतःचा कलदार चमकावत बसतो का? त्याने आपल्याला स्वतःला काय मिळते? माझे मत बरोबर, किंवा उदार होऊन सगळेच बरोबर, हा अट्टहास आपण का करतो? मतप्रदर्शन म्हणजे पद्धतशीर अभ्यास नव्हे. असे काही छोटे मुद्दे लक्षात ठेवता येतील.

वास मा‌रतोय!

आणि शेवटचे असे – एकदा दर्ग्याला गेलो तेव्हा घरातल्या एका व्यक्तीने म्हटले – काय घाण वास आहे? मी काही बोललो नाही. काही वर्षांनी जामियामध्ये शिकवताना तसाच वास आला. वाक्य परत डोक्यात घोळले. आजूबाजूला एक वस्तीसारखे (ghetto) – अर्धी बांधलेली, अर्धी पडलेली घरे होती. रस्तेही तसेच… बेमालूम. पायाभूत सुविधा आजूबाजूला असणे ही चैन असते.

पावसाची कृपा

वास आहे आणि येतो कारण तिथे शहरी कॉर्पोरेशनचा विकासात्मक आराखडा आखणाऱ्यांची नजर पडलेली नाही. Parasite चित्रपटात कसला तरी वास येतो… तो त्या घरात काम करणाऱ्या लोकांचा वास असतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका चायनीज मित्राला इथे ब्रिस्बेनमध्ये भेटलो. आम्ही दोघे टेबल घेणार तेवढ्यात एक साठीतली ऑस्ट्रेलियन बाई म्हणाली 'ओह बॉईज, यु स्मेल लाईक यंग बॉईज!' आणि उठून गेली गॅम्बलिंग सेक्शनमध्ये. आम्ही जगातल्या अर्ध्या जनतेचं प्रतिनिधित्व करत नव्हतो. पण तरीही आम्हाला दोघांना वंशवादाचा 'वास' येत होता.

दोघांनाही 'वंशवादा'चा वास येतो.

राजामौली म्हणतात… 'हो. भीम-राजू कधी भेटले नाहीत हे खरे, पण त्यांची भेट चित्रपटात होणे महत्त्वाचे होते. माझे म्हणणे आहे की आपण सगळे एक आहोत'. ह्याउलट अनुभव सिन्हा इशान्येकडील भागावर चित्रपट बनवताना म्हणतात की आपण एक नाही अनेक आहोत. लहानपणी पाहिलेले 'एक चिडिया, अनेक चिडिया…' आठवले. एक असो का अनेक, RRR जिंकला पाहिजेच अशी आपली सुप्त इच्छा असेल तर आपल्या मनात नेमके काय आहे – राष्ट्रवाद, की लोकप्रिय माध्यमाविषयीचे आकर्षण, की सध्या चालू असलेली साऊथची craze phase, की कोविडमुळे अडकल्यासारखे वाटत होते पण आता करता येईल फुकटचे celebration? ह्यातली कुठलीही सुप्त इच्छा असेल तरीही आपल्या अपेक्षांच्या रिकाम्या जागा भरल्या पाहिजेत.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

ह्यातल्या काही काही संज्ञा आणि उल्लेख डोक्यावरून गेल्याने पुन्हा वाचावे लागतील.

नागमोडी जिना-सेटअप-शिकारी पप्पा हा उल्लेख फार जबरी पकडला आहे, त्या अनुषंगाने असे किती archtype हिंदी/मराठी सिनेमात आहेत ते तपासले पाहिजे असं वाटून गेलं.

मात्र सुरुवात जेवढी स्पष्ट आहे त्याउलट शेवट धूसर - प्रश्नोत्तरेही नीट उमजली नाहीत.

अवाका आणि दृष्टिकोन पहिला तर माझ्यासाठी तरी हा संकल्पनाविषयक सर्वोत्तम लेख आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वात पयल्यांदा एक दणकून आभार- लेख लिहून त्यावर तुम्ही प्रतिक्रियाही देत आहात हे फार उत्तम आहे.

पुनर्वचनात आलेल्या शंका
१. RRR चं अपेक्षित हॉलिवूड यश हा मिस युनिव्हर्स सारखा व्यवस्थित मार्केट बळकवण्यासाठी रचलेला बनाव आहे - असं तुम्हाला वाटतं का?

२. RRR कित्येक ठिकाणी विनोदी (so bad it's good) पातळीवर पोचतो (पहा- लोड,येम, फायर वाले देवगण सीन).शिवाय अतिवेळा स्लोमोचा वापर, आणि खास दाक्षिणात्य महासुपरपावर दाखवणारे सीन.
मग RRR ला एक चित्रपट म्हणून गंभीरतेने का घ्यायचं? केवळ त्यातले इफेक्ट्स भारी आहेत आणि तो हॉलिवूडच्या तोडीस तोड आहे म्हणून?

3. आपण दिलेल्या प्रश्नोत्तरांना थोडं उलगडाल का? म्हणजे त्यात उथळपणाने केलेल्या एकोळी शेऱ्यांना उत्तरं दिलीत असं माझं मत झालं. मी बरंच काही miss केलं असणारे

४. वासाचा मुद्दा नक्की काय आहे ते कळलं नाही, म्हणजे "हे असे वांशिक/क्लास स्तराचे भेद मनात ठेवूनच कलाकृतीना "कचरा/ग्रेट" म्हटलं जातं असं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. मिस युनिव्हर्स मध्ये ब्रँड इन्व्हॉल्व्हमेंट खूप असतं. ट्रम्प निवडून येण्याचे एक कारण २०११- १२ चं पजेन्ट आहे. तो रशियामध्ये काहीतरी करत होता. पुतिनने त्याच्या टेप बनवल्या. त्यात काय काय होते ते थोडे नेटवर वाचल्यावर कळेल. सिनेमा किंवा पेजेंट समाजापासून वेगळे नाहीत. तर RRR हा चित्रपट नव्याने 'गावलाय' असा नाही . ना राजामौली नव्याने सापडलेत. हॉलिवूड हे वापरणे आणि टाकणे, फेकून देणे असे राजकारण करतच रहाते.

२. परफेक्ट . इंडियन सौथ आणि ग्लोबल सौथ इंडियन हे दोन्हीं संदर्भ आहेत. द्रविड आर्यन हे उघड, आंतर राष्ट्रीय तेवढे उघड नाही त्यामुळे लेखात लिहिले होते.
साधे उत्तर साम्राज्य विरुद्ध भाग / प्रभाग असे आहे.

3. प्रश्न उत्तरे उथळ वाटणार ह्याविषयी शंका नाही. पण खालील चर्चा बघून ते का गरजेचे आहे ते कळेल. इंग्रजीत ( परत इंग्रजीत ) शॉर्ट हॅन्ड उत्तरे आहेत. लोक तेच तेच जुने मुद्दे, रिऍलिसम ,आणि मला आवडला नाही .. ह्यातच अडकून आहेत. चुकीचे वाटत असेल तर विक्षिप्त अदितीचे मालिकांबद्दलचा लेख बघा. ' करमणूक कमी नाही..', 'मैत्रिणीने सांगितलं बघ म्हणून .. ' असल्या धेडगुजरी गोष्टी त्या लिहितात.

4. वंशवादी वागण्यात वास एक प्रबळ स्थान घेतो. माझ्या एका शिक्षकाला युनिव्हर्सिटी वाले म्हणाले .. ' चीन आणि भारत या दोन्ही देशाच्या मीडिया चा अभ्यासक्रम २ आठवड्यात उडवून टाका '. ते म्हणाले - दुनियेतले अर्धे लोक २ आठवड्यात .. कमाल !'. उडवतो .. असही म्हणाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1. हे ठिके, नाहीतरी हॉलिवूड आधी रशिया, मग चीन, उ.कोरिया ह्यांना दुष्ट दाखवत, ते आता हळूहळू इस्लामी अतिरेकी म्हणजे वाईट इथे पोचलेत. जसे नरेटिव्ह बदलतात तसे त्यांचे बरे/वाईटचे निकषदेखील.

3. पण एक व्यक्ती म्हणून मी " माझ्या personal viewpoint " मधूनच टीका करीन ना? उदा मी क्रिकेट फॅन असेल तर मला lagaan आवडेलच. किंवा माझा राजकारणात रस असेल तर तो unconscious bias माझ्या चित्रपट निवडीत घुसेलच - मग मी चित्रपट अवडण्या-नावडण्याची कारणं माझ्या फिल्टर मधूनच देईन.
एखादी कलाकृती ही ग्रेट आहे की कचरा - हे व्यक्ती निरपेक्ष ठरवणं फसर अवघड आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? कदाचित एखादा पट्टीचा श्रोता जशी उत्तम गायकी आपसूक ओळखतो, तसे आपण पट्टीचे वाचक/प्रेक्षक बनलो तर हे शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Unconscious bias नक्कीच असणार. त्या पलीकडेही भूमिका असते. सिनेमा हे माध्यम , विक्रेय वस्तू ( ऑब्जेक्ट आणि कमोडिटी) आणि जन माणसाचा कलाव्यवहार आहे असे मूळ लेखात लिहिले आहे. परत वाचून बघा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचलं मी आणि नाही समजलं मला. तुम्ही आणखी उलगडून सांगणार का?

गोंधळ असा आहे माझा -
समजा एक नरमासभक्षकाबद्दल चित्रपट आहे. त्यात ते आपल्या नातेवाईकांची प्रेतं शिजवून खातात, ठीक?
आता हा चितपट paapua ला त्या जमातीला दाखवला तर ते काय म्हणणार? की बाबा आमची परंपरा दाखवणारा हा एक उत्तम चित्रपट आहे.

हाच जर का महाराष्ट्रात दाखवला तर लोक काय म्हणतील? की हा भावना दुखावणारा कचरा आहे.
मग हे कसं ठरवायचं? कचरा की क्लासिक हे एका समाजाच्या परिघात बंदिस्त आहे की वैश्विक आहे?

तसच हिंदू ही कादंबरी मला जितकी भावते तितकीच एका युरोपीय माणसाला भावेल का? मग युरोपीय कला आणि साहित्य मला तेवढंच क्लासिक वाटलं पाहिजे - हे रूढ गृहीतक तरी का रास्त मानावं?
माझ्या परिघात हिंदू जबरी आहे, असं किती मोठ्या जनसमुदायला वाटलं तर मग ती वैश्विक ग्रेट कादंबरी होईल?

तर मुद्दा हा की ह्या सगळ्या पलीकडे जाऊन जर कुणी एखादा फकीर मला र
एक धुपारा देऊन म्हणाला की हे डोळ्यात घाल आणि मग तुला जगातल्या सगळ्या क्लासिक का ग्रेट आहे ते कळेल.

माझा प्रश्न आहे असा धुपारा अस्तित्वात असतो का? की नाही?
की मग सगळ्या क्लासिक आणि कचऱ्याचे वर्तुळ आपल्यापुरते असते?

ही शंका आहे, त्याच उत्तर तुमच्या स्पष्टीकरणातून मला तरी समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदर्भ कुठला आणि काय ? त्यात मोरालिटी का एथिक .. ह्यात आपण कुठे आहोत हे बघा . त्यानुसार या अंदाज बांधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे फारच ऐसपैस उत्तर आहे.
असो. मला वाटतं तुम्ही जे लिहिलंय ते विस्तृत मांडायला हवं कारण तुमच्या एका वाक्याचे इथे अनेक अर्थ निघूही शकतात किंवा अर्थ निसटूही शकतात.
धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला कळले नाही त्याला मी काहीच करू शकत नाही . झूम वर बोलू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Can't you elaborate on your terse statements in the article?
लेखातल्या त्रोटक आणि अपुरी वाटणाऱ्या वाक्यांचा तुम्ही खुलासा देऊ इच्छित नाही?

कुठला झूम कॉल?

द्विमितिय माहितीसाठी त्रिमितिय खटाटोप करण्यात एक अख्खी मिती खर्च पडते आहे -
पण त्रिमितिय विषयाबद्दल मुळात द्विमितीय भाषेत लिहिण्यात एका मितीतले तपशीलच गळून पडत असतील तर तेही समजण्यासारखं आहे म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कंमेंट मध्ये लिहिलंय तुम्ही सगळी झुंड घेऊन या एकदा झूम वर सगळी उत्तरे देतो . इतका काही अवघड नाही लिहिलंय मी. तुम्ही लोक तयार असाल तर मी तयार आहे. आता मला इतर कामे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा पुढला लेखसुद्धा झूम कॉलवरच वाचतो.
बरंय. माझ्याकडून इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@अस्वल
अवाका आणि दृष्टिकोन पहिला तर माझ्यासाठी तरी हा संकल्पनाविषयक सर्वोत्तम लेख आहे
>>>>>>>>>>>
+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिवाळी अंकाच्या थीमशी संबंधित असं ह्या लेखात काहीतरी आहे हे मान्य. पण कित्येक वाक्यांचा आणि परिच्छेदांचा धड अर्थ लागत नाही. उदाहरणार्थ:

---

Morality आणि ethics ह्या दोन्ही परस्परांशी जोडलेल्या, पण काही अर्थी भिन्न गोष्टी आहेत. मराठीत दोन्ही जास्त जवळचे वाटतात, कारण नैतिकतेमध्ये दोन्ही भाग येतात. पण moralism प्रशासकीय होऊ शकतो, ethics हे तत्त्वावर अवलंबून असतात. एखादी गोष्ट कला की कचरा हे मत बनवताना आपल्याला त्याविषयी काय माहीत आहे? किती माहीत असावे? माहीत नसताना कुठे आणि किती मतप्रदर्शन करावे?

--

Morality आणि ethics मध्ये लेखकाला कुठला फरक अभिप्रेत आहे ते काही नीट कळत नाही. प्रशासकीय विरुद्ध तात्विक ही काय भानगड आहे? मराठीत दोन्ही जास्त जवळचे वाटतात, पण इंग्रजीत किंवा ग्रीकमध्ये जास्त लांब वाटतात का? मराठीत म्हणजे मराठी भाषेत की सिनेमात? (कारण आधीच्या परिच्छेदात दादासाहेब फाळके येतात.) कला विरुद्ध कचरा हा पूर्ण वेगळाच मुद्दा आहे की त्याचा morality-ethics ह्या द्वैताशी काही संबंध आहे? आणि असलं काही प्रसिद्ध करण्याआधी त्याच्यावर संपादकीय संस्कार का करत नाहीत?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

As noted earlier, statism is moralistic. We can find this in Althusser or Foucault. While such statism or institutional repression exists, people practice their own agency to work through existing system. Ethics is about principles. Taste or Trash is related to value judgment passed on a cultural work or product. We often tend to demean something that we don't like, the point is to go beyond that and understand why something exists as a cultural product, an object, a mass art form. Otherwise, we resort to cultural elitism. Last point about Marathi usage- naitikta covers both shades of morality and ethics, but the distinction is useful. Same way, sanskruti can mean culture and civilisation, but those are overlapping yet different concepts.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दिवाळी अंकाच्या थीमशी संबंधित असं ह्या लेखात काहीतरी आहे हे मान्य"- चला म्हणजे काहीतरी पैसा वसूल झाला तर.

'...कित्येक वाक्यांचा आणि परिच्छेदांचा धड अर्थ लागत नाही' यासाठी परत लेखातल्या काही वाक्यांना उद्धृत करतो...
'पण ते realistic नाही ना वाटत मग.. : सगळं realistic का हवं आहे?'' पण आपल्याकडला चित्रपट म्हणजे नाचगाणे : ते तसे का आहे ह्याचा अभ्यास करायला हवा मग...'  याच चालीवर, लेखात सगळं सोप्पं सोप्पं करून, एकरेषीय असच हवे का? 

"आणि असलं काही प्रसिद्ध करण्याआधी त्याच्यावर संपादकीय संस्कार का करत नाहीत?" किती हा त्रागा, किती ती चीडचीड त्यापेक्षा 'समजावून सांगा', 'समजला नाही', हि वाक्ये जास्त संयुक्तिक नाही का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The mathematician making the above comment, can google basic words like morality and ethics, and their difference. Like there should be editorial revision before publishing such an article as he mentions...( In such a paternalistic way), there should be restraint in commenting as well. People make random comments without taking the whole article or editorial choices in consideration. Morality is that people ought not to drink or eat beef, ethics is when we decide what to do when we witness an accident on the road. The idiosyncratic behaviour here is just another form of moralism.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

Like there should be editorial revision before publishing such an article as he mentions...( In such a paternalistic way), there should be restraint in commenting as well.

बघा बै! मग इथे मराठी संस्थळावर इंग्रजी प्रतिक्रिया लिहायची सोय राहिली नसती!

हृषिकेश, तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता; दुखावल्याबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बघ ना बाई, काय घात केला आणि इंग्रजीत उत्तर लिहिलं गणित तज्ञाला ? वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे... पण ही ओळ पण माधव जुलिअनांची .. म्हणजे पटवर्धनच होते ते! अवघडच झालंय मुळी... सगळे इंग्रजीत लिहितात. हो ना! लिहिलेल्या लेखावर कशाला चर्चा करायची? आपल्याला तर त्यात कुठेतरी काहीतरी चुकलंय, त्या भाषेत आहे जी मला रुचत नाही .. की झालं ! बस्स ! ह्याच्यावर चक्कलंस करण्यात जास्त मजा येते. इंग्रजीत लिहिलेल्या टिप्पणीमध्ये काही महत्त्वाचे असले तरी आम्हाला फरक नाही बाई पडायचा... नावातच विक्षिप्त आहोत ना आपण !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोक ना दूश्ट, दूश्ट, वैट्ट असतात. (श्रेयाव्हेर - 'न'वी बाजू.) लोक लेख सोडून बाकी काही तरी गोष्टींवरच चर्चा करत बसतात. आपण आकाशातला धूमकेतू दाखवायला जावं तर लोक आपल्या तर्जनीच्या नखातली घाण बघत बसतात. लोक !@#$%^* असतात.

मग आपण तसंच का वागावं?

जयदीपनं प्रश्न विचारेस्तोवर morality आणि ethic यांत काही फरक असेल, असा विचारही मी केला नव्हता. मी गणिती नाही ना कंप्युटर सायंटिस्ट! तत्त्वज्ञान हा माझा प्रांत नाही. पण आता प्रश्न डोक्यात राहणार. ह्या लेखाच्या निमित्तानं त्यावरही चर्चा झाली, या दोन्हींच्या व्याख्या कुणी केल्या, तरी मला काही नवीन समजायला मदत होईल.

आणि इथे तंत्रज्ञानही आहे, ती चर्चा स्वतंत्र विचार करण्याएवढी चांगली झाली तर इथून वेगळीही काढता येईल.

हृषिकेश, तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता; दुखावल्याबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी जो फरक दाखवला आहे त्याबद्दल आपण काहीच बोलत नाही. आपण आपलेच लावता .. आपल्या विक्षिप्तपणाची कमाल आहे ! तुम्ही सायंटिस्ट असा का सायकलिस्ट ... दोन वेगवेगळे शब्द वापरलेत (morality आणि ethics, ह्या दोन्हीचा वेगवेगळा ढंग नैतिकता ह्या शब्दात उतरत नाही. तुम्ही शब्द सुचवा. मला सुचला नसेल. त्यात इतकी वायफळ चर्चा कशाला ?) असो जो शब्द वापरलाय त्याला काही कारण आहे ना? दोन्हीतला फरक दाखवला आहे ना ? आंबेडकर लिहितात प्रिंसिपल्स म्हणजे तत्वांबद्दल, बादयु लिहितो. वाचा... थोडा प्रकाश पडेल डोक्यात. इथे उल्लेख केला तर परत त्यांचं लिखाण इंग्रजीत आहे असं म्हणायला फाकडे बच्चे आहेतच. इतक्या सध्या गोष्टीबद्दल तूम्ही आणि चिकलपट्टी किती फालतू चर्चा करता आहात. परत सांगतो ... कोणी म्हटलं दारू पिणे वाईट रे बाबा, तसे बीफ खाणे हिंदू धर्मात बसत नाही.हे morality बद्दल आहे (परत सांगतो हे माझे मत नाही. लोक उगाच ही morality लादतात.) सडकेवर कुणाचा तरी अपघात झालाय आणि तूम्हाला खूप महत्वाचे काम आहे त्याच वेळी.. काय कराल???? हा ethics चा प्रश्न आहे . अजून हजार उदाहरणे देता येतील.

ICC म्हणजे इंडियन सिनेमॅटोग्राफ कमिटी (१९२७-२८) ह्यांचा पुरावा आहे ४५०० पानाचा. त्यात परत परत येणारा मुद्दा आहे MORALITY चा आणि आधुनिकतेचा. महाविद्यालयातले शिक्षक म्हणतात 'सिनेमा तरुणांची वाट लावतोय'. गांधी म्हणालेत 'सिनेमा जुगारासारखे आमिष आहे'. किती किती उदाहरणे आहेत. सेन्सॉर बोर्डच्या (१९२०-५०) ५००० पानांचा अभ्यास करून लिहितो आहे की - the film is of a low moral tone असं वाक्य वारंवार येतं. गेल्या आठ वर्षात भारतीय सिनेमाबद्दलचे १५००० पानांचे दस्तऐवजीकरण करून जे कळले आहे त्याची झलक ह्या लेखात आहे. सगळं इथे मांडता येणार नाही. मला ते इथे करायचे ही नाही.

काही उदाहरणं देतो ... फाळके नंतरच्या काळात प्रतिगामी, अगदी उजवे झाले असंही म्हणता येईल. भालजी पेंढारकर यांनी एकेकाळी भगत सिंग, राजगुरू अतुल सेन यांना (ब्रिटिश) पोलिसांपासून वाचवले होते.. नंतर त्यांनी गोडसेंचा बचाव ही केला होता. गोडसेंनी त्यांना तुरंगातून पत्र ही लिहिले होते. गांधी हत्येत भालजीना अटक झाली होती. नंतर सोडलेही. ह्या सगळ्या प्रकरणात त्यांचा स्टुडिओ जाळण्यात आला. एकदा त्यांनी गोळवलकरांचा बचाव केला होता. हळू हळू ते मत बदलत अगदी फुल्ल rss वाले झालेत. आता हा भाग राजकारणाबद्दल आहे का सिनेमाबद्दल ? का दोन्ही ?

ह्याउपर तुम्हाला जगातल्या इतर कसल्यातरी गोष्टीचा राग RRR वर जे लिहिलंय त्यावर काढायचा असेल तर तो काढा. विक्षिप्तपणा फक्त विषयापुरती असू देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती मराठी संस्थळांवरची म्हणा, किंवा एकंदर मराठी समाजातलीच म्हणा, जुनीच (तथा हीन आणि हिडीस) ट्रिक आहे. (आम्हांस नेमकी ठाऊक, कां की आम्ही ती अनेकदा वापरतो.)

वादामध्ये हमेशा लंबीचौडी आर्ग्युमेंटे इंग्रजीतून ठोकून द्यावीत. यांचे अनेक फायदे आहेत.

१. बहुतांश मराठी वाचकांना इतके इंग्रजी एका दमात वाचण्याची सवय नसते. त्यामुळे, फारसे कोणी तपशिलात वाचत नाही, आणि, तुमच्या मुद्द्यात जरी काहीही दम नसला नि तुम्ही काहीही जे मनाला येईल ते जरी ठोकून दिलेत, तरी कोणाच्याही लक्षात येत नाही. उलट, सरासरी मराठी माणसाच्या मानसिकतेच्या एका वैशिष्ट्यामुळे, तुम्ही इतकी इंग्रजी वाक्ये ज्या अर्थी एका दमात फेकताय, त्याअर्थी तुम्ही काहीतरी प्रचंड महत्त्वाचे मुद्दे मांडत असला पाहिजेत, असा अनेकांचा उगाचच ग्रह होतो, आणि प्रगल्भतेचा, profundityचा आव आणता येतो. (ज्या वाचकांचा असा ग्रह होत नाही, त्यांनी – वर मांडल्याप्रमाणे – बहुतकरून इतक्या इंग्रजी वाक्यांना एकत्रित पाहिल्याने ते वाचण्याच्या भानगडीत पडलेले नसतात, त्यामुळे ते किमानपक्षी तुमच्याशी वाद घालायला येत नाहीत. (प्रतिवाद इंग्रजीतूनच करावा लागेल, ही वाचकाच्या ठायीची चुकीची कल्पना अधिक सरासरी मराठी वाचकाचा सांभाषणिक इंग्रजीविषयीचा न्यूनगंड, हेही दोन घटक तुमच्या पथ्यावर पडतात.))

२. हे करण्याकरिता तुमचे इंग्रजी चांगले असले, तर उत्तमच, परंतु त्याची गरज आहेच, असे नाही. सरासरी मराठी वाचकाचे इंग्रजीसुद्धा बहुतकरून यथायथाच असते. (म्हणून तर न्यूनगंड!) त्यामुळे, तुमची इंग्रजी अतिभिकार जरी असली (प्रस्तुत लेखकाची इंग्रजी भिकार आहे, असे मला येथे अर्थातच सुचवायचे नाही.), तरीसुद्धा, अर्ध्याअधिक वाचकांच्या ते लक्षात येत नाही, आणि ज्यांच्या लक्षात येते, असे वाचक त्या अतिभयंकर इंग्रजीस हादरून, याच्याशी/हिच्याशी वाद घालायचा तर असल्या भयंकर इंग्रजीस तोंड द्यावे लागणार, हे चाणाक्षपणे जाणून, तुमच्या वाटेस जात नाहीत.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

तूम्ही म्हणाल म्हणून मी मराठीत किंवा इंग्रजीत लिहेन असे नाही. त्यावेळी मी फोन वर उत्तर लिहीत होतो... (आता भ्रमणध्वनी म्हणू का ? ) कारण मराठीचा आग्रह करणारे त्याबाबत anal आहेत. कुणाला कुठली भाषा किती कळते या पेक्षाही आपण एक एकमेकांशी जमवून घेऊन बोलू शकतो का ? आपल्याला संवाद करायचा आहे का आतापर्यंत लिहिलेल्या प्रतिसादात मूळ लेखाबद्दल काहीच नाही आहे.

विडंबन ह्यांना कळते का ? ब्राह्मणीपणाच्या आणि पांढरपेशी भाषेत जगणाऱ्या लोकांसाठी 'समजलं नसेल तर इंग्रजीत सांगतो' असं म्हटलंय. ते सैराट सिनेमातलं वाक्य आहे. दुसरं morality म्हणजे अमुक अमुक हे स्पष्ट करण्यासाठी लिहिलं आहे बाबा- ते माझंदारू पिणे किंवा बीफ खाणे ह्याविषयीचं मत नाही.ते उदाहरण आहे लोकांना काय पटू शकतं काय नाही. मला दोन्ही आवडतातच.

इतकी मराठी किंवा इंग्रजी वाक्य वाचणे .... त्याचे दडपण येणे... साधारण मराठी वाचक... वगैरे हे सगळे सोडून कोणी मूळ लेखाबद्दल का चर्चा करत नाही - हे कोणी समाजावेल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Morality is that people ought not to drink or eat beef

_/\_

नतमस्तक.

चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृपया अवांतर चर्चा / दोषारोप थांबवावेत आणि लेखकाच्या विनंतीला मान देऊन लेखातील मुद्द्यांपुरती चर्चा सीमित ठेवावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला लेख नीट कळला नाही. लेखकाच्या मते आरारार ट्रॅश आहे की नाही? कारण दोन्ही बाजूंनी मुद्दे आलेले दिसताहेत. बरेच मुद्दे या बाजूचे की त्या बाजूचे हेही कळत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट एकाच वेळी भंपक आणि गंभीर दोन्ही आहे.  हे लेखाचे तिसरे वाक्य आहे सर ! बघा ब्वा ! ट्रॅश किंवा इतर काही हे आपल्या अभिरुची वर पण अवलंबून आहे. तिथे मोरालिटी आणि एथिक चा प्रश्न आहे. परत वाचा ! जमत असेल तर ! वेळ असेल तर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जमत असेल तर ! वेळ असेल तर !

यात ‘गरज असेल तर!’ची भर घातल्यास तिय्या चांगला जमेलसे वाटते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला लक्ष देऊन वाचता येत नाही त्याला लेखक काय करणार ? लेखक संवाद करू इच्छतो पण आपण सगळे आपलेच लावत बसलात . 'गरज असेल तर '. नका वाचू , नका टिप्पणी करू .. मी जे लिहितो आहे त्यावर तुम्हाला तुमच्या एकमेकात टिंगल टवाळी करायची असेल तर नका वाचू . ज्यांनी लेख मागितला त्यांच्या साठी तो लिहिला आहे. मते माझी आहे. ती गेले अनेक वर्ष अभ्यास करून लिहिलेले आहे. ना तुम्हाला धड एंगेज करायचंय , ना काही मुद्देसूद टीका करायची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही लेखक म्हणून म्हणताय तेव्हा मान्य करतो. पण एक वाचक म्हणून हा सारांश बिलकुल जाणवत नाही. आपल्हेयाला जे म्हणायचं आहे ते वाचकांपर्यंत कस पोचवावं शिकायचं असल्यास मी तुम्हाला लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेले काही प्रभावी निबंध पाठवू शकतो.

Thinking as a hobby हा विलियम गोल्डिंगचा लेख वाचून पाहा कृपया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मास्टर हे जुने आहे सगळे गोल्डीन्ग वगैरे .तरीही परत वाचेन मी. तुम्ही धड वाचत नाही ह्याच काय करायचे ते पण सांगा ना !
तुम्हाला रुचेल ती भाषा आणि ते मुद्दे. मी लिहिलेल तिसरे वाक्य इथं लोक धड वाचत नाही... तिथे मी तुमच्या अपेक्षा का पूर्ण कराव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचकांचा फीडबॅक झेपत नसेल तर जाहीर लेखन करत जाऊ नका, इतपत सल्ला देऊन मी माझ्यापुरती चर्चा थांबवतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कळत नसेल तर वाचू नका. इतका फीडबॅक मीही देतो. ट्रॉलिंग आणि एंगेजमेंट मध्ये फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा फीडबॅक नाही ही बदमाशी आहे. फीडबॅक खरा असतो. लोक धड तिसरे वाक्य वाचत नाही. कसला फीडबॅक बद्दल बोलताय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखाच्या निमित्ताने एक मात्र साधले. (ऑफ ऑल द पीपल) जयदीप चिपलकट्टींबद्दल माझ्या (!) मनात सहानुभूती तेवढी (कधी नव्हे ती) निर्माण झाली.

Which is quite an achievement.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

सदर धागा आणि त्याखालील विशेषतः धागाकर्त्याच्या काही प्रतिक्रिया वाचून -

सदर धागालेखक विरुद्ध सगळे वाचक / प्रतिसादक अशी काही चर्चेची मांडणी धागाकर्त्याला करायची आहे अशी शंका आली.

---

अवांतर: "मी तुम्हा वाचक-प्रतिसादकादी पामरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मी म्हणतो त्याच दृष्टिकोनातूनच तुम्ही सर्वांनीच या विषयाकडेच पाहायलाच हवेच", "माझ्या जीवनात उत्सव आहे, मी तुम्हा सर्वांचा उद्धार करायला इथे आलो आहे" असे विचार बाळगणारे आणि प्रच्छन्नपणे प्रकट करणारे, एकेकाळी अनेक संस्थळांवर मेगाबाइटीपणे वावरणारे पण नंतर तिथून घालवून दिलेले एक गृहस्थ आठवले.

---

सवांतर: खूप कचरा आहे हे शीर्षक किती apt आहे हे पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0