गेल्या आठवड्यात chat gpt-3 चा बराच बोलबाला होतो आहे.
हा ए.आय निबंध लिहितो, कोडिंग करतो, कविता लिहितो, साध्या बातम्यासुद्धा नीट देतो वगैरे वगैरे पासून तो चड्डी घालायला मदत करतो, न जाळता कुकरमधे भात लावतो, खाता येईल असा उपमा बनवतो - इथपर्यंत वाट्टेल त्या अफवा पसरताहेत.
तेव्हा नक्की काय चालू आहे? chat gpt-3 ची उत्क्रांती खरंच धोकादायक वेगाने होते आहे का?
त्यामुळे कुठले जॉब धोक्यात येतील (३-५ वर्षांत)
कुठले जॉब खंप्लीट निकामी ठरतील?
पुढल्या काळात मग काय कौशल्य आत्मसात करावी?
अशा प्रश्नांची उत्तरं मला तरी माहिती नाहीत पण हवी आहेत.
अक्षरनामामधे हे वाचलं - https://www.aksharnama.com/client/article_detail/6474
मराठीत हा एक चांगला सारांश आहे.
(मनातले प्रश्न... वर चाललेली चर्चा इथे हलवल्याबद्दल संपादकांचे आभार)