वाचनातला लिंगभेद

काही काळापूर्वी The Authority Gap, (लेखिका - मेरी ॲन सिगहार्ट) नावाचं पुस्तक वाचलं. ही त्या पुस्तकाची समीक्षा, किंवा माहिती नाही.

The Authority Gap द ऑथॉरिटी गॅप

मेरी ॲन सिगहार्ट, पुस्तकात लेखिका नील्सनचा हवाला देऊन म्हणते की स्त्रियांची पुस्तकं वाचणाऱ्या पुरुषांचं प्रमाण खूप कमी आहे; उदाहरणार्थ मार्गारेट ॲटवूडच्या वाचकवर्गात १९% पुरुष आहेत, डॅनिएल स्टीलच्या वाचकवर्गात १७% पुरुष, इत्यादी. ह्या उलट पुरुषांच्या वाचकवर्गात स्त्रियांचं प्रमाण खूप जास्त आहे. डिकन्स, टोल्कियनच्या वाचकवर्गात ४५% स्त्रिया आहेत.

तिचा मुद्दा असा आहे की स्त्रियांची पुस्तकं कमी वाचली जातात. त्यामुळे स्त्रियांना कमी पुरस्कार मिळतात; आणि कमी पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा वाचकवर्ग आणखी कमी होतो. सिगहार्ट बुकर पुरस्कार निवडणाऱ्यांच्या कमिटीमध्ये होती; त्या चर्चांमध्ये, कमिटीतल्या अनेक पुरुषांनी समोर असलेल्या अनेक स्त्रियांची पुस्तकं वाचली नव्हती, तिथून तिनं सुरुवात केली.

मला आकडे बघून (आणि अत्यंत पकाऊ काम करत असल्यामुळे) स्फुरण मिळालं. मी ॲमेझनवर झाडू मारला - web scraping. सुरुवात केली चिमामांडा नगोझी अडिची हिच्या पानावरून. तिथे समोर १२ इतर लेखिका-लेखकांची पुस्तकं मला आवडतील असं ॲमेझन दाखवत होतं. त्या लोकांच्या पानांवर जाऊन आणखी प्रत्येकी १२+ नावं मिळाली. असं करत १०२३४ लेखिका-लेखकांची पानं झाडली आणि ते स्त्री आहेत का पुरुष हे निश्चित केलं.

बहुतेकांच्या पानांवर 'About' या भागात तृतीय पुरुषी वर्णनं आहे. त्या वर्णनांमध्ये तिनं असा शब्द आहे का त्यानं, वगैरे मोजून हे निश्चित केलं. मग या लोकांच्या पानांवर ज्या इतर लेखिका-लेखकांची नावं दिसत आहेत, त्यांचंही वर्गीकरण केलं.

१०हजार+ मूळ लेखिका-लेखक आणि त्यांच्या पानांवरचे १ लाख ६५ हजार+ जोडलेले लेखिका-लेखक असा माल गोळा केला. त्यांची गोळाबेरीज बघितली, तर सगळीकडे साधारण ५०-५०% विभागणी दिसत होती. म्हणजे साधारण ५०-५१% लेखिका आणि ४९-५०% लेखक.

पण लेखिकांच्या पानांवर ७१% लेखिका आणि लेखकांच्या पानांवर ७१% लेखक असं दिसलं. म्हणजे मी चिमामांडा नगोझी अडिची या स्त्रीची पुस्तकं वाचायला सुरुवात केली, तर मला ७१% रेकमेंडेशन्स (मराठी?) लेखिकांची मिळणार. या जागी टोल्कियनपासून सुरुवात केली तर ७२% रेकमेंडेशन्स पुरुष लेखकांची मिळणार.

-- हे आहे collaborative filtering. नेटफ्लिक्स, हुलू वगैरे लोक आपल्याला सिनेमे, टीव्ही मालिका कशा प्रकारे सुचवतात, किंवा कपडे विकणाऱ्या वेबसायटीवर साडी विकत घेतल्यावर बहुतेकदा धावायचे शूज विकत घ्यायला सुचवणार नाहीत, तर बांगड्या सुचवतील. हे चालतं collaborative filtering वापरून.

ह्या झाडू मारण्याचा, आणि विश्लेषणाचा कोड माझ्या गिटहबवर ठेवला आहे - हा दुवा. About माहिती आणि नावांवरून माणसांची लिंगं कशी ठरवली याची अधिक माहिती तिथे analysis.mdमध्ये मिळेल.

field_vote: 
0
No votes yet

पण हेच बघा ना. तुम्ही स्त्री असलात तरी ह्या धाग्यावरचे आत्तापर्यंतचे शंभर टक्के प्रतिसाद पुरुषांचे आहेत. स्त्रीचा एकही नाही. स्त्रीच स्त्रीची शत्रुली असते असं ‘चारचौघी’ मध्ये म्हटलेलंच आहे.

---

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

तुम्ही स्त्री असलात तरी

- या गृहीतकाला आधार काय?

ह्या धाग्यावरचे आत्तापर्यंतचे शंभर टक्के प्रतिसाद पुरुषांचे आहेत. स्त्रीचा एकही नाही.

- या धाग्यावर प्रतिसाद देणारे पहिले तुम्ही, आणि तुमच्यानंतर दुसरा मी, हे दोघेही पुरुष आहेत, असे जरी गृहीत धरले, तरीसुद्धा, (आपल्या दोघांचेही प्रतिसाद येण्याअगोदरच्या) मध्यंतरीच्या काळात एक किंवा अनेक स्त्रियांनी हा लेख वाचला नसेलच कशावरून? प्रतिसाद दिला नसला, म्हणून काय झाले?

- किंबहुना, आतासुद्धा अनेक स्त्रिया हा लेख (गुपचूपपणे) हा लेख वाचतच नसतील कशावरून? (‘पहिले कोण’ याला येथे नक्की काय महत्त्व आहे?)

- फार कशाला, खुद्द लेखिकेने (स्त्रीलिंगी आहे असे गृहीत धरल्यास) हा लेख आतापावेतो असंख्य वेळा वाचला नसेल कशावरून? (नाहीतर दुसरे कोण वाचणार?)

- तुम्ही (आणि तुमच्यानंतर मी) या लेखाला प्रतिसाद दिलेला आहे, याचा अर्थ तुम्ही (किंवा मी) हा लेख वाचलेला आहे, या निष्कर्षावर उडी नक्की कशाच्या आधारावर मारलीत?

स्त्रीच स्त्रीची शत्रुली असते असं ‘चारचौघी’ मध्ये म्हटलेलंच आहे.

- त्यांना म्हणायला काय जाते?

- तेथे काय वाटेल ते म्हटलेले असेल. (उदा., ‘सूर्य पश्चिमेकडे उगवतो.’ किंवा, ‘अनाघ्रात स्त्रीस परमेश्वरकृपेने अपत्यप्राप्ती झाली.’ छापणारे काय, द्याल ते छापतील.) त्याने नेमके काय सिद्ध होते? आणि, त्याचा येथे नक्की संबंध काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'न'बा सर, चाट गणपतीला विनोद ओळखता येतात का नाही, हे मला माहीत नाही. पण तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. तुम्ही किमान बुद्धीमत्ता असणारे मनुष्य वाटता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपणाशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत जे आपल्याला म्हणाले होते, तेच इथे लिहून काढते. हे असं स्टॅटिस्टिक्स शिकवतात का आयायटीत!?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>स्त्रीच स्त्रीची शत्रुली असते असं ‘चारचौघी’ मध्ये म्हटलेलंच आहे.

हे खरं आहे असं लिहिलं तर इथे एका स्त्रीचा प्रतिसाद येईल. आणि काहीच लिहिलं नाही तर हे खरं आहे असं मला वाटतं हे कुणाला कळणार नाही.
मग खूप विचारांती मी इथे प्रतिसाद लिहायचा ठरवला. लेख अर्थातच मी वाचणार नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> उदाहरणार्थ मार्गारेट ॲटवूडच्या वाचकवर्गात १९% पुरुष आहेत, डॅनिएल स्टीलच्या वाचकवर्गात १७% पुरुष, इत्यादी. 

ॲटवूडच्या कादंबऱ्या माझ्या विद्यापीठाच्या लायब्ररीत आहेत, त्यांतल्या दोन मी वाचलेल्या आहेत. पण कुठली पुस्तकं किती पुरुषांनी आणि किती स्त्रियांनी इश्यू केली याचे आकडे लायब्रऱ्या जाहीर करत नाहीत. (आणि घरी नेलेलं पुस्तक मी पुरं वाचलं की मध्येच सोडून दिलं की फारच आवडून दोनदा वाचलं हेही त्यांना कळणार नाही.)

डॅनिएलकाकूंची गोष्ट आणखी वेगळी आहे. त्यांच्या एका कादंबरीची एक आवृत्ती छापण्यासाठी एक जंगल खलास करावं लागतं. काही काळाने ह्या प्रती एक डॉलरला रस्त्यावर विकल्या जातात, किंवा सार्वजनिक लॉन्ड्रोमॅटमध्ये लोक सोडून देतात. त्यातल्याही एकदोन मी वाचल्या असल्या तरी चित्रगुप्ते बाईंकडे तशी नोंद असणं शक्य नाही. सारांश काय तर ह्या १९, १७ वगैरे टक्केवारीवर माझा भरवसा नाही. पुस्तक छापल्यावर त्याला इतक्या वाटा फुटतात की अशा प्रकारचे आकडे विश्वासार्हरित्या ठरवणं फार अवघड आहे.

वाचनात लिंगभेद नाही असा याचा अर्थ नव्हे. पण तो नेमका कुठे आणि किती आहे हे ठरवणं सोपं नाही.

---

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

अशा पद्धतीनं ॲटवूड, डॅनिएल स्टील आणि टोल्कियनच्याही वाचकवर्गाचे आकडे बदललेले असतील. नील्सन कशा प्रकारे आकडे गोळा करतं माहीत नाही; कदाचित लोकांना फोन करून वगैरे गोळा करत असतील. तर लोकांनी कशा प्रकारे पुस्तकं मिळवली त्याचा परिणाम दिसणार नाही - लोक खरं बोलत असतील असं गृहीत धरून.

वाचनात लिंगभेद नाही असा याचा अर्थ नव्हे. पण तो नेमका कुठे आणि किती आहे हे ठरवणं सोपं नाही.

अगदी.

ॲमेझनवर लोक किती खरेदी करतात हे आकडे, त्यांची प्रॉक्सी, दिसले असं म्हणता येईल. बाकी सगळीकडे जिथे साधारण स्त्री-पुरुष विभागणी ५०-५०% दिसत्ये, तिथे ठरावीक स्लाईस घेतल्यानंतर विभागणी बदलते ही गोष्ट मला रंजक वाटते.

मला आता माणसं कुठले विषय हाताळतात, त्याची विभागणी करून शोधाशोध करायला आवडेल. ते कसं करायचं - म्हणजे ॲमेझनवर झाडू मारून विषय कसे ठरवायचे - हे अजून समजलेलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या प्रयत्नांना दाद !!!.

Thinking Fast and Slow च्या नजरेतून याकडे बघता येईल का?

Collaborative filtering हे "Fast Recommendations" देते असे वाटते.

जाता जाता... या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणी confounding factor असू शकेल का? तो नसेल तर तसे सिद्ध करता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Collaborative filtering हे "Fast Recommendations" देते असे वाटते.

हे मला समजलं नाही. "Fast Recommendations" म्हणजे काय, आणि पुस्तकं किंवा सर्वसाधारणपणे वस्तू विकत घेण्याशी त्याचा काय संबंध?

या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणी confounding factor असू शकेल का? तो नसेल तर तसे सिद्ध करता येईल का?

कुठल्या प्रक्रियेत?

ॲमेझनच्या (पुरेशा मोठ्या) सांपलमध्ये ५०-५०% स्त्रीपुरुष सापडणं हीच गोष्ट मला मुळात बायस्ड वाटते. ते सिद्ध करणं मला शक्य नाही, पण एवढी समानता जनरल पॉप्युलेशन वगळता कुठेही दिसणं मला संशयास्पद वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Fast Recommendations हे Kahneman च्या सिस्टीम-१ नुसार हे केवळ पुस्तकांच्या मेटाडेटाच्या (अमुक पुस्तक किती जणांनी घेतले, अमुक पुस्तक जर एखाद्याने घेतले तर त्याच्या सोबत इतर कोणती पुस्तके घेतली, अमुक पुस्तकाचे लायब्ररी ऑफ क्लासिफिकेशन नुसार कसे वर्गीकरण केले आहे, अमुक पुस्तकाचे average rating, वगैरे) आधारे केलेले Recommendations असू शकतात.

या उलट Kahneman च्या सिस्टीम-२ नुसार एखाद्या पुस्तकाचे सखोल परीक्षण वाचून, किंवा त्या विषयातील तज्ञ व्यक्ती सोबत संवाद साधला जाऊन ते पुस्तक वाचले वा विकत घेतले जाईल. अर्थातातच सिस्टीम-२ ही वेळ खाऊ व knowledge-intensive प्रक्रिया असल्याने ती ऑटोमेट करणे खूप कठीण आहे.

थोडक्यात Amazon च्या Recommendations जास्त अवलंबुन रहाणे योग्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजिबात विचार न करता, प्रतिक्षिप्त क्रिया किंवा तडकाफडकी आलेली प्रतिक्रिया म्हणजे सिस्टम-१ असं काहनीमन म्हणतो. हातावर डास चावतोय असं वाटलं म्हणून फटकन तो डास मारण्यासाठी दुसरा हात उचलणं जेवढ्या चटकन, सहज होईल, त्याला काहनीमन सिस्टम-१ म्हणतो. ह्या सिस्टम मनुष्यमात्रांच्या बाबतीत लागू पडतात, असं तो म्हणतो.

पुस्तक (किंवा कुठलीही वस्तू) विकत घेण्याची प्रक्रिया ॲमेझनवर डास मारावं एवढ्या सहजरीत्या होत नाही (नसावी). एकक्लिकी किंडल खरेदीचा पर्याय सुरू करता येतो; पण त्यासाठीही ठरावीक ठिकाणी क्लिक करण्यासाठी जरा नेम धरावा लागतो. रेकमेंडेशन वापरायची असतील तर किमान काही स्क्रोल करावं लागतं. 'आली लहर केला कहर' म्हणत लोक कपडे, दागिने, बूट, टीव्ही, फोन, वगैरे खरेदी करत असतील याबद्दल मला आश्चर्य वाटणार नाही. पण ज्या खरेदीनंतर आणखी वेळ खर्च करावा लागतो, ती खरेदी लोक जरा शोधाशोध केल्याशिवाय करत असतील का, याबद्दल मला शंका आहे. (ॲमेझनमध्ये काम करणाऱ्या लोकांना याबद्दल अधिक माहिती असू शकते.) विशेषतः किंडलवरून पुस्तकखरेदी करायची असेल तर फारच धीर धरावा लागतो.

काही विचार न करता एक पुस्तक विकत घेतलं; म्हणून लगेच दुसरं पुस्तक रेकमेंडेशनमुळे आणि विचार न करता घेतलं जाईल असं नाही; उलट पहिलं पुस्तक (कुठल्याही कारणानं) आवडलं नाही तर उलट त्या रेकमेंडेशनवरचा विश्वास उडेल.

चिमामांडा नगोझी अडिचीचं पुस्तक विकत घेतल्यावर मला ॲमेझन चिनुआ अचेबे, झुंपा लाहिरी, टोनी मॉरिसन वगैरेंची पुस्तकं दाखवायला लागलं. या सगळ्यांत समान धागा आहे - उत्तर अमेरिकेच्या संदर्भात गौरेतर, आणि/किंवा परदेशी; आणि प्रसिद्ध लेखिका म्हणतील असे हे लोक आहेत; हे सर्व लोक ललित लिहितात; जागतिक कीर्तीचे समजले जातात. ह्या लोकांच्या पुस्तकांबरोबर मला Everybody Lies, The Genetic Lottery यांसारखी, मला आवडतात अशी अललित पुस्तकं दिसत नाहीत. म्हणजे ॲमेझनच्या सिस्टमला कुठल्या ना कुठल्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आहेत.

मशीन लर्निंग किंवा ए.आय. आपण माणसं ज्या पद्धतीनं विचार करतो, किंवा एखादी गोष्ट समजून घेतो त्या पद्धतीनं समजून घेत नाहीत. त्यामुळे काहनीमनची पहिली किंवा दुसरी पद्धत इथे लागू पडेलसं मला वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी अजून नीट लिहायला हवं होतं.

मला असं म्हणायचं आहे की Amazon ने दिलेली Recommendations सिस्टीम-१ वर आधारित असावीत. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती खूप विचारांती एखादे पुस्तक घेईल.

चिमामांडा नगोझी अडिचीचं पुस्तक विकत घेतल्यावर मला ॲमेझन चिनुआ अचेबे, झुंपा लाहिरी, टोनी मॉरिसन वगैरेंची पुस्तकं दाखवायला लागलं. या सगळ्यांत समान धागा आहे - उत्तर अमेरिकेच्या संदर्भात गौरेतर, आणि/किंवा परदेशी; आणि प्रसिद्ध लेखिका म्हणतील असे हे लोक आहेत; हे सर्व लोक ललित लिहितात; जागतिक कीर्तीचे समजले जातात.

यातला "समान धागा" पुस्तकांच्या तुम्ही उल्लेखलेल्या मेटाडेटा वर आधारित आहे ना की त्यांच्या content वर आधारित.

Amazon पुस्तकांच्या content वर आधारित डेटा (जसे की पुस्तकाचे सखोल परीक्षण, विकत घेणाऱ्याची इयत्ता, त्याची नेमकी गरज, इत्यादी ) Recommendations देत असेल असे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तक विकत घेण्याची कृती सिस्टम-१चा भाग असते, हे गृहीतक असल्यास मला ते पुरेसं पटलेलं नाही.

यातला "समान धागा" पुस्तकांच्या तुम्ही उल्लेखलेल्या मेटाडेटा वर आधारित आहे ना की त्यांच्या content वर आधारित.

माणसांना समजण्यासाठी दोन्ही. तत्त्वतः, रेकमेंडर सिस्टम्सना या दोन्हींपैकी काहीच बघण्याची गरज नसते. मात्र ॲमेझनची रेकमेंडेशन्स नेमकी कशी येतात, हे मला माहीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्त्रियांची पुस्तके म्हणजे स्त्री लेखकांनी लिहिलेली का? नाहीतर फेमिना आणि गृहशोभिका सारखी मासिकं सुध्दा स्त्रियांची म्हणून म्हणाता येतील आणि ती वाचणाऱ्या (फोटो बघणाऱ्या असे म्हणत नाही) पुरुषांचे प्रमाण कमी असले तर त्यात आश्चर्य वाटू नये.

मी पुस्तके वाचणे या प्रकारापासून स्वतःला कटाक्षाने दूर ठेवतो त्यामुळे लेखातील एकाही लेखकाचे किंवा लेखिकेचे नाव मला माहीत नाही. तरीही ही तुलना करायची असेल तर एकाच विषयावर स्त्री लेखकांनी आणि पुरूष लेखकांनी लिहिलेले पुस्तके अशी तुलना हवी आणि ते आकडे प्रसिद्ध करायला हवेत. नाहीतर स्त्रियांना आकर्षित करणाऱ्या विषयांवर ( मासिक पाळी वगैरे) स्त्री लेखकांनी लिहिलेली पुस्तके पुरूष वाचकांनी वाचली नाहीत तर त्यात नवल काय?

(कोणतीही पुस्तके कधीही न वाचणारा आणि कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा) सांताक्लॉज हत्ती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण वाचत नाहीत हे समजलंच. काहीकिंचित वाचन करणाऱ्यांना ॲटवुडचं नाव माहीत असतं, ॲटवूड काय लिहिते हे वाचलेलं नसेल तरीही कल्पना असते. तेच टोल्कियन, डिकन्स वगैरे पुरुष लेखिकांच्या बाबतीत. आणि मराठी आंजा आणि फेसबुक झाडलं तर पाळीच्या वेळेस कप वापरावेत का नॅपकिन्स याबद्दल पुरुष सदस्याही हौशीहौशीनं लिहिताना सापडतील! ते असो.

वर गिटहबचा दुवा दिला आहे. तो उघडलात तर तिकडे झाडू मारून गोळा केलेला मालही सापडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्या वर काही बोलत नाही.कारण त्याचा अनुभव नाही.
पण स्त्री अँकर बातम्या सांगत असेल न्यूज चॅनल वर तर मी ते बघायचे टाळतो.
एक तर स्त्रियां चा आवाज बारीक आणि sharp असतो .
त्या मध्ये त्या ओरडुन बोलतात.
कानाचे पडदे तर फाटणार नाहीत ना ही भीती वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या वर काही बोलत नाही.कारण त्याचा अनुभव नाही.
पण स्त्री अँकर बातम्या सांगत असेल न्यूज चॅनल वर तर मी ते बघायचे टाळतो.
एक तर स्त्रियां चा आवाज बारीक आणि sharp असतो .
त्या मध्ये त्या ओरडुन बोलतात.
कानाचे पडदे तर फाटणार नाहीत ना ही भीती वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

Github वर चक्कर टाकून आलो, काही पुनरुपयोगात्मक मिळालं तर वापरीन म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोडमध्ये काही बदल, कॉमेंट्स, आणखी काही मदत हवी असेल तर जरूर सांग.

मी आता पुस्तकाच्या URL झाडायचा कोड लिहीत आहे. पान झाडायचा कोड झाला आहे; तो ऑटोमेट करून चिकार (१०-२० हजार+) पानं झाडायचा भाग बाकी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगले वर्णन आहे. नुसत्या हो-नाही वाक्यांपेक्षा ७१%, ७२% हे आकडे अधिक माहिती देतात. आपली अपेक्षा काय आहे, याला काही मोजमापाची चौकटही मिळते.

एक प्राथमिक विचार की ही टक्केवारी काय असावी अशी आपली अपेक्षा होती? सिगहार्ट यांच्या निरीक्षणामुळे या प्रकल्पाला चालना मिळाली, म्हणून आपण एक बघू शकतो, की सिगहार्ट यांच्या निष्कर्षापासून या प्रकल्पाच्या निरीक्षणांपर्यंत काही जोडणी करता येते का? सिगहार्ट यांची आकडेवारी लिंगनिहाय असमतोल दाखवते : स्त्री-लेखक <-> पुरुष वाचक १७% :: पुरुष लेखिका <-> स्त्री-वाचिका ४५%

जर सिगहार्ट यांचे निरीक्षण काही प्रकारे प्रस्तुत प्रकल्पाशी तत्त्वतः निगडित असले, तर या प्रकल्पात आपल्याला लिंगनिहाय असमतोल अपेक्षित होता का? म्हणजे :
स्त्री प्राथमिक <-> पुरुष शिफारस : काही क% असेल
पुरुष प्राथमिक <-> स्त्री शिफारस : काही ख% असेल

तर क > ख ; किंवा क < ख या दोहोंपैकी कुठला तरी एक प्रकारचा लिंगनिहाय असमतोल अपेक्षित होता का? तशी अपेक्षा असल्यास प्रस्तुत आकडेवारीने वेगळेच दाखवले आहे --
क (७१%) ~=ख (७२%)
या जवळजवळ समान असंतुलितेमुळे, ज्या मोठ्या सामाजिक प्रश्नाच्या एका कंगोऱ्याकडे सिगहार्ट यांनी एक झोत टाकला होता, त्यापेक्षा वेगळ्या कंगोऱ्याकडे प्रस्तुत आकडेवारी नेत आहे का? वगैरे. याबाबतीत लेखात थोडी चर्चा झाली असती, तर मला आवडले असते. सिगहार्ट यांनी त्यांच्या निरीक्षाणाचे संभाव्य परिणाम सांगितले -- वाचकांच्या लिंग-असमतोलामुळे स्त्री-वाचक-परीक्षकांनी पुरेसे उत्तम पुरुष-लेखक वाचले असतील, आणि काही पुरुष लेखकांना पुरस्कार मिळण्यासाठी स्त्री-परीक्षक मते देतील. पण पुरुष-लेखक-परीक्षकांनी फारच थोड्या उत्तम स्त्री-लेखिकांची पुस्तके वाचली असतील, त्यामुळे स्त्री-लेखिकांना पुरस्कार मिळण्यासाठी पुरुष-परीक्षक मते देणार नाहीत. अशा प्रकारे पुरुष-लेखिकांना दोन्हीकडून मते मिळतील, स्त्री-लेखिकांना एकाच दिशेने, आणि अंततः पुरूष लेखकांना बहुमताने अधिक पुरस्कार मिळतील.

प्रस्तुत लेखातील असमतोल मात्र एकदिशीय नाही, दोन्ही दिशांनी सारखाच आहे. सिगहार्ट यांनी पुरस्कारांबाबत केलेला निष्कर्ष या समतोलाने बळावतो (का?) की दुर्बळ होतो (संमित असमतोल) की निःसंदर्भ (ही आकडेवारी सिगहार्ट यांच्या निष्कर्षाशी असंबद्ध आहे. जर असंबद्ध असेल तर प्रस्तावनेतले हे bait-and-switch तितके पटले नाही!)

---------------------------------

हे कोलॅबोरेटिव्ह फिल्टरिंग आणि पुस्तकांचे विषय यांची सांगडही बघायला पाहिजे.
आपल्या समाजात घडवणूक झालेल्या स्त्री आणि पुरुष लेखिका त्या घडवणुकीनुसार विषय निवडून पुस्तके लिहीत असतील, असे प्रमेय (हायपोथेसिस) मांडता येईल.
(सार्वजनिक शौचालयांमध्ये समाजमान्यतेनुसार स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी वेगळी दालने असतात. क्वचित एकत्र दालन असते. "सार्वजनिक मलमूत्रविसर्जन करताना शेजारी कोण?" अशी आकडेवारी गोळा करता, स्त्री-विसर्जकांच्या शेजारी स्त्रिया >९९%; पुरुष विसर्जकांच्या शेजारी पुरुष >९९% असे काहीतरी प्रमाण सापडेल. तर एखाद्या देशातील प्रसाधनगृहाबाहेरील शब्द मला वाचता येत नाहीत, तर ज्या दालनात माझ्या लिंगाची व्यक्ती जात असेल त्या दालनात मी जाणे बग नव्हे, फीचर आहे -- जोवर अशी दोन दालने असणे त्या समाजात नियमित आहे, तोवर तरी.)

तर समजा या पुस्तकव्यवसाय प्रसाधनगृहांत ५०% विषय सामाजिक शिकवणुकीने लिंग-विवक्षित असतील, ५०% विषय लिंग-अविवक्षित असतील तर मग ७५% शेजारी समान लिंगांचे असतील, २५% शेजारी भिन्न लिंगांचे असतील. किंवा असे काही. म्हणजे काही विषय लिंगविवक्षित नसून लिंगप्रधान असतील : गुलाबी प्रेमकथालेखिका ७०:३० स्त्री:पुरुष असतील; गुप्तहेर कथा ७०:३० पुरुष:स्त्री असतील, असे काही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0