मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ११२
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
प्रवाह विरुद्ध मत व्यक्त करणे
प्रवाह विरुद्ध मत व्यक्त करणे किंवा तसे वर्तन करणे,तसा विचार करणे .
हे मूर्खपणाचे आहे का?
असे माझ्या वरील पोस्ट मध्ये आहे.
जगातील अनेक प्रवाह विरुद्ध आंदोलन झाली .
आणि त्या मुळेच खूप चांगले बदल समाजात झाले.
तेव्हा प्रवाह विरुद्ध जाणाऱ्या लोकांस मूर्ख च समजले जात होते.
पण तेच नवीन युगाचे रचनाकार आहेत.
तीन चार दिवस दूरदर्शन
तीन चार दिवस दूरदर्शन (सह्याद्रीच्या) ९: ३०च्या बातम्या पाहतोय.
अर्धा वेळ एक्साम वॉरियर्स ह्या मोदींच्या पुस्तकाबद्दल बोलण्यात घालवला - सलग चारही दिवस. लहान पोरांना पाठ करून घेऊन कॅमेऱ्यासमोर बोलायला सांगितलेले. परीक्षेचा अत्यंत ताण असतो आणि मोदींच्या पुस्तकामुळे तो कमी झाला असे मध्यमवर्गीय पोरं सांगत होती. Bullshit.
इतरही दिवस असेच काहीतरी असते. मोदी कुठेतरी कार्यक्रमात गेले तिथे काय बोलले ह्याचे कव्हरेज डिटेल मध्ये असते. अनुराग ठाकूर (माहिती आणि प्रसार मंत्री) न चुकता दररोज बातम्यांमध्ये काही ना काही कारणाने असतोच असतो. कुठे आय सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्याचे फुटेज. आज तर साली हद्दच झाली.
बातम्यांचा क्रम
१. परीक्षा पे चर्चा -एक्झाम वॉरियर्स - मोदींचे थोडे भाषण आणि मुलांचे अनुभव -१० मिनिट
२. शांघाय सिनेमा फेस्टीव्हल (अनुराग ठाकुर भाषण)
३. कुठेतरी काहीतरी कार्यक्रम होता तिथे कुठला नाच सादर केला गेला. (Not kidding!)
४. नितीन गडकरी रस्त्याचे लोकार्पण
५. ऑस्ट्रेलियन ओपन
६. सानिया मिर्झा रिटायर.
७. भुयारी रस्त्याचे एकनाथ शिंदेंकडून लोकार्पण
८. भारत जोडो यात्रा चर्चेत रहावी म्हणून काँग्रेस आणि राहुल गांधी बेछूट वक्तव्य करत आहेत - भाजपा नेत्याचा आरोप
thats it !!!!
आज दखल घेण्यासारखे अजून काही झाले का ? ह्ममममममम....
सेन्सेक्स ८०० पॉइंट नी कोसळला. आज साधा उल्लेख सुध्दा नाही. हिंडनबर्ग रिपोर्ट बद्दल काल जेमतेम दोन मिनिट सुध्दा बातमी दिली नव्हती.
प्रश्न हा, की दूरदर्शन नेहमीच असे होते का, म्हणजे इतके भंपक होते का ? का कधी काही बघण्यालायका खरोखरचा बातम्या सुध्दा असायच्या ?
आक्षेप नक्की कशाबद्दल आहे?
आक्षेप जर दूरदर्शनसारख्या सरकारी माध्यमावरील बातम्यांचा उपयोग मोदींची टिमकी वाजविण्याकरिता(/पुरताच) केला जात आहे, असा जर असेल, तर कदाचित रास्त मानता येईलही. (ऑल्दो, इतर राजवटींत हे कधी झाले नाही, असेही नाही; तरीसुद्धा, आक्षेपात (मोदीनिरपेक्ष) काही दम आहे.)
मात्र, lack of newsworthiness/भंपकपणा हाच जर का आरोप असेल, तर आजमितीस भारतातील बहुतांश खाजगी चॅनेलांवरील बातम्यांच्या कार्यक्रमांमध्ये तरी कोणती फारशी बरी परिस्थिती आहे?
दूरदर्शन इतके वाईट कधीच
दूरदर्शन इतके वाईट कधीच नव्हते. लोकसभा, राज्यसभा टिव्ही यातर अतिशय सुंदर वाहिन्या होत्या २०१४ पुर्वी, तिथले कार्यक्रम इतके उत्तम माहितीप्रचूर होते की युपीएससी वाले सुद्धा नेमाने बघत. सगळीकडे सुमार लोक भरून आपली आरती ओवाळून घेणे यात प्रचंड इंटरेस्ट असणारी जोडगोळी आहे सत्तेत त्यामुळे ही अधोगति.
खासगी असू किंवा सरकारी
News चॅनेल हा एक व्यवसाय आहे .समाज सेवा नाही . ( जसे सर्रास समजले जाते मीडिया ही समाज सेवा आहे चोथा स्तंभ आहे लोकशाही चा,साफ चूक आहे)
सरकारी news चॅनेल चे मायबाप हे सरकार असते
आणि खासगी चॅनेल चे मालक हे स्वतःचा फायदा जास्तीजास्त व्हावा म्हणून न्यूज चॅनल च वापर करतात
जाहिराती मधून होणाऱ्या फायद्या पेक्षा जास्त फायदा सरकारी आशीर्वाद नी बाकी मार्गाने होतो.
पार्ट टाइम चॅनेल व्यवसाय आणि मुख्य व्यवसाय वेगळा .
अशी स्थिती असते
निःपक्ष पत्रकारिता हा प्रकार आता राहिला नाही.
खरेच गंभीर विचारात पडलो
काल च एक आर्टिकल वाचले आणि ते पटले पण.
जगातील सर्व देश पुढे येणाऱ्या प्राकृतिक किंवा साथीचे रोग अशा संकटाना समोर जाण्यास सक्षम आहे त का?
Covid मध्ये खूप मोठी मनुष्य हानी झाली.
ती पण अशा वेळी की आधुनिक यंत्रणा माणसाकडे उपलब्ध आहे.
भूकंप,किंवा दुष्काळ ह्या मध्ये जितकी लोक मेली नाहीत त्या पेक्षा जास्त लोक covid मध्ये मेली.
जग भीतीच्या छायखाली असहाय झाले होते.
पुढे कोणती हवामान बदला मुळे प्राकृतिक संकट आले तर?
जगातील एक तरी देश त्याचा मुकाबला करू शकेल का?
एक साधा विचार करा .
दोन वर्ष आपल्या देशात पावूस पडलाच नाही(जग राहू ध्या)
काय अवस्था होईल
अशी वेळ जेव्हा येईल तेव्हा भारत सरकार ची काय तयारी असेल.
काहीच नाही.
अन्न अन्न आणि पाणी पाणी करून लोक जीव सोडतील.
पैसे हे आभासी चलन आहे त्याचा उपयोग अशा वेळी बिलकुल होत नाही.
संसाधने ही खरी संपत्ती आहे.
Gdp वर श्रीमंत की गरीब ठरवणे च अयोग्य आहे.
ज्या देशाकडे नैसर्गिक संसाधने जास्त ते च खरे श्रीमंत.
नैसर्गिक संकटात हेच gdp कमी पण नैसर्गिक संपत्ती जास्त तेच देश वाचतील.
बाकी सर्व नष्ट होतील.
Dienosore नष्ट झाले पण उंदीर वाचले तसे आहे है
चलनी नोटा आणि सोने ,हिरे ही खरी संपत्ती नाही
जगात एकदी गोष्ट उपलब्ध च नसेल तर ?
अब्जो डॉलर असून पण ती तुम्हाला मिळणार नाही.
मुंबई मध्ये जेव्हा पुर आला.
लाखो रुपये गाडीत पडले आहेत अन एक दहा रुपया
चा वडापाव खरेदी करू शकत नाही अशी अवस्था होती.
संसाधने निर्माण करणे म्हणजे संपत्ती निर्माण कारणे
चलनी नोटांची किंमत
कचऱ्या पेक्षा पण जास्त नाही.
पाण्याचा साठा दोन वर्ष पुरेल अशी व्यवस्था जगात एका पण देशात नाही.
खरेच तशी वेळ आली तर?
नवीन प्रकारचा व्हायरस जगात पसरला तर?
ह्या वर काही संशोधन जगात पूर्ण क्षमतेने होत नाही.
Covid येवू शकतो ह्याची जाणीव माणसाला २०२६ लाच झाली पाहिजे होती.
पण जेव्हा प्रत्यक्ष व्हायरस नी पाय पसरायला सुरुवात केली तरी जगाला हा व्हायरस ओळखता आला नाही.
ओळख पटविण्यासाठी दोन वर्ष गेली.
तो पर्यंत भयंकर नुकसान झाले होते
स्त्री & पुरुष
स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरात काही चुंबक (मॅग्नेट) नसतो. पण तरीही ते एकमेकांकडे कसे आकर्षित होतात?
स्त्री आणि पुरुष यांच्यातील याच निसर्गनिर्मित अनंत आकर्षणाची आणि मानवनिर्मित अथांग राजकारणाची गोष्ट विनोदी पद्धतीने सांगणारी ‘स्त्री & पुरुष’ ही अवघ्या दहा मिनिटांची शॉर्ट फिल्म खालील लिंकवर विनामूल्य पहा.
https://www.mxplayer.in/movie/watch-stree-and-purush-short-film-movie-o…
आणि शॉर्ट फिल्म तुम्हाला आवडली तर शॉर्ट फिल्मची ही लिंक तुमच्या काँटॅक्टमधील इतरांना, ग्रुप्सना शेअर आणि फॉरवर्ड करा.
धन्यवाद!
हिंडनबर्ग रिपोर्ट बद्दल काल
हिंडनबर्ग रिपोर्ट बद्दल काल जेमतेम दोन मिनिट सुध्दा बातमी दिली नव्हती.
ही कंपनी मूडी, मॉर्गन स्टेनले, एस&पी सारखी व्यवसायिक डाटा क्षेत्रात कार्य करत नाही. 10 कर्मचारी ही या कंपनीत नसेल. ही अशीच रिपोर्ट आहे जसी भारताचा हंगर इंडेक्स . याशिवाय पाहिल्याच पानावर ही आमची निजी राय आहे. हे disclaimar देऊन टाकते. कुणाच्या तरी सांगण्यावर बिना अध्ययन करता बनवलेली रिपोर्ट. दूरदर्शन या रिपोर्टला महत्व का म्हणून देणार.
बाकी 2014 पूर्वी पेक्षा दूरदर्शन वर जास्त उत्तम कार्यक्रम येतात, हे निश्चित.
टाळा टाळ केली की संशय वाढतो
रिपोर्ट प्रसारित झाला की आरोप करणाऱ्या कंपनीला चा टारगेट करणे.
त्यांच्या कुवती वर प्रश्न चिन्ह उभे करणे.
वैयक्तिक व्यवहार ना देशांशी जोडणे.
हे सर्व रिपोर्ट खरे आहेत ह्याचा पुरावा आहे.
त्या पेक्षा चोकशी करून सत्य काय ते जनते समोर ठेवले जाईल . इतकी एका वाक्यात केंद्र सरकार नी हमी दिली असती तर .
लोकांना चा विश्वास वाढला असता.
इतके साधं आहे हे
भारतीय मीडिया
आज काल बातम्या देत असते .अगदी head लाईन्स.
Meta नी इतके कर्मचारी काढून टाकले.
गुगल नी इतके कर्मचारी काढून टाकले.
बाकी अनेक अंतर राष्ट्रीय कंपन्या.
ह्यांचं हेतू ह्या बातम्या देण्यात नक्कीच शुद्ध नाही.
त्यांचा आधार घेवून येथील कर्मचारी वर्गावर अन्याय करण्याचा तो माणसं आहे.
एक फ्रेश सामान्य इंजिनिअर .
गुगल मध्ये नोकरी पा ल लागला तर त्या नक्कीच लाखात पगार असणार.
त्याच दर्जा चा इंजिनियर भारतात कामाला लागला तर त्याचा पगार दहा ते पंधरा हजार फक्त असतो.
खूप फरक आहे.
अग्निविर ल २६ हजार पगार आहे.
खूप खूप मोठा फरक आहे.
पण कामावरून काढून टाकले चार वर्षात ही बातमी पसरून दिली जाते पण स्थिती दोघांची काय आहे हे नाही संगत.
फक्त लबाडी
भारतीय मीडिया
आज काल बातम्या देत असते .अगदी head लाईन्स.
Meta नी इतके कर्मचारी काढून टाकले.
गुगल नी इतके कर्मचारी काढून टाकले.
बाकी अनेक अंतर राष्ट्रीय कंपन्या.
ह्यांचं हेतू ह्या बातम्या देण्यात नक्कीच शुद्ध नाही.
त्यांचा आधार घेवून येथील कर्मचारी वर्गावर अन्याय करण्याचा तो माणसं आहे.
एक फ्रेश सामान्य इंजिनिअर .
गुगल मध्ये नोकरी पा ल लागला तर त्या नक्कीच लाखात पगार असणार.
त्याच दर्जा चा इंजिनियर भारतात कामाला लागला तर त्याचा पगार दहा ते पंधरा हजार फक्त असतो.
खूप फरक आहे.
अग्निविर ल २६ हजार पगार आहे.
खूप खूप मोठा फरक आहे.
पण कामावरून काढून टाकले चार वर्षात ही बातमी पसरून दिली जाते पण स्थिती दोघांची काय आहे हे नाही संगत.
फक्त लबाडी
व्होकल फ्राय
काही दिवसांपूर्वी युट्यूब शाॅर्टस वर recommendation मध्ये आलेला loudermilk चा काॅफीशाॅपचा व्हिडिओ पाहिला ज्यात व्होकल फ्रायचा कचरा केलेला दाखवला. नंतर यावरचे इतर व्हिडिओ पाहिले. व्होकल फ्राय म्हणजे मला समजलं ते एवढंच की मुळ आवाजामध्ये विशिष्ट प्रकारचा फाटकेपणा आणायचा जेणेकरून तो आकर्षक (मादक?) वाटला पाहिजे. काही गायकांची गाणी निव्वळ ह्या प्रकारच्या आवाजामुळे प्रसिद्ध झाल्याचे समजले. एका दुव्यावर माहिती मिळाली की अनेक मोठमोठे नट्या, नट, गायकं, रेडिओ निवेदक सर्रास व्होकल फ्रायचा वापर करतात. (Sorry to bother you चित्रपटात white voice वापरून नायक प्रगती करताना दिसलाच की) जोपर्यंत हे माहीत नव्हते तोपर्यंत थोडेफार हा प्रकार श्रवणीय वाटायचे पण आता उगीचच irritating वाटताहेत. ओरजीनॅलीटीचा जमानाच नाही राहिला. छ्या.
पत्ती लागणे
याला भारतीय सेमीक्लासिकल संगीतात देखील सौंदर्याचे स्थान आहे. बेगम अक्ख्तरची पत्ती लागणे हे तर वाहवाचा कळस समजले जाते.
एक प्रश्न पडला, ॲडेल जर लोकल फ्रायचा वापर करत नसेल तर ती ॲडेल राहील काय?
म्हणजे तिच्यासाठी मस्ट आहे, तिच्या गाण्यांचा उपयोग पाहता.
अजून एक लोकल प्रायचा आवडता उपयोग म्हणजे ब्रुकलिन नाईन नाईन मधली जिना लिनेटी.
कॅमेरा तंत्रज्ञानाचा भीतीदायक गैरवापर!
सत्ताधारी पक्षातील अति वरिष्ठ नेत्यांना एक कंपनी ने अति अति अति high resolution कॅमेरा चा डेमो दिला
पाच सहा पट रक्कम खर्च करून हि कंपनी विकत घेतली गेली - पण कागदावर हे आलेच नाही
आणि ते कॅमेरा तंत्रज्ञान लष्कर संशोधनासाठी दिले
हे कॅमेरे उपग्रहावर लावण्यात आले आणि इतर गोष्टी प्रमाणे विरोधी पक्षावर नजर ठेवायला हे कॅमेरा वापरू लागले
विरोधी पक्षातील एक वरिष्ठ राजकारण्या वर नजर होती आणि त्यावर आकाशातून अंतरीक्ष कॅमेरा लावलेले होते .
एकदा रस्त्याच्या कडेला लघुशंका करीत असता त्याचे शुटींग झाले .
लिंगाचा फोटो प्रचंड इन्लार्ज केला असता त्यावरील विषाणू दिसले आणि त्यास काही गुप्तरोग आहे ते कळले ( त्यालाही माहित नव्हते ) नंतर त्याला व्यवस्थित ब्लॅकमेल केले गेले . अनेक राजकारण्या बद्दल अशा गोष्टी शोधण्याचा प्रयत्न होत आहे .
हे धक्का दायक आहे .
एक च मानसीकता आहे
आंतर राष्ट्रीय मोठ मोठ्या कंपन्या ची एक च मानसिकता आहे त्यांच्या उद्योगातून निर्माण होणारा पैसा कमीत कमी लोकांस वाटला जावा.
सर्व च इन्कम प्रमोटिर लोकांना मिळावा.
तंत्र,यंत्र हे फक्त बहाणे आहेत.
ह्याला एक च उपाय आहे.
ह्या सर्व उद्योगांना पर्याय उभा करणे ..एकत्र येवून.
वॉलमार्ट.
लहान लहान दुकानदार नी एकत्र येवून सहकारी संस्था निर्माण कराव्यात आणि त्याचे देश भर जाळे.
एकमेकात सहकार्य ठेवावे
टीव्ही इण्डस्ट्री.
जिल्हा पातळीवर एकत्र येवून एक एक कार्यक्रम आणि त्याचे देश जाळे सहकारी वृत्ती नी.
असे प्रतेक उद्योगात झाले पाहिजे.
लोकांनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे.
मोठ मोठ्या कंपन्या लहान लहान होवून बंद झाल्या पाहिजेत.
तेव्हा हे नोकर कपात आणि उद्योगांची एकाधिकार शाही नष्ट होईल .
हा एकमेव उपाय आहे
वार्तालाप: मनातील विचार सकारात्मक आणि नकारात्मक
समुद्रात जेवढा लाटा उसळत नाही त्याच्यापेक्षा जास्त विचार तरंगा मानवाच्या मनात सदैव उसळी भरत राहतात. सृष्टी कर्त्याच्या मनात विचार आला आणि या ब्रह्मांडाची रचना झाली. आपले प्राचीन ऋषी म्हणतात 'जे काही ब्रम्हांडात आहे ते पिंडामध्येही' आहे. प्रत्येक सूष्म कोशाचे ही स्वतंत्र अस्तित्व आहे. एका कोशातील विचार ही ब्रम्हांडाची निर्मिती करण्यास समर्थ आहे. विचारांनी स्मृती निर्मित होते आणि कोशांच्या स्मृति ब्रम्हांडाच्या निर्मितीपासून सतत वृद्धिंगत होत राहतात आणि त्यानुसार जीवांची निर्मिती करतात. मानवाची निर्मितीही कोशांतील स्मृति अनुसारच झाली आहे. आपल्या शरीरातील कोश ही सतत निर्मितीत व्यस्त राहतात, शरीरात होणारी क्षती सतत दूर करत राहतात. मनुष्य आपल्या विचारांच्या स्मृती पुढच्या पिढीलाही प्रदान करतो. मानवाचे आचार व्यवहार - धर्म, अर्थ, काम जीवन सर्वच विचारानुसार ठरते आणि भविष्यासाठी स्मृतीत सुरक्षित होते. सकारात्मक विचार सकारात्मक स्मृति निर्माण करतात. मानवाला शारीरिक आणि मानसिक रूपेण निरोगी ठेवतात. नकारात्मक विचार नकारात्मक स्मृति निर्मित करतात. या नकारात्मक विचारांमुळे आपल्या शरीरातील कोशिका भ्रमित होतात, निर्मितीच्या जागी शरीरलाच नष्ट करू लागतात. अधिकान्श आजारांचे हेच मुख्य कारण आहे. मानवाला होणारे आनुवंशिक आजारांचे मुख्य कारण ही नकारात्मक विचार आहे. आत्महत्येचे मुख्य कारण ही हेच आहे.
मानव जातीचे अस्तित्व विचारांवर निर्भर आहे. सकारात्मक विचार ब्रम्हदेवाने निर्मित केलेल्या सृष्टीच्या समस्त जीवांचा जगण्याच्या अधिकाराचे सम्मान करतात. जियो और जीने दो या सिद्धांताचे पालन करतात. पण मानव जातीचे नकारात्मक विचार पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व ही संपवू शकतात. तूर्त सकारात्मक विचार करा. आनंदी रहा. आनंदी आणि निर्मितीत व्यस्त राहणाऱ्या कोशिका जीवनाची रक्षा करण्यास समर्थ आहेत. करोना काळात हा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
महिला दिनानिमित्त
प्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
अनेक समाज सुधारक महिला हक्क साठी लढले त्या मध्ये पुरुष च जास्त असतील.
असंख्य कायदे महिलांच्या हिता साठी जग भरात लागू केले गेले.
आरक्षण,सवलती हे पण महिलांना देवून झाले .
तरी आज पण स्त्री पुरुष समानता नाही अशी बोंब ठोकली जातेच.
इतके सगळे प्रयत्न करून पण अजून स्त्री पुरुष समानता का आली नाही.
कोण आहे ह्याला जबाबदार?
पुरुष सत्तक पद्धत.
की पुरुषांची एकाधिकार शाही.?
१) शिक्षण मध्ये आज चे पालक मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करत नाहीत(एकदा अपवाद असेल पण तो अपवाद समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही.
२) कोणत्याच ठिकाणी स्त्री म्हणून वेगळी वागणूक दिली जात नाही.
बस,ट्रेन,नोकऱ्या, सिनेमा हॉल, सार्वजनिक जागा, etc.
कोठेच स्त्री म्हणून प्रवेश नाकारला जात नाही.
३), कायदे हे पुरुषानं पेक्षा स्त्री ला झुकते माप देणार आहेत.
तरी समानता नाही
कारण स्त्री च स्वतः अजून बदलली नाही.
Tiktok पासून fb पर्यंत सर्व समाज माध्यम बघा.
बौद्धिक,शारीरिक,सामाजिक , ह्या विषयात स्त्रिया व्यक्त होत नाहीत .स्त्री चे शरीर स्त्री च स्वतःचे कर्तुत्व म्हणून वापरते.
.खेळ, बौद्धिक क्षेत्र, सामाजिक काम, संशोधन अशा विविध क्षेत्रात स्त्री नी यश संपादन करावे आणि तेच समाज माध्यमावर दिसावे.
ही अपेक्षा असते
पण दिसते नेमके उलट .
वार्तालाप: सकारात्मक विचारांसाठी मनाचे श्लोक
मनात विचार उत्पन्न होतात, विचारांनी स्मृति तैयार होतात आणि स्मृतिच्या निर्देशानुसार आपण कृती करतो. मनात सकारात्मक विचार उत्पन्न होतील तर कृती ही सकारात्मक होणार. मनात नकारात्मक विचार उत्पन्न झाले की आपण नकारात्मक कृती उदा. तळीरामाणे दारू पिणे, शिव्या देणे किंवा हत्या इत्यादि घृणीत कृती ही आपण करू शकतो. मन तर अभौतिक आहे, त्यात विवेक पूर्ण सकारात्मक विचार कसे भरावे, हा मोठा प्रश्न आहे?
समर्थ रामदास स्वामी म्हणतात:
मन दिसते मां धरावे. ज्याचे त्याने आवरावे.
आवरून विवेके भरावे. अर्थांतरी (द. 18.10.17)
आपल्या मनाला भटकण्यापासून वाचविण्याचे कार्य आपल्यालाच करावे लागते. मनात विवेकपूर्ण विचार भरून मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आपण संसार आणि परमार्थात सफल होऊ शकतो. पण समर्थ फक्त उपदेश करणारे नव्हते. त्यासाठी समर्थांनी 205 श्लोकांत मनाला उद्देश्यून मनोबोधाची निर्मिती केली. मनाच्या श्लोकांच्या सुरवातीलाच समर्थ म्हणतात जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावें. जनीं वंद्य ते सर्व भावें करावें अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादींचा वाईटांचा त्याग करणे. वंद्य धरण्यासाठी समर्थ म्हणतात, सज्जनांची संगती धरावी, पापबुद्धी नको रे, विषयांची कल्पना नको रे, मना वासना दुष्ट कामा नको रे, दुसर्यांचे द्रव्य नको रे, अति स्वार्थ बुद्धी सोडणे, अहंकार सोडणे, दुसर्यांचे नीच बोलणे ऐकून ही सर्वांशी नम्र बोलणे, शोक-चिंता न करणे, इत्यादि इत्यादि. मनाच्या श्लोकांचे नियमित वाचन/ पाठांतर केल्याने मनात विवेकपूर्ण उत्तम विचार सहज भरतील आणि उत्तम स्मृति निर्माण होतील. उत्तम स्मृति उत्तम कार्य करण्यास प्रेरणा देतील. संसारात आणि परमार्थात सफल होण्यास मदत होईल.
वार्तालाप: मनातील मूषक वृतीला दूर करा.
अप त्यम् परिपन्थिनम् मुषीवाणम् हुरःचितम् ।
दूरम् अधि स्रुतेः अज॥
(ऋ.१/४२/३)
आपल्या मनातील मूषक प्रवृती म्हणजे दुर्विचार. बिना कष्ट करता दुसर्यांच्या वस्तु हडपण्याची इच्छा ठेवणे आणि त्यासाठी कपट कारस्थान रचणे, दुसर्यांना धोका देणे, चोरी,डाका, रिश्वत घेऊन कार्य करणे, इत्यादि-इत्यादि. या ऋचेत ऋषि आपल्या मनातील मूषक वृतीला दूर करण्याची प्रार्थना परमेश्वराला करत आहे. आपल्याला माहीत आहे उंदीर सदा कुरतडत राहतो. तो शेतातील, घरातील अन्न-धान्य कागद, कपडे इत्यादि काहीही सोडत नाही. सर्व काही तो त्याच्या बिळात सतत एकत्र करत राहतो. दुसर्यांची संपती हडपण्याची त्याची हाव कधीच संपत नाही. परिणाम उंदीराचा शेवट पिंजर्यात होतो किंवा विषाक्त पदार्थ खाऊन तो मरतो. समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात:
नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे
अति स्वार्थ बुद्धीन रे पाप सांचे.
घडे भोगणे पाप तें कर्म खोटे
न होतां मनासारिखें दु:ख मोठें.
अति स्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन सदा सर्वकाळ दुसर्यांच्या द्रव्याची अर्थात जे आपल्या कष्टाचे नाही, हाव धरण्याने पापांचा संचय होत राहतो. अखेर अश्या खोट्या कर्मांचे वाईट परिणाम भोगावे लागतात आणि मनाला त्याचे मोठे दु:ख होते.
आजकाल संपूर्ण समाज या मूषक वृतीने ग्रसित आहे. काही काम न करता वीज, पाणी, जेवण सर्व फुकट पाहिजे ही मनोवृती समाजात बळावत आहे. व्होट बँक साठी अनेक राजनेता जनतेच्या मूषक प्रवृतीला खत-पाणी घालत आहे. देशातील अधिकान्श जनतेला फुकटाची सवय लागली तर कष्ट करून पोट भरण्याचा उद्यम कुणीच करणारा नाही. परिणाम स्वरूप या खोट्या कर्मांचे फळ समस्त समाजाला भोगावे लागेल. भूक, अराजकता आणि हिंसेने जनता त्रस्त होईल. अजूनही वेळ गेलेली नाही स्वत:ची आणि समाजाच्या मूषक प्रवृतीला आळा घालण्याची गरज आहे. असो.
इस्त्रायल मध्ये नुकतीच एक घटना घडली
देशप्रेमी,प्रतेक व्यक्ती सैन्यात असणारा देश, सर्वच बाबतीत आघाडीवर.
असा देश .
त्या देशात लोक रस्त्यावर उतरली सरकार विरुद्ध.
न्यायवयवस्था सरकार ची दासी ठरावी असे विध्येक मांडल्या मुळे.
उजवी विचार सरणी इस्त्रायल सरकार इतकी गल्लीहच्छ असेल तर नको बाबा उजवे.
डावे काय आहेत ते उत्तर कोरिया जगाला दाखवत आहेत .
भंगार.
ते पण नकोत..
असा विचार मनात आला
नेहरूंचा मिश्र विचार च योग्य
वार्तालाप: अकस्मात तें राज्य सर्वे बुडाले
मना सांग पां रावणा काय जालें
अकस्मात तें राज्य सर्वे बुडालें.
म्हणोनी कुडी वासना सांडिं वेंगी
बळें लागला काळ हा पाठिलागी.
समर्थ म्हणतात, मृत्यू कुणालाच चुकलेली नाही. भगवंताने माणसाला 100 वर्षांचे आयुष्य दिले आहे. माणसाला, दुष्ट वासनांचा त्याग करून सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालत चारी आश्रमांचे कर्तव्य पूर्ण करत, मृत्यू आली तर त्याचे दु:ख कुणालाच भोगावे लागत नाही. अशी मृत्यू प्रत्येकाला हवी असते. समर्थ पुढे म्हणतात दुष्ट माणसांचा अकस्मात नाश होतो. कुडी म्हणजे दुष्ट वासनेच्या चक्रात रावण बुडालेला होता. त्यामुळे त्याचा अकस्मात नाश झाला. राक्षसी साम्राज्य बुडाले. इथे समर्थांनी अकस्मात शब्द वापरला आहे. कारण रावणा जवळ दैवीय अस्त्र-शस्त्रानीं सुसज्जित सैन्य होते. देव आणि दानवांची त्याला भीती नव्हती. पण एका वनवासी श्रीरामाने वनात राहणाऱ्या वानर, भिल्ल इत्यादींच्या मदतीने शक्तिशाली रावणाला सहज पराजित केले. दुष्ट वासनांचे परिणाम रावणाला आणि समस्त श्रीलंकेच्या प्रजेला भोगावे लागले.
आज ही ओवी घेतली त्याला ही कारण आहे. नुकतीच दूरदर्शन वर अतीक अहमदच्या हत्येची बातमी पाहिली. अतीक अहमद ज्याची गॅंग हप्ता वसूली करायची, धमकी द्यायची, जमिनी हडपायची, बलात्कार, लूटमार इत्यादि करायची. विरोध करणाऱ्यांना तो यमसदनी पाठवायचा. न्यायाधीश ही त्याला घाबरायचे. जो जेल मधूनही लोकांना धमक्या द्यायचा. राजनेता ही त्याचे पाळीव होते. त्याच्या विरुद्ध तक्रार करायला ही सामान्य जनतेची हिम्मतच नव्हती. याच दुष्ट मार्गाने त्याने हजारो कोटींची माया जमविली होती. मोठे साम्राज्य उभे केले होते. पण काय झाले, अकस्मात त्याच्या मुलाचे एनकाऊंटर झाले, पोलिसांच्या सुरक्षेत ही त्याची हत्या झाली, बायको पोलिसांच्या भीतीने वणवण फिरते आहे. आज दुष्ट वासनांचे परिणाम त्याला आणि त्याच्या परिवाराला भोगावे लागत आहे.
Fb पासून सर्व समाज माध्यम
FB पासून सर्व समाज माध्यम फुकट लोकांना उपलब्ध करून दिलं आहेत.
आणि ह्या सर्व कंपन्या अमेरिकेच्या आहेत..फुकट ह्या सुविधा देण्या मागे ह्या सर्व कंपन्यांचा आणि संबंधित देशांचा नक्कीच कुटील हेतू आहे
परिपक्व समाज नसणारे भारता सहित अनेक देश आहेत ..
ह्या फुकट समाज माध्यम च वापर ह्या सर्व देशात धार्मिक,जातीय, आणि बाकी सर्व असमानता आहे त्या
देशात सामाजिक अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला जातो.
एफबी पासून सर्व समाज मध्यान स शुल्क संबंधित देशांनी करावीत..जसे चीन नी सरळ सर सकट बंदी च घातली आहे
अतुल देऊळगावकर यांचा लेख
पर्यावरणाबद्दल करूणेने पण शास्त्रीय दृष्टीकोनातून सातत्याने लिहिणारे अतुल देऊळगावकर यांचा खालील लेख वाचून काळजात चर्र झाले. नदीला माता वगैरे म्हणत तिचे अस्तित्वच संपवूण टाकायला निघालेला आपला देश. पर्यावरणाची एवढी अमर्याद हानी करतोय आपण. सरकार याबाबतीत कधीच कार्यक्षम नव्हते. आणि क्रोनी कॅपॅटलिझमचा सुवर्णकाळ असताना या नद्या जिवंत राहतील याची कसलीही शक्यता दिसत नाही. परिणिता दांडेकर, अतुल देऊळगावकर यांचे लेख वाचून विषण्ण वाटते.
https://www.loksatta.com/lokrang/environmentalist-atul-deulgaonkar-lett…
वार्तालाप(१७): भिक्षा ही कामधेनु
समर्थ म्हणतात भिक्षाही सर्व सांसारिक आणि अध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी कामधेनू रुपी गाय आहे. समर्थांनी भिक्षा मागून संपूर्ण भारताचे भ्रमण केले. त्याकाळी भारत परचक्राच्या तावडीत सापडलेला होता जाळ-पोट, हिंसा, लूट, बलात्कार इत्यादी सामान्य बाबी होत्या. हीन भावनेनेग्रस्त सामान्य जनता दुःख आणि दारिद्र्यात खितपत पडलेली होती. महाराष्ट्राची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. समर्थांनी हे सर्व बदलण्याचे ठरविले. भिक्षेच्या बळावर ज्या काळी मंदिरे आणि मठ उध्वस्त होत होती त्या काळात त्यांनी समर्थ मठांची स्थापना केली. भिक्षेच्या मदतीने त्यांनी त्यांच्यासारखे शेकडो समर्थ ब्रह्मचारी तयार केले. "जय जय रघुवीर समर्थ" आरोळी ऐकल्याबरोबर सामान्य जनता ही मूठभर भिक्षा आनंदाने त्यांच्या भिक्षा पात्रात घालायची. महाराष्ट्राच्या जनतेत शौर्य आणि स्वाभिमान निर्मित करण्यात समर्थ सफल झाले आणि त्याची स्वराज्याला बहुमोल मदत झाली. हा इतिहास आहे.
समर्थ म्हणतात भिक्षेने ओळखी वाढतात, लोकांचे मनोगत समजते आणि त्यांच्या समस्या कळतात. भिक्षेच्या माध्यमातून समाज कल्याणाची मोठी-मोठी कार्य ही सहज सिद्ध होतात. आजच्या काळातली काही उदाहरणे -स्वामी दयानंद सरस्वती गुरुकुल आणि डीएवी शाळांची श्रृंखला सामान्य जनते कडून मिळालेल्या भिक्षेच्या बळावरच निर्मिती केली. संघाच्या प्रचारकांनी ही भिक्षेच्या माध्यमातून समाज सेवेचे महत्त्वपूर्ण कार्य सहज सिद्ध केले आणि आजही करत आहे. कोटीहून जास्त लोकांनी शंभर ते हजार रुपयांची भिक्षा स्वामी रामदेवांच्या झोळीत टाकली आणि कामधेनु रुपी त्या भिक्षेच्या प्रतापाने स्वामी रामदेव यांनी पतंजली योगपीठ, अनेक गुरुकुल, पतंजली विश्व विद्यालय, आयुर्वेदात रिसर्च करणारी सर्वात मोठी प्रयोगशाळा, आयुर्वेद फार्मेसी आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी फूड पार्क, इत्यादी इत्यादी. या शिवाय शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी भारतीय शिक्षा बोर्डची स्थापनाही केली.
स्पष्ट आहे, निस्वार्थ भावनेने समाज सेवेसाठी मागितलेली भिक्षा ही कामधेनु समान आहे.
वार्तालाप : भिक्षा ही कामधेनु
समर्थ म्हणतात भिक्षाही सर्व सांसारिक आणि अध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी कामधेनु रुपी गाय आहे. समर्थांनी भिक्षा मागून संपूर्ण भारताचे भ्रमण केले. त्याकाळी भारत परचक्राच्या तावडीत सापडलेला होता जाळ-पोट, हिंसा, लूट, बलात्कार इत्यादी सामान्य बाबी होत्या. हीन भावनेनेग्रस्त सामान्य जनता दुःख आणि दारिद्र्यात खितपत पडलेली होती. महाराष्ट्राची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. समर्थांनी हे सर्व बदलण्याचे ठरविले. भिक्षेच्या बळावर ज्या काळी मंदिरे आणि मठ उध्वस्त होत होती त्या काळात त्यांनी समर्थ मठांची स्थापना केली. भिक्षेच्या मदतीने त्यांनी त्यांच्यासारखे शेकडो समर्थ ब्रह्मचारी तयार केले. "जय जय रघुवीर समर्थ" आरोळी ऐकल्याबरोबर सामान्य जनता ही मूठभर भिक्षा आनंदाने त्यांच्या भिक्षा पात्रात घालायची. महाराष्ट्राच्या जनतेत शौर्य आणि स्वाभिमान निर्मित करण्यात समर्थ सफल झाले आणि त्याची स्वराज्याला बहुमोल मदत झाली. हा इतिहास आहे.
समर्थ म्हणतात भिक्षेने ओळखी वाढतात, लोकांचे मनोगत समजते आणि त्यांच्या समस्या कळतात. भिक्षेच्या माध्यमातून समाज कल्याणाची मोठी-मोठी कार्य ही सहज सिद्ध होतात. आजच्या काळातली काही उदाहरणे -स्वामी दयानंद सरस्वती गुरुकुल आणि डीएवी शाळांची श्रृंखला सामान्य जनते कडून मिळालेल्या भिक्षेच्या बळावरच निर्मिती केली. संघाच्या प्रचारकांनी ही भिक्षेच्या माध्यमातून समाज सेवेचे महत्त्वपूर्ण कार्य सहज सिद्ध केले आणि आजही करत आहे. कोटीहून जास्त लोकांनी शंभर ते हजार रुपयांची भिक्षा स्वामी रामदेवांच्या झोळीत टाकली आणि कामधेनु रुपी त्या भिक्षेच्या प्रतापाने स्वामी रामदेव यांनी पतंजली योगपीठ, अनेक गुरुकुल, पतंजली विश्व विद्यालय, आयुर्वेदात रिसर्च करणारी सर्वात मोठी प्रयोगशाळा, आयुर्वेद फार्मेसी आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी फूड पार्क, इत्यादी इत्यादी. या शिवाय शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी भारतीय शिक्षा बोर्डची स्थापनाही केली.
स्पष्ट आहे, निस्वार्थ भावनेने समाज सेवेसाठी मागितलेली भिक्षा ही कामधेनु समान आहे.
वार्तालाप: नामाची महिमा
अखंड नामस्मरण जपत जावे,
नामस्मरणे पावावें समाधान.
समर्थ रामदासांनी श्रीसार्थ दासबोधात चौथ्या दशकातील तिसर्या समासात नामाच्या माहिमेचे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात नामस्मरणाचा अधिकार लहान थोर सर्वांना आहे.भगवंताचे नामस्मरण केल्याने मूढ व्यक्ति संसाररूपी समुद्र सहज पार करून जातो. सांसारिक समस्यांचे समाधान ही नाम स्मरणाने सहज होते. प्रभू श्रीरामाने समुद्रात टाकलेला दगड पाण्यात बुडून गेला. वानरांनी राम नाव लिहून टाकलेले दगड पाण्यावर तरंगत राहिले. ही आहे नामाची महिमा. एक जुनी आठवण. एकदा आमच्या मंत्रालयात आलेल्या नव्या अधिकार्याला कारचे लाईसेन्स बनवायचे होते. तो दिल्लीच्या एका आरटीओत गेला. तिथे काउंटर वर असलेल्या कर्मचार्याला त्याचा परिचय दिला. पण तो कर्मचारी त्याच्या कडे दुर्लक्ष करत म्हणाला, तुमच्या सारखे भरपूर साहेब इथे येतात, जाऊन लाइनीत उभे रहा. तिथली भीड पाहून अधिकारी कार्यालयात परतला. त्याने आपल्या पीएला समस्या सांगितली. पीए म्हणाला चिंता करू नका उद्या तुमचे काम होईल. पीएने साहेबांचे नाव घेऊन आरटीओच्या एका वरिष्ठ अधिकार्याच्या स्टाफची बोलणी केली. साहेबांची अपाइंटमेंट फिक्स केली. दुसर्या दिवशी साहेब पुन्हा आरटीओ गेले. अर्ध्या तासात साहेबाला लाईसेन्स मिळाले. जे काम साहेबाला जमले नाही त्यांच्या पीएने साहेबांचे नाव घेऊन सहज केले. मोठ्या लोकांचे नाव घेऊन संकटातून सहज मुक्ति मिळते असा अनुभव आयुष्यात सर्वांनाच येतो. तसेच आपण कितीही पापी असलो तरी भगवंताचे नाव घेऊन सहज संसार चक्रातून अजामीळ प्रमाणे मुक्त होऊ शकतो.
वार्तालाप: जाणण्याचे विज्ञान
जाणते लोक ते शहाणे.
नेणते वेडे दैन्यवाणे.
विज्ञान तेही जाणपणे.
कळो आले.
समर्थ म्हणतात सतत ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणारे लोक शहाणे असतात. जे लोक काहीही जाणण्याचा प्रयत्न करत नाही, अज्ञानी आणि आळशी असतात त्यांना समर्थांनी नेणते म्हटले आहे. नेणते लोकांच्या नशिबी फक्त दुःख आणि दारिद्र्य येते. समर्थ पुढे म्हणतात विज्ञान हेही जाणण्यामुळे कळू लागते. जाणण्याचे विज्ञान म्हणजे काय हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते.
समर्थानी श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसे सिद्ध करावे याचे मार्गदर्शन केले आहे. प्रपंच उत्तम करण्यासाठी जाणण्याचे विज्ञान ही समजण्याची गरज आहे. उदाहरण- एका शेतकऱ्याला उत्तम शेती करायची आहे. फक्त बी पेरून, खत-पाणी देऊन उत्तम शेती होत नाही. शेत जमिनीची पोत, पाण्याचे व्यवस्थापन, त्या भागातील हवामान, हवामान खात्याचे अंदाज, शेतीचे नवीन-नवीन तंत्र, कृषी विशेषज्ञांचे मार्गदर्शन, दुसऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव, विभिन्न ऋतूत शेतमालला मिळणारा बाजार भाव, प्राकृतिक विपत्ती- अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, आग, काळ-वेळ, सरकारची आयात- निर्यात नीती, एमआरपी, प्रोत्साहन अनुदान, इत्यादी सर्व जाणून शेती करणे म्हणजे शेतीचे विज्ञान जाणणे. अनुभवाने हे विज्ञान सिद्ध होते. असा शेतकरी आत्महत्या ही करत नाही, दुःखी आणि दरिद्री राहत नाही. दुसरे शेतकरी त्याच्या पासून प्रेरणा घेतात. जे लोक जाणण्याचे विज्ञान समजतात ते उद्योग-धंदे, व्यापार सर्व ठिकाणी सफल होतात.
आत्ताचेच एक उदाहरण- मे महिन्यात टमाटोला बाजार भाव मिळत नाही म्हणून पंजाबच्या शेतकऱ्यांनी टमाटो रस्त्यावर फेकले. शेतावर नांगर फिरवले. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी टमाटो शंभर रुपये किलोच्या भावाने विकले. असो.
दुर्जनांचा ही सन्मान करा.
दुर्जन प्राणी समजावे.
परी ते प्रगट न करावे.
सज्जना परीस आळवावे.
महत्त्व देऊनी.
समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे. नीती कथाही म्हणतात दुर्जन आणि नीच शत्रूला थोडे बहुत देऊन संतुष्ट केले पाहिजे आणि तुल्यबळ शत्रूशी युद्ध केले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न करत होते तर दुसरीकडे विजापूर आणि आदिलशाही स्वराज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. अश्या बिकट परिस्थितीत दिल्लीच्या बादशहा औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंहला स्वराज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत पाठविले. मिर्झा राजा जयसिंग मोठी फौज घेऊन दक्षिणेत आले. एवढ्या विशाल फौजेशी युद्ध करणे म्हणजे स्वराज्याचा विनाश. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांनी दासबोधात सांगितलेला मार्ग निवडला. महाराजांनी स्वराज्याचा हितासाठी दुर्जन मुघलांशी तह केला आणि स्वराज्याचे 23 किल्ले मुघलांच्या हवाली केले. एका दुर्जन शत्रूला प्रसन्न केले आणि त्याच्या वापर दुसऱ्या शत्रू विरुद्ध केला. मुगल फौजा विजापूर विरुद्ध युद्ध करण्यात गुंतल्या. स्वराज्याचे दोन्ही विरोधी दुर्बळ झाले. त्याचा फायदा स्वराज्याला झाला. अखेर मराठी साम्राज्य अटक ते कटक पर्यंत पसरले.
वर्तमान काळात ही भाजपने मेहबूबा मुफ्ती सोबत सत्ता स्थापन केली. हजारो काश्मिरी हिंदूंना काश्मीर मधून पलायन करावे लागले होते, त्यात तिच्या पक्षाचा ही हात होता, असे अधिकांश भारतीयांना वाटत होते. तरीही भाजप ने तिच्या सारख्या दुर्जन शत्रूला मुख्यमंत्री पद दिले. भाजपचे हे कृत्य अधिकांश भारतीयांना पटले नाही. पण भाजपने त्याच सत्तेचा फायदा घेऊन काश्मीर मधून धारा 370 हटवली. आपले उद्दिष्ट साध्य केले.
राजकारणात दुर्जन शत्रूचा उपयोग ही जे स्वतःच्या हितासाठी करू शकतात त्यांनाच खरे राजकारण कळले असते.
भारत जोडो यात्रेचा दुसरा
भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत आहे. त्याच्या आधी राहुल गांधीवर एखादी इन्कम टॅक्स - इडीची धाड पडेल आणि त्याला अटक करण्याचा प्रयत्न होईल, त्याची यथेच्छ बदनामी केली जाईल, आयटीसेलचे पाळीव ट्रोल्स अंगावर सोडले जातील यावर मी पैज लावायला तयार आहे. शेठ आणि त्याची बिरादरी आहेच एवढी प्रेडिक्टेबल.
स्पर्धा हीच माणसाचे दुःख आणि समस्या ह्याचे कारण आहे
स्पर्धा असेल तर प्रगती होते हे वाक्य च फसवे आहे.ह्या आंधळ्या spardhe मुळे अनेक संकट माणसाने ओढवून घेतली आहेत.
गैर धंद्याला प्रोत्साहन दिले आहे.
Bolt ni 9.58 seconds मध्ये 100 मीटर अंतर पार केले आहे .
पण माणसाची धावण्याची काही तरी मर्यादा आहे.
Bolt चे रेकॉर्ड तोडण्यासाठी स्पर्धा होते पण अतिउच्च तीच मर्यादा असेल तर रेकॉर्ड तोडण्यासाठी गैर मार्ग वापरले जातात..
ड्रग्स, हार्मोन बदलणारी औषध .
हे घातक च.
कशासाठी हवी आंधळी स्पर्धा.
वाहन हे प्रवास करण्यासाठी आहेत.
दोन चाकी मध्ये.
110cc,ते अगदी 1000 cc पर्यंत बाईक आहेत.
विनाकारण अंध स्पर्धा आहे.
उपयोग झीरो.
पण किमतीत कित्येक लाख रुपयाचा फरक.
विनाकारण लोकांची हाव वाढते, लोक ह्याची बळी पडतात.
कार 4 लाख पासून अगदी दहा करोड पर्यंत पण असतील .
पण लोक त्या स्पर्धेचे विनाकारण बळी ठरतात.
Suzuki असेल तर ओडी का नाही .
म्हणून लोक विनाकारण दुःखात असतात.
ह्या सर्व स्पर्धांना वर बंदी आली तर माणूस खूप सुखी होईल.
Exa .
Bike 150 cc चीच असेल त्याच्या वर नहीं
कार वीस लाख च अंतिम त्याच्या वर कोणतीच car नसेल.
1.5 लाखाची लायकी पण नसणार ऍपल मोबाईल लोक खरेदी करतात ते फक्त स्पर्धे चे बळी आहेत.
. ही फक्त उदाहरणे आहेत मोजकीच.
अशी लाखो उदाहरणे आहेत.
स्पर्धा ही अंध स्पर्धा आहे आणि माणसाची दुःखाची कारण आहे हे सिद्ध सहज होवू शकते.
माणसाच्या अनेक आजारच कारण,खून ,दरोडे ह्या गुन्ह्याचे कारण,माणसाच्या दुःखाचे कारण,माणसाच्या पिळवणूकी चे कारण, माणसाच्या शोषणाचे कारण, देशातील युद्धाचे कारण,
विनाशकारी हत्यार निर्माण होण्याचे कारण, समाजात भेद भाव होण्याचे कारण,.etc ,,,..........खूप मोठी लिस्ट आहे.
ह्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे स्पर्धा ,मराठी मध्ये अजून शब्द आहे चढाओढ.
Uno मध्ये कायदा करून जगातील प्रतेक गोष्टीला कमीत कमी उपयोगी हीच अंतिम मर्यादा समजून बंदी घाला.
जगातील सर्व माणसं सुखी होतील
110 cc पेक्षा जास्त cc असणारी एक पण बाईक जगात दिसणार नाही.
असा जागतिक कायदाच हवा .
बाकी सर्व घटक पण आहेत प्रतेक गोष्टीला मर्यादा ठरवून बंदी घाला .......खूप मोठी लिस्ट आहे.
आणि मग बघा जगात प्रतेक व्यक्ती सुखी असेल.
आणि एका समान पातळीवर असेल.
भेदभाव दिसणार च नाही
फक्त विचार करा जगात किती समानता असेल
सामान्य व्यक्ती जो मोबाईल वापरत असेल तोच मोबाईल सर्वात श्रीमंत व्यक्ती पण वापरेल त्याच्या साठी काही दुसरा कोणता पर्याय उपलब्ध च नसेल.
जी गाडी सामान्य लोक वापरतील तीच गाडी सर्वात श्रीमंत व्यक्ती पण वापरेल .
दुसरा पर्याय उपलब्ध च असणार नाही.
अफाट पैसा (लबाडी,चोऱ्या,लूट,प्रभाव टाकून,अधिकाराचा गैर वापर करून)कमावला तरी त्याला प्रश्न पडेल हा पैसा खर्च कुठे करायचा.
अफाट पैसा असेल तरी जीवन शैली मध्ये काडी चा फरक हवा असला तरी घडू शकणार नाही.
सर्व जन समान पातळीवर
मला समजलं तसं...
मला ह्या विषयात फार गती आहे असं नाही. यातून मला समजलं ते असं -
उदाहरणार्थ लंडन आणि न्यू यॉर्क या शहरांमध्ये पैसा आहे म्हणून खूप रोजगार आहे. इनव्हेस्टमेंट बँकिंग उदाहरणार्थ. लंडनमध्ये मोठ्या प्रमाणावर रशियन ओलिगार्कांनी घरं, जागा विकत घेतल्या आहेत; व्हँकुव्हरमध्ये चिनी नवश्रीमंतांनी, त्यामुळे स्थानिकांना परवडत नाही, अशा प्रकारच्या बातम्या अधूनमधून येत असतात.
मॅन्युफॅक्चरिंगचा बादशहा आता चीन असेल, औद्योगिक क्रांती जिथे झाली तो युरोप बराच मागे असेल. अमेरिकेत ए.आय. हीच इंडस्ट्री खूप मोठी असेल - यात औद्योगिकीकरणापेक्षा वीज, पाणी, शिकलेला नोकरदार वर्ग वगैरे औद्योगिकीकरणाचे परिणाम उपयुक्त आहेत, पण प्रत्यक्ष चिप्स, स्क्रीन्स वगैरे चीनमधून येतात.
असा काहीसा अर्थ मला लागला. इतरांचं, तुमचं काय म्हणणं?
मला लागलेला अर्थ:
मला लागलेला अर्थ:
औद्योगिक क्रांतीमुळे असा समाज निर्माण झाला जो उद्योगांवर(मोठे कारखाने, विजेवर चालणारी यंत्राद्वारे उत्पादन, मोठे भांडवल घातले गेलेले असे उद्योग) अवलंबून होता, म्हणजे त्या समाजाची आर्थिक, सांस्कृतिक, वाढ सर्वथा त्या उद्योगांवर अवलंबून होती. नवे तंत्रज्ञान आणि आर्थिक संरचना जसजश्या उदयास येतील तसतसे हे अवलंबन हळू हळू कमी कमी होत जाईल. एआयच्या युगात अश्या मोठ्या उद्योगांचे आजुबाजूच्या समाजावरचे प्रभाव नाहीसे होतील.
:D
हा प्रश्न, सुरुवातीलाच (कोठलाही अंदाज ठोकून देण्यास सरसावून येण्याअगोदर) विचारण्यात आला असता, तर त्यास काही मतलब राहिला असता, नाही काय?
(परंतु, अर्थात, OldIndian१ habits die hard, त्याला काय करणार?)
– (माझ्या आगामी आत्मचरित्रातील२ ‘अमेरिकेने मला काय शिकविले?’ या प्रकरणातून.)
——————————
१ बोले तो, आम्हीही शेवटी त्यातलेच! कितीही स्वतःला अमेरिकन म्हणविले, तरी मूळ पिंड जाता जात नाही. चालायचेच.
२ म्हणजे, आत्मचरित्र वगैरे लिहिण्याच्या भानगडीत तसा मी कधीच पडणार नाही म्हणा२अ, परंतु, चुकून लिहिलेच, तर.
२अ कारण, I don’t owe the world an explanation, म्हणून.
विनाकारण स्पर्धा
20 लाखाची कार आणि 10 करोड ची कार.
40 हजाराचा मोबाईल आणि 4 लाखाचा मोबाईल .
. कार गरजेची आहेच,मोबाईल गरजेचा आहेच.
पण हा जो लाखो रुपयांचा फरक आहे .
त्याचा गरजे शी काही संबंध नसणार आहे.
भेदभाव विरहित समाज निर्मिती च्या गप्पा आपण मारत असतो.
ह्या मध्ये जात आणि धर्म,भाषा इतकेच धरून बसलो आहे .
किती मोठा मूर्खपणा आहे.
खरा भेदभाव तर वेगळाच आहे त्याला सोन्याचे cover आहे
..
पण वरील उदाहरण ना मधील कृत्य रोजगार किती निर्माण करतात ह्याची value.
आणि समाजात भेदभाव निर्माण करण्याचा नवीन मार्ग निर्माण करून किती लोक ह्या स्पर्धेचे बळी पडतात.
काही ही करून खूप पैसा कमावणे ही भावना निर्माण करतात.
जास्त पैसा माझ्या कडे आहे है वेगळेपण दाखवण्याची संधी उपलब्ध करून देतात.
ह्याचा जमा खर्च .
कधी तरी मांडवाच लागेल
वय वर्ष तीन पासून माणसाची पिल्ल ह्या विकृत system चि बळी ठरतं आहेत.
तरी आपल्याला अजून ती गोष्ट लक्षात येत नाही.
गुन्हेगारी वाढत आहे,भ्रष्टाचार वाढत आहे, युद्ध वाढत आहेत,.
अत्यंत घातक शस्त्र निर्मिती होत आहे ..हे सर्व परिणाम त्याच system चे आहेत...
ही स्पर्धा थांबवायची असेल तर रोजगार निर्मिती ह्या फसव्या तर्का वर ज्याचे आपण समर्थन करत आहोत त्याचे सत्य कठोर परीक्षण करून उघड केले पाहिजे
जगात वाढत असलेली घातक हत्याराची स्पर्धा.
जगात वाढत असलेले यांत्रिकी करण सर्व काही फायदा मला च झाला पाहिजे भागीदार नको.
जगात पसरत असलेली वृत्ती काही ही उद्योग करा पण पैसा कमवा.
करिअर chya नावाखाली उध्वस्त होणारे नाते संबंध
छळ,खून, .
ह्या सर्व गोष्टींना प्रोत्साहन देणारा घटक म्हणजे.
फालतू उपयोग असणाऱ्या महाग वस्तू ,गाड्या,सेवा आणि सुविधा.
त्या बंद केल्या की सर्व बंद होईल.
20 लाखावर एक पण कार जगात उपलब्ध नको.
.सर्व च वस्तू ,सेवा ह्यांच्या किंमती आणि दर्जा ह्या वर निर्बंध हवेतच
पैसे कुठे खर्च करायचे हा प्रश्न निर्माण झालाच पाहिजे
1970 नंतर जन्म झालेली लोक
ही सर्व लोक पृथ्वी चा विनाश करण्याचे कार्य घेवून च जन्माला आले आहेत.
माझ्या तरुण मुलाने सहज बोलता बोलता एका गोष्टी ची जाणिव करुन दिली.
तुमच्या पिढी नी आमच्या आयुष्याची वाट लावली.
प्रदूषण वाढवले, हवामान बदल घडवून आणला.जीव घेणी स्पर्धा निर्माण केली.
हवा ,पाणी सर्व दूषित केले .
आमच्या भवितव्य ची पूर्ण वाट लावली.
हे खरेच आहे .
आपली पिढी ह्या मानव जातीची सर्वात मोठी दुश्मन आहे.
तसा इतिहास पुढे लिहाल जाईल.
नुकताच संशोधक लोकांनी इशारा दिला आहे.
वातावरण बदला मुळे 100 कोटी लोकांचे आयुष्य धोक्यात येईल.
त्यांचा मृत्यू होईल.
आपल्या काळात अनेक शोध लागले असले तरी माणसाच्या विनाशाची बीज आपल्या पिढी नीच रोवली आहेत.
फालतू ऐहिक सुखासाठी
.
1970 नंतर जन्म झालेली लोक
चला, म्हणजे 'आम्ही नाही त्यातले!' म्हणण्याची (१९६६चा जन्म असल्याकारणाने) आमची सोय झाली तर!
माझ्या तरुण मुलाने सहज बोलता बोलता एका गोष्टी ची जाणिव करुन दिली.
एक कुतूहल: त्याचाही जन्म १९७०नंतरचाच ना?
तसा इतिहास पुढे लिहाल जाईल.
माणसाचाच जर विनाश झाला, तर इतिहास लिहिणार कोण? उलटपक्षी, इतिहास जर लिहिला गेला, तर याचा अर्थ मानवजात सुरक्षित आहे!
मग काळजी कशाची?
मराठा आरक्षणाबद्दल इथे खुप
मराठा आरक्षणाबद्दल इथे खुप चर्चा पुर्वी(एक मराठा लाख मराठा मोर्च्यांच्या निमित्ताने) झाली होती. तित जवळपास सर्वांचं मत आरक्षणाच्या विरोधात होतं एक ॲमी सोडता. त्या चर्चेतले अनेक मुद्दे अजून मननीय आहेत. आता परत हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा तरूणांत असलेली अस्वस्थता खरीच आहे. तिचे मूळ आर्थिक प्रश्नांत आहे व आरक्षण हा उपाय असूच शकत नाही, हे सांगण्याचे धाडस कोणातच नाही असे दिसते.
सहमत आहे
खरं तर मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत हे सर्वोच्च न्यायालयात सिध्द झालेले आहे, त्यामुळे आरक्षण देणे शक्य नाही. हेच गुज्जर, जाट इ. समाजाची परिस्थिती आहे. अत्यंत आक्रमक आंदोलनामुळे हे सांगण्याचे धाडस कुणातच नाही. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही; अशीच राजकारण्यांची परिस्थिती झाली आहे.
खुप विचार,खूप अनुभव,खूप मत बघून अखंड भारत म्हणजे काय ते समजले
खूप उदाहरणे. साध्या उदहरणतून ते सांगत आहे.
समजून घ्या हे एक उदाहरण मानसिकता सिद्ध करते..
बस ची लाईन असते .लाईन मध्ये उभ च राहावे लागत.
ऊन,पावूस दोन्ही सहन करावे लागते.
बस येते .लोक बस मध्ये चढतात.
सीट पॅक होतात.
पण लोक standing साठी बस मध्ये चढत नाहीत.
त्यांना आशा असते दुसरी बस येईल बसून जावू.
पण ते already line मध्ये उभेच असतात.
बस मध्ये पण उभेच रहीचे असते.
बस येत नाही मग .
सरकार आणि बस service ला शिव्या देतात.
रस्त्यावर उभे राहणे पसंत असते पण बस मध्ये नाही.
अशी मूर्ख मानसिकता चा प्रदेश म्हणजे अखंड भारत.
त्या मध्ये जे दावा करतात ते सर्व प्रदेश येतात.
मानसिकता same
हे एक उदाहरण आहे .
कोणत्याही विषयात स्व फायदा बघून च ,किंवा बुध्दी न वापरता, अजेंडा चालवण्यासाठी .
सर्रास चुकीचे पोस्ट करणारे .
प्रायोजित अखंड भारतात च मिळणार.
म्हणून हा सर्व प्रदेश म्हणजे अखंड भारत
ह्या प्रचंड विशाल ब्रह्मांड मध्ये
ह्या प्रचंड विशाल ब्रह्मांड मध्ये आपण माणसं ,अती हुशार प्राणी जीव सृष्टी च अस्तित्व शोधते तेव्हा काय काय शोधतो..1) पाणी आहे का तिथे.
२) त्या ग्रहाचे तापमान किती आहे.
३) तिथे ऑक्सिजन हा वायू आहे का.
ह्या जीवसृष्टी साठी आवशक्य असणाऱ्या बेसिक गोष्टी प्रथम शोधतो.
नंतर बाकीचे अंदाज.
१) तेथील जीव सृष्टी कोणत्या प्रकारची आहे.
२) तेथील जीव सृष्टी किती प्रगत आहे.
..
इतके सर्व माणसाला नीट कळत मग जीवसृष्टी अस्तित्वात आसण्या साठी .
किंवा टिकण्यासाठी..
ऑक्सिजन,पाणी,योग्य तापमान आवशकय आहे..टीव्ही,मोबाईल,गाड्या ,औषध,इमारती ,पैसे, सोने आवश्यक नाही.
हे आपल्याला उत्तम रित्या माहीत आहे..
तरी आपण पृथ्वी वासी..
पाणी प्रदूषित करत आहोत.
पृथ्वी चे तापमान वाढवत आहोत.
बाकी वायू चे प्रमाण वाढवून ऑक्सिजन चे प्रमाण हवेतून कमी करत आहोत.
आपल्याच मुळावर आपण घाव घालत आहोत हे आपल्याला का समजत नाही.. .
सोने,पैसा गाड्या,महाल,ह्या जीवनासाठी बिलकुल गरजेच्या नसणाऱ्या गोष्टी साठी आपण स्वतला च स्वतः च विनाशाकडे का घेवून जात आहोत..
हा प्रश्न कोणालाच का पडत नाही.
प्रतिलता
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी एक काळ गाजवला. त्यावेळी प्रतिलता हा शब्द प्रचलित झाला होता. हा शब्द त्यांच्याकडेच रोख दाखवतो, असा कयास आहे. नक्की माहीत नाही.
अलका याज्ञिक, साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती याही पौडवाल यांना समकालीन होत्या. फक्त पौडवाल यांनाच प्रतिलता का म्हटले गेले असावे ? त्यांची गायकी खूप सरस होती ? आहे ?
चर्चा का होत नाही.
अमेरीका मध्ये ह्या दोन चार दिवसात अंधाधुंद गोळीबार च्या दोन घटना घडल्या काही व्यक्ती मारल्या गेल्या.
गोळीबार करणाऱ्या व्यक्ती चे ज्यांच्यावर गोळीबार केला त्यांच्याशी ओळख असण्याची शक्यता नाही.
मग त्यांना मारण्याचे कारण असण्याची तर बिलकुल शक्यता नाही
ह्या गोळीबार ला अतांगवादी हल्ला हे पण लेबल चिकटवले गेले नाही.
मग असे कृत्य लोक का करत आहेत.
अमेरीका मध्ये अशा घटना वारंवार घडतात त्याची कारण कोणी का शोधत नाही.
ह्या मानसिकतेचे मूळ भांडवली व्यवस्था,अस्थिर कुटुंब व्यवस्था, संपत्ती चे प्रदर्शन, माणसं पेक्षा यंत्रा ला आलेले महत्व, मानसिक घुसमट , आईवडील सारखे बदलत असण्या मुळे मुलांच्या मनावर आलेला तणाव etc .
अशा गोष्टीत तर नाही ना?
म्हणून ना चर्चा होत ना त्याची कारणे शोधली जात
वार्तालाप : जीभ आणि सर्वनाश
जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात:
जनासीं मीत्री करीना।
कठिण शब्द बोले नाना।
मूर्खपणें आवरेना।
कोणीयेकासी॥ 1९/३/१३॥
याचेच एक उदाहरण: महाभारतात राजसूय यज्ञाचा एक प्रसंग आहे. महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञात येण्यासाठी कौरवांना ही निमंत्रण दिले होते. या आयोजनाचा एक उद्देश्य कौरवांशी मैत्री संबंध्द दृढ करणे ही होता. पण झाले काय मय दानवाने बांधलेल्या मायावी महालात दुर्योधन सहित सर्व कौरव पाण्यात पडतात. त्यांना असे पाण्यात पडताना पाहत द्रोपदी त्यांचा उपहास करत आपल्या सखींना म्हणाली पहा " आंधळ्याचे पुत्र आंधळे" कसे सर्व पाण्यात पडले हा! हा! हा! ". जिभेचा हा वार दुर्योधनाला जिव्हारी लागला. त्याच क्षणी त्याने पांडवांचा सर्वनाश करण्याचा प्रण केला. पांडवांच्या सर्वनाशासाठी त्याने नाना षड्यंत्र केले. परिणाम, महाभारताच्या युद्धात संपूर्ण कुरुवंशाचा संहार झाला. जर द्रोपदीने मूर्खतापूर्ण कटू वचन बोलले नसते तर पांडव इंद्रप्रस्थात आणि कौरव हस्तिनापुरात सुखाने नांदले असते. या प्रसंगावरून एकच धडा मिळतो कुणालाही तो कितीही दीनहीन किंवा मूर्ख का असेना, जिभेने कधीच चुकूनही कटू वचन बोलले नाही पाहिजे.