कडू कडू कारले
एक होता _ _ _, गाव त्याचे पार्ले
आवडायचे त्याला, कडू कडू कारले
एकदा त्याने खाल्ले, गोड गोड कारले
आणि त्याचे डोके, फिर फिर फिरले
“आवडे मला कडू, आणि हे काय चारले”
असे म्हटले जिभेने, नि मानगूट त्याचे धरले
कॉफीचे पाकीट त्याने, आणले भलेथोरले
बाटलीभर कॉफी प्यायला, तरी नाही पुरले
कडूशार कोयनेल, होते घरी उरले
बादलीभर प्यायले, तरी नाही पुरले
अंगणात होते पाच, कडुनिंब पेरले
एक अख्खे झाड खाल्ले, तरी नाही पुरले
शेवटी त्याच्या डोक्यात, खरे काय ते शिरले
आणून कडू साखर, तिचे बकाणे भरले
पळून गेले जिभेवरचे, गोड उरले-सुरले
’हुश्श’ म्हणून त्याने, खाल्ले कडू कडू कारले
छान
पाडगावकर कवी
पापड-कविता करी
त्यापेक्षा ही
कारले कविता बरी
पापडाचे काय
तळा नाहीतर भाजा
नाहीतर त्यात
काही नाही मजा
कारल्याचे काय
कसेही शिजवा
मात्र त्यात भरपूर
साखर-गूळ हवा
आता टंकणे पुरे
"शिदोरी" संपली
शिवाय इथे कामाची
आहे रास पडली
(कधीमधी यमक्या) सुनील
हा हा हा! लय म्हंजे लयच भारी!
हा हा हा!
लय म्हंजे लयच भारी!