निरोप

निःशब्द मिठी सोडवून  
निरोपाचा हात हाती देताना 
   
आपण  घट्ट धरून ठेवतो 
उसनं आणलेलं अवसान

पाठ वळताच साथ सोडणारं
डोळ्यांवाटे मुकाट ओघळणारं

आपल्याकडे बघून कसनुसतात
समांतर विश्वातले तू अन मी

एकमेकांना विचारून पाहतात 
विरहाचा अर्थ-भावार्थ...
दोघांनाही न उमजलेला

field_vote: 
0
No votes yet