Permalink Submitted by 'न'वी बाजू on शुक्रवार, 19/01/2024 - 20:15.
मराठीकरिता देवनागरीमध्ये (कन्नडप्रमाणे१) ऱ्हस्व आणि दीर्घ ए-कार तथा ओ-कारांची पद्धत सुरू करावी काय?
(परंतु, अर्थात, आजकाल मराठी लेखक जेथे इकारांत आणि उकारांतसुद्धा ऱ्हस्वदीर्घाचा विधिनिषेध बाळगीत नाहीत, तेथे त्यांजकडून या प्रस्तावित नव्या ए-कारांच्या तथा ओ-कारांच्या विधिनिषेधाची अपेक्षा धरणे फोल आहे.)
Permalink Submitted by मिसळपाव on शनिवार, 20/01/2024 - 22:57.
"
विधिनिषेध बाळगीत नाहीत
" ... नाही हो. ते कळणं कठीण असणारे माझ्यासारखे काही असतात. ऱ्हस्व-दिर्घ अचूक कसं लिहावं यावर काही सोपासा उपाय आहे का? "लांबलेला उच्चार असेल तर तो दिर्घ" याचा अजिबात उपयोग होत नाही. "मुळात झाडाचं मूळ किती खोल असतं हा प्रश्न आहे" यातले मु/मू हे शब्द जसे लिहीलेले असतात ते आठवून मी लिहीतो. माझ्या डोक्यात तरी त्यांचे उच्चार एकाच लांबीचे आहेत. का हा 'कलर ब्लाईंडनेस' सारखा काही प्रकार आहे की ज्या मुळे मला उच्चारांच्या वेळेतला फरक कळत नाही? ते ईथे बरोबर लिहिले आहेत का हा प्रश्न आहेच. आणि त्याही आधी - "लिहिले" की "लिहीले"?? छ्या! कटकट असते सगळी. अगदिच चुकीचं वाटलं तर बदलतो नाहितर दडपून लिहीत सुटतो. काही सोपा उपाय आहे की कठोर परीश्रमाला पर्याय नाही? "पाणी" आणि "पाणि" या शब्दांचे अर्थ तरी वेगळे आहेत. पण मी परिश्रम / परीश्रम यातलं जे चुकीचं आहे ते लिहिलं तर तुमच्या मज्जातंतूना धक्का बसण्यापलीकडे (पुलंना जसं ग्लुको बिस्किट मज्जातंतूना धक्का देउन जायचं तसं) अजून काही - अर्थाचा अनर्थ होईल असा काही - दुष्परीणाम होतो का? की जेणे करून मी ऱ्हस्व-दिर्घ अचूक लिहीण्यासाठी कठोर परिश्रम करावेत?
मार्मिक0
माहितीपूर्ण0
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
Permalink Submitted by 'न'वी बाजू on रविवार, 21/01/2024 - 03:18.
प्रथम, माझ्याकडून एक प्रश्न. त्यानंतर मग आपल्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रयत्न करतो. (अर्थात, समाधानकारक उत्तर माझ्याजवळ आहे, असा माझा दावा नाही.)
इंग्रजीच्या स्पेलिंगबद्दल अशी अडचण येते का? (नसल्यास, उत्तम; का येत नाही, असा प्रश्न मी विचारणार नाही — इंग्रजीची स्पेलिंगव्यवस्था मराठीहूनच काय, परंतु अनेक युरोपीय भाषांच्या तुलनेतसुद्धा आत्यंतिक अनियमित (irregular अशा अर्थी) नि किचकट असूनसुद्धा — परंतु) असल्यास, तिचे निवारण कसे करता?
(नसल्यास, स्पेलिंगच्या भरपूर चुका असलेला एखादा मजकूर डोळ्यांसमोर आल्यास, नक्की काय प्रतिक्रिया होते?)
(इंग्रजीला स्पेलिंगनियम असावेत काय? (ब्रिटिश नियम, अमेरिकन नियम वगैरे भानगडी तूर्तास बाजूस ठेवू. मुळात नियम असावेत काय?) आणि, असल्यास, समजा जर ते पाळले नाहीत, तर ते पाळलेले पाहण्याची सवय असलेल्या चारचौघांच्या डोळ्यांना धक्के बसतात, याहून अधिक नक्की काय बिघडते?)
(आधी म्हटल्याप्रमाणे, इंग्रजीची स्पेलिंगव्यवस्था, पाहायला गेल्यास, अत्यंत अनियमित तथा किचकट आहे, तिच्यात अजिबात सुसूत्रता नाही. (याला अनेक ऐतिहासिक कारणे असू शकतात, परंतु, अनियमितता आहे, सुसंगती नाही, हे निश्चित.) मात्र, काहीतरी एक व्यवस्था आहे. अन्यथा, ‘स्पेलिंग चुकले’, असे म्हणता आले नसते. (हे म्हणजे थोडेसे भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकांप्रमाणे झाले. भा.रे.च्या आगगाड्या कधीच जर वेळेवर धावणार नसतील, तर मुळात वेळापत्रके छापायची कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर, “गाडी लेट आहे” असे म्हणता येण्याची सोय म्हणून, असे आहे. तुलनेसाठी काहीतरी नको काय?) मात्र, इंग्रजीची स्पेलिंगव्यवस्था इतकी किचकट, अनियमित, गोंधळात टाकणारी आहे, तर तिच्यात काही सुसूत्रता आणून तिचे सुलभीकरण करावे काय? तर, तसे केल्यास नक्की काय होऊ शकते, याची किंचित झलक दाखविणाऱ्या, १९६०च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या रीडर्स डायजेस्टच्या बालपुरवणी विशेषांकात छापून आलेल्या या लेखाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. असो; फार अवांतर झाले.)
——————————
तसेही, मराठीत लेखनाचे प्रमाणीकरण हा प्रकार बहुधा इंग्रजी अंमलानंतर – नि त्यातसुद्धा, छापील माध्यमांचा प्रसार वाढल्यावर – अंमळ गंभीरपणे घेतला जाऊ लागला असावा, असे वाटते. (त्यातसुद्धा वेळोवेळी बदल होत गेले असावेत; आमच्या आजोबांच्या काळातील शुद्धलेखनाचे नियम आणि आमच्या काळातील शुद्धलेखनाचे नियम यांत फरक होता, हे निश्चित.) फार कशाला, खुद्द इंग्रजी स्पेलिंगांचे प्रमाणीकरण ही बाब तुलनेने नंतरनंतरची असावी, नि तीसुद्धा हळूहळू बदलत, उत्क्रांत होत गेली असावी. (या विषयात माझा अभ्यास नसल्याकारणाने, काय, कसे, कधी यांच्या तपशिलांत शिरू इच्छीत नाही; तसेच, प्रस्तुत विधानांचा मोघमपणाही त्याच कारणास्तव. असो चालायचेच.)
——————————
मात्र, शुद्धलेखनाचे नियम, झालेच तर लिखित भाषेचे प्रमाणीकरण, असावे, असे मला वाटते. हे नियम गरजेप्रमाणे बदलता येण्यास, किंवा प्रादेशिक/सामाजिक फरकांस लक्षात घेऊन विस्तृत करता येण्यास माझा विरोध नाही, परंतु, नियम असावेत.
——————————
ऱ्हस्व-दिर्घ अचूक कसं लिहावं यावर काही सोपासा उपाय आहे का?
सॉरी, पण, चुकीच्या माणसाला विचारताय. बोले तो, मी मराठीचे शुद्धलेखनाचे नियम काय किंवा इंग्रजीची स्पेलिंगे काय, कधीही पाठ करण्याच्या भानगडीत पडलेलो नाही. मात्र, दोहोंमध्ये मला आजतागायत सहसा अडचण आलेली नाही, किंवा दोहोंत चुकाही सहसा होत नाहीत, असे आढळत आलेले आहे. आता, हे कसे होते, हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकणार नाही – या बाबतीत माझा फॉर्म्युला असा काही नाही. मात्र, काय होऊ शकत असेल, याबद्दल अंदाज व्यक्त करू शकतो. कदाचित छापील माध्यमांतून डोळ्यांसमोर आलेल्या शब्दांच्या प्रतिमा डोक्यात कोठेतरी रजिष्टर होऊन त्यांचे काही प्रिस्क्रिप्शन डोक्यात फिट्ट बसत असावे, नि तदनुसार लेखन होत असावे, असे मला वाटते. (कदाचित माझ्या formative yearsमध्ये माझ्या डोळ्यांसमोर जे मराठी/इंग्रजी लिखाण आले, त्याच्या प्रमाणलेखनाचा/स्पेलिंगचा दर्जा बऱ्यापैकी सुसंगत असावा, ही माझ्या भाग्याची गोष्ट म्हटली पाहिजे.) अर्थात, चुका होऊच शकत नाहीत, असे नाही, परंतु, त्यांचे प्रमाण आजतागायत नगण्य असल्याचे लक्षात आलेले आहे. (त्या लक्षात आल्यास अर्थात पुढील वेळेस दुरुस्ती करता येतेच. One learns from one’s mistakes.) आणि, कधी शंका वाटल्यास, इतर स्रोत (जसे की, डिक्शनऱ्या, झालेच तर इतर लिखाण) तपासता येतातच. थोडक्यात, it’s an ever-evolving process.
याव्यतिरिक्त, it’s an intuition that has very rarely failed me, याहून अधिक काय म्हणू?
Permalink Submitted by गवि on रविवार, 21/01/2024 - 12:02.
फ्रेंच मध्ये तर नाहीच.
मी याउलट ऐकले आहे. लिखित स्वरूपात फ्रेंच ही इंग्रजीपेक्षा बरीच स्थिर भासते. हां, फ्रेंच लिखित आणि फ्रेंच उच्चारित यांची मुळात इंग्रजी शिकून मग त्या ब्याकग्रौंडवर तुलना करू जाल तर बरेच गोंधळात पडू शकाल. बोलताना एकवचन आणि अनेकवचन याचे उच्चार एकसारखेच असतात. लेखीमधेच सर्व फरक. बाकी बोलणे बरेचसे संदर्भावरुन समजून घ्यावे अशी पद्धत असू शकेल.
Permalink Submitted by 'न'वी बाजू on रविवार, 21/01/2024 - 17:19.
काँट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, फ्रेंच स्पेलिंगव्यवस्थेत कमालीचे सातत्य/सुसूत्रता/नियमितता आहे, असे मीही ऐकून आहे. हं, त्यांची कन्व्हेंशने इंग्रजीच्या कन्व्हेन्शनांपेक्षा प्रचंड वेगळी असल्याकारणाने केवळ इंग्रजी शिकलेल्या मनुष्यास गोंधळायला होऊ शकते खरे, परंतु, जी काही कन्व्हेंशने आहेत, ती अतिशय नियमित आहेत, असे ऐकलेले आहे.
अर्थात, फ्रेंचतज्ज्ञ याबद्दल काय तो खुलासा करू शकतीलच.
Permalink Submitted by सुधीर on रविवार, 21/01/2024 - 17:55.
प्रमाणीकरण असावे. माझं शुद्धलेखन फारच गचाळ आहे. मनोगतने २००७ मध्येच चांगली सुविधा करून दिली होती. तशी सुविधा केली तर बरे होईल. फ्रेन्च माहीत नाही पण स्पॅनिश स्पेलिंग उच्चाराप्रमाणे होतात पण त्यात काही शब्दाचे उच्चार वेगळे आहेत. उदा. मराठीत च जसा वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारतात. अजून एक अडथळा हा आहे की मराठी प्रमाणे स्पॅनिशमध्ये पुल्लिंगीआणि स्त्रिलिंगी शब्दा नुसार क्रियापद आणि आर्टीकल्स बदलतात पण साला "तो सँडविच" आणि "ती बर्गर" ही भानगड काही आपल्या डोक्यात जात नाही. (एक सोपा नियम हा आहे की शेवटी आ आला असेल तर स्त्रिलिंगी.. hamburguesa पण डोक्यात "तो बर्गर" पटकन येते)
Permalink Submitted by चिमणराव on रविवार, 21/01/2024 - 19:06.
लेखाला धरून बोलायचं तर लवकर न शिकता येणाऱ्या गोष्टी करत राहण्याने वृद्धत्व मागे उभं राहून आपल्याकडे लक्ष ठेवून आहे हे विसरायला होते.
म्हणून फ्रेंच शिकण्याचा खटाटोप सुरू आहे. व्याकरण नियम आणि शालेय पद्धत अर्थातच बाद.
यूट्यूबवर सर्व प्रकारचे धडे आहेत तेही फुकट. "मोफतनो मूळो केळो जेवो लागे छे" एम गुजरातीमां केहवाय. ( फुकटचा मुळा केळ्यासारखा लागतो अशी गुजराथी म्हण आहे.)
Permalink Submitted by रेवती१९८० on शनिवार, 27/01/2024 - 23:01.
आफ्रिकेमध्ये बोलली जाणारी फ्रेंच फ्रान्स मधल्या फ्रेंच पेक्षा वेगळी आहे. उदा:
इंग्रजी -आर यू हंग्री?
फ्रान्स - एस्क त्यू आ फाम?
आफ्रिकन - विएं मांजे?
इ- क्विक
फ्रा- वित
आ- च्याप
इ- आय एम लिव्हिंग
फ्रा - ज में वे
आ - ज दमांद ला रू(त्)
इ- वेलकम
फ्रा- बीएंवेन्यू
आ- बोंआरीव
इ- वॉच आऊट!
फ्रा- अतेंसिओ
आ- दुस् माँ
इ- मिस्ट्रेस
फ्रा- माईत्रेस
आ- ल दुजीएम् ब्युरो
इ- बाय
फ्रा- ओर्वा
आ- आ तू लर
युरोपमधल्या इतर देशात बोलली जाणारी फ्रेंच जवळपास फ्रान्स मध्ये बोलली जाते तशीच आहे. परंतु आफ्रिकेत, जिथे जिथे फ्रेंचांच्या वसाहती होत्या तिथली फ्रेंच भाषा मात्र बदलली आहे.
….
Permalink Submitted by 'न'वी बाजू on मंगळवार, 30/01/2024 - 05:49.
(या विषयांतराच्या धाग्यावर हे विषयांतर आहे, परंतु, असू द्यात. मला काही अडचण नाही.)
हं, तर काय विचारत होतो? आफ्रिकेतसुद्धा फ्रेंचच्या कित्येक आवृत्त्या असतील, त्यातली नक्की कुठली आवृत्ती म्हणायची ही?
ल दुजीएम् ब्युरो
‘दुसरे ऑफिस’… हे रोचक आहे. काहीसा ‘अंगवस्त्र’ किंवा ‘स्टेपनी’तल्यासारखा प्रकार असावा काय हा?
बाकी, हे फरक असायचेच. आमच्या अमेरिकेतली इंग्रजी, ब्रिटनमधील इंग्रजी, ऑस्ट्रेलियातली इंग्रजी नि भारतातली इंग्रजी, फरक आहेच ना? (तरी अमेरिकेतल्या विविध भागांतल्या इंग्रज्यांमधले फरक किंवा भारतातल्या विविध भागांतल्या इंग्रज्यांतले फरक वगैरे जमेस धरलेले नाहीत.)
Permalink Submitted by मिसळपाव on शनिवार, 27/01/2024 - 07:56.
(शुद्धलेखनाबद्दल - किंवा त्याच्या अभावाबद्दल - आधीच माफी मागतो)
तुमच्या विस्तृत प्रतिसामधल्या मुद्द्यांबद्दल;
- ईंग्रजीच्या स्पेलिंगबद्दल अडचण फार कमी येते. स्पेलिंग्ज काही घोकून घोकून पाठ नाही केलेली. आणि मराठी वाचन दहावीपर्यंत खूप होतंच पण कॉलेजात गेल्यावर सुद्धा ईंग्रजीपेक्षा जास्त होतं. मग "वाचून वाचून ईंग्रजी शब्दांची विचित्र स्पेलिंग्ज सुद्धा जर लक्षात रहातात तर मराठी ऱ्ह्स्व-दिर्घ का नाही?" या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने माझ्याकडे नाही . "लीहीणे" नक्की बरोबर नाहीये हे कळतं पण 'लिहीणे' का 'लिहिणे' चटकन लक्षात येत नाही. नशीब आमचं दुसरं काय?
- ईंग्रजी स्पेलिंग्ज तर्कशुद्ध करायचा लेख मी 'मार्क ट्वेन'च्या नावाने वाचला होता! उदाहरणं वेगळी होती पण याच वळणाचा होता.
- पण स्पेलिंग्ज चुकणे आणि ऱ्हस्व-दिर्घ चुकणे यात एक मोठ्ठा फरक आहे. difikultis / diffikultis / dificultis / difficulties / diffikulties अशी बरीच रुपं होऊ शकतील आणि ती (त्यातली काही तरी नक्कीच) वाचायला कठीण जाताहेत. पण लिहिणे / लिहीणे / लीहिणे / लीहीणे ही रूपं वाचताना डोक्यात तितकं "खडकम खडकम" होत नाहीये. अर्थातच एखादा 'फेदरवेट' साहेब हे बरोब्बर उलटं म्हणायची दाट शक्यता आहे
- लिखित भाषेचं प्रमाणीकरण असावं. पण शिंचं ते शिकणं / लक्षात ठेवणं मला कठीण जातंय ही अडचण आहे!
मार्मिक0
माहितीपूर्ण0
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
Permalink Submitted by 'न'वी बाजू on शनिवार, 27/01/2024 - 10:47.
(शुद्धलेखनाबद्दल - किंवा त्याच्या अभावाबद्दल - आधीच माफी मागतो)
सर्वप्रथम, माझी (किंवा फॉर्दॅट्मॅटर कोणाचीही) माफी कशाबद्दल? शुद्धलेखन चुकणे हे वाचणाऱ्याच्या चटकन नजरेत भरू शकते खरे, परंतु तो काही गुन्हा नव्हे.
मग "वाचून वाचून ईंग्रजी शब्दांची विचित्र स्पेलिंग्ज सुद्धा जर लक्षात रहातात तर मराठी ऱ्ह्स्व-दिर्घ का नाही?" या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने माझ्याकडे नाही
कोणाच्या काय लक्षात राहील नि काय लक्षात राहणार नाही, सांगणे अवघड आहे. याला काही निश्चित नियम असा नसावा.
"लीहीणे" नक्की बरोबर नाहीये हे कळतं पण 'लिहीणे' का 'लिहिणे' चटकन लक्षात येत नाही. नशीब आमचं दुसरं काय?
“लिहिणे”. (आणि हो, “इंग्रजी”. परंतु, ते असो.)
पण स्पेलिंग्ज चुकणे आणि ऱ्हस्व-दिर्घ चुकणे यात एक मोठ्ठा फरक आहे. difikultis / diffikultis / dificultis / difficulties / diffikulties अशी बरीच रुपं होऊ शकतील आणि ती (त्यातली काही तरी नक्कीच) वाचायला कठीण जाताहेत. पण लिहिणे / लिहीणे / लीहिणे / लीहीणे ही रूपं वाचताना डोक्यात तितकं "खडकम खडकम" होत नाहीये.
हम्म्म्… हा तुमचा मुद्दा (काहीसा लक्षात येतोयसा वाटतोय) अंमळ रोचक आहे. म्हणजे, उदाहरणार्थ, त्या Kaos in ce klasrumमधले ते शेवटचे वाक्य वाचायला जवळजवळ जे अशक्य होऊन बसते, जणू काही भलत्याच कोठल्यातरी अगम्य भाषेतील वाक्य आपण वाचत आहोत, असा भास होतो, तसा परिणाम मला वाटते बदललेल्या मराठीतून साधता येणे अवघडच नव्हे, परंतु जवळजवळ अशक्य असावे. हे का होते, ते समजत नाही. मात्र, (एखाद्या भाषेतील लिखाणाशी) अतिपरिचय हे त्याचे कारण असावे, याबद्दल साशंक आहे. म्हणजे, तुमचा फेदरवेटसाहेब जर मराठी शिकला, तर त्याला येणाऱ्या अनुभवात नि तुम्हाला येणाऱ्या अनुभवात काही फरक असेल (किंवा फेदरवेटसाहेबाला बरोबर तुमच्या उलट अनुभव येईल), असे मला तरी वाटत नाही. (फार कशाला, तो Kaos in ce klasrumमधील शेवटच्या वाक्यातून साधला जाणारा (अगम्यतेचा) परिणाम मराठीतून तर सोडाच, परंतु स्पॅनिश, फ्रेंच वगैरे इतर युरोपीय भाषांतून तरी साधणे शक्य आहे, किंवा कसे, याबद्दल (त्या दोन्ही भाषा जरी मला अवगत नसल्या, तरीसुद्धा) मला स्वतःला शंका आहेत.)
कदाचित असे असावे का, की इंग्रजी स्पेलिंगमध्ये खरे तर इतकी प्रचंड अनियमितता आहे, तरीसुद्धा काही शब्दांची स्पेलिंगे ही अशीच असतात – अर्थात, एकाच ध्वनिसमुच्चयाकरिता अनेक पॅटर्न परंतु त्यातसुद्धा ठराविक शब्दाकरिता ठराविकच पॅटर्न नि तोच ध्वनिसमुच्चय असलेल्या दुसऱ्या एखाद्या शब्दाकरिता मात्र वेगळा (परंतु, पुन्हा, ठराविकच) पॅटर्न – हा जो काही (बहुधा इंग्रजीचीच खासियत असलेला; चूभूद्याघ्या.) प्रकार आहे, तो आपल्या डोळ्यांना इतका अंगवळणी पडला असावा, की त्याविपरीत जर का काही डोळ्यांसमोर आले, तर ते नुसतेच खटकते नव्हे, तर अडखळायला होते, नि क्वचित त्यातून काही अर्थबोध होणे दुरापास्त होऊन बसते?
कल्पना नाही. अर्थात, हे माझे निव्वळ स्पेक्युलेशन आहे. यावर अधिक विचार करावा लागेल. (परंतु, हे या माझ्या विषयांतराच्या धाग्यावरसुद्धा (माझेच) विषयांतर झाले. अर्थात, मला त्याबद्दल काही अडचण असायचे कारण नाही म्हणा! चालायचेच.)
लिखित भाषेचं प्रमाणीकरण असावं. पण शिंचं ते शिकणं / लक्षात ठेवणं मला कठीण जातंय ही अडचण आहे!
तुम्हाला अडचण असू शकते, हे मी समजू शकतो. परंतु, अर्थात, लिखित भाषेचे प्रमाणीकरण असावे. म्हणजे, गेला बाजार ‘गाडी लेट आहे’ म्हणता येण्यापुरते तरी रेल्वेचे वेळापत्रक असावे, त्याचप्रमाणे.
Outliers will always be present, but without a standard range, there can be no outliers. पाहा विचार करून.
Permalink Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on मंगळवार, 30/01/2024 - 03:44.
मी मराठीत 'लहानपणी' बऱ्यापैकी लिहीत असे. स्वतंत्र काही नाही, पण मराठी माध्यमाच्या शाळेत होते. विभक्ती प्रत्यय शब्दाला चिकटून लिहायचे, वगैरे 'सोपे' नियम तेव्हाही माहीत होते. पण उदाहरणार्थ, माहीत आणि माहिती, असे शब्द आले की गडबडायला होत असे. माझं प्रमाणलेखन सुधारलं ते ऐसीच्या कामामुळे. सुरुवातीला साधं प्रमाणलेखन तपासायचं काम मी सुरू केलं. हेच ते, विभक्ती प्रत्यय शब्दाला चिकटून, अवतरण सुरू होण्याचा अपवाद वगळता बाकी विरामचिन्हं आधीच्या शब्दाला चिकटून, वगैरे. आणि पुढचं किचकट काम करणाऱ्यांना सांगितलं की गूगल डॉकात हे बदल थेट करू नका; सूचना म्हणून लिहा. मी ते वाचून मान्यच करायचे, पण ते बदल काय सुचवले आहेत हे दिसणं सोपं झालं.
इंग्रजीत लिहिताना अनेकदा शब्दाखाली लाल रेघ दिसते, तिचा फायदा होतो, तसंच हेही झालं. आता चुका बऱ्यापैकी कमी होतात. नाहीच होत, असा दावा नाही. पण अनेकदा त्या घाईघाईत टंकतानाही होतात. पुन्हा नजर टाकली तरी त्या चुका दिसतात.
मी मराठीत वाचून प्रमाणलेखन तपासून देण्याचं कामही ऐसीच्या निमित्तानं करते. (त्यामुळे फेसबुकवर, व्हॉट्सॅपवर लोक भयभीषण लेखन करतात ते वाचताना जरा जास्तच त्रास होत असे. पण हे सगळं लेखन विनोद म्हणून वाचायला लागले, आता ताप होत नाही. पण जरा मोठंसं कुणी, काही लिहिलं आणि प्रमाण लेखन चुकवलं असेल तर मनातली मुद्रितशोधक झोपायला जाऊ शकत नाही; आणि लेखनातला तपशील, मुद्दा राहिला बाजूला, मला अप्रमाण लेखनाचा तापच जास्त होतो.)
थोडक्यात - जे काम आणखी चांगलं जमावं असं वाटतं, ते करायला घ्यावं. मी पायथनही अशीच शिकले/शिकते.
Permalink Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on मंगळवार, 06/02/2024 - 02:05.
ज्या लोकांना माझ्याबद्दल माहित्ये, थोडक्यात मित्रमंडळी, त्यांच्यासमोर मी पायताणच म्हणायचे. त्यावर πताण वगैरे कॉमेंट्सही जुन्या झाल्या. तेच-तेच जोक पुन्हा कुठे करायचे म्हणून आता सरळ पायथन म्हणते.
Permalink Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on मंगळवार, 23/01/2024 - 06:46.
मला आवडतं हे ॲप. माझ्याकडे छापील कोश आहे. पण ॲपच वापरलं जातं. वापरून वापरून गरज कमी झाली आहे; पण तरीही विशेषतः दिवाळी अंकाचं काम करताना ॲप बरेचदा उघडलं जातं. ॲपमध्ये नसलेले शब्दही तपासावे लागतात; त्यासाठी काही व्हॉट्सॅप समूहांमध्ये चर्चा होते. उदाहरणार्थ, २०२३च्या दिवाळी अंकासाठी चर्चा झाली ती पोर्तुगीज या शब्दाचं सामान्य रूप काय असावं - पोर्तुगिजा का पोर्तुगीजा? असे शब्द फडकेंच्या कोशात न सापडण्याबद्दल माझी तक्रार नाही.
अरुण फडके काही वर्षांपूर्वी गेले; त्यामुळे आता या कोशात भर पडेल असं वाटत नाही.
अवांतर - फडकेंच्या मृत्युची बातमी वाचून वाईट वाटलं. पण हे कुणाला सांगावं हे समजेना. पुस्तक वाचून माणूस जवळचा वाटतो. अशा दुःखाचं काय करावं ते समजत नाही.
Permalink Submitted by मिसळपाव on शनिवार, 27/01/2024 - 08:11.
आय फोन्यावर नाहीये? phadake lekhana / fadake lekhana शोधून नाही सापडलं. पण नबा म्हणताहेत त्याप्रमाणे कुतूहल म्हणूनच फक्त विचारतोय. फोन्यावर लेखन काही नसतं फारसं. मी गाडीत असेन, बाहेर खरेदिला गेलेलो असेन तरच फोन वापरतो. घरी आलो की प्रशस्त की-बोर्डावर टाईपण्याला पर्याय नाही - काँप्युटरावर ब्राउझरमधे व्हॉट्सॲप उघडून मग मराठीत निरोप बडवायचे कीबोर्डवर !!
मार्मिक0
माहितीपूर्ण0
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
Permalink Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on मंगळवार, 30/01/2024 - 03:45.
माझ्याकडे अँड्रॉईड १३वाला फोन आहे, त्यात प्ले स्टोअरवर दिसत नाही. पण आधीच्या अँड्रॉईड ११वर होतं; ते जुन्या फोनवरून नव्यावर दोन-अडीच वर्षांपूर्वी आपोआप आलं.
Permalink Submitted by चिमणराव on बुधवार, 24/01/2024 - 04:48.
भाषा हे संपर्काचे साधन
असे म्हटल्यावर परदेशात गेल्यावर तिथे आपल्याला हवे ते मिळवणे आणि ते काय बोलतात हे समजणे हा पहिला प्रयत्न असेल. मग त्यासाठी पर्यटकांसाठी भाषा शिकवणारी छोटी पुस्तके असतात. व्याकरण शिकवणे यास प्राधान्य नसते. सर्वसाधारण लोक बोलतात तीच प्रमाणभाषा. पुस्तकं लिहितांना मात्र अचूकता आणखी लागते.
जहाजांवर कामं करणारे लोक बऱ्याच देशांत फिरतात. जहाजं, बोटी विविध देशांच्या बंदरांना थांबतात. शिवाय जहाजाचे खलाशी काही ठराविक देशांतून येतात त्यांना नोकरीवर ठेवावे लागते. त्यांच्या प्रमाण भाषा ही एक गंमतच असते. त्यांचा एक मासला उदाहरण म्हणजे Ibis Triology - Amitav Ghosh. पुस्तके. खूप मजा येते वाचायला. लेखकाचा व्यासंग, निरीक्षण याचा प्रत्यय येतो. कादंबरी तर वाचनीय आहेच.
Permalink Submitted by मनीषा on गुरुवार, 25/01/2024 - 15:14.
भाषा नेहमीच शुद्ध स्वरूपात ऐकायला, वाचायला चांगली वाटते.
माझ्या शाळेतील काही भाषा विषयाच्या शिक्षिका, धडे, कविता मोठ्याने वाचायला सांगत असत, काही वेळा त्या स्वत: ही वाचत असत, स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार कसे असले पाहिजेत हे कळण्यासाठी. शब्दोच्चार अचूक माहिती असेल तर लेखनात चूक होण्याची शक्यता पुष्कळच कमी होते.
शुद्धलेखनाची वेगळी वही असे त्यात रोजच्यारोज वर्तमान पत्रातील किंवा अन्य पुस्तकातील (पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त) उतारे लिहायला सांगत असत. त्यामुळे देखिल ऱ्हस्व, दिर्घ बऱ्यापैकी ओळखीचे होतात.
लिखित मराठी वाचनामुळे देखिल लेखन शुद्ध होऊ शकते.
संस्कृत भाषा शिकताना तर पाठांतरावर जास्त भर असे. त्यामूळे लेखी आणि उच्चारी भाषा शुद्ध होण्यास मदत होउ शकते.
परिक्षेत शुद्धलेखनाचे गुण असत. उत्तर बरोबर असेल पण त्या शुद्धलेखनाच्या चुका असतील तर कमीतकमी अर्धा तरी गुण कापला जायचा.
त्यामुळे शुद्धलेखनाबद्दल जागरूकता होती.
पण इतके असूनही घाईने काही लिहायचे असेल, किंवा लिहिताना इतर काही व्यवधाने चालू असतील (काही ऐकणे, बोलणे, पहाणे इ.) तर लिहिताना चूका होउ शकतात. तसेही आजकाल मराठी लेखनाची वेळ फारच क्वचित येते. मराठी टंकलेखन सोपे वाटते कारण शुद्धलेखन तपासण्याची सुविधा उपलब्ध असते (पण त्यामुळे काहीवेळा शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष होते.. नंतर तपासून सुधारणा करीन असे म्हणून).
मार्मिक0
माहितीपूर्ण0
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
Permalink Submitted by 'न'वी बाजू on गुरुवार, 25/01/2024 - 17:35.
काही वेळा त्या स्वत: ही वाचत असत
‘ही’ हा शब्द सुटा असू नये.
त्यामुळे देखिल ऱ्हस्व, दिर्घ बऱ्यापैकी ओळखीचे होतात.
देखील, दीर्घ. (शिवाय, ‘देखील’ हा शब्द सुटा असू नये.)
लिखित मराठी वाचनामुळे देखिल लेखन शुद्ध होऊ शकते.
देखील. (शिवाय, ‘देखील’ हा शब्द सुटा असू नये.)
त्यामूळे लेखी आणि उच्चारी भाषा शुद्ध होण्यास मदत होउ शकते.
त्यामुळे, होऊ.
परिक्षेत शुद्धलेखनाचे गुण असत.
परीक्षेत.
तर लिहिताना चूका होउ शकतात.
चुका.
——————————
नाही म्हणजे, बाकी काही नाही, तरी गेला बाजार शुद्धलेखनाच्या महत्त्वाबद्दल प्रतिपादन करणाऱ्या प्रतिसादात शुद्धलेखनाच्या चुका असू नयेत, म्हणून हा प्रतिसादप्रपंच. बाकी तुमचे नित्यनेमाप्रमाणे चालू द्या.
(किती मार्क कापावेत?)
——————————
थोडक्यात, मराठीत कन्नडप्रमाणे एकारांत आणि ओकारांत ऱ्हस्वदीर्घाची भानगड आणणे उपयोगाचे नाही. आहे तेच जमेना…
Permalink Submitted by 'न'वी बाजू on शनिवार, 27/01/2024 - 10:55.
*** पण उत्तर बरोबर की चूक ते सांगितलच नाही...
निबंधात बरोबर की चूक ते काय असते?
(ही म्हणजे, रतन समेळच्या बॉयफ्रेंडची नियुक्ती ज्या ष्टोरीरायटरच्या जागी होणार आहे, ती तो (जुना) ष्टोरीरायटर “चुकीची ष्टोरी लिहितो” म्हणून, तशातली गत झाली.)
Permalink Submitted by मनीषा on शनिवार, 27/01/2024 - 15:47.
(ही म्हणजे, रतन समेळच्या बॉयफ्रेंडची नियुक्ती ज्या ष्टोरीरायटरच्या जागी होणार आहे, ती तो (जुना) ष्टोरीरायटर “चुकीची ष्टोरी लिहितो” म्हणून, तशातली गत झाली.)
काय बी कळ्ळं नाई... जमल तर उस्कटून सांगा.. नाही सांगितलं तरीही चालेल म्हणा, तितकसं महत्वाचं नाहीये.
पण हा निबंध नाही...
असो चालायचंच ... चालू द्या.
मार्मिक0
माहितीपूर्ण0
विनोदी0
रोचक0
खवचट0
अवांतर0
निरर्थक0
पकाऊ0
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
Permalink Submitted by गवि on शनिवार, 27/01/2024 - 19:50.
.. दूष्ट मधूच्या या नवीन ष्टोरीमध्ये रतनला साईड हिराईनचा चान्स असल्याने तिचंच शुटिंग जास्त होणार हा जुन्या आणि नव्या ष्टोरीतला फरक आहे. शिवाय त्यामुळे मालामाल होऊन मधू ब्युक गाडी घेणार आहे.
Permalink Submitted by चिमणराव on गुरुवार, 25/01/2024 - 19:07.
आमचे हस्तव्यवसायाचे गुरूजी तोंडी कृती सांगत आणि आम्ही (५वीत) लिहून घेत असू. एकदा माझी वही त्यांच्या हातात पडली. अशुद्ध लेखनाबद्दल कान पिळून पुन्हा नवी वही लिहायला लावली.
________________
देण्यासाठी, लिहिण्यासाठी, देऊनही वगैरे शब्द Gboard auto correct करून देण्या साठी, लिहिण्या साठी, देऊन ही असे करतो.
१९ सप्टेंबर जन्मदिवस : समाजसुधारक, कोको उद्योजक बंधूंपैकी एक जॉर्ज कॅडबरी (१८३९), चित्रकार, वेदाभ्यासक पं. श्री. दा. सातवळेकर (१८३६), नोबेलविजेता लेखक विल्यम गोल्डिंग (१९११), अठरा जागतिक उच्चांक गाठणारा चेक धावपटू एमिल झाटोपेक (१९२२), वैश्विक न्यूट्रिनो शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता मासातोशी कोशिबा (१९२६), अभिनेता जेरेमी आयर्न्स (१९४८), गायक, अभिनेता लकी अली (१९५८), अंतराळवीर सुनीता विलिअम्स (१९६५), अभिनेत्री, मॉडेल इशा कोप्पीकर (१९७६), क्रिकेटपटू आकाश चोप्रा (१९७७) मृत्युदिवस : गणितज्ञ, अभियंता, वैज्ञानिक गास्पर-गुस्ताव कोरिओलिस (१८४३), वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन (१९२५), संगीततज्ज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे (१९३६), इटालियन लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९८५), पहिल्या अणुबाँबचे जनक सर रुडाल्फ पिरल्स (१९९५), प्रभात फिल्म कंपनीचे संचालक अनंतराव दामले (२००१), अभिनेत्री प्रिया तेंडुलकर (२००२), कथक नर्तिका दमयंती जोशी (२००४), संगीतकार दत्ता डावजेकर (२००७).
---
स्वातंत्र्यदिन : सेंट किट्स आणि नेव्हिस (१९८३)
१८९३ : स्त्रियांना मताधिकार देणारा न्यूझीलंड हा जगातला पहिला देश ठरला.
१९५२ : चार्ली चॅप्लिनला अमेरिकेत प्रवेशबंदी.
१९५७ : अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
१९८२ : कार्नगी मेलन विद्यापीठाच्या बुलेटीन बोर्डावर स्कॉट फाहलमनने Smile आणि Sad या इमोटीकॉन्सचा प्रथम वापर केला.
२००७ : युवराज सिंग '२०-२०' क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटखेळाडू आणि क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक (१२ चेंडू) गाठणारा खेळाडू ठरला.
(अवांतर)
मराठीकरिता देवनागरीमध्ये (कन्नडप्रमाणे१) ऱ्हस्व आणि दीर्घ ए-कार तथा ओ-कारांची पद्धत सुरू करावी काय?
(परंतु, अर्थात, आजकाल मराठी लेखक जेथे इकारांत आणि उकारांतसुद्धा ऱ्हस्वदीर्घाचा विधिनिषेध बाळगीत नाहीत, तेथे त्यांजकडून या प्रस्तावित नव्या ए-कारांच्या तथा ओ-कारांच्या विधिनिषेधाची अपेक्षा धरणे फोल आहे.)
--------------------------------------------------
१ ऐकीव माहिती; चूभूद्याघ्या.
मुद्दा...
मुद्दा असा की देवनागरीत इंग्रजी शब्द वाचताना माझ्यासारख्यांना त्रास होतो*, एवढंच नाही तर अनर्थही डोक्यात अडकून राहतात.
* रोमन लिपीत मराठी लिहिलेलं दिसलं तर मी ते वाचायचा प्रयत्नही करत नाही. Stick to the native script, is what I urge people.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
"विधिनिषेध बाळगीत नाहीत"
"
" ... नाही हो. ते कळणं कठीण असणारे माझ्यासारखे काही असतात. ऱ्हस्व-दिर्घ अचूक कसं लिहावं यावर काही सोपासा उपाय आहे का? "लांबलेला उच्चार असेल तर तो दिर्घ" याचा अजिबात उपयोग होत नाही. "मुळात झाडाचं मूळ किती खोल असतं हा प्रश्न आहे" यातले मु/मू हे शब्द जसे लिहीलेले असतात ते आठवून मी लिहीतो. माझ्या डोक्यात तरी त्यांचे उच्चार एकाच लांबीचे आहेत. का हा 'कलर ब्लाईंडनेस' सारखा काही प्रकार आहे की ज्या मुळे मला उच्चारांच्या वेळेतला फरक कळत नाही? ते ईथे बरोबर लिहिले आहेत का हा प्रश्न आहेच. आणि त्याही आधी - "लिहिले" की "लिहीले"?? छ्या! कटकट असते सगळी. अगदिच चुकीचं वाटलं तर बदलतो नाहितर दडपून लिहीत सुटतो. काही सोपा उपाय आहे की कठोर परीश्रमाला पर्याय नाही? "पाणी" आणि "पाणि" या शब्दांचे अर्थ तरी वेगळे आहेत. पण मी परिश्रम / परीश्रम यातलं जे चुकीचं आहे ते लिहिलं तर तुमच्या मज्जातंतूना धक्का बसण्यापलीकडे (पुलंना जसं ग्लुको बिस्किट मज्जातंतूना धक्का देउन जायचं तसं) अजून काही - अर्थाचा अनर्थ होईल असा काही - दुष्परीणाम होतो का? की जेणे करून मी ऱ्हस्व-दिर्घ अचूक लिहीण्यासाठी कठोर परिश्रम करावेत?
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
हम्म्म्… चांगला प्रश्न आहे/कल्पना नाही
प्रथम, माझ्याकडून एक प्रश्न. त्यानंतर मग आपल्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रयत्न करतो. (अर्थात, समाधानकारक उत्तर माझ्याजवळ आहे, असा माझा दावा नाही.)
इंग्रजीच्या स्पेलिंगबद्दल अशी अडचण येते का? (नसल्यास, उत्तम; का येत नाही, असा प्रश्न मी विचारणार नाही — इंग्रजीची स्पेलिंगव्यवस्था मराठीहूनच काय, परंतु अनेक युरोपीय भाषांच्या तुलनेतसुद्धा आत्यंतिक अनियमित (irregular अशा अर्थी) नि किचकट असूनसुद्धा — परंतु) असल्यास, तिचे निवारण कसे करता?
(नसल्यास, स्पेलिंगच्या भरपूर चुका असलेला एखादा मजकूर डोळ्यांसमोर आल्यास, नक्की काय प्रतिक्रिया होते?)
(इंग्रजीला स्पेलिंगनियम असावेत काय? (ब्रिटिश नियम, अमेरिकन नियम वगैरे भानगडी तूर्तास बाजूस ठेवू. मुळात नियम असावेत काय?) आणि, असल्यास, समजा जर ते पाळले नाहीत, तर ते पाळलेले पाहण्याची सवय असलेल्या चारचौघांच्या डोळ्यांना धक्के बसतात, याहून अधिक नक्की काय बिघडते?)
(आधी म्हटल्याप्रमाणे, इंग्रजीची स्पेलिंगव्यवस्था, पाहायला गेल्यास, अत्यंत अनियमित तथा किचकट आहे, तिच्यात अजिबात सुसूत्रता नाही. (याला अनेक ऐतिहासिक कारणे असू शकतात, परंतु, अनियमितता आहे, सुसंगती नाही, हे निश्चित.) मात्र, काहीतरी एक व्यवस्था आहे. अन्यथा, ‘स्पेलिंग चुकले’, असे म्हणता आले नसते. (हे म्हणजे थोडेसे भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकांप्रमाणे झाले. भा.रे.च्या आगगाड्या कधीच जर वेळेवर धावणार नसतील, तर मुळात वेळापत्रके छापायची कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर, “गाडी लेट आहे” असे म्हणता येण्याची सोय म्हणून, असे आहे. तुलनेसाठी काहीतरी नको काय?) मात्र, इंग्रजीची स्पेलिंगव्यवस्था इतकी किचकट, अनियमित, गोंधळात टाकणारी आहे, तर तिच्यात काही सुसूत्रता आणून तिचे सुलभीकरण करावे काय? तर, तसे केल्यास नक्की काय होऊ शकते, याची किंचित झलक दाखविणाऱ्या, १९६०च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या रीडर्स डायजेस्टच्या बालपुरवणी विशेषांकात छापून आलेल्या या लेखाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. असो; फार अवांतर झाले.)
——————————
तसेही, मराठीत लेखनाचे प्रमाणीकरण हा प्रकार बहुधा इंग्रजी अंमलानंतर – नि त्यातसुद्धा, छापील माध्यमांचा प्रसार वाढल्यावर – अंमळ गंभीरपणे घेतला जाऊ लागला असावा, असे वाटते. (त्यातसुद्धा वेळोवेळी बदल होत गेले असावेत; आमच्या आजोबांच्या काळातील शुद्धलेखनाचे नियम आणि आमच्या काळातील शुद्धलेखनाचे नियम यांत फरक होता, हे निश्चित.) फार कशाला, खुद्द इंग्रजी स्पेलिंगांचे प्रमाणीकरण ही बाब तुलनेने नंतरनंतरची असावी, नि तीसुद्धा हळूहळू बदलत, उत्क्रांत होत गेली असावी. (या विषयात माझा अभ्यास नसल्याकारणाने, काय, कसे, कधी यांच्या तपशिलांत शिरू इच्छीत नाही; तसेच, प्रस्तुत विधानांचा मोघमपणाही त्याच कारणास्तव. असो चालायचेच.)
——————————
मात्र, शुद्धलेखनाचे नियम, झालेच तर लिखित भाषेचे प्रमाणीकरण, असावे, असे मला वाटते. हे नियम गरजेप्रमाणे बदलता येण्यास, किंवा प्रादेशिक/सामाजिक फरकांस लक्षात घेऊन विस्तृत करता येण्यास माझा विरोध नाही, परंतु, नियम असावेत.
——————————
सॉरी, पण, चुकीच्या माणसाला विचारताय. बोले तो, मी मराठीचे शुद्धलेखनाचे नियम काय किंवा इंग्रजीची स्पेलिंगे काय, कधीही पाठ करण्याच्या भानगडीत पडलेलो नाही. मात्र, दोहोंमध्ये मला आजतागायत सहसा अडचण आलेली नाही, किंवा दोहोंत चुकाही सहसा होत नाहीत, असे आढळत आलेले आहे. आता, हे कसे होते, हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकणार नाही – या बाबतीत माझा फॉर्म्युला असा काही नाही. मात्र, काय होऊ शकत असेल, याबद्दल अंदाज व्यक्त करू शकतो. कदाचित छापील माध्यमांतून डोळ्यांसमोर आलेल्या शब्दांच्या प्रतिमा डोक्यात कोठेतरी रजिष्टर होऊन त्यांचे काही प्रिस्क्रिप्शन डोक्यात फिट्ट बसत असावे, नि तदनुसार लेखन होत असावे, असे मला वाटते. (कदाचित माझ्या formative yearsमध्ये माझ्या डोळ्यांसमोर जे मराठी/इंग्रजी लिखाण आले, त्याच्या प्रमाणलेखनाचा/स्पेलिंगचा दर्जा बऱ्यापैकी सुसंगत असावा, ही माझ्या भाग्याची गोष्ट म्हटली पाहिजे.) अर्थात, चुका होऊच शकत नाहीत, असे नाही, परंतु, त्यांचे प्रमाण आजतागायत नगण्य असल्याचे लक्षात आलेले आहे. (त्या लक्षात आल्यास अर्थात पुढील वेळेस दुरुस्ती करता येतेच. One learns from one’s mistakes.) आणि, कधी शंका वाटल्यास, इतर स्रोत (जसे की, डिक्शनऱ्या, झालेच तर इतर लिखाण) तपासता येतातच. थोडक्यात, it’s an ever-evolving process.
याव्यतिरिक्त, it’s an intuition that has very rarely failed me, याहून अधिक काय म्हणू?
असो चालायचेच.
स्पेलिंग
स्पेलिंग
फ्रेंच मध्ये तर नाहीच.
फ्रेंच मध्ये तर नाहीच.
मी याउलट ऐकले आहे. लिखित स्वरूपात फ्रेंच ही इंग्रजीपेक्षा बरीच स्थिर भासते. हां, फ्रेंच लिखित आणि फ्रेंच उच्चारित यांची मुळात इंग्रजी शिकून मग त्या ब्याकग्रौंडवर तुलना करू जाल तर बरेच गोंधळात पडू शकाल. बोलताना एकवचन आणि अनेकवचन याचे उच्चार एकसारखेच असतात. लेखीमधेच सर्व फरक. बाकी बोलणे बरेचसे संदर्भावरुन समजून घ्यावे अशी पद्धत असू शकेल.
शिवाय या भाषा लॅटिन मधून!!
शिवाय या भाषा लॅटिन मधून!!
!
जर्मन, फ्रेंच, इंग्लिश. अमनधपक्याने किंवा लहान मुलांप्रमाणे सावकाश शिकणे हेच बरे.
+१
काँट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, फ्रेंच स्पेलिंगव्यवस्थेत कमालीचे सातत्य/सुसूत्रता/नियमितता आहे, असे मीही ऐकून आहे. हं, त्यांची कन्व्हेंशने इंग्रजीच्या कन्व्हेन्शनांपेक्षा प्रचंड वेगळी असल्याकारणाने केवळ इंग्रजी शिकलेल्या मनुष्यास गोंधळायला होऊ शकते खरे, परंतु, जी काही कन्व्हेंशने आहेत, ती अतिशय नियमित आहेत, असे ऐकलेले आहे.
अर्थात, फ्रेंचतज्ज्ञ याबद्दल काय तो खुलासा करू शकतीलच.
मनोगत
प्रमाणीकरण असावे. माझं शुद्धलेखन फारच गचाळ आहे. मनोगतने २००७ मध्येच चांगली सुविधा करून दिली होती. तशी सुविधा केली तर बरे होईल. फ्रेन्च माहीत नाही पण स्पॅनिश स्पेलिंग उच्चाराप्रमाणे होतात पण त्यात काही शब्दाचे उच्चार वेगळे आहेत. उदा. मराठीत च जसा वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारतात. अजून एक अडथळा हा आहे की मराठी प्रमाणे स्पॅनिशमध्ये पुल्लिंगीआणि स्त्रिलिंगी शब्दा नुसार क्रियापद आणि आर्टीकल्स बदलतात पण साला "तो सँडविच" आणि "ती बर्गर" ही भानगड काही आपल्या डोक्यात जात नाही. (एक सोपा नियम हा आहे की शेवटी आ आला असेल तर स्त्रिलिंगी.. hamburguesa पण डोक्यात "तो बर्गर" पटकन येते)
लेखाला धरून बोलायचं तर लवकर न
लेखाला धरून बोलायचं तर लवकर न शिकता येणाऱ्या गोष्टी करत राहण्याने वृद्धत्व मागे उभं राहून आपल्याकडे लक्ष ठेवून आहे हे विसरायला होते.
म्हणून फ्रेंच शिकण्याचा खटाटोप सुरू आहे. व्याकरण नियम आणि शालेय पद्धत अर्थातच बाद.
यूट्यूबवर सर्व प्रकारचे धडे आहेत तेही फुकट. "मोफतनो मूळो केळो जेवो लागे छे" एम गुजरातीमां केहवाय. ( फुकटचा मुळा केळ्यासारखा लागतो अशी गुजराथी म्हण आहे.)
कोणत्याही भाषेचे नियम शिकून
कोणत्याही भाषेचे नियम शिकून भाषा शिकणे म्हणजे संगणक कसा काम करतो यासाठी गेट्स, 1,0,1 वगैरे शिकण्यासारखे असते. गंमत घालवून टाकतात.
फ्रेंच साठी
RockNRoll किंवा
learn French by suchita, in 15 days छानच आहे. https://youtube.com/playlist?list=PLOVSdvQtun0r91XZQuqk109Rjx7Dqw6nb&si=...
अदिती, ही ईथे अवांतर झालेली चर्चा
अदिती, ही ईथे अवांतर झालेली चर्चा स्वतंत्र धाग्यावर हलवता येईल का? धन्यवाद.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
धन्यवाद.

'मनोगत'चा शुद्धिचिकित्सक आहे अजून
'मनोगत'चा शुद्धिचिकित्सक आहे अजून. पण तिथे मजकूर डकवा, दुरूस्त करा आणि जिथे हवाय तिथे परत आणा हे कटकटीचं आहे त्यामुळे ही सव्यापसव्य नाही करत बसत.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
आफ्रिकेमध्ये बोलली जाणारी
आफ्रिकेमध्ये बोलली जाणारी फ्रेंच फ्रान्स मधल्या फ्रेंच पेक्षा वेगळी आहे. उदा:
इंग्रजी -आर यू हंग्री?
फ्रान्स - एस्क त्यू आ फाम?
आफ्रिकन - विएं मांजे?
इ- क्विक
फ्रा- वित
आ- च्याप
इ- आय एम लिव्हिंग
फ्रा - ज में वे
आ - ज दमांद ला रू(त्)
इ- वेलकम
फ्रा- बीएंवेन्यू
आ- बोंआरीव
इ- वॉच आऊट!
फ्रा- अतेंसिओ
आ- दुस् माँ
इ- मिस्ट्रेस
फ्रा- माईत्रेस
आ- ल दुजीएम् ब्युरो
इ- बाय
फ्रा- ओर्वा
आ- आ तू लर
युरोपमधल्या इतर देशात बोलली जाणारी फ्रेंच जवळपास फ्रान्स मध्ये बोलली जाते तशीच आहे. परंतु आफ्रिकेत, जिथे जिथे फ्रेंचांच्या वसाहती होत्या तिथली फ्रेंच भाषा मात्र बदलली आहे.
….
?
(या विषयांतराच्या धाग्यावर हे विषयांतर आहे, परंतु, असू द्यात. मला काही अडचण नाही.)
हं, तर काय विचारत होतो? आफ्रिकेतसुद्धा फ्रेंचच्या कित्येक आवृत्त्या असतील, त्यातली नक्की कुठली आवृत्ती म्हणायची ही?
‘दुसरे ऑफिस’… हे रोचक आहे. काहीसा ‘अंगवस्त्र’ किंवा ‘स्टेपनी’तल्यासारखा प्रकार असावा काय हा?
बाकी, हे फरक असायचेच. आमच्या अमेरिकेतली इंग्रजी, ब्रिटनमधील इंग्रजी, ऑस्ट्रेलियातली इंग्रजी नि भारतातली इंग्रजी, फरक आहेच ना? (तरी अमेरिकेतल्या विविध भागांतल्या इंग्रज्यांमधले फरक किंवा भारतातल्या विविध भागांतल्या इंग्रज्यांतले फरक वगैरे जमेस धरलेले नाहीत.)
"ल दुजीएम् ब्युरो" काहीसा
"ल दुजीएम् ब्युरो" काहीसा ‘अंगवस्त्र’ किंवा ‘स्टेपनी’तल्यासारखा प्रकार असावा काय हा? बरोबर आहे.
कसं ओळखलत?
अदितीने वेगळा
अदितीने वेगळा धागा काढला की उत्तर देतो. सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
तुमच्या विस्तृत प्रतिसामधल्या मुद्द्यांबद्दल;
(शुद्धलेखनाबद्दल - किंवा त्याच्या अभावाबद्दल - आधीच माफी मागतो)
तुमच्या विस्तृत प्रतिसामधल्या मुद्द्यांबद्दल;
- ईंग्रजीच्या स्पेलिंगबद्दल अडचण फार कमी येते. स्पेलिंग्ज काही घोकून घोकून पाठ नाही केलेली. आणि मराठी वाचन दहावीपर्यंत खूप होतंच पण कॉलेजात गेल्यावर सुद्धा ईंग्रजीपेक्षा जास्त होतं. मग "वाचून वाचून ईंग्रजी शब्दांची विचित्र स्पेलिंग्ज सुद्धा जर लक्षात रहातात तर मराठी ऱ्ह्स्व-दिर्घ का नाही?" या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने माझ्याकडे नाही . "लीहीणे" नक्की बरोबर नाहीये हे कळतं पण 'लिहीणे' का 'लिहिणे' चटकन लक्षात येत नाही. नशीब आमचं दुसरं काय?
- ईंग्रजी स्पेलिंग्ज तर्कशुद्ध करायचा लेख मी 'मार्क ट्वेन'च्या नावाने वाचला होता! उदाहरणं वेगळी होती पण याच वळणाचा होता.
- पण स्पेलिंग्ज चुकणे आणि ऱ्हस्व-दिर्घ चुकणे यात एक मोठ्ठा फरक आहे. difikultis / diffikultis / dificultis / difficulties / diffikulties अशी बरीच रुपं होऊ शकतील आणि ती (त्यातली काही तरी नक्कीच) वाचायला कठीण जाताहेत. पण लिहिणे / लिहीणे / लीहिणे / लीहीणे ही रूपं वाचताना डोक्यात तितकं "खडकम खडकम" होत नाहीये. अर्थातच एखादा 'फेदरवेट' साहेब हे बरोब्बर उलटं म्हणायची दाट शक्यता आहे
- लिखित भाषेचं प्रमाणीकरण असावं. पण शिंचं ते शिकणं / लक्षात ठेवणं मला कठीण जातंय ही अडचण आहे!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
…
सर्वप्रथम, माझी (किंवा फॉर्दॅट्मॅटर कोणाचीही) माफी कशाबद्दल? शुद्धलेखन चुकणे हे वाचणाऱ्याच्या चटकन नजरेत भरू शकते खरे, परंतु तो काही गुन्हा नव्हे.
कोणाच्या काय लक्षात राहील नि काय लक्षात राहणार नाही, सांगणे अवघड आहे. याला काही निश्चित नियम असा नसावा.
“लिहिणे”. (आणि हो, “इंग्रजी”. परंतु, ते असो.)
हम्म्म्… हा तुमचा मुद्दा (काहीसा लक्षात येतोयसा वाटतोय) अंमळ रोचक आहे. म्हणजे, उदाहरणार्थ, त्या Kaos in ce klasrumमधले ते शेवटचे वाक्य वाचायला जवळजवळ जे अशक्य होऊन बसते, जणू काही भलत्याच कोठल्यातरी अगम्य भाषेतील वाक्य आपण वाचत आहोत, असा भास होतो, तसा परिणाम मला वाटते बदललेल्या मराठीतून साधता येणे अवघडच नव्हे, परंतु जवळजवळ अशक्य असावे. हे का होते, ते समजत नाही. मात्र, (एखाद्या भाषेतील लिखाणाशी) अतिपरिचय हे त्याचे कारण असावे, याबद्दल साशंक आहे. म्हणजे, तुमचा फेदरवेटसाहेब जर मराठी शिकला, तर त्याला येणाऱ्या अनुभवात नि तुम्हाला येणाऱ्या अनुभवात काही फरक असेल (किंवा फेदरवेटसाहेबाला बरोबर तुमच्या उलट अनुभव येईल), असे मला तरी वाटत नाही. (फार कशाला, तो Kaos in ce klasrumमधील शेवटच्या वाक्यातून साधला जाणारा (अगम्यतेचा) परिणाम मराठीतून तर सोडाच, परंतु स्पॅनिश, फ्रेंच वगैरे इतर युरोपीय भाषांतून तरी साधणे शक्य आहे, किंवा कसे, याबद्दल (त्या दोन्ही भाषा जरी मला अवगत नसल्या, तरीसुद्धा) मला स्वतःला शंका आहेत.)
कदाचित असे असावे का, की इंग्रजी स्पेलिंगमध्ये खरे तर इतकी प्रचंड अनियमितता आहे, तरीसुद्धा काही शब्दांची स्पेलिंगे ही अशीच असतात – अर्थात, एकाच ध्वनिसमुच्चयाकरिता अनेक पॅटर्न परंतु त्यातसुद्धा ठराविक शब्दाकरिता ठराविकच पॅटर्न नि तोच ध्वनिसमुच्चय असलेल्या दुसऱ्या एखाद्या शब्दाकरिता मात्र वेगळा (परंतु, पुन्हा, ठराविकच) पॅटर्न – हा जो काही (बहुधा इंग्रजीचीच खासियत असलेला; चूभूद्याघ्या.) प्रकार आहे, तो आपल्या डोळ्यांना इतका अंगवळणी पडला असावा, की त्याविपरीत जर का काही डोळ्यांसमोर आले, तर ते नुसतेच खटकते नव्हे, तर अडखळायला होते, नि क्वचित त्यातून काही अर्थबोध होणे दुरापास्त होऊन बसते?
कल्पना नाही. अर्थात, हे माझे निव्वळ स्पेक्युलेशन आहे. यावर अधिक विचार करावा लागेल. (परंतु, हे या माझ्या विषयांतराच्या धाग्यावरसुद्धा (माझेच) विषयांतर झाले. अर्थात, मला त्याबद्दल काही अडचण असायचे कारण नाही म्हणा! चालायचेच.)
तुम्हाला अडचण असू शकते, हे मी समजू शकतो. परंतु, अर्थात, लिखित भाषेचे प्रमाणीकरण असावे. म्हणजे, गेला बाजार ‘गाडी लेट आहे’ म्हणता येण्यापुरते तरी रेल्वेचे वेळापत्रक असावे, त्याचप्रमाणे.
Outliers will always be present, but without a standard range, there can be no outliers. पाहा विचार करून.
माझी थिअरी
मी मराठीत 'लहानपणी' बऱ्यापैकी लिहीत असे. स्वतंत्र काही नाही, पण मराठी माध्यमाच्या शाळेत होते. विभक्ती प्रत्यय शब्दाला चिकटून लिहायचे, वगैरे 'सोपे' नियम तेव्हाही माहीत होते. पण उदाहरणार्थ, माहीत आणि माहिती, असे शब्द आले की गडबडायला होत असे. माझं प्रमाणलेखन सुधारलं ते ऐसीच्या कामामुळे. सुरुवातीला साधं प्रमाणलेखन तपासायचं काम मी सुरू केलं. हेच ते, विभक्ती प्रत्यय शब्दाला चिकटून, अवतरण सुरू होण्याचा अपवाद वगळता बाकी विरामचिन्हं आधीच्या शब्दाला चिकटून, वगैरे. आणि पुढचं किचकट काम करणाऱ्यांना सांगितलं की गूगल डॉकात हे बदल थेट करू नका; सूचना म्हणून लिहा. मी ते वाचून मान्यच करायचे, पण ते बदल काय सुचवले आहेत हे दिसणं सोपं झालं.
इंग्रजीत लिहिताना अनेकदा शब्दाखाली लाल रेघ दिसते, तिचा फायदा होतो, तसंच हेही झालं. आता चुका बऱ्यापैकी कमी होतात. नाहीच होत, असा दावा नाही. पण अनेकदा त्या घाईघाईत टंकतानाही होतात. पुन्हा नजर टाकली तरी त्या चुका दिसतात.
मी मराठीत वाचून प्रमाणलेखन तपासून देण्याचं कामही ऐसीच्या निमित्तानं करते. (त्यामुळे फेसबुकवर, व्हॉट्सॅपवर लोक भयभीषण लेखन करतात ते वाचताना जरा जास्तच त्रास होत असे. पण हे सगळं लेखन विनोद म्हणून वाचायला लागले, आता ताप होत नाही. पण जरा मोठंसं कुणी, काही लिहिलं आणि प्रमाण लेखन चुकवलं असेल तर मनातली मुद्रितशोधक झोपायला जाऊ शकत नाही; आणि लेखनातला तपशील, मुद्दा राहिला बाजूला, मला अप्रमाण लेखनाचा तापच जास्त होतो.)
थोडक्यात - जे काम आणखी चांगलं जमावं असं वाटतं, ते करायला घ्यावं. मी पायथनही अशीच शिकले/शिकते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अशुद्ध लिहितांना किंवा
अशुद्ध लिहितांना किंवा बोलताना "पायथन" चे "पायताण" होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशुद्ध का?
ज्या लोकांना माझ्याबद्दल माहित्ये, थोडक्यात मित्रमंडळी, त्यांच्यासमोर मी पायताणच म्हणायचे. त्यावर πताण वगैरे कॉमेंट्सही जुन्या झाल्या. तेच-तेच जोक पुन्हा कुठे करायचे म्हणून आता सरळ पायथन म्हणते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शुद्धलेखन ठेवा खिशात
फडके कोशाचं ॲप आहे - शुद्धलेखन ठेवा खिशात. ते वापरून पाहा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बरे आहे का हो? (अवांतर)
(नाही, म्हणजे मला गरज (किंवा उपयोग) नाही, पण कुतूहल म्हणून?)
हो!
मला आवडतं हे ॲप. माझ्याकडे छापील कोश आहे. पण ॲपच वापरलं जातं. वापरून वापरून गरज कमी झाली आहे; पण तरीही विशेषतः दिवाळी अंकाचं काम करताना ॲप बरेचदा उघडलं जातं. ॲपमध्ये नसलेले शब्दही तपासावे लागतात; त्यासाठी काही व्हॉट्सॅप समूहांमध्ये चर्चा होते. उदाहरणार्थ, २०२३च्या दिवाळी अंकासाठी चर्चा झाली ती पोर्तुगीज या शब्दाचं सामान्य रूप काय असावं - पोर्तुगिजा का पोर्तुगीजा? असे शब्द फडकेंच्या कोशात न सापडण्याबद्दल माझी तक्रार नाही.
अरुण फडके काही वर्षांपूर्वी गेले; त्यामुळे आता या कोशात भर पडेल असं वाटत नाही.
अवांतर - फडकेंच्या मृत्युची बातमी वाचून वाईट वाटलं. पण हे कुणाला सांगावं हे समजेना. पुस्तक वाचून माणूस जवळचा वाटतो. अशा दुःखाचं काय करावं ते समजत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आय फोन्यावर नाहीये?
आय फोन्यावर नाहीये? phadake lekhana / fadake lekhana शोधून नाही सापडलं. पण नबा म्हणताहेत त्याप्रमाणे कुतूहल म्हणूनच फक्त विचारतोय. फोन्यावर लेखन काही नसतं फारसं. मी गाडीत असेन, बाहेर खरेदिला गेलेलो असेन तरच फोन वापरतो. घरी आलो की प्रशस्त की-बोर्डावर टाईपण्याला पर्याय नाही - काँप्युटरावर ब्राउझरमधे व्हॉट्सॲप उघडून मग मराठीत निरोप बडवायचे कीबोर्डवर !!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
हम्म्म्… नाही दिसत खरे!
.
हं...
माझ्याकडे अँड्रॉईड १३वाला फोन आहे, त्यात प्ले स्टोअरवर दिसत नाही. पण आधीच्या अँड्रॉईड ११वर होतं; ते जुन्या फोनवरून नव्यावर दोन-अडीच वर्षांपूर्वी आपोआप आलं.
भारतात आयफोन फार पसरलेला नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दीर्घ उच्चार आहेत ना
दीर्घ उच्चार आहेत ना कन्नड भाषेमध्ये.( त्यांचा उच्चार 'कन्नडा')
https://youtu.be/ITTVR0RMbcY?si=REXUmyuiyY5F69-l
शिवाय मराठीतून कन्नडआ शिका playlist [ https://youtube.com/@kabeerpanditkannada?si=RioqqhcM1dU5mr79 ] मध्येही हे विविध विडिओत सापडेल.
भाषा हे संपर्काचे साधन
भाषा हे संपर्काचे साधन
असे म्हटल्यावर परदेशात गेल्यावर तिथे आपल्याला हवे ते मिळवणे आणि ते काय बोलतात हे समजणे हा पहिला प्रयत्न असेल. मग त्यासाठी पर्यटकांसाठी भाषा शिकवणारी छोटी पुस्तके असतात. व्याकरण शिकवणे यास प्राधान्य नसते. सर्वसाधारण लोक बोलतात तीच प्रमाणभाषा. पुस्तकं लिहितांना मात्र अचूकता आणखी लागते.
जहाजांवर कामं करणारे लोक बऱ्याच देशांत फिरतात. जहाजं, बोटी विविध देशांच्या बंदरांना थांबतात. शिवाय जहाजाचे खलाशी काही ठराविक देशांतून येतात त्यांना नोकरीवर ठेवावे लागते. त्यांच्या प्रमाण भाषा ही एक गंमतच असते. त्यांचा एक मासला उदाहरण म्हणजे Ibis Triology - Amitav Ghosh. पुस्तके. खूप मजा येते वाचायला. लेखकाचा व्यासंग, निरीक्षण याचा प्रत्यय येतो. कादंबरी तर वाचनीय आहेच.
भाषा
भाषा नेहमीच शुद्ध स्वरूपात ऐकायला, वाचायला चांगली वाटते.
माझ्या शाळेतील काही भाषा विषयाच्या शिक्षिका, धडे, कविता मोठ्याने वाचायला सांगत असत, काही वेळा त्या स्वत: ही वाचत असत, स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार कसे असले पाहिजेत हे कळण्यासाठी. शब्दोच्चार अचूक माहिती असेल तर लेखनात चूक होण्याची शक्यता पुष्कळच कमी होते.
शुद्धलेखनाची वेगळी वही असे त्यात रोजच्यारोज वर्तमान पत्रातील किंवा अन्य पुस्तकातील (पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त) उतारे लिहायला सांगत असत. त्यामुळे देखिल ऱ्हस्व, दिर्घ बऱ्यापैकी ओळखीचे होतात.
लिखित मराठी वाचनामुळे देखिल लेखन शुद्ध होऊ शकते.
संस्कृत भाषा शिकताना तर पाठांतरावर जास्त भर असे. त्यामूळे लेखी आणि उच्चारी भाषा शुद्ध होण्यास मदत होउ शकते.
परिक्षेत शुद्धलेखनाचे गुण असत. उत्तर बरोबर असेल पण त्या शुद्धलेखनाच्या चुका असतील तर कमीतकमी अर्धा तरी गुण कापला जायचा.
त्यामुळे शुद्धलेखनाबद्दल जागरूकता होती.
पण इतके असूनही घाईने काही लिहायचे असेल, किंवा लिहिताना इतर काही व्यवधाने चालू असतील (काही ऐकणे, बोलणे, पहाणे इ.) तर लिहिताना चूका होउ शकतात. तसेही आजकाल मराठी लेखनाची वेळ फारच क्वचित येते. मराठी टंकलेखन सोपे वाटते कारण शुद्धलेखन तपासण्याची सुविधा उपलब्ध असते (पण त्यामुळे काहीवेळा शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष होते.. नंतर तपासून सुधारणा करीन असे म्हणून).
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
लोका सांगे…/आपण सांगे लोकांला…
‘ही’ हा शब्द सुटा असू नये.
देखील, दीर्घ. (शिवाय, ‘देखील’ हा शब्द सुटा असू नये.)
देखील. (शिवाय, ‘देखील’ हा शब्द सुटा असू नये.)
त्यामुळे, होऊ.
परीक्षेत.
चुका.
——————————
नाही म्हणजे, बाकी काही नाही, तरी गेला बाजार शुद्धलेखनाच्या महत्त्वाबद्दल प्रतिपादन करणाऱ्या प्रतिसादात शुद्धलेखनाच्या चुका असू नयेत, म्हणून हा प्रतिसादप्रपंच. बाकी तुमचे नित्यनेमाप्रमाणे चालू द्या.
(किती मार्क कापावेत?)
——————————
थोडक्यात, मराठीत कन्नडप्रमाणे एकारांत आणि ओकारांत ऱ्हस्वदीर्घाची भानगड आणणे उपयोगाचे नाही. आहे तेच जमेना…
प्रत्येकी अर्धा म्हणले तर तीन
प्रत्येकी अर्धा म्हणले तर तीन मार्क्स होतात.
उत्तर १ मार्क चे असेल तर -२ द्या ... चालेल मला.
*** पण उत्तर बरोबर की चूक ते सांगितलच नाही...
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
?
निबंधात बरोबर की चूक ते काय असते?
(ही म्हणजे, रतन समेळच्या बॉयफ्रेंडची नियुक्ती ज्या ष्टोरीरायटरच्या जागी होणार आहे, ती तो (जुना) ष्टोरीरायटर “चुकीची ष्टोरी लिहितो” म्हणून, तशातली गत झाली.)
(ही म्हणजे, रतन समेळच्या
(ही म्हणजे, रतन समेळच्या बॉयफ्रेंडची नियुक्ती ज्या ष्टोरीरायटरच्या जागी होणार आहे, ती तो (जुना) ष्टोरीरायटर “चुकीची ष्टोरी लिहितो” म्हणून, तशातली गत झाली.)
काय बी कळ्ळं नाई... जमल तर उस्कटून सांगा.. नाही सांगितलं तरीही चालेल म्हणा, तितकसं महत्वाचं नाहीये.
पण हा निबंध नाही...
असो चालायचंच ... चालू द्या.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
…
‘बटाट्याच्या चाळी’तला संदर्भ आहे. असो.
.. दूष्ट मधूच्या या नवीन
.. दूष्ट मधूच्या या नवीन ष्टोरीमध्ये रतनला साईड हिराईनचा चान्स असल्याने तिचंच शुटिंग जास्त होणार हा जुन्या आणि नव्या ष्टोरीतला फरक आहे. शिवाय त्यामुळे मालामाल होऊन मधू ब्युक गाडी घेणार आहे.
वेळीच कान पिळला तर पुढील
वेळीच कान पिळला तर पुढील अनर्थ टळतात.
आमचे हस्तव्यवसायाचे गुरूजी