बाजारगप्पा-भाग-२

तर मागील भागात आपण बघितलं की काही सार्वकालिक सत्ये आह्ते बाजाराविषयीची त्याच चर्चेला थोडं पुढे नेत पुढील महत्वाचे सत्य बघु या.

३-ट्रेडींगमध्ये दिर्घकाळ सातत्याने यशस्वी होण्यासाठी पामुख्याने तीन घटकांची आवश्यकता असते.1-money management 2-mindset 3-method.

सर्वसाधारणपणे तुम्ही कुठल्याही दिर्घकाळ सातत्याने यशस्वी ट्रेडर्स ची पुस्तके किंवा मुलाखती बघितल्या वा चर्चा केल्यास वरील तीनही घटकांच्या आवश्यकतेबाबत सर्वामध्येच एकमत असते आणि ते खरेच आहे. यात प्रत्येक घटकाचे योगदान किती टक्के असते यावर वेगवेगळ्या ट्रेडर्स मध्ये मतभेद आढळतील. पण त्यातही जर एक अगदी समान धागा बघितला तर सर्वाच्या एकमताने money management आणि mindset हे दोन घटक method पेक्षा कायम श्रेष्ठच मानले जातात. उदा. पहीले दोन सात्विक आणि राजस आणि मेथड ही कायम तामसिक दुय्यम या दोघांच्या तुलनेने मानली गेलेली आहे. कोणी ४०-४०-२० असे मानेल म्हणजे money mgt & mindset एकंदरीत यशात 40% -40% च योगदान देतात तर method 20%. . काही ट्रेडर्स ३५-३५-३० इ.इ. काही ४५-४५-१० पण सर्वानुमते method ही तामसिक च आहे. तर माझ्या व्यक्तिगत मतानुसार सर्वात महत्वाची अनुक्रमे 1-money management 2-mindset 3-method. असेच आहे. मला mindset पेक्षा money management ही महत्वाची वाटते. याचे कारण mindset हा काहीसा तरल abstract असा प्रकार आहे. म्हणजे त्याचे नियमन करणे थोडे गुंतागुंतीचे आहे. त्यामानाने एक नवा ट्रेडर हा money management पासुन सुरुवात करुन फार चांगले नियंत्रण आपल्या ट्रेडींगवर प्रस्थापित करु शकतो. अर्थात इतर दोन घटकांवरही काम करावेच लागेल त्याला पर्यायच नाही पण सुरुवात अगदी उत्तम व्यावहारीक सुरुवात जर money management पासुन केली तर सोपे जाते हा माझा अनुभव आहे. तर या भागात आपण money management या एकाच भागावर लक्ष केंद्रीत करुन त्याला आपण कसे आपल्या ट्रेडींग मध्ये वापरु शकतो हे बघणार आहोत. इतर घटकांवरही आपण क्रमाने येउच सध्या सुरुवात या money management पासुन करु. जी तुलनेने crystal clear सहजी अंमलात आणण्याजोगी बाब आहे.

या money management च्या मॉडेल संदर्भात काही स्पष्टीकरणे

१-आता मी पुढील विवेचन जे करणार आहे ते प्रामुख्याने नविन ट्रेडर ला म्हणजे जो असा ट्रेडर आहे की ज्याला अजुन आपली method किंवा strategy अजुन सिद्ध झालेली नाहीये. डोळ्यासमोर ठेउन करत आहे तसेच हीच money management तुम्ही प्रगतीच्या पुढच्या टप्प्यात कशी वापरु शकतात यावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेल.

२- तसेच सोयीसाठी ही money management मी लहान भांडवल गृहीत धरुन मांडणी करत आहे. सोयीसाठी एक भांडवल जे मी गॄहीत धरत आहे ते ३,००,०००/- इतके आहे. याला मग कमी किंवा जास्त रकमेवर तुम्ही वापरु शकतात. तो केवळ आकडेबदल आहे.

३- यातील मॉडेल हेच एकमेव आदर्श आहे असा माझा दावा नाही हा एक बेस आहे जो तुम्ही वापरु शकता आणि तुमच्या सोयी/रुची/अनुभवानुसार बदलु शकता.हा मी माझ्या व्यक्तिगत अनुभवातुन बनवलेला आहे व महाजनांच्या मार्गदर्शनातुन विकसीत केलेला आहे. याचा वापर तुम्हाला तुमच्या मॉडेल बिल्डींगमध्ये होऊ शकतो.

४- माझा या money management अनुभव प्रामुख्याने Equity Cash Swing Trade या विभागात केलेल्या ट्रेडींगवर आधारीत आहे. तरी हा थोड्या प्रयत्नाने इतर विभागातही वापरता येऊ शकतो. मुलभुत तत्वे महत्वाची आहेत आणि ती सर्वत्र समान असतात.

५-money management आणि mindset हे परस्परपुरक असे घटक आहेत. एक सुधारला तर दुसराही सुधारण्यास मदत होते. यांचा एकमेकांशी अतिशय घनिष्ट संबंध आहे. तुमची उत्तम सशक्त money management ही तुमचा mindset सशक्त करण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करेल व उलट दिशेने ही तसेच. आणि सर्वाचा सर्वगुणसमुच्चय च तुम्हाल सातत्यपुर्ण यश देइल. तर हे वेगवेगळे नाहीत इंटरकनेक्टेड असे घटक आहेत.

मुलभुत money management ची नियम व तत्वे

१-Begin with the Loss in mind.

ट्रेडींग हा एक विलक्षण असा खेळ आहे. इथे नेहमीच्या जगातल्यापेक्षा वेगळेच मार्ग आणि नियम आहेत. लॉस चा विचार सुरुवातीलाच करणे हे नकारात्मक वाटु शकते पण ते तसे नाही. या खेळात तुम्ही दिर्घकाळ टिकुन राहणे हे हरण्या जिंकण्यापेक्षा अधिक महत्वाचे असते.म्हणजे तुम्ही जर तुमचे भांडवल दिर्घकाळ टीकवु शकला तर तुम्ही कुठलीही मेथड वापरत असाल हळुहळु तुम्ही त्यात उत्क्रांत होत जाणार सुधारत जाणार आणि शेवटी जिंकणारच. पण जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त लॉस केला आणि मुळ भांडवलच गमावुन बसलात तर तुम्ही या खेळात जिंकुच शकणार नाही. म्हणुन हा पहीला नियम की काहीही होवो भांडवल वाचवायचा प्रयत्न हा केलाच पाहीजे. एक सुप्रसिद्ध सुविचार आहे.“I have two basic rules about winning in trading as well as in life: 1. If you don’t bet, you can’t win. 2. If you lose all your chips, you can’t bet.” तर आपण इथे दुसरा जो आहे त्यावर बोलत आहोत आणि आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करायचा आहे भांडवल वाचवण्याचा आणि प्रयोग ही करत राहण्याचा. हे नविन ट्रेडरसाठी महत्वाचे आहे कारण जोपर्यंत त्याचा स्वतःच्या मेथडवर पुर्ण विश्वास विकसीत होत नाही तोपर्यत तरी तो मार्केटमध्ये टीकला पाहीजे. कारण सरावाने आणि फोकस ने अखेर मेथड ही विकसीत होइलच. त्यावर आपण नंतर बोलु.

२-Risk Reward Ratio आणि Win Ratio

हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तुमचा प्रत्येक ट्रेड एक शक्यता असते इथे आपण बघितले तसे १००% काहीच नसते. तसे असते तर मग आपण आपले संपुर्ण भांडवल ३ लाख आपण एकाच ट्रेड मध्ये लावले असते. मग मनी मॅनेजमेंटची गरजच नव्हती. तर प्रत्येक ट्रेड मध्ये उदा. जर आपला तोटा हा १० रुपये होण्याची शक्यता असेल तर आपण आपल्या नफ्याचे उद्दीष्ट हे त्यापेक्षा कधीही जास्तच ठेवले पाहीजे. म्हणजे एक स्टॉक तुम्ही १०० रुपयात घेतला व ९० रुपयाचा स्टॉपलॉस लावला तर त्याचा टेक प्रॉफिट टारगेट अगदी कमीत कमी १० रुपये वा त्यापेक्षा जास्तच असला पाहीजे. म्हणजे तुम्ची रीस्क १० रु. होती तर तुमचा प्रॉफिट किमान १० वा २० वा ३०० असाच अस्ला पाहीजे. जर तुमचा लॉस १० आहे आणि प्रॉफिट टारगेट २० आहे तर तुमचा रीस्क रीवार्ड रेशो १:२ असा होतो. याला बहुधा गुणोत्तर असा शब्द आहे. तर हा नविन ट्रेडर ने किमान १:२ तरी ठेवलाच पाहीजे. नविन ट्रेडरसाठी हा आदर्श आहे. पुढे जसे तुम्ही प्रगती कराल तसा तो वाढवत नेला पाहीजे म्हणजे १:३, १:५ इ. हा जितका जास्त असेल तितका साहजिकज तुमचा नफा वाढेल.
तसेच तुमचा Win Ratio ही महत्वाचा आहे. उदा. तुमची मेथड ही ५०% वेळा यशस्वी होते. म्हणजे तुम्ही घेतलेल्या १० ट्रेड पैकी सर्वसाधारण तुमचे ५ ट्रेड यशस्वी होतात तर तुमचा विन रेशो हा ५०% आहे असे म्हटले जाते.

तर वरील Win Ratio आणि २-Risk Reward Ratio. या दोघांचा संयोगाने तुमचे यश निश्चीत होते. उदा. तुमचा वरील प्रमाणे ५०% विन रेशो आहे आणि रीस्क रीवार्ड १:२ आहे तर तुम्ही एक समान भांडवल प्रत्येक ट्रेडमध्ये वापरले आणि तुम्हाला ५ ट्रेड मध्ये २ प्रमाणे १० रु. नफा झाला आणि उरलेल्या ५ ट्रेड मध्ये १ रु प्रमाने ५ रु. तोटा झाला तरी तुम्ही अंतिमतः ५ रु,. निव्वळ नफा कमवणार.

आता नविन ट्रेडरसाठी आदर्श किमान रीस्क रीवार्ड रेशो १:२ इतका असायलाच हवा आणि साहजिकच नविन ट्रेडर चा विन रेशो हा कमी असतो म्हणुन हे आवश्यक आहे. पुढे जसा अनुभव वाढत जातो तसा विन रेशो आणि रीस्क रीवार्ड रेशो दोन्ही त प्रगती होत जाते. हे फारच सोपे आहे पण अंमलात आणायला अवघड आहे. अनेक अनेक नविन ट्रेडर या मुलभुत तत्वाच्या विरोधात काम करतात म्हणजे रीस्क घेतात ५० रु. ची आणि १० रु. प्रॉफिट मध्ये ट्रेड मधुन बाहेर पडतात. म्हणजे ५:१ या रीस्क रेशो त काम करतात जे अर्थातच चुकीचे आहे. हा प्रकार कधीच यशस्वी होऊच शकत नाही.

३- Total risk per strategy and Risk per trade.

याचा अर्थ तुम्ही वरीलप्रमाणे एकदा तुमचा स्वतःचा रीस्क रीवार्ड रेशो आणि विन रेशो एकदा सेट केला की म्हणजे तुम्ही अपेक्षा करुन त्यादिशेने काम करत आहात. तो साध्य करणे ह्ळुहळु तुम्हाला जमेल तुम्ही ठरवले म्हणुन काही लगेच ते साध्य होणार नाही तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करणार हे महत्वाचे आहे हे ध्येय्य आहे जे डोक्यात ठेउन तुम्हाला काम करायचे आहे. तर आता तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्ही समजा तुमची एक मेथड आहे ज्यावर तुम्ही उत्तम अभ्यास केलेला आहे किंवा कोर्स मध्ये शिकलेला आहात किंवा तुम्ही स्वतः बॅकटेस्ट करुन अभ्यास करुन तुम्ही निवडलेली आहे आणि ज्यावर तुम्हाला आता प्रत्यक्ष काम करायचे आहे ट्रेड्स घ्यायचे आहे. (मेथडवर आपण पुढे सविस्तर बोलुच सध्या एक आहे असे गृहीत धरुन चला कुठलीही असो ) तर इथे आपल्या पुढे दोन गरजा आहेत.

अ- नविन मेथड चा आपल्याला अधिकाधिक सराव करायचा आहे त्यात प्रविण व्हायचं आहे.
ब- हे करत असतांना आपल्या भांडवलाला ही सुरक्षित ठेवायच आहे.

कारण प्रत्येक ट्रेडगणिक तुमची मेथड विकसीत होत जाणारच त्या मेथड च्या निमीत्ताने तुमचे Guess work हे विकसीत होणारच फक्त हा होत असतांना तुमचे भांडवल जर अगोदर संपले तर सगळेच संपेल. प्राविण्य आणि आत्मविश्वास आल्यानंतर काही अडचण नाही पण तोपर्यंत तुमचे भांडवल टिकुन राहणे हेच मुख्य महत्वाचे आहे. राकेश झुनझुनवाला एकदा म्हणालेले. की मार्केट मध्ये रोज नविन चुका करा रोज त्यातुन शिका त्या सुधारा फक्त चुक इतकी मोठी करु नका की दुसर्या दिवशी ट्रेड करण्यासाठी तुम्हीच शिल्लक नसाल.

तर यासाठी आपण दोन नियम पाळणार

१- आपल्या एकुण भांडवलाच्या एक निश्चीत टक्के रक्कमच आपण एका स्ट्रॅटेजीच्या सिद्धतेपर्यत वापरणार. म्हणजे त्यानंतर आपण ती मेथड थांबवणार. आता ही रक्कम किती असावी नेमकी ? तर जिथपर्यंत आपली मानसिकता टिकु शकते आपण सहज सामान्य मनस्थितीत राहु शकतो तितकी ही व्यक्तिपरत्वे वेगळी आहे. पण मी तुम्हाला एक आदर्श आकडा देतो १०% म्हणजे आपल्या ३ लाख भांडवलापैकी जेव्हा आपण ३०,००० गमावु तेव्हा आपण थांबु हा नियम ठेवा. १० च का २० का नाही इ. थोडा वेळ बाजुला ठेवा. अगोदर एकदा सर्व प्रकरण समजुन घ्या सर्व मग वाटेल तसा बदल करा.

२-आता वरील मॅक्स लॉस आपण निश्चीत केल्यावर आपण आता या प्रक्रियेला दिर्घ काळ कसे खेळता येइल हे बघु. लक्षात घ्या जितका अधिकाधिक सराव एका मेथड वर फोकस करुन करणार तितके यश अधिकाधिक निश्चीत होणार. त्याहुन मोठा मुद्धा म्हणजे जरी नियमबद्धतेने हरलात प्रवास पुर्ण केलात आणि अगदी १०% जरी हरलात तरी तुमचे गेस वर्क तुमची क्षमता इतकी वाढलेली असेल की पुढील मेथड जी सुधारीत आवृत्ती असेल ती यशाच्या अधिकाधिक जवळच नेत जाणार. तुमचा माइंडसेट आणि मेथड दोन्ही योग्य दिशेने वाटचाल करणार. म्हणजे हा मार्ग महत्वाचा आहे या वे ऑफ वर्क ने तुम्ही अंतिम ध्येय्या पर्यंत पोहोचणार सहजतेने म्हणजे तुमचा माइंडसेट न विचलीत होता तुम्ही प्रगती करणार.

तर आता हा खालील तक्ता बघा
1
आता तुम्ही समजा एक स्ट्रॅटॅजी/मेथड निश्चीत केलेली आहे.
तुमचे एकुण भांडवल ठरलेले आहे रु.३,००,०००/-
तुमचा रीस्क रीवॉर्ड रेशो तुम्ही ठरवलेला आहे १:२
तुमचा विन रेशो अपेक्षित आहे ५०% म्हणजे एकुण १० ट्रेड पैकी तुमचे ५ ट्रेड च प्रॉफिट देणार बाकी लॉस करतील.
शिवाय या वरील एका स्ट्रॅटेजी वर तुम्ही एकूण भांडवलाच्या पैकी किती मॅक्स लॉस लावणार हे ठरवलेले आहे ते १०% आहे म्हणजे ३०,००० मॅक्स लॉस
आणि तुम्हाला आता अधिकाधिक ट्रेड्स यावर घ्यावयाचे आहेत कारण जितके अधिक ट्रेड्स तुम्ही या एकाच क्ष नावाच्या स्ट्रॅटेजी वर घेणार तितकी ती स्ट्रॅटेजी व त्या मागे तुमचे गेसवर्क तुमची एकुण मार्केट ची समज तुमची अ‍ॅक्युरसी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. व अंतिमतः तीच तुम्हाला यश देणार

तर त्यासाठी

१-एकीक्डे अधिकाधिक ट्रेड प्रॅक्टीस करत अधिकाधिक क्षमता विकास करत राहणे चुका करणे त्यातुन शिकणे नव्या चुका करणे अनुभव जमणे कौशल्य वाढवत जाणे

२-दुसरीकडे मात्र भांडवल सुद्धा शाबुत ठेवणे यासाठी आपण वरील तत्का वापरणार तो असा

एक आता वरील तक्त्यात बघा स्टेजेस दिलेल्या आहेत ० ही न्युट्रल सुरुवात दर्शविते. नंतर -१ आणि -२ या लॉस दाखवतात त्यानंतर १-२-३-४-५ या प्रॉफिट स्टेजेस आहेत. तर तीन आहेत एक न्युट्र्ल एक रेड लॉस स्टेजेस चा टाइप आणि तिसरा प्रोफिटेबल ग्रीन स्टेजेस तर सुरुवातीला

१-आपण सुरुवातीला एक व्याख्या बनवु या ही लक्षात ठेवा

१० ट्रेड ची मिळुन १ सायकल
१० सायकल मिळुन १ राऊंड
१० राउंड मिळुन १ सिझन
म्हणजे १ राउंड = १०० ट्रेड्स व १ सिझन = १००० ट्रेड्स

२- सुरुवातीची १ ली सायकल आपण ० स्टेज पासुन सुरु करु म्हणजे यात पहीले १० ट्रेड्स आपण घेतांना प्रत्येक ट्रेड चा लॉस हा १००० फिक्स करुन ठेउ. आता हे कसे तर जर आपली एन्ट्री १०० रुपये वर आहे आपला स्टॉप लॉस आपल्या मेथड प्रमाने ९० वर आला तर आपले स्टॉप लॉस पॉइन्ट्स १० आहेत तर आपण एकुण १०० नग खरेदी करु. म्हणजे जेव्हा एका शेअर मागे १० रु लॉस झाला तर आपला एकुण लॉस हा १००० च होणार जो आपला नियम आहे. समजा स्टॉपलॉस ८० वर आहे तर स्टॉप लॉस पोइन्ट्स झाले २० तर आपण १०००/२०=५० नग च खरेदी करणार म्हणजे एकुण लॉस पुन्हा १००० च होणार.
तर १००० रुपये च्या वर आपला लॉस जायला नको त्यासाठी आपण पोजीशन सायझींग करणार म्हणजे शेअर ची क्वांटीटी अ‍ॅडजस्ट करत राहु मात्र लॉस १००० च ठेउ.

३-आता १० ट्रेड ची १ सायकल पुर्ण झाली व आपला एकुण नफा हा ७००० झाला तर आपण अजुन ० स्टेज मध्येच आहोत म्हणजे मायनस १०००० लॉस ते १०००० प्रॉफिट तर परफोर्मन्स प्रमाणे आपण पुढची सायकल १० ट्रेड्ची जी आहे ती १००० रु. लॉस पर ट्रेड प्रमाणे च खेळत राहणार.
आता दुसरी सायकल झाली व आपला नफा समजा १३००० झाला तर आता आपण स्टेज १ मध्ये गेलो ( १०,००० ते ३०,००० नफा) तर आता आपण वरील १००० एवजी आता १२०० रुपये रीस्क पर ट्रेड घेणार तर आपण आता या सायकल मध्ये रीस्क पर ट्रेड वाढवली कारण आपला परफॉर्मन्स सुधारला. याच्या उलट जर आपण लॉस केला तर तिसरी सायकल संपल्यावर ११००० चा तर आता आपण रीस्क पर ट्रेड घटवुन ७५० वर आणणार.
प्रत्येक सायकल च्या शेवटी आपण नफा तोटा कामगिरी बघणार आणि त्याप्रमाणे पुढील १० ट्रेड तसे घेत जाणार.

४- यात तुम्ही रीस्क पर ट्रेड परसेंट बघितले तर ते मॅक्सिमम १% पर ट्रेड आहे ते सुद्धा जेव्हा तुम्ही प्रॉफिट मिळवला तरच तुम्ही त्याला पात्र होणार. तर हे तुम्ही तत्क्त्यानुसार काटेकोर पाळत गेलात तर अनेक सायकल ऑफ ट्रेड्स पर्य्त तुम्ही टिकणार म्हणजे तुमचे भांडवल सहजासहजी चटकन साफ होणार नाही तर ह्ळूहळु आटत जाणार पण जितका दिर्घ काळ ते आटायला लागेल तितकी तुमचे स्टृटेजीवरील पकड घट्ट होत जाणार.

पुढच्या भागात हेच प्रकरण पुढे नेऊन अजुन मनी मॅनेज्मेंट च्या खोलात जाऊन बघु

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ट्रेडचा कालावधी (होल्डींग पिरिअड) किती असतो. गुंतवणूकीमध्ये सहसा कालावधी काही महिने ते काही वर्ष इतका असू शकतो. जोपर्यंत गुंतवणूक (एखाद्या स्टॉक मधली)आकर्षक वाटते आहे तो पर्यंत त्यात गुंतवले जातात. किती आकर्षक आहे हे अर्थात सापेक्ष असते. आणि हे अंदाज बर्‍याच वेळा चुकतातही आगदी महानुभावांचेही. उदा. कंपनी मॅच्युअर फेझ मध्ये आली आहे आता ती यापुढे तितक्या वेगाने वाढणार नाही असा अंदाज करायचा आणि नेमकी तीच कंपनी दुसर्‍या कुठल्यातरी संलग्न बिझनेस मध्ये हातपाय रोऊन अजून मोठी होते. वा याच्या उलटही होते. मॅच्युअर कंपनी ग्रोथ स्टॉक म्हणून गुंतवली जाते वा संलग्न बिझनेसमध्ये हातपाय रोवण्यास कमी पडते.

अवांतरः

माझ्या काही ओळखीतल्या जेष्ठ नागरिकांचे काही हजारांचे शेअर्स गेल्या २०-२५ वा त्याहूनही अधिक वर्षात कैक पटीने वाढून आज लाखात आहेत. बहुतेक सगळ्या आजच्या ब्लुचीप कंपन्या आहेत. आणि त्यातल्या काही त्यांना आयपीओ मध्ये मिळालेल्या आहेत. प्रॉब्लेम हा आहे की, आताच्या त्यांच्या १०० रुपयाच्या पोर्टफोलीमधल्या या ३-४ कंपन्या मिळून जवळजवळ ९५ ते ९९ रुपये होतात. अर्थात बाकीच्या कंपन्या इतक्या मोठ्या झाल्या नाहीत. तरीही ही एक जोखिम आहे कारण १०० रुपये ही त्यांच्यासाठीखूप मोठी गुंतवणूक आहे. ह्या सगळ्या पोर्टफोलिओमधे प्रॉफीट बूक करून आलेले पैसे ब्रॉडर इंडेक्स मध्ये (निफ्टी इटीएफ मध्ये) गुंतवले तर जोखीम फारच कमी होईल ज्यात त्यांच्या ह्या ३-४ कंपन्याही असतील. पण ज्या स्टॉक्सने आपली "वेल्थ" निर्माण केली ते स्टॉक्स ते विकायला तयार नाहीत. कंपनी गेली ५-६ वर्ष ब्रॉडर मार्केटला अंडरपर्फॉर्म करत असली तरिही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रेड चा होल्डींग पिरीयड हा अनेक घटकांवर अवलंबुन आहे.

१-

तुम्ही कोणत्या टाइमफ्रेम वर आणि कुठला ट्रेडींग टाइप निवडलाय यावर हे प्रामुख्याने अवलंबुन आहे. उदा. स्काल्पर ची टाइमफ्रेम १ ते ३ मिनीट इतकीच असते. त्यांचा होल्डींग पिरीयड हा फारच छोटा काही सेकंद ते दोन तीन मिनिट इतकाच असतो. इंट्राडे ट्रेडर साधारण ५ ते १५ मिनीट ट्रेडींग टाइमफ्रेम वर काम करणारा असेल तर तो १ दिवस ट्रेड होल्ड करणार दिवस संपायच्या आत एक्झीट घेणार. बीटीएसटी एक सेगमेंट असतो बाय टुडे सेल टुमारो हे एक रात्र स्टॉक होल्ड करतात क्लोजींग टाइम ला आज एन्ट्री घेऊन दुसर्स्या दिवशी सकाळी मार्केट उघडताच विकुन टाकतात. त्यानंतर स्विंग ट्रेडर साधारण १ तास ते १ दिवस च्या ट्रेडीङ टाइमफ्रेम वर काम करतात म्हणजे या टाइमफ्रेम चा चार्ट लावुन अभ्यास करुन निर्णय घेतात मी प्रामुख्याने स्विंग ट्रेडींग करतो माझा होल्डींग पिरीयड २ ते १४ दिवस सर्वसाधारण इतका असतो. त्याहुन जास्त मी सहसा होल्ड करत नाही.

२-
तुम्ही फिक्स टारगेट वर काम करता की ट्रेल करुन प्रॉफिट बुक करता या तुमच्या धोरणावर पण अवलंबुन आहे की तुमचा ट्रेड कालावधी काय असेल. मी काही वेळा ट्रेल करतो म्हणजे स्टॉक आपल्या फेवर मध्ये जसजसा वाढत आहे तर त्याप्रमाणे आपला ट्रेड च्या सुरुवातीला लावलेला मुळ स्टॉप लॉस हा मॉडीफाय करत वर नेत जाणे. उदा तुम्ही १०० रु. त स्टॉक मध्ये एंट्री केली आणि स्टॉप लॉस ९० वर लावला आता स्टॉक जसजसा वर जात आहे उदा. १०० ते १२० वर गेला की तुम्ही तुमचा स्टॉप लॉस १० पॉइन्ट ने वर आणुन कॉस्ट प्राइस वर ठेवला नंतर स्टॉक अजुन वर १४० वर गेला की तुम्ही स्टॉप लॉस १२० वर आणुन ठेवला असे ट्रेल करत जेव्हा कधी तो रीव्हर्स होईल तेव्हा तुमचा स्टॉप लॉस हीट होउन एक्जीट होइल. पण अर्थातच प्रॉफीट मध्ये एक्झीट होइल. तर फिक्स टारगेट पेक्षा इथे तुलनेने जास्त वेळ लागतो.

३-
इन्व्हेस्टींग आणि ट्रेडींग सर्वस्वी भिन्न असे प्रकार आहेत. जे इन्वेटींग मध्ये गुण आहेत ते ट्रेडींग मध्ये मोठे दोष आहेत आणि व्हाइस व्हर्सा. मला इनव्हेस्टींग आवडत नाही मी शुद्ध ट्रेडर आहे. तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हणुन मात्र मी तुम्हाला आर्वजुन बघण्यास सांगतो एक मॉमेन्टम इन्व्हेस्टींग म्हणुन प्रकार आहे हा मला आवडतो यातले एक ग्रेट नाव आहे आलोक जैन यांचे या विषयावरील व इतरही एकुण व्हिडीयोज फार च सुंदर माहीतीपुर्ण उपयुक्त आहे तुम्हाला आवडतील जरुर बघा नविन मिळेल तुम्हाला
इथे यांची सुंदर मुलाखत आहे
https://www.youtube.com/watch?v=R8qYEOZF460
आणि हा यांचा चॅनेल आहे.
https://www.youtube.com/@AlokJain/playlists
आणि हे तुम्ही ऑप्शन ट्रेडर आहात आणि वर ब्रॉडर इन्डेक्स चा उल्लेख केलात तर गोविंद झवर ची ही स्ट्रॅटेजी सुंदर आहे लॉन्गटर्म ऑपश्न ची एकदा बघा
https://www.youtube.com/watch?v=K2AYOBuIPkU

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सविस्तर प्रतिसादाबद्धल धन्यवाद!. दुसर्‍या व्हिडीओमध्ये गोविंद जे म्हणत आहेत तेच जवळ जवळ मी करतो. माझा कलही थोडा गुंतवणुकदार म्हणूनच आहे. ऑप्शन्स मी लाँग पोजिशन्स मधली रिस्क हेज करण्यासाठीच वापरतो. पण कधी कधी स्पेक्युलेटर म्हणूनही ऑप्शन्स वापरतो. क्वांट्स, पराग पारेख सारखे काही फंड्स पण जवळ जवळ हेच करतात फक्त ते इंडेक्स पेक्षा स्टॉक्सवर करतात.

तुमचे पुस्तकही ऐकायला घेतले आहे. त्यातल्या दुसऱ्या पाठाच्या शेवटचा हा पॅरा आवडला.

There are a millions ways to make money in the market. Unfortunately they are all difficult to find. But there are many many ways to succeed. Some traders such as Rogers succeed using only fundamental analysis. Others such as Schwartz succeed using only technical analysis. And still others use a combination of the two. Some traders succeed holding positions for months or even years. While other succeed on a timescale measured in minuets. Market success is a matter of finding a methodology that is right for you. And it will be different for everyone. Not a matter of finding one true methodology.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पुस्तकात wisdom पानोपानी खच्चून भरलेला आहे.
Enjoy!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0