Skip to main content

सद्दीत सुमारांच्या ह्या

जटिलाच्या दारावरती
दुर्बोध देतसे थाप
भेटीत उमजले दोघा,
"उभयतांस एकच शाप

सद्दीत सुमारांच्या ह्या
उ:शाप नसे शापाला
अस्वस्थ उद्याची हाक
ऐकू ना येई कुणाला"

दुर्बोध जटिलसे हसले
दुर्बोधून जटिलही गेले
अन् विषण्ण होऊनी दोघे
आश्रयी कवीच्या गेले :)

तिरशिंगराव Fri, 21/06/2024 - 07:21

अपूर्णतेच्या अंधारात
पूर्णत्वाचे विवर
अर्थकाहुर शब्दभांडारात
विषण्णतेचे प्रहर
पद्यपंक्तिच्या मांडवात्
शब्दफुलांची झगमग
दुर्बोध रचनांच्या जाळ्यात
वाचकांची तगमग
सुबोध स्पष्ट विचारांचे
अर्थवेत्त्यांना वावडे
तिमिरघन मायाजालात
रसिकांना शब्दकोडे !