जीवनाचा ताल (The Rhythm of Life)

सॅमी डेव्हिस ज्युनियर या अफलातून गायकाच्या "The Rhythm of Life" या गाण्याचा भावानुवाद करण्याचा प्रयत्न.

===========================================================================

बाबाजी राहत होते कलकत्त्यात
प्रवचनं झोडती मोठमोठी
अचानक आतला आवाज वदला -
"चहूकडे पसरव तुझी कीर्ती"

"बाबाजी, बघ हे लाखो येडे
धाव घेती नव्यानव्या पंथांकडे
त्यांना गटव, सोड तुझी बायको आणि बाळ
सुरु कर नवा पंथ - जीवनाचा ताल!"

"जीवनाचा ताल - त्याचं स्पंदन जोरदार
रोमारोमांमधून त्याचा होतसे प्रसार
शय्येमध्ये ताल, चारचौघांतही ताल
स्पंदन जोरदार - असा जीवनाचा ताल

जाणून घे रे जीवनाचा ताल
जाणून घे रे स्पंदन जोरदार
जाणून घे रे शय्येमधला ताल
जाणून घे चारचौघांतला ताल"

बाबाजींनी प्रचार केला ओरिसामध्ये
त्यानंतर गाठला विजयवाडा
करून पादाक्रांत बंगलोर, मंगलोर
शेवटी पुण्यामध्ये बांधला वाडा

बाबाजींची हवा झाली, वळचणीला मेंढरे आली,
धंदा मोठा उभारला बघताबघता
प्रवचने भुलवती, पाट दारूचे वाहती -
बाबाजींच्या मागे लागे सारी जनता

"पंख पसरा, उड्डाण करा
पंख पसरा, उड्डाण करा
पंख पसरा, उड्डाण करा
जा बाबाजींच्या आश्रया

सूर मारा, पोहू लागा
सूर मारा, पोहू लागा
सूर मारा, पोहू लागा
जा बाबाजींच्या आश्रया

क्षुद्र किड्यांनो, सरपटा
क्षुद्र किड्यांनो, सरपटा
क्षुद्र किड्यांनो, सरपटा
जा बाबाजींच्या आश्रया"

"जीवनाचा ताल - त्याचं स्पंदन जोरदार
रोमारोमांमधून त्याचा होतसे प्रसार
शय्येमध्ये ताल, चारचौघांतही ताल
स्पंदन जोरदार - असा जीवनाचा ताल

जाणून घे रे जीवनाचा ताल
जाणून घे रे स्पंदन जोरदार
जाणून घे रे शय्येमधला ताल
जाणून घे चारचौघांतला ताल"

"पंख पसरा, उड्डाण करा
सूर मारा, पोहू लागा
क्षुद्र किड्यांनो, सरपटा"
"बाबाजी, आम्हां लाभला जीवनाचा ताल!
जीवनाचा, जीवनाचा, जीवनाचा ताल!
होय! होय! होय! ताSSल!"

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही कविता समजून appreciate करण्यासाठी मुळात सॅमी डेव्हिस ज्युनियर या अफलातून गायकाचे "The Rhythm of Life" हे गाणे ही नक्की काय भानगड आहे, हे तपासून ते समजून घ्यावे लागेल.

सबब, आपला पास.

(दोष अर्थात सर्वस्वी माझा. This does not reflect upon the मूळ कविता or on the translation thereof. मूळ कविता आणि/किंवा तिचे प्रस्तुत भाषांतर उत्कृष्ट असण्यास मला व्यक्तिश: काहीही प्रत्यवाय नाही; मात्र, त्याकरिता मी योग्य judge नव्हे. (किंबहुना, इथे कितीसे सापडतील, याबद्दल मी साशंक आहे.))

(कविता/भाषांतर समजून appreciate करण्याचा baton (निव्वळ अज्ञानापोटी) अबापट यांजकडे pass on करीत आहे. इथे कोणाला हा प्रकार कळून appreciate झालाच, तर त्यांनाच होण्याची शक्यता त्यातल्या त्यात अधिक, एतदर्थ हा pass onप्रपंच. क्षमस्व, आणि आभार.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=GS1rEJOz9Hc

भावानुवादाचं सोडा. मूळ गाणं छान आहे.

(हे गाणं ऐकण्यात येण्याचं कारण Guiness ची एक जाहिरात आहे, तीही छान आहे. https://www.youtube.com/watch?v=dpJaHqvRdB0 )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न बा,
सॅमी डेव्हिस यांच्याविषयी, त्यांच्या संगीतांविषयीं लिहिण्यासारखे मजपाशी फार काही नाही.

श्री देवदत्त यांनीच या विषयी विस्तृत माहिती लिहावी अशी त्यांना विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चॅटजिपीटी म्हणे--
"Rhythm of Life" is a song from the musical "Sweet Charity," with music by Cy Coleman, lyrics by Dorothy Fields, and a book by Neil Simon. Here's a detailed breakdown of the song:

### Context:
The song appears in Act 2 of "Sweet Charity," a musical that follows the romantic misadventures of Charity Hope Valentine, a dance hall hostess who dreams of finding true love.

### Content and Themes:
1. **Celebration of Life**: "Rhythm of Life" is a celebratory anthem that embraces the vitality and diversity of life. It speaks to finding joy and purpose in everyday experiences.

2. **Spirituality and Philosophy**: The lyrics blend elements of spirituality and philosophy, suggesting that life's rhythm encompasses both the mundane and the profound. It encourages embracing all aspects of life, whether highs or lows.

3. **Lyricism**: The lyrics are rich with imagery and metaphors that paint a vivid picture of a communal gathering where people from all walks of life come together to celebrate existence.

### Musical Style:
1. **Upbeat Tempo**: The song is characterized by an upbeat tempo, reflecting its celebratory nature and the excitement of life.

2. **Jazz and Gospel Influences**: The music draws from jazz and gospel influences, with lively rhythms and harmonies that amplify the song's exuberance.

3. **Choral and Solo Parts**: "Rhythm of Life" features both choral sections where the ensemble joins in, creating a sense of community, as well as solo parts that highlight individual voices expressing their perspectives on life.

### Significance in the Musical:
1. **Turning Point**: In the context of "Sweet Charity," "Rhythm of Life" serves as a turning point where Charity begins to reflect on her own life and aspirations amidst the larger canvas of human experiences.

2. **Cultural Commentary**: The song also offers a commentary on the cultural and social dynamics of the 1960s, exploring themes of identity, spirituality, and community in a time of social change.

### Cultural Impact:
1. **Iconic Status**: "Rhythm of Life" has become an iconic song within musical theater, often performed in revivals and adapted in various cultural contexts.

2. **Message of Unity**: Its message of unity and celebration resonates across generations, making it a timeless anthem that continues to inspire and uplift audiences.

In summary, "Rhythm of Life" is a vibrant and multi-layered song that captures the essence of living fully and embracing the diverse rhythms that define human existence. Its blend of musical styles and profound lyrical content make it a standout piece within the musical "Sweet Charity" and in the broader canon of musical theater.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झ झ झोपडीत चारपाई (कवी श्री श्री श्री रा रा रा घासकडवी) - यासारखा काही प्रकार नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0