तुला दिसणारा पक्षी
फुटकळ
फार पूर्वीची गोष्ट आहे,
अवतीभवती जंगल तर होते.
विचारांनी वेढलेले, उंचच उंच..
कल्पनेने व्यापलेले, आकाशाला गवसणी घालणारे.
प्रेमाची एक गुहा होती तिथे.
कुणालाही सहजी दिसू न शकणारी, रम्य अश्या शृंगारवेलींनी लिप्त..
तराजूत दोन्ही पारड्यात समान ठेवता येईल, इतकी बुद्धी आणि शक्ती अशी डौलदार वृक्ष आजूबाजूला वाढलेली होती.
एक निराकार उन्हाचा कवडसा उजळत त्या गुहेच्या तोंडाशी आलेला होता, त्यात किल्मिषांचे रजःकण उजळून निघत होते.
थांग न सापडणारी स्वप्नांची दरी होती.
यथार्थचा झरा खळखळ वाहत होता.
त्या जोडीला डगमग डगमग करणारी मनाची एकाग्रता विहरत होती.
ज्ञानाच्या तार्यांचा पुंजका अदृश्यसा अवकाशात खिळून होता.
तेव्हा चारही दिशा घट्ट होतील, असा भास झाला आणि
तुला दिसणारा पक्षी मला दिसू लागला......