रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई तर्फे खुली काव्यवाचन स्पर्धा(स्वरचित किंवा इतरांची)
रोटरी क्लब ऑफ बाँबे पवईच्या पवई फेस्ट २५ या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात मराठी, हिंदी आणि इंग्रजी काव्यस्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. कविता सादरीकरण ऑन लाईन असेल. प्रत्येक भाषेच्या स्वतंत्र गटात स्वरचित आणि दुसऱ्या कोणाच्या कवितेच्या सादरीकरणासाठी वेगळे, तसेच १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवर असे वेगवेगळे वयोगट असतील. आपल्या कविता वाचनाचा विडियो यूट्यूब वर अपलोड करून त्याची लिंक रजिस्ट्रेशन सह ५ जानेवारी पर्यंत आमच्या कडे पाठवण्यात यावी. मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या उपक्रमात सहभाग करावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईच्या संचालिका सविता गोविलकर यांनी केले आहे अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा: फोन. – WhatsApp 77188 62969, ईमेल rotarypowai@yahoo.in.
पोस्ट बद्दल काही अजून माहिती हवी असेल तर मला मेल करा . savitag.govilkarg @gmail.com
.
१. (माझ्या कल्पनेप्रमाणे) प्रस्तुत वयोगट हा कवितेच्या कर्त्यास (किंवा, त्याहीपेक्षा, कवितेच्या लक्ष्य श्रोतृवर्गास) लागू व्हावा; कवितेच्या सादरकर्त्यास (वा अभिवाचकास) नव्हे. (चूभूद्याघ्या.)
२. तसेही आम्ही प्रसिद्धिपराङ्मुख असल्याकारणाने… असो. (परंतु, इतर कोणी ही कल्पना उचलून धरून प्रत्यक्षात आणल्यास बहार यावी.)
अवांतर: हे असं लक्षात ठेवून योग्य जागी डकवायला कसं जमतं? कमाल आहे.
तुम्हाला प्रस्तुत कविता लक्षात ठेवून, (तो अंक शोधून काढून) ती (कविता) स्कॅन करून, एक सविस्तर लेख लिहून त्यात (ती (स्कॅन केलेली) कविता) डकवायला जर जमते, तर, त्या तुलनेत, (तुम्ही अशी कविता स्कॅन करून डकविली होतीत, हे लक्षात ठेवून) त्या (स्कॅन केलेल्या) कवितेचा केवळ दुवा (तथा त्या लेखाचा निव्वळ संदर्भ) देणे हे सोपे असावे, नव्हे काय? मग ते मला का जमू नये? (इतकाही मला ‘हा’ समजलात काय?)
तसेही, एकदा का (प्रस्तुत स्पर्धेकरिता) ‘दुसऱ्यांच्या कविता चालतात’, म्हटल्यावर, ‘लहान माझी बाहुली’पासून ते ‘ट्विंकल, ट्विंकल, लिट्टिल स्टार’पर्यंत अनेक उमेदवार डोळ्यांसमोरून तरळून गेले होते. मात्र, प्रस्तुत कवितेने माझ्या मनःपटलावर सखोल छाप (मराठीत: डीप इंप्रेशन) पाडलेली असल्याकारणाने ती सुचविली, इतकेच. (आणि, एखाद्या गोष्टीने — जसे की, प्रस्तुत कवितेने (गैरसमज नसावा!) — एकदा का मनःपटलावर सखोल छाप पाडली, की तिला लक्षात ठेवणे सोपे — किंबहुना, तिला विसरणे कठीण — व्हावे, नव्हे काय?)
असो चालायचेच.
(अतिअवांतर)
रोटरी क्लब ऑफ बाँबे पवई
प्रस्तुत संस्थेच्या नावात अद्याप ‘बाँबे’ (‘मुंबई’ नव्हे!) असल्याचे पाहून आश्चर्य वाटले.
नाही, व्यक्तिशः मला त्याबद्दल कोणताही आक्षेप नाही. किंबहुना, ((तुलनेने) जुन्या पिढीतील असल्याकारणाने) मी स्वतः अनेकदा (निदान इंग्रजीत बोलताना तरी) ‘बाँबे’च म्हणतो; त्यात मला काहीही गैर, लाजिरवाणे, अथवा पाप केल्यासारखे वाटत नाही. (का वाटावे?)
मात्र, कसे आहे, की, मी महाराष्ट्रात (नि त्यातूनसुद्धा बृहन्मुंबईत) राहात नसल्याकारणाने, ‘बाँबे’ म्हटल्याबद्दल कोठलाही शिवसैनिक मला रस्त्यात गाठून बदडून काढेल, ही शक्यता तुलनेने नगण्य आहे. (आणि, मी जेथे राहातो, तेथपर्यंत केवळ मला बदडून काढण्याकरिता जाण्यायेण्याचा एखाद्या शिवसैनिकाचा खर्च (अधिक पासपोर्ट, व्हिसा, वगैरे आनुषंगिक खर्च) दिवंगत ठाकऱ्यांनी स्पॉन्सर केला असता (वा कोठलेही विद्यमान ठाकरे इतःपर स्पॉन्सर करतील), ही शक्यता शून्यवत् वाटते. (चूभूद्याघ्या.)) त्यामुळे, मी तुलनेने निर्धास्त आहे.
प्रस्तुत संस्थेच्या चालकांचे वा सदस्यांचे तसे नाही. आणि त्याचमुळे, त्यांचे धाडस वाखाणण्यासारखे वाटते.
(अर्थात, या ठाकऱ्यांपैकीच कोणाचीतरी मुले ‘बाँबे स्कॉटिश’ नामक शाळेत शिकली, की शिकतात, असे कायसेसे ऐकून आहे. (चालायचेच.) मात्र, रस्त्यात सामोऱ्या उभ्या ठाकलेल्या एखाद्या शिवसैनिकासमोर हे आर्ग्युमेंट कितपत टिकेल, याबद्दल साशंक आहे.)
——————————
(फॉर्दॅट्मॅटर, आमच्या पुण्याचे विद्यापीठसुद्धा परवापरवापर्यंत (इंग्रजीत, अधिकृतरीत्या, कागदोपत्री) ‘युनिव्हर्सिटी ऑफ पूना’ होते. ‘पूना’चे कागदोपत्री ‘(पी यू एन ई) पुणे’ होऊन य वर्षे लोटली, तरीही. त्याचे (थेट) ‘सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी’ अगदी अलीकडे झाले. (किंबहुना, मराठीव्यतिरिक्त इतर कोठल्याही भाषेत बोलताना माझ्याही तोंडात (लहानपणापासूनच्या सवयीने) ‘पूना’च येते; खरे तर (इतर भाषांतून) ‘पुणे’ म्हटलेले माझ्याच कानांना कसेतरी वाटू लागते. (आणि, ‘रशिया’ऐवजी मराठीत ‘रश्या’ लिहिलेले जे जबरदस्त खटकते, ते काहीश्या अशाच कारणामुळे. ‘रश्या’बद्दल याहूनही सबळ आक्षेप आहेत, परंतु तूर्तास तो आपला विषय नाही. असो.))) फरक इतकाच आहे, की पुण्यात जर का तुम्ही पुण्याला ‘पूना’ म्हणालात, तर तुम्हाला कोणीही रस्त्यात गाठून ठोकणार नाही; फार फार तर तुमची (तथाकथित) ‘चूक’ तत्काळ, जागच्या जागी ‘दुरुस्त’ करतील, इतकेच. (कारण, (पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे) शेवटी आम्ही भटेच; त्याला काय करणार?))
असो चालायचेच.
बोम्बे नावात असल्याचि प्रतिक्रिया
क्लब ३५ वर्शे जुना आहे.. ते विशेश नाम आहे. सर्व थिकानि सरकारि कचेर्यन्मध्ये तशि नोन्द अहे या धर्मादाय सन्स्थेचि. मि तेव्हा मेम्बर नव्हते, सन्स्थेचे अता नाव बदलने जिकिरिचे आहे. आनि माझे ते काम नाहि. हा वाद मि येथेच सम्पवु इच्चिते. स्पर्धेत भाग घ्या. प्लिज्
वर्गमित्राने कालच नोंदणी केली
वर्गमित्राने कालच नोंदणी केली आहे.