सध्या 'ऐसी अक्षरे' जे सॉफ्टवेअर वापरून चालत आहे, त्याचं अपग्रेड करण्याची गरज आहे. सध्या ते काम पडद्यामागे सुरू आहे; मात्र येत्या आठवड्यात कामासाठी संस्थळ काही काळ बंद ठेवावं लागेल. त्याची पूर्वसूचना किमान काही तास आधी दिली जाईल.
अपग्रेडनंतर व्यक्तिगत निरोप उपलब्ध होणार नाहीत. त्याचा बॅकप घ्यावा ही विनंती. जर सध्या व्यनिंचा बॅकप घ्यायला जमणार नसेल तर ३१ जानेवारी २०२५पर्यंत अदितीला इमेल करून बॅकप मागवता येईल. (इमेल - sanhita.joshi ॲट जीमेल)
अपग्रेडनंतर खरडफळा आणि खरडवही उपलब्ध होणार नाही. खरडफळ्याची पर्यायी सोय कशी करावी यावर विचार सुरू आहे.
अपग्रेडनंतर देवनागरीत टंकनसोय देण्याची सोय व्हायला वेळ लागू शकतो.
एवढा सगळा नन्नाचा पाढा वाचल्यानंतर, "अपग्रेड कशाला?" असा प्रश्न पडू शकतो. तर ते आमच्या हाताबाहेर आहे आणि संस्थळ सुरू ठेवायचं तर अपग्रेड करणं क्रमप्राप्त आहे.
तसदीबद्दल क्षमस्व.
संपर्क
ओके.
एक जुना फेसबुक ग्रूप मागे एकदा सुरू केला होता. aise rasik
Link
https://facebook.com/groups/713706602125526/
त्याचा काही संपर्कासाठी उपयोग होतो का पाहा. ऐसी बंद झाल्यास संपर्क एवढाच हेतू.
ख फ आणि व्यनि उपलब्ध होणार
ख फ आणि व्यनि उपलब्ध होणार नाहीत म्हणजे ते रिसेट होऊन या आधीच्या नोंदी नष्ट होतील आणि कोरी पाटी सुरू होईल? की ती सुविधाच नसेल ?
बाकीचे मरू द्यात…
…बोले तो, व्यक्तिगत निरोप, खरडवही, खरडफळा, वगैरे सुविधा नाहीत, ही फार पुढची गोष्ट झाली. परंतु, सध्या कोणकोण आलेले आहे, हेसुद्धा दिसू नये, म्हणजे काय म्हणावे!
हा अपग्रेड, की ही अधोगती?
UI
तर मस्त लागत आहे. हा UI टेंपरवारी आहे की पुन्हा पूर्वीचा UI असणार आहे.
प्रश्न
बाळाजी, पूर्वीचा UI म्हणजे थीम कशी दिसते ते, का स्क्रीनचा आकार का आणखी काही? विचारण्याचं कारण असं की काही बदल सुचवायचे असतील तर सुचवा. मुख्य प्रश्न ते जमणार का. जमणार असतील तर त्यावर विचार करता येईल.
नवीन अवतार
ओलीव्ह ग्रीन थीम आणि त्यासोबत असलेला स्क्रीनचा आकार हे combination चांगले आहे. निळा रंग आवडता असला तरी डिजिटल स्क्रीनवर डोळ्यांसाठी सुस्ह्य नाही. निळ्या थीम मधले लिखाण भिंगाने वाचावे एवढे छोटे आहे. झूम इन केल्यावर खूप स्क्रोल करावे लागते. माझे दोन पैसे.
निळा पांढरा रंगही छान वाटत
निळा पांढरा रंगही छान वाटत आहे.
दोनवेळा प्रतिसाद पडला.
दोनवेळा प्रतिसाद पडला.
तपशील
खफ आणि व्यनिची मॉड्युलं/सॉफ्टवेअर नवीन ड्रूपालमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे डेटा उपलब्ध असला तरी तो दाखवण्याची सोय उपलब्ध नाही. सध्या व्यनि आणि खफ सुरू केले आहेत.
'न'बा, सध्या कोण आलं आहे, हा ब्लॉक काही "आवराआवरी"त गायब झाला असणार. तो बहुतेक नव्या ड्रुपालमध्येही असेल.
भावेप्र सोमवारी रात्री/मंगळवारी पहाटे अपग्रेडचा एक प्रयोग करून बघण्याचा इरादा आहे. ते व्यवस्थित चाललं तर आत्ता आहे ते बदलून नवं सॉफ्टवेअर इनस्टॉल करता येईल. पण त्याची आधी पूर्वसूचना देईन. तेव्हा मात्र व्यनि आणि खफ बंद होतील. तो डेटा एक्सेल किंवा तत्सम फॉरमॅटमध्ये इमेल करता येईल.
.
कोण आलं आहे हे जाणून नबांना काय मिळतं?
एखाद्या प्रत्यक्ष पार्टीत कोण आलं आहे हे जाणून घेऊन आपण आयत्या वेळी सपाट पादत्राणे काढून ठेवून उंच टाचेची घालून जाऊ. किंवा अमुक एक व्यक्ती आली आहे आणि ती जाईपर्यंत बाहेरच्या टपरीवर विडी ओढत उभे राहू. किंवा मग अमुक एक व्यक्ती आली आहे आणि ती जायच्या आत पोहोचायचं आहे म्हणून आहे त्या कपड्यात पळत जाऊ. किंवा मग एखाद्या आलेल्या व्यक्तीने आपल्या बरोबर असलेल्या व्यक्तीला भेटू नये म्हणून बरोबरच्या व्यक्तीला विडी ऑफर करू.
पण अशा ऑनलाईन संकेतस्थळावर कोण आलं आहे हे जाणून घेऊन आपण काय करणार? विशेषतः जेव्हा त्यांचा सूर्यास्त आणि आपला सूर्योदय एकावेळी होत असतील अशा परिस्थितीत?
लोल!
सूर्यास्त आणि सूर्योदय एकाच वेळी म्हणजे आर्क्टिक प्रांतात निवास असेल का?
(अवांतर)
सूर्योदयावरून आठवले...
.
शैशवास जपणे.. वगैरे वगैरे. म्हणूनच तुम्हाला पिंकुची कविता इतकी आवडली.
शैशव
शैशव
तसं कुणाकुणाच्यात लहान मुल लपलेलं असतं . काही जण त्यास डांबून ठेवतात तर काही जण त्यास हात वर करू देतात शाळेत वर्गात करतो तसं. ते ओळखून त्यांचं शंकानिरसन करणाऱ्या शिक्षिका पुढे येतात.
प्रकाटाआ
प्रतिसाद काढून टाकला आहे.
(अतिअवांतर)
‘शैशवा’चा ‘शिशु’शी संबंध लक्षात आला असेलच.
वर्षभर नकळत करतो.
वर्षभर नकळत करतो.
नंतर सांगून करतो.
नंतर दम धरून करू शकतो.
शैशव संपल्यावर उगाचच दाबून ठेवतो.
!!! (वही किस्सा पुराना है)
उगाचच ‘लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया’ची आठवण येऊन गेली.
चालायचेच.
.
मला व्यक्तिश: काहीच फरक पडत नाही.
फार कशाला, संकेतस्थळ कायमचे बंद जरी पडले, आणि/किंवा सारे सदस्य (इन्क्लूडिंग मी, आणि, हो, तुम्हीसुद्धा!) एकसमयावच्छेदेकरून सोडून जरी गेले, तरीसुद्धा मला व्यक्तिश: त्याने काहीही फरक पडत नाही.
परंतु, कसे आहे, की या अशा प्रकारच्या संकेतस्थळांमध्ये बाकी काही नाही, तरी येथे सध्या कोण कोण आलेले आहे, हे दाखविण्याची एक मूलभूत सुविधा असतेच असते. तीसुद्धा नव्या आवृत्तीत जर नसेल, तर मग याला 'अपग्रेड' काय म्हणून म्हणायचे, इतकाच प्रश्न आहे.
बाकी चालू द्या.
Dhanyvad
Update च्या नावाखाली दर्जा पूर्ण नष्ट करण्याचा निर्णय रद्द करून परत. मूळ स्थिती मध्ये रुपड आणल्या बद्धल लाख लाख धन्यवाद
नाही...
अजून मुख्य संस्थळ अपडेट केलेलं नाहीच. अपडेट करण्यासाठी काही प्रयोग म्हणून काही काळ अगदी बेसिक गोष्टीच सुरू ठेवून मग काम करत होते. आता त्यासाठी थांबायची गरज नाही, म्हणून पुन्हा संस्थळ पूर्वस्थितीत आणलं आहे.
(एकदाचा) अपडेट होईल तेव्हाही खाचखळगे लागतील. सांभाळून घ्या तेवढ्यापुरतं.
नवीन ड्रूपल ?
नवीन ड्रूपल ?
The latest version of Drupal is Drupal 11.1.0, which was released on December 16, 2024.
Here are some other recent Drupal versions:
Drupal 11.0.9: Released on November 22, 2024
Drupal 10.3.10: Released on November 22, 2024
Drupal 10.2.12: Released on November 22, 2024
१)यातल्या 10.3 वरती जाणार का?
२)>> अपग्रेडनंतर खरडफळा आणि खरडवही उपलब्ध होणार नाही. खरडफळ्याची पर्यायी सोय कशी करावी यावर विचार सुरू आहे.>>
एखादा नवीन धागाच सुरू करून त्याचे रूप .....( अ)नवीन प्रतिसाद वरती आणि (ब) फक्त सभासदांनाच वापरता येईल अशी काही सोय असेल... करता येईल काय? म्हणजे प्रश्नच सुटला.
३) रंगसंगती बद्दल काही आग्रह नाही.
४)व्यनि सोय Drupal ने का काढून टाकली? या बाबत सभासदांनी तक्रार केली असावी Drupal कडे. आमचे इमेल द्यायचे नाहीत. ऐसीवर व्यनि जातो पण इमेल गुप्तच राहतात. मायबोली या संस्थळावर व्यनि केला की घेणाऱ्याने त्यास उत्तर दिले की एकमेकांना इमेल पत्ते कळतात. तर security च्या दृष्टीने व्यनि काढले असावे. शिवाय साईटचा भारही कमी झाला असावा.
काहींचं श्रेणी देण्याचं शेपूट
काहींचं श्रेणी देण्याचं शेपूट हरवलं ते पुन्हा उगवणार का?
ओह नो
आधी मला हे वाचून वाटलं की माझे व्यनि ईतके कमी आहेत की काही फरक पडणार नाही. पण जे काही मूठभर आहेत ते वाचले आणि दॅट हॅज चेन्ज्ड टू "ओह नो" !! मूठभरच आहेत पण माझ्यासाठी संग्रहणीय आहेत. स्क्रीनशॉटस कीती घेत बसू? एक्सपोर्ट करणं शक्य आहे का?
नवी विटी नवा दांडू.
नवी विटी नवा दांडू.
.
संस्थळाचा अपग्रेड प्रचंड गंडलेला आहे, एवढेच नम्रपणे नमूद करून खाली बसतो.