Skip to main content

विंडोजवर मराठीत टायपिंग कसे करावे?

मायक्रोसॉफ्टने मराठीत टायपिंग करण्यासाठी सुविधा दिली आहे. ती कशी सुरू करता येईल याविषयी इथे वाचता येईल -
Phonetic Marathi Keyboard

थोडक्यात, मायक्रोसॉफ्टने दिलेला मराठी लँग्वेज पॅक इन्स्टॉल करून त्यात मराठी फोनेटिक कीबोर्ड वापरता येतो. त्यात हिंदी आणि संस्कृतचा लँग्वेज पॅक इन्स्टॉल केला तर इनस्क्रिप्ट किंवा बोलनागरी कीबोर्डही वापरता येतात. सदर लिखाण बोलनागरी कीबोर्ड वापरून लिहिले आहे.

मिसळपाव Mon, 06/01/2025 - 22:11

या सूचना जुन्या आहेत. विंडोज-११ साठी या अद्ययावत सूचना.
- विंडोज की + आय (किंवा दुसर्‍या कुठल्या प्रकारे) सेटींग्ज ला जा.
- Time & Language > Language & Region > Language section ला जा आणि मग Add a Language वर क्लिक करा. मराठी शोधा आणि ईन्स्टॉल करा
- सिस्टिम ट्रे मधे ईंग्रजी / मराठी किबोर्डची अदलाबदल करायला पर्याय दिसतो

पण मी हे केलेलं नाही कारण चुकून तुम्ही मराठी किबोर्ड वापरत असताना लॉक झाला / क्रॅश झाला तर पासवर्डचा घोळ होउ शकतो. एकदाच झालंय पण असं काही तोंड भाजलंय की आता पाणी पण फुंकून पितो!!

हे सगळं मिपावरनं कॉपी/पेस्ट केलंय. होप ओंकारचं गमभन प्लग-ईन ईथे लवकरच उपलब्ध होईल. मराठीत टाईप करायला तो सर्वोत्तम पर्याय आहे. त्याला हे जरूर सांग.