"गुहेत राहणाऱ्या आदिमानवापासून ते आज पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राहात असलेल्या माणसांत सामान धागा कोणता? माणसाच्या माणूसपणाची कधीही न बदललेली ओळख कोणती?"
हा चर्चेचा विषय निवडला होता. पण तो "समरी" या बॉक्समध्ये टाकल्यावर दिसत नाही. एनीवे. चर्चा धागा नीट चालत नाही यावर चर्चा न करता मूळ चर्चेच्या विषयावर चर्चा व्हावी.
या दोन क्षमतांमुळे माणूस वेगळा ठरला. मला वाटतं बहुतेक द मिथ ऑफ सिसीफस का अजून अशाच कोणत्या तरी निबंधात उल्लेख आहे की स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती नसती, तर माणसाला कधी आत्महत्या करण्याइतकं दुःख झालं नसतं.
.

पण तो "समरी" या बॉक्समध्ये…
समरीमध्ये टाकलेला मजकूर जुन्या ऐसीवरही दिसत नसे. धाग्याचा मजकूर 'बॉडी'मध्ये टाकावा लागतो. (समरी उदा. लेख व्हॉट्सअॅपवर शेअर केला तर दिसायची.)
प्रयत्न…
शेपूट नसणारा, (मागच्या) दोन पायांवर उभे राहून चालणारा प्राणी?
(शिवाय, हाताच्या आंगठ्याची काही विशिष्ट रचना असल्याबद्दल कधीकाळी काही वाचले होते, परंतु ते नक्की काय, ते आता आठवत नाही. (चूभूद्याघ्या.))
(बादवे, गुहेत राहणारा आदिमानव हसत असे काय? नक्की ठाऊक नाही.)
स्वार्थी
स्वार्थीपणा हा एक नक्कीच कॉमन धागा आहे मनुष्याच्या आजवरच्या प्रवासात, आणि तो कायमच राहील ही शाश्वती पण आहे.
तरीसुद्धा…
स्वार्थीपणा हे खास माणसाचेच असे व्यवच्छेदक लक्षण आहे, असे म्हणता येईल काय? साशंक आहे.
स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती
या दोन क्षमतांमुळे माणूस वेगळा ठरला. मला वाटतं बहुतेक द मिथ ऑफ सिसीफस का अजून अशाच कोणत्या तरी निबंधात उल्लेख आहे की स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती नसती, तर माणसाला कधी आत्महत्या करण्याइतकं दुःख झालं नसतं.
माणूस हा कधीही माणसासारखा…
माणूस हा कधीही माणसासारखा वागत नसतो, हेच त्याच्या माणूसपणाचे वैशिष्ट्य आहे.
?
‘माणूस’ जे काही वागतो, त्याला(च) ‘माणसासारखे वागणे’ म्हणून संबोधणे हे (व्याख्येनेच) प्राप्त नाही काय?