१) चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.
म्हातारी भोपळ्यात बसली मुलीचा निरोप घेतला.
“पोरी ह्याचा ब्रेक आणि अॅक्सिलेटर कुठेय?”
“आई, हे गुगलचे लेटेस्ट मॉडेल आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते.”
“म्हणजे एआय ना?”
मुलीला स्वतःची शरम वाटली.
“”चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.” अस म्हटले कि गाडी पळायला लागते. ह्या गाडीला नॅचरल लँग्वेज इंटरफेस आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी पळवावी. बाय आणि टेक केअर. पोहोचल्यावर टिंकल दे.”
वाटेत वाघोबा दिसला. स्कूटरवर बसून म्हातारीची वाट पाहत होता. मुलीकडे जाऊन लठ्ठ मुठ्ठ होऊन येते मग मला खा म्हणाली होती. बघतो काय तर म्हातारी गुगल भोपळ्यातून येत होती.
“म्हातारे, थांब. कुठं पळतेस?”
“आता काय झालं?”
“म्हातारे, ये भोपला मुझे दे दो.”
म्हातारीने कावा ओळखला. तिने ऑर्डर दिली, “म्हातारी कोतारी कुछ भी नाही. चल रे भोपळ्या टुणुुक टुणुुक, भोपळ्या फास्ट फॉरवर्ड.”
वाघोबाने स्कूटरला किक मारली. पण काय उपयोग? किका मारता मारता म्हातारी दिसेनासी झाली.
सुसाट धावणाऱ्या भोपळ्यापुढे स्कूटरची काय कथा.
गंमत बघत असलेला कोल्हा म्हणाला, “वाघोबा, तू केव्हापासून भोपळ्याची भाजी खायला लागलास?”
“मूर्खा, ती भोपळागाडी पेट्रोलशिवाय आणि चार्जिंगशिवाय धावते.”
2)पुनर्जन्म.
“चला चला. वेळ झाली.”
किती छान झोप लागली होती. लोक झोपू पण देत नाहीत.
अंधाऱ्या भोगद्यातून प्रवास. ए धक्का देऊ नकोस. कुणीतरी ढुंगणावर चापट्या मारत होता. डोळे उघडले तर लख्ख प्रकाश! एलइडी लॅंप हं.
मागच्या खेपेला कंदिल होता. गावातली सुईणबाई होती. आता पांढरा शुभ्र पोषाख केलेली नर्स बाई. प्रगति आहे.
अरे बापरे! म्हणजे पुन्हा सगळे नशिबी आले. गमभन, पाढे, व्हफा, मॅट्रिक, नोकरी, लग्न, मुलेबाळे, हगेरी मुतेरी, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्नं, त्यांची मुलेबाळे, त्यांची लग्नं, त्यांची मुलेबाळे, त्यांची लग्नं, त्यांची...
ओ, शिट! रडू आवरेना. .
“सुलोचनाबाई, अभिनंदन. मुलगा...”
“काय पण वेडे विद्रूप टकलू माकड.”
“अगं अस का बोलतेस...”
“अहो असच बोलायचं असतं. नाहीतर आपलीच दृष्ट .. देवाने पदरात टाकलेय...”
“पहा, गुलाम हसतोय कसा.”
हसू नाही तर काय करू, माते?
म्हणे देवाने पदरात टाकलेय! मजा तुम्ही करा आणि फाडा देवाच्या नावाने पावत्या. एवढे घोडे झाले तरी ह्यांना अजून माहित नाही मुलं कशी होतात. काय तर म्हणे देव देतो!
"नर्सबाई, नाष्ट्याला काय आहे?"
"पोहे! वरून काय टाकू? पातळ चटणी का शाम्पल का आपलंं सांबार?"
"हायला, पुन्हा पुण्यालाच आलो वाटतय!"
नवा वेपार
एकदा अमेरिकेचा एक अध्यक्ष नवा वेपार खेळायला बसला. पहिल्याच राऊंड मध्ये त्याने कॅनडा, ग्रीनलँड आणि पनामा विकत घेतले. नंतर 'भाग्य?' या घरांत गेला आणि बेंकला एक ट्रिलियन डॉलर भरावे लागले. सेकंड राऊंड मध्ये त्याने झवेरीबाजार घेतले, वीज कंपनी आणि नळची कंपनी घेतली. त्यानंतर नेमका जेलमध्ये गेला. तिथून सोडवायला पैसे न उरल्यामुळे, तीन डाव बसुन रहावे लागले. तोपर्यंत बाकी भिडुंनी खेळायचेच बंद केले. मग काय! मुद्यांवरुन गुद्यांवर आले.
.
अद्याप विकत घेतलेले नाहीये. (तो तोंडाने ढीग बडबडेल; त्याला विकायला बसलेय कोण?)
हे मात्र दुर्दैवाने होऊ शकलेले नाहीये. (ज्या दिवशी होऊ शकेल, तो सुदिन.) काय आहे, की अमेरिकेची न्यायव्यवस्था बोले तो the best justice system in the entire world that money can buy होऊन बसलीय. त्यात पुन्हा याची पार वरपर्यंत — अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत — सेटिंग फिक्स आहे. आणि रिपब्लिकन पक्षाचे तमाम लोकनियुक्त प्रतिनिधी सर्व लाजलज्जा, स्वाभिमान, self-respect वगैरे गैरसोयिस्कर बाबी पूर्णपणे सोडून देऊन याच्या खिशात जाऊन बसलेत. आधी म्हटल्याप्रमाणे, सुप्रीम कोर्टाच्या नवापैकी सहा (रिपब्लिकन-अध्यक्ष-नियुक्त) न्यायमूर्ती याच्या खिशात अगोदरपासून आहेतच. त्यामुळे, सगळा आनंदीआनंद आहे.
(किंबहुना, ‘जेलच्या बाहेर राहणे’ हीच ट्रंपची अध्यक्षीय निवडणुका लढविण्यामागची आदिम प्रेरणा होती, असा एक लोकप्रवाद आहे. चालायचेच.)
(आणि लोक मोदींना शिव्या घालतात! आमच्या अमेरिकन राज्यव्यवस्थेची आजची जी अवस्था आहे, तिच्या तुलनेत मोदी बच्चा आहे. (तुलनात्मकच जर बोलायचे झाले, तर मी तर म्हणेन मोदीजी साधू आहेत, संत आहेत!) अजून बरीच मोठी मजल गाठायची आहे मोदीजींना! त्यांनी आपले ध्येय उच्च ठेवले पाहिजे! तर ते एक असो.)
किंबहुना, मला तर कधीकधी वाटते की ट्रंप बाहुला आहे — त्याचे कर्तेकरविते पुरुष वेगळेच आहेत. सखोल खिसे आणि vested interests असलेले. असो, कायकाय होत जाते, ते पाहात जायचे, झाले.
मात्र, अनेक (भारतस्थ) भारतीयांमध्ये ट्रंपबद्दलचे जे एक अकारण (तथा बिनडोक) adoration आजकाल दिसून येऊ लागले आहे, त्याचे आश्चर्य तथा गंमत वाटते. असो चालायचेच.
पोह्यांवर खोवलेला नारळ…
पोह्यांवर खोवलेला नारळ ह्याव्यतिरिक्त इतर काहीही टाकणे आणि ते खाणे हे महापाप आहे झालं! मरोत ते इंदुरी आणि नागपुरी पोहे!
…
हे वाचून, हे आजच्या अमेरिकेवरील रूपक आहे की काय, अशी शंका आली होती. परंतु,
नाही! हे त्याहूनही भयंकर आहे!