कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी
गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गौ आधारित अर्थव्यवस्था होती. आपल्या संस्कृतीत गौ दान करण्याची परंपरा होती. ऑपरेशन फ्लड काळात लाखो शेतकर्यांना सरकारने गायी प्रदान केल्या. सरकारचा मुख्य उद्देश्य देशात गायीच्या दूधाचे उत्पादन वाढविणे आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे होता. आज ही अनेक राज्यांत गाय पाळण्यासाठी सरकार अनुदान देते. गौ सेवा केल्याने शेतकर्यांचे जीवनमान सुधारले. दूध आयात कमी झाला. आज आपण दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात ही करतो. देशात १९ कोटी गायी आहेत त्यात 5 कोटी विदेशी आणि संकर गायी आहेत. त्यात 13 कोटी गायी दूध देणार्या आहेत. दुधाचे उत्पादन 2014-15 मध्ये 146.3 एमटी होते जे वाढून 23-24 मध्ये 239.2 एमटी झाले. दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात 2014 मध्ये 141.39 मिलियन युएस डॉलर होता तो 23-24 मध्ये वाढून 272.64 मिलियन डॉलर झाला. देशात अमूल, मदर डेअरी, नंदिनी सारखे मोठे ब्रॅंड तैयार झाले. कोट्यवधी शेतकर्यांना त्याच्या लाभ झाला. असो
आजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे. आज ही आपण यज्ञ हवन आणि धार्मिक समारंभात आपण गायीच्या गोवार्यांच्या उपयोग करतो. पूर्वी आणि आज ही गावांत घर शेणाने सावरतात. पावसाळ्यानंतर घराच्या भिंतींचा रखरखाव करण्यासाठी ही शेणाचा उपयोग होतो. गायीच्या शेणापासून, उदबत्ती, धूप, संभ्राणी कप, हवन कप, दिवे इत्यादि पूजा सामग्री बनतात. आता तर भिंती रंगविण्याचे पेंट ही शेणा पासून बनू लागले आहेत.
शंभर वर्षांपूर्वी आणि आज ही भारतात ग्रामीण भागात आणि जगात अनेक भागांत घरांच्या निर्मिती साठी माती आणि शेणाचा वापर होतो. काही वर्षांपूर्वी अशोक नगर जवळ एका मराठी जमींदाराच्या शेताला भेट दिली होती. बाहेर भयंकर गरमी होती पण शेतात असलेल्या मातीच्या (माती आणि बांबू वापरुन पूर्वी घरे बनत होती) आणि वरती मातीची कौलारू छत) घरात वातावरण थंड होते. मातीच्या घरांच्या निर्मिती आणि रखरखावचा खर्च अत्यंत कमी असतो. या शिवाय भूकंप इत्यादि आल्या तरी तुमचे प्राण वाचण्याची शाश्वती. आज गायीच्या शेणापासून वीट,टाईल्स बनतात. शेणापासून बनलेल्या वैदिक प्लास्टरचा आणि पेंटचा उपयोग केला तर घराचे तापमान बाहेरपेक्षा आठ ते दहा डिग्री कमी राहते. घराच्या निर्मितीचा खर्च ही कमी येतो. याशिवाय ज्याच्या कडे गाय आहे. तो गोबर गॅसचा वापर करू शकतो आणि खत तर बाई प्रॉडक्ट म्हणून तैयार होणारच. घरासाठी शेणाचा वापर पर्यावरणाला पोशाक ही आहे आणि खर्च वाचविणारा ही आहे.
आज अधिकान्श शेतकरी जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा जास्त वापर करतात. सरकारी ही रासायनिक खतांवर भारी भरकम अनुदान देते. पण जेवढा शेतकर्यांचा खर्च वाढत जातो तेवढे उत्पादन मिळत नाही. या शिवाय कितीही रासायनिक शेती केली तरी दर दोन किंवा तीन वर्षानी प्रति हेक्टर 12 ते 15 टन शेण खत विकत घेऊन शेतात टाकावे लागते. किमान तीस ते 50 हजार खर्च करावा लागतो.
देसी गायीच्या गौ मूत्रात असंख्य सक्रिय संयुगे असतात. मुख्यत: नाइट्रोजन, युरिया आणि खनिज इत्यादि ज्यांचा वापर खत आणि कीटनाशक बनविण्यात वापर होतो. गौ मूत्रात तांबे, लोह आणि जास्त सारखी खनिजे सापडतात जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. गायीच्या शेणात ही असंख्य संयुगे असतात. नायट्रोजन, फास्फोरस, पोटाशीयम असतात. असंख्य सूक्ष्मजीव असतात जे मातीच्या आरोग्यासाठी आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. शेतीत गौ मूत्र आणि शेणाच्या वापराने शेत जमीन सुपीक आणि समृद्ध होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते. एखाद वर्षी पाऊस कमी झाला तरी शेती होऊ शकते. पण यांच्या जास्त वापराने जमिनीचा पोत बिघडतो. कालांतरात जमीन नापीक होते. जमिनीतील पानी ही प्रदूषित होते. कृषि वैज्ञानिकांच्या मते विशेषकरून रासायनिक खतांचा वापर कमी झाला नाही तर भविष्यात जमिनीतील पानी पिण्याचे सोडा ओंघोळीच्या लायकीचे राहणार नाही. आज रासायनिक खतांचा आणि किट नाशकांचा परिणाम शेतकर्यांना भोगावा लागतो आहे. एक तर शेतीचा खर्च वाढला दूसरा लाखो शेतकरी कॅन्सर ग्रस्त होतात. पंजाबातून बिकानेरला जाणार्या गाडीचे नावच कॅन्सर ट्रेन पडले आहे. रासायनिक खत आणि किटनाशक वापरुन पिकावलेले अन्न ही विषाक्त असते. अश्या अन्नाचे सेवन करून कोट्यवधी लोक दरवर्षी रोगग्रस्त होतात. हजारो कोटी उपचारावर खर्च होतात. आज हजारो शेतकरी पुन्हा गोमय आधारित शेतीकडे वळत आहे किंवा स्वत:च्या वापरासाठी उपयोग करत आहे.
आयुर्वेदात रूग्णांच्या उपचारासाठी पंचगव्याचा वापर होतो. गौ मूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो. आज मोठ्या प्रमाणात गौ मूत्रावर संशोधन सुरू आहे. फिनायाल एवजी घरात गोनायलने (डिस्टील गो मूत्र आणि पाणी, कडू लिंब, निलगिरी, वज आणि पाईन तेल पासून) फरशी पुसली तर किटाणू आणि जिवाणू पासून सुरक्षा ही मिळते आणि अपायकरक ही नसते. आज हजारो गोशाला गोनायल, आंघोळीचे साबण आणि गो अर्क बनवितात. एका स्वदेशी कंपनी ने 100 कोटीहून जास्त रुपयांचे गो अर्क आणि गोनायल गेल्या वर्षी विकले. शेतकर्यांना ही गोमूत्र विकून एका लीटरचे पाच ते दहा रुपये सहज मिळतात. गेल्यावर्षी गोमय निर्मित वस्तूंचा 400 कोटींचा निर्यात आपण केला.
जर गोपालक आणि शेतकर्याने गोमयचा आर्थिक दृष्टीकोणातून उपयोग केला तर गौ मूत्र आणि शेण यातून विभिन्न जीवनावश्यक उपयोगी पदार्थांची निर्मिती करून गायीच्या दुधापेक्षा जास्त कमाई करू शकतो. शेतकरी एक गाय पाळून किमान एक हेक्टर शेतीत गौ मूत्र आधारित किटनाशकांचा आणि शेण आधारित खतांचा उपयोग करून खर्च वाचवू शकतो. जास्त उत्पन्न घेऊ शकतो. जमिनीची सुपीकता आणि पाणी धरण करण्याची क्षमता वाढवू शकतो. जास्त नफा मिळवू शकतो.
गायीच्या गौ मूत्र आणि शेणाचे आर्थिक महत्व आपल्या ऋषींना माहीत होते म्हणून ते म्हणाले "गोमय वसते लक्ष्मी"
गाय माणूस स्वार्थासाठी पाळतो…
गाय माणूस स्वार्थासाठी पाळतो. गायीचे आर्थिक महात्वा प्रकाश टाकला आहे. त्यात चुकीचे काय. पक्ष आणि विपक्ष प्रतिसाद देण्याएवजी मी लेख लिहू नये असे तुम्हाला अड्मिनला का म्हणून सुचवायचे आहे. बाकी जे गायीची पूजा करतात. प्रधान मंत्री आवासात ही गाय ठेवतात. त्याच माणसाने दहा वर्षांत भारतीय सैन्याला शक्तीशाली केले आहे.
?
बाकी जे गायीची पूजा करतात. प्रधान मंत्री आवासात ही गाय ठेवतात. त्याच माणसाने दहा वर्षांत भारतीय सैन्याला शक्तीशाली केले आहे.
या दोन वाक्यांतला परस्परसंबंध/कार्यकारणभाव समजला नाही.
(शिवाय, दहा वर्षांपूर्वी / ‘या माणसा’ने करण्यापूर्वी भारतीय सैन्य शक्तिशाली नव्हते, असे एक गर्भित गृहीतक यातून डोकावते आहे, त्याकडे तूर्तास दुर्लक्ष करू.)
…
पक्ष आणि विपक्ष प्रतिसाद देण्याएवजी मी लेख लिहू नये असे तुम्हाला अड्मिनला का म्हणून सुचवायचे आहे.
पाकिस्तानी यूट्यूबरांच्या चॅनेलांवर भारतात बंदी काय म्हणून आहे? तसेच आहे काहीसे हे.
तिथेदेखील ‘पक्ष आणि विपक्ष’ प्रतिसाद का देऊ दिले जाऊ नयेत?
(टीप: पाकिस्तानी यूट्यूबरांच्या चॅनेलांवर भारतात बंदी (विशेषेकरून युद्धपरिस्थितीत) आणू नये, अशा मताचा मी नाही. तसेच, भारतीय सरकारने या संदर्भात तूर्तास उचललेल्या प्रस्तुत पावलाच्या विरोधातही मी नाही. पाकिस्तानी चॅनेलांवरून प्रसारित होणाऱ्या अपप्रचारास तथा निखालस असत्यास योग्य ती चाळणी लावून त्याकडे केवळ विनोद म्हणून पाहण्याची विवेकबुद्धी बहुतांश भारतीयांच्या ठायी असावी, अशी माझी वैयक्तिक श्रद्धा, धारणा, तथा आशा असली, तरीही. (उलटपक्षी, (कदाचित सरकारी ‘दूरदर्शन’ आणि अधिकृत सरकारी सूत्रे वगळता) अनेक भारतीय चॅनेलांनीही याहून फारसे वेगळे असे काही केले नाही, हेही जाता जाता खेदाने नमूद करावेसे वाटते. असो; हे फारच अवांतर झाले.)
काही केलं तरी गाय म्हैस ही आपल्या स्वार्थासाठीच
आमचे सेंद्रिय शितकरी मित्र शिरीष पवार यांच्या मते: शेतकरी श्रम काढून घेण्यासाठी, दूध, शेण यासाठीच गुरे पाळतो. दूध गाईच्या वासराचे. ते आपण चोरायचे? एवढीच दुधाची आस असेल, तर ज्याने त्याने आपआपल्या मादीचे दूध प्यावे. पुढे बहुतेक शेतकर्यांचा दुधाचा धंदा आतबट्ट्याचा होतो आणि शेतकर्याने गाय पाळलीय की गाईने शेतकरी, हेच समजत नाही. दुसरे म्हणजे दूध माणसाला आवश्यक आहे हेच मुळी अनेक लोकाना मान्य नाही. शिरीष पवार यांच्याविषयी पूर्ण लेख
गायी च दूध तिच्या पिल्ला साठी
आज काल काही विचितत्र लोक अत्यंत तर्क हीन लिहीत असतात. मी एकटाच कसा शहाणं आणि बाकी सर्व वेडे अशी एक विचित्र भावना असलेले वेडपट लोक च असतात असे मला तरी वाटत आणि बहुसंख्य लोकांपेक्ष वेगळा विचित्र विचार करण्यात नास्तिक आणि पुरोगामी सर्वात पूढे असतात.
हे शिरीष पवार नक्की नास्तिक किंवा पुरोगामी च असणार.
1} हत्ती इतका मोठा सस्तन प्राणी आहे पण दूध 3 ते 4 ltr च देतो.
त्ता मध्ये त्याच्या पिलाचे पोट भरते.
मग गाय, म्हैस, शेळी जास्त दूध का देतात?
त्यांच्या पिलाना इतक्या दुधाची बिलकुल गरज नसते.
हे वरील सर्व पाळीव सस्तान प्राणी जास्त दूध देण्यासाठी च उत्क्रांत झालेले आहेत.
त्या मुळे त्यांच्या बाळाचे दूध माणूस हिसकावून घेतो हा विचार च पूर्ण चूक आहे.
त्यांच्या दुधाच्या बदल्यात मानव त्यांना सुरक्षा, अन्न पाण्याची हमी देतो.
त्या मुळे च ते तसें उत्क्रांत झालेले आहेत.
आंब्या चे झाड किंवा कोणतेही फळ झाड इतकी फळ का निर्माण करते त्याची प्रजाती टिकून राहण्यासाठी आठ दहा फळ खूप झाली पण हजारो फळ झाडांना येतात.
काही तरी निसर्ग चक्र आहे ना..
सेंद्रिय शेती म्हणजे जमीन न नांगरने, तण नाही काढणे, रासायनिक खते न वापरणे, कीटक नाशक न वापरणे इतकेच असते का?
सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती म्हणजे कोणत्याच बिजाची. लागवड न करणे आपोआप झाड उगवली पाहिजेत तेव्हाच त्याला सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती म्हणता येईल.
पण पहिल्या स्टेप सोडायच्या, बी कृत्रिम रित्या आपल्याला हाव असलेल्या झाडाच्या पेरयाच्या आणि बोंब ठोकायची आम्ही सेंद्रिय शेती करत आहोत म्हणून.
मानव जी जी फळ झाडे, तेलबिया कड धान्य, ह्यांची लागवड करतो ती सर्व झाडे निसर्ग पासुन तुटलेली आहेत.
रोगाला जास्त बळी पडतात, स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत.
स्पर्धेत असणाऱ्या तना च प्रतिकार करू शकत नाहीत.
म्हणून खुरपाणी, कीटक नाशक, खते ही वरून द्यावी लागतात.
त्यांना ऐत खाऊ माणसाने च बनवले आहे.
हे नाकारले तर darwin विरोधी आहात तुम्ही असे समजेन.
मते नाही पटली तरी...
हा धागा पवार किंवा पुरोगामी यांच्यांवर टीका करण्यासाठी नाही, नसावा असे वाटते.
बाकी गाय, म्हैस, शेळी इ. प्राणी 'जास्त' दूध देतात हे सिध्द करणारा काही संदर्भ असेल तर कृपया द्यावा. जास्त म्हणजे किती? कोणी ठरवले? अन्यथा ते तुमचे कसलाही आधार नसलेले मत होय.
तसेच माणसाचा प्राण्यांच्या दुधावर किंवा इतर कोणत्याही प्राणीज पदार्थांवर नैसर्गिक अधिकार का असावा? याचे स्पष्टीकरण काय? आपण सगळेच ते करतो (व्हेगन लोक सोडून) हे मान्य पण म्हणून ते बरोबर असे नव्हे. नैतिक दृष्ट्या तर मुळीच समर्थनीय वाटत नाही.
बाकी काही गोष्टींचा संदर्भ लागत नाही. उदा. डार्विन बद्दल आपण काय म्हणत आहात?
काय दुवे द्यायचे
रिअल स्थिती तुम्हाला दिसत नाही का जे पाळीव सस्तान प्राणी आहेत.
गाई, म्हैस, शेळ्या इत्यादी हेच प्राणी जास्त दूध देतात.
जंगली प्राणी..
वाघ, हत्ती, लांडगा, कोल्हा जास्त दूध देत नाहीत.
गुगल वर जंगली प्राणी किती दूध देतात आणि पाळीव प्राणी किती दुध देतात ह्याची माहिती आहे
हे नागडं सत्य आहे ते तुम्हाला माहित नसेल तर अभ्यास करत जा.
पाळीव सस्तान प्राणी च जास्त दूध देतात.
सहजीवन म्हणजे काय हे तुमच्या शाळेत नव्हते का?
त्या पवार चे सेंद्रिय शेती पासुन
पाळीव प्राण्यांच दूध त्यांच्या बाळासाठी असते हे सर्व विचार एकदम चुकीचे आहेत तो पवार agenda चालवत आहे आणि तुम्ही त्या agenda च शिकार आहात
तुम्हाला पटलं नाही की अजेंडा
तुम्हाला पटलं नाही की अजेंडा असं नसतं. पवार यांचा हा अजेंडा राबवण्यामागे काय फायदा आहे हेही सांगा? पण तो मुद्दाच नाही.
प्राणी माणसाच्या उपयोगासाठी उत्क्रांत झालेले नाहीत. पण हे तुम्ही समजून घेत नाही आहात किंवा तुम्हाला समजत नाही. त्यामुळे मी थांबतो.
न बा यांनी दिलेल्या प्रतिसादाचा हा दुवा पहा: https://aisiakshare.com/index.php/comment/207353#comment-207353
(अवांतर निरीक्षण)
“'न'वी बाजू हे सुबोध खरे यांचे डुआयडी आहेत” असा आरोप 'न'वी बाजूंवर (किंवा, उलटपक्षी, “सुबोध खरे हे 'न'वी बाजू यांचे डुआयडी आहेत” असा आरोप सुबोध खऱ्यांवर — It works both ways!) होणे कदापि शक्य नाही.
(“कुठे त्या राजेश१८८च्या नादी लागता!” असा सल्ला (तुम्हाला वा अन्य कोणाला, एकदा वा वारंवार) 'न'वी बाजूंकडून मिळणे कदापि शक्य नाही.)
(अतिअवांतर: हा आडून सल्ला देण्याचा प्रयत्न नव्हे. केवळ, जो फरक प्रकर्षाने जाणवला, तो मांडला, इतकेच.)
बाकी (तुमचे दोघांचेही) चालू द्या.
सगळी शेणे सारखीच
लेखात दिलेली खनिजं आणि अमोनिया वगैरे कुणाच्याही शेणात सापडतात. किंबहुना माणूस स्वतःला गाईपेक्षा किती महान समजतो याचा प्रत्यय "सोनखत" या शब्दांतून येतो. जे जे काही गाय करू शकते त्यापेक्षा अधिक म्हैस करू शकते. म्हैस इज लाइक गाय ऑन स्टिरॉइड्स. तरीही म्हैस उपेक्षित आहे याबद्दल मला कायमच वाईट वाटत आले आहे.
खुबसुरती बडी चीज है भारतीय गायी सुंदर असतात.
भारतीय वंशाच्या गायी या सहसा सुंदर असतात.
म्हैस ही काहीही असो
सुंदर नसते.
if you kill a cockroach you are a hero, if you kill a butterfly, you are evil. morals have aesthetic criteria.
शिवाय कवी ग्रेस यांनी दाखवून दिलेले आहे की गायीचे डोळे व्याकुळ असतात.
गा आ ईचा हंबरडा आपण लहानपणा पासून ऐकतोय.
शिवाय गाय अहिंसक असते. समजूतदारपणा तिच्या अंगाअंगात मुरलेला असतो.(तसे म्हैस ही matured प्राणी आहे.)
बाकी विवेकराव बाकीच्याच कौतुक सोडा
तुम्ही त्या प्रोफेसर ताई सारखेच निघाले
दुसऱ्यांचे वर्ग रंगविले
तुमच्या घराच्या भिंती चे काय ?
असावा सुंदर शेणाचा बंगला
गोवारी वर उद लोभाणं कापूर जाळून धूर केला आणि खोलीत फिरवला की मस्त मजा येते.
एकदम झकास धून लागते.
+
उलट म्हशीत एक स्पंक/chutzpah असतो.
म्हशीच्या या गुणधर्मावरच तर आम्ही फिदा आहोत!
म्हशीच्या या गुणधर्मामुळेच तर तिचे अगोदरचेच अंगभूत सौंदर्य अधिकच खुलून दिसते. काय ती मारकी नजर… आहाहा!
म्हशीचा blackboard करून शाळा घेता येते.
एकीकडे, साक्षरतामोहिमेकरिता म्हशीची ही उपयुक्तता वाखाणण्याजोगी आहेच. उलटपक्षी (नि एकसमयावच्छेदेकरून), देशाच्या काही भाषिक गटांत काळे अक्षर हे म्हशीसमान (गणले जात) असल्याचेही ऐकलेले आहे. हे गौडबंगाल काही उलगडत नाही. (म्हणजे, या गोष्टी परस्परविरोधी असल्याबद्दल आमची धारणा होती. अर्थात, आमचीच धारणा म्हटल्यावर, ती चुकीची असू शकेलच, म्हणा! चालायचेच.)
हरयाणाचे (नसते) गोडवे…
हरियाणात एक म्हण आहे। मुलाला पैलवान बनवायाचे असेल तर म्हशीचे दूध पाजा। बुद्धिमान बनवायाचे असेल तर गायीचे।
असे असताना, (अधिकतर) गायीचे दूध पिणाऱ्या हरयाणातले लोक जास्त करून पैलवानडोक्याचे असतात, तर उलटपक्षी, (अधिकतर) म्हशीचे दूध पिणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांचे डोके (तुलनेने) ठिकाणावर असते, ते कसे काय, हे गौडबंगाल काही केल्या उलगडत नाही.
आणि, तुमच्या हरयाणाचे कौतुक आम्हाला सांगू नका. कॉलेजात असताना एका हरयाणवी मित्राशी झालेल्या चर्चेत, महाराष्ट्रात ज्वारीची भाकरी करून खातात, या गोष्टीचे त्याला प्रचंड आश्चर्य वाटले होते, असे आठवते. त्यांच्यात म्हणे ज्वारी ही फक्त जनावरांना खाऊ घालतात, नि केवळ त्याच लायकीचे पीक समजतात. अर्थात, हरयाणव्यांना ज्वारीची चव ती काय, हे ओघानेच आले, परंतु, याच कारणास्तव, हरयाणव्यांकडून नसते शहाणपण शिकण्याची आम्हांस यत्किंचितही आवश्यकता अथवा इच्छा नाही. असो चालायचेच.
बाकी काहीही असो, पण…
म्हशीच्या सौंदर्याच्या संदर्भातील आमचा मतभेद वर अन्य प्रतिसादात नोंदविलेला आहेच. मात्र, काहीही झाले, तरी गायीची जागा म्हैस सदैव तथा सर्वथा घेऊ शकेलच, असे नाही, या आपल्या (गर्भित?) मुद्द्याशी (नाइलाजाने का होईना, परंतु) सहमत व्हावे लागते.
उदाहरणादाखल, प्रस्तुत लेखाच्या शीर्षकातील ‘कामधेनु’ हाच शब्द घ्या. परंपरेने का होईना, परंतु, काय वाटेल ते मागा, ते प्राप्त करून देणारी (गायरूपी) देवता, अशी एक (काहीशी मंगलमय तथा आल्हाददायक) कल्पना उभी राहते.
आता, त्याऐवजी, ‘काममहिषी’ असा शब्द मोठ्याने उच्चारून पाहा. काही भलभलती चित्रे नाही डोळ्यांसमोर उभी राहात?
(असो चालायचेच.)
यमाचा रेडा विसरूनच गेलो…
यमाचा रेडा विसरूनच गेलो. विश्वामित्राने बनवलेल्या म्हैस (आणि रेडा) वाहनाला कुणी देव घेत नसतील आणि यमाने तो उचलला असेल. बिग बँगनंतरच एकेक गोष्टी झाल्या ( singularity पूर्वी देवही नसावेत) .( पौराणिक कथा आणि शास्त्राची/ विज्ञानाची सांगड घालायची तर) चांगली वाहने इतरांनी पाळवल्यावर यमाला रेडाच मिळाला असेल काय?
बाकी नारळीकरांनी स्टेडी स्टेट थिअरी मानली तर म्हैस आणि रेडा अनादि असेल.
तर लेखाचा विषय धरून गायीचं शेण आणि म्हशीचं शेण वेगवेगळ्या परीक्षा गटावर वापरून काही अनुमान काढणारं संशोधन झालेच पाहिजे. किती दिवस गायीच्या शेणाचे गोडवे ( किंवा काय जी चव असेल ती) ऐकायचे ? हां, मोरारजीभाई यांनी काही प्रयोग स्वमुत्रावर केले पण गोमुत्रावर केले होते का ऐकिवात नाही. हत्तीसुद्धा मान्यवर प्राणी( ऐरावत आहे) होता त्याच्या शेणावरही संशोधन व्हायला हवे.
महिषा असे नाव ठेवण्याची मनिषा बाळगणारा
म्हशीच्या सौंदर्याने प्रेरित होऊन आपल्या मुलीचे नाव महिषा ठेवणारा बाप किंवा आपल्या प्रेयसीला प्रेमावेगात "तु म्हशी सारखी सुंदर दिसतेस ! तुला महिषा नाव किती शोभून दिसतं! " अस म्हणणारा प्रियकर माझ्या अल्पानुभवात अजून तरी आलेला नाही. म्हणजे असे रसिक जगत नसतीलच असा काही माझा दावा नाही. मी आर्य असल्याने कदाचित अनार्य महिषासुर माझ्या भावजीवनात नेणिवेत फिट झाला नसावा.पण आज महिषासुर नाव हे मला विचार करायला भाग पडत आहे.
तुमच्या पाली विषयक प्रेमाने सुद्धा माझ्या जाणिवेच्या कक्षा रुंदा वल्यात आज मी असा प्रियकर कल्पु शकतो की जो म्हणतोय "तु अशीच जवळी रहा तू अशीच चिपकून रहा " आपला पाल्य या शब्दात असलेल वात्सल्य मला चिपकू लागलंय. पालक हा शब्द आतापर्यंत एक रटाळ भाजीचं माझ्या डोळ्यासमोर आणत असे आज पालक शिवाय नगरपालिका हा सुद्धा शब्द एका वेगळ्या प्रकाशात न्हाऊन निघालय.
माणसांच्या कोत्या कविता उदा घर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती या तील तुच्छतावाद जो बहुधा पाली च्या द्वेषा पासून प्रेरित आहे अन्यथा भिंती कडे इतक्या तुच्छतेने पालप्रेमी बघू शकत नाही. पाली भाषेचा नव्याने अभ्यास करावासा वाटतोय.
काही अशी या सर्वांचे मूळ र्आर्य अनार्य संघर्षाचं आहे अन्यथा महिषासुर आणि पाली भाषा अशा नष्ट झाल्या नसत्या.
राहता राहिले गो प्रेम क्रूर भांडवलवादी विचारसरणी human centric मंडळी गायीचे फॅट मोजता ते त्यांच्या दृष्टीने योग्यच आहे. बैल का चांगला तर म्हणे आम्हास शेतीला कामाचा आहे वगैरे आणि डास का वाईट तर म्हणे आम्हास चावतो. गायी च्या फॅट वर डोळा ठेवणे गैर आहे स्वार्थी आहे. Human centric संकुचीत स्वार्थी भांडवलवादी विचारसरणी आहे.
तिचे नुसते डोळे बघा
तिचे नुसते रंग वैविध्य बघा (काळी म्हैस सोडून दुसरी अजून बघितली नाही )
तिचे नुसते पाडसा बरोबरचे फोटो बघा
(अवांतर)
म्हशीच्या सौंदर्याने प्रेरित होऊन आपल्या मुलीचे नाव महिषा ठेवणारा बाप किंवा आपल्या प्रेयसीला प्रेमावेगात "तु म्हशी सारखी सुंदर दिसतेस ! तुला महिषा नाव किती शोभून दिसतं! " अस म्हणणारा प्रियकर माझ्या अल्पानुभवात अजून तरी आलेला नाही.
उलटपक्षी, “आमची आई जर इतकी सुंदर असती, तर आम्हीही असेच सुंदर निपजलो असतो”, असे उद्गार काढणाऱ्या शिवाजीमहाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराची म्हैस सादर करण्यात आली असावी, याबद्दल आम्हांस खात्री आहे.
(अतिअवांतर: त्या सुप्रसिद्ध उद्गारांतून, आपली आई (पक्षी: जिजामाता) ही निखालस कुरूप असल्याची प्रांजळ (नि जाहीर) कबुली तर शिवरायांनी दिली नसावी? शिवराय नि जिजामाता यांच्यातील वैयक्तिक संबंध कसे होते (प्रेमाचे होते, की (सारखे कशाचेतरी टुमणे लावल्याबद्दल वगैरे) जिजामातेबद्दल काही सूक्ष्म अढी शिवरायांच्या मनात होती — इडीपस कॉंप्लेक्सच्या उलट प्रकार?), ते तपासावे लागेल. मात्र, स्वतःच्या आईबद्दल मनात कितीही अढी असली (आणि ती कितीही सकारण असली), तरीसुद्धा, चारचौघांदेखत तिच्या (नसलेल्या) रूपाचे असे वाभाडे काढणे हे शिवरायांच्या तोडीच्या मनुष्यास शोभले नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. पण आम्हाला विचारतो कोण? चालायचेच.)
मुळात शिवाजी महाराज असे म्हणाले नसतील
मुळात हे वाक्य शिवाजी महाराज म्हणाले नसावेत अशी दाट शक्यता वाटते. हे बखरकार टाईप अतिरंजीत लिहिणारे किंवा तथाकथित आदर्शवादी वेड्या पैकी कोणी एक लेखक असावा. ज्याने झाशी च्या राणी बाबत जसे "फेकलेले"आढळते तसा.
त्यामुळे महाराजापेक्षा ही लाईन लिहिणाऱ्या चा complex शोधला पाहिजे. तसेच गोब्राह्मणप्रतिपालक लावणाऱ्या चा.सुद्धा तपास केला पाहिजे.
.
जिजामाता कुरूप आहेत असं म्हणायचं नसावं. त्या सुभेदाराच्या सुनेइतक्या सुंदर नाहीत असं म्हणायचं असावं.
सुंदर नसणे म्हणजे थेट कुरूप असणे नव्हे!
सुंदर आणि कुरूप या रेंजच्या मधल्या मुलींची वर्णनं करायला वेगवेगळे शब्द आहेत.
नाकी-डोळी-नीटस (म्हणजे काय त्यांचं त्यांना माहित!)
(सावळी असली) तरी फीचर्स छान आहेत (म्हणजे काय, अगेन?)
(जाड असली) तरी गोरीपान आहे.
गहू वर्ण (म्हणजे गोरी नाही. पण थेट काळीही नाही)
यापैकी काहीतरी असतील जिजामाता. त्यांनी खाल्लेलं पान त्यांच्या गळ्यातून उतरताना दिसत नसेल.
If anything he must have been a realist.
.
त्या सुभेदाराच्या सुनेइतक्या सुंदर नाहीत असं म्हणायचं असावं.
करेक्शन: सुभेदाराच्या म्हशीइतक्या.
नाकी-डोळी-नीटस (म्हणजे काय त्यांचं त्यांना माहित!)
(सावळी असली) तरी फीचर्स छान आहेत (म्हणजे काय, अगेन?)
ही दोन्ही वर्णने म्हशीस फिट्ट बसत नाहीत काय?
(जाड असली) तरी गोरीपान आहे.
गहू वर्ण (म्हणजे गोरी नाही. पण थेट काळीही नाही)
म्हैस ही (जाड असली तरी) गोरीपान अथवा गहू वर्ण वगैरे या वर्णनांत बसणे (ती albino वगैरे असल्याखेरीज) शक्य नाही. त्यामुळे, शिवाजीमहाराजांनी असे काही वर्णन केले असल्यास त्याचा गंभीर विचार करावा लागेल.
(Come to think of it, एखादी albino अथवा कोड आलेली म्हैस निदान माझ्या तरी पाहण्यात आजतागायत आलेली नाही. अर्थात, म्हणजे ती नसावीच, असा माझा दावा नाही. कोणास ठाऊक, कल्याणच्या सुभेदाराची म्हैस ही अशा नमुन्यांपैकी (मराठीत: specimen) असेलही. नाहीतरी, राजेमहाराजेनवाबसुभेदार वगैरे मंडळींची दुर्मिळ प्राण्यांचा संग्रह करण्याची खोड अंमळ जुनीच आहे.)
त्यांनी खाल्लेलं पान त्यांच्या गळ्यातून उतरताना दिसत नसेल.
एक म्हणजे, म्हशी चारा खातात, पान नव्हे. दुसरी गोष्ट, समजा म्हशीने चारा अथवा पान जे काही असेल ते खाल्ले, तरीसुद्धा, ते जे काही असेल त्याचा म्हशीच्या तोंडात शिरल्यापासून ते म्हशीच्या पचनसंस्थेच्या दुसऱ्या टोकातून बाहेर पडेपर्यंतचा प्रवास या डोळ्यांनी इथे नक्की कोणाला पाहायचा आहे?
(अतिअवांतर: मस्तानीने खाल्लेले पान हे तिच्या गळ्यातून (नि आणखी कोठूनकोठून) उतरताना फक्त बाजीरावास दिसत असावे, नि बाकीचे लोक हे ‘राजाच्या नव्या कपड्यां’प्रमाणे (निव्वळ भयापोटी अथवा स्वार्थी कारणांमुळे) केवळ त्याच्या हो-ला हो करीत असावेत, असा आमचा कयास आहे. याचा अर्थ, बाजीराव (पहिला) हा एक तर इंटर्नल मेडिसीनवाला स्पेशालिस्ट तरी असावा, नपक्षी त्याला प्रियकराची एक्सरे-व्हिजन असावी. बाकी, मस्तानीच्या पचनसंस्थेतील पानाचा प्रवास ट्रेस करणारा बाजीराव (पहिला) काय, नि ‘घटकंचुकी’चा खेळ खेळणारा बाजीराव (दुसरा उर्फ पळपुटा) काय, हे दोघेही गेला बाजार (for want of a better word) विक्षिप्त (किंवा कदाचित आंबटशौकीनसुद्धा) असावेत, असा तर्क करता येण्यास प्रत्यवाय नसावा. चालायचेच.)
If anything he must have been a realist.
अलबत्! स्वतःच्या आईची म्हशीशी तुलना करू शकणारा हा ultimate realist म्हटला पाहिजे.
अनाकलनीय
मस्तानी चे पान उतरताना दिसत असे याची तारीफ करणाऱ्यांच्या मते बहुधा मस्तानी
" इतकी ती गोरी होती"
" इतकी ती नाजुक होती "
गोरे असणे आणि नाजूक असणे दोन्ही यांच्या मते स्त्री सौंदर्याचे निकष असावेत.
पण असा पान प्रवास पाहता येतो
म्हणजे मस्तानी किती गंभीर आरोग्य विषयक प्रश्नाने त्रस्त असावी असे कोणत्याच सौंदर्य रसिकाच्या डोक्यात का आले नसावे ?
हे मला तरी अनाकलनीय वाटते. म्हणजे बाजीराव असा पानाचा रक्तरंजीत प्रवाह बघून प्रफुल्लित होण्याआधी चिंतीत का झाले नाहीत ?
मस्तानी ही अतिशय देखणी स्त्री होती
पान उतरताना दिसत असे जे अलंकारी वाक्य आहे त्याचा अर्थ तिची कांती अतिशय नितळ होती.
रुपाचा खजाना असलेल्या मोजक्याच स्त्रिया जगात असतात.
आता च्या विश्व् सुंदरी पण त्या category मध्ये येत नाहीत.
अभ्यास वाढवा.
मोजकेच पुरुष चं सुंदर असतात.
अशी सुंदरता की कोणत्या ही बाह्य सौंदर्य प्रसाधान न ची त्यांना गरज नसते त्यांच्या कडे बघितली की नजर हटवावी वाटत नही.(दैवी सौंदर्य )
मस्तानी अशीच सुंदर होती
हो ना!
त्यांच्या कडे बघितली की नजर हटवावी वाटत नही.(दैवी सौंदर्य )
मस्तानी अशीच सुंदर होती
हो ना! तिच्या गळ्यातून उतरणाऱ्या पानाकडे पाहिले, की (तिच्या चेहऱ्याचे होत नसेल एक वेळ, परंतु) त्याचे इतके fascination होत असे, की ते पान पार दुसऱ्या टोकातून बाहेर निघालेले दिसेपर्यंत नजर हटवावीशी वाटत नसे. (पानाच्या प्रगतीचा वेध घेत) नुसते बघऽऽऽऽऽऽत बसावेसे वाटे.
लाजवाब!
(अतिअवांतर: लहानपणी मस्तानीने कधी एखादे नाणेबिणे गिळले असेल, तर तिच्या आईवडिलांचे काम सोपे झाले असेल.)
असो.
गायीचे डोळे
तुमचं खरं नाव काय आणि आपण भेटलो आहोत का हे मला माहिती नाही. पण माझे डोळे माझ्या बाकीच्या न-सौंदर्याला वाचवणारे आहेत (असं मी नाही, अनेक लोक सांगून गेले आहेत.) पण परदेशात असताना एकदा एक तरुण मला, "युअर आईज आर सो बिग अँड ब्युटीफुल.. लाइक अ काऊ" असं म्हणाला होता. त्याला मी अजूनही माफ केलेलं नाहीये. हरीण, मॉलटिझरच्या गोळ्या, कात, मध वगैरे अनेक उपमा ऐकल्या आहेत. पण कुणी डोळ्यांमुळे गाय म्हणलं की एक तीव्र सणक डोक्यात जाते. त्यामुळे ग्रेसांच्या कविता ग्रेसांना लखलाभ. त्यांतून प्रेरणा घेऊन कुणी खऱ्या बायकांना गाय म्हणू नये.
>>>राहता राहिले गो प्रेम क्रूर भांडवलवादी विचारसरणी human centric मंडळी गायीचे फॅट मोजता ते त्यांच्या दृष्टीने योग्यच आहे
जे गायीचं दूध विकत घेतात, ते घरी साय साठवून भरपूर तूप कढवू शकतात का? नाही. त्यांना भांडवलशाहीला शरण जाऊन बाजारातून लोणी किंवा तूप विकत घ्यावं लागतं. याउलट जर तुम्ही म्हशीचं दूध घेत असाल, तर रोज एकच लिटर दूध घेऊनही महिन्याच्या शेवटी डबाभरून तूप निघतं. ते संस्कारित असतं कारण ते मीच खपून विरजलेल्या सायीतून केलेलं असतं. कुठेच संदेह नाही. शिवाय घरचं, रवाळ, विड्याचं पान घालून कढवलेलं! हे सगळं लक्षात घेता गाईचा जो उगाच उदो उदो होतो त्याची चीड येते.
अहो या धाग्यावरील सर्वच प्रतिसाद विनोदाने लिहिलेत.
सहज गमतीने प्रतिसाद देतोय या धाग्यावर. आपण कृपया हलक्यात घ्या. आता हा विनोद होता हे सांगावे लागले हा सुद्धा एक करुण विनोदच आहे.
बाकी तुमच्यावर चुकीची कमेंट करणाऱ्या परदेशी तरुणाचा मी निषेध करतो. जाऊ द्या त्याला बिचाऱ्याला माफ करा आपल्या भारतीय मुलींची माहिती नसावी त्याला फारशी.
आपल्या गड्या ने अशी चूक अजाबात केली नसती.
.
इंग्रजीत कुणी काऊ म्हणण्यापेक्षा (एरवी to be a cow याचा अर्थ वाईटच. आळशी. जाड वगैरे वगैरे) वॉटर बफलो वेगळं आहे. त्याला अजून संस्कृतिक संदर्भ आला नसावा. आणि आपल्याला म्हैस सुंदर वाटते त्यामुळे आपण त्याला इंग्रजीत नवीन अर्थ देऊ शकतो.
शिवाय वॉटर नंतर सोयीस्करपणे लिली असं ऐकता येईल.
शंका
१. शीर्षक संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने गंडले आहे का? ("गोमय"ला कुठलातरी विभक्ती प्रत्यय लागेल असे वाटते)
२. "गेल्यावर्षी गोमय निर्मित वस्तूंचा 400 कोटींचा निर्यात आपण केला." - या वस्तू नक्की कुठल्या? त्या वस्तूंचा आयात कुणी केला? गोमयची श्रेष्ठता आधीच माहीत असलेल्या अनिवासी भारतीयांनी की गोमयची श्रेष्ठता मानल्यामुळे पश्चिमी सभ्यतेच्या परक्या लोकांनी?
…
१. शीर्षक संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने गंडले आहे का? ("गोमय"ला कुठलातरी विभक्ती प्रत्यय लागेल असे वाटते)
अहो, पटाईतकाका मराठीच्यासुद्धा (किंबहुना, हिंदी सोडून इतर कोठल्याही भाषेच्या) व्याकरणाची जेथे पदोपदी वाट लावतात, तेथे त्यांच्याकडून याहून वेगळी अशी काही अपेक्षा तुम्ही करूच कशी शकता?
(किंबहुना, हिंदुत्वप्रेमी नि तदनुषंगाने निव्वळ परंपरेखातर संस्कृतप्रेमी मंडळी ही संस्कृत व्याकरणाच्या माताभगिनीएकीकरणमोहिमेत आघाडीवर असतात, हा योगायोग खासा नसावा, नि दैवदुर्विलास तर नसावाच नसावा. आंग्लभाषेत म्हणतात, त्याप्रमाणे, या वेडेपणात काही पद्धत आहे. चालायचेच.)
"गेल्यावर्षी गोमय निर्मित वस्तूंचा 400 कोटींचा निर्यात आपण केला."
वस्तुतः, याही वाक्यात व्याकरणाची घोडचूक आहे. (मराठीत निर्यात ही स्त्रीलिंगी असते.) परंतु, पटाईतकाकांकडून (नेहमीप्रमाणेच) याहून वेगळी अपेक्षा नसल्याकारणाने, त्याचा गवगवा आम्ही करीत नाही; त्याकडे काणाडोळा करतो. असो.
आमची ज्ञानक्षुधा भागवा,पटाइतकाका.
पटाइतकाका ,
अत्यंत माहितीपूर्ण लेख लिहिल्याकारणे आपले आभार.
परंतु काही मुद्दे आपल्या निदर्शनाला आणून द्यायचे होते.
भारतातील निम्मे दुग्धोत्पादन म्हशींमुळे होते तरीपण आपण म्हशीला अज्याबात क्रेडिट देत नाहीयात हे काही बरोबर वाटत नाही . शिवाय म्हशीचे दूध A२ पण असते म्हणे.
शिवाय आपल्याला माहित असेल का ते माहित नाही, म्हैस हा प्राणी मूळचा भारतीय. मूळनिवासी. गोमाता फिरत फिरत आलेली,उगम भारताबाहेरचा.
अशी मूलनिवासी म्हैस निम्मे दुग्धोत्पादन करते , शिवाय दुप्पट फॅट असलेले, तरी तुम्ही तिला द्यावे तसे क्रेडिट देत नाही याचे वैषम्य वाटून राहते.
लक्ष्मी असलीच तर ती म्हशीच्या दुधात आहे,गोमयापेक्षा.
आता ऑपरेशन फ्लड वगैरे विषयी : (खांग्रेसी सरकारने) तेव्हा गायी वाटल्या हे खरे ,पण देशी गाई नाही. बाहेरून आणलेल्या संकरित गायी त्या. माझ्या भागातले गोप्रेमी लोकं तर त्यानं गोमाता मानायलाच तयार नाहीत. ते म्हणतात की हे प्राणी म्हणजे गोमाता नसून " परदेशातून आणलेला, दूध देणारा एक गाय सदृश सस्तन प्राणी"
माझी आपणास अशी विनंती आहे की आपण खालील मुद्द्यांची सविस्तर माहिती देऊन आमचे ज्ञान वाढवावे.
१. ३३ कोटी देवता या दूध देणाऱ्या गायसदृश सस्तन प्राण्यात पण वास करतात की फक्त देशी गोमातेच्या शरीरातच ?
२. या सस्तन प्राण्याच्या गोमयाला गोमय म्हणावे कि म्हणू नये ? ( तुमचे मत काय )
३. म्हशीच्या शेणात, गोमातेच्या शेणात आणि या सस्तन प्राण्याच्या शेणात काय काय फरक असतो? गोमाता सोडून या इतर प्राण्यांच्या शेणाला राष्ट्रीय दर्जा द्यावा किंवा कसे ? हे शेण शेतात टाकल्याने अन्नरूपी लक्ष्मी प्रकट होईल किंवा कसे ?
४. देशात १९ कोटी गायी आहेत ( असे आपण वर लिहिले आहात )यातील देशी गोमाता किती व 'दूध देणारा गायसदृश सस्तन प्राणी' किती ?
५. भारतवर्षाचा मूलनिवासी महिष उर्फ म्हैस (आणि रेडा) हे गोमातेपेक्षा दुप्पट फॅट ( स्निग्ध पदार्थ ) निर्माण करून देशाच्या जीडीपीमध्ये तुलनेने गोमातेपेक्षा जास्त भरघोस वृद्धी करत असूनही या प्राण्याला व या प्राण्याच्या उत्पादनांना असे दुय्यम दर्जा, हा अन्याय कधी संपणार ?
अजून बरेच प्रश्न आहेत, वरच्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर पुढील प्रश्न विचारीन म्हणतो.
आमची ज्ञानक्षुधा भागवा,पटाइतकाका.
आभार.
पण मुळात आर्य परदेशी तर त्यांच्या गायी परदेशी
पण मुळात आर्य हे बाहेरचे असे जर जून्या करारा नुसार मानले तर मग गाय बाहेरची जरी समजा असलीच तरी हरकत काय आहे ? म्हैस मूलनिवासी असण्याची दाट शक्यता वाटते. शिवाय ही आर्य मंडळी नेहमी त्यांचे विरोधक मूलनिवासी आणि त्यांच्या देवताना नकारात्मक रंगात रंगवतात. मला असे वाटते हा जो यम आहे हा आर्यांना पराजित करणारा कोणी शूरवीर मूलनिवासी असावा. जो कदाचित यांना मारणारा कर्दनकाळ अनार्य hero असावा. त्याच्या द्वेषातून यांनीं त्याला असा depict केलेला असावा. एक सहज शंका आपली. आणि हा यम यमी बरोबर जाणूनबुजून incest relationship मध्ये depict केलेला असावा कदाचित. म्हणजे जी काही मूळनिवासी ची कुटुंब व्यवस्था असेल ती बहुधा आर्या ना डाचत असावी. याला घाबरतात ही खूप आणि द्वेष ही फार करतात. पण नचिकेत याच्याकडून knowledge ही घेतो म्हणजे हा विद्वान ही असावा.
आर्य नावाची जातीच अस्तीत्वात…
आर्य नावाची जातीच अस्तीत्वात नव्हती. राखी गढ ने सर्व भारतीयांचे डीएनए एकच आहे हे सिद्ध केले आहे. बाकी भारतीय गायींना कुबड असते यूरोपियन गायींना नाही. बाकी "भारतीय उपनस्ल (वैज्ञानिक नाम: बॉस प्रिमिजिनियस नामाडिकस, Bos primigenius namadicus) - यह भारतीय उपमहाद्वीप के गरम रेगिस्तानी क्षेत्रों में रहा करती थी और औरोक्स की सब से प्राचीन उपनस्ल थी। इस उपनस्ल की उत्पत्ति वर्तमान से २० लाख वर्ष पूर्व हुई और यही बाक़ी दो औरोक्स उपनस्लों की पूर्वजा थी। भारत की ज़ेबू गाय (साधारण सफ़ेद-भूरे रंग की भारतीय गाय) इसी से उत्पन्न हुई है और इसलिए अत्यंत सूखे में भी जी सकती है। भारत में ज़ेबू गाय को लगभग ९००० ईसापूर्व में पालतू बनाया गया।[2]" युरोप मध्ये 7000 वर्षांपूर्वी गायींना पाळीव बनविले. याचा अर्थ बहुतेक भारतीयांनी जगाला गाय पाळणे शिकविले.
बाकी संस्कृत भाषेतील ळ शब्द मराठी सहित दक्षिणी भाषांत आहे. भारतातील उत्तर पश्चिम आणि मध्य आशिया यूरोपियन भाषेत नाही. आज ही दाक्षिणात्य उत्तम संस्कृत बोलतात.
?
बाकी संस्कृत भाषेतील ळ शब्द मराठी सहित दक्षिणी भाषांत आहे. भारतातील उत्तर पश्चिम आणि मध्य आशिया यूरोपियन भाषेत नाही.
वैदिक संस्कृतात ‘ळ’ होता. पाणिनीय संस्कृताच्या काळापर्यंत कधीतरी तो लोप पावला. परंतु, त्याचा येथे काय संबंध?
बाकी, भारतातील उत्तरपश्चिमी (=वायव्येकडील?) भाषांबद्दल म्हणाल, तर हिंदीत ‘ळ’ नाही, परंतु हिंदीच्या काही स्थानिक बोलीभाषांत तो आहे. (राजस्थानी, हरयाणवी, वगैरे. या बोलीभाषा माझ्या कल्पनेप्रमाणे वायव्येकडील किंवा तुम्ही ज्याला उत्तरपश्चिमी म्हणाल, त्या भौगोलिक प्रदेशातील गणता याव्यात. (पंजाबीबद्दल नक्की कल्पना नाही, परंतु, पंजाबीत बहुधा ‘ळ’ नसावा. (चूभूद्याघ्या.))) परंतु, त्याचासुद्धा येथे काय संबंध?
फार कशाला, मराठीत जो दंततालव्य ‘च’ (‘चमचा’ अथवा ‘भिकारचोट’ या शब्दांतला) आहे, तसा तो कश्मीरी भाषेतसुद्धा आहे. (कश्मीरीत ‘चोट’ बोले तो एका विशिष्ट प्रकारची रोटी.) मात्र, इतर कोठल्याही भारतीय भाषेत (किंवा संस्कृतातसुद्धा) तो असल्याबद्दल ऐकलेले नाही. बरे मग?
गो ऑब्सेशन
तुमच्या लेखनाला विरोध अजिबात नाही. आणि आम्हाला म्हैस आवडते म्हणून तुम्ही म्हशीबद्दल लिहावं असाही आग्रह नाही. पण भारतीयांनी सगळ्या फार्म ॲनिमलांतून (या समूहाला मराठीत काय म्हणतात?) गाय वेगळी काढून तिच्याबद्दल असं काही जाज्वल्य ऑब्सेशन जनमानसात रुजवलं आहे त्याबद्दल अचंबा वाटतो. उदाहरणार्थ, मांजरही माणसाचा आवडता प्राणी आहे. ते पुरेसं चलाख आणि गूढही आहे. इजिप्तमध्ये पुरातन शिल्पांत मांजराचे उल्लेख येतात. इस्तंबूलमध्ये रस्त्यावर हजारो मांजरे अधिकाराने फिरत असतात असं ऐकलं आहे. माणसाने पक्षीही पाळले. नलदमयंती यांच्यामध्ये व्हॉट्सॲपचे काम पक्षीच करत होता ना? हे किती स्तुत्य काम आहे! दूध देण्यापेक्षा तर नक्कीच जास्त बुद्धीचे काम आहे. माणसाने घोडे पाळले जे मोठमोठ्या राजांना घेऊन रणांगणावर गेले. घुबड कुणी पाळले की नाही माहिती नाही, हॅरी पॉटर सोडल्यास. क्लिओपत्राने बहुधा सापही पाळले (तसे ते मीही पाळले होते. पण ते साप आहेत हे लक्षात आल्यावर त्यांना सोडून दिलं).
Inspite of all this, आपण गाय या पशूबद्दल इतके भावूक आहोत याचं मला वाईट वाटतं. इतकाच मुद्दा आहे.
Obsession जसे फुटबॉल चे ब्राझील वासियांना आहे.
ब्राझील वाले फुटबॉल साठी वेडे आहेत. भारतीय क्रिकेट साठी. आता शेकडो इतर खेळ असताना ब्राझील वासी फुटबॉल साठीच का वेडे आहेत किंवा आपण क्रिकेट साठी ?
क्रिकेट ची भारतीय वेडा ची मुळे आपणाला दिसतात आपल्या साहेबाचा खेळ, गरीब देशात कमी खर्चात खेळता येणे (stump लाकडी,सायकलचे चाक, नुसती तीन दगड ठेवून करता येतो बॉल एकदम स्वस्त पासून सुरु होतो इत्यादी, अजून लोकसंख्या जास्त असल्याने एका खेळात 22 लोक खेळू शकतात कधी जास्त सुद्धा गल्ली क्रिकेट मध्ये वगैरे, म्हणजे टेनिस इ खेळ तुलना करा दोनच खेळणार, शिवाय साहेबा मुळे सवय लागली, नुसती कॉमेन्ट्री पण time pass करते म्हणून obsession आहे .आता असेच काही करणे ब्राझील ची असावीत. आणि गायीची आहेतच उघड कारणे भारतात हिंदू बहुसंख्य, धर्मात गायीला मोठे स्थान, दूध वगैरे , भावनिक संदर्भ ज्यांना धार्मिक भावना आहे त्यांना अधिकच.पाळीव पशु असल्याने अधिकं जवळीक, दुर्गामातेचा सिंह आहे पण तो पाळता येत नाही. तर त्यामुळे obsession आहे. तर आहे ते असे आहे
त्यात तुम्हाला अचंबा का वाटतो ? आता यामुळे नुकसान होते म्हैस अधिक उपयुक्त आहे हे खरेच आहे पण माझे म्हणणे मूळ गोष्टी चा अचंबा का ? Obsession ची कारणे इतकी उघड धर्मिक आणि सांस्कृतिक असताना त्यात आश्चर्य कशाचे ? अर्थात एखादी भारत आणि हिंदू धर्माशी फार संबंधित नसलेली दूरदेशीची व्यक्ती असेल तिचे अचंबित होणे समजू शकतो. जसे मला चायनीज माणसांचे गाढव प्रेम किंवा obsession अचंबित करते. ते तसे का आहे याची मला फार कमी माहिती आहे. पण ते तसे आहे खरे. गायी विषयी मी अजिबात अचंबित होत नाही क्रिकेट विषयी पण नाही. गायी च्या.लोकप्रियतेच अजून एक कारण महत्वाच भाजपच्या cow boys मुळे आहे गाय सध्या नुसताच धार्मिक सांस्कृतिक नाही तर राजकीय पशु सुद्धा झालेला आहे. पण सांस्कृतिक लोकप्रियता यापूर्वीपासून आहे. गोमासा चा फॅक्टर वापरून त्यांना इतर धर्मीय विशेषतः मुस्लिमांवर जरब ठेवणे, लिंच करण्यास सोय होते. शक्तिप्रदर्शन करता येते. तर अशी अनेक बरी आणि वाईट कारणे आहेत ज्याने गायी विषयी obsession आहे. मला अचंबा वाटत नाही मला कारणे माहित आहेत.
...
प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण जिचे दूध, दही, लोणी इ.इ. गोपींकडून चोरायचे, ती गोमाता परदेशी कशी काय?
मुळात भगवान श्रीकृष्ण हे भारतीय होते, भारताचे मूलनिवासी होते, याबद्दल आपल्याला खात्री आहे काय?
(ठीक, भारतीय प्रदेशात जन्मलेले आणि पिढ्यान्पिढ्या वगैरे भारतीय प्रदेशात गेलेल्या, या निकषांवर त्यांचे नागरिकत्व हे भारतीय मानता येईलही कदाचित. परंतु, त्यांना भारताचे मूलनिवासी म्हणता येईल काय?)
किती मागे जायचे?
असल्या विषयात किती मागे जायचे हेच समजत नाही. अमिबाच तसे पाहिले तर मुलनिवासी.
अवांतर:
या न्यायाने आपले उपावसाचे बहुतेक सर्व पदार्थ हे भारतात पूर्वीपासून उगवणारे नाहीत. उदा. बटाटा, मिरची इ. महाराष्ट्रात उपवासाला साबुदाणा सर्रास खातात, पण त्याचे कंद इथे उगवतात असे कधी दिसले नाही.
जब तलक ये फासले ना गिरे ! मानवाचे अंती एक गोत्र !!
मिसिसिपीमध्ये मिसळू दे गंगा;
-हाईनमध्ये 'नंगा' करो स्नान.
सिंधुसाठी झुरो आमेझान थोर'
कांगो बंडखोर टेम्स साठी
नाईलच्या काठी 'रॉकी' करो संध्या;
संस्कृती अन् वंध्या नष्ट होवो.
व्होल्गाचे ते पाणी वाहू दे गंगेत
लाभो निग्रो रेत पांढरीला
माझा हिमाचल धरो अतंर्पट
लग्नासाठी भट वेद्द्रष्टा!
रक्तारक्तातील कोसळोत भिंती
मानवाचे अंती एक गोत्र
छप्पन भाषांचा केलासे गौरव
तोची ज्ञानदेव जन्मा येवो.
जागृतांनो फेका प्राणांच्या अक्षता
ऐसा योग आता पुन्हा नाही!
विंदा करंदीकर
( गायींचे अंती एक गोमूत्र )
…
Big bang पासुन ब्रह्माण्ड निर्मिती आणि जीव सृष्टी निर्मिती hi सर्व गृहीतक आहेत.
सत्य कोणालाच माहित नाही.
जीवसृष्टीनिर्मितीबद्दल कल्पना नाही, परंतु, Big bangपासून ब्रह्माण्डनिर्मितीच्या थियरीला साक्षात तुकोबांनी दुजोरा दिलेला आहे.
‘अणुरेणीया थोकडा, तुका आकाशाएवढा’ हे Big bangमध्ये सापडलेल्या तुकोबांचे before and after वर्णन आहे. (मज्जा!)
ह्या पृथ्वी वर
ह्या पृथ्वी वर सर्व चं परके आहेत.
कोणी मूळ निवासी वैगेरे नाही.
जीवनाची बीज चं अवकाश मधून पृथ्वी वर आलेली आहेत.
त्या मुळे हे परके आम्ही मुलवासी असे काही नाही.
. आता वर्तमान काळात जी भूमी ज्या लोकांच्या ताब्यात आहे तेच त्ता भूमी चे मालक आहेत.
त्ता मुळे महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे आणि अमेरिका फक्त अमेरिकन लोकांचा चं आहे स्थलांतरित लोकांचा बिलकुल नाही
2 paper
वरील लेखात 400 कोटी ची निर्यात गेल्या वर्षी भारताने केली ते विधान बहुतांशी खरे दिसत आहे.
https://www.exportimportdata.in/blogs/cow-dung-export-from-india.aspx
त्याव्यतिरिक्त धांडोळा घेतला असता दोन प्रमुख रिसर्च पेपर्स बहुचर्चित आणि महत्वाचे वाटले. त्यापैकी एक indian veterinary research institute चा आहे.https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/cow-urine-u… ज्याच्या मते अस्सल भारतीय Holy cow (Bos indicus) चे ताजे गोमूत्र antibacterial तर नाहीच नाही परंतु उलट ते 14 प्रकारच्या मानवी सेवनास घातक अशा 14 प्रकारच्या वाईट bacteria ने युक्त असे आहे. यात ही पुन्हा म्हशी ने बाजी मारलेली आहे.The urine of buffalo was significantly more effective on bacteria like S Epidermidis and E Rhapontici,”
दुसरा रिसर्च पेपर प्रख्यात nature मध्ये प्रकाशित झालेला आहे.
https://www.nature.com/articles/s41598-021-91684-4
हा कुतुहलाने पूर्ण वाचला आणि अर्थातच पूर्ण डोक्यावरून गेला आपला विषय पण नाही. या व इतर 4 रिसर्च पेपर चा उल्लेख iit madras च्या एका संचालकाने केलेल्या विधानात आलेला आहे.
तो विवाद इथे
https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/news/national/research-pa…
बाकी या पेपर विषयी nature मधील इथे कोणी जाणकर असतील तर कृपया प्रकाश टाकावा. हा पेपर positive या अर्थाने प्रमोट केला जात आहे. हे जर सत्य असेल तर मग आपण अर्थातच इंडियन इन्स्टिट्यूट पेक्षा nature वर अधिक विश्वास करून गोमूत्र प्राशन करावयास हरकत नाही.
"दुसरा रिसर्च पेपर प्रख्यात…
"दुसरा रिसर्च पेपर प्रख्यात nature मध्ये प्रकाशित झालेला आहे."
नेचर आणि नेचरचेच सायंटिफिक रिपोर्ट्स , या दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. ( पेपरविषयी ही कमेंट नाही.तुम्ही प्रख्यात नेचरचा उल्लेख केलात म्हणून हा खुलासा केला)
वैयक्तिक मत विचाराल तर अगदी गोमूत्र( किंवा महिषमूत्र ) सर्व अँटिबायोटिक्सनी संपृक्त जरी आहे असं कुणी म्हंटल, तरी मी अँटीबायोटिक( प्रतिजैविक) घ्यायची जर वेळ आलीच तर माझ्यावर , तर मी बापडा केमिस्टच्या दुकानांतून डॉक्टर सांगेल ते प्रतिजैविक विकत आणून ठरलेला डोस घेईन.
कारण सोपं आहे.
धन्यवाद ! मला हा फरक माहिती नव्हता
मग हा जो रिसर्च पेपर आहे तो
नेचर मधील आहे की सायंटिफिक रिपोर्ट्स मधील आहे ?
दोघांच्या दर्जामध्ये नेमका काय फरक आहे ?
म्हणजे एखादे संशोधन जर nature च्या scientific reports मध्ये प्रकाशित झाले तर ते नुसत्या nature journal मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनापेक्षा "उजवे" किंवा "सरस" असते का ? असे मानले जाते का ?
तुम्हीच दिलेली लिंक उघडलीत…
तुम्हीच दिलेली लिंक उघडलीत की दिसेल की हा पेपर (नेचरच्या) सायंटिफिक रिपोर्ट्स मध्ये प्रकाशित झाला आहे.
डावे उजवे असली काही टिप्पणी करण्याइतपत माझा अभ्यास नाही.
परंतु सायंटिफिक रिपोर्ट्सचा इम्पॅक्ट फॅक्टर ३.८ आहे ( जो चांगलाच आहे ), फक्त नेचरचा पन्नासच्या वर आहे. एवढेच.
रिसर्च चे मापदंड काय आहेत…
रिसर्च चे मापदंड काय आहेत. रस्त्यावर फिरणार्या कचरा खाणार्या गायी. वेगळी रिपोर्ट येईल. जंगलात चरणार्या गायींचे दूध अधिक उत्तम रहित. गोठ्यात युरिया युक्त भोजन दिले जाईल, वेग वेगळी रिपोर्ट येतील. अर्थात हे सर्व जांनावरांवर लागू आहे. बाकी गो मूत्राचे अनेक औषधी उपयोग आहे. गोमूत्र डिस्टील करून विकल्या जातो त्यामुळे हानिकारक विषाणू त्यात राहत नाही. शेकडो रिसर्च पेपर उपलब्ध आहेत. सरकार विरोधी प्रिंट चा लेख
https://hindi.theprint.in/india/medicinal-properties-of-cow-urine-have-…
विवेकजी तुम्ही वरील प्रतिसाद पुन्हा वाचा एकदा
वरील प्रतिसादात मी एक रिसर्च पेपर ची लिंक दिलेली आहे जो nature मध्ये प्रकाशित झालेला आहे आणि तो गोमूत्र संदर्भात सकारात्मक आहे. दुसरा जो भारतात झालेला रिसर्च आहे त्यात ताज्या गोमूत्रात असलेल्या मानवी सेवनास घातक अशा bacteria संदर्भात. आहे . आणि. त्याच प्रतिसादात IIT Madras चे संचालक कामकोटी यांनी दाखवलेल्या NATURE आणि इतर 4 रिसर्च पेपर संदर्भातील पूर्ण वृत्त दिलेले आहे. त्याच वृत्ताची तुम्ही प्रिंट (सरकार विरोधी) मध्ये आलेली लिंक दिलेली आहे. मी दिलेल्या दुव्याच्या लेखात जो हिंदू मधला आहे तोच विषय अधिक विस्तृत आणि आणि विशेष म्हणजे रिसर्च पेपर च्या लिंक सहित आलेला आहे. दोन्ही बाजू cover केलेल्या आहेत.पण बहुधा तुम्ही तो उघडण्याचे ही कष्ट घेतलेले दिसत नाही. नाहीतर तोच कामकोटी च्या बातमीचा दुवा तुम्ही दुबारा दिला नसता.
गाय ही भारताची मूल निवासी…
गाय ही भारताची मूल निवासी आहे। भारतीय उपनस्ल (वैज्ञानिक नाम: बॉस प्रिमिजिनियस नामाडिकस, Bos primigenius namadicus) - यह भारतीय उपमहाद्वीप के गरम रेगिस्तानी क्षेत्रों में रहा करती थी और औरोक्स की सब से प्राचीन उपनस्ल थी। इस उपनस्ल की उत्पत्ति वर्तमान से २० लाख वर्ष पूर्व हुई और यही बाक़ी दो औरोक्स उपनस्लों की पूर्वजा थी। भारत की ज़ेबू गाय (साधारण सफ़ेद-भूरे रंग की भारतीय गाय) इसी से उत्पन्न हुई है और इसलिए अत्यंत सूखे में भी जी सकती है। भारत में ज़ेबू गाय को लगभग ९००० ईसापूर्व में पालतू बनाया गया।[2] यूरोपियन लोकांनी गायीला फक्त 7000 वर्षांपूर्वी पाळणे सुरू केले. बहुतेक भारतीयांनी त्यांना शिकवले असेल.
भारतीय पुरोगामी
गाय पवित्र आहेच तिचे दूध बाकी प्राण्यांन पेक्षा उत्तम प्रति च आहेच.
तिच्या पासुन निर्माण होणारा बैल शेतकरी आणि शेती साठी अगदी उवयोगी आहे.
तिचे मूत्र आणि शेण जमिनी चीं पोत वाढवणारे च आहे.
गाई ही पवित्र च आहे.
भारतातील पुरोगामी ( ह्यांना पुरोगामी म्हणणे पण पुरोगामी शब्धचा खोर अपमान आहे )
फक्त हिंदू द्वेशी आहेत बाकी त्यांच्या कडे कोणतेच तत्व ज्ञान नाही.
पूर्ण जग गाई च महत्व उत्तम रित्या समजते.
मूठभर भारतीय पुतोगामी ना समाजात अशी पण काही किंमत नाही.
त्यांचे विचार लोक जोक म्हणून वाचतात.
आणि भारतात पुरोगामी ही शिवी आहे
आयाम ऍग्री राजेशभाऊ.
आयाम ऍग्री राजेशभाऊ.
तुम्ही लिहिलंत त्याबद्दल काही दुमत नाही. विशेषतः पवित्र वगैरे लिहिलं आहेत त्याबद्दल.
माझा प्रश्न म्हशीवर अन्याव का असा आहे. त्याविषयी माहिती असेल तर द्याल का ?
म्हशीच्या शेणानेही जमिनीचा पोत वाढतो म्हणतात.
म्हशीचं दूध तर A २ असतं , आणि त्यात फॅट टक्केवारी गाईच्या दुधाच्या दुप्पट असतं. ( ज्यामुळे दुप्पट तूप निघतं )
तुम्ही बाकी लिहिलं आहेत त्याबद्दल आपल्याला काही नाही.
पण म्हैस आणि रेडा यांच्यावर पुरातन काळापासून होत आलेल्या अन्यायाविरुद्ध लढा द्यायला माझ्याबरोबर तुम्ही सामील होणार काय ?
पवित्र कुणाला मानायचे हा…
पवित्र कुणाला मानायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. ( काही पौराणिक कथांनुसार गाय ही तोंडाकडून अपवित्र आहे. पुच्छाकडून पवित्र)
बाकी गायीच्या दुधाविषयी चर्चा फार मागे इथे होऊन गेली आहे. म्हशीची नाही.
गोमय वसते... इथे गोमये हवं.( कराग्रे वस्ती...याप्रमाणे)
गाय , म्हैस वगैरे वर्गिकरणानुसार ' bovine' .
नवीन विषय सुरू केल्याबद्दल पटाईतकाकांना धन्यवाद.
(अवांतर)
भारतातल्या दुग्धव्यवसाच्या एका ठराविक मॉडेलमुळे (जनावरे पाळणारे, दूध बँकेत जमा करणारे, पाश्चराईज्ड करून मार्केटींग करणारे दूधमहासंघ अशी साकळी आहे) अगदी मुरलेल्या भांडवलदारालाही यश मिळविणे हे आव्हानात्मक आहे. गोदरेज अॅग्रो वा ब्रिटानिया गेली कित्येक वर्षे यात अजूनही चाचपडत आहेत. त्यातल्या त्यात फ्लेवर्ड मिल्क, आइसक्रीम या व्हॅल्यू अॅडेड कॅटेगरी मध्ये थोडेफार यश मिळू शकेल म्हणून त्यात हातपाय मारणे चालू आहे.
दुग्ध व्यवसायासाठी जनावरे पाळणे (गाय - देशी वा संकरीत वा म्हैस) अल्पभूधारक शेतकर्यासाठी फारसे फायद्याचे नसावे असे वाटते. कारण एकतर भारतात जे मॉडेल आहे ज्यात तुम्ही छोटे पशूपालक असाल तर दूध महासंघाला (वा इतर ब्रँडना) दुधाचा राबता घालता. महासंघ पाश्चरायझेशन, मार्केटीग आणि डिस्ट्रीब्यूशन बघतात. पशूपालन करणार्याला तो सांगेल ती दूधाची किंमत मिळत नाही तर त्याला महासंघ सांगेल ती किंमत घ्यावी लागते. जर तुमच्याकडे शेतजमीन असेल तर चारा लागवड करून तुम्हाला चार्याच्या किंमती आटोक्यात ठेवता येऊ शकेल आणि निदान "केलेल्या मेहनतीचे" चार पैसे गाठीला लागतील. हिरव्या सुक्या चार्याशिवाय जनावरे पाळणे केवळ अशक्य. गेल्या काही वर्षात चार्याचा खर्च ज्या प्रमाणात वाढला आहे त्या प्रमाणात दूधाच्या किमती वाढलेल्या नाहीत. महासंघालाही इतर महासंघांपेक्षा पेक्षा फार अधिक किंमत लादता येत नाही. शिवाय पशूवैद्याचा खर्च असतो तो वेगळा. भाकड जनावरांचा खर्च वेगळा. काही चतुर लोक दूध देणे कमी झाले की ते जनावर दुसर्याच्या गळ्यात मारतात असे लक्षात आले. दुष्काळात तर चारा छावणीत गुरे बांधावी लागतात.
काही जणांनी पाश्चरायझेशन, मार्केटींग आणि डिस्ट्रीब्यूशन स्वतः करून दूधाची किंमत शंभर रुपये वा अधिक ठेवली आहे. जी महासंघाच्या दूधाच्या किमती पेक्षा (५८ रुपये प्रति लिटर)अधिक आहे. पण यामुळे खर्चही वाढतो. पाश्चरायझेशन चा खर्च. मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्यूशन जाळे उभारण्याचा खर्च इ. उदा. "गाईचे ए-२ दूध" अशी जाहीरात करणार्या (ए२ या तांत्रिक बाबीवर एक लेख सई यांनी लिहिला होता त्यामुळे त्यात मी जात नाही) मिस्टर मिल्कचे लोणावळ्यातला फार्म खरचं खूप छान आहे. युट्युब वर बघायला मिळेल. जवळजवळ ६०० गीर गाई आहेत आणि अगदी युरोपिअन स्टाईलने त्यात व्यवस्थापन केले जात आहे. पण पहाताच क्षणी कळते की जमिनीची किंमत जरी नाही धरली तरी यात जी गुंतवणूक केली आहे ती कित्येक करोडोमध्ये आहे. मार्केटींग^ करून दूधाला १०० रुपये प्रति लिटर भाव मिळतही असेल. मलातरी वाटते की प्रति लिटर २०० रुपयाने जरी विकले तरी तो आतबट्ट्याचा व्यवहार असावा. पण कदाचित चालूनही जात असेल. कारण मित्तल नावाच्या त्या मालकाने ते हौस म्हणून केले आहे असे कळले. त्यामुळे मित्तल फॅमिलीच्या वार्षिक उत्त्पन्नाच्या ५-१०% इतका ऑपरेटींग लॉस या दुग्ध व्यवसायात होत असेल तर ते हा व्यवसाय चालूही ठेवतील. पण असे कुठलेच पाठबळ नसलेला नवउद्यमी या व्यवसायत पडला तर तो टिकणार नाही. दिल्लीमधे २०० रुपये प्रति लिटरने दूध विकणार्या एका नवउद्योजिकेला गोशाळा बंद करावी लागली असेही एका ठिकाणी कळले.
तरीही इथल्या कुणी वाचकाने यशस्वीपणे या व्यवसायात हातपाय रोवले असतील तर अनुभव वाचायला आवडेल. कदाचित चितळेंची मुलाखत यावर घेता येईल. त्यांनी महासंघासारखा आपला ब्रँड विकसित केला आहे. महासंघाला नेमका किती नफा होतो हे सध्या गुलदस्त्यात आहे. अमूलचा ९०,००० कोटीचा महसूल आहे खरा. तरी नफा, रिटर्न ऑन कॅपिटल किती इ. ची उत्सुकता मला आहे.
(^मार्केटींग - जसे एकच सोर्स - साधारण महासंघातले दूध देशी गाई कडून आले आहे की म्हशीकडून याची नक्की खात्री मिळत नाही-, चार्यासाठी कुठलेही किटकनाशके वापरलेली नाहीत, बंधिस्त नसलेल्या "हॅप्पी काउज" इ... हे पाहून मला व्हे प्रोटीनच्या लिजन ब्रँडची आठवण आली. काही वर्षांपूर्वी ते अशीच जाहीरात करत असत. आपल्या गायी कशा आयरलंडच्या हिरव्यागार कुरणावर मनसोक्त चरतात. त्या कशा "हॅप्पी काउज" आहेत इ. म्हणून आमचे व्हे प्रोटीन खूप चांगले आहे.)
...... मी लहान होतो तेव्हा…
...... मी लहान होतो तेव्हा आमच्याकडे तीन गायी आणि एक म्हैस होती. मला गायीचंच दूध आवडायचे आणि ते मी पीत असे. जरा मोठा झाल्यावर मी इतर मुलांच्या बरोबर गुरें चरायला नेत असे. येताना भरपूर शेण गोळा करून आणत असे. सगळे माझ्यावर खूश असत. दुपारच्या वेळी सगळी गुरे झाडाच्या सावलीत रवंथ करत विश्रांती घेत तेव्हा मी धोपटीतून नेलेलं पुस्तक काढून वाचत असे. इतर मुलासारखा पावा न वाजवता कागदं वाचत असल्याने माझी टिंगल व्हायची परंतू मी शहाणाच ठरलो...... अशी काही गोष्ट लिहिली तर वाचक आवडीने वाचतील आणि चांगले कामाचे उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतील. शिवाय भाकड प्रश्न कुणी विचारणार नाही. कारण ते कोणत्याही गोष्टीचं समर्थन नसून लाईफस्टाईल वर्णन आहे. काहींना यात लंपनही दिसेल किंवा गारंबीचा बापू. मोठे पुस्तक झाल्यास एखादे पारितोषिकही मिळेल.
वॉव!
इथे खरेच कुणाचे बालपण खेडेगावात गेलेले असेल तर गेल्या काही दशकातले बदल टिपणारे लेखन वाचायला आवडेल खास करून गुरं आणि पाळीव प्राण्यांवर. माझ्या सारख्या शहरी माणसाला काही बदल चटकन दिसतात. आजकाल गुरांची संख्या फार कमी झाली आहे. तळकोकणात माझ्या लहानपणी प्रत्येक घरात गुरे होती. आताशी अपवादाने एखाद्या घरात गुरे असतात. ही गुरे फक्त पावसाळ्यात राखावी लागत (तेही ऐकून माहीती) कारण भात शेतीत घुसू नयेत म्हणून. शेतीची कापणी झाली की गुरे मोकाट असायची. उन्हाळ्यात गुरांना चारा नसायचा. सकाळी सोडलेली गुरे गावभर उंडारायची. झाडावरून पडणारे आंबे, पिकून खाली पडलेला फणसं (फणसाचा वास आला की गुरे झोंबायची), माणसांची विष्ठा (हो, अजब आहे पण डोळ्यांनी पाहिले आहे. काही माणसांना गायीच्या विष्ठेचे कौतुक आणि गुरांना माणसाच्या) हे खाद्य असायचे. त्यामुळे भुकेलेली गुरे संध्याकाळी गोठ्याकडे आपसूक परतायची. निदान चार्याची सोय असायची. संध्याकाळी गोठ्यात बांधताना केवळ त्यांना सुकलेले भाताचे गवत चारा म्हणून मिळायचा. म्हशीला आंबवन असायचे. त्यात शेंगदाण्याची पेंड असायची. पण गाय काय आणि म्हैस काय फार फार तर पेला वा दोन पेलाभर दूध द्यायची. ते पुलंनी म्हटलेले खोटे नाही. (कोकणातली म्हौस म्हणे शेरभर दूध देते.) त्या दूधाची चव पण कडवट असायची. रानावनात भूकेला काहीही खातात म्हणून दूध कडू लागते असे कारण मला त्यावेळी दिले गेल होते. म्हशी आणि गायी कशा गाभण रहायच्या हे माहीत नाही. म्हणजे उन्हाळ्यात माळरानावर (सड्यावर) चरताना, बैलांच्या वा रेड्यांच्या झुंझी लागल्या की आम्हाला आनंद व्हायचा. पण गाई म्हशीचे ब्रीडींग माणसं जबरदस्तीने घडवून आणत होते की माळरानावरच्या तगड्या सांडाकडून वा रेड्याकडून नैसर्गिकपणे गाभण रहायच्या? आजकाल सर्रास सिमन स्ट्रॉ द्वारे फक्त मादीच जन्माला येईल अशा पद्धतीने गाभण ठेवल्या जातात. या तंत्रज्ञानामुळे ९०-९५% मादीच जन्माला येते क्वचित नर जन्माला येतो. भारतात अंदाजे ५०० मिलिअन डॉलर्सचा सिमनचा व्यवसाय आहे. केंद्र सरकार त्याला सबसीडीही देते. एकंदर आजकाल बैल आणि रेडा कोणाला नको आहेत. जेव्हा पासून मिनी ट्रॅक्टर आले आहेत. कोकणातही बैलांची गरज कमी झाली आहे. एकतर गुरांसारखे राखावे लागत नाही. मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा कमी किंमत. बाटलीतून पेट्रोल आणले की झाले. अगदी डोक्यावरून पायवाटेने कुठल्याही कोपर्यात नेता येते. मिनी ट्रॅक्टरचं एक तरी दुकान आजकाल मोठ्या बाजारपेठेत दिसते. गाय, बैल, कोंबडी, डुक्कर इ. प्राणी गरज आहे म्हणून त्यांची संख्या आज भरपूर आहे. लॅब ग्रोन मिट, लॅब ग्रोन डेअरी प्रोडक्ट पुढल्या शतकात विकसित झाले तर घोडे, गाढव इ. प्राण्यांप्रमाणे यांची संख्याही रोडावत जाईल. सध्या तशी सुरुवात तर झाली आहे. पण सध्याचे तंत्रज्ञान एकतर चवीत मार खात आहे किंवा लार्ज स्केलवर उत्पादन घेण्यात अडचणी आहेत. यांत्रिकीकरणाच्या युगात दुधाचा व्यवसाय म्हटला की हे सगळे ओघाने आलेचं. एकदा का गाय ही उपयुक्त पशू आहे आणि सेपिअन्स ही इतर प्रजातींवर सत्ता गाजवणारी एक प्रजाती आहे जी इतर प्रजातींच्या नाशाला वा कमी होण्याला कारणीभूत आहे हे सत्य स्विकारले की अपराधीपणाची भावना बोथट होते. त्यातल्या त्यात पाळलेल्या प्राण्यांना कारखान्यातली यंत्रे म्हणून न वागवता थोडी माणूसकी दाखविण्याइतपत नैतिकता ठेवली की झाले. पण गाय ही माता आहे अशी श्रद्धा असणार्यांना या गोष्टी खटकत कशा नाहीत. म्हणजे जबरदस्तीने घडवून आणलेले ब्रीडींग (मग ते अगदी पंचक्रोशीतल्या वळू कडून जबरदस्तीने केलेले असले काय -म्हणजे तसे ऐकून माहीती- वा सिमन स्ट्रॉ द्वारे), त्याला सबसीडी देणारे सरकार, वासराचा हक्क डावलून काढलेलं दूध, हे सगळे माता म्हणवणार्यांना कसं चालतं? किंबहूना असे प्रकार सरार्स चालू असतात तेही कसे खपविले जातात. का दोष फक्त अल्पसंख्यांक खाटीकामध्येच दिसतात? का गाय ही माता फक्त पॉलिटीकली आहे, बाकी जिथे स्वार्थ आहे तिथे सोयिस्कर डोळेझाक अगदी गेल्या दशकातही होत होता आणि आताही आहे?
लोकांना योग्य प्रश्न का पडत नाहीत
.माझे बालपण खेड्यात गेले आहे.
..तुमचा प्रश्न वासरच्या हिश्या चे दूध माणूस काढतो म्हणजे शेतकरी ते चुकीचे आहे.
खरी स्थिती.
वासरच्या वाढी साठी गायी चे ( इथे सर्व दूध देणारे प्राणी घ्या येथील पुढील सर्व उत्तरात. गाय hi प्रतिनिधिक )
तितके दूध त्ता वासाराला पाजले जाते म्हणून गायी ची पिल्लं सशक्त असतात.
2}तुमचा प्रश्न गाय दोन ltr चं दूध देते जाती नुसार गायी 5 ltr पासुन 40 ltr पर्यंत दिवसाला दूध देतात.
देशी खिल्लर जाती ची जी महाराष्ट्य मध्ये पळाली जाते ती 4 ते 5 ltr दूध देते आणि खिल्लर गायी दूध विक्री साठी पाळली जात नाही खिलार जाती च्या बैलाची पैदास करण्या साठी पाळली जाते आणि दूध शिल्लक राहिले तर घरात वापरले जाते.
शेळ्या पान 2 ltr दूध देतात ती गायी आहे.
3) तुमचा प्रश्न गायी ची गर्भ धारणा कृत्रिम रित्या सीमेन्स देऊन केली जाते ते क्रूर आणि अनैसर्गिक आहे.
उत्तर गायी माजावर आल्या वर चं सीमेन्स दिले जाते किंवा बैल दाखवला जातो..
जो पर्यंत गायी माजावर येत नाही तो पर्यंत गायी किंवा बाकी पाळीव प्राण्यात गर्भ धारणा होत नाही आणि अशी स्थिती वर्षातून एकदाच येते त्यांचे माणसासारखं नाही.
. सीमेन्स ह्या साठी दिले जाते उत्तम जातीच्या बैल चं ते सीमेन्स असते त्या मुळे होणारी वासर उत्तम प्रति ची पैदा होतात.
हिटलर नी पण हेच धोरण त्यांच्या प्रजेसाठी राबवले होते.
की उत्तम प्रति ची प्रजा निर्माण व्हावी.
त्या मुळे ह्या मध्ये काही hi गैर नाही काँग्रेस सरकार नी उत्तम प्रति चं पशुधन निर्माण व्हावे म्हणून ती योजना अमलात आणली होती म्हणून सरकारी सुबसिडी पण होती.
. तुमचा प्रश मिनी ट्रॅक्टर मुळे बैलांची गरज संपेल, गायी ची गरज संपेल, पाळीव प्राण्यांची गरज संपेल.
उत्तर.
असे काही होणार नाही शेती साठी पाळीव प्राणी खूप गरजेचे आहेत.
फक्त रासायनिक खत वापरून धान्य उत्पादन होत नाही.
रासायनिक खता न मुळे जमिनीचा पोत नष्ट होतो आणि जमीन हळू हळू नापिक होते त्या जमिनीत पीक उगवत नाहीत.
शेणखते जी प्राण्यांना पासुन चं मिळतात.
कंपोस्ट खत hi जमिनीला द्यावीच लागतात.
तर चं धान्य उत्पादन शक्य आहे अन्यथा नाही.
गाय का पवित्र मानली जाते?
हा प्रश्न इथे खूप लोकांना पडत आहे.
गायी चे शेण आणि मूत्र ह्या पासुन उत्तम दर्जा चे शेणखत निर्माण होते हे आधुनिक शास्त्र नी सुद्धा सिद्ध खूप लोकांनी केले असेल.
गायी चं दूध लहान मुलांसाठी अतिशय उत्तम आहार आहे आताचे आधुनिक शास्त्र शिकलेले डॉक्टर पण मुलांना गायी चं दूध द्या असाच सल्ला देतील.
. गायी पासुन जो बैल निर्माण होतो तो शेताची काम त्या वेळेस करत होता
रेडा पण शेत कामासाठी वापरला जातो.
पण भर उन्हात फक्त बैल चं दिवसभर काम करू शकतो रेडा करू शकत नाही त्याला ऊन सहन होत नाही.
बैल चपळ आणि काटक असतो रेडा ढिला आणि अवजड
असतो.
.
काहीच वर्षा पूर्वी जेव्हा कोणत्या चं गोष्टी चं व्यापारीकरण झाले नव्हते.
तेव्हा गायी विकली जात नसे फुकट लोकांना सांभाळ्याला दिली जायची.
बैल म्हातारा झाला तरी शेतकरी तो विकत नसतं दावणी वर त्याला वृद्ध पणा मुळे मृत्यू यावा असेच शेतकऱ्या न ची भावना असे.
पहिले डॉक्टर देव स्वरूप होते, शिक्षक गुरु सामान होते.
व्यापारीकरण तेव्हा नव्हते लोक कर्तव्य म्हणून काम करत असत.
आज सर्व चं क्षेत्रात कर्तव्य म्हणून कोणी काम करत नाही.
फसवणूक, अडवणूक करून पैसे लुटले जातात त्या गोष्टी ला गोड नाव व्यापारीकरण आहे.
पूर्ण दुनिया व्यापारी करणात व्यस्त आहे आणि ग्रामीण भागातील लोक आणि शेतकरी ह्यांनी मात्र कर्तव्य म्हणून दूध उत्पादन करावे, अन्न धान्य उत्पादन करावे, उच्च नीती मत्ता पाळावी अशी अपेक्षा शहरी लोकांनी ग्रामीण भागातील लोकांन कडून ठेवणे हा उच्च दर्जा चं मूर्ख पणा आहे
.
माझा मुद्दा हा या व्यापारीकरणावरच आहे. पराग मिल्क या लिस्टेड कंपनीचा भाग्यलक्ष्मी नावाचा ब्रँड आहे. ज्याचे दूध मिडियातल्या गॉसिपनुसार सेलिब्रेटीजना पुरविले जाते. या कंपनीत जर्मन तंत्रज्ञानाच्या सहायाने दूध काढतात तिथे मला वासरे दिसली नाहीत. मि. मिल्क वाले काही काळासाठी वासरासाठी एक पान्हा मोकळा सोडतात. पण काही काळासाठीच. अन्यथा ते व्यावसायिक दृष्ट्या परवडणारे नाही. शिवाय वासराला ते फक्त दूध काढण्याच्या वेळी सोडतात. बाकी वेळी वासराला गाईपासून वेगळे ठेवतात जेणेकरून गायीचे दूध संपवू नये. अपवाद वासराचा जन्म झाल्यावर काही दिवस. दोनही कंपन्यांचे व्हिडिओज युट्युबर शोधल्यास मिळतील. नव्वदीच्या दशकात माझ्या लहानपणी वासराने बराचचेळ दूध प्यायल्यानंतर दूध काढले जात असे. तेव्हाही वासराला/रेडकूला दूर लोटून मग दूध काढताना पाहिले आहे. त्यामुळे आणि कोकणातल्या गायी म्हशी या एकंदर दूध देणार्या नसल्याने सगळा भार हा नेस्लेच्या दूधाच्या भुकटीवर असायचा असे अंधुकसे आठवते. नंतर कधीतरी रेफ्रिजरेटेड ट्रान्सपोर्ट्रेशनची सोय झाल्यावर, पिशव्याच्या रुपात कोल्हापूर महासंघाचे दूध कोकणात येऊ लागले.
दुसरा अगदीच बेसिक प्रश्न. माजावर आल्यावरच हस्तक्षेप करून गाभण ठेवतात हे मलाही माहीत आहे. पण माजावर आलेली प्रत्येक म्हैस वा गाय नैसर्गिकरीत्या गाभण रहातेच का? बरे रहात असेलही तरीही त्यात माणसाने हस्तक्षेप करणे कितपत योग्य (कुठल्याही मार्गाने अगदीच सिमन स्ट्रॉ नेच असे नाही) खास करून जेव्हा गोमाता अशी भावना असताना? त्या तशा भावना नसतील तर काहीच म्हणणे नाही.
बाकी बैलांचे म्हटलात तर पशूगणनेची आकडेवारी मिळाली की ट्रेंड पाहून अधिक बोलता येईल. मी फक्त निरिक्षण नोंदविले आहे तेही एकाच छोट्याशा भौगोलिक भागाचे.
राहीला मुद्दा शेणाचा. त्यांचे कंपोस्ट करून नाही विकले, दही, ताक, तूप, आईस्क्रीम अशी अन्य उत्पादने नाही विकली तर नुसत्याच दुधासाठी गायी पाळणे फायदेशीर होणार नाही हे मि. मिल्कच्या मालकाचेच म्हणणे आहे. जमिनीचा पोत सुधारणारी अनैसर्गिक खते वाईटच हा मुद्दा कदाचित वादाचा होऊ शकतो. त्यात मला जास्त काही माहीत नाही. पण इतकेच कळते की सरकार अजूनही फर्टीलाजर सबसीडी देते. आणि फर्टीलायजर कंपन्यांची उलाढाल गेल्या कित्येक दशकात वाढतच आहे.
समतोल विचार केला पाहिजे
1) जगात 196 देश आहेत त्या मधील मोजकेच भारत, नेपाळ, श्रीलंका अशा तीन चं देशात शाखा हरी लोक थोडी फार आहेत.
बाकी 193 देशातील लोक मांसाहार करतात.
सीमेन्स देणे, वासाराला दुध न देणे, शेत कामासाठी जनावरे वापरणे हे तुम्हाला पटत नही तुमचे हळव. मन दुखावत आहे.
तर 193 देशातील करोडो ton मांस लागते त्या साठी लाखो जनावर न ची हत्या होते ह्या बाबत मात्र तुमचे हळवे मन दुःख व्यक्त करत नाही.
. समतोल विचार लोक करत नाहीत ते मला दुःख दायक वाटते.
2) हे मांस चं मार्केट खूप मोठं आहे पण ते विकेंद्रित आहे म्हणजे गुर पाळणाऱ्या लोकांन पर्यंत ते विस्तारले आहे.
किती तरी लोकांची जीविका त्या वर चालते.
ह्या मोठ्या मार्केट चं फायदा घेण्यासाठी चं कृत्रिम मांस ची आयडिया उद्योगपती लोकांच्या मनात आली आहे म्हणजे एक दोन लोक चं ह्या मार्केट वर अधिकार गजवतील खुप लोक त्या मुळे बेकार होतील हा सर्वात मोठा दुष्परिणाम होईल.
कृत्रिम मांस बनवताना प्राणी पाळण्या पेक्षा जास्त प्रदूषण होत.
ह्या कृत्रिम मांस चे मानवी शरीरावर विपरीत परिणाम पण नक्की होतील.
तुम्ही अजून खोलात गेलात तर लक्षात येईल.
औषध उत्पादन, अगदी it क्षेत्र पर्यंत ह्या कंपन्यानी स्वतःचे संशोधक पाळले आहेत ते जे मालक सांगतील तेच संशोधन करतात आणि मालक सांगतील तेच त्या शोधाचे फायदेसांगतील.
आणि science वरील मॅगझीन जाहिरात करतात तसें ते शोध प्रसिद्ध करतील.
आता धार्मिक अंध श्रद्धा न पेक्षा science च्या नावावर जास्त अंध श्रद्धा समाजात पसरवल्या गेल्या आहेत..
कारण लोकांना जाहिरात आणि सत्य ह्या मधील फरक समजून घेण्याची तसदी घेण्याची तयारी नाही.
अंध विश्वास ठेवतात लोक.
गाय hi पवित्र आहे हा विचार आता ह्या दशकात किंवा समाजात निर्माण झाली आहे का?
जेव्हा यांत्रिक युग नव्हते तेव्हा गाय ही कामधेनू सारखीच होती.
त्या वेळेस गाय पवित्र आहे हा विचार योग्य चं होता.
आता काही म्हणतील ह्या जुन्या खुळचाट कल्पना सोडून द्या.
अगदी योग्य आहे.
पण हा सल्ला फक्त हिंदू नाच दिला जातो बाकी कोणाला हा सल्ला दिला जात नाही जसे बाकी सर्व धर्माच्या परंपरा त्रिकाल बाधित पवित्र चं आहेत आणि सत्य आहेत असे ह्यांना वाटत.
ह्या असल्या दोन तोंडानी बोलणाऱ्या लोकांन सत्य ची बिलकुल चाड नसते फक्त ते अजेंडा चं चालवत असतात हे मत पक्क होते
(अतिअवांतर)
सर्वप्रथम, चिमणरावांचा प्रस्तुत प्रतिसाद बोले तो दस्तुरखुद्द चिमणरावांच्या बालपणाचे वर्णन नसून, येथे कोठल्या प्रकारचे लेखन (चिमणरावांना) अपेक्षित आहे (आणि/किंवा वाचावयास आवडेल), याच्या वानगीदाखल, एक आदर्श प्रारूप (मॉडेल)/नमुना म्हणून त्यांनी तो लिहून दाखविला असावा, असा निदान माझा तरी ग्रह झाला. (चूभूद्याघ्या.) त्यामुळे, चिमणरावांना दोष देण्यात (अथवा त्यांच्या प्रस्तुत प्रतिसादाची मापे काढण्यात) हशील नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, (चिमणरावांच्या बालपणीच्या) डोंबोलीबद्दल कल्पना नाही, परंतु, माझे स्वतःचे बालपण पुण्यातील ज्या नारायण पेठेत गेले, जेथे मी लहानाचा मोठा झालो, तेथे, आमच्या शेजारच्या वाड्यात एक जोशी वकील राहात असत. त्यांच्या वाड्यात एवढी मोठी जागा नक्की कोठे होती, हे काही मी पाहावयास त्यांच्या वाड्यात कधी शिरलेलो नाही, परंतु, आत कोठेतरी एक गोठा होता, आणि, त्यात (माझ्या अंदाजे) गेला बाजार पंधरा ते वीस म्हशींचा एक तांडा होता, एवढे निश्चित. आता, या पंधरा ते वीस म्हशींचे दूध काही जोशी वकील जातीने काढीत नसावेत, हे ओघानेच आले; त्याकरिता त्यांनी पूर्ण वेळ एक पगारी मनुष्य नेमलेला होता. (मात्र, कोर्टात दिवसभर केसा लढवून संध्याकाळी घरी परत आल्यानंतर, ते दूध विकण्यासाठी वाड्याच्या रस्त्यावरील दर्शनी खोलीत जोशी वकील स्वतः बसलेले अनेकदा दिसत, एवढे आठवते.) ते असो. तर आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे, रोज सकाळी तो म्हशींचा तांडा रस्त्यावरील रहदारी रीतसर अडवीत, धुवायला म्हणून, ओंकारेश्वराकडे जाणाऱ्या रस्त्याने (वाटेत लागणारा न.चिं. केळकर रस्ता ओलांडून) मुठा नदीकडे रमतगमत जात असे, नि तासा-दोन तासांनंतर, मनसोक्त धुवून (नि डुंबून) झाल्यावर, पुन्हा त्याच रस्त्याने उंडारीत वाड्यातील गोठ्याकडे परत येत असे, या (रोजच्याच) दृश्याने आमच्या नयनांचे पारणे प्रतिदिनी फिटे.
(जोशी वकिलांच्या या म्हशींच्या तांड्याप्रमाणेच, आणखीही एका श्वापदाने आमचे नारायण पेठेतले अन्यथा नीरस असे बालपण समृद्ध केले. त्या काळात, नारायण पेठेतील जुने वाडे पाडून त्या जागी ओनरशिपचे फ्लॅटवाल्या इमारती बांधण्याकडील बिल्डरांचा कल नुकताच सुरू झाला होता. त्यामुळे, बांधकामावरील गाढवांचा तांडादेखील रस्त्यातून अधूनमधून जाताना दिसत असे. इतके निरागस श्वापद मी आजतागायत दुसरे पाहिलेले नाही! पाठीवर बांधकामाच्या सामानाची ओझी बांधलेल्या अवस्थेत, शाळेतील कवायतीच्या तासाला एका हाताने मोजल्यासारखे अंतर ठेवून सिंगल फायलीत रमतगमत हे तांडे पथक्रमण करीत असत. अशा वेळेस कधीकधी निसर्गनेमानेच पैकी मधल्याच एखाद्या गर्दभाची कामभावना अचानक उद्दीप्त होत असे. नि मग, काय विचारता, महाराजा! ‘हाज़िर सो वज़ीर’ (अथवा, ‘मजबूरी का नाम महात्मा गाँधी’) या राष्ट्रभाषेतील उक्तीस अनुसरून ते गाढव, आपल्या समोरील जेमतेम हाताने मोजलेल्या अंतरावरील दुसऱ्या गाढवाबरोबर भर रस्त्यात पाठीवरील ओझ्यासहित… जाऊ द्यात! त्या तांड्यावर लक्ष ठेवण्याकरिता जो मुकादमवजा मनुष्य नेमलेला असे, तो अशा वेळेस त्या चुकलेल्या गाढवाच्या पाठीत दाणकन दंडुका हाणून पुढील अतिप्रसंग टाळीत असे. (दुष्ट!!!!!! त्याच्याही पाठीत ऐन मोक्याच्या वेळी असाच कोणीतरी… असो.) ते एकसमयावच्छेदेकरून नयनमनोहर तथा शैक्षणिक असे दृश्य माझ्या मनःपटलावर आजतागायत, कायमचे कोरले गेलेले आहे. चालायचेच.)
तर सांगण्याचा मतलब, म्हशी तथा गाढवे यांच्याबद्दलचे आमचे प्रेम (तथा त्यांच्याप्रति असलेली सौंदर्यास्वादक दृष्टी) ही तेव्हापासूनची (तथा अशा रीतीने निर्माण तथा विकसित झालेली) आहे. (पालींबद्दलची आमची भक्ती तथा सौंदर्यपिपासा हीदेखील तेव्हापासूनचीच; मात्र, तीस कारणीभूत आमच्याच घरात बागडणाऱ्या तथा आमच्याबरोबर लहानाच्या मोठ्या झालेल्या पाली होत्या. असो.)
——————————
(द्या पाहू आता ज्ञानपीठ पारितोषिक!)
खरे आहे!
गोमयाचे महत्त्व निर्विवाद आहे. किंबहुना, नुकत्याच पार पडलेल्या भारत-पाक युद्धकल्पात१, दहशतवाद्यांच्या तळांवर (झालेच तर पाकिस्तानच्या लष्करी विमानतळांवरसुद्धा) क्षेपणास्त्रांतून बाँबगोळे फेकण्याऐवजी, (क्षेपणास्त्रांतूनच) गोमय जर फेकले असते, तर (दहशतवाद्यांचा नि पाकिस्तानी लष्कराचा) निःपात तर झाला असताच, शिवाय त्याचबरोबर त्यांची शुद्धीसुद्धा झाली असती२, हा दुहेरी फायदा झाला असता.
परंतु, स्वतःस कट्टर हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या मोदीसरकारच्या ध्यानात काही ही गोष्ट आली नाही, याचे आश्चर्य (खरे तर वाटावयास पाहिजे, परंतु) वाटत नाही. (चालायचेच!) नाहक बाँबगोळ्यांवर खर्च झाला!
ऐसीअक्षरे: या इसमास नि त्याच्या विष्ठाप्रपातास या संस्थळावर नक्की काय म्हणून tolerate केले जाते? ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्या’च्या नावाखाली काय वाटेल ते (अगदी ‘फडतूसांना गोळ्या घातल्या पाहिजेत’पर्यंत) खपवून घेण्याची ‘ऐसीअक्षरे’ची परंपरा जुनी आहे, याची कल्पना आहे. (आणि, ती आपल्या जागी ठीकच आहे.) परंतु, काही किमान दर्जाची अपेक्षा अगदीच अनाठायी असावी काय?
काय सकाळीसकाळी पो टाकून ठेवला आहे!
नाही म्हणजे, गोमय पवित्र असेलही. परंतु, म्हणून पटाईतमय कपाळी फासून हिंडण्याचेही काही कारण नसावे, नव्हे काय?
असो चालायचेच!
——————————
१ जे ‘द्वीप’ (island) नव्हे, परंतु (तीन बाजूंनी समुद्र असल्याकारणाने) ‘जवळजवळ द्वीप’ आहे, त्याला हिंदीत ‘द्वीपकल्प’ (peninsula) असे संबोधतात.१अ तद्वत्, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सांप्रतकाळी झालेल्या हाणामारीस ‘युद्धकल्प’ असे संबोधण्यास प्रत्यवाय नसावा, नव्हे काय?
१अ याकरिता मराठीतसुद्धा काही संज्ञा आहे. परंतु, मला या क्षणी नेमकी ती आठवत नाही. चालायचेच! (हिंदीचे मराठीवरील आक्रमण/अतिक्रमण?)
२ अखेरीस, पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांच्या काय किंवा पाकिस्तानी लष्कराच्या काय, लेखी, त्यांची शुद्धी करण्याइतका मोठा त्यांचा निःपात दुसरा नसावा, नव्हे काय?