सिस्टर मिडनाईट
एका सामान्य स्त्रीचं रूपांतर चांडाळणीत कसं होतं, ह्याचं स्थित्यंतर दाखविण्याचा विनोदी अंगाने केलेला प्रयत्न. चांडाळ-चांडाळणी ह्या उपमा त्या लोकांसाठी असतात, की ज्यांना परजीवांचं रक्त पिऊनच शरीर चालू अवस्थेत ठेवावं लागतं, प्राचीन काळापासून ही संकल्पना आहे, कुत्र्यांचं मांस अति चविष्ट असतं चांडाळांना, पाश्चिमात्यांतही अश्यांना व्हायम्पायर म्हणवले जाते, त्यांना कोल्ह्याचं सख्य जास्त असतं.
एकंदरीत सुरूवात हलकीशी मंद वाटणारी, तसाही फारकाही वेग शेवटपर्यंत पकडला गेलेला नाही, पण शेवटी शेवटी जरा खुलविण्यासाठी वाव होता, पण हात खूपच आवरता घेतलेला दिसतो. त्याचप्रमाणे संवादांची ही मोजकीच ठेवण आहे, आजकालच्या मारधाडीच्या लोंढ्यात तर अगदीच संथ वाटेल असा चित्रपट, मध्येमध्ये स्पॅनिश का इटालियन कुठल्याशा संगीत-गीतांचे विलोभनीय; चित्रपटात साचलेली शांतता आणि ठेवलेला अंधारही सुसह्य करणारी स्वरांची पेरण, प्रासंगिक विनोदही साजेसेच असा चित्रपट एका माणसाच्या मृत्यूच्या प्रसंगानंतर जरा अंगावर येतो, पण चांडाळणी आपल्याच पतीला खाऊन पुन्हा जीवंत करण्याची मनोमन खात्री बाळगून असते, ती काही पूर्ण होत नाही मग शेवटी ती त्याला जाळते आणि त्याची राख आपल्या अंगाला फासते. तेव्हाच्या प्रसंगात तिच्या बाजूला बसलेला भगव्यात असलेला संन्यासी भगवाच फ्यांटा पिताना दाखवलेले रूपक आपल्याला तंतरून टाकते. बुद्धाच्या स्त्री अनुयायांच्या सोबतची तिची तडफडही लोभस वाटते.
तिने खाल्लेले मांस पुन्हा जीवंत होतात हे वास्तवातले भान आणि तिच्या मनातील चाललेला भ्रामक खेळ या सीमेरेषेवर चित्रपट चालत राहतो, आणि तिच्यात काही असाधारण असण्याचा निश्चय ठाम होतो, तेव्हा तिचा प्रवास हिमालयाच्या दिशेने काळ्या रंगाच्या शृंगारात व पेहरावात सुरू होतो आणि चित्रपट संपतो.
आपली आपल्यातली असाधारण असणारी मनोवृत्ती कशा आणि कोणत्या प्रकाराने दृढ होत असते त्याचा हा चित्रपट.
पागल लोकांनी जरूर पहावा.
बेंगळुरू, ४ जून २०२५
पागल
पागल हा शब्द वाचून पुन्हा एकदा धागा वाचला. कुठे बघितला सिनेमा, स्ट्रिमिंगवर आहे का?