Skip to main content

बुवाबाजीत करीअर करणाऱ्यांसाठी...

काही नतद्रष्टांच्या भांडाफोड उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक बुवा-बाबा-महाराज-माँ-देवी इत्यादींना सक्तीने निवृत्त व्हावे लागत आहे. काही जण जेलची हवा खात आहेत. काही जण तोंड दाखवू नये म्हणून कुठे कुठे तरी लपून बसलेले आहेत. बहुतेकांची दुकानदारी बंद झालेले आहेत. अधेमधे लुडबुड करणारे दलाल, बाबा-बुवापर्यत भक्तांना पोचविणाऱ्या सोई-सुविधांचे सोय करणारे सेवेकरी, जीप-कार्सचे व्यावसायिक, हॉटेलचे मालक इत्यादींचा धंदा बसला आहे. तरीसुद्धा काही अनुभवी बुवा-बाबांना हा धंदा पुन्हा तेजीत येईल व बुवाबाजीला लागलेली उतरती कळा संपून चांगले दिवस येतील, असेही वाटत असेल. आजकालच्या बेरोजगारीच्या काळात काही जण तरी या धंद्याकडे आकर्षित होतील असे वाटणाऱ्यामधील एका वृद्ध व अनुभवी बाबाने बुवाबाजी व्यवसायातील होतकरू तरुण बुवांसाठी एक पत्र लिहून बुवाबाजी व्यवसायात नेमके काय करावे याचे उपदेशपर मार्गदर्शन केले आहे. त्याच्या पत्रातील मजकूर असा आहेः
तुम्ही इतर सर्व करीअर सोडून बुवाबाजीचे करीअर निवडल्याबद्दल तुम्हा सर्वांचे हृत्पूर्वक अभिनंदन. ही तुमची निवड नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. तुमच्यातील अल्पबुद्धीला व नैतिकतेच्या बद्दल अजिबात काळजी करायचे नाही या मनस्थितीला योग्य व त्याबरोबरच बक्कळ पैसा व प्रसिद्धी मिळवून देणारा हा व्यवसाय असून योग्य पावलं उचलल्यास तुमची नक्कीच भरभराटी होऊ शकेल.
सर्वात महत्वाचे म्हणजे या करीअरसाठी तुम्ही निवडलेली वेळ नक्कीच फलदायी ठरणार आहे. त्याबद्दलही मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो.
देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी झालेले आहेत. सरकारी नोकऱ्या मिळवणे या जन्मी तरी शक्य होणार नाही. तिकडे अमेरिकेतील ट्रम्प महाशय आपल्या देशातील सायबर कूलींना हाकलून देत आहेत. रिकाम्या हातांना व डोक्यांना फक्त समाज माध्यमांचा आधार आहे. परंतु त्यातून पोटं भरत नाहीत, याची जाणीव होत आहे. भडकलेली डोकी नको त्या उद्योगात पडत आहेत. त्यामुळे तुमच्यासारख्या बुवा-बाबांचा धंदा तेजीत चालण्याची शक्यता भरपूर आहे. कारण तुम्हीच – फक्त तुम्हीच – त्यांच्या या दुस्थितीवर फुंकर घालत बेमालूमपणे, त्यांना कळू न देता, आपली पोळी भाजून घेऊ शकता. तुमचे शब्द झेलण्यासाठी लाखो भक्त तयार आहेत. त्यामुळे तुमचा भांडाफोड होईपर्यंत तुम्ही तुमच्या करीअरच्या उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचलेला असाल. नंतर काय होणार आहे याची काळजी आताच कशाला?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या मदतीला व दिमतीला ‘विश्वगुरु’ची साथ सदैव असेल. जरी विश्वगुरूची भाषा अत्याधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली वाटत असली तरी त्यांनी आपल्या अथक प्रयत्नातून समाजातील अंधश्रद्धांना खतपाणीच घालत आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. त्यांच्या या कालखंडात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत, याबद्दल दुमत नसावे. त्यांचे देवळात जाणे, लहान-मोठ्या देवळांचे उद्घाटन समारंभ करणे, ध्यान करण्यासाठी एकांतवास स्वीकारणे, पवित्र नद्यात-समुद्रात डुबकी मारणे, डुबकी मारताना अंगरक्षक (व व्हिडिओ शूटिंग करणारे) असतील याची खात्री करून घेणे, मोठमोठे धार्मिक समारंभ आयोजित करणे इत्यादीमुळे आमच्यासारख्या बाबा-बुवांची पत परत मिळविणे शक्य होत आहे. त्यानी आयोजित केलेले कुठलेही समारंभ असो, आमच्यापैकीचे स्वामीजींची फौज कायम पडद्यावर दिसेल याची ते काळजी घेतात. यावरून बाबा-बुवांना मरण नाही हेच सिद्ध होते.
शेवटी करीअर म्हणून हा दैवी उद्योग स्वीकारल्यानंतर खाली उल्लेख केलेले काही पथ्ये पाळण्याची गरज आहे. त्यामुळे तुमचे करीअर लवकरात लवकर फळं देत राहील याबद्दल शंका नसावी. या करीअरची एक खासीयत आहे. ती म्हणजे यासाठी तुम्हाला NEET, JEE, CET असली कुठलीही प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही.
• स्वतःचे ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे. या पूर्वीचे सर्व बाबा-बुवा आपापल्या ठिकाणी हेच करत आलेले आहेत व बहुतेक सर्वांनी अजिबात विचार न करता माझ्या शब्दावर विश्वास ठेवा हा एकमेव मंत्र घोकत आलेले आहेत. (ते तुमचे भक्त झालेत याचाच अर्थ ते डोक्याने बधिर आहेत यात शंका नसावी.)
• तुम्हालासुद्धा आपले ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी काही बझवर्ड्स व काही वाक्यं, तुमचाच असा वाटणारा व सगळ्यांचे लक्ष वेधणारा रंग व पोषाख यावर लक्ष केंद्रित करावा लागेल. या करीअरमधील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला सामान्यांच्या मनामध्ये तुमचीच अशी एक अनोखी प्रतिमा उभी करावी लागेल. बुवाबाजीसुद्धा एक उद्योग असून इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे समाजात पाय रोऊन उभे राहण्यासाठी सुरुवातीच्या काही काळासाठी तरी तुमच्या ब्रँडसाठी तुम्हाला प्रयत्नशील रहावे लागेल. एकदा तुमचा ब्रँड प्रस्थापित झाल्यानंतर तुम्हाला (दुसरा/दुसरी तुमच्यावर कुरघोडी करेपर्यंत) काळजी करण्याचे कारण नाही.
• तुमच्या बोलण्याला व वागण्याला काही अर्थ असावा अशी अपेक्षाच कधी करू नये. जितकी निरर्थक बडबड वा हातवारे तितकी तुमच्या उद्योगाची चलती. अविवेकीपणावर श्रद्धा हेच तुमचे उद्दिष्ट. त्या श्रद्धेस तडा जाऊ नये असे कुठलेही भाष्य करू नये याची काळजी घ्यावी. गंभीर चेहऱ्याने मनाला येईल तसे बडबड करत राहणे वा असंबद्ध बोलणे याची भरपूर प्रॅक्टीस करावी. गंमत अशी आहे की असे काही करत राहिल्यास आमच्यासारखे वृद्ध बुवा-बाबासुद्धा तुमच्या या अफाट कत्तृत्वावर खुश राहतील व तुमचा हा (फसवणुकीचा) धंदा बिनधास्त चालू राहील. जर कुणी कुत्सितपणे तुमच्या या धंद्यात आड येत असल्यास साम-दाम-दंड-भेद वापरून त्याचा नायनाट करणे हे तुमच्या हातात असेल.
• जितके जास्त वेळा तुम्ही सत्संगाचे प्रवचन करू शकाल तितकी तुमची प्रसिद्धी होत राहील. सम (अ)विचारी लोकात मिसळणे तुमच्या प्रकृतीला नेहमीच चांगले. सत्संग हा आपलेपणाला बढावा देतो, त्यातून बिरादरी वाढते. तुमच्या भक्तांची चांगली ओळख होते व यानंतर तुम्हाला काय करावे याची दिशा मिळते. धीर–गंभीर आवाज यासाठी कामी येईल. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व गुण नसले तरी चालतील, वक्तृत्व कला आत्मसात करा.
• तुम्हाला गर्दीची भाषा कळायला हवी. गर्दीचे एक मानसशास्त्र असते. ज्या गोष्टी एकट्या-दुकट्याने करण्यास घाबरतात तेच गर्दीत असताना बिनधास्त करतात. त्यामुळे तुम्ही गर्दीकडून काय करून घेता येईल याचा अंदाज घेत आपला कार्यभाग उरकून घ्यावे.
• तुमची भरपूर प्रसिद्धी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावे. सत्संगाच्या वेळी भरपूर फ्लडलाइट्स, उंचावरील आकर्षक सिंहासन, भोवती तरुण/तरुणींचा गराडा, सतत व्हिडिओ कॅमेराची तुमच्यावर झोत इत्यादी गोष्टीमुळे झुंडीच्या झुंडी भक्तगण येत राहतील व तुमची प्रसिद्धी होत राहील.
• सत्संगांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सर्व संबंधितापर्यंत पोचविण्याची स्वतंत्र यंत्रणा तुमच्याकडे हवी. क्रेन्स वापरून रेकॉर्डिंग करणाऱ्यांना नेमावे. गर्दीला हे सर्व हवे असते. टीव्ही चॅनेल्सवर तुमचे सत्संग (रोजच्या रोज) प्रसारित होत राहतील याची काळजी घ्यावी.
• स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमांशी, नोकरशाहीशी व राजकीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवणे हितावह ठरेल. गर्दीची गरज तुम्हाला जितकी हवी तेवढी या (मतांसाठी हपापलेल्या) राजकीय नेत्यांना व (टीआरपीच्या मागे धावणाऱ्या) प्रसार माध्यमांनाही हवी असते. त्यामुळे तुमचे लागेबांधे असल्यास अडचणीच्या वेळी त्याचा भरपूर उपयोग होऊ शकतो.
• चमत्कार व भीती हे दोन्ही चांगल्यापैकी विकाऊ आहेत हे लक्षात असू दे. भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडणार हे गाजर कायम दाखवत रहावे. मग ते गाजर मोक्षप्राप्तीची असो की मनशांतीची असो की एखादी दुःखद घटना विसरण्याची असो. त्याच प्रमाणे भीतीच्या टांगत्या तलवारीचीसुद्धा भक्तांना कल्पना देत रहावे. मी सांगतो त्या प्रमाणे न केल्यास काही तरी वाईट घडेल असे कायम घोकत रहावे. त्यामुळे काही तरी वाईट घडल्यास आपलेच काही तरी चुकले असावे म्हणून ते स्वतःला दोष देत राहतील व चांगले काही तरी झाल्यास त्याचे क्रेडिट तुम्हाला मिळेल.
• अती सामान्य (गरीब, वंचित इ.इ.) जनतेच्या खिजगणतीत आपण असता कामा नये. पहिल्यांदा तुमचे जे काही आहे ते सर्व श्रीमंत भक्तांसाठी असू दे. बाकीचे नंतर आपोआप तुमच्यामागे येतील. श्रीमंत भक्त तुमच्यासाठी राजमहालवजा आश्रम बांधून देतील. दर्शनासाठी वेगळा हॉल त्यात असेल. (यातूनच त्यांचा सामाजिक स्तर उंचावेल.) त्यांच्याच मर्सीडीस वा BMWमधूनच जास्तीत जास्त प्रवास करणे उचित ठरेल. एकदा तुमच्याकडे बक्कळ पैसा आल्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची असल्याच प्रकारची गाडी घेऊ शकता. श्रीमंतानाच तुम्हाला मोठी देणगी द्याविशी वाटेल कारण करचुकवेगिरी केलेला हरामाचाच पैसा ते तुम्हाला देतात. त्यामुळे यात कुठलीही नीती-मूल्यांचा प्रश्न येत नाही.
अजून भरपूर काही मला सांगायचे आहे. पुन्हा केव्हा तरी (गरज भासल्यास) मी सांगेन.
तुमच्या करीअरसाठी माझे शुभकामनाए...
(टीपः हे सर्व करीअर करणाऱ्या महिलांच्यासाठीसुद्धा आहे.)

Rajesh188 Mon, 09/06/2025 - 19:48

श्रध्येच्या दृष्टी, अंध श्रध्येच्या दृष्टी नी, विज्ञान च्या दृष्टी नी, राजकीय दृष्टी नी, सामाजिक शस्त्र च्या दृष्टी नी.

कोणत्या ही दृष्टी नी विचार केला तरी हा लेख काही दर्जेदार नाही.
Zero गुण देण्याच्या लायकीचा पण नाही minus 1000 नंतर च काही तरी गुण देता येतील दर्जा बाबत

अहिरावण Mon, 16/06/2025 - 14:20

In reply to by प्रकाश घाटपांडे

मौजमजा हे दाखवायचे दात आहेत.

तुम्ही जुने जाणते "नानावटी" सारख्या लोकांना तुम्ही नीट ओळखत नाही असे म्हणणे धाडसाचे.

अहिरावण Mon, 16/06/2025 - 14:21

In reply to by विवेक पटाईत

एका व्यक्तीचा नाही.. एका समाजाचा. हिंदू समाजाचा द्वेष करणारा नानावटी मुसलमानांबद्दल फार प्रेमळ असतो... वाचा त्याचे जुने लेखन.

'न'वी बाजू Mon, 16/06/2025 - 20:32

In reply to by अहिरावण

नानावटी मुसलमानांबद्दल फार प्रेमळ असतो...

नानावटींचे लेखन वाचलेले नसल्याकारणाने (सहसा वाचीत नसल्याकारणाने), हे कधी जाणवले नव्हते. पण आता तुम्हीच म्हणताहात तर, असेल ब्वॉ.

बादवे, हा प्रतिसाद म्हणजे, नानावटींचे (अन्यथा रटाळ असे) समग्र जुने (फॉर्दॅट्मॅटर नवेसुद्धा; तेदेखील तितकेच रटाळ असते!) लेखन वाचण्यास (ऑफ ऑल द पीपल) विवेक पटाइतांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न आहे, किंवा कसे?

नाही म्हणजे, अशी मार्केटिंग टॅक्टिके सहसा यशस्वी होतात, असा अनुभव आहे, म्हणून म्हटले.

सलमान रश्दीचे ‘सॅटनिक व्हर्सेस’ जेव्हा बाजारात आले, तेव्हा त्यात प्रेषित मुहंमदाकरिता काही बदनामीकारक मजकूर आहे, अशी आवई उठली. (असेलही कदाचित. मला आजतागायत कल्पना नाही.) त्याविरुद्ध आंदोलने वगैरे (विशेषेकरून भारतात) झाली. भारतात (उर्वरित जगाअगोदर) या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. भारतातील (तथाकथित) लिबरल वर्तुळांत, ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपीऽऽऽऽऽऽ!’ म्हणून त्याविरुद्ध बोंबाबोंबही झाली. (पुढे इतरही काही — विशेषेकरून इस्लामी — देशांत या पुस्तकावर बंदी घालण्यात आली, झालेच तर, इराणच्या अयातुल्लाह खोमेनींनी रश्दीविरुद्ध फतवादेखील काढला, वगैरे वगैरे बरीच मज्जामज्जा झाली.)

मध्यंतरी, जेथे या पुस्तकावर बंदी नव्हती, अशा (विशेषेकरून पश्चिमी) जगतात या पुस्तकाचा खप धोधो झाला.

आता, या सगळ्याने मला फरक पडण्याचे खरे तर काहीही कारण नव्हते. कारण, रश्दीची इतर काही पुस्तके मी अगोदर (लायब्ररीतून आणून, फुकटात!) वाचलेली असल्याकारणाने, हा मनुष्य बकवास (कोठल्यातरी अमली द्रव्याच्या तारेत असल्यासारखा काहीही) लिहितो, याची पूर्वकल्पना होती. त्यामुळे, त्याचे नवे पुस्तक आले काय, त्यात त्याने काही स्टंटबाजी केली काय, नि त्या पुस्तकावर बंदी आली काय, यापैकी कशाचेच मला सोयरसुतक नव्हते. कारण, ज्या पुस्तकाच्या (नि लेखकाच्या) वाटेस मी तसाही गेलोच नसतो, त्याची चिंता मी काय म्हणून करू?

पुढे अमेरिकेत आलो. आल्यापासून एकदोन आठवड्यांतच एका पुस्तकांच्या दुकानात जाण्याचा योग आला. नेमके ‘सॅटनिक व्हर्सेस’ शेल्फावर दिसले. आणि, ‘एवढे भारत सरकारने बंदी घालण्याइतके शिंचे होते तरी काय या पुस्तकात?’ हे कुतूहल जागृत झाले. आणि, पदरचे (तेव्हा परवडत नसलेले) दहा डॉलर खर्ची घालून ते पुस्तक मी विकत घेतले. (असे कुतूहल जागृत होण्यासारख्या घटना भूतकाळात जर घडल्या नसत्या, तर एरवी मी या पुस्तकाच्या वा या लेखकाच्या वाटेस जाण्याची शक्यता (विशेषतः, पदरचे पैसे खर्ची घालून) शून्य होती.)

पुस्तक विकत घेऊन घरी आणले, नि वाचायला घेतले. अर्ध्या प्रकरणाहून अधिक वाचवले नाही. त्यात काही प्रक्षोभक अथवा भावना दुखावणारे आढळले, म्हणून नव्हे, तर अव्वल दर्जाचे ट्रॅश निघाले, म्हणून.

आता, त्या पुस्तकात पुढे कोठेतरी प्रेषित मुहंमदासंबंधी (लोक म्हणतात तसा) काही बदनामीकारक मजकूर असेलही, किंवा नसेलही; मला आजतागायत कल्पना नाही, तितक्या पुढपर्यंत ते पुस्तक मी वाचू शकलेलो नाही. ज्यांनी ते पुस्तक तितक्या पुढपर्यंत वाचले, त्यातून त्यांना काही अर्थबोध झाला, नि त्यातील प्रेषिताबद्दलचा (असल्यास) बदनामीकारक मजकूर नेमका टिपून नि समजून ज्यांच्या भावना दुखावल्या, त्यांच्या पेशन्सला माझा सलाम! तितक्या पुढपर्यंत प्रस्तुत पुस्तक वाचू शकल्याबद्दल!

आजही ते पुस्तक माझ्या संग्रही, माझ्या घरातील बुकशेल्फावर पडून आहे. अर्ध्या प्रकरणाहून अधिक न वाचलेले. एकोणीसशे ब्याण्णवाच्या इसवीत दहा डॉलर अक्कलखाती खर्च केल्याची पावती, म्हणून.

बाकी, प्रस्तुत पुस्तकावर बंदी घालण्यामागील भारत सरकारचा (अथवा रश्दीविरुद्ध फतवा काढण्यामागील अयातुल्लाह खोमेनींचा) इरादा नेक असेलही कदाचित, परंतु व्यवहार्य खासा नव्हता. व्यवहार्य जर असता, तर रश्दीच्या पुस्तकाच्या खपास हातभार लावल्याप्रीत्यर्थ त्या खपातून होणाऱ्या नफ्यातला काही हिस्सा दोघांनीही मागून घेण्यास वास्तविक काही हरकत नव्हती.

(नानावटींच्या लिखाणातून यदाकदाचित त्यांना पुढे कधी काही आर्थिक लाभ जर झालाच, तर आपणही त्यातला काही कट त्यांना न्याय्यपणे मागू शकताच!)


बाकी, विवेक पटाइतांना प्रभाकर नानावटींचे जुने-नवे लिखाण वाचण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नांतून काहीही हाती लागण्यासारखे नाही, असे अतिशय नम्रपणे सुचवू इच्छितो.

अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या (वा स्वातंत्र्यसमराच्या) उपरान्त, दिल्लीची नाममात्र उरलेली का होईना परंतु बादशाही सत्ता गुंडाळून दिल्लीत इंग्रजी सत्ता अधिकृतपणे रुजू झाल्यानंतरच्या काळात कधीतरी, दिल्लीतील (बहुधा खानेसुमारी करणाऱ्या) एका इंग्रज अधिकाऱ्याने एकदा मिर्ज़ा ग़ालिबला आपला धर्म विचारला.

ग़ालिबचे उत्तर: ‘अर्धा मुसलमान.’

अधिकारी बुचकळ्यात पडला, नि ग़ालिबला स्पष्टीकरण विचारले.

ग़ालिबचे म्हणणे: ‘दारू पितो. परंतु, डुक्कर खात नाही.’

सांगण्याचा मतलब, वरील न्यायाने, विवेक पटाईत काय, किंवा प्रभाकर नानावटी काय, ही मंडळी अर्धसाक्षर आहेत. त्यांना लिहिता येते; (दुसऱ्याने लिहिलेले) वाचता येत नाही. (कदाचित तुमच्याआमच्याबद्दलसुद्धा हेच म्हणता येईल, परंतु, या बाबतीत ही वरील मंडळी जरा जास्तच आहेत, हे कदाचित तुम्हीसुद्धा मान्य कराल.) त्यामुळे, विवेक पटाइतांना प्रभाकर नानावटींचे (किंवा स्वतः विवेक पटाईत सोडून इतर कोणाचेही) जुनेनवे काहीही वाचण्यास प्रवृत्त करण्यातून काहीही साध्य होण्यासारखे नाही; किंबहुना, ती गोष्ट त्यांच्या कुवतीबाहेरची आहे, एवढेच सुचवायचे आहे.

बाकी चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/06/2025 - 06:17

In reply to by 'न'वी बाजू

सलमान रश्दींची 'व्हिक्टरी सिटी' मला आवडली. जरूर वाचा.

त्या फतव्यामुळे (बहुतेक) उद्युक्त होऊन सलमान रश्दींवर माथेफिरूनं हल्ला केला; त्यात त्यांचा एक डोळा गेला. त्यानंतर ही कादंबरी आली. कादंबरीतलं मुख्य पात्र, पंपा कंपना, आंधळी होते हे सुरुवातीला, पहिल्याच परिच्छेदात, येतं. ते तसं का होतं याबद्दल बहुतेकशी कादंबरी आहे. चौदाव्या शतकातल्या विजयनगर साम्राज्यात ही पंपा कंपना आज एकविसाव्या शतकात अनेकांना झेपणार नाहीत अशा कल्पना मांडते. नाकर्त्या राज्यकर्त्यांच्या हातात तिची दुर्दशा होण्यात काही नवीन नाहीच.

इथे नानावटींच्या नावानं शंख करणाऱ्यांनी कदाचित याचा विचार करावा.

'न'वी बाजू Tue, 17/06/2025 - 16:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सलमान रश्दींची 'व्हिक्टरी सिटी' मला आवडली. जरूर वाचा.

नको ब्वॉ. ती तुम्हालाच लखलाभ होवो.

कसे आहे ना, की या लेखकाबरोबरचा माझा पूर्वानुभव फारसा उत्साहवर्धक नाही. त्यामुळे, यापुढे त्याने भगवद्गीता किंवा मध्य रेल्वेचे वेळापत्रक यांपैकी काही जरी लिहिले ((ऐकीव माहितीनुसार) ‘जगातल्या सर्वात थोर पुस्तकांपैकी काही’ अशा अर्थाने), तरीसुद्धा, ती पुस्तके (खास करून विकत घेऊन) वाचण्यात मला अजिबात स्वारस्य नाही.

तसेही, म्हटलेच आहे, की A fool and his money are soon parted. Well, I have better things to waste my hard-earned money on. त्यापेक्षा, तितक्या डॉलरांच्या नोटा पेटवून त्यांचा धूर करणे मी पसंत करेन. (किंवा, better still, तितक्या डॉलरांचा चेक मी स्वतःच्या नावे लिहीन, आणि तो पेटवून देईन.)

(बाकी, हा सलमान रश्दी काय, ती ‘लज्जा’वाली तस्लीमा नसरीन काय, ती अरुंधती रॉय काय, तो मुहंमदाचे व्यंगचित्र काढणारा डॅनिश व्यंगचित्रकार काय, ‘शार्ली एब्दो’वाले काय, किंवा संकीर्ण लिबरलांनी (हे मी स्वतःस लिबरलांत गणत असूनही लिहितो आहे — इदं न मम!)/तथाकथित literatiनी अथवा literary cognoscentiनी डोक्यावर चढवून ठेवलेली अन्य संकीर्ण मंडळी काय, ही सर्व मंडळी एकजात फाजील आहेत, हे माझे प्रामाणिक मत आहे. अर्थात, त्यांनी फाजील असण्याबाबत (किंवा त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबतसुद्धा) मला आक्षेप नाही — ती अर्थात त्यांची वैयक्तिक निवड आहे. त्या फाजीलपणाचे बरेवाईट परिणाम त्यांनी अवश्य उपभोगावेत. फाजीलपणामुळे धोधो खप झाल्यास त्या पैशांचाही आनंद अवश्य लुटावा, नि फाजीलपणाबद्दल धमक्या ओढवून घेतल्या,  तर त्यांनाही अवश्य तोंड द्यावे — तेव्हा टॅक्सपेयरच्या खर्चाने सरकारी security apparatusला वेठीस धरण्याची अपेक्षा करू नये. त्या धमक्यांचे नि त्या फतव्यांचे मी समर्थन करीत नाही, परंतु… Well, buddy, you knew (or should have known) what you were getting into, and still chose to go ahead with it, so… be prepared to face the consequences, good or bad, right or wrong, on your own dime, and do not expect me (or the taxpayer) to prop you up. Neither I nor the taxpayer begged you to express what you chose to express; that was entirely your own choice. So, we cannot be liable to protect you from the consequences, especially the bad ones, however uncalled for they may be. So there!)

(थोडक्यात, वाल्या कोळ्याला जो संदेश आहे, तोच इथे आहे: तुमच्या पापांत वाटेकरी कोणीही होणार नाही. (होऊही नये.))

त्या फतव्यामुळे (बहुतेक) उद्युक्त होऊन सलमान रश्दींवर माथेफिरूनं हल्ला केला; त्यात त्यांचा एक डोळा गेला.

एकोणीसशे एकूणनव्वदच्या इसवीत काढलेल्या फतव्याने दोन हजार बावीसच्या इसवीत कोणी जर उद्युक्त होऊन काही करत असेल, तर… ‘पीने वाले को पीने का बहाना चाहिए’, याहून अधिक मी काय म्हणू?

आणि, पुन्हा एकदा: नाही. त्या फतव्याचे मी समर्थन करीत नाही. (तसेही, बकवास लिहिणे हे मृत्युदंडास पात्र असण्याचे काही कारण निदान मला तरी दिसत नाही. (तसे असते, तर इथे ‘ऐसीअक्षरे’वरच तुमच्यामाझ्यासहित कितीजण मृत्युदंडास पात्र असते, हे तो दयाळू परमेश्वरच जाणे!)) परंतु, आहे हे असे आहे. फतवा कोणीतरी काढलेला आहे. त्या फतव्याच्या विरोधात काही करता येण्याची जगातल्या कोणत्याही सत्तेची ताकद तशीही मर्यादित आहे, नि कोण्या सलमान रश्दीसाठी ती मर्यादित ताकद जगातली कोणतीही सत्ता वापरणार नाही; वापरूही नये. (आज इस्राएलने जर इराणवर हल्ला केला असेल, तर तो इस्राएलच्या अंतःस्थ हेतूंकरिता; कोण्या सलमान रश्दीचा नि त्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुळका आल्यामुळे नव्हे. परंतु, तो वेगळा विषय झाला.)

अशा परिस्थितीत, कोणीतरी फतवा काढला, त्याने उद्युक्त होऊन कोणीतरी कोणावर तरी इतक्या वर्षांनंतर हल्ला केला, त्यात ज्याच्यावर हल्ला झाला, त्याचा डोळा फुटला, म्हणून ज्याचा डोळा फुटला, त्याचे पुस्तक मी (स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी) विकत घेऊन आपद्ग्रस्तांस मदत करावी… यह लॉजिक कुछ हज़म नहीं होता।

बाकी चालू द्या.

मारवा Tue, 17/06/2025 - 21:43

In reply to by 'न'वी बाजू

ज्या महान मानवी मूल्यांसाठी सलमान रश्दी आणि तस्लिमा नसरीन यांनी आवाज उठवला.
ज्या महान मानवी मूल्यांसाठी रश्दी नसरीन प्रतिगाम्याना भिडले नव्हे त्यांना शिंगावर घेतले
ज्या.....साठी त्यांनी मेहनत घेऊन पुस्तकें लिहिली
ज्या.....साठी तुम्हा वाचकांचा मेंदू मागितला
ज्या......साठी तुम्ही किमान कृतज्ञता बाळगायला हवी
ते सोडून तुमच्यासारखे लिबरल असे खांदे झटकून दहा डॉलरची शोकात्मिका अहमहमिकेने मांडत जाता.....
काय म्हणावें या लिबरल अधोगतीला ?
मी वादाच्या सुरुवाती पासून कलेसाठी कलेच्या विरोधात आहे.

'न'वी बाजू Sun, 22/06/2025 - 21:18

In reply to by मारवा

कोणती महान मानवी मूल्ये ब्वॉ?

(नाही म्हणजे, पुस्तकाच्या खपातून मिळणाऱ्या रॉयल्टीस महान मानवी मूल्य मानावयास माझी व्यक्तिशः काहीही हरकत नाही, परंतु, त्याव्यतिरिक्त, कोणती महान मानवी मूल्ये ब्वॉ?)


यांच्या पुस्तकांचे (विक्री)मूल्य सहसा महान (महाग?) असते, नि मानवी१अ वाचकच सहसा ते (आपल्या खिशातून) भरतात, एतदर्थ.

१अ जनावरे या मंडळींच्या पुस्तकांची गिऱ्हाइके असल्याबद्दल अद्याप ऐकलेले तरी नाही. तसे, यांची पुस्तके उकिरड्यावर फेकून दिल्यावर भटक्या गायी ती चघळत असणे अगदीच अशक्य नाही, परंतु, त्या परिस्थितीत, प्रस्तुत गायींनी त्या पुस्तकांचे मूल्य स्वतःच्या खिशातून१अ१ भरलेले नसल्याकारणाने, त्यांना या पुस्तकांच्या गिऱ्हाइकांत गणता येणार नाही. (चूभूद्याघ्या.)

१अ१ गायींना कांगारूंप्रमाणे खिसे नसतात. (उलटपक्षी, कांगारू गोमातांप्रमाणे उकिरडे फुंकीत असल्याबद्दल ऐकलेले तरी नाही. (चूभूद्याघ्या.))

मारवा Sun, 22/06/2025 - 23:22

In reply to by 'न'वी बाजू

प्रतिसाद उपहासात्मक होता हे सांगावे लागणे म्हणजे जोक सांगितल्यावर एखाद्याने त्याचा अर्थ गंभीरपणे विचारल्यावर होतो तेव्हा जोक सांगणाऱ्याचा पोपट होतो तसा झाला.
बरे ते सुद्धा hints देऊन
कलेसाठी कला .....
महान मानवी मूल्ये शब्द वापरून....
अर्थात याला मीच जबाबदार आहे.

'न'वी बाजू Wed, 25/06/2025 - 16:53

In reply to by मारवा

तुमच्या प्रतिसादातील उपहास अर्थातच (पहिल्या वेळेसच, नि तुम्ही समजावून न सांगतासुद्धा) समजला होता. (इतकाही काही मी ढ नसेन बहुधा. (चूभूद्याघ्या.))

मात्र, तुमचा प्रतिसाद मॉक-गंभीरपणे घेऊन, त्यातील मुदलातील तुमच्या उपहासावर माझ्याही उपहासाचे व्याज चढवून काही मूल्यवर्धन करता आले, तर पाहात होतो, इतकेच.

(अर्थात, हेदेखील सांगावे लागणे म्हणजे… …शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख।)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 18/06/2025 - 06:03

In reply to by 'न'वी बाजू

'न'बा, तुमच्याकडून या कारणाची अपेक्षा नव्हती. पुस्तकं न वाचण्यासाठी आणखीही चांगली कारणं असतात -
१. वेळ नाही.
२. खूप पुस्तकं आधीच यादीत आहेत. मी या पुस्तकावर येईस्तोवर रश्दींचीही आणखी नवी कादंबरी येईल कदाचित.
३. ललित लेखन वाचणं सोडलं. किंवा कादंबऱ्या वाचणं सोडलं.

अमेरिकेत मी नवीन असताना रश्दींचं 'शेम' नावाचं पुस्तक फक्त त्यांचं नाव बघून उचललं. ते मी अर्ध्यात सोडून दिलं. काय सुरू होतं, हे मला काही समजत नव्हतं. तुमच्याच पद्धतीत आता पुढचं थोडं पाल्हाळ लिहिते, अशीच एक कादंबरी मी शीर्षक वाचून गेल्या वर्षी विकत घेतली - विटगेनस्टाईन्ज मिस्ट्रेस. विटगेनस्टाईनचं नाव बघून घेतली. कादंबरी मला समजली असा दावा मी करणार नाही, पण कादंबरी वाचताना कंटाळा आला नाही हे निश्चित.

असो. तर व्हिक्टरी सिटीबद्दल आधी कुठे तरी, काही तरी लिहून आलं होतं; ते वाचलं. तेव्हा धीर धरून कादंबरी वाचली.

कादंबरी वाचल्यानंतर काही महिन्यांनी न्यू यॉर्कमध्ये एका म्युझियममध्ये Ancient Future का अशा काही नावाचं प्रदर्शन बघितलं. तिथे काही आफ्रिकेतल्या कलाकरांनी आपल्या परंपरांवर आधारित भविष्याबद्दलच्या कल्पना मांडल्या होत्या. ते सगळं मला फार समजलं, आवडलं असं म्हणणार नाही; पण ते बघताना 'व्हिक्टरी सिटी'मधला काही भाग आठवत राहिला.

असो. सांगायचा मुद्दा असा की रश्दींच्या आधीच्या काही कादंबऱ्या आवडल्या नाहीत म्हणून 'व्हिक्टरी सिटी' वाचणारच नाही; असा आडमुठेपणा भक्त-छाप विचारांच्या लोकांकडून अपेक्षित असतो. अशी अपेक्षा तुमच्याकडून नव्हती.

'न'वी बाजू Sun, 22/06/2025 - 21:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री. रश्दी यांच्या पुस्तकांच्या खपातून मिळणाऱ्या रॉयल्टीचा काही कट (काही टक्केवारी, वगैरे) श्री. रश्दी आपणांस देऊ करतात काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 23/06/2025 - 01:58

In reply to by 'न'वी बाजू

फक्त चांगली सबब द्या, असं म्हणाले म्हणून थेट आर्थिक हितसंबंधांपर्यंत उडी?

'न'वी बाजू Sun, 22/06/2025 - 21:29

In reply to by प्रकाश घाटपांडे

१९९२ सालचा बियरचा साधारण भाव आता आठवत नाही, परंतु, (अगदी स्वस्तातली) बडवायज़र वगैरे घेतल्यास बहुधा आठएक तरी येत असाव्यात. (चूभूद्याघ्या.)

Rajesh188 Mon, 16/06/2025 - 16:19

असे लोक सूत्र मांडायची की जी लोक शिक्षित नाहीत,, गरीब आहेत.
ते जास्त धार्मिक कट्टर आहेत, दुसऱ्या धर्माचा द्वेष करतात.
कारण शिक्षण नसल्या मुळे त्यांना खरं खोटं ह्याची ओळख नसते.

मी त्याच्या उलट अनेक समाज माध्यमावर बघत आहे शिक्षित लोक चं धार्मिक विद्वेष वाढवण्यात आघाडीवर आहेत.
दुसऱ्या धर्माचा द्वेष करण्यात आघाडीवर आहेत.
जसे ह्या लेखाचे लेखक शिक्षित आहेत.
पण?

'न'वी बाजू Sun, 22/06/2025 - 21:34

In reply to by Rajesh188

(श्री. प्रभाकर नानावटी यांच्या धर्माबद्दल मला कल्पना नाही, परंतु, हिंदू असल्याचे गृहीत धरल्यास) त्यांनी कोठल्या दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष पसरविला, म्हणे?

(श्री. प्रभाकर नानावटी हे शिक्षित असल्याबद्दलचे आपले गृहीतक रोचक आहे. नाही म्हणजे, त्या गृहीतकास माझा विरोध नाही, परंतु तरीही, आपल्याकडून आले, म्हटल्यावर रोचक आहे.)

मनीषा Thu, 19/06/2025 - 09:27

धर्माच्या नावाखाली हजारो, लाखो अनुयायी जमविणार्‍या या उपदेशकांना समुह मानसिकतेची चांगली जाण असते. तुमच्या आयुष्यात सारे काही ठीक नाहिये. पण "माझे" ऐकाल तर तुम्ही अधिक उत्तम पद्धतीने जगु शकाल, असा विश्वास ते भाविकांना देतात.

मंत्र, तंत्र, भजन, किर्तन, प्रवचन अशा अनेक प्रकारांनी ते समुहाच्या मनावर गारूड करतात. त्यांच्या भजनी लागणारे सर्वप्रकारच्या सामाजिक थरातले असतात. गरीब-श्रीमंत, सुशिक्षित्-अडाणी, सत्ताधारी-सामान्य असा कोणताही भेद नसतो. जितके अनुयायी जास्त तितकी राजमान्यता मिळते आणि अर्थात आर्थिक माया जमा होते. हे सारे करण्यासाठी कुठल्याही पात्रता निकषांची पूर्तता करण्याची आवश्यकता नसते. फक्त तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे आणि जे खोटे, अविश्वसनीय आहे ते सुद्धा खरे, सत्य म्हणुन खपविण्याची व्यावहारिक कुशलता असायला पाहिजे.. मग राधे राधे म्हणत स्वतःच्या तालावर जनसमुहाला नाचविणारे अनेक लखोबा लोखंडे, पुजनीय म्हणून घरोघरी स्थापित होतात.

यात वाईट एकच आहे की जे खरोखरीचे सभ्य, सात्त्विक आणि आदरणीय असे गुरू, उपदेशक आहेत, ज्यांची लोकोद्धाराची तळमळ प्रामाणिक आहे आणि स्वतःचे ज्ञान, अनुभव याचा उपयोग जनसामान्यांच्या भल्यासाठी करावा असा एकमेव हेतू त्यांच्या सर्व कर्मात आहे, असेही सर्व या गदारोळात नाहक बदनाम होतात.

Rajesh188 Thu, 19/06/2025 - 15:13

In reply to by मनीषा

तुम्हाला फक्त असे वाटत का की जगात फक्त हिंदू धर्म चं आहे.
तुम्हाला पचणार नाही पण फक्त हिंदू धर्म चं धर्म विरुद्ध टिकेला स्वीकारतो.
बाकी कोणता चं त्यांच्या धर्मा विरुद्ध एक विरुद्ध अक्षर पण स्वीकारत नाही
हिंदू हा एकमेव धर्म आहे तो वेळेनुसार बदलत आहे.
बाकी सर्व धर्म अजून अर्वजित काळातील चं परिस्थिती चिकटून आहेत.

तुमची पोस्ट परत वाचा.


हिंदू विषयी चं तुम्ही लिहले आहे बाकी धर्म विषयी एक शब्ध पण लिहिला नाही.
त्या मुळे भारतीय पुरोगामी, भारतीय नास्तिक, भारतीय डावे ह्याना कोणताच वैचारिक पाया नाही.
फक्त हिंदू द्वेष हा एकमेव समान हेतू ह्या सर्व लोकात आहे

मारवा Sun, 22/06/2025 - 23:14

बाबांच्या नादी लागणारे जे लोक आहेत
1
त्यांच्याविषयी फार मोठी सहानुभूती आणि संवेदनशीलता बाळगणे फार गरजेचे आहे . म्हणजे त्यांच्या मजबुरीचा, गरजेचा, अगतिकता यांचा फार सहानुभूतीपूर्वक अभ्यास व्हावा विचार व्हावा. म्हणजे बॉडी शेमिंग सारखे भक्त शेमिंग केले जाऊ नये. पूर्वी मी सुद्धा असेच करत असे पण आता जाण जशी हळूहळू येते वय वाढताना तेव्हा आपण असे केले याची मोठी खंत वाटते.
2
त्याचप्रमाणे जे बाबा बनतात त्यांचा सुद्धा अतिशय सहानुभूतीने विचार केला पाहिजे. म्हणजे भक्ताचे शोषण नंतरचा टप्पा आहे. मी सर्वज्ञ आहे. मी आता यांचा तारणहार आहे मी आता यांना जीवन कसे जगावे हे सांगतो. या अती मानसिक स्थिती पर्यंत पोहोचणे तिथे दीर्घकाळ स्वतःच्या नैसर्गिक उर्मी, भीती, शंका आदींना suppress करत एका सतत भ्रमात स्वतः जगावे लागणे हा ताण सुद्धा फार मोठा आहे. बरे भक्ताला तरी burden पासुन बाबा चा सहारा आहे. पण बाबा स्वतः ज्या suppression मध्ये भ्रमात जगतोय ते तसे जगणेही अतिशय painful असे आहे. मला पूर्वी सदगुरू बेभान नाचताना पाहून हसू यायचें किंवा श्री श्री एकदम लहान मुला सारखा हसता खिदळताना काळात येताना बघून. त्यांची खरेच दया येते. बाबाचा इंटर्नल struggle फार मोठा आहे. एकवेळ त्यांची ऐश चंगळ बाजूला सारून एक व्यक्ती म्हणून त्या बाबा कडे बघितले तर तो भक्त पेक्षाही अधिक केविलवाण्या अवस्थेत आहे.