Skip to main content

आठवणीचे दिवस.

3 minutes

झोरान झिवकोविचचे TWELVE COLLECTIONS AND THE TEASHOP हे भन्नाट पुस्तक हातात पडले आणि पहीलीच कथा “Days” ही कथा वाचून भारावून गेलो. आपले सुदैव असे कि ह्या पुस्तकाला Michael Moorcock ह्या लेखकाने प्रस्तावना लिहिली आहे, Fantasy ह्या नव्या लेखनप्रकाराची ओळख करून दिली आहे. एके काळी नगण्य मानला गेलेला आणि नाके मुरडली गेलेल्या ह्या वाङ्मयप्रकारात अनेक हेवी वेट साहित्यिकांनी लेखन केल्यामुळे ह्याॉला थोडीतरी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. ह्या संग्रहातील बारा कथा ह्या माणसाच्या संग्रह करणाच्या वृत्तीबद्दल भाष्य करतात. Moorcock ने ह्या प्रवृत्तीचे छान विश्लेषण केले आहे. माणूस का म्हणून निरुपयोगी गोश्तीन्चा गराडा आपल्या सभोवती का उभा करतो? Moorcockच्या मते काळाची गती धीमी करून मृत्यू ला आपल्या पासून दूर ठेवण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे द्योतक आहे. ह्या बारा कथांना एकत्र जोडणारे हे सूत्र आहे,
रशिया आणि पूर्व युरोप मधल्या साहित्याबद्दल आपल्याला अगदी त्रोटक माहिती आहे. पण आता हे साहित्य इंग्रजीत भाषेत अनुवादित झाले असल्याने ही दारे उघडायला लागली आहेत. प्रस्तावनेत अजूनही बरेच काही वाचनीय आहे.
झोरान झिवकोविचचे वैशिष्ठ्य असे आहे कि कथा पूर्ण वाचली तरी आपल्याला नायकाचे नाव, गावाचे नाव, रस्त्याचे नाव, हॉटेलचे नाव ह्याचा पत्ता लागत नाही. लेखकाला त्याची गरज वाटत नसावी त्याच्या मुले कथेला यूनिवर्सल स्थान प्राप्त होत असावे. जणू कथा कुठल्याही जगात कुठल्याही काळी घडू शकते, स्पेस आणि टाईम पार करून जाते. पाश्चिमात्य कथा मध्ये बारीक सारीक डीटेल्स वर भर दिलेला असतो, ह्या बद्दल नंतर बोलता येईल.
आता कथेकडे वळूया,
नायकाला आज काहीतरी गोडधोड खायची इच्च्छा आहे. म्हणून तो केक आणि पेस्ट्री च्या कॅफेकडे वळतो. इथून कथेची सुरवात होते. कॅफेमध्ये जाम्भळ्या रंगाचे प्राबल्य आहे, पहा झोरानने किती मोजक्या शब्दात वर्णन केले आहे,
“WHEN I ENTERED THE PASTRY SHOP, a purple wave swept over me. Almost every surface was in some shade of this color: the wallpaper, curtains, rugs, tablecloths, chair covers. So were the shades on the lighted table lamps. The muted light gave even the air a purple tint...”
मेनू मधल्या आयटेम्सची नावे पहा.
“livid lightning rod” “shambling violin” “absent-minded bumblebee”
“enamored water lily” ही जरा काव्यमय आहेत पण “stinky grater”, “putrid acrobat” or “cheerful carcass” ह्याला तुम्ही लाय म्हणाल. ही खास झोरान खासियत आहे, “Teashop” ह्या कथेतही चहाची अशीच नावे आहेत.
हॉटेलचा शेफ समोर येऊन बसतो.
“कुठला आयटम खायची इच्छा आहे?”
“मला काहीतरी चवदार आणि गोड खायची इच्छा आहे, युम्हीच काही शिफारीश का करत नाही?”
“आहे अशी एक चीज आहे, stuffed monkey.तुम्ही कधी खाल्ली आहे?”
“पण तुमच्या ह्या मेनू मध्ये हा आयटेम नाहीये. “नायक जरा चक्रावून बोलतो.
“कसा असेल? कारण मेनू मध्ये प्रत्येक पदार्थाची किंमत लिहावी लागते. ह्या डीशची किंमत पैशात लीहिता येणार नाही.”
“का बरे?”
“कारण प्रत्येक डिशच्या बदली तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एक दिवस मला द्यावा लागेल.
तुमच्या आयुष्यातून एक दिवस पुसला जाईल आणि त्याच्या जागी पोकळी निर्माण होईल.विचार करा.”
नाटक विचार करतो, “एकाच तर दिवस ना.”
तो stuffed monkey खायला तयार होतो.
शेफ म्हणतो, “थांबा, मी तुमचा दिवस साठवण्यासाठी कुपी घेऊन येतो, विचार करा आणि मला एक दिवस द्या. कुठलाही द्या, तुमची निवड.”
नायक विचार करतो. आणि stuffed monkeyचा एक तुकडा तोंडात टाकतो.
अहाहा, अहाहा! काय चव आहे. अगदी स्वर्गीय, समोरची प्लेट साफ करून तो दुसरया प्लेटची ऑर्डर देतो.
“सॉरी, दुसरी नाही मिळणार.”
“पण मी माझाआजून एक दिवस द्यायला तयार आहे ना.“
“तरीही नाही. एकदा का ह्या डिशची चटक लागली कि खाणाऱ्याची हाव वाढत जाते. भूतकाळातले सगळे दिवस एक एक करून संपुन जातात, आठवणी सरत जातात, मागे उरते ती निव्वळ पोकळी. रिते पणा अशी पोकळ माणसेही अदृश्य होतात. इथेच भिराभिरत रहातात.”
नायक काय समजायचे ते समजतो. उठून बाहेर चालता होतो.
ही कथा मी माझ्या शब्दात वर्णन केली आहे. नसेल आवसली तर तो माझा दोष समजा, आवडली असेल तर मग झोराननेच लिहिलेल्या “लायब्ररी “ नावाच्या कथेचा नितीन रिंडेनी मराठीत अनुवाद केला आहे तो वाचा. ह्या पेक्षा अधिक नाही सांगणार. नाहीतर म्हणाल कि हा तर त्यांचा एजंट दिसती आहे.

Node read time
3 minutes

प्रभुदेसाई Tue, 21/04/2026 - 20:49

संप्रति ह्यांनी "द लायब्ररी" चा परिचय लिहिला आहे.
https://www.maayboli.com/node/86161 वेळ काढून वाचा.
मराठीत नव्या दमाचे लेखक म्हणजे निखिलेश चित्रे. त्यांचा "गॉगल लावलेला घोडा " नावाचा कथा संग्रह आहे. त्यांच्या कथा मला काफ्का आणि झोरान ह्यांचे मिक्स वाटले. हाही वाचनीय आहे.

'न'वी बाजू Wed, 22/04/2026 - 00:25

प्रकार रोचक वाटतोय, परंतु...

...अ‍ॅमेझॉन यूएसएवर (इंग्रजी आवृत्ती, अर्थात!) किमान किंमत सोळा डॉलर सत्तावन्न सेंट्स अधिक तीन डॉलर नव्व्याण्णव सेंट्स डेलिव्हरी फी, तीही सेकंडहँड आवृत्तीकरिता, इतकी आहे. (सेकंडहँड आवृत्ती असल्याकारणाने, विक्रेता खुद्द अ‍ॅमेझॉन नाही, थर्ड पार्टी आहे. म्हणजे, प्राइम मेंबरशिपचे फायदे नाहीत; डेलिव्हरी फी माफ होणार नाही. आणि, नवीकोरी आवृत्ती किंवा किंडल आवृत्ती उपलब्ध दिसत नाही.)

अगोदरपासून या लेखकाच्या लेखनाशी परिचित वगैरे असतो, त्याचा फॅन वगैरे असतो, तर कदाचित तितके पैसे घालून विकत घेतलीसुद्धा असती. (उदाहरणादाखल, वुड्डहौस असता, तर (सर्वच पुस्तके नाही, तरी) बहुधा डोळे झाकून घेतली असती. जॉर्ज मिकॅश या (तुलनेने अपरिचित, आणि आतापावेतो बहुतांशी औट-ऑफ-प्रिंट) लेखकाची पुस्तके अधूनमधून घेतो. 'अ‍ॅस्टेरिक्स' मालिका (आता मूळ जनक दोघेही निवर्तले असून भलतेच लोक चालवितात, नि दर्जासुद्धा पूर्वीच्या मानाने अनियमित असतो, तरीही) नवीन अंक आला, की आवर्जून विकत घेतो.) मात्र, प्रयोगाकरिता इतके पैसे घालावेसे वाटत नाही. (यात नुकसान कोणाचे, माझे, की लेखकाचे, हे काळ तथा नियतीच आपापसात ठरवतील.)

असो चालायचेच.

प्रभुदेसाई Wed, 22/04/2026 - 09:07

In reply to by 'न'वी बाजू

पुस्तक महाग आहे खरे आहे,
आम्ही मित्रांनी पैसे पूल करून पुस्तक घेतले.
पण तुम्ही मराठी भाषांतरित "द लायब्ररी" वाचू शकता. पुस्तक खरे तर २६० रुपयांचे आहे. कोणी मित्र नातेवाईक इकडून तिकडे जाणार असेल तर आणायला सांगा.