Skip to main content

काही बरणाल्या

मेलेल्यांनाही मिळत होता, मतदानाचा हक्क,
नावे कापून ज्ञानदेवाने दिला, मृतात्म्यांना धक्क.

डुप्लीकेट मते टाकून, रक्षण करत होतो लोकशाहीचे
नावे कापून ज्ञानदेवाने, गाडून टाकली लोकशाही.

बांगलादेशी मतदार होता, आमुचा हो आधार,
नावे कापून ज्ञानदेवाने, दूर केला हक्काचा मतदार .

सेंट्रल फोर्सेस आल्या, बूथ लुटू नाही दिले,
पराजय आमुचा झाला, संविधानाची हत्या झाली.

गाळलेली नावे पुन्हा टाकून, बूथ आम्ही लुटणार
गुनाहगार ज्ञानदेवाला दंड आम्ही देणार.

काळा मठ्ठ बैल … Wed, 20/05/2026 - 00:12

निवडणुकीच्या अखाड्यातील “धर्मवीर”

मतदारच न दिसता, मतपेटी मात्र गर्भवती,
“लोकशाहीचा चमत्कार”—अशी काहींचीच वाकबगती.

केंद्राच्या फौजा उतरल्या, म्हणे रक्षणासाठी,
पण तपासणीच्या नावाखाली, भीतीचं साम्राज्य उभं पायापासून माथ्यापर्यंत.

सभांमध्ये गर्जना—जमिनीवर मात्र शून्य,
विकासाच्या गप्पा म्हणजे, मतांचा फक्त धंदा खूनखराबा.

धर्माच्या तलवारीने मतदारांना कापलं रेषेत,
विभाजनाच्या धुरात हरवली, लोकशाहीचीच शेवटची श्वासरेषा.

“बाहेरचे” म्हणत आरडाओरडा, भिंती उभ्या केल्या लोखंडाच्या,
आरोपांच्या वादळात सत्याचा दिवा—कधीच न पेटणारा.

यंत्रांवरचा विश्वास म्हणे, देवासारखा पवित्र,
पण निकाल लागला की दोष—नेहमीच इतरांवर चित्र.

जिंकण्यासाठी नियमांना, चामड्यासारखं सोललं,
आणि पराभव झाला की, तक्रारींचं डोंगरच ढकललं.

लोकशाहीच्या नावाखाली, खेळले राजकीय खेळ,
आणि शेवटी म्हणाले—“आम्हीच खरे रक्षक”—हा तर सर्वात मोठा मेळ.