परीस
anant_yaatree
दऱ्या खोऱ्यांनी धाडला
काल हिरवा सांगावा
आता गर्दीच्या पुरात
जीव कसा रमवावा
हिर्व्या सांगाव्याची भाषा
ओढे सुसाट बोलती
बिजलीच्या मशालीत
रानवाटा उजळती
ढग एकटा चुकार
बघ ओथंबून आला
धरणीला चुंबताना
त्याचा तोल पार गेला
बेड्या अभेद्य पायात
विसरण्या दोन दीस
जिंदगीच्या लोखंडाला
लावू हिरवा परीस
क्या बात है!
काय सुरेख लिहिलं आहेस रे....व्वा !! लेखणीत मजा आहे हां तुमच्या. बरेचदा माहीत असलेलं, 'वळख असलेलं' काहीतरी तू अशा काही शब्दात लिहितोस .... झकास. पहिलं कडवं वाचलं आणि मिसळपाववर प्रचेतसने गेल्या आठवड्यात लिहिलेला लेख आठवला चटकन. जणू त्यातले सुरूवातीचे फोटो बघूनच ही कविता लिहिली आहेस तू :-)