Skip to main content

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र

4 minutes

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र

==================================

-- राजीव उपाध्ये


टीप - हा दोन जुन्या लेखांचे हे एकत्रिकरण आहे. काही विशिष्ट उद्देशाने हे लिखाण इथे पुनर्प्रकाशित करत आहे. या लेखाचा आणि ए०आय०चा काहीही (म्हणजे पूर्णविरामाचा पण ) संबंध नाही.

डॉ० बर्नाड बेल या फ्रेंच विद्वान-मित्राने मला मानववंशशास्त्राची गोडी लावली (माझ्या लग्नात त्याने माझ्या बाजूने साक्षीदार म्हणून सही केली होती). याचा मुद्दामून उल्लेख अशासाठी की मानववंशशास्त्राच्या परिचयाने जगभरच्या मानवीसंस्कृतींकडे बघायचा निकोप दृष्टीकोन प्राप्त झाला तर "सर्व काही भारतीय ते सर्वश्रेष्ठ" हा (सनातनी) दुरभिमान गळून पडला.  

खरं तर याची बीजं मुंबईला शिकत असताना पेरली गेली होती. आमच्याकडे चित्रपट बघण्यासाठी फिल्मक्लब आणि फिल्म सोसायटी असे दोन क्लब होते. फिल्म सोसायटी ही बॉलीवुड आणि हॉलिवुडचे लोकप्रिय चित्रपट दाखवायची तर फिल्मक्लब चे चित्रपट ’कलात्मक’ (वास्तवाचे यथार्थदर्शन करणारे) असत. बहुतेक चित्रपट युरोपात तयार झालेले असल्यामुळे त्यात मंचकदृष्ये, मैथुन, नग्नता याची रेलचेल असे. पण ते अतिरंजित नसत. फिल्मक्लब मध्ये १८+ वयाच्या व्यक्तीनाच प्रवेश मिळत असे.

मी (अर्थातच) फिल्मक्लबचा सभासद होतो.

एकदा आमच्या फिल्मक्लबमध्ये एक जर्मन चित्रपट आला होता. ते एक नृत्यनाट्य होते. या चित्रपटात ३०-४० कलाकार प्रथमपासून शेवटपर्यंत पूर्ण नग्न होते. पण त्यात कुठे ही विकृत उत्तेजकपणा नव्हता. पण तरीही या चित्रपटाने माझ्या सोवळ्या (आणि कोवळ्या) मानसिकतेला धक्का बसून फ्यूज उडाला.  

माझ्या संस्कृतीने निषिद्ध ठरवलेलं आचरण/वर्तन दुसर्‍या एका, विशेषत: पुढारलेल्या, संस्कृतीत नॉर्मल असू शकतं ही जाणीव मोठी मानसिक उलथापालथ घडविणा्री होती. कारण भारतीय संस्कृती नग्नतेच्या बाबतीत अतिशय दुटप्पी आहे. धार्मिकतेच्या वेष्टनातील नग्नता भारतीय स्वीकारतात, तिच्यापुढे लोटांगण घालतात. तर खजुराहो सारख्या ऐतिहासिक वारशातील नग्नता अभिमानाने चघळतात. पण उर्फी जावेदला मात्र ते स्वीकारू शकत नाहीत.

जगभरच्या नग्नतेचा निरीक्षणात्मक अभ्यास चालू केल्यावर काही ठळक गोष्टी लक्षात आल्या. जगात किमान डझनभर नग्नतेशी संबंधीत   ’उत्सव’ आहेत. भारतात फक्त कुंभमेळ्यात अशी उत्सवी-नग्नता दिसते. पण ती नागासाधुंपर्यंतच मर्यादित आहे. नागासाधू "विकारांवर विजय मिळविण्यासाठी" अघोरी उपायांचा अवलंब का करतात, असा एक मला पडलेला प्रश्न आहे. याचं कारण असं की जगात अनेक समुद्र किनार्‍यावर विशेषत: न्यूडबीचेसवर समुद्रस्नानाचा आनंद घेणारे लोक बघितले की एक प्रश्न पडतो - नग्नतेने लैंगिक भावना/विकार उद्दीपित होत असतील तर न्यूडबीचवर सर्वात जास्त बलात्कार व्हायला हवेत.  पण तसं होताना दिसत नाही.  अगदी फ्रान्स मधल्या कॅप द’आग्द सारख्या मुक्त नग्नसंस्कृती जपणार्‍या शहरात पण राजरोस बलात्कार झाल्याचे ऐकायला मिळालेले नाही. पण जिथे स्त्रिला आजन्म बुरख्यात, नखशिखांत शालिनतेच्या ओझ्याखाली दबून ठेवलं जातं तिथे बलात्कार जास्त होतात. तात्पर्य असे की विकारांवर विजय मिळविण्यासाठी अघोरी मार्ग अवलंबायची गरज नसते. कदाचित एखादी गोष्ट मुबलकपणे उपलब्ध झाली की त्याती्ल नावीन्य संपते आणि आपोआप विकारांवर विजय मिळतो. सतत रक्तपात/मृत्यू बघणार्‍यांना मरणाची भीति उरत नाही, तसेच. त्यामुळे नग्नतेने लैंगिक गुन्ह्यांना उत्तेजन मिळते हे मला मान्य नाही.

तात्पर्य आपण भारतीय लोक नग्नतेबद्दलच्या दुटप्पी भूमिकेमुळे पूर्णपणे गंडलेलो आहोत. त्यात पूर्ण कपडे घालून पोहोण्याचा अलिकडचा ट्रेण्ड तर मला भयानक विनोदी वाटतो. त्यामुळेच मला तर आजकाल नग्नतेमध्ये ’सवस्त्र’ आणि विवस्त्र असे दोन भेद करावेत असे वाटते. होय "सवस्त्र" नग्नता असू शकते. यात लाजेकाजेस्तव किंवा श्लील-अश्लीलतेच्या कल्पनांमुळे कपडे टाकून तर देता येत नाहीत. पण अंगसौष्ठ्वाचे प्रदर्शन करायची उर्मी/खुमखुमी जबरदस्त असते. कातडे पूर्ण झाकले तरी तंग कपड्यांनी सौष्ठव "नागडे" पडल्याने ही "सवस्त्र नग्नता" ठरते. विवस्त्र नग्नता स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे मला वाटते की सवस्त्र नग्नता, विवस्त्र नग्नतेपेक्षा जास्त उद्दीपक ठरू शकते.

समकालीन नग्नतेबद्दल आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. संधी मिळाली की लिहीनच...

सध्या अचानक फेसबुकवर सेक्सटॉइजच्या जाहिराती मुबलक दिसू लागल्या आहेत. हा अचानक बदल "सनातनी" मानसिकतेला कितपत झेपेल माहित नाही. पण मला तो संस्कृतीच्या स्थित्यंतरात महत्त्वाचा वाटतो...

जननेंद्रियांविषयी लज्जा, तिरस्कार किंवा घृणा जगभर सापडते. हे एक acquired behavior आहे. मनुष्यप्राणी सभोवतालच्या निरीक्षणातून किंवा अनुभवातून योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकत जातो. हे योग्य/अयोग्य त्या त्या समूहापुरतेच मर्यादित असते, याचे भान सहसा सर्वसामान्य व्यक्तीला नसते. जो समूह ताकदवान असतो, तो आपल्या योग्य/अयोग्यतेच्या कल्पना इतरांवर लादतो. भारतीय संस्कृती याला अपवाद नाही. पण भारतीय संस्कृतीमध्ये जननेंद्रियांची पूजा पण होते. हा परस्पर विरोध गमतीदार आहे. सर्वेषामिन्द्रियाणामुपस्थमेव निधानं। म्ह० जननेंद्रिये सर्व आनंदाचे मूळ आहेत याज्ञवलक्य मैत्रेयी संवादातील हे वाक्य बहुसंख्य भारतीयांना ठाउक पण नसेल.

पण जगभर मात्र एक मोठा वर्ग जननेंद्रियांविषयी नकारात्मक भावनातून मुक्त झालेला दिसतो. तसेच नग्नतेविषयी उदार दृष्टीकोन बाळगतो. मानवी जननेंद्रिये मोठ्या प्रमाणात कलाविष्काराचा (१,२, ३)  विषय बनलेली दिसतात. teatro oficina या एका प्रसिद्ध नाटक कंपनीच्या एका नाटकात एक पात्र स्टेजवर हस्तमैथून करते. तर दूस-या एका नाटक कंपनीच्या एका ऑपेरात १२० पूर्णनग्न पात्रे गायन करतात! मला या कलाकारांच्या धाडसाचे कौतूक वाटते. लुई गॅरेल नावाचा एक माझा आवडता फ्रेंच नट त्याच्या एका सिनेमात असाच पडद्यावर हस्तमैथून करतो.

याच बरोबर जननेंद्रियांच्या आकारातील खाद्यपदार्थांची रेलचेल अनेक देशांत दिसून येते. पुरुष जननेंद्रियांच्या आकारातील बेकरीपदार्थ, आईस्क्रीम किंवा मिठाया इ० जपानपासून फ्रान्सपर्यंत  अनेक युरोपीअन देशात दिसून येतात.

अलिकडेच "मास्टरशेफ" या  जगप्रसिद्ध पाकस्पर्धेत बैलांच्या जननेंद्रियांपासून (Bull's penis Pho) बनवलेला पदार्थ pressure test साठी निवडलेल्या स्पर्धकांना करायला सांगितला होता.  हा पदार्थ चीन, व्हिएतनाममध्ये (४) एक delicacy म्हणून बनवला जातो. स्पर्धकांमध्ये असलेल्या एका मराठी महिलेने कोणताही थयथयाट न करता हा पदार्थ बनविण्याचे आह्वान स्वीकारले. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे उर्फी जावेदच्या फॅशनमुळे उडवली गेलेली धूळ आठवली आणि हसू आले.

 

Node read time
4 minutes

चिमणराव Wed, 19/08/2026 - 13:36

अथवा त्यांचा फेसबुकचा लेख इथे छापलाय समजत नाही. ते असो.

राजा रवी वर्माच्या {देवतांच्या} नग्न चित्रांना खूप विरोध झाला आणि मॉडेलने आत्महत्याही केली. ते एकूण प्रकरणच त्यांच्यावरच्या पुस्तकात [ राजा रवी वर्मा, लेखक रणजीत देसाई, १९८६] वाचण्यासारखे आहे.
ममलापुरमचे { चेन्नईजवळ}सात रथ ज्या राजाने खोदवून घेतले त्यांतले देव देवता आणि राजा राणीही शिल्पकाराने नग्नच दाखवले आहेत.
आता प्रश्न उरला नग्नतेला विरोध करणारे का करतात? मला वाटतं समाजात काही नियम अटी घालण्याचे हक्क आमच्याकडे आहेत हे दाखवण्याचे शक्तिप्रदर्शन असावे.

तर्कतीर्थ Wed, 19/08/2026 - 15:08

In reply to by चिमणराव

आता प्रश्न उरला नग्नतेला विरोध करणारे का करतात? मला वाटतं समाजात काही नियम अटी घालण्याचे हक्क आमच्याकडे आहेत हे दाखवण्याचे शक्तिप्रदर्शन असावे.

1001% सहमत!
 

Rajesh188 Wed, 19/08/2026 - 13:38

विविध विषयावर मानव कसे व्यक्त होतात हा डेटा जमा करायचं.

Fb वर तुम्ही हा डेटा घेऊ शकत नाही लोक फक्त शिव्या देतात.
त्या मुळे तुम्ही तुमचे तीव्र बुद्धी चे लेख fb अकाउंट वर बिलकुल टाकत नाही. टाकला तर ऍक्सेस देत नाही. तिथे . 90 टक्के डेटा दूषित असतो इथे किमान 80 टक्के तरी शुद्ध डेटा मिळेल ही लालच आम्हाला एक दोन डॉलर पण मिळणार नसतील तर आमची अमूल्य मत आणि विचार का लिहावीत