anant_yaatree Mon, 07/09/2026 - 11:52 निवडुंगांची सद्दी, सुकला सोन्याचा पिंपळ भ्रमास किनखापी अंगरखा, सत्य नग्न बेहाल जलपर्णी फोफावे, करपे काठावर हिर्वळ उत्सव नुरले, उधाण उरले, मंजुळ किती गोंधळ! तर्क बिर्क खुंटीवर आता गुद्द्यांचाच सुकाळ डी जेचा थर्थराट, फुटला मृदंग, तुटला टाळ Like Dislike भन्नाट तर्कतीर्थ Mon, 07/09/2026 - 12:32 भन्नाट Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments23 views
भन्नाट
भन्नाट