रवीन्द्रनाथ आणि कृष्णकळी!

Tagore

" क्रीश्नोकोली आमी तारेई बोली.. " ह्या अतिप्रचलित रवींद्रगीतात रवींद्रनाथ म्हणतात : " अगं लोक तुला काळी म्हणतात पण माझ्यासाठी तर तू कृष्णकळी आहेस.. " आणि पुढे सबंध गीतात एकूणच सावळाईची अद्भूत नवलाई सांगत राहतात.. आपल्याला माहित असेलच कि रवीन्द्रनाथ स्वतःच ह्या गीतांचे गीतकार, संगीतकार एवं गायक असत... कित्येक विद्वान नवंकवींना ठाकूर हा कंटाळवाणा प्रकार वाटतो... परंतु ह्या माणसाने मला एक वेगळ्या संगीतविचाराचे दालन खुले करून दिले..

शांती निकेतन मध्ये गेल्या वर आज ही सुमारे १२५ वर्षान पूर्वी लिहिली आणि गायली गेलेली क्रीश्नोकोली आणि त्यातील सावळाई अनुभवता आली.. संगीत संकृतीशास्त्र शिकवते कि कुठली हि संगीत कलाकृती समजून घायची असेल तर ती निर्माण झाली तो काळ, समाज, संस्कृती आणि वातावरण कसे होते हे जाणून घेणे आवश्यक असते..

ठाकूर शास्त्रोक्त संगीतातल्या गवयांना म्हणायचे : " अहो तुमचे हे शास्त्रीय संगीत एकदम वैश्विक संवेदना निर्माण करते.. पण मला माझेच व्यक्तिगत सुखं दुक्खं मांडायचे आहे.. स्वतःला अभिव्यक्त करत मी शोधत असतो... विचारत असतो आसमंताला कि काय नाते तुझे माझे? मग मी तुमचे एवढे विशाल विराट राग कसे गाऊ?" इथे सांगावासे वाटते कि रवींद्रनाथांना हिंदुस्तानी संगीत एवं पाश्चात्य संगीताचे ज्ञान होते परंतु त्यांच्यावर पश्चिम बंगाल येथील लोकसंगीत प्रकार बाउल ह्याचाही गहिरा प्रभाव होता.. सूफी संगीताशी नाते सांगणारे असे बाउल हे संगीत होय.. त्यातून निर्माण झालेले रवीन्द्रसंगीत हे असे तिपेडी आहे..

त्यात गेय शब्दातून "सांगणे" महत्वाचे आहे.. बोलता बोलता गाणे व गाता गाता बोलणे अशी सहजता असते सादरीकरणात.. त्यामुळे वाद्यमेळ ही मर्यादित असतो... नंतरच्या काळात प्रयोग होत होत जेंव्हा हे संगीत studio मधून किंवा रंगमंचा वरून गायले जाऊ लागले तेंव्हा त्यात अर्थातच मनोरंजन हा हेतू देखील जोडला गेला.. आणि त्याचे स्वरूप काहीसे बदलले.. अजूनही रूढीवादी रवींद्रभक्त हा बदल स्वीकारू शकत नाहीत..

ठाकूर स्वतः क्रीश्नोकोली कसे आळवायचे ते इथे ऐकता येईल - http://www.youtube.com/watch?v=hwUqCGsLghU

आणि त्याचाच पुढील अविष्कार शुचित्रा मित्तो ह्या रवींद्रसंगीताच्या मान्यवर गायिकेने गाऊन खूप प्रचलित केला आहे, तो असा - http://www.youtube.com/watch?v=IIfJhm0MF2U

रवींद्र संगीताची थोडक्यात माहिती येथे मिळेल - http://en.wikipedia.org/wiki/Rabindra_Sangeet

अर्थप्रिय अक्षरप्रिय मित्रान साठी क्रीश्नोकोलीचा इंग्रजी अनुवाद येथे देत आहे..
Here is the translation of original Bangla Poem' done by Smt. Rajlukshmee Debee.

'Black Blossom' I call her, though
The village-folk call her 'the dark one'
On a cloudy day, I saw at a meadow
The black girl, with eyes
Black, like the eyes of a doe.
She had no veil on her head '
Oh her back lay the open braid.
Dark? Be she black as black can be '
Her doe-like black eyes I did see.

A sudden gust of easterly wind
Made waves across paddy-fields
Alone, I stood by the stile,
None else could be seen on any side,
Did she at all look my way?
Only I and that girl can say.
Dark? Be she black as black can be-
Her doe-like black eyes I did see.

This is how the kajol-black cloud
Comes up at the Ishan sky in summer,
This is how an inky soft shadow
Falls on tamal-groves when it drizzles,
This is how the rain may fall all night
And softly fill the heart with delight.
Dark? Be she black as black can be-
Her doe-like black eyes I did see.'

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (10 votes)

प्रतिक्रिया

" अहो तुमचे हे शास्त्रीय संगीत एकदम वैश्विक संवेदना निर्माण करते.. पण मला माझेच व्यक्तिगत सुखं दुक्खं मांडायचे आहे.. स्वतःला अभिव्यक्त करत मी शोधत असतो... विचारत असतो आसमंताला कि काय नाते तुझे माझे? मग मी तुमचे एवढे विशाल विराट राग कसे गाऊ?"

क्या बात है... दंडवतच या माणसाला. तेही कितीदा घालायचे म्हणा...
दिलतितली, हात आखडता घेत का लिहिताय? जरा मोकळा सोडा हात. हा आणि असले विषय असे लिहिले तर ती छोटेखानी खेळी ठरते. आता सचिन, द्रविड सारखं खेळणाऱ्याकडून तसे थोडंच चालेल? सेहवागी खेळी हा तुमचा प्रांत नाही, हे लिखाणाच्या घुसमटलेल्या बैठकीतून कळतंय. अजून लिहायचं आहे, पण पटापट चार फटके मारून डाव आटोपला. आता अधिक घुसमट होईल. ती शेवटची इंग्रजीतील कविता हा षटकार आहे, पण त्यानंतर डाव संपतोय. कारण म्हटलं तर विजयी धाव झाली. पण शतक अधुरं राहिलं. Smile
त्या इंग्रजीतील अनुवादाचं कौतुक करता येणार नाही मला, कारण मी मूळ कविता वाचलेली नाही, किंवा वाचली तरी ती कळणारही नाही. पण इथं इंग्रजीतून जी समृद्धी दिसतेय, तिनं मात्र संपन्नता दिली. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रावण मोडक .. खूप धन्यु परंतु अहो कृष्णकळी आहे ती.. हळूहळूच उमलणार.. Lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

एका जबरदस्त रवीन्द्र काव्याची माहिती करून दिलीत त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. बांगला भाषा अवगत नाही पण तुम्ही व्यक्त केलेले शब्द न् शब्द हृदयात घर करून जातात. राजलक्ष्मी देवींच्या इंग्लिश अनुवादाने मूळ काव्याचा मोठेपणा उत्तम रीतीने अभिव्यक्त होत आहे हे वे. सां. न.

श्रामो म्हणतात त्याप्रमाणे रसग्रहण अधिक विस्तृत आले असते तर आवडलेच असते.

तरी तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे सुरूवात असल्याने वाट पहायची तयारी ठेवत आहे.

रवीन्द्र संगीताबद्दल आणखी जाणायला आवडेल.

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------------
'प्रास'ची
१) सांगीतिक आवड
२) लेखन मुसाफिरी

लिखाण आवडले. अधिक लिहायला हवे होते या मताशी सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सुंदर लेखन. अश्या प्रकारचे उत्तमोत्तम लेखन येऊ द्या येथे!
पुलंनी रविद्रनाथांवर सुंदर लेखन केले आहे, ते वाचायची जुनी इच्छा जागृत झाली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://www.youtube.com/watch?v=-VyfeJulQTE&feature=player_embedded#!

वरील चित्रफीत पाहाण्याजोगी आहे.

पुस्तक - द पाथ ऑफ मिस्टीक लव्हर - बोल साँग्स ऑफ पॅशन अँड एक्स्टसी
लेखक - भस्कर भट्टाचार्य, पेनी स्लिंगर्,निक डग्लस
वाचनीय आहे. -
पुढे मला थोडीफार कळलेली कडवी देते आहे.-

(१)
What wick is in this lamp
That burns in the city
Both night & day?
It burns in the center of the lamp
See it O beloved one
No wind or rain will make it flicker.
(ही ३ पेड्यांची वेणी घातलेली वात म्हणजे ३ नाड्या ज्या पाठीच्या कण्यातून जातात. दिवा म्हणजे भ्रूमध्याच्या, आज्ञाचक्राच्या जागचा प्रकाश, नगरी म्हणजे शरीर.)

(२)
O mind are you man or woman
I cannot understand
This marvelous secret

(3)
Don't speak of emotions to the insensitive
Don't tell anyone
For noone will understand
By soaking coal in milk
You cannot make it white

A certain king desired
That bitter should become sweet
He fed a neem tree
with sackful of sugar
The tree became three times as bitter
Never did it aquire any sweetness.

(4)
The man becoming three women
Rides the waves & three fluides
He assumes threefold nature
Worldly, celestial & divine

A poison, she is worldly
At the essence of beauty, she is celestial
As the taste of nectar, she is divine

Only one who is sensual
can prepare the nectar
One who has the GURU's grace
can go to the river
To play with the three women

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतर
माझ्या आई-अप्पांच्या लग्नात त्यांना स्वतः साने गुरुजींनी भेट दिलेली एक 'गीतांजली' ची प्रत खूप दिवस झाले मी जपून ठेवलेली आहे..
कधीतरी वाचीन वाचीन म्हणत असतो. बघू. कधीतरी लागेल मूहूर्त - या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती आठवण तरी झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मित्रांनो, हे बरोबर कि अधिक लिहायला हवे, शिकेन मी.. पण त्या बरोबरच ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि संगीता विषयी सगळे लिहून वाचून झाल्यावर देखील ती एक श्रवण करायचीच गोष्ट राहते आणि म्हणून ह्या माहिती बरोबर श्रवणासाठी दिलेल्या लिंक्स खूप महत्वाच्या आहेत असे मला वाटते .. ठाकूर जे recitation करतात त्यातली गेयता, नाट्यमयता, बंगाली उच्चारातील गोडवा आणि त्यांचे भिजून कृष्णकळी आळवणे, हे वाचनापेक्षा श्रवणाने कळणारे आणि भिडणारे मुद्दे आहेत.. ठाकूरांना ऐकणे हा नक्कीच एक विलक्षण अनुभव आहे.. त्याचबरोबर शुचित्रा मित्तो ह्यांचे गाणे ऐकताना एक तयार आवाज, कृष्णकळी वर झालेले सांगीतिक संस्कार आणि संपूर्णपणे बदलेले सादरीकरण - त्यात भर घालणारा सारंगीचा आर्त स्वर ह्या गोष्टी ऐकायलाच हव्यात.. बाकी रवींद्रसंगीताच्या ढोबळ माहिती साठी विकीची लिंक सुद्धा दिलेली आहे..

जाता जाता शांतीनिकेतन मधला एक अनुभव सांगते.. मी पोचले तेंव्हा कुट्ट अंधार झाला होता आणि शांतीनिकेतन मध्ये कृत्रिम प्रकाशाचा वापर खूप कमी केला जातो.. चंद्राच्या मंद प्रकाशात निकेतनच्या एका प्राध्यापका बरोबर मी campus मधून फेरी मारत होते आणि अचानक एका कोपर्यातून जोरात वृंदगान ऐकू येऊ लागले.. काही हलणारे छोटे आकार दिसले.. अंदाजे १०० सुरेल बालिका आपले रात्रीचे भोजन संपवून आपल्या निवासा कडे परततांना ठाकूरांची गाणी म्हणत होत्या... शांत स्तब्ध काळ्या रात्रीत अचानक कानावर आलेल्या त्या दुमदुमणार्या स्वराने भारावून गेले मी.. आणि तो professor म्हणाला: welcome to शांतीनिकेतन !!! सांगायला नकोच कि माझे तेथील उर्वरित वास्तव्य संगीतमय झाले ... - दिलतितली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

मूळ शब्दांतला गोडवा रवींद्रनाथांच्या शब्दांतून तसंच सुचित्रा मित्रा यांच्या आवाजातूनही पूरेपूर जाणवला.

या सुंदर कवितेच्या इंग्रजी अनुवादाबद्दलही मनःपूर्वक धन्यवाद. या शब्दांचं मराठीत रुपांतर करण्याची हिंमत करण्याचा गुन्हा आवरला नाही, खाली देतोयःमी म्हणे तिला 'कृष्ण-कळी'
गाव म्हणे 'कसली काळी!'एका घनभरल्या संध्याकाळी
मी पाहिलं हिरव्या कुरणी
काळ्याभोर नयनांची कन्या सावळी
जशी काळ्या डोळ्यांची हरिणी
ना डोईवर पदराची सावली
पाठीवर रुळणारी मुक्तकेशी वेणी
काळी? असो भले ती काळी
हरिणीचे डोळे टिपले माझ्या डोळ्यांनीपूर्वेच्या वाऱ्याने एका झुळुकेने
भातशेतीत केल्या लहरी
मी थबकलो बांधाच्या कडेने
कुणीही दिसेना शेजार-पाजारी
पाहिलं का तिने मला एका नजरेने?
केवळ ती अन मी जाणू गोष्ट खरी
काळी? असो भले ती काळी
हरिणीचे डोळे टिपले माझ्या डोळ्यांनीकाजळ-काळा मेघ येतो असाच
ग्रीष्मातल्या ईशान-आकाशात
थंड जांभळी सावली पडते अशीच
तमाल- वृक्षातळी, रिमझिम वर्षावात
रात्रभर पडावं पावसानं असंच
आणि आनंदे भरावं माझ्या हृदयात
काळी? असो भले ती काळी
हरिणीचे डोळे टिपले माझ्या डोळ्यांनी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझाही प्रयत्नः

जरी माझ्यासाठी कृष्णकळी
गावातील ती केवळ काळी

एका दुर्दिनी*, हिरव्या कुरणी
दिसली काळी, काळी बुबुळे
जणु मृगेचे बोलती डोळे
डोईवरून पदर ढळलेला
पाठीवर सांडल्या कुंतला
काळी? ती तर केवळ काळी
बघितले मी मृगनयनीच्या डोळी

वारा अवचित पुर्वेकडचा
तरंग उमटे शेतावरचा
बांधावरती तसाच खिळलो
सभोवती ना दिसले कोणी
नजरभेट का आमची झाली?
ही तर गंमत दोघांमधली
काळी? ती तर केवळ काळी
बघितले मी मृगनयनीच्या डोळी

काजळ मेघ हा असाच येतो
शिशिरातील तृतीय नेत्र** तो
अशीच नाजूक सावली उमटते
तमालवृक्षावरि रिमझिमते
असाच रात्रभर पाऊस कोसळतो
आनंदात मग चिंब भिजवतो
काळी? ती तर केवळ काळी
बघितले मी मृगनयनीच्या डोळी

*दुर्दिनी: ढगाळलेला दिवस -- संदर्भः हंगेरी माझा नवा मित्र - जावे त्यांच्या देशा
**इशानः मुळ कवितेत जरी इशान्य दिशा असले असले तरी इशानचे इतर अर्थ मृत्यूची दिशा,शंकराचा तिसरा डोळा असाही घेतला जातो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुंदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख!!!
Eyes are called window of the soul.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय गोड गाण्याची ओळख करून दिलीत.
मला बंगाली कळत नाही. या भाषेत शिव्या दिल्या तरी त्या कानाला मंजुळ लागतात. दुव्यांबद्दल धन्यवाद. शब्दार्थ जवळपास न समजूनही आवाज आणि संगीतातली उत्कटता हृदयाला भिडते.

आमच्यासारख्या अडाण्यांसाठी आणखी विस्ताराने विवेचन यायला हवं होतं असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवीँद्र संगीत ह्या प्रकाराची छान माहिती दिली
या संगीताचा गोडवा लाजवाब आहे
अजून लिहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

रविंद्रनाथांना आपली कविता शब्द व्यक्त करण्याच्या प्रत्येक माध्यमातून आस्वादकापर्यंत पोहोचावी असे का वाटत असावे याचे उत्तर चित्रफितींतून मिळाले. आधी रविंद्रनाथांच्या आवाजात आणि नंतर शुचित्रा मित्रा यांच्या आवाजात. वर शहाराझाद यांनी म्हटल्याप्रमाणे बंगाली भाषेत गोडवा आहे हे आधीच* पटलेले आहे. कविता, चित्रफिती आणि तुमचा शांतिनिकेतनातला अनुभव येथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. आणखीही लिहावे ही विनंती.

*वर्षभर एका बंगाली कुटूंबाबरोबर राहून मिठायांबरोबर गोड भांडणांचा गोडवाही चाखलेला आहे. एरवी अशा सरसकटीकरणाला निक्षून विरोध केला असता पण इतक्या बंगाली लोकांबरोबर राहून गोडव्याबाबत अपवाद असा भेटलाच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भिशन शुन्दर :). अजुन वाचायला आवडेल .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुई

'ऐसी अक्षरे'च्या सदस्यान कडून केले गेलेले कृष्णकळीचे मराठी अनुवाद महत्वाचे वाटतात. विविध भाषान मध्ये साहचर्य आणि संवाद होणे गरजेचे वाटते.. कृष्णकळीच्या निमित्ताने ते ह्या मंचावर घडत आहे ही आनंदाची गोष्ट आहे..

रवींद्रसंगीताची सांगीतिक बाजू पाहिली कि लक्षात येते - बंगाली भाषेतील गोलाई आणि गोडवा कायम राहावा म्हणून गायनात मिंडेचा प्रयोग अधिक होतो .. तान मुरकी इत्यादी गान वैशिष्ट्यांचा वापर टाळलेला दिसतो.. एकूणच हे काही 'तयारी' दाखवण्याचे गायन नव्हे! त्यात हिंदुस्तानी संगीतातल्या रागान पासून ते देशी लोकधुनांच्या सुरावटींची छाया दिसते... रवीन्द्रनाथांच्या गाण्यात अर्थातच त्यांच्या बहुरंगी बहुपेडी व्यक्तिमत्वाची झलक दिसे.. परंतु नंतर जेंव्हा रवींद्रसंगीत एक संगीतसंप्रदाय म्हणून वावरू लागले, त्याचे क्लास घेऊ जाऊ लागले आणि पेटी वर गाणे वाजवून मुलांना शिकवले जाऊ लागले तेंव्हा ते काहीसे एकसुरी आणि रटाळ वाटू लागले.. म्हणूनच ह्या संगीताचा गाभा माहित नसलेल्या आजच्या संगीतपिढीला ते कंटाळवाणे वाटते असा माझा अनुभव आहे.. पण ह्या संगीताच्या भोवती जी संस्कृती होती, तिचा शोध घेत - ठाकूर ह्यांची भूमिका समजून घेत जर ह्या संगीताची मांडणी केली तर ती नक्कीच प्रभावी ठरते.. स्वान्तःसुखाय अनुभवा बरोबरच इतरांना देखील आनंद देणारी ठरते..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

ऐसी अक्षरे'च्या सदस्यान कडून केले गेलेले कृष्णकळीचे मराठी अनुवाद महत्वाचे वाटतात. विविध भाषान मध्ये साहचर्य आणि संवाद होणे गरजेचे वाटते.. कृष्णकळीच्या निमित्ताने ते ह्या मंचावर घडत आहे ही आनंदाची गोष्ट आहे..

धन्यवाद.
आम्ही केलेले रुपांतर हे इंग्रजी कवितेवरून केले आहे. मुळ कवितेच्या जवळ हा आशय जातो का? की रुपांतराच्या रुपांतरामधे आशयच हरवतो आहे? याबद्दल उत्सुकता आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तान मुरकी इत्यादी गान वैशिष्ट्यांचा वापर टाळलेला दिसतो.. एकूणच हे काही 'तयारी' दाखवण्याचे गायन नव्हे! त्यात हिंदुस्तानी संगीतातल्या रागान पासून ते देशी लोकधुनांच्या सुरावटींची छाया दिसते... रवीन्द्रनाथांच्या गाण्यात अर्थातच त्यांच्या बहुरंगी बहुपेडी व्यक्तिमत्वाची झलक दिसे.. परंतु नंतर जेंव्हा रवींद्रसंगीत एक संगीतसंप्रदाय म्हणून वावरू लागले, त्याचे क्लास घेऊ जाऊ लागले आणि पेटी वर गाणे वाजवून मुलांना शिकवले जाऊ लागले तेंव्हा ते काहीसे एकसुरी आणि रटाळ वाटू लागले.. म्हणूनच ह्या संगीताचा गाभा माहित नसलेल्या आजच्या संगीतपिढीला ते कंटाळवाणे वाटते असा माझा अनुभव आहे..

सुंदर गाणं दिवसभर डोक्यात राहणार - त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. ऐसीअक्षरेवर पहिला प्रतिसाद द्यायला प्रवृत्त केले त्याबद्दलही आभार!

शब्द आणि कवितेकडून संगीताने लक्ष वेधून घेऊ नये, रागदारी संगीतावर आधारित राहूनही शब्दांशी रागाचा निराळा, विशिष्ट संबंध तयार व्हावा म्हणून रवींद्रनाथांनी कुठले गीत कसे गावे ह्याबद्दल नियम आखले होते. मी टप्प्याच्या शैलीतील एक अगदी जुने ध्वनिमुद्रित रवींद्रसंगीत ऐकले आहे - ते ऐकले की त्यांनी असे नियम का आखले हे कळते. कुठल्या शब्दावर भर, कुठला ताणायचा, कुठला नाही, हे सगळे नियमबद्ध आहे. मुरकी न घेता मींड आणि सरळ स्वरांचा म्हणूनच रवींद्रसंगीतात जास्त उपयोग होतो. हे नाट्यसंगीत किंवा रागदारी ऐकणार्‍यांना प्रथम जरा रटाळ वाटते खरे (मला ही वाटायचे) पण थोडे अधिक ऐकून त्यातील पद्धती ओळखता आल्या की मधुरता लगेच जाणवते. काही विशिष्ट शैली त्यात ओळखता येतात - वेगवेगळ्या शाळा-संस्थांशी निगडित या तयार झाल्या आहेत.

रवींद्रनाथांनंतर या नियमांची गोष्ट पण रोचक आहे. विश्वभारती विद्यापीठाने त्यांच्या गाण्यांवर प्रताधिकार बजावला, आणि त्यांच्या निधनानंतर काटेकोर नियमांबाहेर कोणी वेगळ्या चालीचे, किंवा मूळ चालीत फेरबदल करून रवींद्रसंगीत ध्वनिमुद्रित केले, तर त्यांची खास परवानगी घ्यावी लागे. थोडेसेही फरक, म्हणजे एखादे नवीन वाद्य संगतीला घेतलेले वगैरे, त्यांना खपत नसे. या पारंपारिक पक्षात सुचित्रा मित्र अग्रभागी होत्या. चारूलता सिनेमात किशोर कुमारने गायलेल्या अप्रतिम आमि चिनि गो चिनि तोमारे ओगो बिदेशिनी बद्दल कुरकुर सुरू झाल्यावर सत्यजीत राय यांना ठाकूरांनीच ही दुसरी चाल लिहून ठेवली होती हे सांगावे लागले.

पण यात सर्वात करुण कहाणी देवव्रत उर्फ जॉर्ज बिस्वास या गायकाची आहे. बिस्वास हे ६०-७०च्या दशकातले, आणि आजही अगदी लाडके रवींद्रसंगीताचे गायक राहिले आहेत. माझे ही अगदी आवडते आहेत.(हे गाणे ऐकावे!) त्यांचा आवाज आणि शैली काहीशी हेमंत कुमारांसारखी आहे, विलक्षण गोडवा, आणि कृत्रिम ताण अजिबात न आणता अगदी स्वच्छ स्वर. पण काही गाण्यांच्या त्यांच्या गायकीबद्दल विश्वभारतीबरोबर झालेल्या दीर्घकाल वादावादीनंतर त्यांनी शेवटी ध्वनिमुद्रण करणे सोडून दिले. पण रवींद्रनाथांचेच त्यांच्या संगीताबद्दल तुम्ही वर दिलेले विचार बिस्वास यांनी स्वत:च्या शैलीबद्दल मांडले - की त्यांच्या व्यक्तिगत सुख-दु:खातून ते गात, आणि तसे करण्याचा त्यांना हक्क होता.

अलिकडे, व्रात्य बसू या नाटककाराने "रुद्धसंगीत" म्हणून एक अफलातून नाटक सादर केले. बिस्वास यांच्या "व्रात्यजनांचे रुद्धसंगीत" आत्मचरित्रावर आधारित ५०-७०च्या दशकातल्या बंगाली सांस्कृतिक घडामोडींचे, आणि विविध सांस्कृतिक-राजकीय संस्थांमधील वाढत्या कर्मठपणाचे मार्मिक विश्लेष्ण नाटकात आहे - त्याबद्दल लिहावे अशी खूप इच्छा आहे. मराठीत कोणीतरी ते सादर केले पाहिजे, अगदी पॉवरफुल आहे.

अर्थात, गेल्या काही वर्षात विश्वभारतीचा प्रताधिकार संपला, आणि आता रवींद्रसंगीतातील प्रयोगांना पंख फुटले आहेत - रॉक, जॅझ, फ्यूशन, भावगीत, सगळेच प्रयोग जोरात आहेत, आणि काहींच्या मते पुन्हा विश्वभारतीचा कटाक्ष त्यांतील एकादोघांवर पडल्यास काही गैर नाही!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलतितली आणि रोचना यांच्यामुळे माझे अनुभवविश्व अजून समृद्ध झाले या बद्दल मनःपुर्वक आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश.. होय, आपला प्रयत्न स्तुत्य आहे.. आशय मुळीच हरवला नाही पण काही ठिकाणी छोटे बदल सुचवावेसे वाटतात ते असे -

"जरी गावातील ती केवळ काळी
माझ्यासाठी तर कृष्णकळी" - हे आशयाच्या अधिक जवळ होईल...

" काळी? असूच दे ती केवळ काळी" हे मूळ काव्याच्या अधिक जवळ जाईल असे वाटते..

राम महिसाळकर ह्यांनी थेट बंगाली वरून केलेला मराठी अनुवादही उपलब्ध आहेच.. मला सापडल्यास नक्की मी देईन इथे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

ह्या धाग्यात सहभागी झाल्या बद्दल धन्यवाद मित्रांनो.. माहितीत महत्वाची भर घातल्या बद्दल विशेष आभार रोचना!

रवीन्द्रनाथ कविते बद्दल म्हणतात : " कविता ही माझी पूर्वी पासूनची प्रेयसी... कविते बरोबरच माझं शुभमंगल झालं. पण ह्या पोरीची लक्षण धड नाहीत हे मात्र मान्य केलंच पाहिजे. बाकीचं जाऊ दे. पण मोठंस भाग्यही घेऊन आली नाही ती. सुख दिलं नाही असं मी म्हणणार नाही पण स्वास्थ्य देण्याचं नाव नको. एकदा तिने एखाद्याची निवड केली की घरदार सांभाळीन स्वस्थ बसेन म्हणायची सोय नाही. तरी सुद्धा माझं जीवन तिच्याशीच निगडीत आहे, जीवनात माझ्या हातून कळत नकळत खोटं आचरण घडलं असेल पण कवितेशी मात्र कधी खोटेपणा करून चालत नाही. माझ्या जीवनातल्या सत्याचं ती एकच आश्रयस्थान आहे! कविता! " - 'काब्येर कॉथा' ह्या चंद्रकांत काळे दिग्दर्शित कार्यक्रमातून साभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

रवींद्रनाथांनी ७-८ वर्षांचे असताना एक कविता लिहीलेली अनेकांकडून मी ऐकली आहे (ती कुठे संग्रहित केली आहे माहित नाही) -

मूळ कविता आणि साधा मराठीत अर्थ देते, कोणी मराठीत मस्त अनुवाद केला तर मजा येईल.

आम शॉत्तो दुधे फेली (आंबा पोळी दुधात टाकली)
हाते कॉदोली दोली (हाताने ती कुस्करली)
शाँदेश माखिया ताते (संदेश त्यातच कालवला)
हापुश-हुपुश शॉब्दो (आता हापुश-हुपुश एवढाच आवाज)
चारिदिके नि:स्तॉब्धो (बाकी सगळी शांतता)
पिपिडें कांदिया जाये पाते (मुंग्या पहा रडत रडत चालल्या)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलतितली,
रोचना,
ऋषीकेश,

तुम्हा सर्वांचे लेखन इतर मसंवर गेले २-३ महिने वाचत आहे. एकाच धाग्यावर तिघांना पाहून- वाचून- मजा आली. भरून पावलो. नुस्तं तोंडपुजेपण नाही. खरोखर सुंदर लेख अन प्रतिसाद.
आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दिलतितली, कृष्णकळीची ओळख खूप आवडली. खूपच छान, गोड कविता आहे.
बहुगुणींनी केलेला मराठी अनुवादही भावला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

दिलतितली, कृष्णकळीची ओळख आवडली आणि रोचना यांचे प्रतिसादही आवडले. तुम्हां दोघींकडून बांग्ल्या मिष्टी संस्कृतीबद्दल काही वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

बहुगुणी यांनी केलेला अनुवाद जास्त आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिखाण आवडले. थोडे लवकर आवरते घेतल्यासारखे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलतितली,
रवीन्द्रनाथ आणि कृष्णकळीची उत्तम ओळख करून दिल्याबद्द्ल, आणि रोचना यांच्या माहितीपुर्ण प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. लेख मात्र त्रोटक वाटला.

पुर्वी रेडीयोवर रवींद्रसंगीत ऐकायचे तेव्हा ते मलाही रटाळ वाटलं होतं. बर्‍याचदा ते दुपारच्यावेळी लागायचं.
पहिल्यांदा रवींद्रसंगीताचा प्रभाव पडला तो मात्र आशा भोसले यांनी गायलेल्या कवितांमधून. http://www.youtube.com/watch?v=cjomhLcv3KU&NR=1 त्यातून गाण्यातली सहजता, मर्यादित वाद्यमेळ ही वैशिष्ट्ये लक्षात आली. गाणे थेट ह्र्दयाला भिडले! एस. डी. बर्मन यांच्या अनेक संगीतरचनांवर रवींद्रसंगीताचा परिणाम जाणवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर काढते आहे. अनुवाद (कविता) अतिशय आवडली. संगीतापेक्षा शब्दांवर प्रेम असल्याने कदाचित काव्य अत्यंत आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

ऐसीचे जुने संचित असे मध्येच वर काढलेत नी पुन्हा नव्याने वाचत बसलो.
वृन्दातै, अनेक आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile धन्यवाद ऋ. मी तर ४-५ पानी वाचनखूणा साठवल्यात. काय मज्जा येते पुनःपुन्हा वाचायला.
___
नंदन यांचा पुनर्वाचनीय हा लेख, त्यातील काही वाक्ये quote करण्यासाठी १०० वेळा शोधते. अन कधीही सापडत नाही. Sad
पण त्यांनी पुनर्वाचनाबद्दल, असे म्हटले होते-

एकूणच ’या हृदयीचे त्या हृदयीं’चे ध्येय गाठताना होणारी दमछाक ज्ञानेश्वरीतल्या नवव्या अध्यायातल्या एका ओवीत फार सुरेखपणे व्यक्त झाली आहे -
.

जें जाल जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें ।
परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांघे ॥

.
पाण्यात दिसणारे चंद्रबिंब जाळं फेकल्यावर, क्षणभर त्यात अडकल्याचा भास होतो खरा; पण बाहेर ओढून पाहिल्यावर ते हाती काही लागत नाही; असा हा दृष्टांत जसा लेखकाच्या अभिव्यक्तीच्या मर्यादा स्पष्ट करतो, तसाच वाचकाच्या जाणीवांचाही. मात्र अंतिम ध्येय कधीच हाती लागणार नाही, हे ठाऊक असूनही पुन्हा पुन्हा केले जाणारे हे प्रयत्न वाचकाच्या फाटक्या झोळीत कधी कधी अनपेक्षित दान टाकून जातात, हे नक्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

बहुदा हा लेख पुस्तकविश्वच्या दिवाळी अंकात होता. बघतो शोधून.
पुवि उघडत नैय्ये.

===
नंदन, तुझ्याकडे ऑफलाईन कॉपी असेल तर लेख इथे टाकशील काय? (अर्थात पुस्तकविश्वचा नामनिर्देश करून)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋ.
नंदन यांनी मागे दुवा दिलेला. पण ऐसी पे नही इस्लिये बुकमार्क कैसन करनेका? Sad मला खरं तर तो लेख फार वाचावासा वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

धागा वर आल्यावर बरी आठवण झाली.
नंदन, टाक की रे तो लेख इथे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0