नोव्हेंबर दिनवैशिष्ट्य

नोव्हेंबर

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०

१ नोव्हेंबर

जन्मदिवस : शिल्पकार अ‍ॅन्तोनिओ कानोव्हा (१७५७), लेखक हर्मन ब्रॉक (१८८६), अभिनेता शरद तळवलकर (१९१८), गणितज्ज्ञ हर्मन बॉन्डी (१९१९), संगीतकार यशवंत देव (१९२६), कवी अरुण कोलटकर (१९३२), लेखक व विचारवंत एडवर्ड सैद (१९३५), अभिनेता किशोर प्रधान (१९३६), समाजसुधारक नरेंद्र दाभोलकर (१९४५), अभिनेत्री ऐश्वर्या राय (१९७३), क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (१९७४)
पुण्यस्मरण : लेखक अल्फ्रेड जारी (१९०७), कवी एझ्रा पाउंड (१९७२), कवी व स्वातंत्र्यसैनिक कुंजविहारी (१९७८), लेखक विलिअम स्टायरॉन (२००६)

---

शाकाहार (व्हेगन) दिन
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : अल्जेरिया, अ‍ॅन्टिग्वा-बार्बुडा
वर्धापनदिन / स्थापनादिन : हरियाणा, कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेश राज्ये, पॉप ग्रूप अब्बा

१६०४ : शेक्सपीअरचे नाटक 'ऑथेल्लो'चा प्रथम प्रयोग.
१६११ : शेक्सपीअरचे नाटक 'टेम्पेस्ट'चा प्रथम प्रयोग.
१८५८ : १८५७च्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या राणीचा जाहीरनामा प्रसृत. इस्ट इंडिया कंपनीच्या हातून भारताचा कारभार काढून घेतला गेला आणि पार्लमेंटकडे तो सोपवण्यात आला.
१९५६ : भाषावार प्रांतरचनेच्या अंमलबजावणीला सुरुवात. आंध्र प्रदेश, केरळ व म्हैसूर (नंतरचे कर्नाटक) राज्यांची स्थापना.
१९८४ : पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येपश्चात भारतभर शिखांविरोधात दंगली.

२ नोव्हेंबर
जन्मदिवस : चित्रकार जाँ-बातिस्त-सिमेआँ शारदँ (१६९९), दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे 'मनोरंजन'कार का. र. मित्र (१८७१), बंगालीला पाकिस्तानात अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी करणारे हुतात्मा धीरेंद्रनाथ दत्त (१८८६), सिनेदिग्दर्शक, अभिनेता व निर्माता सोहराब मोदी (१८९७), सिनेदिग्दर्शक लुकिनो व्हिस्कॉन्ती (१९०६), बोस संगीतयंत्रांचे जनक अमर बोस (१९२९), शिल्पकार रिचर्ड सेरा (१९३९), अभिनेता शाहरुख खान (१९६५)
पुण्यस्मरण : संगीत नाटकांचे लेखक, नट व दिग्दर्शक अण्णासाहेब किर्लोस्कर (१८८५), लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ (१९५०), लेखक व व्यंगचित्रकार जेम्स थर्बर (१९६१), सिनेदिग्दर्शक पिएर पाओलो पासोलिनी (१९७५), कवी, कादंबरीकार व समीक्षक शरच्चंद्र मुक्तिबोध (१९८४)

---
वार्ताहरांविरुद्ध गुन्ह्यांना माफ न करण्याचा दिवस.
१९३६ : बी.बी.सी.तर्फे दूरचित्रवाणी सेवा सुरू.
१९६० : लेडी चॅटर्लीज लव्हर (लेखक डी. एच. लॉरेन्स) हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल अश्लीलतेच्या खटल्यातून पेंग्विन बुक्सची निर्दोष सुटका

३ नोव्हेंबर

जन्मदिवस : मुघल सम्राट औरंगझेब (१६१८), नाट्यकर्मी, 'पृथ्वी थिएटर'चे संस्थापक व अभिनेते-दिग्दर्शक पृथ्विराज कपूर (१९०६), नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन (१९३३), संगीतकार लक्ष्मीकांत (१९३७)
पुण्यस्मरण : चित्रकार मातिस (१९५४), अभिनेता प्रेमनाथ (१९९२), कलेतिहासतज्ज्ञ अर्न्स्‌ट गॉम्बरिच (२००१), गायिका रेश्मा (२०१३), अभिनेता सदाशिव अमरापूरकर (२०१४)

---

स्वातंत्र्यदिन : पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया.

१६८९ : स्वराज्याची राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात.
१८३८ : 'द टाइम्स ऑफ इंडिया'ची 'द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स' या नावाने स्थापना.
१९४८ : भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेपुढे आपले पहिले भाषण केले.
१९५४ : पहिला 'गॉडझिला' चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित.
१९५७ : स्पुटनिक-२ उपग्रहातून रशियाने अंतराळात पहिला सजीव पाठवला. लायका नावाची ही कुत्री अंतराळात पोहोचल्यावर काही तासांत मरण पावली.
२००७ : पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली.

४ नोव्हेंबर
जन्मदिवस : चित्रकार गुईदो रेनी (१५७५), क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (१८४५), ट्रॅक्टरचा निर्माता हॅरी फर्ग्युसन (१८८४), वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल (१८९७), शांतता नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ जोजेफ रॉटब्लॅट (१९०८), सिनेदिग्दर्शक ऋत्विक घटक (१९२५), संगीतकार जयकिशन (१९३२), सिनेनाट्यदिग्दर्शिका विजया मेहता (१९३४), छायाचित्रकार रॉबर्ट मॅपलथॉर्प (१९४६), अभिनेत्री तब्बू (१९७२)
पुण्यस्मरण : कवी विलफ्रेड ओवेन (१९१८), संगीतकार गॅब्रिएल फॉरे (१९२४), कथक नर्तक व गुरू शंभू महाराज (१९७०), सिनेदिग्दर्शक जॅक ताती (१९८२), प्राच्यविद्या संशोधक पु. वि. बापट (१९९१), तत्त्वज्ञ जिल दलझ (१९९५), कवी नागार्जुन (१९९८), कोशकर्ते व इतिहासकार स. मा. गर्गे (२००५), नाटककार दिलीप परदेशी (२०११)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : टोंगा
वर्धापनदिन / स्थापनादिन : लंडनची भूमिगत ('अंडरग्राउंड') रेल्वे (१८९०), हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट (१९५४)

१८४७ : क्लोरोफॉर्मच्या गुंगी आणणाऱ्या गुणधर्माचा शोध.
१९२२ : फरोह तुतानखामेनच्या कबरीचा शोध.
१९५६ : हंगेरीत रशिअन सैन्य दाखल. कम्युनिस्टांविरोधातील बंडाचा बीमोड. हजारो मृत. लाखो देश सोडून गेले.
१९९५ : इस्राइली पंतप्रधान यित्झॅक राबिन यांची हत्या.
२००५ : अफगाण कवयित्री नादिया अंजुमन यांचा पतीकडून मारहाणीने मृत्यू.
२००८ : बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले.

५ नोव्हेंबर
जन्मदिवस : चित्रकार पिएत्रो लोंघी (१७०१), इतिहासकार विल ड्यूरंट (१८८५), लेखक व भाषांतरकार सज्जाद झहीर (१९०५), अभिनेत्री व्हिव्हियन ली (१९१३), लेखक व कलासमीक्षक जॉन बर्जर (१९२६), गायक, गीतकार व गिटारिस्ट आर्ट गारफंकेल (१९४१), तत्त्वज्ञ बर्नार्ड हेन्री-लेव्ही (१९४८), गायक, गीतकार व गिटारिस्ट ब्रायन अ‍ॅडम्स (१९५९), क्रिकेटपटू विराट कोहली (१९८८)
पुण्यस्मरण : भौतिकशास्त्रज्ञ जेम्स मॅक्सवेल (१८७९), गायक फय्याझ खाँ (१९५०), लेखक व समीक्षक लायनेल ट्रिलिंग (१९७५), 'अ‍ॅस्टेरिक्स'च्या जनकद्वयांपैकी एक, लेखक रने गॉसिनी (१९७७), इतिहासतज्ज्ञ इ. एच. कार (१९८२), तत्त्वज्ञ व लेखक इसाया बर्लिन (१९९७), लेखक जॉन फाउल्स (२००५), संगीतकार भूपेन हजारिका (२०११)

---
मराठी रंगभूमी दिन
१८४३ : विष्णुदास भावे यांनी 'सीता स्वयंवर' या पहिल्या मराठी नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे केला.
१९५० : पहिले एफ. एम. स्टीरिओ प्रसारण.
२००६ : इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसेनला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
२०१३ : भारताच्या मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण.

६ नोव्हेंबर
जन्मदिवस : 'महाराष्ट्र सारस्वत'कार वि. ल. भावे (१८७१), लेखक रॉबर्ट म्युसिल (१८८०), समीक्षक श्री. के. क्षीरसागर उर्फ श्रीकेक्षी (१९०१), सिनेदिग्दर्शक, पटकथा व संवादलेखक दिनकर द. पाटील (१९१५), लेखक मायकेल कनिंगहॅम (१९५२)
पुण्यस्मरण : संगीतकार चायकॉव्ह्स्की (१८९३), अभिनेता संजीव कुमार (१९८५), नाट्यदिग्दर्शक व विज्ञानलेखक भालबा केळकर (१९८७)

---

राष्ट्रीय दिन : डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान

१९१३ : दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक
१९६२ : दक्षिण आफ्रिकेच्या वंशभेदाविरोधात संयुक्त राष्ट्रांमध्ये ठराव संमत; द. आफ्रिकेशी सामरिक व आर्थिक संबंध तोडण्याचे सदस्य राष्ट्रांना आवाहन.

७ नोव्हेंबर
जन्मदिवस : चित्रकार फ्रान्सिस्को झुर्बारान (१५९८), स्वातंत्र्यसैनिक बिपिनचंद्र पाल (१८५८), नोबेलविजेत्या भौतिकशास्त्रज्ञ मारी क्युरी (१८६७), भौतिकशास्त्रज्ञ लीज माइट्नर (१८७८), रशिअन क्रांतिकारी, लेखक व तत्त्वज्ञ लेऑन ट्रॉट्स्की (१८७९), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण (१८८८), नोबेलविजेता लेखक व तत्त्वज्ञ अल्बर्ट काम्यू (१९१३), कवी चंद्रकांत देवताले (१९३६), अभिनेता मोहन गोखले (१९५३), अभिनेता व दिग्दर्शक कमल हासन (१९५४)
पुण्यस्मरण : कवी केशवसुत (१९०५), कथाकार य. गो. जोशी (१९६३), गणितज्ञ अलेक्सांद्र गेलफंड (१९६८), इतिहासकार व तत्त्वज्ञ विल ड्युरंट (१९८१), गायक व संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी (१९९८), क्रिकेटपटू पॉली उम्रीगर (२००६), लेखिका सुनीताबाई देशपांडे (२००९)

---

ऑक्टोबर क्रांतिदिन. (ग्रेगोरिअन दिनदर्शिकेनुसार)

१८३७ : अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीविरोधात लढणारा एलायजा लव्हजॉय इलिनॉय जमावाकडून हल्ल्यात ठार मारला गेला.
१९२९ : न्यू यॉर्कमधील जगप्रसिद्ध 'म्यूझिअम ऑफ मॉडर्न आर्ट'चे उद्घाटन.

८ नोव्हेंबर
जन्मदिवस : खगोलज्ञ एडमंड हॅले (१६५६), मानसशास्त्रज्ञ हर्मन रॉरशाश (१८८४), स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार नरुभाऊ लिमये (१९०९), पु. ल. देशपांडे (१९१९), लेखक काझुओ इशिगुरो (१९५४)
पुण्यस्मरण : सम्राट जहांगीर (१६२७), कवी जॉन मिल्टन (१६७४), चित्रकार आन्द्रेआ आप्पिआनी (१८१७), नोबेलविजेता लेखक इव्हान बुनिन (१९५३), चित्रकार नॉर्मन रॉकवेल (१९७८)

---

१६०२ : ऑक्सफर्ड विद्यापीठातील बोडलेअन ग्रंथालय सामान्यजनांसाठी खुले.
१८९५ : विलियम रॉन्टजेनला एक्स-रे प्रारणाचा शोध लागला.
१९६५ : ब्रिटनमध्ये फाशीची शिक्षा रद्दबातल.
२०१६ : प्रचलित ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा भारतीय सरकारने रद्द केल्या.

९ नोव्हेंबर
जन्मदिवस : लेखक इव्हान तुर्गेनेव्ह (१८१८), 'सारे जहाँ से अच्छा'कार कवी इकबाल (१८७७), गणितज्ञ हर्मन वेल (१८८५), अभिनेत्री हेडी लामार (१९१४), नोबेलविजेता लेखक इम्रे कर्तेश (१९२९), लेखक कार्ल सेगन (१९३४), अभिनेता व दिग्दर्शक शंकर नाग (१९५४)
पुण्यस्मरण : कवी गिय्योम अपोलिनेर (१९१८), कवी डिलन टॉमस (१९५३), समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे (१९६२), संगीतकार व संगीत-समीक्षक केशवराव भोळे (१९७७), लेखक स्टिग लार्सन (२००४), अभिनेत्री लालन सारंग (२०१८)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : कंबोडिया
१९६७ - 'रोलिंग स्टोन' मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१९८५ - अनातोली कारपॉव्हला हरवून गॅरी कास्पारॉव्ह वयाच्या बाविसाव्या वर्षी सर्वात लहान वयाचा बुद्धिबळ जगज्जेता झाला.
१९८९ - १९६१पासून पूर्व व पश्चिम जर्मनीदरम्यान अडथळा म्हणून उभी असलेली बर्लिनची भिंत ओलांडून लोक ये-जा करू लागले. अखेर भिंतीमधील फाटके उघडण्याचे पूर्व जर्मनीचे आदेश. शीतयुद्धाची अखेर समजली जाणारी महत्त्वाची घटना. यथावकाश पूर्व-पश्चिम जर्मनीचे एकीकरण झाले.
१९९८ - ब्रिटनमध्ये मनुष्यवधासाठी अगोदरच रद्दबातल झालेली फाशीची शिक्षा अखेर सर्व गुन्ह्यांसाठी रद्द झाली.
२०१९ - अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. निकालानुसार जमिनीवर राम मंदिर उभारण्यात यावे आणि मशिदीसाठी वेगळी जमीन देण्यात यावी.

१० नोव्हेंबर
जन्मदिवस : ख्रिस्ती धर्मसुधारक मार्टिन ल्यूथर (१४८३), चित्रकार विलिअम होगार्थ (१६९७), लेखक व इतिहासकार फ्रीडरिक शिलर (१७५९), स्वातंत्र्यचळवळीतील नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी (१८४८), शिल्पकार जेकब एपस्टाईन (१८८०), 'AK-47'चा जनक मिखाईल कालाश्निकोव्ह (१९१९), अभिनेता रिचर्ड बर्टन (१९२५)
पुण्यस्मरण : कवी आर्थर रॅम्बो (१८९१), लेखक केन सारो-विवा (१९९५), लेखक विजयदन देठा (२०१३), गायक, वादक व संगीतकार लिओनार्ड कोहेन (२०१६)

---

शांततेसाठी आणि प्रगतीसाठी विज्ञान दिन.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : तुर्कस्तान.

१६५९ : शिवरायांनी अफझलखानाला ठार मारले.
१६९८ : कोलकाताची इस्ट इंडिया कंपनीला विक्री.
१९१८ : क्रांतिकारी कन्हाई लाल दत्त यांना फाशी.
१९६० : डी.एच. लॉरेन्सलिखित 'लेडी चॅटरलीज लव्हर' कादंबरीवरची बंदी उठल्यावर पेंग्विनने इंग्लंडमध्ये काटछाटीविना पहिली आवृत्ती प्रकाशित केली. पहिल्याच दिवशी सगळी आवृत्ती (दोन लाख प्रती) विकली गेली. पुढील वर्षभरात कादंबरीच्या वीस लाख प्रती खपल्या. 'बायबल'च्या खपापेक्षा हा खप अधिक होता.
१९८३ : विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमची पहिली आवृत्ती (१.०) जाहीर.
१९९५ : लेखक व मानवी हक्क कार्यकर्ते केन सारो-विवा यांना नायजेरियन सरकारने फाशी दिली.
२००६ : श्रीलंकेत तमिळींच्या मानवी हक्कांसाठी लढणारे वकील नादराज रविराज यांची हत्या.

११ नोव्हेंबर
जन्मदिवस : लेखक फ्योदोर दोस्तोयव्हस्की (१८२१), व्हीटी आणि मुंबईतल्या अनेक इमारतींचे वास्तुरचनाकार फ्रेडरिक स्टीव्हन्स (१८४७), पुरोगामी विचारवंत व भारतीय समाज-संस्कृतीचे अभ्यासक राजारामशास्त्री भागवत (१८५१), चित्रकार पॉल सिन्याक (१८६३), शाहीर पठ्ठे बापूराव (१८६६), गायक व किराणा घराण्याचे संस्थापक उ. अब्दुल करीम खाँ (१८७२), स्वातंत्र्य चळवळीतले नेते मौलाना अबुल कलाम आझाद (१८८८), गांधीवादी नेते आचार्य कृपलानी (१८८८), सिनेदिग्दर्शक रने क्लेअर (१८९८), लोककवी मनमोहन (१९११), लेखक कर्ट व्हॉनेगट (१९२२), क्रिकेटपटू रूसी मोदी (१९२४), अभिनेता जॉनी वॉकर (१९२६), लेखक कार्लोस फ्यूएन्तेस (१९२८), अभिनेत्री माला सिन्हा (१९३६), गायक तलत अझीझ (१९५६), क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा (१९८५)
पुण्यस्मरण : तत्त्वज्ञ सोरेन किर्कगार्द (१८५५), शिल्पकार अलेक्झांडर काल्डर (१९७६), पॅलेस्टिनी स्वातंत्र्य चळवळीचे नेते यासर अराफत (२००४)
---

राष्ट्रीय शिक्षण दिन
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : पोलंड, अंगोला

१६७५ : गणितज्ज्ञ लाइबनित्झने इंटिग्रल कॅलक्युलसचा y = ƒ(x) वक्राखालील क्षेत्रफळ (area under the curve) काढण्यासाठी प्रथम वापर केला.
१९१८ : पहिले महायुद्ध अधिकृतरीत्या समाप्त. जर्मनीचा पराभव.
१९९२ : चर्च ऑफ इंग्लंडची स्त्री धर्मगुरुंना मान्यता.

१२ नोव्हेंबर
जन्मदिवस : संस्कृत कोशकार व भाषातज्ज्ञ मोनिएर-विलिअम्स (१८१९), शिल्पकार ओग्युस्त रोदँ (१८४०), क्रांतिकारी सेनापती बापट (१८८०), पक्षीतज्ज्ञ सलीम अली (१८९६), लेखक, सामाजिक कार्यकर्ते व समाजवादी नेते एस्. एम्. जोशी (१९०४), तत्त्वज्ञ रोलाँ बार्थ (१९१५), अभिनेत्री ग्रेस केली (१९२९), जिमनॅस्ट नादिया कोमानेची (१९६१), लेखिका व सामाजिक कार्यकर्ती नेओमी वूल्फ (१९६२)
पुण्यस्मरण : बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक शिक्षणतज्ज्ञ पं. मदन मोहन मालवीय (१९४६), सत्यशोधक पत्रकार व कार्यकर्ते केशवराव जेधे (१९५९), समाजवादी नेते व संसदपटू मधू दंडवते (२००५)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : अझरबैजान

१८९३ : पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा म्हणून आज मान्यता पावलेली 'ड्यूरंड लाइन' अस्तित्वात आली.
१९२७ : लेऑन ट्रॉट्स्कीची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी. स्टालिनचा एकछत्री अंमल सुरू.
१९५४ : न्यू यॉर्कमध्ये दाखल झालेल्या स्थलांतरितांसाठीचे केंद्र 'एलिस आयलंड' ६२ वर्षांनंतर बंद.
१९६९ : व्हिएतनाम युद्ध - पत्रकार सेमूर हर्शने माय-लाय हत्याकांडाला वाचा फोडली.
१९७० : सर्वात हानिकारक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ 'भोला' बांगलादेशात (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) दाखल. तीन लाख मृत.
१९८० : 'व्हॉयेजर १' या यानाकडून शनीभोवतीच्या कड्यांचे छायाचित्रण प्राप्त.
१९८२ : पोलिश 'सॉलिडॅरिटी' चळवळीचे नेते लेक वॉवेन्सा यांची ११ महिन्यांच्या कैदेनंतर सुटका.

१३ नोव्हेंबर
जन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)
पुण्यस्मरण : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)

---

जागतिक कनवाळूपणा दिवस.

१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.
१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.
१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.
२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.

१४ नोव्हेंबर

जन्मदिवस : क्रांतिवीर लहुजी साळवे (१७९४), चित्रकार क्लोद मोने (१८४०), शिक्षणतज्ज्ञ, संविधानतज्ज्ञ अॅन्सन सर विल्यम रेनेल (१८४३), भारताचे प्रथम पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू (१८८९), संगीतकार एरन कॉपलंड ९१९००), पत्रकार व संपादक अनंत भालेराव (१९१९), कथक नृत्यांगना रोहिणी भाटे (१९२४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या लेखिका इंदिरा गोस्वामी (१९४२)
पुण्यस्मरण : गणितज्ञ गॉटफ्रीड लाइबनित्झ (१७१६), तत्त्वज्ञ हेगेल (१८३१), संशोधक, शिक्षणतज्ज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन (१९१५), कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रथम कप्तान सी.के. नायडू (१९६७), कादंबरीकार नारायण हरी आपटे (१९७१), नाट्यनिर्माते सुधीर भट (२०१३)

---

बालदिन
जागतिक मधुमेह दिन
१९०८ : अल्बर्ट आइनस्टाईनने 'क्वांटम थियरी ऑफ लाइट' हा सिद्धांत मांडला.
१९१३ : मार्सेल प्रूस्तच्या 'इन सर्च ऑफ लॉस्ट टाईम' (किंवा 'रिमेम्बरन्स ऑफ थिंग्ज पास्ट') या महाकादंबरीचा पहिला खंड फ्रान्समध्ये प्रकाशित.
१९१८ : चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताक झाले.
१९२२ : बी.बी.सी.चे रेडिओ प्रसारण सुरू.
१९६७ : अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ थिओडोर मेमन याला जगातल्या पहिल्या लेझर, रुबी लेझरसाठी पेटंट प्रदान.
२०१० : सेबॅस्टिअन व्हेटेल सर्वात तरुण 'फॉर्म्युला १' विजेता ठरला.
२०१० : 'जी-२०' गटातील देशांची पहिली शिखर परिषद.
२०१३ : सचिन तेंडुलकर याची क्रिकेट निवृत्ती.

१५ नोव्हेंबर

जन्मदिवस : खगोलज्ञ विलिअम हर्शल (१७३८), नोबेलविजेता नाटककार गेरहार्ड हाउप्टमन (१८६२), रक्तपुरवठ्याच्या यंत्रणेचं कार्य शोधणारा नोबेलविजेता ऑगुस्त क्रोग (१८७४), चित्रकार जॉर्जिया ओ'कीफ (१८८७), लेखक रिचमल क्रॉम्पटन (१८९०), संगीतकार दत्ता डावजेकर (१९१७), कवयित्री शिरिष पै (१९२९), लेखक जे. जी. बॅलर्ड (१९३०), 'अॅबा'मधली गायिका फ्रीदा लिंगस्ताद (१९४५), लेखक सुहास शिरवळकर (१९४८), टेनिसपटू सानिया मिर्झा (१९८६)
पुण्यस्मरण : गणितज्ञ व खगोलज्ञ योहानस केपलर (१६३०), चित्रकार अल्बर्ट कुईप (१६९१), समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहाईम (१९१७), 'कामायनी'चे रचयिता कवी जयशंकर प्रसाद (१९३७), मानववंशशास्त्रज्ञ मार्गारेट मीड (१९७८), आचार्य विनोबा भावे (१९८२), अभिनेता सईद जाफरी (२०१५), शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (२०२१)

---
जागतिक तत्त्वज्ञान दिन
जागतिक बंदिवान लेखक दिन
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - ब्राझिल, पॅलेस्टिन (स्वघोषित)
वर्धापनदिन : झारखंड राज्य (२०००)

१५३३ : इंकांचे पेरूवरील राज्य संपवणारा काँकिस्तेदोर फ्रान्सिको पिझारो राजधानी कुझकोमध्ये आला.
१८५९ : ऑलिंपिकचे आधुनिक कालखंडात पुनरुज्जीवन.
१९२० : 'लीग ऑफ नेशन्स'ची पहिली परिषद.
१९४३ : जर्मन छळछावण्यांमध्ये जिप्सी लोकांनादेखील ज्यूंप्रमाणेच वागवले जावे अशी हिमलरची आज्ञा.
१९४९ : नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना गांधीहत्येबद्दल फाशी.
१९६९ : अमेरिकेच्या राजधानीत व्हिएतनाम युद्धाविरोधात अडीच लाख लोकांनी निदर्शन केले.
१९७१ : इंटेलतर्फे पहिला व्यावसायिक सिंगल-चिप मायक्रोप्रोसेसर सादर.
१९८८ : पॅलेस्टिनी नॅशनल काउन्सिलतर्फे स्वतंत्र पॅलेस्टिन राष्ट्राची घोषणा.
१९८९ : सचिन तेंडुलकरचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण.
१९९८ : आंतरराष्ट्रीय शस्त्रनिरीक्षकांना परवानगी दिल्यामुळे इराकवरचा हल्ला पुढे ढकलला गेला.
२००० : झारखंड राज्याची स्थापना.

१६ नोव्हेंबर

जन्मदिवस : नोबेल पारितोषिक विजेता लेखन होजे सारामागो (१९२२), अभिनेता डॉ. श्रीराम लागू (१९२७), लेखक चिनुआ अचेबे (१९३०), संतसाहित्याचे अभ्यासक निर्मलकुमार फडकुले (१९३०), क्रिकेटपटू वकार युनिस (१९७१)
पुण्यस्मरण : अभिनेता क्लार्क गेबल (१९६०), संगीतकार रोशन लाल (१९६७), अर्थतज्ज्ञ मिल्टन फ्रीडमन (२००६)

---

जागतिक सहिष्णुता दिन
राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिन
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - इस्टोनिआ
वर्धापनदिन : युनेस्को (१९४५)

१८५२ : स्त्री शिक्षणाचे जनक म. फुले यांचा कंपनीसरकारतर्फे सत्कार झाला.
१९०४ : जॉन अँब्रोज फ्लेमिंग याला व्हॅक्यूम ट्यूबसाठी पेटंट मिळाले.
१९८८ : दशकाहून अधिक कालावधीनंतर पाकिस्तानात झालेल्या निवडणुकांत बेनझीर भुत्तो पंतप्रधान.
२००२ : 'सार्स' रोगाचा पहिला रुग्ण चीनमध्ये आढळला.
२०१३ : सचिन तेंडुलकरची क्रिकेटनिवृत्ती. सर्वात तरुण वयात 'भारतरत्न'. हा बहुमान मिळवणारा पहिला खेळाडू.
१९९६ : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी-मुंबई मार्गाचा शुभारंभ.

१७ नोव्हेंबर
जन्मदिवस : दिग्दर्शक ली स्ट्रासबर्ग (१९०१), अभिनेत्री शोभना समर्थ (१९१६), अभिनेता, दिग्दर्शक जेमिनी गणेशन (१९२०), लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८), दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता मार्टिन स्कॉर्सेजी (१९४२)
पुण्यस्मरण : समाजवादी सुधारक, कामगार नेते रॉबर्ट ओवेन (१८५९), 'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८), सिनेदिग्दर्शक देबकी बोस (१९७१), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (२०१३)
----
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.
१८०० : अमेरिकन सेनेटचे (संसद) पहिले अधिवेशन सुरू.
१९६९ : सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला झाला.
१८७६ : चायकोवस्कीचा 'स्लावोनिक मार्च' प्रथमच जाहीर कार्यक्रमात सादर.
१९६३ : पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे पुण्यात कडकडीत बंद.

१८ नोव्हेंबर

जन्मदिवस : 'दागेरोटाईप' छायाचित्रण तंत्र विकसित करणारा लुई दागेर (१७८७), लेखक व चित्रकार विंडहॅम लुईस (१८८२), सिनेदिग्दर्शक योरिस इव्हेन्स (१८९८), चित्रपटनिर्माते व दिग्दर्शक व्ही. शांताराम (१९०१), लेखक क्लाउस मान (१९०६), लेखिका मार्गारेट अ‍ॅटवुड (१९३९)
पुण्यस्मरण : लेखक मार्सेल प्रूस्त (१९२२), भौतिकशास्त्रज्ञ नील्स बोर (१९६२), छायाचित्रकार व चित्रकार मान रे (१९७६), अभिनेता जेम्स कोबर्न (२००२), अध्यक्षांविना पार पडणारे औदुंबर साहित्य संमेलन सुरू करणारे कवी सुधांशु (२००६), सिनेलेखक व दिग्दर्शक अब्रार अल्वी (२००९), गायक व बंदिशकार पं. बबनराव हळदणकर (२०१६)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - लाटव्हिआ, मोरोक्को, ओमान.
१३०७ : विलिअम टेलने आपल्या मुलाच्या डोक्यावरील सफरचंद बाणाने भेदले.
१६२६ : व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स बॅसिलिका कार्यरत.
१७२७ : महाराजा सवाई जय सिंग दुसरे यांनी जयपूर शहराची स्थापना केली.
१८८२ : अण्णासाहेब किर्लोस्करांच्या 'संगीत सौभद्र' नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात झाला.
१८८३ : उत्तर अमेरिका व कॅनडातील रेल्वे कंपन्यांनी पाच प्रमाणवेळा निश्चित केल्या.
१९२६ : नोबेल पारितोषिकाचे मानधन स्वीकारण्यास जॉर्ज बर्नार्ड शॉचा नकार. "I can forgive Alfred Nobel for inventing dynamite, but only a fiend in human form could have invented the Nobel Prize".
१९२८ : 'स्टीमबोट विली' हा पहिला अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित.
१९६३ : बटणे असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला.
१९७३ : वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
१९७८ : गयानामध्ये 'टेंपल पीपल' पंथाची सामूहिक आत्महत्या. ९००हून अधिक लोक मृत.
१९९३ : दक्षिण आफ्रिकेची नवी राज्यघटना मंजूर. अल्पसंख्य गौरवर्णीय राज्य संपुष्टात.
२००३ : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे मॅसॅच्युसेट्स हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले.

१९ नोव्हेंबर
जन्मदिवस : भौतिकशास्त्रज्ञ जाँ-आन्त्वान नोले (१७००), झाशीची राणी लक्ष्मीबाई (१८२८), इतिहाससंशोधक व पुरातत्वशास्त्रज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर (१८७५), 'हाल सातवाहनाची गाथासप्तशती'चे लेखक सदाशिव आत्माराम जोगळेकर (१८९७), लेखक वि. वा. पत्की (१९१२), संगीतकार हंसराज बहल (१९१६), पंतप्रधान इंदिरा गांधी (१९१७), सिनेदिग्दर्शक जिलो पाँटेकार्व्हो (१९१९), संगीतकार सलील चौधरी (१९२२), पैलवान व अभिनेता दारा सिंग (१९२८), अभिनेत्री रेहाना सुलतान (१९५०), अभिनेत्री झीनत अमान (१९५१), अभिनेत्री जोडी फॉस्टर (१९६२), मॉडेल व अभिनेत्री सुश्मिता सेन (१९७५)
पुण्यस्मरण : चित्रकार निकोला पूसँ (१६६५), संगीतकार फ्रान्झ शुबर्ट (१८२८), चित्रकार जेम्स एन्सॉर (१९४९), 'पेशवेकालीन महाराष्ट्र'चे लेखक वासुदेव कृष्ण भावे (१९६३), लेखक बोरिस स्ट्रुगात्स्की (२०१२), दुहेरी नोबेलविजेता जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक सॅंगर (२०१३).
---
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
आंतरराष्ट्रीय शौचालय दिन
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - माली, मोनॅको
१८२० : अंटार्क्टिकाचे मानवाला दर्शन.
१८६३ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे गेटिसबर्ग भाषण.
१९४२ : ज्यू वंशाचा पोलिश लेखक व चित्रकार ब्रुनो शुल्झला नाझींनी गोळ्या घालून ठार मारले.
१९६९ : फुटबॉलपटू पेलेचा १०००वा गोल.
१९७७ : इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांची इस्राइलला भेट. १९४८ साली निर्माण झालेल्या ज्यू राष्ट्राशी कोणतेही सार्वजनिक संबंध टाळण्याचे अरब धोरण दूर सारून इस्राइलला भेट देणारे ते पहिले अरब नेते ठरले.
१९८२ : नवव्या आशियाई खेळ स्पर्धांची दिल्लीत सुरुवात.

२० नोव्हेंबर
जन्मदिवस : ब्रिटिशांविरोधात बंड पुकारणारा म्हैसूरसम्राट टिपू सुलतान (१७५०), अंतराळशास्त्रज्ञ एडविन हबल (१८८९), सिनेदिग्दर्शक हेन्री-जॉर्ज क्लूझो (१९०७), सिनेदिग्दर्शक कॉन इचिकावा (१९१५), नोबेलविजेती लेखिका नादीन गॉर्डिमर (१९२३), गणितज्ज्ञ बन्वा मँडेलब्रॉट (१९२४)
पुण्यस्मरण : लेखक लिओ टॉलस्टॉय (१९१०), लेखक व समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे (१९७३), चित्रकार जॉर्जिओ द किरिको (१९७८), कवी फैझ अहमद फैझ (१९८४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९८९)
---
आंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन
१९०२ : द. आफ्रिकेतल्या भारतीयांच्या हक्कासाठीच्या लढ्यात भाग घेण्यासाठी महात्मा गांधी पुन्हा एकदा द. आफ्रिकेला गेले.
१९४७ : नाझींविरुद्ध 'न्युरेंबर्ग खटले' सुरू झाले.
१९५५ : पॉली उम्रीगर ह्यांचे न्यू झीलंडविरुद्धच्या कसोटीत द्विशतक; क्रिकेटमध्ये पहिले भारतीय द्विशतक.
१९५९ : संयुक्त राष्ट्रांतर्फे बालहक्क जाहीरनामा संमत. यामुळे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय बालक दिन' म्हणून पाळला जातो.
१९६२ : अमेरिकेने क्यूबावरची नाकेबंदी उठवली. 'क्यूबन मिसाइल क्रायसिस'ची अधिकृत अखेर.
१९७४ : अमेरिकेतील बडी कंपनी 'ए टी अँड टी' विरुद्ध सरकारतर्फे 'अ‍ॅन्टीट्रस्ट' तक्रार दाखल. खटल्याअखेर कंपनीचे विभाजन झाले.
१९७५ : स्पेनचा हुकुमशहा जनरल फ्रँको मृत.
१९८५ : मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० उपलब्ध.
१९९८ : रिटा हेस्टर या कृष्णवर्णीय प्रवाही लिंगअस्मितेच्या (ट्रान्सजेंडर) व्यक्तीची हत्या; हा दिवस आता 'आंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन' म्हणून पाळला जातो.
२००९ : सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० धावा काढणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.

२१ नोव्हेंबर

जन्मदिवस : लेखक व तत्त्वज्ञ व्होल्तेअर (१६९३), गिटारिस्ट आणि संगीतकार फ्रान्सिस्को टारेगा (१८५२), चित्रकार रने माग्रित (१८९८), नोबेलविजेता लेखक आयझॅक बाशेव्हिस सिंगर (१९०२), परमवीर चक्र विजेता जादूनाथ सिंग (१९१६), लेखक शं. ना. नवरे (१९२९), लेखक चारुता सागर (१९३०), अभिनेत्री हेलन (१९३८), गायिका ब्यॉर्क (१९६५)
पुण्यस्मरण : संगीतकार पर्सेल (१६९५), लेखक इव्हान क्रिलोव्ह (१८४४), लेखक चिं. वि. जोशी (१९६३), नोबेलविजेता वैज्ञानिक सी. व्ही. रमण (१९७०), नोबेलविजेता वैज्ञानिक अब्दुस सलाम (१९९६), लेखक व अभिनेता क्वेंटिन क्रिस्प (१९९९)
---
आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी दिन.
१८७७ : एडिसनने 'फोनोग्राफ' ह्या ध्वनिमुद्रणयंत्राच्या शोधाविषयीची घोषणा जाहीर केली.
१९०५ : 'Does the Inertia of a Body Depend Upon Its Energy Content?' हा आइनस्टाइनचा शोधनिबंध प्रकाशित. ह्यात मांडलेल्या विचारातून त्याने पुढे E = mc² हे समीकरण मांडले.
१९६२ : चीन-भारत युद्ध समाप्त.
२०१२ : २६ नोव्हेंबर २००८च्या मुंबई हल्ल्यात सहभागी दहशतवादी अजमल कसाबला फाशी.

२२ नोव्हेंबर
जन्मदिवस : लेखिका जॉर्ज एलिअट (१८१९), संमतीवयाच्या कायद्यासाठी लढा देणारी तसेच वैद्यकीय व्यवसाय करणारी पहिली भारतीय महिला डॉ. रखमाबाई राऊत (१८६४), नोबेलविजेता लेखक आंद्रे जीद (१८६९), चरित्रकार व पत्रकार दा. न. शिखरे (१९०३), संगीतकार बेंजामिन ब्रिटन (१९१३), भावकवी कृ.ब. निकुंब (१९१९), टेनिसपटू बिली जीन किंग (१९४३), टेनिसपटू बोरिस बेकर (१९६७), क्रिकेटपटू मार्व्हन अटापट्टू (१९७०), धावपटू ऑस्कर पिस्टोरिअस (१९८६)
पुण्यस्मरण : पत्रकार व लेखक जॅक लंडन (१९१६), कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (१९२०), संस्कृत नाटकांचे भाषांतरकार महादेव लेले (१९३३), खगोलशास्त्रज्ञ आर्थर एडिंग्टन (१९४४), लेखक अ‍ॅल्डस हक्सली (१९६३), लेखक सी. एस्. ल्यूईस (१९६३), लेखिका शीलवती केतकर (मूळ नाव : इडिथ व्हिक्टोरिआ कोहन) (१९७९), अभिनेत्री मे वेस्ट (१९८०), लेखक अँथनी बर्जेस (१९९३), धावपटू एमिल झाटोपेक (२०००), नृत्यदिग्दर्शक मॉरिस बेजार (२००७), गायक डॉ. एम. बालमुरलीकृष्ण (२०१६)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : लेबनॉन

१७१८ : सागरी चाचा ब्लॅकबीअर्ड ब्रिटिश आरमाराकडून मारला गेला.
१९२२ : तुतनखामेनची कबर उघडली. जवळपास मूळ स्वरूपात टिकलेली ही कबर इजिप्तच्या अभ्यासकांसाठी अनन्यसाधारण महत्त्वाची ठरली.
१९२८ : राव्हेलच्या जगप्रसिद्ध 'बोलेरो' या संगीतरचनेचे प्रथम सादरीकरण.
१९६३ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.
१९७४ : संयुक्त राष्ट्रांतर्फे पॅलेस्टिन मुक्ती संघटनेला 'निरीक्षक' दर्जा बहाल.
१९७४ : सतीश आळेकर लिखित 'महानिर्वाण' नाटकाचा पहिला प्रयोग.
१९९० : ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांची सत्ता संपुष्टात. त्या १९७९ पासून सत्तेवर होत्या.
१९९५ : पूर्णतः संगणकीय प्रतिमा वापरून केलेला पहिला अ‍ॅनिमेशनपट 'टॉय स्टोरी' प्रदर्शित.
२००५ : अँगेला मर्केल जर्मनीच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

२३ नोव्हेंबर
जन्मदिवस : नाटककार कृ. प्र. खाडिलकर (१८७२), चित्रकार ओरोझ्को (१८८३), विनोदवीर हार्पो मार्क्स (१८८८), चित्रकार, छायाचित्रकार, वास्तुरचनाकार एल लिसित्झ्की (१८९०), चित्रकार व छायाचित्रकार अलेक्सांद्र रॉडचेंको (१८९१), लेखक निरद चौधरी (१८९७), चित्रकार वेन थिबो (१९२०), गायिका गीता दत्त (१९३०), संगीतकार क्रिस्तॉफ पेंडेरेत्स्की (१९३३)
पुण्यस्मरण : चित्रकार ब्राँझिनो (१५७२), चित्रकार क्लोद लोरँ (१६८२), भौतिकशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस (१९३७), लेखक आंद्रे मालरो (१९७६), शिक्षणतज्ज्ञ ग. वि. अकोलकर (१९८३), लेखक रोअल्ड डाल (१९९०), अभिनेता क्लाउस किन्स्की (१९९१), सिनेदिग्दर्शक लुई माल (१९९५), चित्रकार, समीक्षक व लेखक बाबुराव सडवेलकर (२०००)

---

१६४४ : लेखक जॉन मिल्टन याने आएरोपाजेटिका ही सेन्सॉरशिपच्या विरोधात पत्रिका प्रकाशित केली.
१८८९ : पहिली ज्यूकबॉक्स सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये कार्यान्वित.
१९२४ : अ‍ॅन्ड्रोमेडा आकाशगंगेतलीच एक अभ्रिका (नेब्यूला) असल्याचे पूर्वी समजले जात असे. आकाशगंगेप्रमाणेच ती एक स्वतंत्र दीर्घिका (गॅलॅक्सी) आहे आणि विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत याचा पुरावा एडविन हबल यांनी सादर केला.
१९६३ : बी.बी.सी.वर 'डॉ. हू' या विज्ञान काल्पनिकेचा पहिला भाग प्रसारित. आज ही सर्वात दीर्घकाळ चालणारी विज्ञान काल्पनिका मालिका आहे.
१९७१ : कम्युनिस्ट क्रांतीनंतरच्या चीनला अखेर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत प्रवेश मिळाला.
१९९२ : आयबीएमने सायमन नावाचा हातात धरण्याजोगा, टचस्क्रीन असणारा मोबाईल फोन सादर केला. हा पहिला 'स्मार्टफोन' मानला जातो.

२४ नोव्हेंबर
जन्मदिवस : तत्त्वज्ञ स्पिनोझा (१६३२), लेखक लॉरेन्स स्टर्न (१७१३), चित्रकार आँरी द तुलूज-लोत्रेक (१८६४), सिनेलेखक सलीम खान (१९३५), लेखक केशव मेश्राम (१९३७), अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर (१९४४), सिनेदिग्दर्शक एमिर कुस्तुरिका (१९५४), क्रिकेटपटू इयन बॉथम (१९५५), लेखिका अरुंधती रॉय (१९६१)
पुण्यस्मरण : 'क्वीन' रॉक गटाचा गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्यूरी (१९९१), गायिका व अभिनेत्री उमादेवी उर्फ टुनटुन (२००३)
---
उत्क्रांति दिन
लछित दिवस (आसाम)
१६४२ : एबेल टास्मानला टास्मेनिया बेटाचा शोध लागला.
१८५९ : चार्ल्स डार्विनचे 'On the Origin of Species' हे उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारे पुस्तक प्रकाशित झाले.
१९२२ : आयरिश मुक्त राष्ट्राने लेखक आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीचा सदस्य अर्स्किन चाइल्डर्स आणि इतर आठ जणांना बेकायदेशीररीत्या रिव्हॉल्वर बाळगल्याबद्दल गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
१९६९ : चंद्रावर जाणारी दुसरी मानवी मोहीम यशस्वीरित्या संपली.
१९९१ : 'क्वीन' फ्रेडी मर्क्यूरीचा 'एड्स'मुळे ४५व्या वर्षी मृत्यू. ह्या घटनेमुळे समलैंगिकतेविषयी आणि 'एड्स'विषयी जनजागृतीसाठी मदत झाली.
१९९८ : ब्रिटिश संसदेच्या 'हाउस ऑफ लॉर्ड्स'मध्ये वंशपरंपरागत सदस्यत्वाचे युग संपुष्टात आणण्याचे पहिले पाऊल - सुमारे ७०० सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले.
२०१२ : बांग्लादेशात कपड्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीचे निदान ११२ बळी.

२५ नोव्हेंबर

जन्मदिवस : लेखक, कवी व नाटककार फेलिक्स लोपे द व्हेगा (१५६२), सिनेदिग्दर्शक, लेखक व अभिनेता देबकी बोस (१८९८), चित्रकार एस्. एल्. हळदणकर (१८८२), संगीताचार्य अशोक रानडे (१९३७), क्रिकेटपटू इम्रान खान (१९५२), महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी (१९८३)
पुण्यस्मरण : प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ व समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे (१९२२), सिनेदिग्दर्शक अलेक्सांद्र दॉव्हझेंको (१९५६), लेखक अपटन सिंक्लेअर (१९६८), लेखक युकिओ मिशिमा (१९७०), सिनेनिर्माता व दिग्दर्शक चंदूलाल शहा (१९७५), हिंदी सिनेसंगीताचा पाया रचणारे संगीतकार आर.सी. बोराल (१९८१), स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व सहकार चळवळीचे प्रणेते यशवंतराव चव्हाण (१९८४), सिनेदिग्दर्शक कारेल राईस्झ (२००२), कथक नृत्यांगना सितारा देवी (२०१४), फूटबॉलपटू दिएगो मॅरादोना (२०२०)

---

जागतिक महिला हिंसा निर्मूलन दिन.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : सुरिनामे, बॉस्निआ-हर्त्झेगोविना.

१९१५ : आइनस्टाईनने 'The field equations of gravitation' हा प्रबंध प्रकाशनासाठी दिला. सामान्य सापेक्षतावादाच्या (general relativity) सिद्धांतात तो कळीचा होता.
१९५२ : अगाथा ख्रिस्तीलिखित नाटक 'माउसट्रॅप'चा पहिला प्रयोग. यथावकाश ते सातत्याने सर्वाधिक काळ चाललेले नाटक ठरले.
१९६० : भारतातील पहिली STD (subscriber trunk dialling) दूरध्वनी सेवा लखनौ आणि कानपूरदरम्यान सुरू.
१९६० : राजकीय विरोधापोटी डॉमिनिकन गणराज्यात मिराबाल भगिनींची हत्या. नंतर १९९९मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस महिलांविरुद्ध हिंसाचाराच्या विरोधात पाळायचे ठरवले.
१९९२ : चेकोस्लोव्हाकियाचे चेक आणि स्लोव्हाक गणराज्यात विभाजन करण्याचा निर्णय विधिमंडळात संमत.

२६ नोव्हेंबर

जन्मदिवस : भाषातज्ञ व तत्त्वज्ञ फर्दिनाँ द सोस्यूर (१८५७), गणितज्ज्ञ नॉर्बर्ट वीनर (१८९४), नाटककार यूजीन आयोनेस्को (१९०९), इतिहासतज्ज्ञ राम शरण शर्मा (१९१९), दूधक्रांतीचे जनक व्हर्गीज कुरिअन (१९२१), दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते सिनेछायालेखक व्ही. के. मूर्ती (१९२३), सिनेदिग्दर्शक राजा ठाकूर (१९२३), लेखक भाऊ पाध्ये (१९२६), पॉपस्टार टीना टर्नर (१९३९)
पुण्यस्मरण : राजकवी यशवंत तथा य. दि. पेंढारकर (१९८५), ग्राफिक डिझायनर पॉल रँड (१९९६)

---

भारतीय संविधान दिवस.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : मंगोलिआ.

१७८९ : अमेरिकेत पहिला 'थँक्सगिव्हिंग डे' साजरा.
१८६५ : 'अ‍ॅलिस इन वंडरलँड' कादंबरी प्रकाशित.
१८८२ : विष्णुपंत छत्रे यांनी पहिली भारतीय सर्कस सुरू केली. मुंबईच्या क्रॉस मैदानावर 'ग्रँड इंडियन सर्कस'चा पहिला खेळ झाला.
१९४९ : संविधान समितीने भारतीय संविधान स्वीकृत केले. त्यामुळे हा दिवस 'भारतीय संविधान दिवस' म्हणून साजरा केला जातो.
१९७९ : २१ वर्षांनंतर चीनचा पुन्हा ऑलिंपिकमध्ये प्रवेश.
२००८ : मुंबईवर पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला. १६४ ठार.

२७ नोव्हेंबर

जन्मदिवस : संशोधक अँडर्स सेल्सिअस (१७०१), स्वातंत्र्यसैनिक व लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळणकर (१८८८), कवी हरिवंशराय बच्चन (१९०७), लेखक दि. बा. मोकाशी (१९१४), मार्शल आर्टपटू ब्रूस ली (१९४०), गिटारिस्ट व रॉकस्टार जिमी हेंड्रिक्स (१९४२), क्रिकेटपटू सुरेश रैना (१९८६)
पुण्यस्मरण : कवी होरेस (ख्रि.पू. ८), गणितज्ञ एडा लव्हलेस (१८५२), लेखक अलेक्झांडर द्यूमा धाकला (१८९५), लेखक व अभ्यासक अहिताग्नी राजवाडे (१९५२), नोबेलविजेता नाटककार यूजीन ओ'नील (१९५३), लेखक ग. त्र्यं. माडखोलकर (१९७६), लेखक माल्कम ब्रॅडबरी (२०००), कवी शिवमंगल सिंह 'सुमन' (२००२), पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग (२००८), सारंगीवादक सुलतान खान (२०११), सिनेदिग्दर्शक केन रसेल (२०११)

---

१८२६ : घर्षणाने जळणाऱ्या आगकाडीचा शोध.
१८९५ : अल्फ्रेड नोबेल याने आपल्या मृत्युपत्रावर स्वाक्षरी केली. त्यात नोबेल पारितोषिकासाठीची तरतूद होती.
१९७८ : सॅन फ्रान्सिस्को येथील नगरपालिकेतील महापौर आणि त्यांचे समलिंगी हक्कांसाठी लढणारे सहकारी अधिकारी हार्वे मिल्क यांची हत्या. अमेरिकेतील समलिंगी हक्कांसाठीच्या लढ्यात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
२००५ : जगातील पहिली चेहरा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी.

२८ नोव्हेंबर

जन्मदिवस : लेखक जॉन बन्यन (१६२८), कवी व चित्रकार विलियम ब्लेक (१७५७), तत्त्वज्ञ फ्रेडरिक एंगेल्स (१८२०), कवी निकोलाय नेक्रासोव्ह (१८२१), गायक व संगीतकार पं. रामकृष्णबुवा वझे (१८७४), कवी अलेक्सांद्र ब्लॉक (१८८०), लेखक स्टीफन झ्वाइग (१८८१), लेखक अल्बर्टो मोराव्हिया (१९०७), मानववंशशास्त्रज्ञ क्लोद लेव्ही-स्ट्राउस (१९०८), कादंबरीकार विश्वास पाटील (१९५९)
पुण्यस्मरण : शिल्पकार बर्निनी (१६८०), कवी बाशो (१६९४), विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले (१८९०), पुरातत्ववेत्ते व 'आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'चे संस्थापक अलेक्झांडर कनिंगहॅम (१८९३), लोकभाषांचे अभ्यासक केशव शिवराम भवाळकर (१९०२), 'रंगभूमी' मासिकाचे संस्थापक शंकर बापूजी मुजुमदार (१९३८), निर्णयसागर छापखान्याचे संचालक, लेखक व प्रकाशक दामोदर सावळाराम यंदे (१९४४), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी (१९५४), लेखक रिचर्ड राईट (१९६०), गायक, संगीतकार व अभिनेता के. सी. डे (१९६२), इतिहासतज्ज्ञ त्र्यं. शं. शेजवलकर (१९६५), क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट (१९६७), लेखिका एनिड ब्लायटन (१९६८), चित्रकार सिडनी नोलन (१९९२), सिनेनिर्माते व दिग्दर्शक भालजी पेंढारकर (१९९४)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : मॉरिटानिआ, अल्बेनिआ, पनामा, चाड

१५२० : फर्डिनांड मॅगेलन अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला.
१८१४ : लंडनचे वृत्तपत्र 'टाइम्स' स्वयंचलित, बाष्पशक्तीवर चालणाऱ्या छापखान्यात छापला जाऊ लागला. वृत्तपत्रे आम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
१८९३ : न्यू झीलंडच्या राष्ट्रीय निवडणुकांत महिलांनी मतदान केले. कोणत्याही राष्ट्रीय निवडणुकीत महिलांना मतदान करण्याची ही पहिली संधी होती.

२९ नोव्हेंबर
जन्मदिवस : भौतिकशास्त्रज्ञ ख्रिस्तिअन डॉपलर (१८०३), लेखिका लुईसा मे अल्कॉट (१८३२), प्राचीन भारतीय वाङ्मयाचे अभ्यासक म. मो. कुंटे (१८३५), भौतिकशास्त्रज्ञ जॉन अँब्रोज फ्लेमिंग (१८४९), लेखक सी. एस. लुईस (१८९८), संपादक व बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर (१९०७), सिनेदिग्दर्शक जोएल कोएन (१९५४)
पुण्यस्मरण : चित्रकार जोव्हानी बेलिनी (१५१६), चित्रकार हान्स होल्बेन धाकला (१५४३), संगीतकार मोंतेव्हेर्दी (१६४३), संगीतकार पुचिनी (१९२४), कवी माधव ज्यूलियन (१९३९), राजनीतिशास्त्रतज्ज्ञ बळवंत गणेश दाभोळकर (१९३९), रियासतकार गो. स. सरदेसाई (१९५९), अभिनेता कॅरी ग्रँट (१९८६), भारतरत्न जे. आर. डी. टाटा (१९९३), 'बीटल' जॉर्ज हॅरिसन (२००१), ज्ञानपीठविजेत्या लेखिका इंदिरा गोस्वामी (२०११)

---

पॅलेस्टिनींशी दृढैक्य साधण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन.

१६१२ : सुवालीचे युद्ध सुरू. पोर्तुगीजांचा ब्रिटिश इस्ट इंडियाने युद्धात पराभव केला. पोर्तुगीजांचा भारतावरील अंमल कमजोर होण्यास सुरुवात. युद्धाची परिणती - भारतीय आरमाराचे मूळ असलेले आरमार ब्रिटिशांनी स्थापन केले.
१८७७ : एडिसनने आपला नवा शोध 'फोनोग्राफ' लोकांना दाखवला.

३० नोव्हेंबर
जन्मदिवस : वास्तुरचनाकार आंद्रेआ पालादिओ (१५०८), संगीतज्ज्ञ आंद्रेआस वर्कमाईस्टर (१६४५), लेखक जोनादन स्विफ्ट (१६६७), चित्रकार विलिअम-अडॉल्फ बूगरो (१८२५), लेखक मार्क ट्वेन (१८३५), भौतिकशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस (१८५८), कोशकार, भाषाविषयक लेखक व संपादक वा. दा. गोखले (१८९८), चित्रकार क्लिफर्ड स्टिल (१९०४), कवी बा. भ. बोरकर (१९१०), लेखक आनंद यादव (१९३५), गायिका सुधा मल्होत्रा (१९३६), सिनेदिग्दर्शक रिडली स्कॉट (१९३७), नाटककार डेव्हिड मॅमेट (१९४७), जागतिक बुद्धिबळविजेता मॅग्नस कार्लसन (१९९०)
पुण्यस्मरण : लेखक ऑस्कर वाइल्ड (१९००), कवी फर्नांडो पेसोआ (१९३५), सिनेदिग्दर्शक अर्न्स्ट ल्यूबिश (१९४७), चित्रकार फ्रान्सिस पिकाबिआ (१९५३), संगीतकार विलहेल्म फुर्टवँगलर (१९५४), कवी पॅट्रिक कॅव्हाना (१९६७), नाटककार टेरेन्स रॅटिगन (१९७७), गिटारिस्ट चार्ली बर्ड (१९९९), बासरीवादक विजय राघव राव (२०११), पंतप्रधान इंदर कुमार गुजराल (२०१२)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : बार्बेडॉस, दक्षिण येमेन, बेनिन
खि.पू. ३३४० : ग्रहणाविषयीची मानवी इतिहासातील पहिली ज्ञात नोंद.

१७८६ : मृत्युदंडाची शिक्षा रद्द करणारे टस्कनी हे आधुनिक इतिहासातील पहिले राज्य ठरले.
१८७२ : पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा ग्लासगो येथे खेळला गेला.
१९७४ : 'ल्यूसी' ह्या तीस लाख वर्षांपूर्वीच्या महिलेचे अवशेष इथिओपिआत सापडले.
१९८२ : पॉप स्टार मायकेल जॅकसनचा 'थ्रिलर' अल्बम प्रदर्शित झाला. हा सर्वाधिक खपाचा रेकॉर्ड अल्बम आहे.
१९९८ : एक्झॉन आणि मोबिल कंपन्यांचे एकत्रीकरण होऊन एक्झॉन-मोबिल ही बलाढ्य कंपनी निर्माण झाली.
१९९९ : जागतिक व्यापार संघटनेच्या सीअ‍ॅटल येथे सुरू होत असलेल्या बैठकीचा उद्घाटन सोहळा जागतिकीकरणविरोधी आंदोलनामुळे रहित करावा लागला.

---