ऑक्टोबर दिनवैशिष्ट्य

ऑक्टोबर

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०
३१

१ ऑक्टोबर
जन्मदिवस : स्वातंत्र्यचळवळीतील नेत्या व विचारवंत अॅनी बेझंट(१८४७), विमानअभियंता विल्यम बोईंग (१८८१), उदारमतवादी विचारवंत, भारत सेवक समाजाचे सदस्य ह्रुदयनाथ कुंझरू (१८८७), कम्युनिस्ट नेते ए.के. गोपालन (१९०४), लेखिका मालतीबाई बेडेकर तथा विभावरी शिरूरकर (१९०५), संगीत दिग्दर्शक सचिनदेव बर्मन (१९०६), कवी ग. दि. माडगूळकर (१९१९), गीतकार मजरूह सुलतानपुरी (१९१९), सिनेकलावंत शिवाजी गणेशन (१९२७), अभिनेत्री लेयला हतामी (१९७२),
मृत्युदिवस : नाट्यछटाकार दिवाकर तथा शंकर काशिनाथ गर्गे (१९३१)

---

आंतरराष्ट्रीय संगीत दिन.
जागतिक पशुकल्याण दिन.
राष्ट्रीय रक्तदान दिवस.
ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता दिन.

स्वातंत्र्यदिन : सायप्रस (१९६०) , नायजेरिया (१९६०), तुवालू (१९७८), पलाऊ (१९९४)

१८३७ : भारतात पहिल्या पोस्ट ऑफिसची स्थापना.
१८४७ : सीमेन्स एजी आणि हाल्स्क या नावाने सीमेन्स कंपनीची सुरुवात.
१८६९ : ऑस्ट्रियामध्ये पहिल्यांदा पोस्टकार्डचा वापर.
१८८० : विजेच्या दिव्यांचा कारखाना एडिसनने सुरू केला.
१८९१ : स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना.
१९०८ : फोर्डची मॉडेल टी मोटार बाजारात आली.
१९४९ : चीनमध्ये क्रांती; कम्युनिस्ट राजवट सुरू.
१९५७ : अमेरिकेने आपल्या चलनावर 'इन गॉड वी ट्रस्ट' छापायला सुरुवात केली.
१९५८ : भारतात दशमान पद्धतीच्या वजनांचा वापर सुरू.
१९५८ : नासाची स्थापना.
१९६४ : जलद जपानी रेल्वे, शिंकांसेनची सुरुवात.
१९६५ : ऋत्विक घटक दिग्दर्शित चित्रपट 'सुवर्णरेखा' प्रदर्शित.
१९८२ : पहिला सीडी प्लेयर सोनी कंपनीने बाजारात आणला.
१९८७: समलैंगिक जोडप्यांना नोंदणीद्वारे मान्यता देणारा डेन्मार्क हा पहिला देश ठरला.

२ ऑक्टोबर
जन्मदिवस : नोबल वायू शोधणारा नोबेलविजेता विल्यम रामसे (१८५२), आधुनिक जीववैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ, भारतातल्या शहरांची आखणी करणारे नगररचनकार पॅट्रिक गेडिस (१८५४), महात्मा गांधी (१८६९), माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (१९०४), क्रिकेटपटू जयसिंगराव घोरपडे (१९३०), क्लोनिंग तंत्राची पायाभरणी करणारा नोबेलविजेता जॉन गर्डन (१९३३), क्रिकेटपटू बुधी कुंदरन (१९३९), अभिनेत्री आशा पारेख (१९४२), लेखक नंदा खरे (१९४६), अभिनेत्री पर्सिस खंबाता (१९५०), संगीतकार कौशल इनामदार (१९७१)
मृत्युदिवस: चित्रकार, शिल्पकार मार्सेल द्यूशाँ (१९६८), रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय वंशाचे गव्हर्नर आणि अर्थमंत्री सी.डी. देशमुख (१९८२), लेखक द. मा. मिरासदार (२०२१)

---

स्वातंत्र्यदिन : गिनी (१९५८)
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (गांधी जयंती)

१९२५ : जॉन लोगी बेअर्डने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९४४ : नाझींनी वॉर्सामधले पोलिश बंड चिरडले; अडीच लाख ठार.
१९५३ : पुणे आकाशवाणीचे प्रसारण सुरू.
१९५७ : रेडिओ सिलोनशी स्पर्धा करण्यासाठी आकाशवाणीची 'विविध भारती' सेवा सुरू.
१९६७ : थर्गूड मार्शल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश झाले.
१९४१ : मनोहर दिवाण यांनी दत्तपूरमध्ये कुष्ठधाम सुरू केले.
१९७९ : पोप जॉन पॉल (दुसरा) याने सगळ्या प्रकारचे यातनातळ आणि छळ यांचा निषेध केला.

३ ऑक्टोबर

जन्मदिवस : कवी लुई आरागाँ (१८९७), पत्रकार, संपादक श्रीपाद नवरे (१९००), हैद्राबादच्या मुक्तिसंग्रामाचे नेते व्यंकटेश खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ (१९०३), 'मराठवाड्याचा चालता बोलता इतिहास' म्हणून गौरविले गेलेले नरहर पोहनेरकर (१९०७), क्रिकेटपटू सरोबिंदू नाथ बॅनर्जी (१९११), समीक्षक म. वा. धोंड (१९१४), लेखक जेम्स हेरिअट (१९१६), लेखक गोर व्हिडाल (१९२५), चित्रपट निर्माता, दिग्दर्शक जे. पी. दत्ता (१९४९)
मृत्युदिवस : आधुनिक शिवणयंत्राचा निर्माता इलियस होव (१८६७), विनोदी लेखक व पत्रकार दत्तू बांदेकर (१९५९), गायक वूडी गथ्री (१९६७), लेखक व समीक्षक स.शि.भावे (१९८६) लेखक जाँ आनुई (१९८७), अभिनेत्री जॅनेट ले (२००४).

---

स्वातंत्र्यदिन : इराक (१९३२)
दक्षिण कोरियाचा स्थापना दिवस.

१६७० : शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर दुसर्‍यांदा स्वारी केली.
१८८० : पहिले संगीत नाटक 'शाकुंतल'चा पहिला प्रयोग पुण्यात.
१९२९ : सर्बिया, क्रोएशिया व स्लोव्हेनियाने एकत्र येउन युगोस्लाव्हिया राष्ट्राची निर्मिती केली.
१९५७ : 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना.
१९५७ : अ‍ॅलन जिन्सबर्गचा काव्यसंग्रह 'हाउल' अश्लील नसल्याचा न्यायालयीन निर्वाळा.
१९६१ : मराठी साहित्य मंडळाने मराठी शुद्धलेखनाचे नवे नियम मंजूर केले.
१९८५ : शेतकरी संघटनेतर्फे कृत्रिम धाग्याच्या विरोधात आंदोलन.
१९९० : पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण.

४ ऑक्टोबर

जन्मदिवस : चित्रकार लुकास क्रानाक धाकला (१५१५), चित्रकार जाँ-फ्रान्स्वा मिले (१८१४), हिंदी साहित्याचे इतिहासकार आचार्य रामचंद्र शुक्ल (१८८४), अभिनेता बस्टर कीटन (१८९५), प्राच्यविद्या संशोधक आलँ दानियेलू (१९०७), अतिवहनशीलता, प्लाझ्मावहन यांचा अभ्यास करणारा नोबेलविजेता व्हिताली गिंझबुर्ग (१९१६), समाजशास्त्रज्ञ आल्व्हिन टॉफलर (१९२८), अभिनेत्री सूझन सॅरॅन्डन (१९४६)
मृत्युदिवस : चित्रकार रेम्ब्राँ (१६६९), अमेरिकन स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचा शिल्पकार ओग्यूस्त बार्तोल्दी (१९०४), गायक केशवराव भोसले (१९२१), भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लॅन्क (१९४७), संपादक अनंत अंतरकर (१९६६), गायिका जॅनिस जॉपलिन (१९७०), कवी सोपानदेव चौधरी (१९८२), वृत्तपट निवेदक भाई भगत (२००२)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : मेक्सिको, बेल्जियम, लसोथो (१९६६)
जागतिक प्राणी दिन

१८३० : बेल्जियमला नेदरलँड्सपासून स्वतंत्र अस्तित्त्व.
१९५७ : 'स्पुटनिक' या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण
१९७७ : तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदीतून भाषण केले; संयुक्त राष्ट्रसंघातले हे हिंदीतले पहिलेच भाषण.
१९८५ : 'फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन'ची स्थापना.
१९९१ : अंटार्क्टिका संरक्षण करार सहमतीसाठी उपलब्ध झाला.

५ ऑक्टोबर
जन्मदिवस : विषाणूमुळे प्रसार होणाऱ्या कर्करोगावर संशोधन करणारा नोबेलविजेता फ्रान्सिस रूस (१८७९), पत्रकार, संपादक किशोरीलाल मशरूवाला (१८९०), क्रिकेटपटू माधव आपटे (१९३२). चित्रकार जेम्स रिझ्झी (१९५०), अभिनेत्री केट विन्स्लेट (१९७५)
मृत्युदिवस : अकबराच्या दरबारातला राजकवी अबुल फैज (१५९५), टपरवेअरचा निर्माता अर्ल टपर (१९८३), एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक, वृत्तपत्र स्वातंत्र्य चळवळीचे अध्वर्यू रामनाथ गोयंका (१९९१), राजनैतिक मुत्सद्दी परशुराम भवानराव पंत (१९९२), बिलीयर्ड्सपटू विल्यम जोन्स (२००४), एक्स-रे विकीरणावर संशोधन करणारा नोबेलविजेता मॉरीस विल्कीन्स (२००४), 'अॅपल'चा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज (२०११)

---

आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोध दिन
जागतिक शिक्षक दिन

प्रजासत्ताक दिन : पोर्तुगाल.

१८६४ : कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी.
१९४४ : फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९५५ : पं. नेहेरूंच्या हस्ते बंगळुरूच्या हिंदुस्थान मशीन टूल्स (एच.एम.टी.) च्या कारखान्याचे उद्घाटन.
१९७० : माहितीपटांसाठी प्रसिद्ध पीबीएस (पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस)ची सुरुवात.
१९९१ : लिनक्सच्या पहिल्या अधिकृत कर्नलचे प्रकाशन.

६ ऑक्टोबर
जन्मदिवस : ए.सी. विजेच्या उद्गात्यांपैकी एक जॉर्ज वेस्टींगहाऊस (१८४६), रेडिओ दळणवळण शोधणारा रेजिनाल्ड फेसेंडन (१८६६), वास्तुरचनाकार ल कोर्ब्यूजिए (१८८७), खगोलशास्त्रज्ञ मेघनाद सहा (१८९३), प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या अणूचे विभाजन करणारा नोबेलविजेता अर्नेस्ट वॉल्टन (१९०३), पूर्वीच्या काळातील मानवी समुद्रसफरींचे प्रात्यक्षिक करणारा दर्यावर्दी मानवंशशास्त्रज्ञ थोर हायेरडाहल (१९१४), क्रिकेटपटू रिची बेनॉ (१९३०), क्रिकेटपटू, समालोचक टोनी ग्रेग (१९४६), अभिनेता विनोद खन्ना (१९४६)
मृत्युदिवस : कवी आल्फ्रेड टेनिसन (१८९२), स्नायूंमधल्या चयापचयाची प्रक्रिया शोधणारा नोबेलविजेता ऑटो मेयरहॉफ (१९५१), इतिहाससंशोधक, दत्तो वामन पोतदार (१९७९), अभिनेत्री बेट डेव्हिस (१९८९), 'सत्यकथा'चे संपादक व पटकथालेखक ग. रा. कामत (२०१५)

---

१८६० : 'इंडियन पीनल कोड' संमत; कायदा १ जाने. १८६२ पासून लागू
१८८९ : थॉमस एडिसनने पहिले चलतचित्र बनवले व प्रदर्शित केले.
१८८९ : पॅरिसमधील विख्यात कॅबरे 'मूलँ रूज' सुरू.
१९२७ : पहिला बोलपट 'जॅझ सिंगर' प्रदर्शित.
१९७३ : अरब देशांनी इस्रायलविरोधात 'योम किप्पूर' युद्ध सुरू केले.
१९७६ : विजया मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या 'मुद्राराक्षस' नाटकाचा प्रयोग जर्मनीत वायमारमध्ये घडला.
१९९५ : ग्रह असणारा सूर्य वगळता पहिला तारा, ५१- पेगासी सापडला.
२००७ : जेसन लुईस याने मनुष्यबळावर पहिली पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२००८ : मंदी : जगभरातील शेअर बाजार सरासरी २०%नी कोसळले.

७ ऑक्टोबर
जन्मदिवस : कवी वॉल्टर रॅले (१५५२), कवी केशवसुत (१८६६), अणूची रचना शोधणारा नोबेलविजेता नील्स बोर (१८८५), नाटककार प्रागजी डोसा (१९०७), गायिका बेगम अख्तर (१९१४), वर्णद्वेषाविरोधी लढ्यातला द. आफ्रिकन बिशप डेसमंड टुटु (१९३१), 'बकीबॉल्स' शोधणाऱ्यांपैकी एक नॅनोटेक्नॉलॉजी शास्त्रज्ञ हॅरी क्रोटो (१९३९), संगीतकार उषा खन्ना (१९४१), क्रिकेटपटू झहीर खान (१९७८)
मृत्युदिवस : लेखक एडगर अ‍ॅलन पो (१८४९), 'फिलिप्स'चा सहनिर्माता अंतोन फिलीप्स (१९५१), रोगप्रतिकारशक्तीसंदर्भात संशोधन करणारा नोबेलविजेता नील्स काय यर्न (१९९४)

-----

वर्धापनदिन : स्थापनेपासून त्याच नावाखाली सुरू असणारी एकमेव विमानकंपनी 'केएलएम' (१९१९)

१९४९ : जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिकची (पूर्व जर्मनी) निर्मिती.
१९५० : तिबेटवर चिनी सैन्याचे आक्रमण. अजूनही तिबेटला स्वातंत्र्य मिळालेले नाही.
१९५२ : 'बार कोड'शी संबंधित पहिले पेटंट दाखल केले गेले.
१९५९ : रश्यन प्रोब लूना-३ याने चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजूचे प्रथमच फोटो काढले.
१९८७ : शीख राष्ट्रवाद्यांनी खलिस्तान असा स्वतंत्र देश असल्याची घोषणा केली; खलिस्तानला मान्यता मिळाली नाही.
२००१ : ११ सप्टेंबरच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला.
२००६ : रशियन वार्ताहर आना पोलिट्कोव्हस्काया यांची हत्या.

८ ऑक्टोबर
जन्मदिवस : लेखक, संपादक, व्यंगचित्रकार शं. वा. किर्लोस्कर (१८९१), श्वसनक्रियेवर संशोधन करणारा नोबेलविजेता ऑटो वारबुर्ग (१८८३), अँटीबॉडीजवर संशोधन करणारा नोबेलविजेता रॉडनी पोर्टर (१९१७), अभिनेता राजकुमार (१९२६), धावपटू मिल्खा सिंग (१९३५), अभिनेत्री सिगोर्नी वीव्हर (१९४९), जलतरणपटू मॅट बियॉन्डी (१९६५), अभिनेता मॅट डेमन (१९७०)
मृत्युदिवस : कवी, साहित्याचे अभ्यासक म. मो. कुंटे (१८८८), लेखक मुन्शी प्रेमचंद (१९३६), समाजवादी नेते, सर्वोदयी कार्यकर्ते जयप्रकाश नारायण (१९७९), C भाषेचा जनक डेनिस रिची (२०११)

----

स्वातंत्र्यदिन : क्रोएशिया
वर्धापनदिन : भारतीय वायुसेना (१९३२)

१९३२ : भारतीय वायुसेनेच्या स्थापनेचे विधेयक मध्यवर्ती कायदेमंडळात मंजूर झाले.
१९६७ : बोलिव्हियात क्रांतिवीर चे गव्हेरा पकडला गेला.
१९८२ : 'कॅट्स' संगीतिकेचा ब्रॉडवेवर पहिला प्रयोग. (ती २००० पर्यंत तिथे चालली.)
१९९१ : मतदान करून क्रोएशिया युगोस्लाव्हियापासून स्वतंत्र झाले.
२००५ : पाकव्याप्त काश्मीरमध्ये ७.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. सुमारे लाख ठार.

९ ऑक्टोबर
जन्मदिवस : कृष्णविवरांवर संशोधन करणारा भौतिकशास्त्रज्ञ कार्ल श्वार्त्सशील्ड् (१८७३), बौद्ध पंडित, लेखक धर्मानंद कोसंबी (१८७६), स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, कवी गोपबंधु दास (१८७७), स्फटिकांमध्ये क्ष-किरणांचे अपवर्तन शोधणारा नोबेलविजेता मॅक्स व्हॉन लू (१८७९), स्वातंत्र्यसैनिक एम्.भक्तवत्सलम् (१८९७), अस्पृश्यतेविरोधातला समाजसुधारक इमानुवेल देवेंद्रार (१९२४), एमाराय स्कॅनिंगचा सहसंशोधक पीटर मॅन्सफील्ड (१९३३), लेखक महेश एलकुंचवार (१९३९), 'बीटल्स'चा कवी आणि गायक जॉन लेनन (१९४०), सरोदवादक अमजद अली खान(१९४५)
मृत्युदिवस : कथाकार विद्याधर पुंडलिक(१८८९), समाजसुधारक विचारवंत 'लोकहितवादी' गोपाळ हरी देशमुख (१८९२), झीमन परिणाम शोधणाऱ्यांपैकी पीटर झीमन (१९४३), हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे (१९५५), 'पिलाटेस'चा जनक जोसेफ पिलाटेस (१९६७), नर्तक व नृत्यशिक्षक गोपीनाथ (१९८७), समाजसेविका, लेखिका गोदावरी परुळेकर (१९९६), संगीतकार रवींद्र जैन (२०१५), सिनेदिग्दर्शक आन्द्रे वायदा (२०१६)

---

जागतिक टपाल दिन.
स्वातंत्र्यदिन : युगांडा (१९६२), गयाकिल (१८२०)
शिरकाण स्मृती दिन : रोमेनिया

१६०४ : आकाशगंगेतला आत्तापर्यंतचा सगळ्यात शेवटचा अतिनवतारा (केप्लरचा अतिनवतारा) दिसला.
१८७४ : जागतिक पोस्ट युनियनची स्थापना.
१९६७ : क्रांतिकारक चे गव्हेराची गोळ्या घालून हत्या.
१९७० : मुंबईतील भाभा अणुशक्ती केंद्राने 'युरेनियम २३३'ची निर्मिती करण्यास सुरुवात केली.
१९८१ : फ्रान्समध्ये देहदंडावर बंदी.
२००६ : उत्तर कोरियाने अणुबॉम्बची चाचणी घेतली.
२०१२ : पाकिस्तानात तालिबान्यांनी विद्यार्थिनी मलाला युसुफजाईच्या खुनाचा प्रयत्न केला.

१० ऑक्टोबर
जन्मदिवस : चित्रकार आन्त्वान वात्तो (१६८४), भौतिकरसायनशास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेन्डिश (१७३१), संगीतकार जिउसेप व्हर्दी (१८१३), काँग्रेसचे संस्थापक सदस्य सुरेंद्रनाथ बॅनर्जी (१८४८), कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे (१८९९), चित्रकार व शिल्पकार अल्बेर्तो जियाकोमेत्ती (१८१३), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक के. शिवराम कारंथ (१९०२), लेखिका व समीक्षक कुसुमावती देशपांडे (१९०४), लेखक आर.के. नारायण (१९०६), कवी, समीक्षक राम विलास शर्मा (१९१२), नोबेलविजेता लेखक क्लोद सिमाँ (१९१३), जाझ संगीतकार थेलोनियस मंक (१९१७), नोबेलविजेता नाटककार हॅरॉल्ड पिंटर (१९३०), क्रिकेटपटू सदाशिव पाटील (१९३३), लेखिका 'सानिया' (१९५२), अभिनेत्री रेखा (१९५४), वार्ताहर डॅनिएल पर्ल (१९६३)
मृत्युदिवस : तुर्कस्तानाचे निर्माते कमाल अतातुर्क (१९३८), संत चरित्रकार, इतिहासकार ल. रा. पांगारकर (१९४१), लेखिका पार्वतीबाई आठवले (१९५५), गायिका एडिथ पियाफ (१९६३), सिनेदिग्दर्शक व अभिनेता गुरू दत्त (१९६४), सिनेदिग्दर्शक ऑर्सन वेल्स (१९८५), अभिनेता, दिग्दर्शक माधव वाटवे (१९८८), गायिका सरस्वतीबाई राणे (२००६), कथकनर्तिका रोहिणी भाटे (२००८), गजलगायक, संगीतकार जगजीत सिंग (२०११)

---

जागतिक मानसिक आरोग्य दिन.
जागतिक मृत्युदंड विरोधी दिवस.
स्वातंत्र्यदिन/राष्ट्रीय दिन : क्युबा (१८६८), फिजी (१९७०), तैवान (१९११)

१६९८ : कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून ईस्ट इंडिया कंपनीने विकत घेतले.
१८४६ : नेपच्यूनचा सगळा मोठा उपग्रह, ट्रायटन, याचा शोध लागला.
१८८२ : गॉटलिब डेमलरने तयार केलेली पहिली मोटरसायकल चालवून दाखविण्यात आली.
१९१३ : पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण.
१९५७ : श्वेतवर्णीय नसल्यामुळे घानाच्या अर्थमंत्री कोम्ला अग्बेली ग्ब्डमाहला डेलावेरमधील डोव्हर शहरातल्या रेस्टॉरंटमध्ये मालकाने प्रवेश नाकारला. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ड्वाईट डी. आयझेनहोवरने याबद्दल ग्ब्डमाहची जाहीर माफी मागितली.
१९६४ : टोकियो ऑलिम्पिक - भूस्थिर उपग्रहाद्वारे जगभरात लाइव्ह दाखवला गेलेला पहिला ऑलिम्पिक उद्घाटनसोहळा.
१९७८ : राष्ट्रीय बुद्धिबळ चँपियन म्हणून रोहिणी खाडिलकर ही पहिली भारतीय स्त्री ठरली.
१९८० : जम्मू-काश्मीर विधानसभेची इमारत आगीत भस्मसात.

११ ऑक्टोबर
जन्मदिवस : लघुग्रह, धूमकेतू संशोधक विल्हेम ओलबर्स (१७५७), बालसाहित्यिक ना. गं. लिमये (१८८९), लोकनायक जयप्रकाश नारायण (१९०२), अभिनेता अमिताभ बच्चन (१९४२), सिनेदिग्दर्शक आमोस गिताई (१९५०), कादंबरीकार अरुण गद्रे (१९५७)

मृत्युदिवस : 'वाईकर भटजी' कादंबरीचे लेखक धनुर्धारी उर्फ रा. वि. टिकेकर (१९०७), विनोदवीर चिको मार्क्स (१९६१), कवी, चित्रकार, सिनेदिग्दर्शक जाँ कोक्तो (१९६३), छायाचित्रकार डोरोथी लॅन्ज (१९६५), सामाजिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करणारे, 'छोडो भारत' सत्याग्रही माणिक बंडोजी ठाकूर उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९६८), अभिनेत्री दीना पाठक (२००२).

---

आंतरराष्ट्रीय कन्या दिन
LGBT 'कमिंग आऊट' दिन

१९६२ : भारताच्या ईशान्य सीमेवर चीनचा हल्ला
२००० : नासाचं शंभरावी अवकाश यात्रा डिस्कव्हरी यानाच्या सहाय्याने सुरू
२००१ : पोलरॉईड कॉर्पोरेशनने दिवाळं जाहीर केलं.

१२ ऑक्टोबर
जन्मदिवस : जायरोस्कोप शोधणारा एल्मर स्पेरी (१८६०), साखरेच्या किण्वनाचा शोध लावणारा नोबेलविजेता आर्थन हार्डन (१८६५), 'आवडी'चा जनक ऑगुस्ट होर्च (१८६५), कवयित्री शांता शेळके (१९२२), छायालेखक सुब्रत मित्र (१९३०), ऑपरा गायक, अभिनेता लुच्चिआनो पावारोत्ती (१९३५), क्रिकेटपटू अशोक मांकड (१९४६), अभिनेता, निर्माता ह्यू जॅकमन (१९६८),
मृत्युदिवस : फ्रेंच इतिहासकार, मुत्सद्दी फ्रांस्वा पियार गीयोम गोझी (१८७२), मलेरिया आणि पिवळ्या तापाच्या प्रतिबंधासाठी डीडीटीचा वापर शोधणारा नोबेलविजेता पॉल मुलर (१९६५), समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया (१९६७)

---

स्वातंत्र्यदिन : विषुववृत्तीय गिनी (१९६८)

१४९२ : ख्रिस्तोफर कोलंबर (आताच्या) बहामाच्या किनाऱ्यावर पोहोचला.
१८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा एडनचा तुरुंग फोडून पळण्याचा अयशस्वी प्रयत्न.
१८१० : म्युनिकच्या राजघराण्याने आपल्या राजकुमाराच्या लग्नाप्रीत्यर्थ म्युनिकच्या जनतेला बीयर पिण्यास मुक्त आमंत्रण दिले. यातून ऑक्टोबरफेस्टची सुरुवात झाली.
१८२३ : चार्ल्स मॅकिंटॉशने स्कॉटलँडमध्ये पहिला रेनकोट विकला.
१८७१ : भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. भारत सरकारने हा कायदा १९४९मध्ये रद्द केला.
१९२८ : चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बॉस्टनमध्ये सर्वप्रथम कृत्रिम फुफ्फुसाचा उपयोग.
१९७९ : 'द हिचहायकर्स गाइड टू द गॅलेक्सी' प्रकाशित.
१९८८ : जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.
१९९९ : परवेझ मुशर्रफने नवाझ शरीफचे सरकार उलथवून पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली.

१३ ऑक्टोबर
जन्मदिवस : कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक भुलाभाई देसाई (१८७७), अभिनेता, गायक अशोक कुमार (१९११), गायक उस्ताद नुसरत फतेह अली खान (१९४८), विनोदवीर, अभिनेता साशा बॅरन कोहेन (१९७१), अभिनेत्री स्पृहा जोशी (१९८९)
मृत्युदिवस : भारतीय संस्कृती, स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या भगिनी निवेदिता (१९११), संगीतकार वसंत प्रभू (१९६८), गायक, संगीतकार, अभिनेता किशोर कुमार (१९८७), न्यूट्रॉन विकीर वर्णपटाच्या तंत्राचा शोध लावणारा नोबेलविजेता बरट्राम ब्रॉकहाऊस (२००३), मैहर घराण्याच्या सूरबहार वादक आणि गुरू अन्नपूर्णा देवी (२०१८)

---

१७७२ : इंग्रजांची कायमची वकिलात पुण्याला पेशव्यांच्या दरबारात स्थापन झाली.
१७७३ : चार्ल्स मेसिअरला व्हर्लपूल दीर्घिका सापडली.
१७९२ : अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा निवास, 'व्हाईट हाऊस' इमारतीची पायाभरणी.
१८८४ : ग्रीनीचला युटीसीचा मध्य अक्ष असल्याचे ठरवण्यात आले.
१९८४ : श्रीलंकेने ९३ भारतीय मच्छिमारांना तुरुंगात डांबले.
२०१३ : मध्य प्रदेशच्या दांतिया जिल्ह्यातील रतनगढ मंदिराजवळ असलेल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत स्त्री-बालकांसह ११० ठार, १००+ जखमी.

१४ ऑक्टोबर
जन्मदिवस : सम्राट अकबर (१५४२), लेखिका कॅथरीन मॅन्सफिल्ड (१८८८), कवी इ. इ. कमिंग्ज (१८९४), जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका हाना आरेंड्ट (१९०६), संगीतज्ज्ञ निखिल बॅनर्जी (१९३१), लेखक सुभाष भेंडे (१९३६), गायक क्लिफ रिचर्ड (१९४०), क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान (१९७६), गौतम गंभीर (१९८१).
मृत्युदिवस : लेखक, पत्रकार व संपादक न. चिं. केळकर (१९४७), समाजसुधारक र. धों. कर्वे (१९५३), अभिनेता एरॉल फ्लिन (१९५९), गायक बिंग क्रॉसबी (१९७७), इतिहासतज्ज्ञ सेतू माधवराव पगडी (१९९४), संपादक द्वा. भ. कर्णिक (२००५), गणितज्ज्ञ मॅन्डेलब्रॉट (२०१०).

---

आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण दिन.

१८८८ : फ्रेंच शास्त्रज्ञ लुई ल प्रॅन्स ह्याने 'राउंडहे गार्डन सीन' ही फिल्म चित्रित केली. मानवी इतिहासात जतन झालेले हे पहिले फिल्मचित्रण आहे.
१९२६ : 'विनी द पूह'चे प्रथम प्रकाशन.
१९४३ : सॉबिबॉर येथील नाझी छळछावणीत बंड.
१९५६ : सुमारे ३,८०,००० अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्धधर्मात प्रवेश.

१५ ऑक्टोबर
जन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)
मृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)

---

वर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)

१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.
१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.
१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.
१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.
१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.
१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू

१६ ऑक्टोबर
जन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)
मृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)

---

जागतिक अन्न दिन
१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)
वर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)
१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.
१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.
१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.
१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).
१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.

१७ ऑक्टोबर
जन्मदिवस : शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक सर सय्यद अहमद खान (१८१७), गायक, संगीतज्ज्ञ पं. भास्करबुवा बखले (१८६९), ग्रीक साहित्य, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक गो. वि. तुळपुळे (१८८०), पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव बोरावके (१८९२), नाटककार आर्थर मिलर (१९१७), अभिनेत्री रिटा हेवर्थ (१९१९), अभिनेत्री सिमी गरेवाल (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९५५), क्रिकेटपटू अनिल कुंबळे (१९७०), रॅप गायक एमिनेम (१९७२)
मृत्युदिवस : संगीतकार शोपँ (१८४९), व्याकरणकार, ग्रंथकार दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८८२), भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव्ह किरचॉफ (१८८७), चित्रकार नाताल्या गोंचारोव्हा (१९६२), साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी, गीतकार कन्नादासन (१९८१), तत्त्वज्ञ रेमंड एरन (१९८३)
---

जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन

१७२९ : थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गुजराथची व्यवस्था लावून संरक्षणाची जबाबदारी घेतली.
१९०७ : मार्कोनीच्या कंपनीने अटलांटिकपार तारायंत्रसेवा सुरू केली.
१९३३ : अल्बर्ट आइनस्टाईनने जर्मनी सोडली.
१९५६ : जगातले पहिले अणुऊर्जा केंद्र इंग्लंडच्या कंब्रिया प्रांतात सुरू
१९७३ : ओपेक देशांनी अनेक पाश्चात्य देशांना तेल विकणे बंद केले.
१९७९ : मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल मिळाले.
२००३ : भारतात तृतीयपंथी व्यक्तींनी जिती जितायी पॉलिटिक्स हा आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला.

१८ ऑक्टोबर
जन्मदिवस : तत्त्वज्ञ व नोबेलविजेता लेखक हेन्री बर्गसन (१८५९), 'दुर्दैवी रंगू' कादंबरीचे लेखक भारताचार्य चिं. वि. वैद्य (१८६१), अभिनेत्री मेलिना मर्क्यूरी (१९२०), अभिनेता क्लाउस किन्स्की (१९२६), अभिनेता ओम पुरी (१९५०), टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा (१९५६).
मृत्युदिवस : गणितज्ञ चार्ल्स बॅबेज (१८७१), शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन (१९३१), मराठीतील आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (१९५१), ज्ञानपीठविजेते तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायणन (१९७६), लेखक शंकर पाटील (१९९८), संतसाहित्यिक डॉ. गं. बा. ग्रामोपाध्ये (२००२)

---

१३८६ : हाईडेलबर्ग विद्यापीठाची स्थापना.
१८५१ : हर्मन मेलव्हिललिखित 'मोबी डिक' कादंबरीची प्रथमावृत्ती प्रकाशित.
१९०६ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबईत 'डिप्रेस्ड क्लास मिशन'ची स्थापना केली.
१९२२ : 'बीबीसी'ची स्थापना.
१९५४ : टेक्सस इन्स्ट्रुमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.
१९६७ : रशियन अंतराळयान व्हेनेरा-४ शुक्रावर उतरले. परग्रहावर उतरणारे ते पहिले यान होते.
१९७७ : 'रेड आर्मी फॅक्शन' (उर्फ बादर-माइनहॉफ गट) ह्या कडव्या डाव्या संघटनेचे तीन सदस्य आंद्रिआस बादर, गुड्रुन एन्स्लिन, यान-कार्ल रास्प ह्यांची तुरुंगात आत्महत्या.
२००४ : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन पोलीसहल्ल्यात ठार.
२००७ : माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परतल्यावर त्यांच्या मोटार ताफ्यावर आत्मघातकी हल्ला. भुत्तो सुखरूप, पण १३९ मृत आणि ४५० जखमी.

१९ ऑक्टोबर
जन्मदिवस : कथाकार दिवाकर कृष्ण (१९०२), आद्य चित्रपट संगीतकार आर.सी. बोराल (१९०३), नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ एस्. चंद्रशेखर (१९१०), लेखक जॉन ल कारे (१९३१), गीतकार शांताराम नांदगावकर (१९३६), अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर (१९५९), नृत्यदिग्दर्शक शामक दावर (१९६१)
मृत्युदिवस : लेखक जॉनादन स्विफ्ट (१७४५), अणुशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड (१९३७), शिल्पकार कामिय क्लोदेल (१९४३), अभिनेत्री बेबी नाझ (१९९५), लेखिका नाताली सारोत (१९९९)

---

१७८१ : अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडची शरणागती.
१८१२ : नेपोलियनची मॉस्कोच्या सीमेवरून माघार.
१८८२ : हंटर कमिशनपुढे महात्मा फुल्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला.
१९३३ : जर्मनीने 'लीग ऑफ नेशन्स'मधून अंग काढून घेतले.
१९९३ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.

२० ऑक्टोबर
जन्मदिवस : गणितज्ञ व वास्तुरचनाकार क्रिस्तोफर रेन (१६३२), कवी आर्थर रॅम्बो (१८५४), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स चॅडविक (१८९१), शाहीर अमर शेख (१९१६), नोबेलविजेती लेखिका एल्फ्रीड जेलिनेक (१९४६), क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू (१९६३), क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (१९७८)
मृत्युदिवस : लेखक, भाषांतरकार व प्राच्यविद्या अभ्यासक रिचर्ड बर्टन (१८९०), अभिनेता-गायक मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर (१९७४), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), पत्रकार दि.वि. गोखले (१९९६)

---

जागतिक सांख्यिकी दिन.
१९४० : 'हरिजन'च्या अंकात म. गांधींनी विनोबांबद्दल लेख लिहून 'पहिले सत्याग्रही' अशी त्यांची ओळख करून दिली.
१९५० : ग्रामीण भागातील जिज्ञासूंसाठी कृ.भ. बाबर ह्यांनी 'समाजशिक्षणमाला' स्थापन केली. श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर ह्यांनी ह्या उपक्रमाअंतर्गत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.
१९६२ : चीनचा भारतावर हल्ला.
१९६७ : ओकलंड, कॅलिफोर्निया येथे व्हिएतनामयुद्धविरोधी निदर्शनांत हजारो सहभागी.

२१ ऑक्टोबर
जन्मदिवस : गणितज्ज्ञ बर्नोली (१६८७), लेखक सॅम्युएल टेलर कोलरिज (१७७२), नोबेल पारितोषिकाचा जनक अल्फ्रेड नोबेल (१८३३), गणितज्ज्ञ मार्टिन गार्डनर (१९१४), संगीतकार राम मराठे (१९१६), संगीतकार, गायक राम फाटक (१९१७), विज्ञान-काल्पनिका लेखिका उर्सुला के ल ग्विन (१९२९), अभिनेता शम्मी कपूर (१९३१), लेखक तारिक अली (१९४३), सिनेदिग्दर्शक निकिता मिखाल्कोव्ह (१९४५).
मृत्युदिवस : ब्रिटिश दर्यासारंग नेल्सन (१८०५), लेखक आर्थर श्नित्झलर (१९३१), लेखक जॅक केरुआक (१९६९), नाट्यसंगीतकार आणि सिनेसंगीतकार मास्टर कृष्णराव (१९७४), सिनेदिग्दर्शक फ्रॉन्स्वा त्रूफो (१९८४), सिनेदिग्दर्शक व निर्माता यश चोप्रा (२०१२).

---

१८०५ : ट्रॅफाल्गारच्या युद्धात अ‍ॅडमिरल नेल्सनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश नौदलाने फ्रेंच आणि स्पॅनिश नौदलाचा पराभव केला. ह्यानंतर विसाव्या शतकापर्यंत ब्रिटनचे दर्यावर्चस्व अबाधित राहिले.
१८७९ : थॉमस अल्वा एडिसनने प्रथम कार्बन तंतू वापरून विजेचा दिवा चालवला. साडेतेरा तास चालल्यावर हा दिवा विझला.
१९२१ : रुडॉल्फ व्हॅलेन्टिनोला मूकपटांचा स्टार बनवणारा 'द शेख' हा चित्रपट प्रदर्शित.
१९४० : अर्नेस्ट हेमिंग्वेलिखित कादंबरी 'फॉर हूम द बेल टोल्स'ची प्रथमावृत्ती प्रकाशित.
१९४४ : दुसरे महायुद्ध - पहिला 'कामिकाझे' हल्ला. जपानी विमानाचा एका ऑस्ट्रेलियन जहाजावर आत्मघातकी हल्ला.
१९४५ : फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाची संधी मिळाली.
१९५९ : न्यू यॉर्कमध्ये जगप्रसिद्ध सॉलोमन गूगनहाईम संग्रहालय खुले.
१९८७ : जाफना इस्पितळ, श्रीलंका : भारतीय शांतिसेनेकडून ७० तामिळ रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिकांची हत्या.

२२ ऑक्टोबर
जन्मदिवस : संगीतकार फ्रान्झ लिस्झ्ट (१८११), अभिनेत्री सारा बर्नहार्ड (१८४४), नोबेलविजेता लेखक इव्हान बुनिन (१८७०), हुतात्मा अशफाकउल्ला खान (१९००), छायाचित्रकार हॅरी कालाहान (१९१२), छायाचित्रकार रॉबर्ट कापा (१९१३), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (१९१९), चित्रकार रॉबर्ट रॉशेनबर्ग (१९४०), अभिनेत्री कॅथरीन दनव्ह (१९४३)
मृत्युदिवस : न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे (१७७९), चित्रकार पॉल सेझान (१९०६), कवी जीवनानंद दास (१९५४), लेखक ना. सी. फडके (१९७८), संगीतज्ञ नादिया बूलॉन्जेर (१९७९), विचारवंत लूई अल्थ्युस्सर (१९९०), लेखक किन्ग्जले अ‍ॅमिस (१९९५)

---

स्वातंत्र्यदिन : लाओस, माले
जागतिक तोतरेपणा दिन

१७९७ : ऑन्द्रे जाक गार्नरँने जगातले पहिले पॅराशूट उड्डाण केले.
२००८ : 'चांद्रयान-१' ह्या भारतीय चांद्रमोहिमेचा आरंभ.
२०१२ : अवैध द्रव्यांचे सेवन केल्याबद्दल सायकलपटू लॅन्स आर्मस्ट्रॉन्गची पदके रद्द; आयुष्यभरासाठीची बंदी.

२३ ऑक्टोबर
जन्मदिवस : नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ फीलिक्स ब्लॉक (१९०५), 'श्रीविद्या प्रकाशन'चे संस्थापक-संचालक मधुकाका कुलकर्णी (१९२३), लेखक अस्लम फारुखी (१९२३), बांगला कवी शमसुर रहमान (१९२९), लेखक मायकेल क्रिक्टन (१९४२), सिनेदिग्दर्शक अ‍ॅन्ग ली (१९५४), लेखक अरविंद अडिगा (१९७४)
मृत्युदिवस : मराठी चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक दिनकर द. पाटील (२००५), लेखक सुनील गंगोपाध्याय (२०१२)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : हंगेरी

१७०७ : ब्रिटीश संसदेची पहिली सभा.
१९११ : विमानाचा युद्धात प्रथम वापर. तुर्की-इटली युद्धादरम्यान इटलीच्या वैमानिकाने लिब्यातून उड्डाण करून तुर्कीवर टेहळणी केली.
१९१७ : ऑक्टोबर क्रांतीसाठी लेनिनचे आवाहन.
१९४६ : संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली सर्वसाधारण सभा.
१९५६ : हंगेरिअन क्रांतीची सुरुवात. (४ नोव्हेंबरला क्रांती दडपली गेली.) पुढे १९८९मध्ये ह्याच दिवशी हंगेरीने कम्युनिझम नाकारत स्वतंत्र गणराज्याची घोषणा केली.
१९९६ : डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत म्हणजे निव्वळ परिकल्पना (hypothesis) नाही, हे पोप जॉन-पॉल २ ह्यांनी मान्य केले.
१९९८ : इस्राएली राष्ट्राध्यक्ष बिन्यामिन नेतान्याहू आणि पॅलेस्टिनी प्रमुख यासर अराफत ह्यांच्यामध्ये 'लॅन्ड फॉर पीस' करार.
२००१ : 'अ‍ॅपल'तर्फे पहिला आयपॉड सादर.
२००२ : चेचेन बंडखोरांनी मॉस्कोमध्ये एका नाट्यगृहात ७०० लोक ओलीस ठेवले.

२४ ऑक्टोबर
जन्मदिवस : जीवशास्त्रज्ञ अँटनी व्हॅन लीवेनहोक (१६३२), औंध संस्थानचे अधिपती, कलासंग्राहक, चित्रकार, लेखक, समाजसुधारक भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (१८६८), गणितज्ज्ञ अलेक्सांद्र गेलफंड (१९०६), व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पिएर-जिल द जेन (१९३२), नोबेलविजेता अर्थतज्ज्ञ रॉबर्ट मंडेल (१९३२), फूटबॉलपटू वेन रूनी (१९८५)
मृत्युदिवस : खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे (१६०१), शिल्पकार अर्न्स््‌ट बार्लाक (१९३८), लेखिका इस्मत चुघताई (१९९१), लेखक अरविंद गोखले (१९९२), वंशभेदविरोधक रोझा पार्क्स (२००५), 'लिस्प' संगणकभाषेचा निर्माता जॉन मॅकार्थी (२०११), गायक मन्ना डे (२०१३), ठुमरी गायिका गिरिजा देवी (२०१७)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : झाम्बिया
जागतिक पोलिओ दिन
वर्धापनदिन : संयुक्त राष्ट्रे

१२६० : मध्ययुगीन युरोपियन कलेचा जगप्रसिद्ध अविष्कार असलेल्या शार्त्रच्या कॅथेड्रलचे उद्घाटन.
१९१७ : रशियामध्ये 'ऑक्टोबर क्रांती'ची सुरुवात.
१९२९ : 'काळा गुरुवार'. वॉल स्ट्रीट कोसळला. आर्थिक मंदीची सुरुवात.
२००३ : स्वनातीत विमान 'काँकॉर्ड'चे अखेरचे उड्डाण.

२५ ऑक्टोबर
जन्मदिवस : संगीतकार योहॅन स्ट्राउस दुसरा (१८२५), संगीतकार जॉर्ज बिझे (१८३८), चित्रकार पाब्लो पिकासो (१८८१), लेखिका झेडी स्मिथ (१९७५)
मृत्युदिवस : लेखक जॉफ्री चॉसर (१४००), शास्त्रज्ञ इव्हान्जेलिस्ता टॉरिचेली (१६४७), चित्रकार रॉबर्ट दलोने (१९४१), धावपटू अबेबे बिकिला (१९७३), लेखक रेमंड कनो (१९७६), कवी साहिर लुधियानवी (१९८०), ज्ञानपीठविजेते लेखक निर्मल वर्मा (२००५), विनोदवीर जसपाल भट्टी (२०१२)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : कझाकस्तान, तैवान

१४१५ - अजँकूर (Agincourt) लढाईने १०० वर्षांच्या युद्धाची अखेर.
१८९० - हरिभाऊ आपटे यांनी 'करमणूक' पत्र सुरू केले. 'पण लक्षात कोण घेतो?' ही विख्यात कादंबरी यात क्रमशः प्रकाशित झाली. १९१७मध्ये पत्र बंद पडले.
१९८२ - रिझर्व्ह बँकेच्या नव्या पतधोरणानुसार निर्यात व इतर अनेक क्षेत्रांस सवलती; ठेवींवरचे व्याजदर वाढले.
१९८३ - ग्रॅनडात कम्युनिस्ट क्रांती झाल्यानंतर ती रोखण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन यांनी तिथे हजारो सैनिक पाठवले आणि देश ताब्यात घेतला.
१९८४ - इथिओपिआतील दुष्काळाचा सामना करण्यासाठी युरोपियन संघाची १.८ मिलियन पाँडांची देणगी. दुष्काळात सुमारे दहा लाख लोक मृत.
२००१ - मायक्रोसॉफ्टने 'विंडोज एक्सपी' ही आवृत्ती वितरित केली.
२००७ - एअरबस ए-३८०चे प्रथम उड्डाण.

२६ ऑक्टोबर
जन्मदिवस : संत नामदेव (१२७०), कवी द. भा. धामणस्कर (१९३०), संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर (१९३७), कवी अ‍ॅन्ड्र्यू मोशन (१९५२)
मृत्युदिवस : चित्रकार विलिअम होगार्थ (१७६४), गायक पं. डी.व्ही. पलुस्कर (१९५५), संपादक, स्वातंत्र्यसैनिक व लेखक अनंत भालेराव (१९९१)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ऑस्ट्रिया

१९४७ : जम्मू-काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांची संस्थान भारतात विलीन करण्यास मान्यता
१९७७ : देवीरोगाचे उच्चाटन. हे लशीकरणाचे मोठे यश मानले जाते.
२००२ : मॉस्कोच्या नाट्यगृहातले ओलीसनाट्य संपुष्टात. ५० चेचेन बंडखोर आणि १५० ओलीस मृत्युमुखी.

२७ ऑक्टोबर
जन्मदिवस : ब्रिटिश दर्यावर्दी जेम्स कूक (१७२८), शिवणयंत्राचा संशोधक आयझॅक सिंगर (१८११), कवी डिलन थॉमस (१९१४), माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन् (१९२०), चित्रकार रॉय लिक्टेनस्टाईन (१९२३), उद्योजक अरविंद मफतलाल (१९२३), विचारवंत फ्रान्सिस फुकुयामा (१९५२), क्रिकेटपटू मार्क टेलर (१९६४), क्रिकेटपटू कुमार संघकारा (१९७७), क्रिकेटपटू इरफान पठाण (१९८४)
मृत्युदिवस : मुघल सम्राट अकबर (१६०५), सवाई माधवराव पेशवे (१७९५), गायक व किराणा घराण्याचे संस्थापक उ. अब्दुल करीम खाँ (१९३७)

---

जागतिक दृक्-श्राव्य वारसा दिन.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : तुर्कमेनिस्तान (१९९१), सेंट व्हिन्सेंट अ‍ॅन्ड ग्रेनेडिन्स (१९७९)

१९४७ : गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी महाराजा हरीसिंग यांची भारतात सामील होण्याची मागणी स्वीकारली; भारतीय सैन्य जम्मू-काश्मीरमध्ये दाखल; काश्मीर भारताच्या ताब्यात.
१९५८ : पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खान ह्यांनी लष्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा ह्यांना पदच्युत केले.
१९७१ : काँगोच्या लोकतांत्रिक प्रजासत्ताकने आपले नाव बदलून झैर केले.
१९८६ : 'बिग बँग' - मार्गारेट थॅचर ह्यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंग्डमने आर्थिक बाजारपेठांवरील सगळे निर्बंध काढून घेतले. ह्यानंतर लंडन पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवहारांच्या केंद्रस्थानी आले.
१९९९ : हल्लेखोरांनी आर्मेनियाच्या संसदेत गोळ्या चालवून पंतप्रधान, संसदाध्यक्ष आणि सहा इतर सदस्यांची हत्या केली.
२००४ : ८६ वर्षांनंतर बॉस्टन रेड सॉक्सने अमेरिकन बेसबॉल वर्ल्ड सिरीज़ जिंकली.

२८ ऑक्टोबर
जन्मदिवस : लेखक इव्हान तुर्गेनेव्ह (१८१८), कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर (१८९३), लेखक एव्हलिन वॉ (१९०३), चित्रकार फ्रान्सिस बेकन (१९०९), पोलिओ लशीचा जनक जीवशास्त्रज्ञ योनास सॉल्क (१९१४)
मृत्युदिवस : सम्राट जहांगीर (१६२७), विचारवंत जॉन लॉक (१७०४), प्राच्यविद्या संशोधक मॅक्स म्युल्लर (१९००), चित्रकार आंद्रे मासाँ (१९८७), कवी टेड ह्यूज (१९९८)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : चेक गणराज्य, स्लोव्हाक गणराज्य
आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिन
क्रिओल भाषा आणि संस्कृती दिन
आंतरराष्ट्रीय ज्यूडो दिन

१४२० : बीजिंग शहर मिंग साम्राज्याची अधिकृत राजधानी म्हणून जाहीर.
१४९२ : कोलंबसला क्यूबाचा शोध लागला.
१६३६ : हार्वर्ड विद्यापीठाची स्थापना.
१८८६ : अमेरिकन स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्त फ्रान्सकडून भेट मिळालेला स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा न्यू यॉर्कमध्ये राष्ट्रार्पित.
१९२९ : न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज १२% कोसळला; जागतिक मंदीची सुरुवात (२४ ऑक्टो. - २९ ऑक्टो.).
१९६२ : क्यूबातून आपली मिसाईल मागे घेण्याची सोव्हिएत युनियनची घोषणा. 'क्यूबन मिसाईल क्रायसिस' संपुष्टात.
१९९५ : बाकू (अझरबैजान) येथे जगातील सर्वात भीषण भूमिगत रेल्वे अपघात. आगीत २८९ प्रवासी मृत्युमुखी.

२९ ऑक्टोबर
जन्मदिवस : खगोलतज्ञ एडमंड हॅले (१६५६), लेखक जेम्स बॉसवेल (१७४०), विचारवंत, लेखक ए. जे. एयर (१९१०), लेखक रा. ना. चव्हाण (१९११)
मृत्युदिवस : लेखक वॉल्टर रॅले (१६१८), लेखक व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक नीळकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे (१८९५), पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर (१९११), स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चटोपाध्याय (१९८८), विचारवंत वसंत पळशीकर (२०१६)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : तुर्कस्तान (१९२३)
वर्धापनदिन : 'अ‍ॅस्टेरिक्स' कॉमिक (१९५९)

१६७५ : गणितज्ज्ञ लाइबनित्झने कॅलक्युलसमधील 'इंटिग्रल' ह्या संकल्पनेसाठी ∫ हे चिन्ह प्रथम वापरले.
१८६३ : आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसच्या स्थापनेला मान्यता.
१९५८ : महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 'भारतरत्न' प्रदान.
१९७५ : स्पेनमधली जनरल फ्रँकोची हुकुमशाही संपुष्टात.
१९९९ : ओडिशास महाभयंकर चक्रीवादळाचा तडाखा. १०,०००हून अधिक लोक मृत्युमुखी.
२००५ : दहशतवादी बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६०हून अधिक व्यक्ती ठार.

३० ऑक्टोबर
जन्मदिवस : नाटककार रिचर्ड शेरिडन (१७५१), चित्रकार अल्फ्रेड सिसले (१८३९), लेखक पॉल व्हॅलेरी (१८७१), कवी एझ्रा पाउंड (१८८५), बंगाली बालसाहित्यकार सुकुमार राय (१८८७), सिनेदिग्दर्शक लुई माल (१९३२), शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा (१९०९), समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक गंगाधर मोरजे (१९३०), संगीतकार त्रिलोक गुर्टू (१९५१), फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना (१९६०)
मृत्युदिवस : तत्त्वज्ञ समाजसुधारक दयानंद सरस्वती (१८८३), स्वातंत्र्यवीर लाला लजपतराय (१९२८), लेखक कॉनरॅड रिक्टर (१९६८), 'मलिका-ए-गझल' बेगम अख्तर (१९७४), विचारवंत व लेखक जोसेफ कॅम्पबेल (१९८७), सिनेदिग्दर्शक व्ही. शांताराम (१९९०), लेखक भाऊ पाध्ये (१९९६), लेखक विश्राम बेडेकर (१९९८), व्यंगचित्रकार वसंत हळबे (१९९९), तत्त्वज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ क्लोद लेव्ही-स्ट्राऊस (२००९), संगीतकार यशवंत देव (२०१८)

---

१९२५ : जॉन लोगी बेयर्डने पहिला दूरचित्रवाणी संच बनवला.
१९३८ : एच.जी. वेल्सची कादंबरी 'वॉर ऑफ द वर्ल्ड्‌स'चे ऑर्सन वेल्सने केलेले रूपांतर रेडिओवरून प्रसारित; मंगळवासियांची स्वारी खरेच आली असे समजून अमेरिकन जनता भयभीत.
१९४५ : भारताचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
१९६० : मायकेल वूडरफने एडिंबरो येथे पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केले.

३१ ऑक्टोबर
जन्मदिवस : चित्रकार व्हरमीर (१६३२), कवी जॉन कीट्स (१७९५), स्वातंत्र्यसैनिक, उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल (१८७५), क्रिकेटपटू सी. के. नायडू (१८९५), छायाचित्रकार हेल्मट न्यूटन (१९२०), मराठी व संस्कृतचे अभ्यासक कृष्ण अर्जुनवाडकर (१९२६), लेखक एच. आर. एफ. कीटिंग (१९२६)
मृत्युदिवस : चित्रकार एगॉन शील (१९१८), जादूगार हॅरी हुदिनी (१९२६), संगीतकार सचिन देव बर्मन (१९७५), पंतप्रधान इंदिरा गांधी (१९८४), लेखिका आनंदीबाई शिर्के (१९८६), सिनेदिग्दर्शक फेदेरिको फेलिनी (१९९३), चित्रकार भय्यासाहेब ओंकार (१९९९), ज्ञानपीठविजेत्या लेखिका अमृता प्रीतम (२००५)

---

वर्धापनदिन : पहिली भारतीय कामगार संघटना आयटक (१९२०)

१५१२ : मायकेलँजेलोच्या अजरामर चित्रांनी सजलेल्या सिस्टीन चॅपेलचे पोपतर्फे उद्घाटन.
१५१७ : जर्मनीत मार्टिन लूथरकडून ख्रिस्ती धर्मातल्या प्रोटेस्टंट चळवळीची सुरुवात.
१८७६ : भारतात चक्रीवादळात २ लाख मृत्युमुखी.
१८८० : किर्लोस्कर कंपनीच्या 'संगीत शाकुंतल'चा पुण्यात पहिला प्रयोग.
१९६४ : यथावकाश 'धवल क्रांती'चा केंद्रबिंदू ठरलेल्या 'अमूल' सहकारी चळवळीअंतर्गत पशुखाद्य प्रकल्पाचे आणंद येथे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते उद्घाटन.
१९८४ : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली.
१९८७ : गॅलिलिओवरील खटल्यानंतर तब्बल ३६० वर्षांनी व्हॅटिकनतर्फे गॅलिलिओचा स्वीकार.
२०११ : जगाच्या लोकसंख्येने ७ अब्जाचा आकडा गाठला.
२०१९ : जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन होऊन लडाख व जम्मू काश्मीर असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले.