सप्टेंबर दिनवैशिष्ट्य

सप्टेंबर

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०

१ सप्टेंबर
जन्मदिवस: 'टारझन'चा लेखक एडगर राइस बरोज (१८७५), लेखक राजिंदर सिंह बेदी (१९१५), क्रिकेटपटू माधव मंत्री (१९२१), वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिआ (१९३०)
मृत्युदिन: चित्रकार यान ब्रुगेल धाकला (१६७८), प्राच्यविद्यासंशोधक आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले देशी कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग (१८९३), कवी सिगफ्रीड ससून (१९६७), नोबेलविजेता लेखक फ्रॉन्स्वा मोरिआक (१९७०)

---

स्वातंत्र्यदिन : उझबेकिस्तान
वर्धापनदिन : भारत गायन समाज (१९११)

१६६८ : पोर्तुगालच्या राजकन्येचे इंग्लंडच्या राजाशी लग्न होऊन पोर्तुगीजांकडून इंग्लंडच्या राजाला मुंबई आंदण मिळाल्याची बातमी मुंबईला पोहोचली.
१९०२ : जॉर्ज मेलिए दिग्दर्शित 'A Trip to the Moon' चित्रपट प्रदर्शित. विज्ञान काल्पनिका म्हणून आणि त्यातल्या स्पेशल इफेक्ट्समुळे तो एक मैलाचा दगड मानला जातो.
१९३४ : रासबिहारी बोस यांनी 'इंडियन नॅशनल आर्मी'ची स्थापना केली.
१९३९ : दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले व युद्धास तोंड फुटले.
१९४७ : भारतीय प्रमाणवेळ संमत.
१९५२ : अर्नेस्ट हेमिंन्वेची 'The Old Man and the Sea' कादंबरी प्रकाशित.
१९५६ : आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) स्थापना.
१९५६ : त्रिपुराला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला.
१९६२ : कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाची स्थापना.
१९६४ : इंडियन ऑइल रिफायनरीज आणि इंडियन ऑइल कंपनी यांनी एकत्र येऊन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापली.
१९९८ : शिसे असणाऱ्या पेट्रोलवर दिल्लीत बंदी.

२ सप्टेंबर
जन्मदिवस: भौतिक रसायनशास्त्राचा जनक, नोबेलविजेता विल्हम्स ओस्टवाल्डस (१८५३), किरणोत्सर्गाचे स्पष्टीकरण देणारा नोबेलविजेता फ्रेडरिक सॉडी (१८७७), लेखक श्री. म. माटे (१८८६), सिनेअभिनेत्री साधना (१९४१), टेनिसपटू जिमी कॉनर्स (१९५२), अभिनेता कियानू रीव्हज (१९६४), सिनेदिग्दर्शक पार्थो दासगुप्ता (१९६५), अभिनेत्री सलमा हायेक (१९६६), क्रिकेटपटू इशांत शर्मा (१९८८)
मृत्युदिन: गणितज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ विलियम हॅमिल्टन (१८६५), चित्रकार हेन्री (दुआनिए) रूसो (१९१०), आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती सुरू करणारा पिएर द कूबेरतँ (१९३७), लेखक जे. आर. आर. टोल्कीन (१९७३), ज्ञानपीठविजेते पहिले मराठी लेखक वि. स. खांडेकर (१९७६), जनुकशास्त्रज्ञ नोबेलविजेती बार्बरा मॅकक्लिंटॉक (१९९२), संगीतकार श्रीनिवास खळे (२०११)

---

राष्ट्रीय दिन : व्हिएतनाम (१९४५)

१९४५ : जपानने विनाअट शरणागती पत्करल्यावर दुसरे महायुद्ध संपले.
१७५२ : उर्वरित युरोपनंतर दोन वर्षांनी ग्रेट ब्रिटनने ग्रेगोरियन कालगणना वापरात आणली.
१८५९ : सूर्यावरच्या वादळामुळे तारायंत्र सेवा खंडित.
१९४६ : तात्पुरते मंत्रिमंडळ बनवून, पं. नेहरू भारताचे उपराष्ट्रपती बनले. त्यांच्याकडे पंतप्रधानाचे अधिकारही होते.
१९६० : तिबेटमध्ये तिबेटी संसदेसाठी प्रथम निवडणुका झाल्या.
१९९० : ट्रान्सनिस्त्रियाने सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य घोषित केले; राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी ते खालसा ठरवले.

३ सप्टेंबर
जन्मदिवस : कार कंपनी 'पोर्शं'चा जनक फर्डिनांड पोर्शं (१८७५), नोबेलविजेता जैवप्रतिकारशास्त्रज्ञ फ्रँक बर्नेट (१८९९), पॉझिट्रॉन शोधणारा नोबेलविजेता कार्ल अँडरसन (१९०५), शाहीर साबळे (१९२३), तबलावादक किशन महाराज (१९२३), अभिनेता उत्तम कुमार (१९२६), नाटककार शाम त्रिंबक फडके (१९३१), समीक्षक, लेखक व अनुवादक एस. डी. इनामदार (१९४२), समीक्षक चंद्रकांत पाटील (१९४४), अभिनेता चार्ली शीन (१९६५), लेखिका किरण देसाई (१९७१), अभिनेता विवेक ओबेरॉय (१९७६)
मृत्युदिन : कोशकार, कवी, 'नवनीत' काव्यसंकलक, संस्कृत नाटकांचे भाषांतरकार परशुरामपंत 'तात्या' गोडबोले (१८७४), लेखक इव्हान तुर्गेनेव्ह (१८८३), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१९६७), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१९९१)
---
स्वातंत्र्यदिन : कतार (१९७१)
१८७५ : अर्जेंटिनामध्ये पोलोचा पहिला अधिकृत सामना झाला.
१९१६ : श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली.
१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला पेनिसिलिनचा शोध लागला.
१९३५ : पं. नेहरूंची अल्मोडा तुरुंगातून सुटका, निर्बंध कायम.
१९३९ : दुसरे महायुद्ध : ब्रिटन, न्यूझीलंड व फ्रान्स यांनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४१ : आउशविट्झ छळछावणीमध्ये नाझींनी गॅस चेंबरचा पहिला वापर केला.
१९५० : पहिल्या ग्रां प्री शर्यतीत "निनो" फारीना जिंकला.
१९७६ : व्हायकिंग-२ यानाने मंगळावर उतरून प्रथमच ग्रहाचे रंगीत फोटो काढले.
२००४ : रशियात बेस्लन येथे चेचेन दहशतवाद्यांचे ओलीसनाट्य संपुष्टात; ३३५ ठार (त्यांपैकी निम्मी शाळकरी मुले).

४ सप्टेंबर
जन्मदिवस : स्वातंत्र्य चळवळीतले धुरीण व राजकारणी दादाभाई नौरोजी (१८२५), चतुरस्र हिंदी लेख सियारामशरण गुप्त (१८९५), लेखक आँतोनँ आर्तो (१८९६), पेशीशास्त्रज्ञ मॅक्स डेलब्रूक (१९०६), वर्णद्वेषाविरोधात लेखन करणारा कादंबरीकार रिचर्ड राईट (१९०८), स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी राम किशोर शुक्ल (१९२३), अभिनेता ऋषी कपूर (१९५२), क्रिकेटपटू किरण मोरे (१९६२), गायिका, अभिनेत्री बियॉंसे (१९८१)
मृत्युदिन : संगीतकार एडवर्ड ग्रीग (१९०७), शांतता नोबेलविजेता विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता डॉ. अल्बर्ट श्वाईट्झर (१९६५), नाटककार धर्मवीर भारती (१९९७)
---
१७८९ : दिल्लीचा बादशहा शाह आलम याने गोहत्या बंदीचे फर्मान काढले.
१८८२ : व्यावसायिक पातळीवरचे जगातले पहिले वीजकेंद्र एडिसनने सुरू केले.
१८८८ : कोडॅकचा ट्रेडमार्क घेऊन जॉर्ज ईस्टमनने फिल्मरोलच्या कॅमेऱ्यासाठी पेटंट मिळवले.
१९५१ : जपानी शांतता परिषदेचे प्रक्षेपण कॅलिफोर्नियात झाले. हे जगातले पहिले आंतरखंडीय टीव्ही प्रसारण होते.
१९६४ : इंडोनेशियाने आक्रमण केल्याची तक्रार मलेशियाने संयुक्त राष्ट्रात दाखल केली.
१९८५ : कण-लहरी द्वैत दाखवणाऱ्या सगळ्यात मोठ्या वस्तूंपैकी बकमिन्स्टरफुलरीन (बकी बॉल)चा शोध; १९९६ चा नोबेल पुरस्कार.
१९९८ : लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी गूगलची सुरुवात केली.
२०१३ : नोकिया कंपनीने आपला मोबाईल व्यवसाय मायक्रोसॉफ्टला विकला.

५ सप्टेंबर
जन्मदिवस : चित्रकार कास्पर डेव्हिड फ्रीडरिक (१७७४), स्वातंत्र्यसैनिक व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई (१८७२), माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८), मराठीत पाठचिकित्साशास्त्राचे प्रणेते अ. का. प्रियोळकर (१८९५), पत्रकार, लेखक आर्थर कोस्लर (१९०५), कथ्थक नर्तिका, जयपूर शैलीच्या कथ्थक गुरू दमयंती जोशी (१९२८), अभिनेत्री राकेल वेल्श (१९४०), सिनेदिग्दर्शक वेर्नर हेर्झॉग (१९४२), रॉक गायक व संगीतकार 'क्वीन' फ्रेडी मर्क्यूरी (१९४६), क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा (१९८६).
मृत्युदिन: तत्त्वज्ञ ओग्युस्त कोम्त (१८५७), भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्ट्झमन (१९०६), कवी, लेखक शरद जोशी (१९९१), संगीतकार सलील चौधरी (१९९५), समाजसेविका मदर तेरेसा (१९९७), लेखिका सुश्मिता बॅनर्जी (२०१३), गायक, संगीतकार आदेश श्रीवास्तव (२०१५).

---

शिक्षकदिन (भारत)

१९३२ : बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.
१९५७ : समलिंगी संबंध गुन्हा नसावा, असा अहवाल वोल्फन्डन समितीने ब्रिटिश संसदेपुढे मांडला.
१९७२ : 'ब्लॅक सप्टेंबर' या पॅलेस्टाईनी अतिरेक्यांच्या गटाने म्युनिकमधील ऑलिंपिक खेळात भाग घेणाऱ्या इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
१९७७ : सूर्यमाला ओलांडणारे पहिले यान, व्हॉयेजर १ प्रक्षेपित.
१९७८ : पुरामुळे उत्तर भारतात दोन लाख लोक बेघर.
१९८४ : ऑस्ट्रेलियातून देहदंड हद्दपार.
२०१२ : शिवकाशीच्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; ४० बळी, ५० जखमी.
२०१७ : पत्रकार गौरी लंकेश यांची आपल्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या.

६ सप्टेंबर
जन्मदिवस : रसायनशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉन डाल्टन (१७६६), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ एडवर्ड अ‍ॅपलटन (१८९२), नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ लुई फेदेरिको लल्वा (१९०६), सिनेनिर्माता यश जोहर (१९२९), क्रिकेटपटू देवांग गांधी (१९७१)
मृत्युदिन : 'आलमआरा' ह्या पहिल्या भारतीय बोलपटाचे कथाकार जोसेफ दाविद पेणकर (१९४९), सरोदवादक व संगीतशिक्षक अल्लाउद्दीन खान (१९७२), सिनेदिग्दर्शक अकिरा कुरोसावा (१९९८), ऑपेरागायक लुचियानो पाव्हारोत्ती (२००७)

---
स्वातंत्र्यदिन : स्वाझीलँड
१५२२ : फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला परत पोचले.
१६२० : अमेरिकेत वसाहत स्थापण्यासाठी चाललेल्या 'पिलग्रिम फादर्स'च्या मेफ्लॉवर जहाजाचा इंग्लंडहून प्रवास सुरू झाला.
१८७७ : 'सत्यप्रकाश' ह्या बेने-इस्राएली समाजाच्या मासिकाची सुरुवात.
१८८८ : चार्ल्स टर्नरने एकाच मोसमात २५० क्रिकेट बळी घेण्याचा विक्रम रचला.
१९१९ : शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा काढला. ८ ऑक्टोबरपासून तो लागू झाला.
१९६५ : पाकिस्तानचे अध्यक्ष लष्करशहा अयूब खान ह्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला.
१९७० : पॅलेस्तिनी दहशतवाद्यांनी शेकडो प्रवाशांसह चार विमानांचे अपहरण केले.
१९७२ : म्युनिक ऑलिंपिकदरम्यान पॅलेस्तिनी दहशतवाद्यांनी अपहरण केलेले सर्वच्या सर्व (९) इस्राएली खेळाडू चकमकीदरम्यान ठार. पाच दहशतवादी मृत; ३ पकडले गेले. (पकडले गेलेले दहशतवादी नंतर एका विमान अपहरण प्रकरणात सोडले गेले. 'मोसाद'ने नंतर त्यांतल्या जिवंत राहिलेल्या दोघांना ठार केले.)
१९९१ : लेनिनग्राड शहराचे सेंट पीटर्सबर्ग ह्या जुन्या नावाने पुनर्नामकरण.
१९९६ : दीपा मेहतांच्या 'फायर' चित्रपटाचे टोरंटो महोत्सवात प्रथम प्रदर्शन. यथावकाश तो भारतात प्रदर्शित झाला तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या आणि समलैंगिकांच्या लढ्यातला महत्त्वाचा टप्पा ठरला.
१९९७ : राजकन्या डायनावर अंत्यसंस्कार; जगभरातल्या लाखो लोकांनी टीव्हीवर अंत्ययात्रा पाहिली.
२०१८ : भारतीय सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंध कायदेशीर ठरवले.

७ सप्टेंबर
जन्मदिवस : रसायनशास्त्रज्ञ ऑगस्ट केक्युले (१८२९), सिनेदिग्दर्शक एलिया कझान (१९०९), उद्योजक डेव्हिड पॅकर्ड (१९१२), कोलेस्टेरॉल, स्टीरॉईड्सचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन कॉर्नफर्थ (१९१७), अभिनेत्री, गायिका, निर्माती, दिग्दर्शिका भानुमती रामकृष्ण (१९२५), लेखक माल्कम ब्रॅडबरी (१९३२), लेखक सुनील गंगोपाध्याय (१९३४), अभिनेता मामूटी (१९५१)
मृत्युदिन : लेखक जेम्स क्लॅव्हेल (१९९४), साहित्यिक बी. रघुनाथ तथा भगवान कुलकर्णी (१९५३), युरेनियमच्या पुढची मूलद्रव्ये प्रथम बनवणारा नोबेलविजेता एडविन मॅकमिलन (१९९१)
---

राष्ट्रीय दिन : ब्राझील

१९४० : लंडन शहरावर जर्मन बाँबहल्ले (ब्लिट्झ) सुरू.
१९४१ : शिक्षणमहर्षी बाबूराव घोलप यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना केली.
१९६५ : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिल्यावर चीनने भारताच्या सीमेवर आणखी सैन्य पाठवले.
१९७२ : पाटणा शहरात विद्यार्थ्यांची दंगल होऊन पन्नास पोलीस जखमी.
१९७९ : ख्राईस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे निघू नये म्हणून अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.
१९७९ : ईएसपीएनची सुरुवात.
१९८६ : द. आफ्रिकेतल्या इंग्लिश चर्चचा प्रमुख म्हणून प्रथमच एका कृष्णवर्णीय व्यक्तीची (डेस्मंड टूटू) निवड.
२००५ : इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
२०१२ : इराणचा सिरीयाला पाठिंबा, आण्विक कार्यक्रम आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांमुळे कॅनडाने इराणशी असणारे संबंध तोडले.

८ सप्टेंबर
जन्मदिवस : नोबेलविजेता कवी फ्रेडरिक मिस्त्राल (१८३०), संगीतकार अंतोनिन द्वोझाक (१८४१), ब्रिटिश कवी सिगफ्रीड ससून (१८८६), अभिनेता पीटर सेलर्स (१९२५), गायक, संगीतकार, गीतकार भूपेन हजारिका (१९२६), गायिका आशा भोसले (१९३३)
मृत्युदिन : संगीतकार रिचर्ड स्ट्राउस (१९४९), अमेरिकन अभिनेत्री जीन सेबर्ग (१९७९), जर्मन दिग्दर्शिका लेनी रीफेन्श्टाल (२००३), ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी (२०२२)

---

जागतिक साक्षरता दिन
स्वातंत्र्यदिन : मॅसडोनिया (१९९१)

१५०४ : मायकेलॅन्जेलोचे शिल्प 'डेव्हिड'चे फ्लॉरेन्समध्ये अनावरण
१६६४ : न्यू अॅमस्टरडॅमचा ताबा ब्रिटीशांकडे आणि न्यू यॉर्क असे नामकरण
१९४३ : दुसरे महायुद्ध - इटली दोस्त राष्ट्रांना शरण
१९६६ : 'स्टार ट्रेक' मालिकेचा पहिला भाग प्रसारित
१९७५ : अमेरिकन विमानदलातला सार्जंट, लेनर्ड मॅट्लोविच, सैनिकी गणवेशात टाईमच्या पहिल्या पानावर 'मी समलैंगिक आहे' या शीर्षकासकट दिसला. त्याला सैन्यातून काढलं गेलं, नंतर त्याला सन्मानाने निवृत्ती मिळाली.

९ सप्टेंबर
जन्मदिवस : भौतिकशास्त्रज्ञ लुईजी गॅल्व्हानी (१७३७), लेखक लेओ टॉलस्टॉय (१८२८), मराठी भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गजानन पानसे (१९१८), युनिक्स प्रणाली आणि 'सी' संगणकीय भाषेच्या विकसकांपैकी एक संगणकशास्त्रज्ञ डेनिस रिची (१९४१), अभिनेता ह्यू ग्रांट (१९६०), अभिनेता अक्षय कुमार (१९६७)
मृत्युदिन : चित्रकार पीटर ब्रुगेल (१५६९), चित्रकार हेन्री द तुलूज-लॉत्रेक (१९०१), ग्रंथालयशास्त्राचे अभ्यासक व लेखक वासुदेव पुरुषोत्तम कोल्हटकर (१९७८), चरित्रलेखक दा. न. शिखरे (१९८०), मानसशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ जाक लाकाँ (१९८१), कवी वा. रा. कांत (१९९१), कामगारनेते, लेखक व अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते (२०१०), दुधाचा महापूर घडवणारे 'अमूल'चे वर्गीस कुरीयन (२०१२)

---

स्वातंत्र्यदिन / राष्ट्रीय दिन : उत्तर कोरिया, ताजिकिस्तान.

१८३९ : काचेवर पहिला फोटो घेतला गेला.
१८८६ : आंतरराष्ट्रीय प्रताधिकारांसाठीचा बर्न करार संमत.
१९३९ : प्रभातचा 'माणूस' चित्रपट प्रदर्शित झाला.
१९४७ : पहिला संगणकीय बग शोधला गेला.
१९८५ : मूक-बधीर जलतरणपटू तारानाथ शेणॉयने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
१९८८ : वर्णद्वेषी द. आफ्रिकेत खाजगी क्लबसाठी खेळण्याबद्दल कप्तान ग्रॅहॅम गूचसह इंग्लंडच्या आठ क्रिकेटपटूंना भारताने व्हिसा नाकारला. त्यामुळे इंग्लंडचा भारत दौरा रद्द करावा लागला.
१९९३ : पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेने इस्राएलला राष्ट्र म्हणून मान्यता दिली.
१९९४ : सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले.
१९७६ : आधुनिक चीनचा शिल्पकार मानला जाणारा क्रूरकर्मा हुकुमशहा माओ त्से तुंग ह्याचा मृत्यू.
१९९० : श्रीलंकेच्या सैन्याने बात्तिकलोआ जिल्ह्यात किमान १८४ तमिळ निर्वासितांना ठार मारले.
२००१ : व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या 'मॉन्सून वेडिंग'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
२००१ : युनिक्स बिलेनियम सुरू झाले.

१० सप्टेंबर
जन्मदिवस : बॅबिलॉन परिसराचे उत्खननशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ शेबेर्ट कोल्ड व्हाई (१८५५), क्रिकेटपटू रणजितसिंह (१८७२), स्वातंत्र्यलढ्यातले नेते गोविंद वल्लभ पंत (१८८७), कॉम्पटन परिणाम शोधणारा नोबेलविजेता आर्थर कॉम्पटन (१८९२), सिनेदिग्दर्शक अलेक्सांद्र डॉव्हजेन्को (१८९४), कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण (१८९५), जीवशास्त्रज्ञ, भूगोलतज्ञ, लेखक जॅरेड डायमंड (१९३७), उत्क्रांतिशास्त्रज्ञ, लेखक स्टीफन जे गूल्ड (१९४१), अभिनेत्री भक्ती बर्वे (१९४८), अभिनेता कॉलिन फर्थ (१९६०), सिनेदिग्दर्शक गाय रिची (१९६८), टेनिसपटू गुस्ताव्हो कर्टन (१९७६)
मृत्युदिन : तत्त्वज्ञ, लेखिका, स्त्रीवादी मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७९७), म. फुले यांचे सहकारी, शल्यचिकित्सक डॉ. विश्राम रामजी घोले (१९००), क्रांतिवादी तत्त्वज्ञ बाघ जतीन उर्फ जतिंद्रनाथ मुखोपाध्याय (१९१५), सत्यजित राय यांचे पिता, बालसाहित्यकार सुकुमार राय (१९२३), व्हायोलिनवादक पं. श्रीधर पर्सेकर (१९६४), परमवीर अब्दुल हमीद (१९६५), इलेक्ट्रॉन विकीरणासाठी नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजट थॉमसन (१९७५), गणितज्ञ, विश्वरचनाशास्त्रज्ञ हर्मन बॉन्डी (२००५), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ फीलिक्स ब्लॉक (१९८३)

---

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

१८४६ : शिवणयंत्राचे पेटंट एलियस हॉव याला मिळाले.
१९६० : रोम ऑलिंपिकमध्ये अबेबे बिकिलाने अनवाणी पायांनी मॅराथॉन जिंकली.
१९६६ : पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली.
१९६७ : जिब्राल्टरमध्ये सार्वमत होऊन ब्रिटनमध्ये राहण्याचा निर्णय झाला.
१९७४ : गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
१९८८ : वर्षातल्या चारही मुख्य (ग्रँड स्लॅम) टेनिस स्पर्धा स्टेफी ग्राफने जिंकल्या.
२००२ : स्वित्झर्लंडचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
२००८ : लार्ज हॅड्रॉन कोलायडर कार्यरत.

११ सप्टेंबर
जन्मदिवस : गणितज्ञ फ्रान्स अर्न्स्ट न्यूमन (१७९८), दृश्य प्रकाशासाठी उपकरणे बनवणारा कार्ल झाईस (१८१६), लेखक ओ. हेन्री (१८६२), स्वातंत्र्यसैनिक शुधामोय प्रामानिक (१८८४), लेखक डी. एच. लॉरेन्स (१८८५), वेदवाचस्पती श्रीपाद सातवळेकर (१८६७), आचार्य विनोबा भावे (१८९५), कवी 'अनिल' (१९०१), तत्त्वज्ञ थिओडोर अडोर्नो (१९०३) चित्रकार गोपाळराव देऊसकर (१९११)
मृत्युदिन : स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, लेखक चिन्नास्वामी भारती (१९२१), कवयित्री महादेवी वर्मा (१९८७), पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल महमद अली जिना (१९४८), सहित्यिक, समीक्षक गजानन माधव मुक्तिबोध (१९६४), अभिनेता अभि भट्टाचार्य (१९९३), अभिनेत्री जेसिका टँडी (१९९४), क्रीडा संघटक, शिक्षणमहर्षी एन. डी. नगरवाला (१९९८)
---
विश्वबंधुत्व दिन
१८०३ : इंग्रज-मराठे दुसऱ्या युद्धात दिल्लीची लढाई. तीन दिवसांनंतर शिंद्यांच्या सेनेचा पराभव.
१८९३ : स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्मपरिषदेत आपले पहिले भाषण दिले.
१९०६ : महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत 'सत्याग्रह' हा शब्द पहिल्यांदा वापरला.
१९२१ : ज्यूवाद्यांनी पॅलेस्टाईनच्या वसाहतीकरणासाठी पहिली वसाहत नाहलालमध्ये वसवली.
१९४२ : सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने 'जन गण मन' हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
१९६१ : वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडची स्थापना.
१९७८ : देवीमुळे दगावणारी जेनेट पार्कर ही शेवटची व्यक्ती ठरली.
१९९७ : नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोचले.
२००१ : वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अतिरेक्यांचा हल्ला; जुळ्या इमारती जमीनदोस्त.
२०१३ : कातालानच्या स्वातंत्र्यासाठी ४०० किमी लांबीची मानवी साखळी तयार केली गेली.

१२ सप्टेंबर
जन्मदिवस : गोलाकार छपाईयंत्र तयार करणारा रिचर्ड हो (१८१२), मशीनगन तयार करणारा रिचर्ड गॅटलिंग (१८१८), कृत्रिम किरणोत्साराचा शोध लावणारी नोबेलविजेती इरेन जोलियो-क्यूरी (१८९७), धावपटू जेसी ओवेन्स (१९१३), विज्ञानकथालेखक स्तानिस्लाव्ह लेम (१९२१), लेखक मायकेल ओन्दात्जे (१९४३)
मृत्युदिन : ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाचे संस्थापक, 'महाराष्ट्र सारस्वत'कार व इतिहाससंशोधक वि. ल. भावे (१९२६), गायक सवाई गंधर्व (१९५२), लेखक, नाटककार रांगेय राघव (१९६२), संगीतकार जयकिशन (१९७१), अभिनेता सतीश दुभाषी (१९८०), गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर (१९९२), अभिनेत्री पद्मा चव्हाण (१९९६), संगीतकार, गायक जॉनी कॅश (२००३), शेतीतज्ञ, हरित क्रांतीचे प्रणेते, नोबेलविजेता नॉर्मन बोरलॉग (२००९), सिनेदिग्दर्शक क्लोद शाब्रोल (२०१०)
---
राष्ट्रीयदिन : केप व्हर्दे, इथिओपिया
१७८६ : लॉर्ड कॉर्नवॉलिस ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला गव्हर्नर जनरल झाला. त्यापुढे भारतातला गव्हर्नर जनरल उमरावांमधून नेमण्याची पद्धत सुरू झाली.
१८८३ : ऑटोमन साम्राज्याचा पराभव.
१९०९ : फ्रिट्झ हॉफमनने कृत्रिम रबरनिर्मितीचे पेटंट मिळवले.
१९१९ : हिटलरचा जर्मन कामगार पक्षात प्रवेश; पुढे हा 'नाझी पक्ष' म्हणून ओळखला जाऊ लागला.
१९३३ : लेओ शिलार्ड याला आण्विक साखळी प्रक्रियेची कल्पना सुचली.
१९४० : लास्को, फ्रान्समध्ये गुंफाचित्रे सापडली.
१९४८ : हैद्राबाद संस्थानावर भारतीय सैन्याने कारवाई सुरू केली.
१९५८ : जॅक किल्बी याने इंटिग्रेटेड सर्किट्सचे पहिले प्रात्यक्षिक दाखवले.
१९९० : जर्मन एकत्रीकरणासाठी मॉस्कोमध्ये करारावर सह्या.
१९९३ : पॅलेस्टाईनला मर्यादित स्वराज्याचा हक्क देण्याच्या करारावर यित्झाक राबिन आणि यासर अराफात यांनी सह्या केल्या.
२००२ : नेदरलंड्समध्ये समलैंगिक जोडप्यांना लग्न करण्याचा आणि मुले दत्तक घेण्याचा अधिकार मिळाला.
२००१ : अमेरिकेने सद्दामच्या राजवटीविरोधात 'वॉर ऑन टेरर' घोषित केले.
२००२ : 'मेटसॅट' या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण.

१३ सप्टेंबर
जन्मदिवस : सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ हान्स ख्रिस्तिअन ग्राम (१८५३), संगीतकार आर्नॉल्ड शॉनबर्ग (१८७४), लेखक रोअल्ड डाल (१९१६), वास्तुरचनाकार तादाओ आंदो (१९४१), धावपटू मायकल जॉन्सन (१९६७), क्रिकेटपटू शेन वॉर्न (१९६९), टेनिसपटू गोरान इवानसेविच (१९७१), अभिनेत्री महिमा चौधरी (१९७३), हॉकीपटू वीरेन रास्कीन्हा (१९८०)
मृत्युदिन : चित्रकार आंद्रेआ मांतेन्या (१५०६), लेखक व विचारवंत मिशेल द मोंतेन्य (१५९२), कवी श्रीधर पाठक (१९२८), स्वातंत्र्यसैनिक जतींद्र नाथ दास (१९२९), रंगभूमी अभिनेता, नाट्यशिक्षक केशवराव दाते (१९७१), कवी, लेखक सज्जाद जहीर (१९७३), 'पॉप आर्ट' कलाकार रिचर्ड हॅमिल्टन (२०११)
----
आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन
१५०१ : मिकेलांजेलोने डेव्हिड या शिल्पावर काम करायला सुरुवात केली.
१८१४ : ब्रिटिश सैन्याला बाल्टिमोर, मेरीलँड जिंकण्यात अपयश. येथून अमेरिकन सैन्याची सरशी होत गेली.
१९२९ : लाहोर कटातील आरोपी जतींद्र नाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
१९४८ : हैद्राबाद संस्थानात भारतीय फौजांनी तिन्ही बाजूंनी प्रवेश केला.
१९५६ : डिस्क स्टोरेज असणारा पहिला संगणक आयबीएमने व्यापारी तत्त्वावर विकण्यासाठी बाजारात आणला.
१९६८ : आल्बेनियाने वॉर्सा करारातून अंग काढून घेतले.
१९८९ : वंशद्वेष्ट्या अपार्थीड धोरणाविरोधात द. आफ्रिकेत, डेस्मंड टूटू यांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्यात मोठा मोर्चा.
२००१ : ९/११ नंतर अमेरिकेत नागरी विमानोड्डाणास सुरूवात.
२००८ : दिल्लीमध्ये बॉंबस्फोट; ३० ठार, १३० जखमी.

१४ सप्टेंबर
जन्मदिवस: ब्रिटीश प्रशासकीय सेवेत भारतीयांची भरती करण्यात प्राधान्य देणारा गर्व्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक (१७७४), गर्भनिरोधकांची पुरस्कर्ती स्त्रीवादी कार्यकर्ती मार्गारेट सँगर (१८७९), चित्रपट दिग्दर्शक जॉं रन्वार (१८९४), क्रिकेटपटू न्यालचंद शाह (१९१९), हृदयातल्या संदेशप्रणालीचा अभ्यास करणारा नोबेलविजेता फरीद मुराद (१९३६), अभिनेता, दिग्दर्शक सॅम नील (१९४७)
मृत्युदिन: शनीच्या कड्यांमधली फट शोधणारा खगोलज्ञ, अभियंता, गणितज्ञ जिओव्हान्नी कसिनी (१७१२), पहिलवानी कुस्तीगीर हरिश्चंद्र बिराजदार (२०११)

----
हिंदी दिवस
१९१७ : रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
१९४२ : दामोदर नरहर शिखरे यांनी स्थापन केलेल्या 'अग्रणी' साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर
१९५९ : सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
१९६० ; ओपेकची स्थापना.
१९७९ : सार्वजनिक क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाचा नारा दिला; संपाला अंशतः यश मिळालं.
१९८४ : वायू भरलेल्या फुग्यातून अटलांटिक पार करणारा जो किटिंजर हा पहिला मनुष्य ठरला.
२००० : मायक्रोसॉफ्टने एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू

१५ सप्टेंबर
जन्मदिवस : गणितज्ञ अल बेरुनी (९७३), फिरस्ता मार्को पोलो (१२५४), नीतिकथालेखक रोशफूको (१६१३), आधुनिक भारताच्या औद्योगिक युगाचे शिल्पकार डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६०), साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय (१८७६), लेखिका अगाथा ख्रिस्ती (१८९०), सिनेदिग्दर्शक जाँ रन्वार (१८९४), सिनेदिग्दर्शक शोहेई इमामुरा (१९२६), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ मरे गेल-मान (१९२९), सिनेदिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन (१९४६), अभिनेता व सिनेदिग्दर्शक टॉमी ली जोन्स (१९४६),
मृत्युदिन : तत्त्ववेत्ता रूडॉल्फ आईक्रेन (१९२६)
----
राष्ट्रीय अभियंता दिन (विश्वेश्वरय्या स्मृती)
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन, शिक्षणस्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यदिन : ग्वातेमाला, एल साल्व्हादोर, होंडुरास, निकाराग्वा, कोस्तारिका (१८२१)
१६१६ : फक्त उमरावांपुरती मर्यादित नसणारी पहिली युरोपीय शाळा इटलीत सुरू झाली.
१८३५ : चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोस द्वीपांत पोचला. तिथे त्याला उत्क्रांतीसंबंधी पहिले पुरावे मिळाले.
१९१६ : पहिले महायुद्ध - रणगाड्यांचा प्रथम वापर सॉमच्या लढाईत केला गेला.
१९३५ : हिटलरने न्यूरेम्बर्ग कायदे अमलात आणले. त्यामुळे जर्मनांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आले आणि ज्यूविद्वेषाला अधिकृतता लाभली.
१९३५ : भारतातल्या डून स्कूलची स्थापना.
१९४८ : निजामाविरुद्ध कारवाईत औरंगाबाद भारतीय सैन्याने जिंकले.
१९५९ : भारतीय दूरचित्रवाणी 'दूरदर्शन'च्या प्रसारणाची दिल्लीमध्ये सुरुवात.
१९५९ : निकिता ख्रुश्चेव अमेरिकेला भेट देणारा सोव्हिएत संघाचा पहिला नेता झाला.
१९९७ : 'गूगल.कॉम' डोमेन रजिस्टर झाले.
२००८ : लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले.
२०१३ : नीना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.

१६ सप्टेंबर
जन्मदिवस : न्यूक्लीक अॅसिड्सची रासायनिक रचना शोधणारा नोबेलविजेता आलब्रेख्त कोसेल (१८५३), समाजसुधारक, द्रविड आंदोलनाचे नेते, रामस्वामी नायकर (१८७९), शिल्पकार जाँ आर्प (१८८६), संगीतज्ञ नादिया बूलॉन्जे (१८८७), सिनेदिग्दर्शक अलेक्झांडर कोर्डा (१८९३), क जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता अल्बर्ट ग्यॉर्गी (१८९३), कर्नाटक शैलीच्या संगीतकार, गायिका एम्. एस्. सुब्बलक्ष्मी (१९१६), सिनेदिग्दर्शक गाय हॅमिल्टन (१९२२), अभिनेत्री लॉरेन बॅकॉल (१९२४), जाझ गिटारिस्ट चार्ली बर्ड (१९२५), बी. बी. किंग (१९२५), कवी ना. धों. महानोर (१९४२), सतारवादक संजय बंदोपाध्याय (१९५४)
मृत्युदिन : थर्मामीटरचा शोध लावणारा डॅनिएल गॅब्रिएल फॅरनहाइट (१७३६), नोबेलविजेता मलेरिया संशोधक रॉनल्ड रॉस (१९३२), गायिका मारिया काल्लास (१९७७), अभिनेत्री इंदिरा चिटणीस (१९८२), गायक, संगीतकार हेमंत कुमार (१९८९), लेखक जयवंत दळवी (१९९४), लेझर शोधणारा गॉर्डन गूल्ड (२००५)
---
जागतिक ओझोन संरक्षण दिन (मॉन्ट्रीयल करारावर स्वाक्षरी - १९८७)
स्वातंत्र्यदिन : मेक्सिको (१८१०), मलेशिया (१९६३), पापुआ न्यू गिनी (१९७५)
१६२० : 'मे फ्लॉवर' जहाजाचे अमेरिकेकडे प्रयाण.
१९०८ : 'जनरल मोटर्स'ची स्थापना.
१९५९ : झेरॉक्स ९१४ छायाप्रतयंत्र उपलब्ध
१९६१ : अमेरिकेत चक्रीवादळाच्या मध्यात सिल्व्हर आयोडाईड टाकून वाऱ्यांचा वेग १०% कमी करण्यात यश मिळाले.
१९६३ : मलाया फेडरेशन, सिंगापूर, उत्तर बोर्निओ आणि सारावाक मिळून मलेशिया स्थापन झाले. सिंगापूर लवकरच बाहेर पडले.
१९८७ : ओझोन थर वाचवण्यासाठी माँट्रीयाल प्रोटोकॉलवर सह्या झाल्या.
१९८८ : कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.

१७ सप्टेंबर

जन्मदिवस : स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले करणारी मर्सी जॅक्सन (१८०२), गणितज्ज्ञ बर्नहार्ड रिमान (१८२६), कार अभियंता, बुईक कंपनीचा जनक डेव्हीड डनबार बुईक (१८५४), कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी (१८७६), द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार रामस्वामी (१८७९), समाजसुधारक, पत्रकार, वक्ते प्रबोधनकार ठाकरे (१८८५), चित्रकार गगनीन्द्रनाथ टागोर (१८६७), चित्रकार एम. एफ. हुसैन (१९१५), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (१९२९), व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन (१९३०), पटकथाकार जाँ-क्लोद कारिएर (१९३१), अभिनेत्री अॅन बँक्रॉफ्ट (१९३१), लेखक केन केसी (१९३५), कवी सीताकांत महापात्र (१९३७), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे (१९३८), पंतप्रधान नरेंद्र मोदी (१९५०)
मृत्युदिन : मानववंशशास्त्रज्ञ रुथ फुल्टन बेनिडिक्ट (१९४८), सिनेकलावंत लीला चिटणीस (१९८२), गीतकार हसरत जयपुरी (१९९९), कवी वसंत बापट (२००२)

---

राष्ट्रीय श्रम दिवस, विश्वकर्मा जयंती

१८२२ : इजिप्शिअन संकेतलिपीची उकल.
१९०८ : विमान अपघातामधला पहिला मृत्यू: वैमानिक ओरव्हिल राईट आणि प्रवासी थॉमस सेल्फ्रीज असणारे विमान कोसळले.
१९४८ : निजामाचे समर्पण, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन.
१९७८ : इस्राइल आणि इजिप्तदरम्यान कॅम्प डेव्हिड करार.
१९८० : पोलंडमध्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळीची स्थापना.
१९८३ : व्हनेसा विल्यम्स ही पहिली कृष्णवर्णीय स्त्री मिस अमेरिका बनली.
१९९१ : लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती आंतरजालावर उपलब्ध.
२०११ : 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' नावाच्या जनआंदोलनास अमेरिकेत सुरुवात.

१८ सप्टेंबर
जन्मदिवस : ब्रिटिश लेखक, कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७०९), फूकोच्या लंबकामुळे प्रसिद्ध झालेला भौतिकशात्रज्ञ लेओं फूको (१८१९), अभिनेत्री ग्रेटा गार्बो (१९०५), युरेनियमपेक्षा जड मूलद्रव्य शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता एडविन मॅकमिलन (१९०७), संगणकतज्ज्ञ जॉन मकॅफी (१९४५), अभिनेत्री शबाना आझमी (१९५०), मानसोपचारतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, लेखक स्टीव्हन पिंकर (१९५४), सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग (१९७१)
मृत्युदिन : गणितज्ज्ञ लेनर्ड ऑयलर (१७८३), लेखक विलिअम हॅझलिट (१८३०), प्रकाशाचा वेग मोजणारा भौतिकशास्त्रज्ञ इपोलित फिजू (१८९६), समीक्षक क्लाइव्ह बेल (१९६४), अणुऊर्जातज्ज्ञ नोबेलविजेता जॉन कॉक्रॉफ्ट (१९६७), रॉक गिटारिस्ट जिमी हेन्ड्रिक्स (१९७०), अभिनेता असित सेन (१९९३), कवी काका हाथरसी (१९९५), सिनेदिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी (१९९९), साहित्यिक शिवाजी सावंत (२००२), समीक्षक, साहित्यिक भा. दि. फडके (२००४)
---
आंतरराष्ट्रीय जलसर्वेक्षण दिन
राष्ट्रीयदिन : चिले
वर्धापनदिन : न्यू यॉर्क टाइम्स (१८५१), सी.बी.एस. (१९२७), सी.आय.ए. (१९४७), आंतरजाल व्यवस्थापन संस्था आयकॅन (१९९८)
१७९४ : फ्रान्समध्ये धर्मसंस्था आणि राजसंस्थेच्या विलगीकरणाचा (धर्मनिरपेक्ष सत्ता) कायदा मंजूर.
१८८५ : माँत्रियालमध्ये कांजिण्याची लस घेणे सक्तीचे केल्याने लोकांनी दंगल सुरू केली.
१९१० : अॅमस्टरडॅममध्ये २५,००० लोकांनी सर्वसाधारण मतदानाच्या हक्कासाठी निदर्शन केले.
१९१९ : नेदरलंड्समध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९२७ : पुण्यात 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'ची स्थापना.
१९७७ : व्हॉयेजर-१ यानाने पृथ्वी आणि चंद्राचा एकत्र फोटो काढला.
१९८१ : फ्रान्समध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची अखेर.
२००५ : ३६ वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये संसदीय निवडणुका.
२००७ : ब्रह्मदेशात बौद्ध भिख्खूंची सरकारविरोधात निदर्शने सुरू; 'भगव्या क्रांती'ची सुरुवात
२०१४ : स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्यासाठी मतदान.

१९ सप्टेंबर
जन्मदिवस : समाजसुधारक, कोको उद्योजक बंधूंपैकी एक जॉर्ज कॅडबरी (१८३९), चित्रकार, वेदाभ्यासक पं. श्री. दा. सातवळेकर (१८३६), नोबेलविजेता लेखक विल्यम गोल्डिंग (१९११), अठरा जागतिक उच्चांक गाठणारा चेक धावपटू एमिल झाटोपेक (१९२२), वैश्विक न्यूट्रिनो शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता मासातोशी कोशिबा (१९२६), अभिनेता जेरेमी आयर्न्स (१९४८), गायक, अभिनेता लकी अली (१९५८), अंतराळवीर सुनीता विलिअम्स (१९६५), अभिनेत्री, मॉडेल इशा कोप्पीकर (१९७६), क्रिकेटपटू आकाश चोप्रा (१९७७)
मृत्युदिन : गणितज्ञ, अभियंता, वैज्ञानिक गास्पर-गुस्ताव कोरिओलिस (१८४३), वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन (१९२५), संगीततज्ज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे (१९३६), इटालियन लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९८५), पहिल्या अणुबाँबचे जनक सर रुडाल्फ पिरल्स (१९९५), प्रभात फिल्म कंपनीचे संचालक अनंतराव दामले (२००१), अभिनेत्री प्रिया तेंडुलकर (२००२), कथक नर्तिका दमयंती जोशी (२००४), संगीतकार दत्ता डावजेकर (२००७).
---
स्वातंत्र्यदिन : सेंट किट्स आणि नेव्हिस (१९८३)
१८९३ : स्त्रियांना मताधिकार देणारा न्यूझीलंड हा जगातला पहिला देश ठरला.
१९५२ : चार्ली चॅप्लिनला अमेरिकेत प्रवेशबंदी.
१९५७ : अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
१९८२ : कार्नगी मेलन विद्यापीठाच्या बुलेटीन बोर्डावर स्कॉट फाहलमनने Smile आणि Sad या इमोटीकॉन्सचा प्रथम वापर केला.
२००७ : युवराज सिंग '२०-२०' क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटखेळाडू आणि क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक (१२ चेंडू) गाठणारा खेळाडू ठरला.

२० सप्टेंबर
जन्मदिवस : नाटककार हेन्री आर्थर जोन्स (१८५१), लेखक अपटन सिन्क्लेअर (१८७८), सिनेदिग्दर्शक एरिक व्हॉन स्ट्रोहाईम (१८८५), अभिनेता पॉल म्युनी (१८९५), पत्रकार ना.भि. तथा नानासाहेब परुळेकर (१८९७), चरित्र अभ्यासक द. न. गोखले (१९२२), अभिनेत्री सोफिया लॉरेन (१९३४), सिनेदिग्दर्शक महेश भट (१९४९), संगीतकार जीन सिबेलिअस (१९५७)
मृत्युदिन : थिओसॉफिस्ट, समाजसुधारक अॅनी बेझंट (१९३३), नोबेलविजेता फ्रेंच कवी, मुत्सद्दी सेंट जॉं पर्स (१९७५), लेखक दया पवार (१९९६), माइम अभिनेता मार्सेल मार्सो (२००७), अभिनेता दिनेश ठाकुर (२०१२), भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर (२०१४)
---
आंतरराष्ट्रीय वाहनविरहित दिन
स्वातंत्र्यदिन : बल्गेरिया, माली
१५१९ : फर्डिनंड मॅजेलानची पृथ्वीप्रदक्षिणा सुरू.
१६३३ : पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलियोवर खटला चालवण्यात आला.
१८५७ : इस्ट इंडिया कंपनीचा दिल्लीवर पुन्हा कब्जा; १८५७ च्या उठावाचा शेवट झाला.
१८७८ : ‘द हिंदू’ हे वृत्तपत्र पहिल्यांदा साप्ताहिक म्हणून मद्रास येथे प्रसिद्ध.
२००४ : 'एज्युसॅट' या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
२०११ : 'डोन्ट आस्क, डोन्ट टेल' ह्या धोरणाची अखेर; अमेरिकन सैन्यात भरती होण्यास स्वघोषित समलिंगी पात्र.

२१ सप्टेंबर
जन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)
मृत्युदिन : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)
---
आंतरराष्ट्रीय शांतता दिन
स्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)
१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.
१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.
१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा "चमत्कार".
२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.

२२ सप्टेंबर
जन्मदिवस : विद्युतचुंबकीय परिणामांचा अभ्यास करणारा मायकल फॅरडे (१७९१), बहुजनांसाठी 'रयत शिक्षण संस्था' सुरू करणारे कर्मवीर भाऊराव पाटील (१८८७), कर्करोग आणि अंतःस्रावाचा संबंध शोधणारा नोबेलविजेता चार्ल्स हगिन्स (१९०१), सिनेदिग्दर्शक अनंत माने (१९१५), 'अॅम्नेस्टी इंटरनॅशनल' सुरू करणाऱ्यांपैकी एक एरिक बेकर (१९२०), स्वातंत्र्यसैनिक, उद्योगपती रामकृष्ण बजाज (१९२३)
मृत्युदिन : किरणोत्सर्गाचे स्पष्टीकरण देणारा नोबेलविजेता फ्रेडरिक सॉडी (१९५६), अभिनेत्री दुर्गा खोटे (१९९१), गायक जी. एन. जोशी (१९९४), क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी (२०११)
---
स्वातंत्र्यदिन : बल्गेरिया (१९०८), माली (१९६०)
१७९२ : पहिल्या फ्रेंच प्रजासत्ताकाची स्थापना.
१८८८ : 'नॅशनल जिओग्राफिक नियतकालिका'चा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९६५ : संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर भारत-पाकिस्तानमधले दुसरे युद्ध समाप्त.
१९६६ : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीच्या प्रकल्पाची सांगता. आज ही आवृत्ती जगभरात प्रमाण मानली जाते.
१९८० : इराण-इराक युद्धाचा आरंभ.
१९९४ : 'फ्रेंड्स' या लोकप्रिय मालिकेची सुरुवात.

२३ सप्टेंबर
जन्मदिवस : प्रकाशाचा वेग मोजणारा भौतिकशास्त्रज्ञ इपोलित फिजू (१८१९), गाड्यांचे सुटे भाग बनवणाऱ्या सगळ्यात मोठ्या बॉश कंपनीचा जनक, अभियंता रॉबर्ट बॉश (१८६१), न्यूट्रॉन विकीरणाचा प्रयोग करणाऱ्यांपैकी एक क्लिफर्ड शल (१९१५), लेखक पंढरीनाथ रेगे (१९१८), शिक्षणतज्ज्ञ देवदत्त दाभोळकर (१९१९), लेखक, नाट्यअभिनेते प्रा. भालबा केळकर (१९२०), जाझ सॅक्सोफोनिस्ट जॉन कॉल्ट्रेन (१९२६), जाझ पियानिस्ट रे चार्ल्स (१९३०), अभिनेता प्रेम चोपड़ा (१९३५), अभिनेत्री तनुजा (१९४३), रॉकस्टार ब्रूस स्प्रिन्ग्स्टीन (१९४९), डॉ. अभय बंग (१९५०)
मृत्युदिन : इतिहासाचे अभ्यासक ग्रँट डफ(१८५८), विख्यात फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार, पुरातत्वज्ञ प्रॉस्पेअर मेरीमे (१९१८), मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉइड (१९३९), नाटककार मामा वरेरकर (१९६४), नोबेलविजेता लेखक पाब्लो नेरुदा (१९७३), नर्तक, नृत्य-नाट्य-सिनेदिग्दर्शक बॉब फॉस (१९८७), चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर (१९९९), जादूगार के. लाल (२०१२), कवी शंकर वैद्य (२०१४)
---
स्वातंत्र्यदिन : सौदी अरेबिया
उभयलिंगता (बायसेक्शुअ‍ॅलिटी) दिन.
१८०३ : मराठे-ब्रिटिश दुसरे युद्ध : असायीची लढाई.
१८४८ : पहिल्या 'च्यूइंग गम'चे उत्पादन.
१८७३ : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१८८४ : महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हॅंड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची भारतात सुरुवात.
१८८९ : गेम कन्सोल बनवणाऱ्या निन्टेंडो कंपनीची स्थापना.
१९१३ : फ्रेंच पायलट रोलॉं गारो याने भूमध्यसमुद्र विमानातून सर्वप्रथम पार केला.
२००२ : मोझिलाच्या फायरफॉक्सची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

२४ सप्टेंबर
जन्मदिवस : स्वातंत्र्यचळवळीतील नेत्या मॅडम भिखाई कामा (१८६१), लेखक, कवी भास्कर उजगरे (१८८७), लेखक एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड (१८९६), सिनेनिर्माता, व्यावसायिक हॉवर्ड ह्यूज (१९०५), चित्रपट कलावंत प्रभाकर शंकर मुजुमदार (१९१५), लेखक, समीक्षक स.गं. मालशे (१९२१), संपादक ग. वा. बेहरे (१९२२), 'मपेट'कार जिम हेन्सन (१९३६), सिनेदिग्दर्शक पेद्रो अल्मोदोव्हार (१९४९), क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ (१९५०)
मृत्युदिन : भौतिकज्ञ हान्स गायगर (१९४५), बालसाहित्यकार, रेखाटनकार डॉ. स्यूस (१९९१), सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सर्वमित्र सिकरी (१९९२), दिग्दर्शक, संघटक वासुदेव पाळंदे (१९९८), शब्दकोशकार, अनुवादक श्रीपाद रघुनाथ जोशी (२००२), भौतिकज्ञ राजा रामण्णा (२००४), अभिनेत्री पद्मिनी (२००६)

---

जागतिक सॉफ्टवेअर पेटंटविरोधी दिन.
स्वातंत्र्यदिन : गिनी-बसाउ.

स्थापना : कॅथे पॅसिफिक एअरवेज (१९४६), होंडा (१९४८).
१६७४ : शिवाजी महाराजांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक
१८७३ : म. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१९३२ : पुणे करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
१९६० : CVN-65 या नावाने जगातील पहिले आण्विक सामर्थ्य असलेले विमानवाहू जहाज तैनात.
१९७९ : 'काँप्युसर्व'ने मोफत इमेल सुविधा देणारी पहिली सार्वजनिक इंटरनेट सेवा सुरू केली.
१९८८ : सोल ऑलिम्पिक : १०० मीटर शर्यतीत बेन जॉन्सनने सुवर्णपदक मिळवले. दोन दिवसांनी स्टेरॉईड चाचणीत दोषी आढळल्यामुळे हे पदक, आधीची सर्व पदके व त्याच्या नावावरचे जागतिक उच्चांक काढून घेण्यात आले.
१९९६ : अणुचाचणीबंदी करारावर (CTBT) ७१ देशांची स्वाक्षरी.
२०१४ : भारताचे मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले.

२५ सप्टेंबर
जन्मदिवस : कथाकार, विनोदकार कॅ. गो. गं. लिमये (१८८१), लेखक विलिअम फॉकनर (१८९७), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट ब्रेसॉं (१९०१), चित्रकार मार्क रॉथ्को (१९०३), संगीतकार दिमित्री शोस्ताकोव्हिच (१९०६), बखर वाङ्मयकार डॉ. र.वि. हेरवाडकर (१९१५), एरोस्पेस संशोधक सतीश धवन (१९२०), सिनेदिग्दर्शक सर्गेई बोन्दारचुक (१९२०), घटनातज्ज्ञ बॅरिस्टर नाथ पै (१९२२), नाटककार बाळ कोल्हटकर (१९२६), लेखक, वृत्तपत्रसंपादक माधव गडकरी (१९२८), सिनेदिग्दर्शक व अभिनेता फिरोझ खान (१९३९), क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी (१९४६), क्रिकेटपटू हॅन्सी क्रोन्ये (१९६९), अभिनेत्री कॅथरीन झीटा-जोन्स (१९६९), अभिनेत्री दिव्या दत्ता (१९७७)
मृत्युदिन : गणितज्ञ योहान लँबर्ट (१७७७), पुरातत्त्वशास्त्रज्ञ लवी लॉरा ग्रॅब्रिएल मॉर्तीये (१८९८), किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर (१९५६), लेखक एरिक मारिया रमार्क (१९७०), नाटयदिग्दर्शक, अभिनेते कमलाकर सारंग (१९९८), 'ओरिएन्टलिझम'साठी ख्यात विचारवंत एडवर्ड सैद (२००३), कवी अरुण कोलटकर (२००४), नोबेल पारितोषिक विजेती पर्यावरणतज्ज्ञ वांगारी मथाई (२०११), लेखक शं. ना. नवरे (२०१३), लेखक अरुण साधू (२०१७)
---
जागतिक फार्मासिस्ट दिवस.
जागतिक हृदय दिन.
१४९३ : कोलंबस अमेरिकेच्या (त्याच्या दृष्टीने भारताच्या) दुसऱ्या सफरीवर निघाला. मरेपर्यंत तो अमेरिकेला भारतच समजत होता.
१७८९ : अमेरिकन काँग्रेसने आपल्या संविधानात १२ बदल केले. यातल्या पहिल्या दहांना 'नागरिकांचा हक्कनामा' म्हणून ओळखले जाते.
१५२४ : पोर्तुगीज भारताचा गव्हर्नर म्हणून वास्को-द-गामा भारतात आला. त्याचे इथेच निधन झाल्याने ही त्याची अखेरची भारतयात्रा ठरली.
१९३० : जंगल सत्याग्रहात पनवेल तालुक्यातले १२ सत्याग्रही हुतात्मा झाले.
१९१५ : 'होमरुल लीग' स्थापन करण्याचा अ‍ॅनी बेझंट यांचा निर्णय.
१९१९ : रयत शिक्षण संस्थेची स्थापना.
१९५६ : इंग्लंड आणि अमेरिका यांना अटलांटिकपार जोडणारी टेलिफोन केबल कार्यान्वित.
१९६२ : अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.
१९८१ : सांड्रा डे ओ'कॉनर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.
१९८४ : सुवर्णमंदिरातील सर्व लष्कर काढून घेण्यात आले.
१९९६ : तालिबान्यांनी काबूलचा ताबा घेतला.
२००२ : अक्षरधाम मंदिरात कमांडो कारवाई.

२६ सप्टेंबर
जन्मदिवस : चित्रकार थिओडोर जेरिको (१७९१), तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ इश्वरचंद्र विद्यासागर (१८२०), कवी टी. एस. एलियट (१८८८), तत्त्वज्ञ मार्टिन हाइडेगर (१८८९), गांधीवादी तत्त्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर (१८९४), कवी, कीर्तनकार अनंत दामोदर आठवले (१९२०), अभिनेता, निर्माता देव आनंद (१९२३), माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (१९३२), टेनिसपटू सेरेना विल्यम्स (१९८१)
मृत्युदिन : कवी जॉन बायरन (१७६३), गणितज्ज्ञ मोबियस (१८६८), संगीतकार बेला बार्टोक (१९४५), तत्त्वचिंतक जॉर्ज सांतायाना (१९५२), सूचीकार, चरित्रकार सदाशिवशास्त्री कान्हेरे (१९५२), नर्तक उदय शंकर (१९७७), एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपीची पद्धत शोधणारा नोबेलविजेता मान सीगबान (१९७८), गायक हिंदगंधर्व उर्फ शिवरामबुवा दिवेकर (१९८८), शिक्षणतज्ज्ञ, लेखिका यमुनाबाई हिर्लेकर (१९८५), गायक हेमंत कुमार (१९८९), लेखक अल्बर्टो मोराव्हिया (१९९०), पत्रकार, नाटककार विद्याधर गोखले (१९९६), संगीतकार राम फाटक (२००२)
---
कर्णबधिर दिन.
१६८७ : व्हेनिस आणि ऑट्टोमन साम्राज्यातील लढाईत अथेन्समधील पार्थेनॉनचा मोठा भाग ढासळला.
१९०५ : आईनस्टाईनचा विशेष सापेक्षता सिद्धांत प्रकाशित झाला.
१९७३ : काँकोर्ड विमानाने विक्रमी वेळात अटलांटिक महासागर पार केला.
१९७५ : पंतप्रधानाला कोणत्याही खटल्यापासून अभय देणारी घटनादुरुस्ती लागू.
१९८४ : हाँगकाँगचा ताबा चीनला देण्याचे ब्रिटिशांनी कबूल केले.

२७ सप्टेंबर
जन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)
मृत्युदिन : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)

---

जागतिक पर्यटन दिन.
वर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)

१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.
१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.
१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.
१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.

२८ सप्टेंबर
जन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)
मृत्युदिन : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)

----

जागतिक हृदय दिन
जागतिक रेबीज दिन
राष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.

१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.
१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.
१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.
१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.
१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.
२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.

२९ सप्टेंबर
जन्मदिवस : चित्रकार काराव्हाज्जिओ (१५७१), बॉलपेन बनवणारा लाझलो बिरो (१८९९), भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी (१९०१), सिनेदिग्दर्शक मिकेलांजेलो अंतोनियोनी (१९१२), क्रिकेटपटू रामनाथ केणी (१९३०), सामाजिक कार्यकर्ता हमीद दलवाई (१९३२), अभिनेता, दिग्दर्शक महमूद (१९३२), विनोदवीर रसल पीटर्स (१९७०)
मृत्युदिन : लेखक एमिल झोला (१९०२), ईसीजी शोधणारा नोबेलविजेता विलम आईन्थोवेन (१९२७), कवी डब्ल्यू. एच. ऑडन (१९७३)
----
आंतरराष्ट्रीय कॉफी दिन
१८८५ : वीजेवर चालणारा पहिला व्यावसायिक ट्राममार्ग इंग्लंडमध्ये सुरू.
१८९६ : लो. टिळकांनी दुष्काळ निवारणासंदर्भात केसरीमध्ये अग्रलेख लिहिला.
१९५४ : 'सर्न' सुरू करण्यासाठी युरोपीय देशांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या.
१९७७ : पंधरा वर्ष अनिर्णित असणाऱ्या गंगा पाणीवाटप प्रश्नासंदर्भात भारत-बांग्लादेशात करार.
१९८८ : चँलेंजर दुर्घटनेनंतर अडीच वर्षानी अमेरिकेने प्रथमच माणूस अंतराळात पाठवला.
२००७ : कॉल्डर हॉल हे ठरवून मोडले गेलेले पहिले अणुउर्जाकेंद्र ठरले.
२००८ : लेहमन ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक एका दिवसात ७७७.६८ गुणांकाने कोसळला.

३० सप्टेंबर
जन्मदिवस : सूफी कवी रूमी (१२०७), नाटककार व नाट्यसमीक्षक वासुदेव भोळे (१८९३), ललित कथालेखक मोरेश्वर भडभडे (१९१३), सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२२), लेखक ट्रुमन कपोटे (१९२४), नोबेलविजेता लेखक एली वीजेल (१९२८), संगीतकार प्रभाकर पंडित (१९३३), कवी राजा ढाले (१९४०), विचारवंत, साहित्यिक भा. ल. भोळे (१९४२), गायक शान (१९६२), टेनिसपटू मार्टिना हिंगिस (१९८०)
मृत्युदिन : डिझेल इंजिनचा जनक रुडॉल्फ डिझेल (१९१३), अभिनेता जेम्स डीन (१९५५), भूकंपतज्ज्ञ रिक्टर (१९८५), लेखक गं. दे. खानोलकर (१९९२), सिनेदिग्दर्शक राजीव पाटील (२०१३), अभिनेता टॉम आल्टर (२०१७)

---

स्वातंत्र्यदिन - बोट्स्वाना (१९६६)
आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन.

१८८२ : थॉमस एडिसनने बनवलेला पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.
१९३५ : जाणूनबुजून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे लीग ऑफ नेशन्सने बेकायदा ठरवले.
१९३८ : म्युनिक कराराद्वारे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि इटली ह्यांनी जर्मनीच्या चेकोस्लोव्हाकियातल्या अतिक्रमणाला मान्यता दिली.
१९७७ : ऋत्विक घटक दिग्दर्शित पहिला चित्रपट 'नागरिक' आणि अखेरचा चित्रपट 'जुक्ती टाक्को आर गाप्पो' प्रदर्शित झाले.
१९७७ : बजेट कपातीमुळे अमेरिकेचा चांद्रकार्यक्रम स्थगित.
१९८० : झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.
१९९३ : लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप; हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.
२००५ : डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.

----