या प्रश्नांची गूगल करून उत्तरं मिळतील याबद्दल खात्री आहे. पण नक्की काय गूगल करायचं आणि कोणावर विश्वास ठेवायचा इथपासून थोड्या शंका आहेत, शिवाय बराच आळस आहे म्हणून इथेच धागा काढलाय.
सामान्य स्थितीतला माझा रक्तदाब आणि नाडीचे ठोके सरासरीपेक्षा कमी असतात. सहज चालण्याची जी गती आहे त्या गतीने तासभर चालत डेंटिस्टकडे गेल्यावर तिथे रक्तदाब, नाडीचे ठोके मोजले जायचे ते १२०/८०, ७२-७५ असे यायचे. रक्तदाब नियमितपणे मोजायचं उपकरण माझ्याकडे नाही. नाडीचे ठोके ट्रेडमिलवर मोजता येतात. वीसेक मिनीट ४.५ मैल/तास (~ ७.२५ किमी/तास) या वेगाने धावल्यावर ठोके ~ ९०/मिनीट एवढे असतात.