बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - ३
मागच्या धाग्यात शंभरपेक्षा अधिक प्रतिसाद आल्याने पुढील धागा सुरु केला आहे.
या वर्षी बागकाम सुरू करून साधारण दीड महिना उलटून गेला आहे. गेल्या वर्षीचं वाचवलेलं वांग्याचं झाड भरभरून कळ्या आणि फुलं देतंय. तीन फुलं गळून गेली, आत्ता एकूण चार फुलं आहेत. फळाची वाट बघण्याला पर्याय आहे का? ही फुलं -
![]() |
![]() |
'बिग बॉय' टोमॅटोलाही फळ धरलंय. (अर्ली गर्लच्या शेजारी ठेवल्यामुळे वाण नाही पण गुण लागला का?)
आणि या भोपळ्या मिरचीच्या छोट्या कळ्या -
प्रश्न क्र १ - वांग्याची फुलं झडण्यावर काही उपाय आहे का?
प्रश्न क्र २ - टोमॅटो, वांगं या झाडांमध्ये लैंगिक पुनरुत्पादन फसलंय किंवा त्याचा फायदा मिळत नाही असं म्हणता येईल का?
खीक!
'बिग बॉय' टोमॅटोलाही फळ धरलंय. (अर्ली गर्लच्या शेजारी ठेवल्यामुळे वाण नाही पण गुण लागला का?)
फळ धरलांय का नक्की? नायतर हायड्रोसिल आसंन. अर्ली गर्ल्ने हात सुदा लावून दिला नशिल तेच्यामुले... :)
आमी आमच्या नाजुक चेरी टोमॅटोच्या बाजूला दोन रांगडे बीफस्टेक टोमेटो लावले होते....
होऊं जाउं द्या थ्रीसम!
स्त्रीमुक्तीवादीच आमी; आसां साक्षात अदितीचां मानां सर्टिफिकिट हाय!! :)
आता चेरी टोमॅटोक फळां लागली हायंत. पन ती नक्की कोनच्या बीफस्टेकची तां काय ठांवा नाय!!!!
वीकेन्डला फोटो टाकतांव.
स्त्रीमुक्तीचा विजय असो!!!!!
इचिभनं, आजकाल कुनाचा जल्ला काय साला भरोसाच नाय!!!!
-पिवला भोईर
:)
"उठा ले रे बाबा उठा ले"
काका उर्ध्वरेतनाबद्दल काही सांगत नाहीत त्यामुळे मलाच काहीतरी कष्ट करावे लागणार याची खूणगाठ मी मनाशी धरली. ते पुंकेसर वरच्या दिशेला जावेत म्हणून शेवटी मीच हो कष्ट केले. आता बघूया फुलाचं पोट फुलतंय का ते!
सध्या दिसणाऱ्या कळ्या मात्र वरच्या दिशेला बोटं दाखवत आहेत.
आता हे ही करून बघा.
http://www.gardeningknowhow.com/edible/vegetables/eggplant/what-to-do-f…
Eggplant Flower Hand Pollination
If you suspect your eggplant flowers fall off due to a lack off pollination, then you can use hand pollination. Eggplant flower hand pollination is easy to do. All you need to do is take a small, clean paintbrush and move this around the inside of the eggplant flower.
...
बाकी काही म्हणा, पण ते फुलांचे फोटो इतक्या झूम/क्लोज़पमध्ये खरोखरच अश्लील दिसतात.
आता बघूया फुलाचं पोट फुलतंय का ते!
(अवांतर:) यावरून, शालेय वयात ब्ल्याकअँडव्हाइट दूरदर्शनच्या दिवसांत कधीतरी दूरदर्शनवर पाहिलेल्या निळू फुलेच्या कोठल्याशा चित्रपटातला - तो चित्रपट कोठला, ते आता आठवत नाही, पण - निळू फुलेचा "छबूचं प्वोट कोनी फुगवलं?" हा अजरामर 'डायलॉग' आठवला.
(स्पॉयलर अलर्ट>वास्तविक, छबू या शाळकरी मुलीचे पोट निळू फुलेच्या पात्रानेच फुगवलेले असते, पण हा 'डायलॉग' मारून शाळेतल्या मास्तरला हा आळ आपल्या डोक्यावर घ्यायला लावून छबूशी लग्न करायला तो भाग पाडतो, असे अंधुकसे आठवते.</स्पॉयलर अलर्ट>)
कोणाला आठवतोय का कोठला पिच्चर ते?
माझं प्रगती पुस्तक - २
आधी प्रॉमिस केल्याप्रमाणे हे अजून काही फोटो....
हा बहरलेला यलो जास्मिन...
ही रातराणी...
हा खरा गुलाबी गुलाब. हा अतिशय नाजूक आहे. जरा फुलं आली की त्याच्या फांद्यांना ते वजन सहन होत नाही, लगेच खाली वाकतात. सुवास आपल्या गावठी गुलाबाचा...
हे रोझमेरीचं बुश. गेल्या खेपेला आऊट ऑफ फोकस आलं होतं म्हणुन पुन्हा देतोय...
हे ओरॅगनो, पास्टा-पिझ्झ्यात घालायला..
हे ब्लू आयरिस..
हा जापनीज मेपल ट्री..
हे एक फ्रंट आयलंड. पूर्वी इथे फक्त लहानमोठे दगड्-धोंडे होते, अजूनही आहेत. त्या दगडांना हिरवाई फोडायचा माझा एक प्रयत्न...
माझ्या बागेची रक्षणदेवता! :)
आता भाजीपाल्याविषयी. पूर्वी लहान प्लास्टिक कंटेनरमध्ये पेरलेल्या बियांना रोपं आल्यानंतर आता ती रोपं वाफ्यांमध्ये ट्रान्सप्लांन्ट केली आहेत.
या वाफ्यात काकडी, इंडियन कारली आणि स्क्वॉश आहेत...
माझी आधी लावलेली काकड्याची काही रोपं किड्यांनी खाऊन टाकली. :(
आता नवीन बॅच तयार होतेय...
ही पूर्वी ट्रान्सप्लांट केलेली मिरच्यांची रोपं...
गंमत म्हणजे या मिरच्यांच्या जागी गेल्या वर्षी टोमॅटो लावले होते. त्या वर्षीच्या बियांची ही दोन चुकार रोपं यावर्षी रुजून वाढताहेत...
हे आमचे यावर्षीचे टोमॅटो. उजवीकडचे दोन ते रांगडे बीफस्टेक टोमॅटो आणि डावीकडची ती नाजूक चेरी टोमॅटो.
अदिती काही म्हणो सेल्फ पॉलिनेशनबद्दल, पण आमच्या चेरीला छोटी बाळं सुद्धा होताहेत... :)
हा अजून एक वाफा. इथे ही चवळी लावलेली आहे..
त्याच वाफ्यात ही मेथी नुकतीच पेरलेली, जस्ट उगवते आहे...
आणि त्याच वाफ्यात ही दोन वांग्याची रोपं. ही अजून जोम धरत नाहियेत, आणि किडे त्यांची पानं कुरतडताहेत! :(
ती अदिती जे अळू-अळू करून गाणं गात असते ते ह्ये? :)
अॅन्ड नाऊ फॉर द ग्रॅन्ड फिनाली...
ही कलिंगडाची रोपं. चांगली जगली आहेत. ही खूप पसरतात म्हणून वेगळी मोकळ्या जमिनीवर लावली आहेत. अजून एका रोपासाठी जागा आहे. तिथे एक हनिड्यू मेलन लावीन असं म्हणतो...
असो. तर मंडळी आत्ता इतकंच गोड मानून घ्या...
फळझाडांना आत्ताशी फुलं-पानं येत आहेत. जरा थोडी फळं धरली म्हणजे मग त्यांचे फोटो टाकीन.
तोवर पाणी-खतं देणे आणि फवारणे हा कार्यक्रम जारी आहे...
जाऊदे झालं!
जाऊदे झालं, सारखं सारखं जळफळाट झाला काय म्हणायचं! :-) तुमच्याकडे असलेल्या जागेला आणि हवामानाला तुम्ही न्याय देताय ते पाहून मनापासून फार समाधान वाटलं. बागकामप्रेमीला अशी बाग मिळायला हवी आणि बागेला असा बागकामप्रेमी मिळायला हवा.
तुमच्या मेयर लिंबाच्या झाडाचा फोटो कुठाय? त्याची पानेही हिवाळ्यात गळतात का हो? मागच्या महिन्यात माझ्या नवर्याच्या डोक्यात, घरात ठेवायला लिंबाची झाडे बियांपासून करण्याचं खूळ आलं होतं म्हणून त्याने एका कुंडीत बिया पेरल्या होत्या. महिनाभरात काही झालं नाही म्हणून परवा कुंडी रिकामी करायला गेले तर सात-आठ लिंबाची रोपे इंचभर उगवून आली आहेत! त्या बिया त्यांच्या वेळाप्रत्रकाप्रमाणेच उगवून येत असाव्यात.
बागकामप्रेमीला अशी बाग
बागकामप्रेमीला अशी बाग मिळायला हवी आणि बागेला असा बागकामप्रेमी मिळायला हवा
.
अगदी बरोबर.
भली मोठी लॉन न करता एवढ्या सगळ्या भाज्या, फुलं आणि झाडं लावलेली पाहून खरंच छान वाटतं. समोरील छोटेशे रॉक गार्डन ही खूप आवडले. कधी घर बांधलं तर गेटशेजारी मधूमालती लावून कमान करायची खूप इच्छा आहे. बर्कलीत Mrs. Dalloway's म्हणून बागकामाला वाहिलेलं एक सुंदर पुस्तकांचं दुकान होतं. ("Mrs Dalloway said she would buy the flowers herself.." असं पाटीवर लिहीलं होतं!) तुम्ही कधी बे एरीयात गेलात तर अवश्य भेट द्या. मी शेजारहून कॉफी घेऊन तासंतास तिथे पुस्तकं चाळत बसायचे. Food, Not Lawns नावाचं मस्त पुस्तक तिथे वाचल्याचं आठवतं.
पण तिथे पाण्याची काय परिस्थिती आहे? अवर्षणामुळे पाणीवापरावर बरीच बंधनं आली आहेत, ना? दक्षिण कॅलिफोर्निया म्हणजे ऊन ही पुष्कळ असेल आता.
होय.
पण तिथे पाण्याची काय परिस्थिती आहे? अवर्षणामुळे पाणीवापरावर बरीच बंधनं आली आहेत, ना?
हे दुष्काळाचं ४थं वर्ष चालू आहे, म्हणुन यावर्षी प्रथमच २५% पाणीकपात जाहीर केलेली आहे.
म्हणूनच मी सुद्धा ग्राउंड कव्हर्स आणि अॅन्युअल्सचा पाणीपुरवठा तोडला आहे. फक्त भाजीपाला आणि पेरेनियल्सना होजने पाणी घालतो, स्प्रिंकलर सिस्टम बंद केली आहे....
दक्षिण कॅलिफोर्निया म्हणजे ऊन ही पुष्कळ असेल आता.
आमच्याकडे ऊन नेहमीच भरपूर. पण एलए किंवा व्हॅलीसारखं खूप गरम होत नाही. आमचं गाव हे डोंगरांमध्ये वसलेलं आहे. माझं घरही डोंगरउतारावरच आहे. शिवाय पॅसिफिक जवळ आहे (~१० मैलांवर) त्यामुळे ब्रीझ नेहमीच सुरू असते.
किंबहुना "सनी, क्लियर, ७५ +- १५ डिग्री आणि लाईट ब्रीझ" हे आमचं बहुतेक वर्षभराचं हवामान असतं. गावात झाडंही खूप आहेत त्यामुळेही गारवा रहातो....
वरील सर्वांना एकत्रित प्रतिसाद
अंतराआनंदः अहो आपण एखादी गोष्ट अर्पण केल्यावर 'जरा गोड मानून घ्या' असंच म्हणतो ना! :)
अदिती: च्यायला अजून पुरेशी पानं नाय आली त्या कलिगडाच्या वेलाला तर ही कलिंगडं मागतेय! जरा त्याला वाढू दे की अजून!! :)
ॠषिकेशः
आमची नुकतीच झालेली राख पूर्वेला फुंकून द्या.. (होपफुल्ली पोचेल आम्रिकेच्या पश्चिम टोकाला)
अरे अगदी "पृथिव्यै समुद्रपर्यंतायां एक राख इति?" :)
मोठ्या वृक्षांची निगा कशी राखता? फवारणी वगैरे करावी लागते? का ते सेल्फ सस्टेनिंग आहेत?
मोठे होईपर्यंत पहिले ५-६ वर्षे खूप काळजी घ्यायला लागते. एकदा मोठे झाले की मग त्यांची मुळं खोलवर जातात. मग बागेच्या इतर स्प्रिंक्लर सिस्टमने दिलेलंच पाणी ते पितात.
मी मोठया झाडांना वर्षातून ३ वेळा खत घालतो. दोनदा त्यांच्या मुळांशी मल्च पसरतो. फळझाडं आटोक्याच्या उंचीत ठेवली आहेत. त्यांवर जर कधी कीड वगैरे पडली तर (शिडीवर चढून) त्यांच्यावर फवारणी करतो. :) आम्रिकेत आल्यापासून कधी बापजन्मी केली नसती असली स्किल्स अॅक्वायर केली आहेत!!
बाकी ते पाईन वगैरे अनेक मजली उंचीचे आहेत त्यांवर काही स्प्रे करता येत नाही...
४-५ वर्षांतून एकदा सर्व्हिस बोलावून सगळी मोठी झाडं ट्रिम आणि थिन करून घेतो....
शुचि: हां, ती फार चमकदार व्हरायटी आहे. माझ्याकडे निळीच पण चमकदार नसलेली व्हरायटीही आहे. तिला चमक नसली तरी तिच्या फुलांना निळ्या रंगाची एक दुर्मिळ शेड येते म्हणून जोपासली अहे. पण सध्या त्या आयरिसला एकही कळी/ फूल नाही, तिचं सायकल थोडं उशीराचं आहे. फूल आलं की फोटो टाकीन...
रुची:
बागकामप्रेमीला अशी बाग मिळायला हवी आणि बागेला असा बागकामप्रेमी मिळायला हवा.
मेणी मेणी ठॅन्क्यू!!!! :)
तुमच्या मेयर लिंबाच्या झाडाचा फोटो कुठाय? त्याची पानेही हिवाळ्यात गळतात का हो?
फळझाडांचे फोटो तिसर्या आणि शेवटच्या हप्त्यात! आत्ता फक्त भाजीपाला!! ("काकू, बॅन्ड संध्याकाळी, आता फक्त सनई-चौघडा!!" संदर्भः नारायण) :)
फळझाडांना आत्ताशी फुलं/पानं येतायत.
माझ्या मेयर लिंबाची पानं गळतात आणि नवीनही येतात. पण ही क्रिया वर्षभर चालू असते. जुनी पानं गळून नवी पानं येत रहातात त्यामुळे फॉलसारखं नुसतं काटक्याचं झाड कधी होत नाही.
बापरे.. काय मेहनत घेता राव
बापरे.. काय मेहनत घेता राव तुम्ही!
आता तूच पघ म्हंजी झालं! अंग निस्त ठनकून र्हायलंय!!
आनि थितं तो सुक्काळिचा मनोबा आमाला लिवत नाय म्हनूनशान आळशी म्हन्तोय गब्बरच्या त्या धाग्यावर!
आता तेच्यासारकं निस्तं चावीबोर्डावर टिपटिप करत बसलुं म्यां तर हातात खुरपं कोन धरील, त्यो मनोबा?
आता तू हितला काय यवडा मोठा याडमिन हायेस तर जरा दे की समज त्येला, की बाबा, काकाला चिखलात नाचू दे,उगाच त्याला चावू नको म्हनून!!!
:)
काकाला चिखलात नाचू दे,उगाच
काकाला चिखलात नाचू दे,उगाच त्याला चावू नको म्हनून!!!
=)) _/\_
आता तू हितला काय यवडा मोठा याडमिन हायेस तर जरा दे की समज त्येला,
अवो आमी धाकले याडमिन. तुमच्या बगलेतच हायेत की सगळे मोठमोठाले याडमिन! :P
आणि याडमिननं समजावून हिथं कोन आयकेल असे वाट्टे हो तुमास्नी? ;)
जरा दे की समज त्येला, की
जरा दे की समज त्येला, की बाबा, काकाला चिखलात नाचू दे,उगाच त्याला चावू नको म्हनून!!!
तुमच्या चिखलातल्या नाचाच्या शोचं वेळापत्रक टाका की हो, ऐसीच्या 'आगामी कार्यक्रम आणि उत्स्फूर्त कट्ट्यां'त! बघा केवढी गर्दी होते, आणि कसला दौलतजादा होतो ते. ऐसीवरच्या अॅडमिनबाई असा दौलतजादा करायला नेहमीच तयार असतात. आणि सध्या मी दौलतजादेच्छुक स्त्रियांसाठी पुरुष पुरवण्याचा धंदा सुरू करायचा म्हणतोय. (अधिक माहितीसाठी जरा योग्य त्या खरडवह्या उपसा.) तेव्हा करू काहीतरी सेटिंग.
हा धागा नेहमीच वाचते आणि फोटो
हा धागा नेहमीच वाचते आणि फोटो बघत असते.
बरीच नविन माहीती कळते, आणि त्याचा वापरही करता येतो.
मी आमच्या बाल्कनीत थोडीफार रोपे ठेवली आहेत.
उपयोगी अशी पुदीना, क्ढीपत्ता, मिरची, आणि कोथिंबीर लावली होती.
पुदीना, कढीपत्ता चांगले वाढलेत. कोथिंबीर थोडीफार आली, मिरची अजिबातच नाही (परत प्रयत्न करणार आहे)
मोगर्याला पण दोन फुले आलेली दिसतायत.
आणि बाकीची शोभेची छानच राहीली आहेत. त्याचे विशेष काही करावे लागत नाही.
एक केशरी फुलांचे (नाव लक्षात नाही) होते. एक दोन फुले आली. नंतर बहुदा ते पक्षांच्या कामी आले असावे. :(
इथे लहानसे , पिवळ्या रंगाचे पक्षी येतात. त्यांनी इथे घारटे केले आहे. सध्या तिथे एक पिल्लू आहे. आणि दिवसभर मोठ्यांची ये जा चालू असते. .
फोटो
तुम्हीही फोटो टाका...अवडतील पहायला. माझ्याकडे पहिल्यांदाच पुदिना एका कुंडीत वाढतोय. कोथिंबीरीची दोन बारकी रोपे कोणत्याही क्षणी मलूल होतील अशी दिसतात.
पर्पल रंप्ड सनबर्ड (शिंजीर ?)चे घरटे असू शकेल. त्यांची चोच वक्राकार असते आणि घरटे लोंबते उभ्या आकाराचे, पाऊच सारखे दिसते.
बरोबर आहे तुझं ॠता. ते
बरोबर आहे तुझं ॠता. ते सनबर्डसच आहेत . (घरच्या पक्षी तज्ञाला विचारून खात्री करून घेतली :) )
मागच्या वेळेस घरटे खाली लोंबत असलेले होते. या वेळी दोन्ही बाजू फांदीला अडाकवलेल्या सारख्या दिसतायत. आणि आकार, - बेल्ट ला पाऊच लावल्याप्रमाणे. किंवा केन ची चेअर मिळते ना , स्टँडला अडकवलेली -- तसा
त्याचेही फोटो काढीनच.
वेलकम
हा धागा नेहमीच वाचते आणि फोटो बघत असते.
बरीच नविन माहीती कळते, आणि त्याचा वापरही करता येतो.
वर ऋताने म्हंटल्याप्रमाणे तुमच्या रोपांचे फोटो टाका...
फोटो कसे टाकायचे हे माहिती नसल्यास अदितीचं डोकं खा!!!!
:)
मी आमच्या बाल्कनीत थोडीफार रोपे ठेवली आहेत.
उपयोगी अशी पुदीना, क्ढीपत्ता, मिरची, आणि कोथिंबीर लावली होती.
पुदीना, कढीपत्ता चांगले वाढलेत. कोथिंबीर थोडीफार आली, मिरची अजिबातच नाही (परत प्रयत्न करणार आहे)
पुदिना राक्षसारखा झपाट्याने वाढतो. कोथिंबीर खारी वगैरे खात आहेत का ते पहा...
कढीपत्ता कसा वाढवायचा ते कळल्यास आम्हालाही कळवा!!! :)
मिरची जर उष्ण हवामान असेल तर काहीही न करता चांगली वाढते..
मोगर्याला पण दोन फुले आलेली दिसतायत.
नुसतंच काय सांगताय, फोटो टाका की!!!!
-----------------------------------------
जुना बरा हा इथे, दिवा पारवा पार्याचा
आणि मोकळ्या नळाची, शिरि धार मुखी ऋचा
मिरची जर उष्ण हवामान असेल तर
मिरची जर उष्ण हवामान असेल तर काहीही न करता चांगली वाढते..
असेल बॉ!
एक निरीक्षण असे की आपण बागकामाचे धागे काढल्यापासून माझ्यासकट किमान ४ जणांनी मिरच्यांचा प्रयोग केलाय आणि मिरच्या आलेल्या नाहीत.
भारतात ऐसीवरील 'सुनील' हे एकच व्यक्ती मला ठाऊक आहेत ज्यांना भरपूर मिरच्यांचे पिक घेता आले आहे.
असे का असावे?
रागावू नकोस रे, थोडी थट्टा
रागावू नकोस रे, थोडी थट्टा केली...
बाकी पुढ्ला बागकामावरचा धागा आपण असा काढूया की प्रत्येकाने आपण बागकामाला सुरवात कशी केली ते अनुभव कथन करायचे...
मग तुला कळेल की थोरथोर लोकांचीही कशी गंमत होत होती ते!!
मी माझा अनुभव कथन करायला जरूर तयार आहे!!!!
कशी आहे कल्पना?
:)
वेलकम सठी धन्यवाद! फोटो
वेलकम सठी धन्यवाद!
फोटो नक्कीच काढीन आणि ( ऐसीवर दाखवणेबल असतील तर) इथे चिकटविन . आधी काढलेले आहेत, पण तेव्हा ती बाळं फारच लहान होती.
तुम्ही म्हणल्याप्रमाणे, पुदीना खूप पसरतो आहे . पण त्याला नियमित पाणी दिले नाही तर पाने लगेच सुकलेली दिसतात.
कढीपत्त्याचे मी रोप आणले होते. सुरवातीला त्याच्या सगळ्या फांद्या , पाने गळाली आणि नुसतीच काडी राहीली. पण काही काळानंतर आता परत नविन पालवी आली आहे. आणि रोपाने चांगलेच बाळसे धरले आहे.
मी घरातील बहुतेक ओला कचरा ( भाज्यांची देठे, चहाचा चोथा वगैरे) या सगळ्या कुंड्यांमधे जिरवते. (बहुदा) त्यामुळे अजूनतरी रासायनिक खते वापरावी लागलेली नाहीत.
ब्लूबेरी
माझ्या ब्लूबेरीला नुकतीच पानं फुटायला लागली आहेत, पण शेंड्यांवर त्याआधीच अशी फुलं फुलली आहेत. आता खारींपासून त्याचा बचाव कसा करायचा या विवंचनेत मी आहे.
बेझीलही उगवते आहे. साध्या आणि चेरी टोमॅटोलाही २-३ फुलं आली आहेत. भोपळ्या मिरचीच्या रोपांना बहुतेक लवकरच फुलं येतील अशी चिन्ह आहेत. लाल माठ, फरसबी आणि लसणीची पातही उगवत आहे. पेरलेल्या अळूचे कांदे उकरून कोणीतरी पळवले आहेत. आतापर्यंतच जमेची बाजू म्हणजे घाबरून घरातच ठेवलेला स्ट्रॉबेरीची काही फळे चाखायला मिळाली.
आणि हो! गेल्या वर्षी ब्रेक घेतल्यानंतर यावर्षी परत डेकच्या खाली पक्ष्यांच्या जोडीने घरटे बांधले आहे.
सुरेख कळ्या
सुरेख कळ्या आल्या आहेत ब्लूबेरीच्या! ब्लूबेरीजचा मस्त बहर येईल असं दिसतं आहे.
पण,
बेझीलही उगवते आहे. साध्या आणि चेरी टोमॅटोलाही २-३ फुलं आली आहेत. भोपळ्या मिरचीच्या रोपांना बहुतेक लवकरच फुलं येतील अशी चिन्ह आहेत. लाल माठ, फरसबी आणि लसणीची पातही उगवत आहे.
हे एव्हढं असतांना फक्त हा एकच फोटो टाकायचा म्हणजे सनी लिऑनच्या फक्त डोळ्यांचा क्लोज-अप फोटो टाकण्यापैकी खोडसाळपणा आहे!!!! :)
टाका की ते ही फोटो, इतकी कसली गुप्तता? :)
पुलंच्या ह्या वाक्यांची आठवण झाली, "काही लोक बाजारात लसूण आणायला निघाले तरी आपला हेतू कसा क्रांतिकारकांसारखा गुप्त ठेवतात. आम्ही सालं लसूण आणण्याच्या आधीच संध्याकाळी पिठलं-भात असल्याचा बेत जाहीर करून मोकळे!!!!" =))
हायब्रीड, जीएम वगैरे
हायब्रीड, जीएम वगैरे नसलेलं
पारंपारीक बद्धतीने बिया जतन करून काही वनस्पतींच्या जाती अजून टिकून आहेत. त्यांचं नैसर्गिक बियाणं
शिवाय या बियांपासून भाज्या आल्यावर त्यावर कोणतीही रासायनिक किटकनाशकं, युरीया किंवा कृत्रिम खतं वगैरे न वापरता (केवळ पारंपारिक उपाय, शेणखत वगैरे वापरायचं) पिक घेतलं की साधारणतः त्याला ऑर्गॅनिक शेती म्हणतात.
तसे पिक शरीराला अधिक चांगले असते व चवीही अधिक तीव्र असतात असे म्हणतात (आता मलाही चवी मिळतीच असे स्वप्न बघतोय :) )
ऑरर्गॅनिक बियाणं हाय्ब्रिड
ऑरर्गॅनिक बियाणं हाय्ब्रिड अथवा जीएमओ तर नसतंच, पण ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेल्या झाडांच्या बिया असतात. किती पिढ्या ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवल्यावर बियाणं ऑर्गॅनिक ठरतं हे मात्र मला नीट कळत नाही. आजकाल सर्रास ऑर्गॅनिक बियाणं हे लेबल लावलं जातं खरं, पण बरेचदा "ओपन-पॉलिनेटेड" अभिप्रेत असतं, म्हणजे जे पारंपारिक पद्धतीने तयार झाले आहे (तयार केलेली हाय्ब्रिड प्रजाती नाही). याचा अर्थ या बियाणातून लागणार्या झाडाच्या बिया पुन्हा वापरता येतात. एरवी हायब्रिड बियाणं पहिल्या पिढीला जोमानं वाढतं, पण दुसर्या तिसर्याला नाही.
वर ऋषिकेशने सांगितलेल्या प्रकाराला "हेरलूम" किंवा "देशी" सुद्धा म्हणतात. या प्रजाती जुन्या असतात, ठराविक लक्षणं असतात, पण कमर्शियल शेतीत सहसा वापरली जात नाहीत.
स्पष्टीकरण
ऑर्गनिक = नॉन जीएमो हे तितकसं खरं नव्हे!
ऑर्गनिक म्हणजे रासायनिक खतांचा, कीटक-बुरशीनाशकांचा वापर न करता वाढवलेलं! जीएमओ बीजदेखील अशा प्रकारे वाढवता येतं....
नॉन जीएमओ = एअर॑लूम
ज्याच्या फळांतल्या बियांपासून पिढ्यानपिढ्या पुढे पिकं काढता येतात ते बियाणं!
दिसायला भक्कास (पण काही लोकांच्या मते चवदार) असतं ते बियाणं!!!!
ऑर्गनिक = नॉन जीएमो हे तितकसं
ऑर्गनिक = नॉन जीएमो हे तितकसं खरं नव्हे!
ऑर्गनिक म्हणजे रासायनिक खतांचा, कीटक-बुरशीनाशकांचा वापर न करता वाढवलेलं! जीएमओ बीजदेखील अशा प्रकारे वाढवता येतं....
थियरेटिकली हे बरोबर आहे, पण सध्या तरी अमेरिकेतल्या ऑर्गॅनिक नियमांप्रमाणे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन हवे असल्यास जी-एम-ओ बियाणं, पशुखाद्य वगैरे वापरण्यावर बंदी आहे. यावर वाद चालू आहेच, मात्र. अनेकांचे म्हणणे आहे की हायब्रिड बियाणं टाळून, ठराविक रोगांविरुद्ध सक्षम केलेल्या जी-एम बियाणांना रासायनिक खतं-औषधं न वापरता उगवली जावीत. पण जी-एम बियाणांच्या अन्य ज्ञात-अज्ञात परिणामांकडे बोट दाखवून ते देखील नको, ओपन-पॉलिनेटेड आणि एरलूम बियाणंच बरं अस विरोधकांचं म्हणणं आहे. (कॅलिफोर्नियातल्या प्रॉप ३७ वरच्या चर्चा तुम्हाला माहित असतीलच.)
नॉन जीएमओ = एअर॑लूम
ज्याच्या फळांतल्या बियांपासून पिढ्यानपिढ्या पुढे पिकं काढता येतात ते बियाणं!
एरलूम नॉन-जी-एम आणि नॉन हायब्रिड (म्हणजे, ओपेन-पॉलिनेटेड, नैसर्गिक पद्धतीने परागण होऊन तयार झालेले) असतात हे खरंय, पण सगळीच ओपेन-पॉलिनेटेड बियाणं एरलूम नसावीत. जुन्या, म्हणजे अनेकानेक पिढ्या जपलेल्या, काही खास लक्षणं असलेल्या, आणि सहसा बाजारात न मिळणार्या प्रजातींना एअरलूम म्हणतात अशी माझी समज आहे.
पण या सगळ्या लेबलांमधे गोंधळ होतो हे खरं.
अंगणात गमले मजला
सोडून यावे लागले.
=====================================================================================================
२००४ ते २०११ अशी ८ वर्षे आम्ही नोयड्यात आणि गुरगावात ग्राउंड फ्लोअर वर राहिलो. आमच्या घरमालकांनी अगोदरच बरीच झाडे झुडपे, गमले आणि गवत लावून ठेवलेले. मला किंवा बायकोला बागकामात काही रस नव्हता पण आम्ही पाणी श्रद्धेने घालायचो. शेजारच्या घराच्या माळ्याकडून खत आणून घालायचो. त्यामुळे मालकांचे कोणते झाड वाळवण्याचे पातक आम्हाला लागले नाही.
हळूहळू कॉलनीतल्या बायका बायकांच्या इर्ष्येतून (असे माझे भाबडे मत) बायकोला आपल्याही घरी उत्तमोत्तम गमले असावेत असे वाटू लागले. मक्काय, नर्सर्यांतून जाऊन किंवा गमलेवाले सोसायटीत आले कि लगेच 'वेगळे' बघून गमले घ्यायचे. पूर्वीचे ३०-३५ आणि आम्ही नव्याने घेतलेले ३०-३५ असे चिकार गमले घरात झाले. उत्साहाने म्हणावे तर फक्त शेजार्यांकडून कडिपत्ता घेणे/चोरणे* टाळावे म्हणून मी कडीपत्ता लावलेला. बायकोने 'स्वतःची तुळस' लावलेली.
नंतर २००७ ला ईशान्य जन्मण्यापूर्वी (अर्थातच उत्साहात) हार्डवेअरच्या दुकानात जाऊन बाळाला झुलवायला एक पाळणा बनवायला सांगीतला. कैतरी कमुनिकेशन गॅप झालेला. ईशान्य आजोळून आल्यावर पाळणा आला तर तो ह्ह्हे भलादांडगा! त्याच्यावर तीन लोक आरामात बसू शकायचे. (आणि बहुतेक बाळ ठेवले तर पक्के खाली पडणार.) हॉलमधे २-३ जण त्याच्या हेलकाव्याने ठेचल्यावर त्याला लॉनमधे हलवण्यात आले. पाळणा फोटोत मागच्या बाजूला आहे. आम्ही त्याच्यावर बसून तासंतास टाईमपास करत असू, फोटो काढायचीही चिकार हौस, पण "लॉन" या प्रकाराची फोटो काढायची पात्रता आहे हा विचार मनात नाही आला तेव्हा. हा एकच फोटो मला तिथे काढलेला मिळाला आहे. तो ही कोपर्यातला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
आम्ही उत्तर दिल्लीत शिफ्ट झालो तेव्हा हे गमले (आमचे आमचे) न्यायचे नाहीत (घर दुसर्या मजल्यावर आहे.) असा निर्णय मी (अर्थातच एकट्याने) घेतला. मग त्यांच्याबद्दलची हळहळ आणि त्यांना परत आणायच्या मागण्या केल्या गेल्या. हळूहळू त्या विरल्या. पण अजूनही कधीकधी चुकुन माकून बाल्कनीत ठेवायला गमला घेताना 'ती गेली तेव्हा' टाइप वातावरण निर्माण होते.
--------------------------------------------------------
*पकडले गेल्यावर अजून थोडी करा असे होस्ट म्हणतो अशी चोरी.
"होते मनोहर परि गमले उदास!"
"होते मनोहर परि गमले उदास!" :)
घर बदलतांना झाडं पाठी सोडून यावी लागली की दु:ख्ख होतं.
आमच्या इथं जमिनीत लावलेली झाडं मागे सोडून यावी लागतात पण गमल्यांत लावलेली (कुंड्यांत लावलेली असं लिहायची आता काय बिशाद आमची!) झाडं आपल्याबरोबर घेऊन जाता येतात.
बाकी तुमचे चिरंजीव लई डॅशिंग दिसताहेत!! :)
रडगाणे अलर्ट!
इथला या वर्षीचा वसंत ऋतू इतर वर्षांच्या मानाने बराच लवकर सुरू झाला होता. आतापर्यंत बहुतेक झाडांना पानेही आली आणि चेरी, सफरचंद वगैरे फळझाडांना मोहोरही आले होते त्यामुळे आता थोडे बागेचे छान-छान फोटो काढून लावावे असा विचार होता. त्यातच काल बागेत फिरताना, मागल्या वर्षी लावलेला लॅव्हेंडर हिवाळा सोसून जिवंत राहिलेला दिसला, त्याला पालवी फुटलेली पाहिली आणि डोळ्यात आनंदाश्रू उभारले (आमच्याकडे सामान्यतः लॅव्हेंडर पेरिनियल नाही) मग निसर्गाच्या ममत्वावर विश्वास ठेऊन गार्डन सेंटरकडे धाव घेतली. अर्धांगाच्या (माफक) विरोधाला न जुमानता आणि त्याच्या धोक्याच्या सूचनेकडे पूर्ण दुर्लक्ष करून दोन गुलाबाची झाडे, दोन बेरीची रोपे आणि काही फुलांच्या कुंड्या..आपलं गमले विकत आणले. 'ब्लू आयरीस'ला स्थानापन्न करताना व्हॅन गोहच्या आवडत्या चित्राला स्मरून त्या 'आयरिस'साठी मुलीला गोड गाणी गायला लावली आणि मग रात्री नऊ वाजता बागेत आवराआवर करून घरात आले (आमच्याकडे आता साडे-नऊपर्यंत उजेड असतो) झोपण्याआधी हवामानाच्या अंदाजाकडे नजर टाकली आणि सगळं आलबेल असल्याने निर्धास्तपणे झोपी गेले. सकाळी साखरझोपेत असतानीम नवर्याने लाडीकपणे उठवत "प्रिये, दिवस उजाडला आता ऊठ आणि जरा बाहेर पहा" म्हणून फर्रकन पडदा उघडला तेंव्हाच काहीतरी चुकतंय याची कल्पना आली होती; बाहेर अर्थातच बर्फ कोसळत होता, चार इंच पाणीदार बर्फाखाली नुकतीच उमललेली झाडे चुपचाप उभी होती. माझ्या डोळ्यात उभे राहिलेले अश्रू (आज दु:खाचे!) लपवत गुमान कुंड्या घरात आणायला गेले. सुदैवाने हवा फार गार नाहीय आणि दुपारपर्यंत सगळा बर्फ वितळून जाईल पण नवीन झाडांचे काय होणार ते त्या निसर्गदेवतेलाच ठावूक!
अग आई ग!!! लवकरच पुन्हा
अग आई ग!!! लवकरच पुन्हा हवामान सुधारेल अशी नॉर्स देवांना प्रार्थना करते! मे महिन्यात बर्फ म्हणजे कहर आहे कहर.
इथे ७५% शेड नेट टाकूनही काही उपयोग नाही, भोपळ्याची फुलं करपलेलीच दिसतायत, आणि बहुतेक सगळीच भोपळी स्टॅसिस मधे आहेत. दोडका वाळला, मी म्हटलं जाऊ दे. पण काकडी जोम धरतेय, पडवळीच्या वेलीला थोडं एका भिंतीला लागून आधार दिला, आणि आता सकाळचे दोन-तीन तास थोडं ऊन कमी लागतं. पुन्हा जिवात जीव आलाय, आणि ४-६ छोट्या पडवळी लोंकळतायत.
भेंडीला छोटे पांढरे किडे लागले, काल आणि आज नुसते निंबाच्या पाण्याने सगळी धूवून काढली. एकीकडे थोडा मावा लागण्याची लक्षणं दिसली, त्या कळ्या छाटून टाकल्या. मेली मिर्ची फुलांचं नावच काढत नाहीये, आज ३ महिने होत आले.
इथे भयंकर उकाडा आहे, काही खरं नाही.
मेली मिर्ची फुलांचं नावच काढत
मेली मिर्ची फुलांचं नावच काढत नाहीये, आज ३ महिने होत आले.
इथे भयंकर उकाडा आहे, काही खरं नाही.
आपल्या हवांची सरासरी झाली तर बरं होईल.
आमची मिर्ची नुस्तीच कळ्या आणि फुलं काढत्ये, फळांचा पत्ता नाही. इथे पाऊस आणि पावसाळी हवा फार माजल्ये. (आणि पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रांत जमीन नुस्ती भिजल्यासारखी होत्ये. बस.)
रुची, कल्जि घेने.
रुचीचं रडगाणं ऐकून तिला दिलासा कसा द्यावा हे समजत नाही. तू तुझ्याकडून आत्तापुरती काळजी घेतली आहेस, आता अजून थोडी काळजी घे.
पंधरा दिवसांपूर्वी कुंड्यांमधल्या* पुरामुळे टोमॅटोच्या पानांनी मान टाकली होती. आज त्याचा एक मोठा वाढलेला टोमॅटो कम्युनिझमकडे वाटचाल करतो आहे. उद्यापर्यंत खाण्यायोग्य पिकेल बहुदा. हा पहा. दुसरा एक बालआकारातच वयात येताना दिसतोय. पण झाडाची तब्येत आता ठीक दिसत्ये. नवीन पानं फुटताना दिसत आहेत. पावसानंतर चार दिवस कडकडीत ऊन होतं, त्याचा झाडाला फायदा झाला असणार. शिवाय कुंडीतली वरवरची माती कोरडी दिसल्यावर थोडंथोडं पाणी घातलं. आता पावसापासून थोडं लांब ठेवलंय झाड.
हा पेराएवढा व्यास असणारा 'बालवीर'.
माझ्या रडगाण्यांमध्ये वांग्याची फळं अजूनही धरत नाहीयेत. भोपळ्या मिरचीनेही टोमॅटोच्या ऐवजी वांग्याचा रस्ता पकडून फुलंच गाळायचं ठरवलं आहे; काल कुंडीत एक फूल सापडलं. आता संशय असा आहे की सध्या टेक्सासच्या वाळवंटात अंमळ पावसाळी हवा सातत्याने असल्यामुळे परागीकरण नीट होत नाहीये. फुलांमध्ये ब्रश फिरवूनही फायदा झालेला नाहीये. त्यातल्या त्यात आनंद असा की मिरची आणि वांगं दोन्ही झाडांच्या तब्येती टुणटुणीत आहेत आणि त्या दोन्ही झाडांना चिक्कार कळ्या अजूनही आहेत, येत आहेत, इ.
आज पहिल्यांदाच बेझिलची काही पानं खुडली, साधारण पेरभर आकार असणारी १०-१५ पानं आहेत. ऊन कमी असल्यामुळे वाढ कमी होत्ये असं वाटतंय. पण पावसाळी हवा अळूला जोरदार मानवल्ये. एका अळकुडीला चार पानं आल्येत, त्यातली शेवटी आलेली दोन बऱ्यापैकी मोठीही झाल्येत. पंधरा दिवसांनी दोघांपुरती अळूची भाजी करता येईल असं वाटतंय.
* कोणत्यातरी भाषेत, बोलीत मराठीतल्या शब्दाचा अर्थ वेगळाच होतो म्हणून मी तो शब्द सोडणार नाही. लंडन, फिनलंड वगैरे शब्दांवर मराठी विनोद करणं मला बालिश वाटतं. किंवा हा माझा मोठं होण्याचा क्षीण प्रयत्न म्हणा!
सुंदर टोमॅटो! महिनाभर कच्चा
सुंदर टोमॅटो! महिनाभर कच्चा राहिलेला टोमॅटो नाही नाही म्हणता दोन-तीन दिवसात कसा लाल बुंद होतो हे पाहणे बागकामातला मोठा आनंद आहे.
मला अळूचे कंद पेरायचे आहेत, सारखी विसरतेय. कधी वाटतं, आमच्या ऑफिससमोर खूप फोफावतो, तोच नियमितपणे घरी न्यावा, उगाच घरच्या बागेत गर्दी कशाला? पण एकदा लावून बघायचा आहे.
वांगी:-या झाडासाठी सर्व फुलं
वांगी:-या झाडासाठी सर्व फुलं हाताने तोडून टाकत राहा,अर्धा किलो तरी शेणखत बुंध्याभोवती मातीत पसरवून तीनचार दिवसांनी पाणी देत राहा.एक महिन्याने झाड गुटगुटित दिसायला लागले की येणाय्रा फुलांस भरदार फळं येतील. फुढच्या वेळेस एक महिन्याची रोपे उपटून एकेक फुटावर खड्डा करून तळाशी शेणखत घालून त्यावर लावा,कमीतकमी तीन झाडे हवीत.वांगी,टोमॅटो,ढोबळी आणि साधी मिरची साठी हीच पद्धत.