Skip to main content

बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - ३

मागच्या धाग्यात शंभरपेक्षा अधिक प्रतिसाद आल्याने पुढील धागा सुरु केला आहे.

या वर्षी बागकाम सुरू करून साधारण दीड महिना उलटून गेला आहे. गेल्या वर्षीचं वाचवलेलं वांग्याचं झाड भरभरून कळ्या आणि फुलं देतंय. तीन फुलं गळून गेली, आत्ता एकूण चार फुलं आहेत. फळाची वाट बघण्याला पर्याय आहे का? ही फुलं -

'बिग बॉय' टोमॅटोलाही फळ धरलंय. (अर्ली गर्लच्या शेजारी ठेवल्यामुळे वाण नाही पण गुण लागला का?)

आणि या भोपळ्या मिरचीच्या छोट्या कळ्या -

प्रश्न क्र १ - वांग्याची फुलं झडण्यावर काही उपाय आहे का?
प्रश्न क्र २ - टोमॅटो, वांगं या झाडांमध्ये लैंगिक पुनरुत्पादन फसलंय किंवा त्याचा फायदा मिळत नाही असं म्हणता येईल का?

चिमणराव Fri, 01/05/2015 - 05:04

वांगी:-या झाडासाठी सर्व फुलं हाताने तोडून टाकत राहा,अर्धा किलो तरी शेणखत बुंध्याभोवती मातीत पसरवून तीनचार दिवसांनी पाणी देत राहा.एक महिन्याने झाड गुटगुटित दिसायला लागले की येणाय्रा फुलांस भरदार फळं येतील. फुढच्या वेळेस एक महिन्याची रोपे उपटून एकेक फुटावर खड्डा करून तळाशी शेणखत घालून त्यावर लावा,कमीतकमी तीन झाडे हवीत.वांगी,टोमॅटो,ढोबळी आणि साधी मिरची साठी हीच पद्धत.

पिवळा डांबिस Fri, 01/05/2015 - 10:03

'बिग बॉय' टोमॅटोलाही फळ धरलंय. (अर्ली गर्लच्या शेजारी ठेवल्यामुळे वाण नाही पण गुण लागला का?)

फळ धरलांय का नक्की? नायतर हायड्रोसिल आसंन. अर्ली गर्ल्ने हात सुदा लावून दिला नशिल तेच्यामुले... :)

आमी आमच्या नाजुक चेरी टोमॅटोच्या बाजूला दोन रांगडे बीफस्टेक टोमेटो लावले होते....
होऊं जाउं द्या थ्रीसम!
स्त्रीमुक्तीवादीच आमी; आसां साक्षात अदितीचां मानां सर्टिफिकिट हाय!! :)
आता चेरी टोमॅटोक फळां लागली हायंत. पन ती नक्की कोनच्या बीफस्टेकची तां काय ठांवा नाय!!!!
वीकेन्डला फोटो टाकतांव.

स्त्रीमुक्तीचा विजय असो!!!!!
इचिभनं, आजकाल कुनाचा जल्ला काय साला भरोसाच नाय!!!!
-पिवला भोईर
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/05/2015 - 18:36

In reply to by पिवळा डांबिस

पिवला काका, ते टमाटूचा सगला शेल्फ-कंटेन्ड आसतं. आपनंच पोलन आनि आपनंच काय ते. वांग्याचापन.

टमाटूची फुलां तोंड वर करून आसतात, वांग्याची खाली घालून. वांग्याला उर्ध्वरेतन जमत नसेल काय? ही योगिक पावर कशी आणायची?

पिवळा डांबिस Fri, 01/05/2015 - 18:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पिवला काका, ते टमाटूचा सगला शेल्फ-कंटेन्ड आसतं. आपनंच पोलन आनि आपनंच काय ते. वांग्याचापन.

आसां असतान व्हय? जल्ला मग मी वगीच काल्जी करांन र्‍हायला डोकरा!!!
:)

पिवळा डांबिस Fri, 01/05/2015 - 20:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वांग्याला उर्ध्वरेतन जमत नसेल काय? ही योगिक पावर कशी आणायची?

डोन्नो, नायदर डू आय वॉन्ट टू नो! हे असले छंद असलेले तुझे ऐसीवरचे काका ते वेगळे!!! ;)

"चुकलीस गल्ली, मी नच तो खट
काका ऐसी वरचा |
डांबिस, पिवळा, मस्तवाल मी
बोका काकी घरचा ||"
=))

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/05/2015 - 21:34

In reply to by पिवळा डांबिस

_/\_

(तुम्ही ज्यांच्या घरात राहता त्या) काकींनाही नमस्कार कळवा. (ते वेगळे काका राहतात त्या घरातल्या काकी नव्हेत.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 02/05/2015 - 03:35

काका उर्ध्वरेतनाबद्दल काही सांगत नाहीत त्यामुळे मलाच काहीतरी कष्ट करावे लागणार याची खूणगाठ मी मनाशी धरली. ते पुंकेसर वरच्या दिशेला जावेत म्हणून शेवटी मीच हो कष्ट केले. आता बघूया फुलाचं पोट फुलतंय का ते!

सध्या दिसणाऱ्या कळ्या मात्र वरच्या दिशेला बोटं दाखवत आहेत.

सानिया Sat, 02/05/2015 - 05:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

http://www.gardeningknowhow.com/edible/vegetables/eggplant/what-to-do-f…

Eggplant Flower Hand Pollination

If you suspect your eggplant flowers fall off due to a lack off pollination, then you can use hand pollination. Eggplant flower hand pollination is easy to do. All you need to do is take a small, clean paintbrush and move this around the inside of the eggplant flower.

'न'वी बाजू Sat, 02/05/2015 - 05:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी काही म्हणा, पण ते फुलांचे फोटो इतक्या झूम/क्लोज़पमध्ये खरोखरच अश्लील दिसतात.

आता बघूया फुलाचं पोट फुलतंय का ते!

(अवांतर:) यावरून, शालेय वयात ब्ल्याकअँडव्हाइट दूरदर्शनच्या दिवसांत कधीतरी दूरदर्शनवर पाहिलेल्या निळू फुलेच्या कोठल्याशा चित्रपटातला - तो चित्रपट कोठला, ते आता आठवत नाही, पण - निळू फुलेचा "छबूचं प्वोट कोनी फुगवलं?" हा अजरामर 'डायलॉग' आठवला.

(स्पॉयलर अलर्ट>वास्तविक, छबू या शाळकरी मुलीचे पोट निळू फुलेच्या पात्रानेच फुगवलेले असते, पण हा 'डायलॉग' मारून शाळेतल्या मास्तरला हा आळ आपल्या डोक्यावर घ्यायला लावून छबूशी लग्न करायला तो भाग पाडतो, असे अंधुकसे आठवते.</स्पॉयलर अलर्ट>)

कोणाला आठवतोय का कोठला पिच्चर ते?

पिवळा डांबिस Sat, 02/05/2015 - 12:18

आधी प्रॉमिस केल्याप्रमाणे हे अजून काही फोटो....
हा बहरलेला यलो जास्मिन...
IMG_0152
ही रातराणी...
IMG_0140
हा खरा गुलाबी गुलाब. हा अतिशय नाजूक आहे. जरा फुलं आली की त्याच्या फांद्यांना ते वजन सहन होत नाही, लगेच खाली वाकतात. सुवास आपल्या गावठी गुलाबाचा...
IMG_0120
हे रोझमेरीचं बुश. गेल्या खेपेला आऊट ऑफ फोकस आलं होतं म्हणुन पुन्हा देतोय...
IMG_0173
हे ओरॅगनो, पास्टा-पिझ्झ्यात घालायला..
IMG_0160
हे ब्लू आयरिस..
IMG_0143
हा जापनीज मेपल ट्री..
IMG_0151
हे एक फ्रंट आयलंड. पूर्वी इथे फक्त लहानमोठे दगड्-धोंडे होते, अजूनही आहेत. त्या दगडांना हिरवाई फोडायचा माझा एक प्रयत्न...
IMG_0115
माझ्या बागेची रक्षणदेवता! :)
IMG_0116
आता भाजीपाल्याविषयी. पूर्वी लहान प्लास्टिक कंटेनरमध्ये पेरलेल्या बियांना रोपं आल्यानंतर आता ती रोपं वाफ्यांमध्ये ट्रान्सप्लांन्ट केली आहेत.
या वाफ्यात काकडी, इंडियन कारली आणि स्क्वॉश आहेत...
IMG_0171
माझी आधी लावलेली काकड्याची काही रोपं किड्यांनी खाऊन टाकली. :(
आता नवीन बॅच तयार होतेय...
IMG_0161
ही पूर्वी ट्रान्सप्लांट केलेली मिरच्यांची रोपं...
IMG_0162
गंमत म्हणजे या मिरच्यांच्या जागी गेल्या वर्षी टोमॅटो लावले होते. त्या वर्षीच्या बियांची ही दोन चुकार रोपं यावर्षी रुजून वाढताहेत...
IMG_0163
हे आमचे यावर्षीचे टोमॅटो. उजवीकडचे दोन ते रांगडे बीफस्टेक टोमॅटो आणि डावीकडची ती नाजूक चेरी टोमॅटो.
IMG_0166
अदिती काही म्हणो सेल्फ पॉलिनेशनबद्दल, पण आमच्या चेरीला छोटी बाळं सुद्धा होताहेत... :)
IMG_0169
हा अजून एक वाफा. इथे ही चवळी लावलेली आहे..
IMG_0175
त्याच वाफ्यात ही मेथी नुकतीच पेरलेली, जस्ट उगवते आहे...
IMG_0176
आणि त्याच वाफ्यात ही दोन वांग्याची रोपं. ही अजून जोम धरत नाहियेत, आणि किडे त्यांची पानं कुरतडताहेत! :(
IMG_0177
ती अदिती जे अळू-अळू करून गाणं गात असते ते ह्ये? :)
IMG_0141
अ‍ॅन्ड नाऊ फॉर द ग्रॅन्ड फिनाली...
ही कलिंगडाची रोपं. चांगली जगली आहेत. ही खूप पसरतात म्हणून वेगळी मोकळ्या जमिनीवर लावली आहेत. अजून एका रोपासाठी जागा आहे. तिथे एक हनिड्यू मेलन लावीन असं म्हणतो...
IMG_0170
असो. तर मंडळी आत्ता इतकंच गोड मानून घ्या...
फळझाडांना आत्ताशी फुलं-पानं येत आहेत. जरा थोडी फळं धरली म्हणजे मग त्यांचे फोटो टाकीन.
तोवर पाणी-खतं देणे आणि फवारणे हा कार्यक्रम जारी आहे...

ऋषिकेश Mon, 04/05/2015 - 09:44

In reply to by अंतराआनंद

तेच ना!
आमची नुकतीच झालेली राख पूर्वेला फुंकून द्या.. (होपफुल्ली पोचेल आम्रिकेच्या पश्चिम टोकाला) असे विलमध्ये लिहून ठेवतोय!

==

बाकी मोठ्या वृक्षांची निगा कशी राखता? फवारणी वगैरे करावी लागते? का ते सेल्फ सस्टेनिंग आहेत?

रुची Mon, 04/05/2015 - 22:31

In reply to by पिवळा डांबिस

जाऊदे झालं, सारखं सारखं जळफळाट झाला काय म्हणायचं! :-) तुमच्याकडे असलेल्या जागेला आणि हवामानाला तुम्ही न्याय देताय ते पाहून मनापासून फार समाधान वाटलं. बागकामप्रेमीला अशी बाग मिळायला हवी आणि बागेला असा बागकामप्रेमी मिळायला हवा.
तुमच्या मेयर लिंबाच्या झाडाचा फोटो कुठाय? त्याची पानेही हिवाळ्यात गळतात का हो? मागच्या महिन्यात माझ्या नवर्याच्या डोक्यात, घरात ठेवायला लिंबाची झाडे बियांपासून करण्याचं खूळ आलं होतं म्हणून त्याने एका कुंडीत बिया पेरल्या होत्या. महिनाभरात काही झालं नाही म्हणून परवा कुंडी रिकामी करायला गेले तर सात-आठ लिंबाची रोपे इंचभर उगवून आली आहेत! त्या बिया त्यांच्या वेळाप्रत्रकाप्रमाणेच उगवून येत असाव्यात.

रोचना Tue, 05/05/2015 - 10:51

In reply to by रुची

बागकामप्रेमीला अशी बाग मिळायला हवी आणि बागेला असा बागकामप्रेमी मिळायला हवा

.
अगदी बरोबर.

भली मोठी लॉन न करता एवढ्या सगळ्या भाज्या, फुलं आणि झाडं लावलेली पाहून खरंच छान वाटतं. समोरील छोटेशे रॉक गार्डन ही खूप आवडले. कधी घर बांधलं तर गेटशेजारी मधूमालती लावून कमान करायची खूप इच्छा आहे. बर्कलीत Mrs. Dalloway's म्हणून बागकामाला वाहिलेलं एक सुंदर पुस्तकांचं दुकान होतं. ("Mrs Dalloway said she would buy the flowers herself.." असं पाटीवर लिहीलं होतं!) तुम्ही कधी बे एरीयात गेलात तर अवश्य भेट द्या. मी शेजारहून कॉफी घेऊन तासंतास तिथे पुस्तकं चाळत बसायचे. Food, Not Lawns नावाचं मस्त पुस्तक तिथे वाचल्याचं आठवतं.

पण तिथे पाण्याची काय परिस्थिती आहे? अवर्षणामुळे पाणीवापरावर बरीच बंधनं आली आहेत, ना? दक्षिण कॅलिफोर्निया म्हणजे ऊन ही पुष्कळ असेल आता.

पिवळा डांबिस Tue, 05/05/2015 - 21:51

In reply to by रोचना

पण तिथे पाण्याची काय परिस्थिती आहे? अवर्षणामुळे पाणीवापरावर बरीच बंधनं आली आहेत, ना?

हे दुष्काळाचं ४थं वर्ष चालू आहे, म्हणुन यावर्षी प्रथमच २५% पाणीकपात जाहीर केलेली आहे.
म्हणूनच मी सुद्धा ग्राउंड कव्हर्स आणि अ‍ॅन्युअल्सचा पाणीपुरवठा तोडला आहे. फक्त भाजीपाला आणि पेरेनियल्सना होजने पाणी घालतो, स्प्रिंकलर सिस्टम बंद केली आहे....

दक्षिण कॅलिफोर्निया म्हणजे ऊन ही पुष्कळ असेल आता.

आमच्याकडे ऊन नेहमीच भरपूर. पण एलए किंवा व्हॅलीसारखं खूप गरम होत नाही. आमचं गाव हे डोंगरांमध्ये वसलेलं आहे. माझं घरही डोंगरउतारावरच आहे. शिवाय पॅसिफिक जवळ आहे (~१० मैलांवर) त्यामुळे ब्रीझ नेहमीच सुरू असते.
किंबहुना "सनी, क्लियर, ७५ +- १५ डिग्री आणि लाईट ब्रीझ" हे आमचं बहुतेक वर्षभराचं हवामान असतं. गावात झाडंही खूप आहेत त्यामुळेही गारवा रहातो....

रोचना Tue, 05/05/2015 - 23:11

In reply to by पिवळा डांबिस

किंबहुना "सनी, क्लियर, ७५ +- १५ डिग्री आणि लाईट ब्रीझ" हे आमचं बहुतेक वर्षभराचं हवामान असतं. गावात झाडंही खूप आहेत त्यामुळेही गारवा रहातो....

रुची पुन्हा जळून राख होणार आहे हे वाचून...

रोचना Tue, 05/05/2015 - 10:56

In reply to by रुची

बिया पेरून वाढलेल्या झाडाला लिंबं यायला किमान ४-५ वर्षं लागतील असे इथे काहीजण म्हणाले. कलम करून लावलेल्या रोपाला १-२ वर्षातच येऊ शकतं. आमचं बियांपासूनचंच आहे, दीडच वर्षं झालंय.

ऋता Tue, 05/05/2015 - 08:28

In reply to by पिवळा डांबिस

यलो जास्मिनच्या फुलांचा जवळून फोटो बघायला आवडेल.
ज्या चवळीची उसळ करतो ते पेरलं का ? चवळी म्हणून एक पालेभाजी थोडी वेगळी दिसते या रोपांपेक्षा अस वाटतं.
सगळी बाग सुंदर ठेवली आहे. फोटो आवडले.

रोचना Tue, 05/05/2015 - 10:54

In reply to by ऋता

हे माहित नव्हतं!! दोन्ही बिया वेगळ्या दिसतात का? गेल्या वर्षी मी दुकानात उसळीसाठी वापरतो तशी चवळी वाण्याकडून आणून लावली होती. खूप पानं आली पण एकही फूल नाही. मग तशीच वेल खुडून पालेभाजी करून खाल्ली. त्यावर जुन्या धाग्यात बरीच चर्चाही झाली होती.

ऋता Tue, 05/05/2015 - 11:20

In reply to by रोचना

चवळी पालेभाजी मी पाहिली आहे ती अशी दिसते:

(फोटो आंतरजालावरून)
वर पिवळा डांबिसच्या फोटोत आहे ती वेगळी वाटली...त्यामुळे शंका आली.

पिवळा डांबिस Tue, 05/05/2015 - 21:52

In reply to by ऋता

पुण्या-नाशकाकडे जी चवळीची म्हणून पालेभाजी मिळते ती ही नव्हे.
मी लावलेली चवळी ही दाण्यांपासूनची (ब्लॅक आय पीज) आहे.

पिवळा डांबिस Wed, 06/05/2015 - 08:54

In reply to by ऋता

मलाही हे आधी माहिती नव्हतं....
जेंव्हा बिया पेरल्या आणि त्यांना पानं आली तेंव्हाच माहिती झालं!!!
:)

पिवळा डांबिस Tue, 05/05/2015 - 01:53

अंतराआनंदः अहो आपण एखादी गोष्ट अर्पण केल्यावर 'जरा गोड मानून घ्या' असंच म्हणतो ना! :)
अदिती: च्यायला अजून पुरेशी पानं नाय आली त्या कलिगडाच्या वेलाला तर ही कलिंगडं मागतेय! जरा त्याला वाढू दे की अजून!! :)
ॠषिकेशः

आमची नुकतीच झालेली राख पूर्वेला फुंकून द्या.. (होपफुल्ली पोचेल आम्रिकेच्या पश्चिम टोकाला)

अरे अगदी "पृथिव्यै समुद्रपर्यंतायां एक राख इति?" :)

मोठ्या वृक्षांची निगा कशी राखता? फवारणी वगैरे करावी लागते? का ते सेल्फ सस्टेनिंग आहेत?

मोठे होईपर्यंत पहिले ५-६ वर्षे खूप काळजी घ्यायला लागते. एकदा मोठे झाले की मग त्यांची मुळं खोलवर जातात. मग बागेच्या इतर स्प्रिंक्लर सिस्टमने दिलेलंच पाणी ते पितात.
मी मोठया झाडांना वर्षातून ३ वेळा खत घालतो. दोनदा त्यांच्या मुळांशी मल्च पसरतो. फळझाडं आटोक्याच्या उंचीत ठेवली आहेत. त्यांवर जर कधी कीड वगैरे पडली तर (शिडीवर चढून) त्यांच्यावर फवारणी करतो. :) आम्रिकेत आल्यापासून कधी बापजन्मी केली नसती असली स्किल्स अ‍ॅक्वायर केली आहेत!!
बाकी ते पाईन वगैरे अनेक मजली उंचीचे आहेत त्यांवर काही स्प्रे करता येत नाही...
४-५ वर्षांतून एकदा सर्व्हिस बोलावून सगळी मोठी झाडं ट्रिम आणि थिन करून घेतो....
शुचि: हां, ती फार चमकदार व्हरायटी आहे. माझ्याकडे निळीच पण चमकदार नसलेली व्हरायटीही आहे. तिला चमक नसली तरी तिच्या फुलांना निळ्या रंगाची एक दुर्मिळ शेड येते म्हणून जोपासली अहे. पण सध्या त्या आयरिसला एकही कळी/ फूल नाही, तिचं सायकल थोडं उशीराचं आहे. फूल आलं की फोटो टाकीन...
रुची:

बागकामप्रेमीला अशी बाग मिळायला हवी आणि बागेला असा बागकामप्रेमी मिळायला हवा.

मेणी मेणी ठॅन्क्यू!!!! :)

तुमच्या मेयर लिंबाच्या झाडाचा फोटो कुठाय? त्याची पानेही हिवाळ्यात गळतात का हो?

फळझाडांचे फोटो तिसर्‍या आणि शेवटच्या हप्त्यात! आत्ता फक्त भाजीपाला!! ("काकू, बॅन्ड संध्याकाळी, आता फक्त सनई-चौघडा!!" संदर्भः नारायण) :)
फळझाडांना आत्ताशी फुलं/पानं येतायत.
माझ्या मेयर लिंबाची पानं गळतात आणि नवीनही येतात. पण ही क्रिया वर्षभर चालू असते. जुनी पानं गळून नवी पानं येत रहातात त्यामुळे फॉलसारखं नुसतं काटक्याचं झाड कधी होत नाही.

ऋषिकेश Tue, 05/05/2015 - 11:06

In reply to by पिवळा डांबिस

बापरे.. काय मेहनत घेता राव तुम्ही!
जेव्हा तुम्हाला भेटेन तेव्हा आधी एक शि.सा.न. घाल्णारे! :)

पिवळा डांबिस Tue, 05/05/2015 - 21:32

In reply to by ऋषिकेश

बापरे.. काय मेहनत घेता राव तुम्ही!

आता तूच पघ म्हंजी झालं! अंग निस्त ठनकून र्‍हायलंय!!
आनि थितं तो सुक्काळिचा मनोबा आमाला लिवत नाय म्हनूनशान आळशी म्हन्तोय गब्बरच्या त्या धाग्यावर!
आता तेच्यासारकं निस्तं चावीबोर्डावर टिपटिप करत बसलुं म्यां तर हातात खुरपं कोन धरील, त्यो मनोबा?
आता तू हितला काय यवडा मोठा याडमिन हायेस तर जरा दे की समज त्येला, की बाबा, काकाला चिखलात नाचू दे,उगाच त्याला चावू नको म्हनून!!!
:)

ऋषिकेश Wed, 06/05/2015 - 08:59

In reply to by पिवळा डांबिस

काकाला चिखलात नाचू दे,उगाच त्याला चावू नको म्हनून!!!

=)) _/\_

आता तू हितला काय यवडा मोठा याडमिन हायेस तर जरा दे की समज त्येला,

अवो आमी धाकले याडमिन. तुमच्या बगलेतच हायेत की सगळे मोठमोठाले याडमिन! :P
आणि याडमिननं समजावून हिथं कोन आयकेल असे वाट्टे हो तुमास्नी? ;)

राजेश घासकडवी Tue, 12/05/2015 - 10:28

In reply to by पिवळा डांबिस

जरा दे की समज त्येला, की बाबा, काकाला चिखलात नाचू दे,उगाच त्याला चावू नको म्हनून!!!

तुमच्या चिखलातल्या नाचाच्या शोचं वेळापत्रक टाका की हो, ऐसीच्या 'आगामी कार्यक्रम आणि उत्स्फूर्त कट्ट्यां'त! बघा केवढी गर्दी होते, आणि कसला दौलतजादा होतो ते. ऐसीवरच्या अॅडमिनबाई असा दौलतजादा करायला नेहमीच तयार असतात. आणि सध्या मी दौलतजादेच्छुक स्त्रियांसाठी पुरुष पुरवण्याचा धंदा सुरू करायचा म्हणतोय. (अधिक माहितीसाठी जरा योग्य त्या खरडवह्या उपसा.) तेव्हा करू काहीतरी सेटिंग.

नंदन Wed, 06/05/2015 - 01:56

In reply to by पिवळा डांबिस

फळझाडांचे फोटो तिसर्‍या आणि शेवटच्या हप्त्यात! आत्ता फक्त भाजीपाला!! ("काकू, बॅन्ड संध्याकाळी, आता फक्त सनई-चौघडा!!" संदर्भः नारायण) (स्माईल)

=)) =))

पिवळा डांबिस Wed, 06/05/2015 - 09:22

In reply to by नंदन

हो एक वशाड मेलो सगळां काय तां जाणून आसां! म्हणान उगीच नाय हो पोट धरधरांन हसतांसा!!!!!
नानाची टांग तेच्या!!!!
:)

मनीषा Wed, 06/05/2015 - 07:40

हा धागा नेहमीच वाचते आणि फोटो बघत असते.

बरीच नविन माहीती कळते, आणि त्याचा वापरही करता येतो.

मी आमच्या बाल्कनीत थोडीफार रोपे ठेवली आहेत.

उपयोगी अशी पुदीना, क्ढीपत्ता, मिरची, आणि कोथिंबीर लावली होती.
पुदीना, कढीपत्ता चांगले वाढलेत. कोथिंबीर थोडीफार आली, मिरची अजिबातच नाही (परत प्रयत्न करणार आहे)
मोगर्‍याला पण दोन फुले आलेली दिसतायत.

आणि बाकीची शोभेची छानच राहीली आहेत. त्याचे विशेष काही करावे लागत नाही.
एक केशरी फुलांचे (नाव लक्षात नाही) होते. एक दोन फुले आली. नंतर बहुदा ते पक्षांच्या कामी आले असावे. :(
इथे लहानसे , पिवळ्या रंगाचे पक्षी येतात. त्यांनी इथे घारटे केले आहे. सध्या तिथे एक पिल्लू आहे. आणि दिवसभर मोठ्यांची ये जा चालू असते. .

ऋता Wed, 06/05/2015 - 08:54

In reply to by मनीषा

तुम्हीही फोटो टाका...अवडतील पहायला. माझ्याकडे पहिल्यांदाच पुदिना एका कुंडीत वाढतोय. कोथिंबीरीची दोन बारकी रोपे कोणत्याही क्षणी मलूल होतील अशी दिसतात.

पर्पल रंप्ड सनबर्ड (शिंजीर ?)चे घरटे असू शकेल. त्यांची चोच वक्राकार असते आणि घरटे लोंबते उभ्या आकाराचे, पाऊच सारखे दिसते.

मनीषा Thu, 07/05/2015 - 08:00

In reply to by ऋता

बरोबर आहे तुझं ॠता. ते सनबर्डसच आहेत . (घरच्या पक्षी तज्ञाला विचारून खात्री करून घेतली :) )
मागच्या वेळेस घरटे खाली लोंबत असलेले होते. या वेळी दोन्ही बाजू फांदीला अडाकवलेल्या सारख्या दिसतायत. आणि आकार, - बेल्ट ला पाऊच लावल्याप्रमाणे. किंवा केन ची चेअर मिळते ना , स्टँडला अडकवलेली -- तसा
त्याचेही फोटो काढीनच.

पिवळा डांबिस Wed, 06/05/2015 - 09:11

In reply to by मनीषा

हा धागा नेहमीच वाचते आणि फोटो बघत असते.
बरीच नविन माहीती कळते, आणि त्याचा वापरही करता येतो.

वर ऋताने म्हंटल्याप्रमाणे तुमच्या रोपांचे फोटो टाका...
फोटो कसे टाकायचे हे माहिती नसल्यास अदितीचं डोकं खा!!!!
:)

मी आमच्या बाल्कनीत थोडीफार रोपे ठेवली आहेत.
उपयोगी अशी पुदीना, क्ढीपत्ता, मिरची, आणि कोथिंबीर लावली होती.
पुदीना, कढीपत्ता चांगले वाढलेत. कोथिंबीर थोडीफार आली, मिरची अजिबातच नाही (परत प्रयत्न करणार आहे)

पुदिना राक्षसारखा झपाट्याने वाढतो. कोथिंबीर खारी वगैरे खात आहेत का ते पहा...
कढीपत्ता कसा वाढवायचा ते कळल्यास आम्हालाही कळवा!!! :)
मिरची जर उष्ण हवामान असेल तर काहीही न करता चांगली वाढते..

मोगर्‍याला पण दोन फुले आलेली दिसतायत.

नुसतंच काय सांगताय, फोटो टाका की!!!!

-----------------------------------------
जुना बरा हा इथे, दिवा पारवा पार्‍याचा
आणि मोकळ्या नळाची, शिरि धार मुखी ऋचा

ऋषिकेश Wed, 06/05/2015 - 09:25

In reply to by पिवळा डांबिस

मिरची जर उष्ण हवामान असेल तर काहीही न करता चांगली वाढते..

असेल बॉ!
एक निरीक्षण असे की आपण बागकामाचे धागे काढल्यापासून माझ्यासकट किमान ४ जणांनी मिरच्यांचा प्रयोग केलाय आणि मिरच्या आलेल्या नाहीत.
भारतात ऐसीवरील 'सुनील' हे एकच व्यक्ती मला ठाऊक आहेत ज्यांना भरपूर मिरच्यांचे पिक घेता आले आहे.

असे का असावे?

पिवळा डांबिस Wed, 06/05/2015 - 11:00

In reply to by ऋषिकेश

रागावू नकोस रे, थोडी थट्टा केली...
बाकी पुढ्ला बागकामावरचा धागा आपण असा काढूया की प्रत्येकाने आपण बागकामाला सुरवात कशी केली ते अनुभव कथन करायचे...
मग तुला कळेल की थोरथोर लोकांचीही कशी गंमत होत होती ते!!
मी माझा अनुभव कथन करायला जरूर तयार आहे!!!!
कशी आहे कल्पना?
:)

पिवळा डांबिस Wed, 06/05/2015 - 11:15

In reply to by ऋषिकेश

बाकी कल्पना फस्क्लास! वाट पाहतोय त्या धाग्याची

मी सांगितलं आहेच की मी तयार आहे...
आता बाकीच्या तायां-मावश्यांना तयार करायची जबाबदारी तुझी!!! :)

मनीषा Thu, 07/05/2015 - 07:23

In reply to by पिवळा डांबिस

वेलकम सठी धन्यवाद!

फोटो नक्कीच काढीन आणि ( ऐसीवर दाखवणेबल असतील तर) इथे चिकटविन . आधी काढलेले आहेत, पण तेव्हा ती बाळं फारच लहान होती.

तुम्ही म्हणल्याप्रमाणे, पुदीना खूप पसरतो आहे . पण त्याला नियमित पाणी दिले नाही तर पाने लगेच सुकलेली दिसतात.

कढीपत्त्याचे मी रोप आणले होते. सुरवातीला त्याच्या सगळ्या फांद्या , पाने गळाली आणि नुसतीच काडी राहीली. पण काही काळानंतर आता परत नविन पालवी आली आहे. आणि रोपाने चांगलेच बाळसे धरले आहे.
मी घरातील बहुतेक ओला कचरा ( भाज्यांची देठे, चहाचा चोथा वगैरे) या सगळ्या कुंड्यांमधे जिरवते. (बहुदा) त्यामुळे अजूनतरी रासायनिक खते वापरावी लागलेली नाहीत.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/05/2015 - 18:56

In reply to by मनीषा

आपणच म्हणायचे गं दाखवणेबल. मी तर मान टाकलेल्या टोमॅटोंचेही फोटो टाकण्याच्या विचारात होते. त्यामुळे बहुतेक घाबरून टोमॅटोने मान धरली.

सानिया Fri, 08/05/2015 - 04:33

माझ्या ब्लूबेरीला नुकतीच पानं फुटायला लागली आहेत, पण शेंड्यांवर त्याआधीच अशी फुलं फुलली आहेत. आता खारींपासून त्याचा बचाव कसा करायचा या विवंचनेत मी आहे.

बेझीलही उगवते आहे. साध्या आणि चेरी टोमॅटोलाही २-३ फुलं आली आहेत. भोपळ्या मिरचीच्या रोपांना बहुतेक लवकरच फुलं येतील अशी चिन्ह आहेत. लाल माठ, फरसबी आणि लसणीची पातही उगवत आहे. पेरलेल्या अळूचे कांदे उकरून कोणीतरी पळवले आहेत. आतापर्यंतच जमेची बाजू म्हणजे घाबरून घरातच ठेवलेला स्ट्रॉबेरीची काही फळे चाखायला मिळाली.

आणि हो! गेल्या वर्षी ब्रेक घेतल्यानंतर यावर्षी परत डेकच्या खाली पक्ष्यांच्या जोडीने घरटे बांधले आहे.

पिवळा डांबिस Mon, 11/05/2015 - 21:48

In reply to by सानिया

सुरेख कळ्या आल्या आहेत ब्लूबेरीच्या! ब्लूबेरीजचा मस्त बहर येईल असं दिसतं आहे.
पण,

बेझीलही उगवते आहे. साध्या आणि चेरी टोमॅटोलाही २-३ फुलं आली आहेत. भोपळ्या मिरचीच्या रोपांना बहुतेक लवकरच फुलं येतील अशी चिन्ह आहेत. लाल माठ, फरसबी आणि लसणीची पातही उगवत आहे.

हे एव्हढं असतांना फक्त हा एकच फोटो टाकायचा म्हणजे सनी लिऑनच्या फक्त डोळ्यांचा क्लोज-अप फोटो टाकण्यापैकी खोडसाळपणा आहे!!!! :)
टाका की ते ही फोटो, इतकी कसली गुप्तता? :)

पुलंच्या ह्या वाक्यांची आठवण झाली, "काही लोक बाजारात लसूण आणायला निघाले तरी आपला हेतू कसा क्रांतिकारकांसारखा गुप्त ठेवतात. आम्ही सालं लसूण आणण्याच्या आधीच संध्याकाळी पिठलं-भात असल्याचा बेत जाहीर करून मोकळे!!!!" =))

सानिया Tue, 12/05/2015 - 01:11

In reply to by पिवळा डांबिस

गुप्तता कसली हो! हा आळस आहे. फोटो काढण्यासार्खी फुलं-फळं धरली की फोटो टाकते.

ऋषिकेश Fri, 08/05/2015 - 11:29

In reply to by अनुप ढेरे

हायब्रीड, जीएम वगैरे नसलेलं
पारंपारीक बद्धतीने बिया जतन करून काही वनस्पतींच्या जाती अजून टिकून आहेत. त्यांचं नैसर्गिक बियाणं

शिवाय या बियांपासून भाज्या आल्यावर त्यावर कोणतीही रासायनिक किटकनाशकं, युरीया किंवा कृत्रिम खतं वगैरे न वापरता (केवळ पारंपारिक उपाय, शेणखत वगैरे वापरायचं) पिक घेतलं की साधारणतः त्याला ऑर्गॅनिक शेती म्हणतात.

तसे पिक शरीराला अधिक चांगले असते व चवीही अधिक तीव्र असतात असे म्हणतात (आता मलाही चवी मिळतीच असे स्वप्न बघतोय :) )

ऋषिकेश Fri, 08/05/2015 - 11:39

In reply to by अनुप ढेरे

छ्या! 'पारंपारिक' पद्धतीने जतन केलेलं बियाणं वापरणं किती पुरोगामी आहे? असा छान खवचट प्रश्न येईल अशी अपेक्षा होती! ;) :P

रोचना Fri, 08/05/2015 - 21:36

In reply to by अनुप ढेरे

ऑरर्गॅनिक बियाणं हाय्ब्रिड अथवा जीएमओ तर नसतंच, पण ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेल्या झाडांच्या बिया असतात. किती पिढ्या ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवल्यावर बियाणं ऑर्गॅनिक ठरतं हे मात्र मला नीट कळत नाही. आजकाल सर्रास ऑर्गॅनिक बियाणं हे लेबल लावलं जातं खरं, पण बरेचदा "ओपन-पॉलिनेटेड" अभिप्रेत असतं, म्हणजे जे पारंपारिक पद्धतीने तयार झाले आहे (तयार केलेली हाय्ब्रिड प्रजाती नाही). याचा अर्थ या बियाणातून लागणार्‍या झाडाच्या बिया पुन्हा वापरता येतात. एरवी हायब्रिड बियाणं पहिल्या पिढीला जोमानं वाढतं, पण दुसर्‍या तिसर्‍याला नाही.
वर ऋषिकेशने सांगितलेल्या प्रकाराला "हेरलूम" किंवा "देशी" सुद्धा म्हणतात. या प्रजाती जुन्या असतात, ठराविक लक्षणं असतात, पण कमर्शियल शेतीत सहसा वापरली जात नाहीत.

पिवळा डांबिस Sat, 09/05/2015 - 10:03

In reply to by रोचना

ऑर्गनिक = नॉन जीएमो हे तितकसं खरं नव्हे!
ऑर्गनिक म्हणजे रासायनिक खतांचा, कीटक-बुरशीनाशकांचा वापर न करता वाढवलेलं! जीएमओ बीजदेखील अशा प्रकारे वाढवता येतं....
नॉन जीएमओ = एअर॑लूम
ज्याच्या फळांतल्या बियांपासून पिढ्यानपिढ्या पुढे पिकं काढता येतात ते बियाणं!
दिसायला भक्कास (पण काही लोकांच्या मते चवदार) असतं ते बियाणं!!!!

रोचना Sat, 09/05/2015 - 12:20

In reply to by पिवळा डांबिस

ऑर्गनिक = नॉन जीएमो हे तितकसं खरं नव्हे!
ऑर्गनिक म्हणजे रासायनिक खतांचा, कीटक-बुरशीनाशकांचा वापर न करता वाढवलेलं! जीएमओ बीजदेखील अशा प्रकारे वाढवता येतं....

थियरेटिकली हे बरोबर आहे, पण सध्या तरी अमेरिकेतल्या ऑर्गॅनिक नियमांप्रमाणे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन हवे असल्यास जी-एम-ओ बियाणं, पशुखाद्य वगैरे वापरण्यावर बंदी आहे. यावर वाद चालू आहेच, मात्र. अनेकांचे म्हणणे आहे की हायब्रिड बियाणं टाळून, ठराविक रोगांविरुद्ध सक्षम केलेल्या जी-एम बियाणांना रासायनिक खतं-औषधं न वापरता उगवली जावीत. पण जी-एम बियाणांच्या अन्य ज्ञात-अज्ञात परिणामांकडे बोट दाखवून ते देखील नको, ओपन-पॉलिनेटेड आणि एरलूम बियाणंच बरं अस विरोधकांचं म्हणणं आहे. (कॅलिफोर्नियातल्या प्रॉप ३७ वरच्या चर्चा तुम्हाला माहित असतीलच.)

नॉन जीएमओ = एअर॑लूम
ज्याच्या फळांतल्या बियांपासून पिढ्यानपिढ्या पुढे पिकं काढता येतात ते बियाणं!

एरलूम नॉन-जी-एम आणि नॉन हायब्रिड (म्हणजे, ओपेन-पॉलिनेटेड, नैसर्गिक पद्धतीने परागण होऊन तयार झालेले) असतात हे खरंय, पण सगळीच ओपेन-पॉलिनेटेड बियाणं एरलूम नसावीत. जुन्या, म्हणजे अनेकानेक पिढ्या जपलेल्या, काही खास लक्षणं असलेल्या, आणि सहसा बाजारात न मिळणार्‍या प्रजातींना एअरलूम म्हणतात अशी माझी समज आहे.

पण या सगळ्या लेबलांमधे गोंधळ होतो हे खरं.

अजो१२३ Fri, 08/05/2015 - 14:00

सोडून यावे लागले.
=====================================================================================================
२००४ ते २०११ अशी ८ वर्षे आम्ही नोयड्यात आणि गुरगावात ग्राउंड फ्लोअर वर राहिलो. आमच्या घरमालकांनी अगोदरच बरीच झाडे झुडपे, गमले आणि गवत लावून ठेवलेले. मला किंवा बायकोला बागकामात काही रस नव्हता पण आम्ही पाणी श्रद्धेने घालायचो. शेजारच्या घराच्या माळ्याकडून खत आणून घालायचो. त्यामुळे मालकांचे कोणते झाड वाळवण्याचे पातक आम्हाला लागले नाही.

हळूहळू कॉलनीतल्या बायका बायकांच्या इर्ष्येतून (असे माझे भाबडे मत) बायकोला आपल्याही घरी उत्तमोत्तम गमले असावेत असे वाटू लागले. मक्काय, नर्सर्‍यांतून जाऊन किंवा गमलेवाले सोसायटीत आले कि लगेच 'वेगळे' बघून गमले घ्यायचे. पूर्वीचे ३०-३५ आणि आम्ही नव्याने घेतलेले ३०-३५ असे चिकार गमले घरात झाले. उत्साहाने म्हणावे तर फक्त शेजार्‍यांकडून कडिपत्ता घेणे/चोरणे* टाळावे म्हणून मी कडीपत्ता लावलेला. बायकोने 'स्वतःची तुळस' लावलेली.

नंतर २००७ ला ईशान्य जन्मण्यापूर्वी (अर्थातच उत्साहात) हार्डवेअरच्या दुकानात जाऊन बाळाला झुलवायला एक पाळणा बनवायला सांगीतला. कैतरी कमुनिकेशन गॅप झालेला. ईशान्य आजोळून आल्यावर पाळणा आला तर तो ह्ह्हे भलादांडगा! त्याच्यावर तीन लोक आरामात बसू शकायचे. (आणि बहुतेक बाळ ठेवले तर पक्के खाली पडणार.) हॉलमधे २-३ जण त्याच्या हेलकाव्याने ठेचल्यावर त्याला लॉनमधे हलवण्यात आले. पाळणा फोटोत मागच्या बाजूला आहे. आम्ही त्याच्यावर बसून तासंतास टाईमपास करत असू, फोटो काढायचीही चिकार हौस, पण "लॉन" या प्रकाराची फोटो काढायची पात्रता आहे हा विचार मनात नाही आला तेव्हा. हा एकच फोटो मला तिथे काढलेला मिळाला आहे. तो ही कोपर्‍यातला आहे.


----------------------------------------------------------------------------------------------------------
आम्ही उत्तर दिल्लीत शिफ्ट झालो तेव्हा हे गमले (आमचे आमचे) न्यायचे नाहीत (घर दुसर्‍या मजल्यावर आहे.) असा निर्णय मी (अर्थातच एकट्याने) घेतला. मग त्यांच्याबद्दलची हळहळ आणि त्यांना परत आणायच्या मागण्या केल्या गेल्या. हळूहळू त्या विरल्या. पण अजूनही कधीकधी चुकुन माकून बाल्कनीत ठेवायला गमला घेताना 'ती गेली तेव्हा' टाइप वातावरण निर्माण होते.
--------------------------------------------------------
*पकडले गेल्यावर अजून थोडी करा असे होस्ट म्हणतो अशी चोरी.

अजो१२३ Fri, 08/05/2015 - 14:05

In reply to by अजो१२३

गमल्याला मराठीत कुंडी म्हणतात हे मला माहित आहे पण लातूर जिल्ह्यात, अ‍ॅट लिस्ट उदगीरकडे, कुंडीला कुंडी म्हणायला बॅन आहे. सुज्ञांनी समजून घ्यावे.

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 14:23

In reply to by अजो१२३

सुरुवातीला आमचे कन्नडिग नातलग झाडाची कुंडी, कुंडीतील लागवड, इ. बोलल्यावर का हसायचे ते कळायचं नाही, नंतर कळालं. =))

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 16:05

In reply to by अजो१२३

अर्र =)) =)) =))

"जास्ती नाटकं केलास तर तुझ्या कुंडीत रोपटे लावीन" वगैरे संवाद कल्पून हहहहहहहहहहहहहहपुवा झाली. =))

पिवळा डांबिस Sat, 09/05/2015 - 01:54

In reply to by अजो१२३

"होते मनोहर परि गमले उदास!" :)
घर बदलतांना झाडं पाठी सोडून यावी लागली की दु:ख्ख होतं.
आमच्या इथं जमिनीत लावलेली झाडं मागे सोडून यावी लागतात पण गमल्यांत लावलेली (कुंड्यांत लावलेली असं लिहायची आता काय बिशाद आमची!) झाडं आपल्याबरोबर घेऊन जाता येतात.

बाकी तुमचे चिरंजीव लई डॅशिंग दिसताहेत!! :)

अजो१२३ Sat, 09/05/2015 - 14:43

In reply to by पिवळा डांबिस

गम ले, हँसी दे असं पण कै गाणं/ शेर असावं.
=================================

बाकी तुमचे चिरंजीव लई डॅशिंग दिसताहेत!!

त्यात १००% योगदान क्ष क्रोमोझोमचं! आमच्यावर गेले असते तर नेभळट, शेळपट, इ इ दिसले असते. ;)

रुची Mon, 11/05/2015 - 21:32

इथला या वर्षीचा वसंत ऋतू इतर वर्षांच्या मानाने बराच लवकर सुरू झाला होता. आतापर्यंत बहुतेक झाडांना पानेही आली आणि चेरी, सफरचंद वगैरे फळझाडांना मोहोरही आले होते त्यामुळे आता थोडे बागेचे छान-छान फोटो काढून लावावे असा विचार होता. त्यातच काल बागेत फिरताना, मागल्या वर्षी लावलेला लॅव्हेंडर हिवाळा सोसून जिवंत राहिलेला दिसला, त्याला पालवी फुटलेली पाहिली आणि डोळ्यात आनंदाश्रू उभारले (आमच्याकडे सामान्यतः लॅव्हेंडर पेरिनियल नाही) मग निसर्गाच्या ममत्वावर विश्वास ठेऊन गार्डन सेंटरकडे धाव घेतली. अर्धांगाच्या (माफक) विरोधाला न जुमानता आणि त्याच्या धोक्याच्या सूचनेकडे पूर्ण दुर्लक्ष करून दोन गुलाबाची झाडे, दोन बेरीची रोपे आणि काही फुलांच्या कुंड्या..आपलं गमले विकत आणले. 'ब्लू आयरीस'ला स्थानापन्न करताना व्हॅन गोहच्या आवडत्या चित्राला स्मरून त्या 'आयरिस'साठी मुलीला गोड गाणी गायला लावली आणि मग रात्री नऊ वाजता बागेत आवराआवर करून घरात आले (आमच्याकडे आता साडे-नऊपर्यंत उजेड असतो) झोपण्याआधी हवामानाच्या अंदाजाकडे नजर टाकली आणि सगळं आलबेल असल्याने निर्धास्तपणे झोपी गेले. सकाळी साखरझोपेत असतानीम नवर्याने लाडीकपणे उठवत "प्रिये, दिवस उजाडला आता ऊठ आणि जरा बाहेर पहा" म्हणून फर्रकन पडदा उघडला तेंव्हाच काहीतरी चुकतंय याची कल्पना आली होती; बाहेर अर्थातच बर्फ कोसळत होता, चार इंच पाणीदार बर्फाखाली नुकतीच उमललेली झाडे चुपचाप उभी होती. माझ्या डोळ्यात उभे राहिलेले अश्रू (आज दु:खाचे!) लपवत गुमान कुंड्या घरात आणायला गेले. सुदैवाने हवा फार गार नाहीय आणि दुपारपर्यंत सगळा बर्फ वितळून जाईल पण नवीन झाडांचे काय होणार ते त्या निसर्गदेवतेलाच ठावूक!

रोचना Mon, 11/05/2015 - 21:57

In reply to by रुची

अग आई ग!!! लवकरच पुन्हा हवामान सुधारेल अशी नॉर्स देवांना प्रार्थना करते! मे महिन्यात बर्फ म्हणजे कहर आहे कहर.
इथे ७५% शेड नेट टाकूनही काही उपयोग नाही, भोपळ्याची फुलं करपलेलीच दिसतायत, आणि बहुतेक सगळीच भोपळी स्टॅसिस मधे आहेत. दोडका वाळला, मी म्हटलं जाऊ दे. पण काकडी जोम धरतेय, पडवळीच्या वेलीला थोडं एका भिंतीला लागून आधार दिला, आणि आता सकाळचे दोन-तीन तास थोडं ऊन कमी लागतं. पुन्हा जिवात जीव आलाय, आणि ४-६ छोट्या पडवळी लोंकळतायत.
भेंडीला छोटे पांढरे किडे लागले, काल आणि आज नुसते निंबाच्या पाण्याने सगळी धूवून काढली. एकीकडे थोडा मावा लागण्याची लक्षणं दिसली, त्या कळ्या छाटून टाकल्या. मेली मिर्ची फुलांचं नावच काढत नाहीये, आज ३ महिने होत आले.
इथे भयंकर उकाडा आहे, काही खरं नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/05/2015 - 22:04

In reply to by रोचना

मेली मिर्ची फुलांचं नावच काढत नाहीये, आज ३ महिने होत आले.
इथे भयंकर उकाडा आहे, काही खरं नाही.

आपल्या हवांची सरासरी झाली तर बरं होईल.

आमची मिर्ची नुस्तीच कळ्या आणि फुलं काढत्ये, फळांचा पत्ता नाही. इथे पाऊस आणि पावसाळी हवा फार माजल्ये. (आणि पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रांत जमीन नुस्ती भिजल्यासारखी होत्ये. बस.)

पिवळा डांबिस Mon, 11/05/2015 - 22:01

In reply to by रुची

अरेरे! च् च्!!
असं काही झालं म्हणजे खरंच खूप वाईट वाटतं!!
तुमच्या इथे स्नो आणि आणि आमच्या इथे सांन्ता अ‍ॅना विंडस, अगदी सत्यानाश करतात बागेचा....
:(

बिटकॉइनजी बाळा Mon, 11/05/2015 - 21:39

या धाग्याचे शीर्षक बागकामप्रेमी अनिवासी ऐसीकर असे असायला हवे. इकडे कुणीच कसे बागा करत नाहीत?

रोचना Mon, 11/05/2015 - 22:00

In reply to by बिटकॉइनजी बाळा

मी महाराष्ट्रनिवासी नाही, पण भारतात आहे - ऋषिकेश, ऋता, मनीषा आणि बहुदा अचरट(?) ही सगळी मंडळी सन्स ऑफ द सॉइल आहेत की!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/05/2015 - 07:14

In reply to by पिवळा डांबिस

:ड

तरी बरं तुम्हाला टेक्सासातला नैसर्गिक वायू आठवला नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/05/2015 - 22:01

रुचीचं रडगाणं ऐकून तिला दिलासा कसा द्यावा हे समजत नाही. तू तुझ्याकडून आत्तापुरती काळजी घेतली आहेस, आता अजून थोडी काळजी घे.

पंधरा दिवसांपूर्वी कुंड्यांमधल्या* पुरामुळे टोमॅटोच्या पानांनी मान टाकली होती. आज त्याचा एक मोठा वाढलेला टोमॅटो कम्युनिझमकडे वाटचाल करतो आहे. उद्यापर्यंत खाण्यायोग्य पिकेल बहुदा. हा पहा. दुसरा एक बालआकारातच वयात येताना दिसतोय. पण झाडाची तब्येत आता ठीक दिसत्ये. नवीन पानं फुटताना दिसत आहेत. पावसानंतर चार दिवस कडकडीत ऊन होतं, त्याचा झाडाला फायदा झाला असणार. शिवाय कुंडीतली वरवरची माती कोरडी दिसल्यावर थोडंथोडं पाणी घातलं. आता पावसापासून थोडं लांब ठेवलंय झाड.

हा पेराएवढा व्यास असणारा 'बालवीर'.

माझ्या रडगाण्यांमध्ये वांग्याची फळं अजूनही धरत नाहीयेत. भोपळ्या मिरचीनेही टोमॅटोच्या ऐवजी वांग्याचा रस्ता पकडून फुलंच गाळायचं ठरवलं आहे; काल कुंडीत एक फूल सापडलं. आता संशय असा आहे की सध्या टेक्सासच्या वाळवंटात अंमळ पावसाळी हवा सातत्याने असल्यामुळे परागीकरण नीट होत नाहीये. फुलांमध्ये ब्रश फिरवूनही फायदा झालेला नाहीये. त्यातल्या त्यात आनंद असा की मिरची आणि वांगं दोन्ही झाडांच्या तब्येती टुणटुणीत आहेत आणि त्या दोन्ही झाडांना चिक्कार कळ्या अजूनही आहेत, येत आहेत, इ.

आज पहिल्यांदाच बेझिलची काही पानं खुडली, साधारण पेरभर आकार असणारी १०-१५ पानं आहेत. ऊन कमी असल्यामुळे वाढ कमी होत्ये असं वाटतंय. पण पावसाळी हवा अळूला जोरदार मानवल्ये. एका अळकुडीला चार पानं आल्येत, त्यातली शेवटी आलेली दोन बऱ्यापैकी मोठीही झाल्येत. पंधरा दिवसांनी दोघांपुरती अळूची भाजी करता येईल असं वाटतंय.

* कोणत्यातरी भाषेत, बोलीत मराठीतल्या शब्दाचा अर्थ वेगळाच होतो म्हणून मी तो शब्द सोडणार नाही. लंडन, फिनलंड वगैरे शब्दांवर मराठी विनोद करणं मला बालिश वाटतं. किंवा हा माझा मोठं होण्याचा क्षीण प्रयत्न म्हणा!

पिवळा डांबिस Mon, 11/05/2015 - 22:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टमाटूबद्दल अभिनंदन, जोजोकाकू!!

खा, टमाटूची कोशिंबीर खा, अळवाचं फतफतं खा!
करा लेको चैन!!!!
:)

ऋषिकेश Tue, 12/05/2015 - 08:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहा!
एकुणच "टंबाटी" जरा 'प्रामाणिक' पिक दिसतंय. त्यांचा प्रयोग फसला असे फारसे दिसत नैये. आता तोच प्रयोग करेन. :)

रोचना Tue, 12/05/2015 - 11:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर टोमॅटो! महिनाभर कच्चा राहिलेला टोमॅटो नाही नाही म्हणता दोन-तीन दिवसात कसा लाल बुंद होतो हे पाहणे बागकामातला मोठा आनंद आहे.
मला अळूचे कंद पेरायचे आहेत, सारखी विसरतेय. कधी वाटतं, आमच्या ऑफिससमोर खूप फोफावतो, तोच नियमितपणे घरी न्यावा, उगाच घरच्या बागेत गर्दी कशाला? पण एकदा लावून बघायचा आहे.