Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================

गेले काही २-४ दिवस स्टॉक मार्केट प्रचंड कोलॅप्स झालय का? अन कोलॅप्स म्हणजे काय असतं - काही ठराविक स्टॉक्स डाऊन होतात की सर्व?
.
अजुन एक डाऊन असताना स्टॉक्स विकत घेणे चांगले का म्हणजे जास्त स्टॉक्स मिळतील व जेव्हा ते वर जातील तेव्हा चांदी होइल.

.शुचि. Mon, 24/08/2015 - 19:10

In reply to by गब्बर सिंग

धन्यवाद. समजावुन घेण्याचा प्रयत्न करते आहे.

It's a huge deal for investment professionals, and a sustained downturn could be very bad for people near retirement.

होय हे का ते कळतय मला.

.शुचि. Mon, 24/08/2015 - 21:30

हे ऐसी वर जे "ताई-माई-अक्का- भाऊराया" वगैरे फालतूपणा बोकाळलाय तो आधी बंद करा. Please talk on equal Footing. मला तरी शुचिताई वगैरे म्हटलेलं आवडत नाही.
____
आता कोणीतरी विचारेलच - यात फालतूपणा काय आहे.

अनु राव Tue, 25/08/2015 - 10:33

In reply to by .शुचि.

बरं शुची.
तुझ्या कायम सॉरी म्हणत रहाण्यानी आणि गोड्गोड प्रतिक्रीया देण्यानी "आशा काळे" ची ताई डोळ्यासमोर येते त्याला काय करणार?

बॅटमॅन Tue, 25/08/2015 - 12:31

In reply to by .शुचि.

मला तरी शुचिताई ऐवजी शुचिमामी म्हटलेलेच जास्त आवडते. ;)

ते आवडत नसेल तर सांगावे, बंद करतो.

सिद्धि Tue, 25/08/2015 - 23:43

In reply to by .शुचि.

मी माझी भूमिका सांगते :

१. कोणाही वयानी/ज्ञानानी / कार्तुत्वानी / शैक्षणिक पात्रतेनुसार मोठ्ठ्या असलेल्या व्यक्तीला मी सहजपणे अगं- अरे असं म्हणू शकत नाही . (काहींना आवडतं , काहींना नाही आवडत हा भाग वेगळा ; माझीच जीभ रेटत नाही ).

२. पण हल्ली बरेच जण शुचि प्रमाणे मला 'तुम्ही' नको 'तू' म्हण असं स्वत:होवून सांगतात तेव्हा मी तू म्हणते पण तरीही "अगं शुचि" पेक्षा "अगं शुचिताई" म्हणायला मला ठीक वाटते .

अर्थात, तेही नको वाटत असेल तर तुला मी फक्त शुचि म्हणेन. हाय काय न नाय काय ! :)

अनु राव Tue, 25/08/2015 - 12:46

In reply to by गब्बर सिंग

गब्बर - तू दिलेला ग्राफ बघितला. कोणी ग्राफ गुरु नी तयार केला आहे म्हणुन पुढे काहीतरी महत्वाचे लिहीले आहे असे वाटुन वाचले. पण पुढे दिलेल्या बुलेट पॉइंट्स मधे फक्त हिस्टॉरीक डेटा दिला आहे, जो कुठेही मिळू शकेल, नाहीतर ग्राफ बघुन पण कळेल. स्वताचे काही मत नाही ना काही भविष्यवाणी आहे. कन्क्ल्युजन तर फार रोचक आहे :-)

So sometimes a big stock market decline is a sign of deeper economic problems. Other times, it's not. It's too early to say which category Monday's crash is in.

त्या पेक्षा पोपट्वाल्याचे भविष्य काय वाईट? ( "तुम्हाला मुलगा होईल आणि मुलगा झाला नाही तर मुलगी नक्कीच होइल" )

आर्टीकलच्या टायटल मधे वाटते तसे "How Bad?" ह्या प्रश्नाचे उत्तरच नाही. :~

गब्बर सिंग Tue, 25/08/2015 - 12:59

In reply to by अनु राव

कन्क्लुजन असे असायला हवे - की हा जो क्रॅश झाला त्यात विशेष असे काही नाही. स्टॉक मार्केट मधे यापेक्षाही मोठे अनेक क्रॅश एका दिवसाचे झालेले आहेत. १९८७ ते २०१५ चा जो ग्राफ आहे त्यात हा संदेश आहे. "How Bad was it ?" या प्रश्नाचे उत्तर "नॉट व्हेरी बॅड" असेच आहे.

मूळ मुद्दा अमेरिकन स्टॉक्स चा नाहीच्चे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा आहे. समस्या खरी तिथेच आहे - हे माझे मत.

धर्मराजमुटके Tue, 25/08/2015 - 14:52

हा २० टिंब असलेला आयडी म्हणजे नक्की कोण आहे ? हा आयडी घेण्यामागे काय हेतू आहे ? आयडी घेणार्‍याने / घेणारीने (इथे नपुसकलिंगी कसे लिहायचे ?) ऐसीवरच्या चर्चा वाचून लिंगनिरपेक्ष व्हायचे ठरवले आहे काय ?

धर्मराजमुटके Tue, 25/08/2015 - 15:48

In reply to by ऋषिकेश


मी माझे थ्रेशोल्ड सेटिंग्ज बदलून फक्त +१:२५ या स्कोरचे प्रतिसाद उघडे दिसतील (बाकीचे झाकलेले) असे केले आहे. तेव्हा काही वेळा त्याहून कमी स्कोरचा प्रतिसाद न वाचला गेल्याने त्यावर माझा प्रतिसाद न आल्यास आगाउ क्षमस्व!

हे तुम्ही कसे करता ते कळाले पण त्यामुळे नक्की काय साध्य होते ते कळाले नाही.

ऋषिकेश Mon, 31/08/2015 - 19:46

In reply to by धर्मराजमुटके

बहुमताच्या गाळणीवर विश्वास ठेऊन बराच वेळ वाचतो असे माझ्या लक्षात आले आहे.
काही चांगले प्रतिसाद जातही असतील पण तेवढा नाईलाज आहे.

या वाचलेल्या वेळात इतर चांगले लेखन वाचता येते.

अनु राव Tue, 01/09/2015 - 10:10

In reply to by ऋषिकेश

बहुमताच्या गाळणीवर विश्वास ठेऊन बराच वेळ वाचतो असे माझ्या लक्षात आले आहे.

ह्या बहुमताच्या आधारावरच भारतीय लोकशाही ने खुनी, गुंड आणि भ्रष्टाचार्‍यांना सत्तेवर नेऊन ठेवले आहे, त्या बद्दल पण तुमची तक्रार नसावी. तसेच सध्याचे बहुमतानी निवडुन आलेले सरकार तुम्हाला का पटत नाही हा प्रश्न पडला आहे.

बहुमतावर हे फसवे असू शकते, बहुमतात पण वेस्टेड इंटरेस्ट असू शकतात.

ऋषिकेश Tue, 01/09/2015 - 10:34

In reply to by अनु राव

बहुमतावर हे फसवे असू शकते, बहुमतात पण वेस्टेड इंटरेस्ट असू शकतात

हे मान्यच ए.
मग? प्रॉब्लेम काये?

सध्याचे बहुमतानी निवडुन आलेले सरकार तुम्हाला का पटत नाही हा प्रश्न पडला आहे.

विनोदीच विधान ए
सरकार न पटणारा मी कोण?
मला त्यांचे काही निर्णय पटत नाहीत. मी त्यांचा विरोध करतो. म्हणजे मी त्यांचे निर्णय वाचतो/लक्षात घेतो, ग्राह्य धरतो. ते बहुमताचे सरकार आहे म्हणूनच!

अनु राव Tue, 01/09/2015 - 10:48

In reply to by ऋषिकेश

हे मान्यच ए.
मग? प्रॉब्लेम काये?

मला काहीच प्रोब्लेम नाहीये, तुम्ही बहुमताच्या बेसिस वर काही प्रतिसाद वाचायचे टाळता म्हणुन लिहीले.

घाटावरचे भट Tue, 01/09/2015 - 13:13

In reply to by अनु राव

यु डोण्ट गेट इट. इथले बहुमत त्यांना सोयीच्या असलेल्या किंवा त्यांच्या विचारांशी जुळणार्‍या विचारांचे आहे. काय राव अनु राव, तुम्हाला साधारण श्रेणीदानाच्या पद्धतीवरून आणि ट्रेंड्सवरून अंदाज येत नाही की काय?

असो. बहुमताची ही चाळणी त्यांच्या दृष्टीने इथे सोयीची आहे.

अनु राव Tue, 01/09/2015 - 13:30

In reply to by घाटावरचे भट

इथले बहुमत त्यांना सोयीच्या असलेल्या किंवा त्यांच्या विचारांशी जुळणार्‍या विचारांचे आहे.

हो ना. पण ते सुद्धा खरे बहुमत नाहीये. श्रेणी देणारी लोक निवडक च ठेवली आहेत.

अनु राव Tue, 01/09/2015 - 15:37

In reply to by ऐसीअक्षरे

सुमारे ४०० लोकांना श्रेणीदानाचे अधिकार आहेत.

तेजायला, इतके लोक असुन ७-८ च्या वरती स्कोर जात नाही. सर्व डॉर्मंट आयडी निवडले काय श्रेणीदाना साठी?
आमच्या लाडक्या ( ;) ) गुजरात मधे जसे मतदान मँडेटरी करणार आहेत तसेच श्रेणी देणे पण मँडेटरी करावे.

Nile Wed, 16/09/2015 - 01:25

In reply to by बॅटमॅन

आमच्या काही प्रतिसादांना आहेत बॉ १५-१६ श्रेण्या. जंत झाले असावेत, दुसरे काय?

तुमच्या १० पेक्षा जास्त श्रेणीसंख्या असलेल्या बहुतेक प्रतिसादांचा फायनल स्कोर पॉसिटीव्ह आहे. जंत झालेल्यांपैकी सगळेच काही तुम्हाला निगेटीव्ह श्रेण्या देत नाहीएत. तेव्हा, तुमच्या जंतांना तरी आपलं म्हणा!

चिंतातुर जंतू Tue, 25/08/2015 - 16:58

In reply to by बॅटमॅन

कोणत्याही ब्राउजरमध्ये आता पासवर्ड आणि यूजरनेम साठवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे प्रत्येक वेळी टंकनश्रम करावे लागतीलच असं नाही.

.शुचि. Thu, 27/08/2015 - 06:46

आत्ताच एक मुद्दा वाचनात आला, - On Facebook campus, there are posters on many of the walls. One that reads, “What would you do if you weren’t afraid?”
___
हे असे प्रश्न मेंटल मास्टरबेशनखेरीज नक्की काय साध्य करत असावेत? या तथाकथित कूल वर्क-प्लेसेस नक्की असे प्रश्न का विचारतात? काय वैचारीक चालना मिळते?

पिवळा डांबिस Thu, 27/08/2015 - 11:44

In reply to by .शुचि.

या तथाकथित कूल वर्क-प्लेसेस नक्की असे प्रश्न का विचारतात?

माझ्या मते त्या कंपन्यांतलं एच आर हे पुस्तकी येड*वं (बघा, आम्ही पण * टाकतो हां, घासुगुर्जी!!) असल्याचं ते एक लक्षण आहे.
नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ती, मग ती कंपनीची सीईओ असो वा सगळ्यात खालच्या थरातला कर्मचारी, इज अफ्रेड. अफ्रेड ऑफ इन्कम अनसर्टन्टी.
म्हणून तर स्वतंत्र प्रॅक्टीस, व्यवसाय करायच्या ऐवजी नोकर्‍या करताहेत!

माझ्या एका मित्राच्या व्याख्येनुसार,
"मी माझ्या कंपनीची रांड आहे. फक्त माझा रेट हाय आहे म्हणून गळ्यात टाय आहे!"
:)

अस्वल Thu, 27/08/2015 - 22:15

In reply to by .शुचि.

"Being afraid" चा मी थोडा वेगळा अर्थ घेतोय. फेसबुकसारख्या कंपन्या, जिथे त्यांना रोज काहीतरी नवीन बनवावं लागतं, नवे प्रॉब्लेम सोडवायला लागतात. त्यांचं काम हे प्रचंड दोलायमान+गतीमान अशा problem space मधे असल्याने नव्या-प्रसंगी खुळचट, अव्यवहार्य-अशा कल्पनासुद्धा त्याज्य मानून चालत नाही.
अशावेळी "नवीन काहीतरी विचार करणं" (ड्रोन्स. इंटरनेटसाठी) किंवा "भलतंच काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करणं (M हा लेटेश्ट पर्सनल मदतनीस नुकताच आलाय)
ह्या गोष्टी फेसबुकच्या वाढीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

प्रत्येक कंपनीचा एक स्वभाव असतो. मायक्रोसॉफ्टचा वेगळा, फेसबुकचा वेगळा. TCS, Infosysचा वेगळा (इन्फोसिसमधे एक प्रसिद्ध वाक्य आहे - "whenever in Doubt- Don't." ह्यात तांची मानसिकता स्पष्ट आहे.)

तर वर म्हटल्याप्रमाणे "आज कुछ तूफानी करते है" टाईप गोष्टींना उत्तेजन देण्यासाठी निर्माण केलेल्या वातवारणात भिंतीवरची पोस्टर्स हा एक छोटा भाग असू शकतो.

नितिन थत्ते Fri, 28/08/2015 - 09:22

In reply to by अस्वल

+१
नव्या नव्या कल्पना शोधण्याचे हे साधन आहे.
कंपनीत काम करताना एखाद्या कल्पनेवर कंपनी पैसा आणि वेळ गुंतवते. पण ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही तर? कंपनी आपल्याला काढून टाकेल का? अशा प्रकारची भीती कर्मचार्‍याला नेहमी असते. म्हणून तो नवीन कल्पनेवर काम न करण्याचे धोरण ठेवतो. त्यांना तशी भीती नसेल तर ते काय करू शकतील? हे जाणण्याचा प्रयत्न असतो.

चिमणराव Sat, 29/08/2015 - 20:40

"i would let them grow"( एक मोठी कंपनी दुसय्रा एका छोट्या कंपनीस वाढताना पाहून )
संदर्भ: माइक्रोसॅाफ्टx नेटस्केप
फेसबुकx वाटसअप

(प्रतिक्रिया थोडी तिक्ष्ण आहे.)

उपाशी बोका Mon, 31/08/2015 - 20:02

In reply to by नितिन थत्ते

काही काही आयडी (स्वमग्नता एकलकोंडेकर, २-माधवबाग) अजेंडा घेऊन येतात, असे वाटते. त्यामुळे एकदा काम झाले की इथे यायचे काय प्रयोजन?
पण काही जुने आयडी ('न'वी बाजू, काळा मठ्ठ बैल अंधारातला, अजो ) दिसत नाहीत, त्यांची कमतरता मात्र जाणवते.

नितिन थत्ते Mon, 31/08/2015 - 20:11

In reply to by उपाशी बोका

तेव्हा ही शंका विचारली होती पण तसे काही नाही असे धागालेखकांनी म्हटले होते म्हणून आज आठवण झाली.

.शुचि. Mon, 31/08/2015 - 20:15

In reply to by नितिन थत्ते

अनेकांनी जेन्युइनली आदित्य यांच्या कॉज ला सपोर्ट केला असेलही. पण ती चर्चा थोडी सूज आल्यासारखीच मलाही वाटलेली. परत आता ढुंकुनही न बघणं खटकतं. अर्थात एक लेख टाकला की ऐसीवर कायम याच असा काही नियम नाही. पण एक माफक अपेक्षा ठेवणेही गैर नाही वाटत.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 31/08/2015 - 20:36

In reply to by .शुचि.

आपल्याकडे म्हणण्यासारखं काही नाही म्हणून आपण लिहित नाही, असं म्हणणारे बरेच लोक आजूबाजूला दिसतात.

शिवाय, स्वतःकडे म्हणण्यासारखं विशेष काहीही नसताना भारंभार प्रतिसाद लिहिणारे वाचाळही चिकार दिसतात. अशा घटनांचा विचार करताना मला डनिंग-क्रूगर परिणाम आठवतो. तसंच असेल असं नाही, पण लोकांच्या हेतूंवर थेट संशय घेणं, लोकांची बाजू समजून न घेता थेट आरोप आणि/किंवा अपेक्षा ठेवणं ... it's so not cool.

.शुचि. Mon, 31/08/2015 - 22:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्म्म्म. ती लिंक रोचक आहे बाकी.
छान उदाहरण दिलयस.
____
काल विस्लावा स्झिंबोर्स्का यांचे पुस्तक वाचताना पुढील उतार्‍याने चट्टकन लक्ष वेधून घेतले -

Contemporary poets are skeptical and suspicious even, or perhaps especially, about themselves. They publicly confess to being poets only reluctantly, as if they were a little ashamed of it. But in our clamorous times it's much easier to acknowledge your faults, at least if they're attractively packaged, than to recognize your own merits, since these are hidden deeper and you never quite believe in them yourself.
Read more at: http://www.azquotes.com/quote/1171845

हे "डनिंग-क्रुगर" परिणामाशी रिलेटेड वाटते.

.शुचि. Wed, 02/09/2015 - 06:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्याकडे म्हणण्यासारखं काही नाही म्हणून आपण लिहित नाही, असं म्हणणारे बरेच लोक आजूबाजूला दिसतात.

खरं आहे या गपचूप बसणार्‍या विद्वान लोकांना उत्तेजन दिले पाहीजे.
कारण ते बिचारे गप्पच बसून राहतील. आपण त्यांच्या ज्ञानाला मुकू.
मी याच्याशी सहमत आहे.

घाटावरचे भट Thu, 03/09/2015 - 14:23

नुकतेच उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या सायटीवरून 'संगीताचे मानकरी' नावाचे पुस्तक उतरवून घेऊन वाचले. त्यातील लेखकाने व्यक्त केलेली संगीतविषयक मते पटली. परंतु लेखकाने हे पुस्तक 'एकलव्य' या टोपणनावाने लिहिले आहे आणि लेखकाच्या मूळ नावाचा पुस्तकात कुठेही उल्लेख नाही. जुन्याजाणत्या मंडळींपैकी कोणाला हे 'एकलव्य' म्हणजे कोण हे ठाऊक आहे काय?

अस्वल Wed, 09/09/2015 - 02:21

पुलंच्या एका पुस्तकात मुमुक्षुपाणपोई ह्या कपोलकल्पित ग्रंथाचा उल्लेख आहे. ह्या पुस्तकाचा लेखक कोण आणि पुलंचं हे कुठलं पुस्तक?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/09/2015 - 19:20

हा प्रतिसाद त्या धाग्यात अवांतर आहे आणि नको तिथे, नको तशी चर्चा लांबण्याची भीती(!) वाटते म्हणून (ट्रोलिंगविरोधात धीर गोळा करून) इथे प्रतिसाद -

१. लक्ष्मणानंद आणि ४ सहकारी यांना जाळून मारणं ही नक्की कसली प्रतिक्रिया होती? तिथली परिस्थिती, धार्मिक, आर्थिक, सामाजिक तणाव याबद्दल कोणी काही प्रदीर्घ (न्यूयॉर्कर स्टाईल किंवा असीमानंदाची मुलाखत धाटणीचं, आंजाछाप नको) लेखन वाचलंय का? कोणत्या का बाजूचं असेना, मला चांगलं लेखन वाचायला आवडेल.
२. गोध्रा जळीतकांडासाठी ११ लोकांना देहदंड आणि इतर काही दोषी इतर काही शिक्षा भोगत आहेत असं विकिपीडीयावर वाचलं. गर्भार स्त्रीला भोसकण्याबद्दल अभिमान बाळगणारा, शिक्षा झालेला बाबू बजरंगी (तसा व्हिडीओ मागे जालावर फिरत होता) आणि नरोडा-पाटीयामधल्या गुन्हेगार ठरलेली माया कोदनानी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. यातला धार्मिक बायस कोणा-कोणाला दिसतो/मान्य आहे? माया कोदनानीला देहदंडाची शिक्षा गुजरात सरकारनेच मागितलेली नव्हती यात धर्म/लिंग भेदभाव आहे असं कोणाकोणाला वाटतं?

अनु राव Fri, 11/09/2015 - 11:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

२. गोध्रा जळीतकांडासाठी ११ लोकांना देहदंड आणि इतर काही दोषी इतर काही शिक्षा भोगत आहेत असं विकिपीडीयावर वाचलं. गर्भार स्त्रीला भोसकण्याबद्दल अभिमान बाळगणारा, शिक्षा झालेला बाबू बजरंगी (तसा व्हिडीओ मागे जालावर फिरत होता) आणि नरोडा-पाटीयामधल्या गुन्हेगार ठरलेली माया कोदनानी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. यातला धार्मिक बायस कोणा-कोणाला दिसतो/मान्य आहे? माया कोदनानीला देहदंडाची शिक्षा गुजरात सरकारनेच मागितलेली नव्हती यात धर्म/लिंग भेदभाव आहे असं कोणाकोणाला वाटतं?

तुम्ही जनरीक विचारलेच आहे म्हणुन सांगते. मला नाही वाटत धार्मिक भेदभाव आहे असे.

तसेही ह्या गुन्ह्यांची मालिका सुरु कुठल्या पॉइंट पासुन झाली हे माझ्या साठी तरी महत्वाचे आहे.

उदाहरणार्थ - मी तुम्हाला थोबाडीत मारली, म्हणुन तुम्ही मला उलटी थोबाडीत मारलीत. ते प्रकरण न्यायालयात गेले तर आपल्या दोघींना समान शिक्षा असावी असे तुम्हाला वाटते का? शिक्षा दोघींना ही व्हावी पण त्यात फरक असावा असे माझे मत.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/09/2015 - 16:10

In reply to by अनु राव

उदाहरण गैरलागू. तुमचं हिंदी सिनेमाछाप उदाहरण आहे. त्याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही. तुम्ही माझ्यावर हात चालवला म्हणून श्रीगुरुजींनी बॅटमॅनला मारलं. तर श्रीगुरुजींना शिक्षा काय झाली, याबद्दल प्रश्न आहे.

गवि Fri, 11/09/2015 - 16:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही माझ्यावर हात चालवला म्हणून श्रीगुरुजींनी बॅटमॅनला मारलं.

उगीच गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न. "तुम्ही माझ्यावर हात चालवला म्हणून" हे थेट संबंधित नसलेलं कारण झालं. त्याचप्रमाणे "भाजी अळणी झाली म्हणून" नवर्‍याने बायकोला मारलं आणि बायकोने नवर्‍याच्या कपाळात प्रतिक्रियेपोटी वरवंटा घातला तर नवर्‍याने प्रथम हल्ला केला आणि बायकोने प्रत्युत्तरात्मक हल्ला केला असा साधा क्रम आहे. त्या क्रमात "भाजी अळणी झाली होती" म्हणून प्रथम हल्ला झाला की "बीफबंदीच्या हुकुमामुळे" झाला की "शेजार्‍याच्या बायकोने तिच्या नवर्‍याला कानफटात मारल्यामुळे" झाला याने फरक पडत नाही. स्वतःच्या बायकोने प्रथम हल्ला केलेला नसताना अन्य कोणत्यातरी निमित्ताने तिच्यावर प्रथम हात उचलणं हे जास्त चूक असा मुद्दा वर अरांनी मांडलेला आहे.

त्यामुळे
अ. "तुम्ही माझ्यावर हात चालवला" (पक्षी अरांनी विअवर प्रथम हात चालवला) ही केस वेगळी चालवणे आवश्यक आहे. त्यात अरांनी प्रथम हल्ला केल्याबद्दल त्यांना जास्त शिक्षा हवी.

ब. "श्रीगुरुजींनी बॅटमनला मारलं" ही केस वेगळी चालवणे आवश्यक आहे. त्यात श्रीगुरुजींनी प्रथम मारल्याने त्यांना जास्त शिक्षा हवी.

असं शिंपळ आहे ते.

डिस्क्लेमर: मूळ उदाहरणातील नावे जशीच्यातशी वापरली आहेत. सदर सदस्यांनी मला मारायला येऊ नये.

अनु राव Fri, 11/09/2015 - 17:00

In reply to by गवि

उगीच गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न

गवि - हे तुम्ही बरोबर बोललात. माझे उदाहरण सरळ सरळ लागू होणारे होते, पण जी गोष्ट उघड उघड दिसते आहे त्या कडे डोळेझाक करुन काहीतरी कॉम्लेक्स फाटे फोडणे हा एक ...

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/09/2015 - 17:05

In reply to by गवि

अ आणि ब हे मान्य.
पण माया कोदनानी, बाबू बजरंगी लोक असंच म्हणत होते ना ... गोध्रा जळीतकांड झालं म्हणून नरोडा-पाटीया आणि इतर दहशत पसरवणारी कृत्यं केली. (आता बाबू आणि माया अशा लोकांना दहशतवादी म्हणायची पद्धत नाही, ते सत्ताधारी आणि सत्ताधारींशी संबंधित असल्यामुळे असेल.)

घनु Fri, 11/09/2015 - 12:04

घर (फ्लॅट) खरेदीखत संदर्भात एक मनातला प्रश्न आहे. 'सेल डिड' आणि 'डिड ऑफ असाईनमेंट' ह्यात काय फरक आहे? मी दोन्ही फॉरमॅट पाहिले आणि जाणवलं केवळ नावात फरक आहे, 'डीड' मधले 'क्लॉजेस' पण बहुतांशी सारखेच आहेत (ते काय आपण कमी जास्त करु शकतोच). होमलोन करताना बँक 'सेल्स डीड' ची मुळ प्रत जमा केल्यावरच 'डिसबर्समेंट' करते, पण ह्याच ठिकाणी जर ती प्रत 'डिड ऑफ असाईनमेंट' ची असेल तरीही त्याला 'सेल डिड' प्रमाणेच वागवता.
इंडेक्स टू आणि डिड ची पावती ह्यावर 'दस्तऐवजाचा प्रकार' मधे 'अभिहस्तांतरण पत्र' असं आहे तर काही फॉरमॅट मधे 'दस्तऐवजाचा प्रकार' ह्यात 'असाईमेंट डिड' असं आहे. पण हे सोडल्यास बाकी सगळं सारखंच. हा केवळ मराठी/इंग्रजी एवढाच फरक आहे का? अंजावर फार व्यवस्थित माहिती नाही.
जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत :)

.शुचि. Sat, 12/09/2015 - 23:45

इन्द्राणीसप्तशती मध्ये पुढील श्लोक वाचनात आला-

सुरराजस्य कान्ते नरसिंहस्य सूनुम् ।
बलवन्तं कुरु त्वं भरतक्ष्मावनाय

इंद्राणी ही नरसिंहाची मुलगी म्हटले आहे का? (सुनू म्हणजे अपत्य की भावंड?)
बहुधा भावंड असावे. गणेशस्य सुनु= कार्तिकेय असं वाचल्यासारखं वाटतय.

बॅटमॅन Sun, 13/09/2015 - 03:18

In reply to by .शुचि.

सूनु = पुत्र.

"हे सुरराजस्य कान्ते, त्वं नरसिंहस्य सूनुम् भरतक्ष्मावनाय बलवन्तं कुरु |" असा अन्वय आहे.

हे इंद्राणी, तू नरसिंहाच्या मुलाला बलवान कर. भरतक्ष्मावन म्हणजे काय ते नै समजले, पाहिले पाहिजे.

योगेश्वर Tue, 22/09/2015 - 11:37

रा.स्व.सं. आणि निखिल वागळे यांना माझा वैयक्तिक विरोध कायम राहिला आहे. परंतु आज दोन बातम्या वाचनात आल्या. रा.स्व.सं. ने आरक्षण पध्दती मोडुन काढण्याची मागणी केली आणि सनातनांच्या यादीत पुढील नाव निखिल वागळे याचं आहे. पहील्या बातमीला माझा वैचारिक पाठींबा आहे तर कोणी कितीही बेताल बडबड करीत असले तरी त्याला जगण्याचा पुर्ण अधिकार आहे या मताचा मी आहे.

अनु राव Tue, 22/09/2015 - 10:52

In reply to by .शुचि.

शुचि - ह्या लेखात प्रश्न आहे च कुठे? :p

पण माझा हा वरील प्रश्न "मनातील छोटे मोठे प्रश्न" ह्या धाग्यावर हलवायला काहीही हरकत नाही.

नगरीनिरंजन Fri, 25/09/2015 - 18:18

In reply to by योगेश्वर

मोठी तीन-चार मजली इमारत, बाजूलाच मंगल कार्यालय वगैरे संपत्ती असलेल्या व वडील कन्स्ट्रक्शन व्यावसायिक असलेल्या एका मित्राने १६००० रुपये वार्षिक उत्पन्न दाखवलेले पाहिले आहे आणि त्या जोरावर उच्च शिक्षणासाठी सरकारी शिष्यवृत्ती पदरात पाडून घेतलेली पाहिली आहे. सीओईपीमध्ये जळगावच्या एका मोठ्या असामीची मुलगी कमी उत्पन्न गटात असल्याचे दाखवून फुकट पाठ्यपुस्तके मिळवत असे याची खात्रीलायक बातमी आहे.
खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यापीठाच्या तोंडी परिक्षेत एका अवघड प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यावर आडनाव विचारले जाण्याचा अनुभव आहे. पुण्यात पूर्णतः खाजगी कॉम्प्युटर शिक्षणसंस्थेत ४५ मिनिटात एक प्रॉग्रॅम लिहून दाखवण्याचे आव्हान स्विकारुन पूर्ण केल्यावर आडनाव विचारले गेल्याचा अनुभव आहे. आणि दोन्हीवेळी बरोबरच्यांपेक्षा कमी गुण दिले गेले आहेत. पुणे विद्यापीठातला विभागप्रमुख "अमुक-अमुक म्हणजे कोण?" विचारतो हे प्रत्यक्ष पाहिले आहे. हे सगळं नव्वदी-नव्वदोत्तरीत.
आता हे चड्डीवाले आरक्षण कोणाला द्यायचं ते ठरवणार. कशाच्या जोरावर?

.शुचि. Tue, 22/09/2015 - 20:06

याहू वरील बातम्या (हेडलाइन्स) वाचाव्याश्याच वाटत नाहीत. लोकांचे वैयक्तिक आयुष्य किती टार्गेट करतात. काहीतरी हपा घेऊन सेन्सेशनल करायचं. How low YAHOO is going to stoop?
जरा खुट्ट झालं की व्हायरल करुन ठेवायचं प्रायव्हसी ची वाट लावलीये याहू ने.

मन Wed, 23/09/2015 - 17:42

मी मूर्खपणा केला आणि "बाबूल मोरा" ऐकलं. आधी सैगलचं ऐकलं. मग जगजितचं आणि मग भीमसेनांचं. त्यात पुन्हा बायकोला "ह्यात इतकं भारी काये" ते सांगायला गेलो. तिला सगळं ब्याकग्राउंड सांगताना मीच त्यात जास्त जास्त गुंतत गेलो. खूपच कसंतरी झालं.
.
.
तो लखनौ का अयोध्येचा नवाब वाजिद अली शाह. ती त्याची गाणं, काव्य वगैरेमधली आवड नि रसिकता. वेगळ्या दृष्टीतून पाहिलं तर तोच त्याचा राज्यकर्ता म्हणून असलेला नालायकपणा; त्याच्यातला कर्तबगारीचा अभाव. त्याचं हतबल आणि कठपुतली असणं;केविलवाणं असणं.
आणि त्याचं नाममात्र असलेलं राज्यही ब्रिटिशांनी झटकन् काढून घेणं; आणि ह्यावरही ह्या राज्यकर्ता म्हणून घेणार्‍याला काहिच करता न येणं; आणि शेवटी गाशा गुंडाळावा लागणं. तो गुंडाळतानाही त्याच्या त्या वास्तव्याच्या गावात त्याचा जीव गुंतलेला असणं; एक आसक्ती, ओढ असणं आणि तरीही कुणीतरी फरपटत दूर नेणं.
अरेरे.
आणि त्याकाळाच्या चौकटीत "खणखणीत पुरुष " असण्याची अपेक्षा असल्याची अपेक्षा असलेल्याकडून मग अगदिच तीव्रतेनं एखाद्या माहेराची ओढ असलेल्या ; पण ते सोडून जावं लागणार्‍या भावनिक/रडक्या/रडवेल्या मुलीसारखं "गाव सोडून जावं लागतय हो" म्हणून केविलवाण्या ओळी निघाल्या. जो तो माणूस राहतो तिथे गुंतलेला असतो; कितीही नाही म्हटलं तरी सभोवतालचा परिसर त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक अवयव बनलेला असतो. इन फ्याक्ट त्याच्या नकळत ती त्याची स्वतःपुरती ओळख असते. अर्थात ती पार निघून जाइपर्यंत त्याला स्वतःलाही ते जाणवलेलं नसतं. वाजिद अली शाह आजवर नामधारी का असेना राजा/नवाब म्हणून तिथे वावरलेला असतो. त्याला एक आदर-सन्मान मिळत असतो; एक एलिट ट्रीटमेण्ट मिळत असते. त्यात पुन्हा तो राजकारण-लढाई-खगोलशास्त्र-विज्ञान वगैरेमध्ये कमी रस घेणारा आणि कविता-शेरोशायरी-संगीत-काव्य- खाद्य संस्कृती(खासम खास बिर्याणी आजही लखनवी-नवाबी फेमस आहे तिथली) ह्यात रमणारा ; मनाचा एक मृदू कोपरा असणारा असतो. त्याला हे सगळं एकदम जाणार म्हटल्यावर जास्तच तीव्रतेनं झोंबतं. हतबलताही जाणवते. आणि हे सगळं सोडणं/सुटणं एवढं एकच दु:ख नाहिये. आपण कतृत्वहीन असल्याची बोच जाणीवही त्याला आहे; तो पुरता सर्वसंग सोडून फकीर झालेला नाही; किंवा पूर्ण ठार वेडाही झालेला नाहीये. त्यामुळे घडणार्‍या घटनांवर नियंत्रण ठेवू शकत नसला ; तरी तो जे घडतय ते समजू शकतो आहे;संवेदनशील आहे. अशा व्यक्तीला अपमान जास्तच ठेचून काढत असावा.
.
.
शिवाय जिकडे पाठवताहेत तिथे तुम्ही आजच्यासारखे काहिच नसणार; नवाब वगैरे. किम्वा इथे ज्या खासमखास जागा, आठवणी आहेत; त्या तुम्ही सोडून जाणार आहात कायमच्या. इथे आपण उंडारत होतो तेव्हा आपल्याला काही जाणवलं नसेलही; पण इथल्या एकेका कोपर्‍याशी आपली एकेक आठवण निगडित आहे. कधी आपण इथे कशावर तरी हसलो डोळ्यात पाणी येइस्तोवर असू;वेड्यासारखे हसलो असू; कधी कैतरी ऐकून हबकलो असू; इथेच कुठेतरी आपण कुणाला तरी वाचवलं म्हणून एखाद्यानं कृतज्ञतेनं आपल्याला मुजरा केला असेल; सलाम ठोकला असेल. इथे कधीतरी आपली ऐनवेळी काहीतरी पंचाइत झाली असेल; दोस्तांनी टांग खेचली असेल. इथे आपण एखाद्याची जिरवून त्या क्षणापुरते "विजयी" महसूस केले असेल. इथली हवा आपल्यात सामवली असेल; इथल्या ऋतूंनुसार आपले मूड होत असतील.खास इथले म्हणून काही इनसायडर जोक्स-म्हणी- पारंपरिक विज्डम असेल; त्यात आपण काही कमावलं असेल....
.
.
हे ... हे सगळं आता सोडून जायचय. एखाद्या अशा ठिकाणी जिथली भाषा धड ठाउक नाही. तिथे आपण कुणीच नाही. तिथे फिरायलाही आपल्याला परवानगी घ्यावी लागणार. तिथले इनसायडर जोक्स, शहाणपण, जीवनाचं तत्वज्ञान कैतरी वेगळच असणार. आप्ल्या ढीगभर आठवणींचे ते कोपरे, ते नाक्यानाक्यावरचे किस्से, सगळं सगळं आता सुटणार. आपली आठवण/स्मृती ही फक्त आपल्या डोक्यापुरती राहणार. हळूहळू ती नि:संदर्भ होत राहणार. हे आपल्याला जे वाटलं की अनंतकाळ आपल्या सोबतच असणार आहे; आणि आपणही अनंतकाळ असणार आहोत; ते सगळं झूट है. सब झूट है. अगदि मागच्या क्षणापर्यंत असलेलं ते "गोष्टी संपत चालल्याचं" विस्मरण स्वतःच आता अचानक खाडकन् संपलय. अचानक; हे असं अचानक संपेल ह्याची जाणीव नसताना हे झालय. सुंदर स्वप्नातून जागं व्हावं आणि आसपास एकाएकी भयानक आगीचा लोळ वास्तवात असावा; तसं झालय. सगळं संपलय. ते इतकं अचानक आणी कायमचं संपलय की "हे खरोखरच असं घडलं होतं का आणि इतकं सुंदर काही आपल्याला मिळालं होतं का" असं आता आपल्याला वाटत राहणारे--जन्मभर "
एक अचानक झालेला शेवट; आणि धक्का.
एक अनिच्छेनं होउ घातलेलं स्थलांतर.
.
.
अरे? पण आपण अचानक पुढच्या काही तासात किंवा मिनिटात मरणार आहोत; ही जाणीव झाल्यावरही हेच वाटत असेल की.
जे आजवर घडून गेलं ते अगदि मिनिटभरात घडून गेल्यासारखं वाटत असणार. अजूनही काही मिळालं असतं ; थांबता आलं असतं तर बरं होतं;
असं वाटत असणार. मोह/आसक्ती/ओढ काही संपतच नसणार.
जितके गुंतला असाल; तितकी ओढ अधिक असणार....
.
.
अतिशय डिप्रेसिंग्/उदासवाणं भिकारडं गाणं आहे; अजिबात ऐकू नका.

मनीषा Thu, 24/09/2015 - 11:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

किशोरी आमोणकरांनी गायलेलं बाबुल मोरा मला आवडतं .

आणि श्रद्धांजली कॅसेट/ सीडी मधे , लता मंगेशकरांचे बाबुल मोरा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 24/09/2015 - 18:26

इथे अवांतर नको म्हणून वेगळ्या धाग्यावर प्रश्न -

विकिपीडीयानुसार भारतात -
Regulations apply to land-based photography for certain locations. A permit is required for aerial photography in India, which normally takes over a month to acquire.

त्याच पानावर लिहिल्यानुसार यूके, यूएसमध्ये कला म्हणून, सार्वजनिक ठिकाणी फोटो काढायला आणि प्रकाशित करायला परवानगी आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेच्या नावाखाली, आपल्याला सांगून किंवा न सांगता, आपल्याला आवडो अगर नावडो, आपले चेहेरे, कपडे, पर्समध्ये काय सामान आहे याची अनेकदा तपासणी होते. मग कला म्हणून किंवा कला विकून पैसे मिळवण्यासाठी लोकांना सांगितल्याशिवाय चेहेऱ्यांचं रेकॉर्डिंग का करू नये?

गब्बर सिंग Fri, 25/09/2015 - 22:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रश्न एकदम उचित आहे.

मी असं ऐकलंय की अ‍ॅडव्हर्टायझिंग च्या क्षेत्रात एखाद्या मॉडेल चा विशिष्ठ अँगल ने फोटो काढण्याचा अधिकार (एकाधिकार??) एखाद्या विशिष्ठ एजन्सीला च असतो. अर्थात ही ऐकीव माहीती आहे. मुद्दा हा आहे की कलाकारांचे करार असतात व त्या करारांची एन्फोर्समेंट सरकारने करायची असते. प्रॉपर्टी राईट्स चे साहित्य वाचलेत की तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. पण त्यासाठी तुम्हास खूप काही वाचावे लागेल. तेव्हा थोडक्यात उत्तर हे की - That recording should not be done because that artist has (presumably) the right to restrict all access to his bodyparts. Violators will be prosecuted. (अतिसंक्षिप्त उत्तर).

.शुचि. Thu, 01/10/2015 - 11:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सध्या फेसबुकवरती अगदी डिट्टो स्किन कलरचे स्टॉकिंग्ज घातलेल्या स्त्रीचा फोटो फिरतो आहे. असं वाटतय की तिने काही कपडेच घायले नाहीयेत. अर्थात फोटो अनेकांनी लाइक केलाय या उद्देशाने की जास्तीत जास्त मुली/स्त्रियांना कळावं की असे स्किन्च्या रंगाचे कपडे घालू नयेत वाईट दिसतात.
.
मला हे म्हणायचय की त्या फोटोत बिचार्‍या त्या स्त्रीचा चेहराही दिसतो आहे. तिला किती कानकोंडं झालं असेल :(. कोणी काढलाय हा फोटो देव जाणे.

अनु राव Mon, 05/10/2015 - 10:48

In reply to by .शुचि.

बघितलाय तो शुचि. भयंकर दिसतय. मला पहिला प्रश्न असा पडला की त्या बाईला स्वताला कसे कळले नाही आणि घरातल्या, ऑफिसमधल्या किंवा मित्रमंडळींनी तिला काही सांगितले का नाही?

.शुचि. Mon, 05/10/2015 - 12:14

In reply to by अनु राव

दातात अडकलेला पालक, मागून शर्टाचे बाहेर निघालेले लेबल याच कॅटॅगरीतील वाईट फॅशन या स्वतःच्या स्वतःला कळत नाहीत. निकटवर्तियांनी या गोष्टी व्यक्तीला सांगायच्या असतात. अगदी हाच प्रश्न माझ्या मनात आला की या स्त्रीचे मित्रमैत्रिणी व मुख्य म्हणजे घरचे काय करत होते?

adam Mon, 05/10/2015 - 13:11

In reply to by .शुचि.

त्या स्त्रीला ह्या सगळ्याबद्दल तक्रार असेलच, किम्वा आपण कसे दिसतो ह्याची कल्पना नसेलच, असे मानून का प्रतिसाद येताहेत ?
हल्ली खूपशा मॉडेल्स नग्न फोटो वगिअरे सहज टाक्तात जालावर स्वतःच.
(किम कार्दिशिअन हिने स्वतःची पॉर्न क्लिप स्वतःच टाकली होती म्हणे.)
त्या मुलीची रिअ‍ॅक्शन काय असेल ब्वा आता ?

बॅटमॅन Fri, 25/09/2015 - 19:44

यासंबंधीचा हा पेपर इथे पाहण्यात आला.

http://link.springer.com/article/10.1007%2Fs10967-011-1539-3

त्याचा सारांश दिलेला आहे:

The present investigation entails the biosorption studies of radiotoxic Strontium (90Sr), from aqueous medium employing dry cow dung powder (DCP) as an indigenous, inexpensive and, eco-friendly material without any pre or post treatments. The Batch experiments were conducted employing 90Sr(II) as a tracer and the effect of various process parameters such as optimum pH, temperature, amount of resin, time of equilibration, agitation speed and concentration of metal ions have been studied. The kinetic studies were carried out employing various models but the best fitting model was Lagergren pseudo-second order model with high correlation coefficient R 2 value of 0.999 and cation exchange capacity of DCP was found to be 9.00 mg/g. The thermodynamic parameters for biosorption were evaluated as ΔG° = −5.560 kJ/mol, ΔH° = −6.396 kJ/mol and ΔS° = 22.889 J/mol K, which indicated spontaneous and exothermic process with high affinity of Sr(II) for DCP.

याचा नक्की निष्कर्ष काय आहे ते कुणी सोप्या भाषेत समजावून सांगेल काय? एक्सोथर्मिक प्रोसेस म्ह. हीट बाहेर पडते इतके कळाले. पण नक्की ऑथर लोक्सना म्हणायचे काय आहे ते झेपले नाही, तरी ते सांगावे ही विनंती.

.शुचि. Mon, 28/09/2015 - 13:38

In reply to by गब्बर सिंग

स्त्रियांकरता मर्दानगीसारखा कौतुकाचा शब्द अजुन निघालेला नाही कारण कौतुक लहानांचं (मानसिक्/शारीरीक्/बौद्धिक्/भावनिक) करायचं असतं, प्रगल्भांचं नाही. ;)

राही Wed, 30/09/2015 - 10:08

In reply to by गब्बर सिंग

१)मर्द--मर्दानगी
औरत--अवरतान्गी.
२) मर्द बाईसाठी -- मुलुखमैदान, भोचकभवानी, अगोचर, धेंडा, रणरागिणी, नुसतीच रागिणी. काल- रजनी,दामिनी. आज अस्मिता.
३) बाईपणा दाखवणारे--आपापल्या कल्पनेप्रमाणे. म्हणजे तन्वी श्यामा पासून शूर्पणखा, झांटिपी, महामाया, टवळी, अनन्त.

.शुचि. Sun, 27/09/2015 - 18:03

ISBN नंबर पुस्तकांना कोण देतं? हा नंबर कसा ठरतो? हा नंबर २ पुस्तकांसाठी एकच असू शकतो का?
____

विकी वरती माहीती दिसते आहे.

ऋषिकेश Wed, 30/09/2015 - 09:52

आम्चा धर्म कस्सा कस्सा प्रगतीशील आहे, नवे बदल स्वीकारतो म्हणत फुशारून फिरणार्‍यांच्या हे लक्षात येते का? की अनेक पुरोगाम्यांमुळेच हा धर्म बदलत राहिला आहे आणि प्रतिगाम्यांनी/धार्मिकांनी त्या त्या वेळी प्रत्येक बदलाला तितकाच जहाल विरोध केला आहे!

मग नवीन विचारांची मंडळी आणू पाहताहेत/सांगताहेत त्या बदलाला उग्गाच (किंवा कैतरी जुनाट कल्प्ना बाळगत) विरोध करून १००/क्ष वर्षांनंतरच्या पिढीच्या दृष्टीने - आताच्या पिढीसाठी फुले-आंबेडकर इत्यादींच्या मुर्ख विरोधकांकडे आपण कसे राग/कीव येऊन बघतो त्या - राग/कीव येणार्‍या गटात जाताना अजिबातच वैषम्य कसे वाटत नाही ते त्यांचा पारंपरिक देवच जाणे!

अनु राव Wed, 30/09/2015 - 10:14

In reply to by ऋषिकेश

नवे बदल स्वीकारतो म्हणत फुशारून फिरणार्‍यांच्या हे लक्षात येते का? की अनेक पुरोगाम्यांमुळेच हा धर्म बदलत राहिला आहे

हे शक्य आहे, पण त्यासाठी तो धर्म त्या पुरोगाम्यांना जीवंत राहुन देतो. काही काही धर्म, बदलाचा नुस्ता वास जरी आला तरी मारून टाकतात.

ऋषिकेश Wed, 30/09/2015 - 10:28

In reply to by अनु राव

अर्थातच! तसे धर्म कमी बदलतात नी मागास रहातात. तेच का मागास आपणही का नाही मागास रहायचं? असा हास्यास्पद तर्क काही नव-धार्मिक संघटना लढवतात नी अनेक जण त्याला बळी पडतात!

आणि हो! "पुरोगाम्यांना जिवंत राहु देतो" अशी वाक्यरचना चालु वर्तमानकाळात व भविष्यकाळातही करता यावी अशी शुभेच्छा!

अनु राव Wed, 30/09/2015 - 10:42

In reply to by ऋषिकेश

आणि हो! "पुरोगाम्यांना जिवंत राहु देतो" अशी वाक्यरचना चालु वर्तमानकाळात व भविष्यकाळातही करता यावी अशी शुभेच्छा!

१-२ अपवाद असु शकतात, पण त्या अपवादावरुन निष्कर्ष काढायची गरज नाही. ९९.९९ टक्क्यांना जिवंत राहू देतो असे म्हणु पाहीजे तर.

ऋषिकेश Wed, 30/09/2015 - 10:43

In reply to by अनु राव

अर्थातच निष्कर्श काढत नाहीच्चे. म्हणून हे वाक्य भविष्यातही बोलता येवो अशी सदिच्छा व्यक्त केलीये. नाहितर शंका घेतली अस्ती

adam Wed, 30/09/2015 - 11:15

In reply to by ऋषिकेश

अर्थातच! तसे धर्म कमी बदलतात नी मागास रहातात. तेच का मागास आपणही का नाही मागास रहायचं? असा हास्यास्पद तर्क काही नव-धार्मिक संघटना लढवतात नी अनेक जण त्याला बळी पडतात!

विनम्र दुरुस्ती. सध्या पुरोगामी विचाराधारेचा वारसा निदान ऑन पेपर तरी आक्रमकपणे सांगणारे लोक/पक्ष ज्यांना प्रतिगामी म्हणत टार्गेट करतात(ज्यात काही सावरकरप्रेमी टार्गेट होतात) त्यांची भूमिका "तेच का मागास आपणही का नाही मागास रहायचं?" अशी अजिबात नाही. इन फ्याक्ट प्रतिगामी म्हणत ज्यांना टार्गेट केलं जात आहे ते लोक " आपण एकटेच प्रागतिक कसं व्हायचं ? आपल्यासोबत सर्वांंनाच प्रागतिक्,पुरोगामी करुन घेउया. समान नागरी कायदा राबवुया. "
"माझ्या देशबाम्धवांत काय्दा वापरुन सुधारणा करणार" असं राजाराम मोहनराय स्टाइलचा जे पवित्रा घेतात ; त्यांची प्रतिगामी म्हणून छी थू केली जाते!
पुरोगामी म्हणवणारे उलट "हा अमुक धर्माचा.... ह्याच्यापुरते हे अमुक कायदे असे. तमुक व्यक्ती त्या गटसमूहाची त्याच्यापुरते ते तमुक कायदे तसे...." अशी गटनिहाय विभागणी, गटाधारित भेदभाव करत राहतात.
अजून एक घोळ मला समजलेला नाही; तो म्हणजे भाजप-शिवसेनेला त्यांचे विरोधक "जातीयवादी " का म्हणतात ?
जातीपातीच्या राजकारनात सर्वात तरबेज तर काँग्रेसवाले आहेत! भाजप-सेनेला विरोधक कधी कधी धर्मांध, कट्टर वगैरे म्हणतात; ते एकवेळ समजू शकतो.
(ते तसं का म्हणत असावेत ह्याचा अंदाज येतो.)
तर मग, आजपासून शहाणे होउया. भाजपला जातीयवादी म्हणणे थांबवुया. सर्वाधिक ओबीसी मुख्यमंत्री ह्या पक्षाने दिलेले आहेत. घंटा जातीयवादी.

मेघना भुस्कुटे Wed, 30/09/2015 - 11:25

In reply to by adam

भाजप-शिवसेनेला त्यांचे विरोधक "जातीयवादी " का म्हणतात ?
जातीपातीच्या राजकारनात सर्वात तरबेज तर काँग्रेसवाले आहेत!

मला हे आर्ग्युमेंट समजलेलं नाही. कॉग्रेस जातीयवादी आहे, या कारणामुळे भाजपा-शिवसेनेला तसं म्हणायचा त्यांचा अधिकार रद्दबातल होतो? कसा काय बॉ? (हे म्हणजे, "तू काळा आहेस. तू मला काळा कस्काय म्हणू शकतोस? मी अगदी ठार-डांबरकाळा असलो, तरी तू काळा असल्यामुळे तुला तो हक्कच नाही." या चालीवरचं काहीतरी आहे. अरे भौ, तू काळा आहेस ही फॅक्ट बदलते का?)

बाकी जातीयवादी या शब्दाचा वापर चुकत असेल. नॉन-सेक्युलर असं चालेल का? एवीतेवी तंबी दुराईंचा तो लेख वाचल्यापासून 'नॉनसेक्युलर' ही सद्यकालीन ओवीच वाटायला लागलेली आहे.

अवांतर: या उदाहरणात किमान शिवसेना तरी जातीयवादी नाही. त्यांना फारतर प्रांतीयवादी, भाषावादी, धर्मवादी (आणि हे सगळंच सोयीस्कररीत्या बदलतं. कधी या डगरीवर, कधी त्या डगरीवर उड्या मारत.) म्हणता येईल.

ऋषिकेश Wed, 30/09/2015 - 13:13

In reply to by adam

इन फ्याक्ट प्रतिगामी म्हणत ज्यांना टार्गेट केलं जात आहे ते लोक " आपण एकटेच प्रागतिक कसं व्हायचं ? आपल्यासोबत सर्वांंनाच प्रागतिक्,पुरोगामी करुन घेउया. समान नागरी कायदा राबवुया. "

याचा अर्थ जोवर समान नागरी कायदा नाही तोवर आम्ही सुधारणार नाही? का बरे? एकुणच सुधारण्याचे जे काही प्रयत्न आहेत ते तो धर्म नाकारणारे पुरोगामी करत रहाणार नी त्या धर्माबद्दल ममत्त्व असलेले आपल्याच धर्मियांना मागे खेचत रहाणार! (का कारण इतर धर्मिय पुढे आलेले नाहीत म्हणून?)

बाकी आताची काँग्रेस व भाजपा दोघेही उजवे व प्रतिगामी विचारसरणी राबवू पाहणारे पक्ष आहेत. भारतात सद्यस्थितीला मध्याच्या डावीकडून जाणारा मोठा पक्ष अस्तित्वात नाही असे माझे मत आहे. परंतू तो फाटा इथे गैरलागू असल्याने गप्प

adam Wed, 30/09/2015 - 15:21

In reply to by ऋषिकेश

याचा अर्थ जोवर समान नागरी कायदा नाही तोवर आम्ही सुधारणार नाही? का बरे? एकुणच सुधारण्याचे जे काही प्रयत्न आहेत ते तो धर्म नाकारणारे पुरोगामी करत रहाणार नी त्या धर्माबद्दल ममत्त्व असलेले आपल्याच धर्मियांना मागे खेचत रहाणार! (का कारण इतर धर्मिय पुढे आलेले नाहीत म्हणून?)

नोप्स. "आम्ही सुधारणार नाही" असं नक्की कोण म्हणतं आहे ? (निदान मी तरी तसं म्हणत नाही; समान नागरी कायद्याचा आग्रह धरणारे खूपसे लोकही असं म्हण्णर नाहित; ह्याची खात्री वाटते.) अहो, भारतातल्या सत्तर ऐंशी टक्के समाजाला आधीच एक कायदा लागू केला गेला आहे; उर्वरितांनाही ते कायद्याचं राज्य अनुभवता यावं; हीच सदिच्छा आहे.. थोडक्यात सध्या ब्रॅकेटमध्ये सत्तर ऐंशी टक्के लोक समाविष्ट आहेत; ते १०० टक्के व्हावेत अशी इच्छा आहे. आहे तिथून कायदा मागं घ्या; असं कोण हो म्हणेल ? किंबहुना "इतर धर्मियांनी पुढं यावं; जे कायद्यास राजी आहेत; त्यांच्याच बाबत कायदे बनवावेत " हे धर्माधारित विचार वाटतात. धार्मिक भावनांचा आदर असला; तरी ते खाजगी बाबतीत ठेवावं. कायदे बनवताना त्या-त्या समजाची मंजुरी का घेत बसावी ? लॉर्ड बेण्टिकला आपण चाम्गला खमक्या पण सद् हृदयी माणूस म्हणतोच ना, त्यानं पार दीडेकशे वर्षापूर्वीच्या काळात सतीप्रथेवर बंदी आणली म्हणून ? मग ? त्याच्यातले चाम्गले राज्यकर्त्याचे गुण आपण नकोत घ्यायला ?आज लोकशाही आहे; आपण "प्रजा/सब्जेक्ट्स" नाही; आपण "नागरिक/सिटिझन " आहोत; टेक्निकली "नागरिक" हा राज्यक्र्ताच की लोकशाहीचा.
मग जबाबदार वर्तन दाखवून समान नागरी कायद्याचा आग्रह धरणं उचित ना ? जेवढ्या ब्रॅकेटमध्ये तो लागू केलेला आहे; ते उत्तमच. तो मागे घ्या कुणीच म्हनत नाही.
पण "अनडिव्हायडेड फ्यामिली" ह्या संकल्पनेचा उपयोग होण्यापासून मुस्लिमांना वंचित का थेवायचं ?
शिवाय मुस्लिम स्त्रियांना प्रागतिक जगाचे फायदे घेण्यापासून अटकाव का करायचा ?
(बहुपत्नीत्वातून एक संदेश जातो; स्त्री वर्गाला त्यामुळे सामाजिक स्तरावर दडपलं जातं.) त्यांची काहीतरी काळजी वाटणं एक नागरिक आणि राज्यकर्ता म्हणून;
ह्यात काय चूक आहे ? पुन्हा सांगतो; सध्या जितक्या ब्रॅकेट मध्ये कायद्याचं राज्य आहे; ते उत्तमच. चला, कल्याणकारी काय्द्याचं राज्य वाढवूया.
(बहुतेक आपली बरीचशी सहमती ऑलरेडी आहे. शंभरातल्या ऐंशी लोकांवर लागू होनारा काय्दा काधून घ्या; असा माझा विचार नाही. ऐंशी ही टक्केवारी ठीकच आहे; ते प्रमाण शंभरावर नेउया; असं माझं म्हण्णं.) १९८६ ला शाहबानो केस दरम्यानच्या काळात मुस्लिम महिलांना पुधे येण्यास कायदा मदत करत, कायदा करण्यास सरकार चालढकल करत आहे; अशे एभूमिका घेत काँग्रेस सरकार सोडाणारे आरिफ मोहम्मद खान ह्या तत्कालीन काँग्रेस मंत्र्यांचं मला कौतुक वाटतं.
हमीद दलवाई, आरिफ मोहम्मद खान ह्यांनाही पटेल असा समान नागरी कायदा आपण प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करुयात असं मला वाटतं.
(फुल्यांनी ब्राम्हण विधवांसाठीही काम केलेलं आहे. त्यांना कुणी म्हटलं का की तुम्ही ब्राम्हण नाहित; मग तुम्ही नाक खुपसू नका म्हणून. त्यांचे सद्विचार ध्यानात घेतलेच ना आपण ?)
.
.

बाकी आताची काँग्रेस व भाजपा दोघेही उजवे व प्रतिगामी विचारसरणी राबवू पाहणारे पक्ष आहेत. भारतात सद्यस्थितीला मध्याच्या डावीकडून जाणारा मोठा पक्ष अस्तित्वात नाही असे माझे मत आहे.

हो कॉम्ग्रेस व भाजप तसे फारसे वेगळे नाहित; असच मलाही वाटतं. पण उजवं - डावं ह्या शब्दांच्या वापराबद्दल मला बराच संभ्रम आहे.
राजीव सान्यांनी खूपच नेमक्या व कमी शब्दांत , टू-द-पॉइण्ट हा मुद्दा मांडलाय --
http://rajeevsane.blogspot.in/2015/09/blog-post.html

ऋषिकेश Wed, 30/09/2015 - 15:30

In reply to by adam

मुळात प्रतिगामी म्हणजे समान नागरी कायद्याच्या बाजुने असणारे ते तुम्ही कसे ठरवलेत?
मी तत्वतः समान नागरी कायद्याच्या बर्‍यापैकी बाजूने आहे. त्याचा काय संबंध?

adam Wed, 30/09/2015 - 15:41

In reply to by ऋषिकेश

माझे महत्वाचे मुद्दे मांडून झालेले आहेत; अधिक नवीन काही सांगणं म्हणजे मी जे आधीच म्हणालो आहे त्याबद्दल अधिकाधिक उलगडा करीत राहणं ठरेल असं वाटतं. तुमचा मुद्दा समजला. आदरपूर्वक आभार.

चिंतातुर जंतू Wed, 30/09/2015 - 16:12

In reply to by adam

>> अजून एक घोळ मला समजलेला नाही; तो म्हणजे भाजप-शिवसेनेला त्यांचे विरोधक "जातीयवादी " का म्हणतात ?
जातीपातीच्या राजकारनात सर्वात तरबेज तर काँग्रेसवाले आहेत! भाजप-सेनेला विरोधक कधी कधी धर्मांध, कट्टर वगैरे म्हणतात; ते एकवेळ समजू शकतो.
(ते तसं का म्हणत असावेत ह्याचा अंदाज येतो.)
तर मग, आजपासून शहाणे होउया. भाजपला जातीयवादी म्हणणे थांबवुया. सर्वाधिक ओबीसी मुख्यमंत्री ह्या पक्षाने दिलेले आहेत. घंटा जातीयवादी.

'जातीयवादी' हा शब्द 'कम्यूनलिस्ट' ह्या अर्थानं वापरला जातो.

communalism :
3. strong allegiance to one's own ethnic group rather than to society as a whole.

उदाहरणार्थ :
उपराष्ट्रपतींचे वक्तव्य जातीयवादी

मुस्लिमांना आता सुरक्षेची हमी द्या, हे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे वक्तव्य जातीयवादी असल्याने अन्सारी यांनी माफी मागावी अथवा पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी केली.

अनु राव Wed, 30/09/2015 - 12:38

In reply to by राही

कसं आहे राहीतै - एखादी गोष्ट फुकट आणि काहीही न करता मिळत असली की त्याची किंम्मत वाटत नाही. तुम्ही दुसर्‍या धर्मात असता आणि अशीच सो-कॉल्ड पुरोगामी मते माडत असता तर सवलत म्हणणे फार च झाले भिक म्हणुन तरी जगायला मिळाले असते तरी नशिबवान ठरला असता.

राही Wed, 30/09/2015 - 23:38

In reply to by अनु राव

प्रतिसाद हा देशकालानुसार होता. जर तरला काय अर्थ आहे? तसे असते तर कदाचित ऐसीवर न लिहिता कुठेतरी जंग किंवा डॉन मध्ये पाठवून दिला असता प्रतिसाद, कदाचित उर्दूतून. तुम्हाला त्याबद्दल कळलेही नसते. वेगळ्या जन्मात काय केले असते हा विचार रोचक आहे.

नितिन थत्ते Thu, 01/10/2015 - 06:35

In reply to by अनु राव

"इकडे तुम्हाला लिहू तरी देतात. तिकडे तुम्हाला ब्लॉक केलं असतं." असं अजोंना म्हटल्यासारखं वाटतंय.

नगरीनिरंजन Wed, 30/09/2015 - 16:42

In reply to by अनु राव

आयला! सिरियल किलर्स लोकांना मारत सुटतात. तसे मी करत नाही म्हणून लोकांनी स्वतःला नशिबवान समजून माझे वेडे चाळे मुकाट सहन केले पाहिजेत आणि मला खाऊन-पिऊन सुखी ठेवलं पाहिजे हे लॉजिक माझ्या लक्षात नव्हतं आलं. उगाच संकेत पाळण्यात आणि काम करण्यात आयुष्य वाया घालवलं इतके दिवस.
शिवाय अतिमूर्खांपेक्षा कमी मूर्ख असल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे हेही कळल्याने सगळे न्यूनगंड झटक्यात दूर झाले!!