मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५४
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
Why your middle-class salary is better than you might think
"so much of day is spent doing things that didn't exist [in 1980] that it's hard to believe the numbers fully account for new products."
फेसबुक सारख्या बाबी ज्यांना फक्त फॅड वाटतात व त्यांच्यामुळे काही "व्हॅल्यु अॅड" होत नाही, समाजात काहीही फरक पडत नाही - असा आरडाओरडा जो चाललेला असतो त्यांना हा लेख वाचायला द्यायला हवा.
अर्थात वाचून झाला तरी मर्म समजेलच याची शाश्वती नाही.
अजोंना अनावृत्त पत्र
अजो,
तुम्हाला खरच काही प्रश्न विचारायचे आहेत. अजोंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी.... आग्रह नाही तर विनंती आहे.
.
(१) Why don't you blend in?
(२) Why do you insist on standing out like a sore thumb
(३) खरं तर प्रवाहाविरुद्ध पोहणे ही एक कौतुकास्पद बाब आहे. तो प्लस पॉइन्ट आहे.
(४) पण "judgemental" असणे ही दुसरी बाब झाली. If you can avoid later, the better असे तुम्हाला नाही वाटत का?
(५) तुमचे बरेचसे म्हणजे खूप प्रतिसाद व प्रतिवाद पटण्यासारखेच असतात परंतु, एकच प्रतिसाद "संपादीत" करुन तो जर मुद्द्यांना नंबर घालून वाढवलात तर अधिक उपयुक्त ठरेल - असे माझे मत आहे.
(६) मला असं वाटतं की तुम्हाला संकल्पनेच्या मर्यादा आखण्यात थोडी difficulty होते. मलाही तशीच difficulty आहे, पण दुसर्या एका क्षेत्रात :( सर्वांना हे समजावून घेता येइलच असे नाही. पण अर्थात जास्तीत जास्त लोक निदान प्रयत्न तरी करतात.
(७) सारखे पुरोगामित्व व वैज्ञानिक निष्ठेवरुन बोल लावणे, तगादा लावणे हा मात्र मला मायनस पॉइन्ट वाटतो.
(८) तुमचा हेतू "ट्रोलींग" करण्याचा नसतो हे मला नीरीक्षणातून माहीत आहे. परंतु प्रत्येक वेळी विरोधी भूमिका घेतल्याने तसे वाटत असावे. पण तसे नाही याची मला १००% खात्री आहे.
(९) तुम्ही तर माझे दोस्तही नाही आहात मग मी हे पत्र का लिहीले - मला अशी भीती वाटली की - we might be on the verge of losing you & that is totally uncalled for :(
अजोंना वैयक्तिक पत्र लिहून धारेवर धरल्यासारखे त्यांना वाटल्यास क्षमस्व. अन हा धागा मनातील प्रश्न मालीकेत हलवला तरी चालेल.
- शुचि
अशा पत्रांना अनावृत्तच म्हणतात ना :(.
मला तर भिती वाटते
we might be on the verge of losing you & that is totally uncalled for
मला तर भिती वाटते भारतातील ऐसीचे सदस्य ही इतकी पॉर्नवरची चर्चा वाचून बलात्काराला वगैरे प्रवृत्त होतील की काय? काय पाहील्याने-वाचल्याने कधी कोणाला बलात्कार करण्याची हुक्की येईल सांगता येत नाही!
खर म्हणाल तर मला विकृत पोर्न
खर म्हणाल तर मला विकृत पोर्न म्हणायचे होते. बाकी चहा सुद्धा बिना साखरीचा किंवा अत्यंत गोड दोन्ही प्रकारचा असतो. मधुमेह झालेल्यांना गोड चहा चालत नाही. ... असेच काही तरी आ.हे. शुची ताई आणि अजो यांच्यातल्या विवादाचे कारण हेच.
बाकी कालच 'आजची ज्वलंत चर्चा' हा लेख लिहिला. सर्व पात्र इथेच भेटले, आहे न गमंत. =)) =)) =))
आय अंडरस्टँड, बट इट इज लेट
आय अंडरस्टँड, बट इट इज लेट नाऊ. उदयचा प्रतिसाद क्षणभर अगोदर यायला हवा होता.
====================
मला माझ्या व्यक्तिवाची उणी दुणी चर्चा झालेली अजिबात आवडत नाही. संपादक सदस्यांना त्यांच्या विचारांच्या योग्य असण्याबद्दल इतकं ऑब्सेशन असेल नि इतका इंटॉलरंस असेल तर तत्काळ माझी सदस्यता रद्द करावी. मला माझे विचार कोण्या व्यक्तिला हर्ट करण्यासाठी कसे नाहीत हे एक्सप्लेन करायचा कंटाळा आलाय.
एक अनावृत्त प्रश्न माझाही
>> मला माझ्या व्यक्तिवाची उणी दुणी चर्चा झालेली अजिबात आवडत नाही. संपादक सदस्यांना त्यांच्या विचारांच्या योग्य असण्याबद्दल इतकं ऑब्सेशन असेल नि इतका इंटॉलरंस असेल तर तत्काळ माझी सदस्यता रद्द करावी. मला माझे विचार कोण्या व्यक्तिला हर्ट करण्यासाठी कसे नाहीत हे एक्सप्लेन करायचा कंटाळा आलाय.
एक साधा सदस्य ह्या भूमिकेतून एक प्रश्न विचारावासा वाटतो -
जर तुम्हाला तुमच्या व्यक्तित्वाची उणीदुणी चर्चा झालेली अजिबात आवडत नाही, तर मग हाच न्याय तुम्ही इतरांविषयी मतं व्यक्त करताना लावता की नाही? असं विचारण्याचं कारण हे आहे, की तुमच्या शैलीनुसार तुम्ही अनेकदा ठोस न्यायनिवाडे करत असल्यासारखी ठाम विधानं इथल्या अनेक सदस्यांविषयी करत असता. ती वेळप्रसंगी कठोर वाटू शकतात. हे तुमच्या लक्षात येतं का?
मासल्यादाखल एक उदाहरण देतो :
ज्या शुचिताई तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना त्या पॉर्नच्या धाग्यावर तुम्ही पटकन जाता जाता एका प्रतिसादात हे म्हणाला होतात :
>> शुचितै, तुम्ही पहिले प्रतिसाद वाचायला शिका.
स्रोत : http://www.aisiakshare.com/node/4297#comment-109317
मला जेवढं मराठी कळतं त्यानुसार हे समोरच्याची अक्कल काढणं आहे. तुम्हाला ते तसं अभिप्रेत नसेलही कदाचित, पण सामान्यतः त्याचा अर्थ कसा घेतला जाईल हे मी सांगतो आहे.
शेवटी पुन्हा ए़कदा स्पष्ट करतो की केवळ एक सामान्य सदस्य ह्या नात्यानं माझं कुतुहल म्हणून हे विचारतो आहे. त्यात कोणतीही तक्रार नाही किंवा झाल्या प्रकाराबद्दल कसलीही टिप्पणी नाही.
Shuci and I have a certain
Shuci and I have a certain kind of chemistry. I chose to answer her open letter because it was she.
-----------------
माझं फार उणं दुणं आवडत हे एका संदर्भात होतं. मी वारंवार त्या संदर्भात सांगत होतो कि मला असं म्हणायचं नाही (कोणी विशिष्ट व्यक्ति विकृत नाही), तरीही पुनःपुन मला तेच म्हणायचे आहे हा आरोप पर्सनल होता.
गंमत
आता काय गंमत होते आहे पाहा -
- शुचिताईंना दिलेला तुमचा प्रतिसाद हे केवळ एक उदाहरण होतं. मूळ मुद्दा असा होता की सर्वसाधारण निकष लावून पाहिले तर तुमची शैली कठोर वाटते.
- ह्यावर तुम्ही जो युक्तिवाद देता आहात (Shuci and I have a certain kind of chemistry.) तो त्याच्या व्यक्तिसापेक्षतेमुळे मूळ मुद्द्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही.
म्हणून पुन्हा एकदा वेगळ्या शब्दांत विचारतो - सार्वजनिक अभिव्यक्तीचे सर्वसाधारण निकष लावले तर तुमची शैली कठोर वाटू शकते, आणि त्यातून लोक दुखावले जाऊ शकतात हे तुमच्या लक्षात येतं का?
सार्वजनिक अभिव्यक्तीचे
सार्वजनिक अभिव्यक्तीचे सर्वसाधारण निकष लावले तर तुमची शैली कठोर वाटू शकते, आणि त्यातून लोक दुखावले जाऊ शकतात हे तुमच्या लक्षात येतं का?
हे निकष कोणते?
आणि माझी सार्वजनिक अभिव्यक्ति, योग्य कारणासाठी, कठोर असेल तर त्यात गैर काय?
लोक दुखावले जाणे हा एक ट्रांझिएंट परिणाम आहे, पण अंतिम अपेक्षित परिणाम लोकांनी दुसरी बाजू दिसणं हा आहे. (शुचिच्या उदाहरणात मी काय लिहिलेलं आहे हे तिने वाचलं नाही हे स्पष्ट दिसतंय.)
जनरली व्यक्तिंना परस्परांसोबत १-२ वर्षे संवाद करूनही मिनिमम रिस्पेक्ट आणि ट्रस्ट नसली तर त्या नात्याला काय अर्थ आहे? ती असेल तर छोट्या छोट्या गोष्टीने कोणी दुखावणार नाही. दुखावले जाण्याचे इगो अति असणे, आपले विचार अजिबात चूक नाहीत असा भ्रम असणे हे ही असू शकतं. कठोरता हेच नव्हे.
==============================================================================
बाय द वे, ऐसीवर माझ्याकरिता सर्वात अधिक कुत्सित प्रतिसाद नि श्रेण्या पडतात. मला मिळालेल्या विनोदी, निरर्थक, इ इ श्रेण्या पाहा (१०-२०% योग्य असतील मानू). ८०% सेन्स नही बनता. तर ती शैली कशी आहे याबद्दलही निपक्षपाती मतप्रदर्शन हवं.
By the way, I just talk passionately for what I believe in. मला दुखवायचेच असते तर ते अधिक इल्लॉजिकली आणि डेडिकेटेडली करता आले असते.
माझ्यामते योग्य कारण काय आहे
माझ्यामते योग्य कारण काय आहे हे मलाच माहित असणार ना? ते भारताच्या घटनेत थोडेच लिहिलेले असणार आहे? आणि अबसॉल्यूट योग्य कारण वाचून तुम्ही लोक माझा प्रतिवाद करत असाल तर मला सांगा, इथून पुढे मी ही तोच रेफरन्स वापरेन.
अबसॉल्यूट योग्य कारण मलाच माहित आहे इ इ कोण म्हणतोय? ते तुम्हाला नि मला दोघांना माहित नाही. आणि तुम्हाला ते माहित आहे असे वाटत असेल तर त्यावर मी उभी केलेली प्रश्नचिन्हे?
=============================================
बाय द वे, we are not talking about merit of an argument, we are talking of style of dialogue.
तुमचा ह्याच्या वरचा प्रतिसाद
तुमचा ह्याच्या वरचा प्रतिसाद तरी अॅब्सोल्यूट योग्य कारण तुम्हांला माहिती आहे असे वाटायला लावणारा आहे.
आता लगेच भाषेचे दौर्बल्य वगैरे वगैरे मेगाबायटी प्रतिसाद येईलच.
आणि स्टाईल ऑफ डायलॉग वगैरेबद्दल बोलायचे तर तुमची स्टाईल इतरांना अनावश्यकरीत्या अग्रेसिव्ह वाटू शकते. त्यांना तसे वाटणे हा त्यांचा दोष असेल तर माहिती नाय बा.
बाय द वे, ऐसीवर माझ्याकरिता
बाय द वे, ऐसीवर माझ्याकरिता सर्वात अधिक कुत्सित प्रतिसाद नि श्रेण्या पडतात. मला मिळालेल्या विनोदी, निरर्थक, इ इ श्रेण्या पाहा (१०-२०% योग्य असतील मानू). ८०% सेन्स नही बनता. तर ती शैली कशी आहे याबद्दलही निपक्षपाती मतप्रदर्शन हवं.
ड्युड, दॅट इज व्हॉट ही इज टॉकींग अबाऊट.
सर्वसाधारण निकष ( ते कोणतेही असोत ) लावणारी सर्वसाधारण माणसे ही तुम्हास निगेटिव्ह श्रेण्या देतात. याचा अर्थ हा की सर्वसाधारण माणसांचे निकष लावले तर तुमचे प्रतिसाद हे निगेटिव्ह वाटतात. कठोर हा अनेक निगेटिव्ह विशेषणांपैकी एक आहे.
सर्वसाधारण निकष ( ते कोणतेही
सर्वसाधारण निकष ( ते कोणतेही असोत ) लावणारी सर्वसाधारण माणसे ही तुम्हास निगेटिव्ह श्रेण्या देतात.
सर्व सदस्य (बहुसंख्येने) डिस्ट्रिब्यूटेड पद्धतीने या श्रेण्या देत असतील असं एक गृहीतक यात दिसतं..अजिबात निगेटिव्हिटी नसलेल्या प्रतिसादांनाही सरसकट असंबद्ध श्रेण्या पडलेल्या दिसतात.. सर्व सदस्य मिळून इतकी असंबद्धता आपोआप उत्पन्न करु शकत असतील हे मानणं कठीण आहे. असो.
सर्वसाधारण निकष ( ते कोणतेही
सर्वसाधारण निकष ( ते कोणतेही असोत ) लावणारी सर्वसाधारण माणसे ही तुम्हास निगेटिव्ह श्रेण्या देतात.
१. सर्वसाधारणपणे भारतीय लोक जगातल्या ५०० कोटी गरीब लोकांची निर्दय कत्तल व्हावी असे मानत नाहीत.
२. सर्वसाधारणपणे भारतीय लोक मातेशी संभोग, अन्य इन्सेस्ट इ इ कल्पना अत्यंत किळसवाण्या समजतात.
३. सर्वसाधारणपणे भारतीय स्त्रीया पॉर्न पाहत नाहीत.
४. सर्वसाधारणपणे भारतीयच काय कोणीही लोक बीडीएसएमला अत्यंत घॅणास्पद मानतात. इतके कि उपचार करणार्या डॉक्टरचेच अगोदर बौद्धिक घ्यावे लागते.
५. सर्वसाधारणपणे भारतीय लोक धार्मिक आहेत.
६. सर्वसाधारणपणे भारतीय लोक ईश्वर मानतात.
७. सर्वसाधारणपणे भारतीय ९९% लोक भारतात राहतात नि विदेशात राहिल्याने विदेशातली संस्कृती आपल्यासाठी तशास तशी घ्यायला त्यांना आवडत नाही.
८. सर्वसाधारणपणे भारतीय लोक आपल्या देशाचा न्यूनगंड बाळगत नाहीत.
९. सर्वसाधारणपणे भारतीय लोक परस्परसंमतीने दोन लोकांनी काहीही झक मारावी असे मानत नाहीत.
१०. सर्वसाधारणपणे भारतीय लोक समलैंगिकांचे प्रश्न हा मतदान करण्याचा केवळ आणि केवळ निष्कर्ष ठेवत नाहीत.
११. सर्वसाधारणपणे भारतीय लोक १ लाख रुपये हे मध्यमवर्गीयाचे उत्पन्न मानत नाहीत.
१२. याकुबला फाशी मुसलमान आहे म्हणून झाली असं सर्वसाधारणपणे भारतीय लोक मानत नाहीत.
१३. सर्वसाधारणपणे भारतीय लोक भारतात बलात्कारांचं अंडररिपोर्टींग चक्क चक्क १५ पट कमी आहे असं मानत नाहीत.
१४. सर्वसाधारण भारतीयाला आपली "वाखाणण्याजोगी" प्रगती झाली आहे असे वाटत नाही.
१५. सर्वसाधारणपणे भारतीय लोक दारू वाईट मानतात (पीत असतील.).
१६. सर्वसाधारणपणे भारतीय लोक देशभक्ती, सैन्य लाइक करतात.
ऐसीकरांची याबाबत मते काय आहेत याचे काही सर्वे मी मागे केले आहेत. सबब, सर्वसाधारण काय आहे याचा नि ऐसीचा फारसा संबंध नाही. संस्थळाची प्रशंसा करताना मी एकदा 'इथे मला विरोध करायला खूप काही आहे.' असं म्हणालो होतो. घासकडवींना ते आवडलं देखिल होतं.
आता तुमची जी अशी अनन्यसाधारण मते आहेत, त्यांचेवर मी काही काही प्रश्नचिन्हे उठवतो. नि इथल्या लोकांना ते सहन होत नाही. (तुझा स्वतःचा अपवाद आहे, इतरही अपवाद आहेत जे कूलली उत्तरे देतात वा जौ द्या म्हणतात.)
तज्य ही यादी पूर्न करू शकतात.
अखेरचा प्रयत्न
>> माझी सार्वजनिक अभिव्यक्ति, योग्य कारणासाठी, कठोर असेल तर त्यात गैर काय?
>>लोक दुखावले जाणे हा एक ट्रांझिएंट परिणाम आहे, पण अंतिम अपेक्षित परिणाम लोकांनी दुसरी बाजू दिसणं हा आहे.
दुखावले जाण्याचे इगो अति असणे, आपले विचार अजिबात चूक नाहीत असा भ्रम असणे हे ही असू शकतं. कठोरता हेच नव्हे.
>> सर्वसाधारण काय आहे याचा नि ऐसीचा फारसा संबंध नाही.
>> तुमची जी अशी अनन्यसाधारण मते आहेत, त्यांचेवर मी काही काही प्रश्नचिन्हे उठवतो. नि इथल्या लोकांना ते सहन होत नाही.
पुन्हा एकदा शांतपणे उकलून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.
- झाल्या प्रकाराचा तुम्हाला त्रास झाला आहे हे तुम्ही ह्याच धाग्यावर कबूल केलेलं आहे.
- तुमच्या शैलीत आणि तुमच्या आशयातही खोडकरपणा असतो हेसुद्धा तुम्हाला कळतंय. उदा : "बरेचदा मी खवचट, पाय ओढू, थिल्लर, पांचट, डिवचणे, चिडवणे, इ इ लिहितो."
- समोरच्याचा रोष ओढवून घेतला, तर तो आपल्या म्हणण्याला सीरियसली घेत नाही हेसुद्धा तुम्हाला कळतंय. उदा: "मूळातच समोरचा काय म्हणतोय याबद्दल अभूतपूर्व अँटागोनिझम असला तर त्याचं खरं म्हणणं पोचत नाही."
- इथे तुमचे काही हितचिंतकसुद्धा हे सांगू पाहात आहेत की भाषेमुळे तुम्ही लोकांचा रोष ओढवून घेता.
मग आता असं असूनही आपल्या वर्तनातल्या ह्या त्रासदायक घटकांना मुरड घालायला तुम्ही जर तयारच नसाल, आणि उलट काही लोक केवळ आपापले इगो सुखावण्यासाठी तुमच्या मागे लागलेले आहेत किंवा तुमच्याविरोधात तुम्हाला छळण्यासाठी टपलेले आहेत असंच जर तुम्ही मानत राहणार असाल, तर परिस्थितीत काही सकारात्मक बदल व्हावा अशी अपेक्षा कशी ठेवता येईल? "इगो अति असणे, आपले विचार अजिबात चूक नाहीत असा भ्रम असणे" हे घटक जसे इतरांच्या बाबतीत ग्राह्य असू शकतील, तसेच ते तुमच्या बाबतीतही ग्राह्य कशावरून नसतील?
थोडक्यात, प्रयोगातला एक तरी व्हेरिएबल बदलला नाही, तर कितीही वेळा प्रयोग केला तरी अंतिम निकाल तोच तोच येत राहणार ना?
असो. ह्या विषयावर माझ्याकडून लेखनसीमा.
मग आता असं असूनही आपल्या
मग आता असं असूनही आपल्या वर्तनातल्या ह्या त्रासदायक घटकांना मुरड घालायला तुम्ही जर तयारच नसाल, आणि उलट तुमच्याविरोधात काही लोक केवळ तुम्हाला छळण्यासाठी टपलेले आहेत असंच जर तुम्ही मानत राहणार असाल, तर परिस्थितीत काही सकारात्मक बदल व्हावा अशी अपेक्षा कशी ठेवता येईल? "इगो अति असणे, आपले विचार अजिबात चूक नाहीत असा भ्रम असणे" हे घटक जसे इतरांच्या बाबतीत ग्राह्य असू शकतील, तसेच ते तुमच्या बाबतीतही ग्राह्य कशावरून नसतील?
तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे. मान्य आहे. या काही लोकांकडे मी जास्तीत जास्तदा दुर्लक्षच करतो. इथे बर्याच लोकांना माझे विचार आवडतात, कंसिडरेबल वाटतात, इ इ देखिल आहे. माझ्या वर्तनातल्या सगळ्या त्रासदायक घटकांना मुरड घालायला माझी काही हरकत नाही. (आणि हा त्रास केवल खोडसाळ लोकांनाच व्हावा अशी पण मी कालजी घेतो.) . मलाही इगो आहे. माझीही अग्राह्य मते असतील.
--------------
तरीही मी नेहमी रिजनॅबिलीटी जपून लिहितो. म्हणूनच नै का २ वर्षे इथे मजा केली? पण एखादा घटक एखादा फोरमच स्पॉइल करत असेल तर तो प्रश्न चव्हाट्यावर घ्याय्ला पाहिजे. तो प्रश्न मी चव्हाट्यावर घेत आहे. आज दोन सदस्यांना तांत्रिकदृष्ट्या विकृत विशेषण लागले तर लगेच त्याची (संस्थळाकडून) प्रचंड दखल घेण्यात आली. पण माझ्या आजवरच्या अनंत मतांना निरर्थक, खोडसाळ, भडकाऊ, इ इ म्हटले गेले तेव्हा संस्थळ गप्प होते. ही विशेषणे कमी भयानकतेची नाहीत. ती बर्याच ठिकाणी उचित असतील पण जास्तीत जास्त जागी (९०%) शुद्ध वैयक्तिक नि खोडसाळ होती. मग त्यावेळेस तत्काल दखल का घेतली नाही?( उदा. ग्रेटथिंकर यांनी नाव न घेता जे म्हटले ते का चालते? वॉज दॅट इन गुड टेस्ट?)
I write here under a good faith that the website is neutral. The editors may have different ideologies in personal capacity, but they are neutral when it comes to freedom of speech. But now I have queries, doubts : 1. Are they really impartial? 2. Do they really understand the concept of freedom of speech? I have my reasons for thinking so.
------------------------------------------
इथल्या अनन्यसाधारण विचारांच्या गर्दीत मी शक्य तितक्या सकारात्मकरित्या माझे साधारण विचार मांडायचा प्रयत्न करेन.
पुन्हा एक अनावृत्त प्रश्न
>> आज दोन सदस्यांना तांत्रिकदृष्ट्या विकृत विशेषण लागले तर लगेच त्याची (संस्थळाकडून) प्रचंड दखल घेण्यात आली. पण माझ्या आजवरच्या अनंत मतांना निरर्थक, खोडसाळ, भडकाऊ, इ इ म्हटले गेले तेव्हा संस्थळ गप्प होते.
तुमचे प्रतिवाद वाचून मला खरंच कळत नाही आहे. पुन्हा एकदा स्पष्टपणे विचारतो : तुमची भाषा इतरांना त्रासदायक वाटू शकते हे तुम्हालाच जर मान्य आहे आणि किमान काही वेळा तुम्हाला तसा परिणाम जर अभिप्रेतही असेल, तर हा प्रकार आवडत नसूनही केवळ एका संस्थळसदस्याचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य करून तो इतके दिवस सहन केला जात असेल अशी शक्यतादेखील तुम्हाला जाणवतच नाही का?
कमॉन, मी लिबरली त्रास वाटू
कमॉन, मी लिबरली त्रास वाटू शकतो, कधी कधी मी देतो असं म्हटलं आहे. म्हणजे मी दुष्ट, सहन करावा लागणारा आयडी आहे असं अज्जिबातच होत नाही. सॉरीच. अशी कोणतीच शक्यता नाही.
माझ्यामते मी संस्थळाच्या टॉप १०% उत्तम वर्तन असणार्र्या सदस्यांपैकी एक आहे. मे बी टॉप ५%.
असो
>> माझ्यामते मी संस्थळाच्या टॉप १०% उत्तम वर्तन असणार्र्या सदस्यांपैकी एक आहे. मे बी टॉप ५%.
तुमची अभिव्यक्ती लोकांना कठोर वाटू शकते हे मान्य करता; त्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतात हे मान्य करता; आणि तरीही असं म्हणता? ह्यापुढे काय सांगणार? स्वतःविषयी थोडा लीन* दृष्टिकोन बाळगणं कधी कधी हितावह असतं एवढंच सांगतो. संपादक म्हणून नव्हे; एक हितचिंतक म्हणून. असो.
* लीन - नम्र; आदरशील; सौम्य वृत्तीचा.
स्रोत : दाते कर्वे शब्दकोश.
गवि, थत्ते, उदय, म्हणतात ते
गवि, थत्ते, उदय, म्हणतात ते पाहून (यात शुचितैचा संबंध नाही)...
I was just not aware that the lobbies on this site are so strong and so sensitive.
-----------------------------
कृपया मला कोणी मार्गदर्शन करा की माझ्याशी जे सर्वत्र तथाकथित वैचारिक संवांद होतात ते देखिल गाईडेड असतात का? मी हे एक मुक्त, विचारी संस्थळ आहे असे मानत आलेलो आहे. अजूनही मानतो. माझ्या वैचारिक विरोधकांच्या एखाद्या वैचारिक मतावर माझं निगेटिव मत असेल, पण त्यांच्या बाकीच्या किंवा पर्सनल गोष्टीबद्दल मला अजिबात देणं घेणं नाही.
I have always been told that there is, as such, no serious lobby against anyone here and I have taken this on face value. चर्चांत चमू बनत्तात त्यापलिकडे काही नाही. But if this is otherwise, I would like to know. Respect, trust, etc must be reciprocal in a relationship. I don't want to befool myself being in the company of members most of whom largely don't like me as a person or member.
आपण व्यनितून आपलं जे काही बरं वाईट मत आहे ते सांगाल तर उप्युक्त असेल.
I have always been told that
I have always been told that there is, as such, no serious lobby against anyone here and I have taken this on face value.
ट्रॅक रेकॉर्ड इफेक्ट खूप स्ट्राँग आहे इथे हे निश्चित. ( इतर संस्थलांवरही असेल असा माझा अंदाज आहे. )
तुमचे एखाद्या विशिष्ठ धाग्यावरचे विचार हे - it does not stand on its own. ते तुमच्या इतर धाग्यांवरच्या, व इतर प्रतिसादांच्या काँन्टेक्स्ट मधे पाहिले जातील.
( ते तसे असावे व्/वा नसावे असा माझा आग्रह नाही. )
मला प्रचंड कंटाळा आला आहे. पण
मला प्रचंड कंटाळा आला आहे. पण ...
१. ब्लेंड किती व्हायचं? मला पॉर्न आवडतं, मी पाहतो. पॉर्नचे खूप सारे चांगले परिंणाम असतात म्हटलं. पॉर्नचा एकही चांगला अस्पेक्ट मी नाकारलेला नाही. अब क्या बच्चे कि जान लोगे?
२. सोर थंब - देअर इज वन मोर साइड टू पॉर्न. ईट इज अंडर स्टडी. धक्कादायक निकाल आहेत.
३. प्रवाहाविरुद्ध - मी आपला आपला एका कोपर्यात डूंबक्या मारू इच्चितो. सारा प्रवाह माझ्या विरोधात वाहायचे ठरवतो. ;) पॉर्न पाहू नये म्हणणारे, वाईट असते म्हणणारे अनेक देवभोळे लोक असतीलच. (ऐसीवर तुमची अभिव्यक्तिस्वातंत्र्याची लायकी नाही म्हणून पळवले गेलेत सगळे बहुतेक). तुम्ही मलाच का बदडता?
४. जजमेंटल - आडकित्ता फारच पातळी सोडून बोलला. इतकं प्रचंड नीच, घाण ऐसीवर अगोदर कोणी बाललं नसावं. अशावेळी असा न्यूसंस कंटेन नाही केला तर तो अजून १०० दा पातळी सोडेल. म्हणून मी इन काइंड बोललो. तुम्ही तो प्रतिसाद वाचलाय, माझी प्रतिक्रिया नैसगिक नव्हती का? बाकी मी कुणाला जजमेंटल वैगेरे बोललो नाही.
५. ओके.
६. संकल्पना - मूळातच समोरचा काय म्हणतोय याबद्दल अभूतपूर्व अँटागोनिझम असला तर त्याचं खरं म्हणणं पोचत नाही. आणि त्याने भयंकरच भिन्न अस्पेक्ट मांडला असता तर कधीच नाही.
७. धर्म, संस्कृती, देश यांना ऐसीवर एकूण जी दुषणे मिळतात त्यापेक्षा मी दिलेली दुषणे १/२० असतात. हा तुमच्या टॉलरन्सचा प्रश्न आहे. त्या दुषणात मेरिट नाही म्हणा, दुषण लावायचं नाही मंजे काय? उद्यापासून तुम्हीपण देवाधर्माला नका लावू. अनेकांची त्यांत आस्था असते.
८. थँक्स. बरेचदा मी खवचट, पाय ओढू, थिल्लर, पांचट, डिवचणे, चिडवणे, इ इ लिहितो. अर्थात समोरच्याच्या अपेटैटची थोडीफार कल्पना असते. आय अॅम नॉट अ सिरियस चॅप. जालावर एकाच प्रतिसादात दोन साहित्य रस नीट मिक्स करता येत नाहीत. रियल लाइफ मधे सोपं आहे.
९. इफ आय अॅम लॉस्ट, आय विल बी व्हिक्टीम ऑफ फॅशनेबल प्रोग्रेसिव हर्ड मेंटॅलिटी. द पीपल हू वान्ट टू ड्राइव मी आउट आर नॉट एबल टू डायजेस्ट द थॉट दॅट वन ऑफ दिअर थॉट्स कॅन बी रॉङ्ग, अॅट लिस्ट इन समवन एल्सेस ओपिनिअन.
आय विल बी हॅपी टू स्टे अवे फ्रॉम सच हर्ड.
माझ्या प्रश्नांना सविस्तर
माझ्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलत त्याबद्दल आभारी आहे.
(१) अब क्या बच्चे कि जान लोगे?
मान्य आहे तुम्ही पोर्न बद्दल चांगलं (न्युटरल + फायदे) ही बोललात व तोटेही मांडलेत. Appreciated.
(२) सोर थंब - देअर इज वन मोर साइड टू पॉर्न. ईट इज अंडर स्टडी. धक्कादायक निकाल आहेत.
स्टडीज चं काय एकदा सांगतात कॉफी प्रकृतीस बरी एकदा म्हणतात घातक. फाट्यावर मारायला हवेत हे स्टडीज.
(३) तुम्ही मलाच का बदडता?
तेच सांगतेय अजो तुम्हाला कोणीही बदडत नाहीये. मी सुद्धा अनेकदा टीका किंवा साधे विनोदही वैयक्तीक घेते. पण तसे करणे बरोबर नाही .
(४) जजमेंट
आडकित्तांचा किस्सा जाऊ द्यात तेव्हा मीही तुमची बाजू घेतली होती. पण just watch out for such tendency एवढेच म्हणायचे होते. का तर - तुम्ही approachable आहात म्हणून.
(६) संकल्पना
??
(७) धर्म, संस्कृती, देश यांना ऐसीवर एकूण जी दुषणे मिळतात त्यापेक्षा मी दिलेली दुषणे १/२० असतात. हा तुमच्या टॉलरन्सचा प्रश्न आहे. त्या दुषणात मेरिट नाही म्हणा, दुषण लावायचं नाही मंजे काय? उद्यापासून तुम्हीपण देवाधर्माला नका लावू. अनेकांची त्यांत आस्था असते.
आस्तिक कधीही नास्तिकांना समजू शकणार नाहीत आणि vice versa. दोघे एकमेकांसाठी enigma रहाणार.
(८)आय अॅम नॉट अ सिरियस चॅप.
Agree. तो प्लस पॉइन्ट आहे. जे लोक स्वतःला फार सिरीअसली घेतात ते विनोदीच वाटतात.
(९) आय विल बी हॅपी टू स्टे अवे फ्रॉम सच हर्ड.
Please don't. इथे वृतींंची जी सरमिसळ आहे तीच लोभस आहे. एक जरी घटक कमी झाला तरी त्याची कमी भासेल.
आय विल बी हॅपी टू स्टे अवे
आय विल बी हॅपी टू स्टे अवे फ्रॉम सच हर्ड.
प्लीज फील फ्री टु फॉलो युअर हार्ट. नन ऑफ अस वॉंट टु कम बिटवीन यू अॅंड युअर हॅपीनेस.
तुम्हाला या 'हर्ड'मधले लोक शांतपणे समजावून देण्याचा प्रयत्न करत आहेत की तुमची भाषा अग्रेसिव्ह असते, तुम्ही व्यक्तिगत पातळीवर येऊन लोकांना सहजपणे विकृत वगैरे म्हणून जाता, संबंध नसताना अकारण त्राग्याने बोलता. इतकं असून त्याबद्दल आत्मपरीक्षण करण्याऐवजी कारणं देत आहात हे उघड आहे. पण एका विशिष्ट मर्यादेनंतर सर्वांनाच कंटाळा येणार आहे, आत्ताच यायला लागलेला आहे. तेव्हा सतत तुम्हाला आणि इतरांना त्रास होत राहावा यात काय हशील आहे?
(१) Why don't you blend
(१) Why don't you blend in?
शुचीतै - असे सगळेच ब्लेंड होऊन गेले तर सगळे कसे सपक आणि सपाट होईल ना.
(३) खरं तर प्रवाहाविरुद्ध पोहणे ही एक कौतुकास्पद बाब आहे. तो प्लस पॉइन्ट आहे.
फक्त अजोंचा प्लस पॉईंट म्हणजे प्रवाह कुठल्याही दिशेचा असो, अजो विरुद्ध दिशेनीच पोहतात ( असा माझा तरी अनुभव आहे). पॉर्न च्या धाग्यावर पण जर ऐसी मेंबरांचा ( आणि खास करुन संपादकांचा ) पॉर्न बद्दल निगेटीव्ह दृष्टीकोन दिसला असता तर अजोंनी पॉर्न बघण्याचे जोरदार समर्थन केले असते असे मला खरच वाटते. अजो सेक्युलरांमशी हिंदुत्ववादी होउन, हिंदुत्ववाद्यांशी सेक्युलर होउन , गब्बरशी समाजवादी, आणि चिंजंशी उजवे होउन बोलतात.
(८) तुमचा हेतू "ट्रोलींग" करण्याचा नसतो हे मला नीरीक्षणातून माहीत आहे. परंतु प्रत्येक वेळी विरोधी भूमिका घेतल्याने तसे वाटत असावे. पण तसे नाही याची मला १००% खात्री आहे.
हा अजोंना प्रश्न आहे का? का ४ थोबाडीत मारुन नंतर गालावरुन हात फिरवण्याचा प्रकार आहे? :p
तरी पण एकुणात, अजोंनी गेल्या ३-४ दिवसात मला तरी अगदी निखळ आनंद दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत. अजो - कृपा करुन ब्लेंड वगैरे होऊ नका.
असे सगळेच ब्लेंड होऊन गेले तर
असे सगळेच ब्लेंड होऊन गेले तर सगळे कसे सपक आणि सपाट होईल ना.
अनु राव, तुम्हास पार्टी माझ्यातर्फे.
सगळ्यांनी कसे न कुरकुरता ब्लेंड व्हावे ही अपेक्षा का ??
Teamwork वर असलेल्या अतिरेकी एम्फॅसिस ची सुमधुर फले आहेत ही.
डॅनियल काह्नेमन चा - legitimize dissent - बद्दलचा व्हिडिओ आठवला.
सगळ्यांनी कसे न कुरकुरता
सगळ्यांनी कसे न कुरकुरता ब्लेंड व्हावे ही अपेक्षा का
अशी अपेक्षा करु नये हे मला समजत नाही का? का मी मूर्ख आहे? आपल्या नजरेत असू शकते. पण तुम्ही कॉन्टेक्स्ट कडे दुर्लक्ष करताय. अन आपल्याला फार कळतं असा अविर्भाव आणताय. असो चालू द्यात तुमचं निरर्थक आत्मरंजन का काय.
.
eamwork वर असलेल्या अतिरेकी एम्फॅसिस ची सुमधुर फले आहेत ही.
अगदी अगदी. तुम्हाला कोणी सांगीतलं की मी टीमवर्क वर आहे? You are getting personal unnecessarily.
____
JUST STOP IT.
____
अनु रावांशी १००००० दा सहमत व्हा पण माझा निरर्थक उपयोग कशाला करुन घेताय?
फक्त अजोंचा प्लस पॉईंट म्हणजे
फक्त अजोंचा प्लस पॉईंट म्हणजे प्रवाह कुठल्याही दिशेचा असो, अजो विरुद्ध दिशेनीच पोहतात ( असा माझा तरी अनुभव आहे). पॉर्न च्या धाग्यावर पण जर ऐसी मेंबरांचा ( आणि खास करुन संपादकांचा ) पॉर्न बद्दल निगेटीव्ह दृष्टीकोन दिसला असता तर अजोंनी पॉर्न बघण्याचे जोरदार समर्थन केले असते असे मला खरच वाटते. अजो सेक्युलरांमशी हिंदुत्ववादी होउन, हिंदुत्ववाद्यांशी सेक्युलर होउन , गब्बरशी समाजवादी, आणि चिंजंशी उजवे होउन बोलतात.
हे खरं आहे. जगातल्या सगळ्याच तत्त्वज्ञानांचे प्रणेते अतिशय महान नि उदार होते. त्यांनी मानवकल्याणासाठी या सार्या विचारसरणी पुढे आणल्या. अनेकांनी तर व्यक्तिगत जीवनाची माती करून समाजजीवनाचा विचार केला. यात कम्यूनिस्ट, भांडवलवाद, समाजवाद, धर्मवाद, अध्यात्मवादी, स्त्रीवाद, उत्क्रांतीवाद, विज्ञानवाद, धर्मनिरपेक्षता,...., ..., यादी प्रचंड लांब आहे. कालांतरांने ही कोलितं त्या विचारसरणींच्या अंध अनुयायांना मिळाली. ते त्यांच्या मर्यादा आणि उद्दिष्टे विसरली. या सर्व विचारसरणींचा दुरुपयोग चालू झाला. त्यांच्या फायद्यांपेक्षा तोटे जास्त वाटू लागले.
मग पुरोगामीता, विवेकवाद, आधुनिकतावाद या चळवळी (किंवा विचार) जगातल्या अत्यंत सुज्ञ, बुद्धिमान, कल्याणकारी विचारांनी प्रेरित झालेल्या लोकांनी चालू केल्या. वर लिस्टलेल्या अनंत वादांचे पाईक आपली भांडणे काही थांबवणार नाहीत, आपला इगो नि स्वार्थ काही सोडणार नाहीत तेव्हा त्या फंदात न पडता आहे त्या परिस्थितीत काय करावे? या सगळ्या वादांची, त्यांना विरोध नाही केला तरी, आधुनिक जगात राबवता येईल अशी फ्रेमवर्क नव्हती/नाही. बरेच गॅप्स होते. कुठे यश कुठे अपयश येई. त्यांचा आधार घेत या सुज्ञ लोकांनी सगळीकडेच मुसंडी मारली. उदा. मी कर्मठपणे धर्म पाळतो म्हणणारा १०० जणांच्या जागी १० मी आधुनिक धर्म पाळतो, १५ मी विवेकी धर्म पाळतो, २० मी प्रगत धर्म पाळतो असे म्हणणारे उभे राहिले. (मी अगोदरच आधुनिक आहे असं म्हणणारे स्पॅम ४० देखिल उभे राहिले ;) )असं प्रत्येक विचारसरणीचं होऊ लागलं.
बाकी सगळे वाद, तत्त्वज्ञाने आहेत पण पुरोगामीता, विवेकवाद नि आधुनिकता ही टूल्स आहेत. मला सहसा असं वाटतं कि समाजाचं तत्त्वज्ञान काय आहे, वाद कोणता आहे, हे फारसं महत्त्वाचं नाही, टूल्स कशी वापरली जातात, तत्त्वज्ञानाचा अर्थ काय काढला जातो, ते कसं अवलंबिलं जातं हे महत्त्वाचं आहे. एकिकडे या टूल्स वापर करून सगळे वाद शुद्ध अवस्थेत ठेवणं गरजेचं आहे, दुसरीकडे ही टूल्सच माकडांच्या हाती पडून त्यांची लोककल्याणाशी असलेली नाळ तुटू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात लोककल्याण कशात आहे याबद्दलची माझी मतं अपरिपक्व असू शकतात हे मला मान्य आहे.
पण एक गणवेश, एक झेंडा, एक स्लोगन, एक झुंड, एक जोष .... सॉरी, नॉट कप ऑफ माय टी.
========================================================================================
४ थोबाडीत मारुन नंतर गालावरुन हात फिरवण्याचा प्रकार आहे?
संस्थळाचे सगळे नियम पाळून, प्रतिमा जपून, अत्यंत साळसूदपणे, सयंत भाषेत देखिल व्यक्तिगत भावना दुखवता येतात. I avoid it to the maximum extent possible, as a policy. पण अशी वाक्ये वाचल्यावर मी चूक करतो असे मला वाटते. असो.
रेनॉल्ड्स
जी. डब्लू. एम रेय्नॉल्ड्स हा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात खूपच लोकप्रिय असलेला एक बहुप्रसव लेखक. (विकीवर पुष्कळ माहिती आहे.) याच्या लेखनातून छोटीछोटी रहस्ये, मोठ्या लोकांची माफक कुलंगडी, माफक रोमान्स,(त्या काळचा प्रणय!) गूढ किल्ले-भुयारे अशा गोष्टी असत आणि त्या काळातल्या सनातनी वातावरणात त्या मिटक्या मारीत वाचण्याजोग्या असत. आपल्याकडे साधारणपणे १९३०-३५ पर्यंत यांचे आकर्षण होते आणि ही पुस्तके म्हणजे दुसर्या 'सभ्य' पुस्तकांत धरून वाचण्याची गोष्ट होती. नाथ माधवांनी बीजरूपाने रेनॉल्ड्सचा आधार घेतलेला असू शकतो. पण मला वॉल्टर स्कॉटचा प्रभाव अधिक जाणवला. त्या काळात दोन आणे माला म्हणून पुस्तके असत त्यात पिवळ्या टोळीचे रहस्य वगैरे कथा असत आणि त्यांची गणना चटोर पुस्तके म्हणून होई. आपल्याकडे तर अगदी अलीकडेपर्यंत अर्नाळकरी काळा पहाड वगैरे वाचणे हे सवंग समजले जाई. पण त्या काळातल्या काही (मातब्बर अशा) लेखकांच्या लेखात 'आम्ही रेनॉल्ड्स वाचत होतो' असे उल्लेख वाचले आहेत. नक्की संदर्भ आठवत नाही, अथवा फडके वगैरे असा नामोल्लेख केला असता.
क्लासिक म्हणावा असा हा लेखक नव्हता. आजकाल डिकन्ससुद्धा कोणी वाचणार नाही तर रेनॉल्ड्स्ची काय कथा.
आणखी कोणी लोकप्रिय रेनॉल्ड्स असल्यास माहीत नाही.
नाही गवि. मीच लॉजीकल डिबेट
नाही गवि. मीच लॉजीकल डिबेट करण्यापेक्षा सोप्पा मार्ग - आक्रस्ताळेपणाचा निवडला. आय अॅम सॉरी.
____
कॉफी घेतल्यावर जरा बरं वाटतय. :).
______
हां तर, अजोंना कॉर्नर करणं बरोबर नव्हतं. पण मला वाटालं की ते सोडून जातील म्हणून भीतीने मी धागा काढला. पण नको होता काढायला, कारण खव ची सुविधा होती.
आजचा दिवस बंडल गेलाय
आजचा दिवस बंडल गेलाय (कोणत्याही बाह्य कारणामुळे नसून , हवा बदल + घरातील काही बदल यांचेमुळे.)
पण म्हणून आता गणितात घुसून बसले होते. येत नाहीये सोडवता पण मजा आली.
काय ओ, मॅडम !!!
गुस्सा गेला का ?
:)
_____
काहीच्या काही अवघड आहे तो थिअरम सोडवणे. नेटवरचं प्रुफ कळत नाहीये.
काहो शुची तै - मी तर माझ्या
काहो शुची तै - मी तर माझ्या प्रतिसादात अजोंना मनापासुन धन्यवाद दिले होते. काही लोकांचे प्रतिसाद वाचुन जाम चीडचीड होते ( एकुणच विचारसरणी आणि उद्धटपणा बघुन ). अजोंचे प्रतिसाद जरी पटले नाहीत तरी मानसिक त्रास कधी होत नाही, बर्याच वेळेला मस्त हसायला येते.
अर्थात वाचून झाला तरी मर्म
अर्थात वाचून झाला तरी मर्म समजेलच याची शाश्वती नाही.
मर्म मला समजले नाहीच पण धागाकर्त्याचा आत्मविश्वास पाहून हसू मात्र आले. थोडक्यात मध्यमवर्ग पूर्वीपेक्षा कमी कमवतोय पण दुसरे काय-काय मजा करतात ते पाहून निराश वाटण्यासाठी किंवा आपण भारी आयुष्य जगतोय असे प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांच्याकडे फेसबुक आहे. सतत ऑनलाईन असल्याने काहीही एक नीट न वाचता फालतू विनोद ढकलणारे व्हॉट्सअॅपसारख्या "सोयी" आहेत. झोपेचं खोबरं होतंय. आणि सतत फोनकडे बघून मानेचं आणि डोळ्यांचं वाटोळं होतंय. कामाचे तास वाढताहेत; पण तरीही १९८० पेक्षा मध्यमवर्ग आज बेटर ऑफ आहे कारण "ही प्रॉडक्ट्स असणे म्हणजे सुख" असे इकॉनॉमिस्ट लोकांनी ठरवले आहे.
माझी आकलनशक्ती फारच कमकुवत आहे. काहीच समजत नाही मला.
पण तो विकल्प वापरला तर मी
पण तो विकल्प वापरला तर मी वर्स ऑफ होईन ना! म्हणजे इकॉनॉमिकली माझ्याकडे विकल्प नाहीच आहे!
थोडक्यात असं की तुम्ही गरीब होत चालला आहात पण तुम्ही इंटरनेट व स्मार्टफोन वापरल्यास तुम्ही गरीब नाही. या गोष्टी न वापरायचे ठरवले तर तुमच्या गरिबीला तुम्हीच कारणीभूत!
विचार करण्यासारखा प्रतिसाद
अाहे ननि तुमचा. मोठ्या अाैद्योगिक अास्थापनांनी (कंपन्या) चांगलं, समृध्द, सुखी जीवन कशाला म्हणायचं याविषयी अापल्या ग्राहकांना शिक्षित करण्याचे अनेक मार्ग इन्नोव्हेट केले अाहेत. त्यांच ध्येय अगदी सरळ अाहे - केंद्रीकरण, वाढता बाजारपेठेचा हिस्सा,अार्थिक फायदा. ़फेसबुक, व्हाॅटस् अॅप, अायफोन, गुगल सर्च कम अॅड्स इ. ही त्याचीच उदाहरणे नाहीत काय? गंम्मत अशी की या गोष्टी सरळ कधीच नसतात. काहीही वाईट नुसतं खपवता येत नाही, त्याची चांगल्याशी अगदी योग्य प्रमाणात भेसळ केली, की विरोध करणारांची हवा निघून जाते. त्यामुळे मग या सार्या तंत्रज्ञानाचे फायदे हे नव्या जीवनासाठी कसे अावश्यक अाहेत असं समाजाचं एज्युकेशन केलं, की झालं.
सुखाची आणि समृद्धीची व्याख्या
सुखाची आणि समृद्धीची व्याख्या अशी एकच नाही; पण जिथे माणसे छोट्या-छोट्या गटांमध्ये स्वेच्छेने राहतील, कोणालाही बेसिक जगण्यासाठी दुसर्यावर अवलंबून राहावे लागणार नाही, दुसर्याची मर्जी राखावी लागणार नाही. लोकांना भरपूर मोकळा वेळ असेल (ज्या परिस्थितीत माणूस इव्हॉल्व्ह झाला (म्हणजे भरपूर प्रोटीन्स मिळून मेंदू विकसित होणे वगैरे) त्या परिस्थितीत त्याला अन्नासाठी इतकी वणवण करावी लागत नाही जितकी आज करावी लागते; पण मिथक मात्र अगदी उलट आहे). जिथे माणसे जीव मुठीत धरुन राहणार नाहीत; दुसर्याला मदत करण्यासाठी फार विचार करावा लागणार नाही; जरा कुठे चाकोरीबाहेर पाय टाकला तर आहे ते गमावू ही भीती असणार नाही; जिथे पॉवरलेसनेसची किंवा कोट्यवधींपैकी एक असल्याची भावना असणार नाही; जिथे अमुक एक कौशल्य असलेला यशस्वी आणि बाकीचे अपयशी अशी बिनडोक विभागणी असणार नाही; जिथे कशाचाही साठा करायची लोकांना गरज वाटणार नाही ते सुख आणि ती समृद्धी.
(संभाव्य प्रतिक्रिया: हे व्यवहारी नाही, भाबडेपणा आहे, मूर्खपणा आहे इ.इ.)
आय फोन ६ च्या जाहिरातीतला नायक शेवटच्या सीन मध्ये
आयफोन ६ ची सध्याची जाहिरात एकदा बारकाइने बघा. नायक नवरदेव हा वधुचे फोटु आयफोन ६ वर बघत असतो. ती फोटोतुन त्याला चकवत असते. नेहमीचा स्वीट चकवाचकवी चा खेळ. मात्र एकदा नायकाचे जाहीरातीच्या सुरुवाती पासुन ते अगदि शेवटच्या सीन मधले चेहर्या वरचे भाव बघा. सुरुवातीचं हसण, हुरहुर सर्व अगदि सर्व भाव सहज समजतात. त्याला नेमकं काय वाटतय हुरहुर अधीरता इ. इ. सगळ सरळ समजत लक्षात येत. मात्र अगदि शेवटच्या सीन मध्ये जेव्हा त्याच्या वधु टप्य्यात ( नजरेच्या ) येते अगदि लास्ट सीन मध्ये ती हसत हसत त्याच्या कडे बघते. तेव्हा या नरश्रेष्ठा च्या चेहर्यावर जे भाव उमलतात ( तो अगदि किंचीत हसतो दोन्ही बाजुने स्लाइटली स्माइल करतो ) मात्र आता पुर्वीची अधीरता गायब झालेली दिसते आनंद हि दिसत नाही काही म्हणजे काही च कळत नाही की बेट्याच्या मनात अगदि नेमक चाललय तरी काय ?
मोनालिसा च्या गुढ स्माईल नंतर त्याच्या कैक पट गुढ स्माईल म्हणजे नुसत स्माइल नाहि तेव्हाचे पुर्ण चेहर्या वरचे भाव फार च गुढ आहेत.
तो नेमक काय व्यक्त करत असतो? त्याच्या चेहर्या वरचा भाव काय दर्शवतो? त्याच्या मनात काय चालु असेल ?
मला फार कुतुहल आहे जाणुन घेण्यात प्लीज एक्स्प्लेन जर तुम्हाला जाहिरात कळली असेल तर.
माझ व्हर्ज्ञन तो एका सराइत शिकारी असल्या सारखा आता तिला न्हाहाळत आहे. एक्साइटमेंट हुरहुर अधीरता सर्व संपलेली आहे आता या शेवटच्या सीन मध्ये त्याचा निळु फुले वुइथ पेशन्स झालेला आहे अस मला उगीचच वाटत मात्र अर्थात अर्थाच्या अनेक शक्यता त्यात दडलेल्या आहेत असे प्रामाणिक पणे मी मानतो.
एका कवितेचे अने अर्थ निघतात तस काहिस.
मोनालिसाच्या चित्राची एक कॉपी
मोनालिसाच्या चित्राची एक कॉपी घेतली,.अन तिला चुरगाळली, फिरवली, enlarge केली. काहीही केले पण जर आपण ती कॉपी ओरीजनल चित्रावर ठेवली, एक तरी बिंदू असा मॅच होइल की मूळ चित्रात व कॉपीत तो सेम असेल. मग तो बिंदू डोळ्यावरचा, हास्यातला, कानावरचा कसाही असो.
या उदाहरणात जे प्रमेय लागते त्याचे प्रुफ वाचले = Brouwer’s Fixed Point Theorem.
Every continuous function f : Dn → Dn has a fixed point.
मला हे सांगा की - मी चित्र एनलार्ज केलं किंवा लहान केलं, तर f : Dn → Dn कसे?
..... मला ते कळत नाहीये.
domain जर Dn आहे तरी Range Dn कशी?
मोनालिसाच्या चित्राची एक कॉपी
मोनालिसाच्या चित्राची एक कॉपी घेतली,.अन तिला चुरगाळली, फिरवली, enlarge केली. काहीही केले पण जर आपण ती कॉपी ओरीजनल चित्रावर ठेवली, एक तरी बिंदू असा मॅच होइल की मूळ चित्रात व कॉपीत तो सेम असेल. मग तो बिंदू डोळ्यावरचा, हास्यातला, कानावरचा कसाही असो.
या उदाहरणात जे प्रमेय लागते त्याचे प्रुफ वाचले = Brouwer’s Fixed Point Theorem.
Every continuous function f : Dn → Dn has a fixed point.
मला हे सांगा की - मी चित्र एनलार्ज केलं किंवा लहान केलं, तर f : Dn → Dn कसे?
जादुच होयला पाहीजे.
एक तरी बिंदू असा मॅच होइल की मूळ चित्रात व कॉपीत तो सेम असेल.
कदाचित एकाच बिदु बद्दल बोलत असतील. तसे तर एक्-एक असे सगळेच बिदु मॅच होतील ना
हे बघ - Brouwer’s Fixed Point
हे बघ - Brouwer’s Fixed Point Theorem:- Every continuous function f : Dn → Dn has a fixed point.
समजा ओरिजनल चित्र आहे त्याच्या सर्व बिंदूंना आकडे घातले. तर प्रत्येक बिंदू x will belong to a closed set [A, B]
आता फन्क्शन घे चित्र एन्लार्ज करण्याचं-
x is mapped to f(x),
say f(x) = y
where y = enlarged(x)
____
मग range [f(A), f(B)] नाही येणार का?
[A,B] is not equal to [f(A), f(B)]
_____
अन थिअरम म्हणतो ..... f : Dn → Dn .......... म्हणजे domain = range
आय आय टी तील माझ्या गणिताच्या
आय आय टी तील माझ्या गणिताच्या सरांना हा प्रश्न लिन्कड इन वर विचारला त्यावर त्यांनी स्पून फीड न करता मलाच पुढील प्रश्न विचारला-
Here is something to think about:
g:[0,1] --->(1/3,2/3) be a continuous function.
Prove that there is at least one point c\in(0,1) such that
g(c)=c
_____
त्यावरुन मी त्यांना हे प्रुफ पाठविले आहे. जे की बरोबर असल्याची मला खात्री आहे.-
Since f is defined & continuous everywhere on [0,1], so it is defined & continuous on (1/3,2/3)........ the later being subset of domain.
Hence there exists a point x belonging to (1/3,2/3) where f(x) =x ............. By Brower's theorm.
The same x belongs to super set [0,1]
Thus there exists an x belonging to [0,1] such that f(x) = x
_____________
अर्थात जरी डोमेन तसेच रेंज सबसेट असला तरी कंटीन्युअस फन्क्शन मुळे, BROUWER’S FIXED POINT THEOREM प्रुव्ह होतो.
As long as the picture is not
As long as the picture is not torn, and just crumpled or enlarged, it is easy. Take only the crumpled case for simplicity. the new location function of a particular original point (x,y) is given by a function f(x, y) = (x', y'). Brouser's theorem amounts to saying there is at least one point x1, y1 that f(x1, y1) = (x1, y1). I think this one is easy to understand.
Now, if the picture is just enlarged, and not crumpled, f(x,y) becomes A*(x, y) where x' and y' are in the original scale and A is a two by two matrix. That means the function is still on the same domain x, y. As to what it means by finding one point where f(x,y) = (x,y) please refer to my projector analogy. I don't have the skills to convert that analogy into rigorous proof. But I know it can be done.
ते प्रमेय गृहित धरलं तर लागू
ते प्रमेय गृहित धरलं तर लागू पडतं? मी असं मुळीच म्हणालो नव्हतो. मी म्हटलं होतं की फर्स्ट प्रिन्सिपल्सपासून सिद्धता करता येऊ शकेल. तरच ते प्रमेय सिद्ध होईल ना...
तुम्हाला कदाचित असं म्हणायचं असावं - एक्स्टेन्शन कॉंप्रेशनशिवाय फक्त चुरगळण्यासाठी आपण ते प्रमेय सिद्ध केलं, तर एक्स्टेन्शन-कॉंप्रेशन केसला तीच सिद्धता लागू पडते. कारण एक्स्टेन्शन कॉंप्रेशनची केस ही फक्त एक अधिक सहगुणकाची आहे.
परवाच मी कोणाशी तरी अचूक बोलण्याबद्दल वाद घातला होता. कृपया प्रत्यक्ष गणितांबद्दल बोलताना तरी अचूक आणि अनअॅंबिग्युअस बोलणं होऊद्यात.
तुम्हाला कदाचित असं म्हणायचं
तुम्हाला कदाचित असं म्हणायचं असावं - एक्स्टेन्शन कॉंप्रेशनशिवाय फक्त चुरगळण्यासाठी आपण ते प्रमेय सिद्ध केलं, तर एक्स्टेन्शन-कॉंप्रेशन केसला तीच सिद्धता लागू पडते. कारण एक्स्टेन्शन कॉंप्रेशनची केस ही फक्त एक अधिक सहगुणकाची आहे.
+१
आता माझे थॉट प्रोसेस सांगते -
(१) मोनालिसा चे चित्र आहे चौकोनी - ४ बाय ४ इन्ची
(२) मी त्याची कॉपी घेतली से ४ बाय ४ इन्ची
(३)तर डोमेन आहे - A = ४ बाय ४ इन्ची कागद व रेंज आहे B = ४ बाय ४ इन्ची इन्ची दुसरा कागद.
सो डोमेन > रेंज, फक्त डोमेन आणि रेंजचे डायमेन्शन्स समान आहेत.
मग कसं काय लावायचे ते प्रमेय?
________
हे प्रमेय जेव्हा सोडविले आहे ते वन डायमेन्शनमध्ये सोडविले आहे. की एखादे फन्क्शन जर f : [0,1] -----------> [0,1] कंटीन्युअस असेल, तर there exists an x belonging to [0,1] such that f(x) belongs to [0,1] and x=f(x)
इथे राघा डोमेन = रेंज = [0,1] आहे.
ती काही डोमेन = [0,1] आणी रेंज = [10,11] अशी नाही.
_____________
इथे माझं नक्की बेसिकात मार खातय. मला हे सांगा जर मोनालिसाच्या चित्रात तो x पॉइन्ट जर ४ बाय ४ इन्ची चित्रात नाकावर असेल तर फन्क्शन चालविल्यानंतर त्या रेंजवाल्या ४ बाय ४ इंची चित्रातही तो y बनून नाकावरच येईल.
where y = f(x) पण
y = x तर नसेल.
प्रुफ प्रमेयाचे नको पण या गंडलेल्या विचाराच्या साखळीचे निराकरण करा. प्रुफ समजतय पण अॅप्लिकेशनमध्ये जीव जातोय.
Am I enough unambiguous?
_____
सॉरी पण मला नेहमी किंचित "कॉग्निटीव्ह डिफिकल्टी" जाणवत राहीलेली आहे. मला माहीत आहे की एका चित्रातील नाकावरचा पॉइन्ट दुसर्या चित्रावर कधीच उमटणार नाही. पण मला त्या स्टेपपर्यंत कसं जायचं ते कळत नाहीये :(
______
ओके एक चित्र घेतलं अन तेच चुरगाळलं तर एक चित्रातील एक बिंदू स्थिर रहातो .............. हे कळतय
एक चित्र घेतलं अन तेच कॉम्प्रेस केलं तरी एक बिंदू स्थिर रहातो हे कळतय.
एक चित्र घेतलं अन तेच एन्लार्ज केलं तरी एक बिंदू स्थिर रहातोय हे कळतय.
असो. But precisely this kind of loopy thoughts, that I face time to time while solving some maths.
____
मात्र आता कळलंय आता. अप्लाइड मॅथ्स मध्ये प्युअर मॅथ्स पेक्षा, एक चिमूटभर कल्पकता अधिक लागते बहुतेक.
चित्र लहान किंवा मोठं
चित्र लहान किंवा मोठं केल्याने काहीच फरक पडत नाही. कल्पना करा तुम्ही मोठ्या चित्राच्या थोडं वर अधांतरी लहान चित्र धरलेलं आहे. आता प्रत्येक बिंदूपासून कॉरस्पॉंडिंग बिंदूपर्यंत किरण काढा. प्रोजेक्टरच्या प्रोजेक्शनप्रमाणे त्या वेगवेगळ्या कोनांमध्ये गेलेल्या दिसतील. आता या टोकापासून त्या टोकापर्यंत बघितलं तर त्या किरणांचे लंबाशी असलेले कोन पॉझिटिव्हपासून निगेटिव्ह झालेले दिसतील. थिअरमचं म्हणणं आहे की त्यातला एकतरी किरण लंब असेल. म्हणजे तो कोन शून्य असेल. मीन व्हॅल्यू थिअरमशी थोडी झटापट केली तर हे सहज सिद्ध करता यावं.
intuitively वाटतं खरं अन असं
intuitively वाटतं खरं अन असं वाटतं की मध्यावरचा एखादा बिंदू मॅच होईल. पण राघा, तो "Brouwer’s Fixed Point Theorem" कसा काय ते सिद्ध करतो?
कारण तो थिअरम म्हणतो - A fixed point of a function f from a set X into itself is a point x0, satisfying f(x0) = x0.
पण आपले रेंज अन डोमेन कधीच एक नसणार. मग सायंटीस्ट हे चित्राचा खेळ प्रुव्ह करायला, कसा काय तो थिअरम वापरतात?
पानिपतच्या तिसर्या युद्धाच्या पराभवाची कारणे
तिसर्या पानिपतच्या युद्धात मराठ्याच्या पराभवाचे कारण बाजार बुनगे सोबत नेणे हे आहे का?
माझ्या मते हे कारण नसावे, सदाशिवराव भाऊचे महत्व मल्हाराव होळकरांना सलत होते. पेशव्यांचे महत्व वाढले तर आपल्याला धोतरे बडवायला ठेवतील असे मल्हालराव म्हणत.
महाभारता मधे भीष्म काैरवाकडे असुनही ते युद्ध कर्तव्य म्हणून लढले मनातून नाही तसे होळकरही मनातून लढले नाहीत
सुरवातीला इब्राहिमने चांगली सुरवात केली होती पण गायकवाड मघे घुसल्यामुळे गोंधळ झाला सगळे बिघडत गेले. विश्वासराव गेल्यामुळे सदाशिवराव भाऊ खचले.
पण सर्वात महत्वाचे हातात आलेल्या नजीब खानाला जिवंत सोडले नसते तर अब्दाली आलाच नसता आणि तिसरे पानिपत युद्ध होवून मराठ्यांची इतकी हानी झालीच नसती.
९७ शब्दांचा लेख?
>> त्यांनी लेखच लिहिला होता ना?
मी शब्दसंख्या मोजली. ती ९७ भरली. शिवाय, त्यात 'बाजारबुणगे', 'सदाशिवरावभाऊ', 'महाभारतामध्ये' असे शब्द लिहिण्याऐवजी दोन शब्द वापरले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात शब्दसंख्या ९७हून कमीच भरेल. बघा बुवा कसं जमतंय ते ह्याला 'लेख' म्हणायला. बाकी लिखाणातल्या विचारांचा आवाका वगैरे पाहायला इतिहासाचा अभ्यास असलेले लोक आहेतच.
शतशब्द
>> धागा शंभर शब्दांचा असावा असे ऐसीचे धोरण आहे का?
तुमच्यासारख्या सदस्याला असा प्रश्न का पडावा ते नीटसं समजलं नाही. शुचिताईंची शतशब्दकथा १०० शब्दांत आहे. तरीही तो स्वतंत्र धागा आहे, कारण त्यामागचा विचार स्पष्ट आहे. उलट, एखाद्या एकोळी प्रतिसादावरही संबंधित आणि सघन पुरेसे प्रतिसाद येऊ लागले तर आतापर्यंत इथे अनेकदा त्याचे स्वतंत्र धागे केले गेले आहेत. तसं ह्या धाग्यात झालं तर पुढे त्याचाही धागा करता येईल. ती काही काळ्या दगडावरची रेघ नाही. ज्यांना स्वतंत्र धागा झालेला पाहायला आवडेल, त्यांनी जर विषयानुरूप काही मुद्दे मांडणारे सघन प्रतिसाद दिले, तर त्याचा खचितच उपयोग होईल.१
>> मी हे प्रतिसाद देतोय याचा अर्थ मला तो लेख डिटेल्ड वाटतोय असा होत नाही.
ठीक. जाता जाता : घासकडवींच्या वरच्या प्रतिसादातला ("यावर एक स्वतंत्र मोठा लेख लिहिलात तर चांगली चर्चा होऊ शकेल.") अधोरेखित शब्द चुकून नजरेआड झाला का?
१. आताचा हा प्रतिसाद धरून एकूण प्रतिसाद - १०. विषयाशी संबंधित काही सघन किंवा विचार करायला लावणारे प्रतिसाद तुमच्या मते किती आहेत? माझ्या मते शून्य.
मग लिहा तुम्ही त्याबद्दल
मग लिहा तुम्ही त्याबद्दल दिवाळी अंकासाठी.