Skip to main content

व्यसने - परिणाम आणि दुष्परिणाम

अनादि काळापासून मानवी समाजात काही वस्तून्च्या सेवनाला "व्यसन" म्हणून त्याज्य ठरवले जाते ... त्या गोष्टीन्चा मोरल ग्राउन्ड्स वर निषेध केला जातो ... यात दारु ,तंबाखू, गांजा-भांग-चरस -एल एस डी इत्यादी गोष्टी येतात

उघड आहे की या गोष्टीना नैतिक /सामाजिक व कायदेशीर दॄष्ट्या त्याज्ज्य अथवा प्रतिबंधित करण्यामागे काही ठोस कारणे आहेत . सामाजिक अथवा नैतिक दॄष्ट्या धोकादायक ठरेल असे वर्तन ही द्रव्ये सेवन करणारुया व्यक्तींकडून घडते ,तसेच आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो . हे १००% मान्य आहे ... परंतु......

जे लोक काही मानसिक /आर्थिक अथवा सामाजिक परिस्थितींची शिकार होवून अथवा आध्यात्मिक / सुपरनॅचरल अनुभवांच्या शोधात अशा द्रव्यांचे संयमित स्वरूपात सेवन करतात ,तेव्हा अशा व्यक्तींचे अनुभव निराळे असू शकतात ...

अमेरिकेतील अनेक संघटनांचे / संस्थांचे / संशोधक लोकांचे असे म्हणणे आहे की कॅनाबिज अथवा भांग / गांजा या वनस्पतींचा वापर करून बनवलेली औषधे कॅन्सरवर रामबाण उपाय आहेत . तसेच कॅनाबिज /इन्फेक्टेड मश्रूम / एल एस डी यासारख्या गोष्टींचा वापर "मेडिटेशन बूस्टर" म्हणून करता येतो व त्यामुळे अध्यात्मिक साधना करणार्या व्यक्तीना उच्चतम अनुभव येतात .

परंतु अमेरिकेतील प्रभावी फार्मा कंपन्या , ज्या कॅन्सरवरील पेनकिलर औषधे विकून अब्जावधी डॉलर वर्षाला कमावतात, अशा क्कंपन्यांच्या दबावामुळे सरकार कॅनाबिज ला प्रतिबन्धित ड्रग कॅतेगरी मध्ये टाकत आहे................

आपल्यापैकी कोणाला अशा "प्रतिबन्धित ड्रग"चा अनुभव आहे का? असल्यास कसा?

मला स्वतःला भांग वापरून अतिशय उच्चतम आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत आणि हे सांगायला मला अजिबात भीती /लाज वाटत नाही

धनंजय Tue, 08/09/2015 - 21:35

(ज्या वयात मला हा अनुभव आला, त्या वयातील मुलांना सिगारेट विकणे बेकायदेशीर होते/आहे.)
सिगारेटचा अनुभव माझ्याकरिता आनंददायी नव्हता. पोटात ढवळून आले, आणि लगेच संडासाला जावे अशी घाई लागली. आणि मित्रलोक हा अनुभव ज्या ठिकाणी लपूनछपून घेत होतो, ते ठिकाण संडासाला जायला सोयीस्कर नव्हते. म्हणून कळ सोसून घ्यावी लागली.
अतिशय सुदैवी ठरलेला नावडीचा अनुभव. पुढे भरपूर पैसे वाचले आणि आरोग्यही.

.शुचि. Tue, 08/09/2015 - 21:38

In reply to by धनंजय

अतिशय सुदैवी ठरलेला नावडीचा अनुभव. पुढे भरपूर पैसे वाचले आणि आरोग्यही.

माझ्या नवर्‍याचा दारुविषयक काहीसा असाच अनुभव आहे. पहील्या जहाजावर, विषुववृत्त ओलांडल्यावर ज्युनियर इंजिनीअर्स ना बळजबरीने (रॅगिंग टाइप) दारु पाजली गेली. इतकी की उलटी होऊन शेवटी त्याने कधीही मद्याला स्पर्श केला नाही.
___
*दारु वाईट आहे वगैरे प्रवचन देत नाहीये. फक्त अनुभव शेअर करतेय.

मारवा Tue, 08/09/2015 - 23:09

In reply to by धनंजय

पर ये हो न सका
और अब ये आलम है के
न वो सिगरेट रही न वो धुऑ
रह गये कुछ कागज के चंद टुकडे

अगदी अगदी.
"चंद तुकडे" - सिगारेटीच्या पाकिटातली चांदी मी जपून ठेवत असे खरी. पण ते उद्योग या अनुभवाच्या आधीच्या वयातले.

उडन खटोला Tue, 08/09/2015 - 21:40

म्मी ५ वर्षाअपूर्वी उत्तर भारतात गेलो असताना सर्वप्रथम भान्गेच्या ३ गोल्या घेतल्या ....त्यानन्त्६अर माझी कुन्डलिनी जागरुक झाल्याचे जानवले .... तसेच एक एनर्जी प्युर्ण पाठिचाअ कणा शुद्ध्ह करित आहे असे जानवले

त्रूतीय नेत्र जागरण व मेन्दुतील ब्लॉकिन्ग्स निघाल्याचे देखिल जाणवले

.शुचि. Tue, 08/09/2015 - 21:58

माझा पहीला प्रतिसाद लिहीत असताना, जाणवले की - "अन्य अनुभव नाही" हे माझ्याकडून किती अभिमानाने लिहीले गेले. :(
.
खरं तर व्यसन नसणे यात अभिमानास्पद काय आहे? आहे का? कोणी तंबाखू/दारु/सिगरेट सेवन करत असेल तर त्या व्यक्तीला कमी लेखण्याची गरज काय आहे?
प्रत्येक व्यक्तीने त्या/ती च्या प्रकृती/आवडी/बुद्धीनुसार आयुष्य निवडलेले असते. कोणी अति खातात तर काही जण दारु पितात, कोणी चिंताच करत बसतात तर कोणी पूजापाठच. व्यसनातून मुक्त कोणीच नाही आणि समजा असला तरी काय मोठे दिवे लावलेत?
.
स्वतःला येन केन प्रकारेन स्पेशल समजणं त्याकरता दुसर्‍याची रेघ खोडून लहान करणं हा मानवी स्वभावच म्हणावा लागेल.

.शुचि. Tue, 08/09/2015 - 22:27

In reply to by आदूबाळ

=)) हाहाहा.
.
नवरा मला म्हणत असतो - तुला खाण्याचं व्यसन आहे. आता झोपेचं मी समजु शकते ;) पण खाण्याचं???? :D :D :D
पण नवर्‍याच्या या कानउघडणीमुळे कोणालाही व्यसनावरुन लुक डाऊन करण्याचे धाडस होत नाही ;)
____
पण एवढं असूनही मुलीने यातील काही ट्राय करावं असं मी कधीच म्हणणार नाही. मग हे कसं??

-
कन्फ्युझड> शुचि

मारवा Tue, 08/09/2015 - 22:32

सर्वोत्तम उदाहरण म्हणजे
अध्यात्माचं व्यसनं
भारतात या व्यसनींची संख्या मोठी आहे,
दुसर एक व्यसन आहे इनफॅक्ट डिसऑर्डर आहे पण फार कमी लोकांना
हि डिसऑर्डर रेकग्नाइज करता येते,
Obsessive-Compulsive Personality Disorder
ओसीडी ( हात धुणे वगैरे कॉमन आहे आता वेल नोन आहे ) मात्र ओसीपीडी इज व्हेरी डिफ्रंट
ओसीपीडी हे एक व्यक्तीत्वाचा भाग बनलेलं असत,

.शुचि. Tue, 08/09/2015 - 22:41

ज्ञानेश्वारी मध्ये खाण्याचे, भक्तीचे वगैरे बर्‍याच गोष्टींचे (= आठवत नाही ;)) ३ प्रकार सांगीतले आहेत - सात्विक, राजसिक, तामसिक.
तशी व्यसनेदेखील ३ प्रकारात मोडत असावित.

उदा- वाचन(सात्विक), संगीत (राजसिक), अन्य काही तामसिक

मारवा Tue, 08/09/2015 - 22:50

In reply to by .शुचि.

वि,स, खांडेकर किंवा वपु जसे सुविचारांच्या लडी लावायचे ते सात्विक व्यसन मध्ये येत असेल,
प्रवीण दवणे तर इनक्युरेबल सुविचारी अ‍ॅडीक्ट आहेत
तामसीक मध्ये नामदेव ढसाळ शिव्यांच्या लडी एकापाठो एक

हाहाहा.
.
दवणे एकदा अर्धेमुर्धे ऐकले आणि परत धाडस केले नाही.
बाप रे ढसाळांवरचा मिपावरचा एक लेख वाचला आहे. परत धाडस झाले नाही.

.शुचि. Tue, 08/09/2015 - 23:09

LCD ने NDE( Near Death Exp) सारखे अनुभव येतात असे वाचले आहे. पण असे अनुभव आल्यानंतर मनुष्याला परत नॉर्मल आयुष्य तरी जगता येत असेल का? किती खोलवर जात असतील ते अनुभव :(
कशाला नसत्या फंदात पडायचं?
___
अमेरीकेत ज्यांच्याकडे इन्श्युरन्स किंवा पैसे आदि नसतात आणि बायपोलर/डिप्रेशन वगैरे सारखी मानसिक व्याधी असते, ते आळीपाळीने दारु अन कोकेन घेतात असे ऐकले आहे. अल्कोहोल डाऊनर असते तर कोकेन अप्पर असते असे काहीसे ऐकले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/09/2015 - 02:00

मला स्वतःला भांग वापरून अतिशय उच्चतम आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत आणि हे सांगायला मला अजिबात भीती /लाज वाटत नाही

मलाही. अगदी उच्चतम आध्यात्मिक अनुभव.
भांग घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मेघनाचा फोन आला. आम्ही खूप म्हणजे खूपच्च वेळ बोलत होतो असं वाटलं. फोन ठेवल्यावर लॉग पाहिला तर फक्त १० मिनीटं ३७ सेकंद झाली होती. एरवी नेहेमीचाच अनुभव, मी काय बोलत्ये हे माझ्यासकट कोणालाही समजत नाही वगैरे वगैरे.