Skip to main content

एक शनिवार - केस कापण्याचा

.

सिद्धि Mon, 21/09/2015 - 07:31

किती प्रांजळ आणि प्रामाणिक !
लेख आवडलेला आहे .
नवीन हेअर कट बघण्यास उत्सुक :)

बाह्यसौंदर्याला पुरुष कसे महत्त्व देतात, ते कसे चूकीचे आहे, पुरुष कसे सुपरफिशिअल असतात, फक्त रुपाकडेच कसे त्यांचे लक्ष असते ..... - वगैरे सर्व कटकटयुक्त विचार काही काळासाठी तरी एकदम थंडावलेले असतात, निदान पुढचे काही दिवस तरी हेअरकटमुळे आलेला आत्मविश्वास साथ देणार असतो.

हे बाकी भारी आहे :)

आदूबाळ Mon, 21/09/2015 - 15:31

आता हा संवाद बघा.

आई/बायको: अरे जातोस का आता केस कापायला? टारलं झालंय...
आ.बा.: ... (निमूटपणे पायांत चपला सरकावून बाहेर.)

सिनारियो १: डायमंड हेयर कटिंग सलून (उच्चारी डारमण्ड), भारत
आ.बा.: (खुर्चीत जाऊन बसतो)
डारमण्डः (झगा गुंडाळून कटिंग करतो.)
डारमण्डः (नवरत्न तेलाची बाटली नाचवतो.)
आ.बा.: (मान तुकवतो)
डारमण्डः (हेडमसाज करून मान वगैरे मोडतो)
आ.बा.: (झोंबर्‍या डोळ्यांनी पंचावन्न रुपये देऊन घरला.)
सलूनमधले एकूण शब्दः शून्य

सिनारियो २: एका पाकिस्तानी माणसाचं सलून, राणीचा देश
आ.बा.: (खुर्चीत जाऊन बसतो) छह नंबर
पा.मा.: (झगा गुंडाळून कटिंग करतो. पाठिमागे टीव्हीवर इस्लामच कसा सर्वश्रेष्ठ आहे यावर तावातावाने चर्चा.)
आ.बा.: (सुटकेचा निश्वास टाकून तीन पौंड देऊन पलायन)
सलूनमधले एकूण शब्दः दोन

गवि Mon, 21/09/2015 - 16:13

In reply to by आदूबाळ

पहिल्या दोन ओळी वरीलप्रमाणेच. पण सलूनमधे मात्र शांतता नसणं.

१. कपककपकप
२. लिखनेवाले ने लिख दी है, मिलन के साथ जुदाई..
३. नैन मिले, उसके बाद, फूल खिले, उसके बाद, चैन गया, उसके बाद, प्यार हुआ, उसके बाद..
४. अपना घर है, स्वर्गसे सुंदर.. स्वर्गमें कहांसे आये मच्छर..ओ मच्छर.. मच्छरभी आशिक है तुमपर क्या करुं..
५. कपकपकपकप

शेवटी सुटका. एकदीड महिन्यासाठी.

बेवफाई, जुदाई, बिदाई, बाबुल का अंगना, नैना, कंगना, यार,दीदार, इन्कार, इकरार, काजल, आंचल, वादा, कुदरत, मुद्दत असे भरपूर तत्सम शब्द गोळा करुन गुत्ता आणि कटिंगसलून (पूर्वीची) यांसाठी सामायिक वापराच्या कॅसेट्स बनवल्या जात असत.

.शुचि. Mon, 21/09/2015 - 16:16

In reply to by गवि

आई ग्ग! अशा कॅसेटस असतात?
_____
लहानपणी बाबा न्हाव्याकडे घेऊन जात आम्हाला. तिथे कोंबडीच्या पिल्लांशी खेळण्यात वेळ फार मस्त जाई. - ही देखील एक मनोरम आठवण.

बॅटमॅन Mon, 21/09/2015 - 16:18

In reply to by गवि

मी जातो त्या सलूनमध्ये टीव्ही आहे. नाभिकगण त्या "ससुराल सिमरन का, चुतियापा गावभर का" सीर्यली बघत बघतच श्मश्रुकर्म उरकीत असतो. त्याला अधूनमधून ढुश्या द्याव्या लागतात की बाबारे, इथे हजामत अडलीये तुझ्याविना.

गवि Mon, 21/09/2015 - 16:20

In reply to by बॅटमॅन

लहानपणी किंवा एकूण केव्हाही, कातरीकामाच्या दरम्यान फिस्सकन हसू येण्याची भीती वाटली आहे का? मोठेपणी जास्तकरुन नाकपुडीखाली मिशीजवळ तोंड वेडेवाकडे करत काम चालू असताना.

.शुचि. Mon, 21/09/2015 - 16:26

In reply to by गवि

माझा गाल प्रचंड टिकलीश आहे. गालांना थंडगार कात्री लागली ना केस कापताना की चक्क ब्रह्मांड आठवतं. =)) इन्टेन्स गुदगुल्या होतात.

गवि Mon, 21/09/2015 - 16:26

In reply to by .शुचि.

मला तर मधेच आपोआप हसू येईल असं वाटतं त्या वातावरणात. मग मी अत्यंत सिरियस सिरियस विचार करुन ते टाळण्याचा खूप प्रयत्न करतो किंवा तोंडं वेडीवाकडी करुन ते जांभई किंवा तत्सम प्रकारात दडपतो.

.शुचि. Mon, 21/09/2015 - 18:26

In reply to by बॅटमॅन

डेंटिस्टकडे घशात काहीतरी उपकरण पडून पोटात जाइल या भीतीबरोबरच इन्जेक्शन वगैरे देताना शिंक यायची भिती वाटते :(

ऋषिकेश Mon, 21/09/2015 - 16:26

In reply to by बॅटमॅन

या मंडवळींना सतत कानावर आवाज हवा असतो बहुधा
एकदा मी तिथे गेलो असता वीज गेली व इन्व्हर्टरवर टिव्ही चालेना तेव्हा त्याने केस कापायचे थांबवून कुठूनसा जाऊन (सेलवर चालणारा) ट्रान्झिस्टर आणला मग म्हणाला "उगाच चुक नको ना व्हायला"

बाकी भवताली इतका आवाज असुनही दोघांमधील प्रत्यक्ष संवादात बहुतांशवेळा शब्द मोजकेच वापरले जातात हे खरेच!

.शुचि. Mon, 21/09/2015 - 16:38

In reply to by ऋषिकेश

लहानपणीच्या आठवणीनुसार, होय शब्द मोजकेच -
नीचे देखो (डोकं हाताने खाली वळवत),
चुकुन आरशाकडे आपण हळूहळू पहायला लागतोच तेव्हा डोकं जोरात खाली दाबून - नीचे देखो
उपर देखो,
रेझर? (मानेवर रेझर चालवायचा का?) - इथे बाबा कधी हो कधी नाही असा निर्णय देत. कन्सिस्टन्सी नसे =))

सिद्धि Tue, 22/09/2015 - 00:54

In reply to by .शुचि.

मला पण माझे बाबा रविवारी न्हाव्याकडे / जेन्ट्स सलून मध्ये नेवून बारीक बॉय कट करून आणायचे. आणि मी नेहमी "मला मुलगा करू नका" म्हणून रडायचे:D (मुलगा करणे म्हणजे बॉय कट करणे असं)
हा फोटो बघून नेहमी तेव्हाची आठवण येते :
1

बॅटमॅन Mon, 21/09/2015 - 17:20

बाकी न्हाव्यांची एक डोक्यात जाणारी लकब म्ह. केद असे मुठीत पकडून त्याबाहेर डॉकावणारे तेवढेच केस कापतात. अजून बारीक काप म्हटलं तर चवताळल्यागतच करतात अन पार टकले करू पाहतात. बाहेरच्या देशांतही तसंच करतात का?

ग्रेटथिंकर Mon, 21/09/2015 - 17:29

स्त्रीया या पुरुषांचे मन रिझवण्याचे एक साधन आहेत हे शेवटच्या पॅरातून सूचीत होत आहे, आणि ते बर्याच अंशी खरं आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 21/09/2015 - 17:52

लेखामुळे माझंही मन रिझलं.

वजन खांद्याखालचं कमी होत नाही म्हणून केस कापण्याची कल्पना चांगली आहे. परिणाम दिसल्याशी कारण.

अंतराआनंद Mon, 21/09/2015 - 20:52

केसाने आत्मविश्वास मिळवून देणार्या शनिवारचं वर्णन आवडलं. कधीतरीच पार्लर मध्ये जाते त्यामुळे गेल्या गेल्या माझा आवाज आणि पार्लरवालीचा आनंद दोन्ही जास्त असतात आणि निघताना उलटं. फक्त माझ्या केसांसाठी एवढा वेळ द्यायचा म्हणून तिचा आनंद विरघळतो तर माझा मेकओव्हर करायची लायकी असलेल्या या बाईला मी हे एवढं क्षुल्लक काम दिलं म्हणून मला उगाचच अपराधी वैगेरे वाटत असतं.

अस्वल Mon, 21/09/2015 - 22:30

शनिवारी केस कापू नये म्हणतात ना?
-----------
एकदा इथे केस कापून घेण्याचा प्रसंग आला, आणि ते लोक किती इंच ठेवू/ किती नंबर वगैरे प्रश्न विचारायला लागले. मग म्हटलं एवढं तर आपल्यालाही करता येईल.
तेव्हा गेल्या काही वर्षांत घरीच कापतो केस. एरवी कोण आपल्या केसांवर प्रयोग करू देईल? म्हणून स्वतःच करतो.
कात्रीने स्वतःच स्वत:चे केस कापणं प्रचंड अवघड आहे, हे लक्षात आल्यापासून एक मशीन आणलं. तरीही काही एरिया डिफिकल्ट असतात यू सी.

पिवळा डांबिस Thu, 24/09/2015 - 00:21

In reply to by अस्वल

तेव्हा गेल्या काही वर्षांत घरीच कापतो केस. एरवी कोण आपल्या केसांवर प्रयोग करू देईल? म्हणून स्वतःच करतो.

तुम्ही स्वतःच्याही नकळत तुमच्या आयडीमागलं गुपित उघड करताय राव!
:)

मराठे Tue, 22/09/2015 - 01:14

माझा मुलगा लहान असताना 'न्हावा' कडे जायचा.. त्याच्या मते मुलींचे केस कापतात ते 'न्हावी' आणि मुलांचे केस कापतात ते 'न्हावा'.

बाय द वे, न्हावी आणि डॉक्टर मी सहसा बदलत नाही. जोपर्यंत भारतात होतो तोपर्यंत एकाच न्हाव्याच्या दुकानात जायचो, मग ते दुकान बंद करून त्याने दुसरं दुकान काढलं, ते लांब असलं तरी तिथेच जायचो. प्रथम परदेशात केस कापण्याचा प्रसंग आला तेव्हा जाम टेंशन आलेलं. केस कापणारी काकू विचारत होती कसे कापू? मी काय कप्पाळ सांगणार... (आमचा देशी न्हावी कधी असले अवघड प्रश्न विचारायचा नाही). मी म्हटलं बरे दिसतील असे काप. डोळे फिरवून तिने बारा डॉलर अधिक टीप ने खिसा हलका केला आणि आमिरखानने म्हटल्या प्रमाने 'बाल भी कटे और पता भी नही चलता' असलं डोकं घेऊन मी परतलो. पुढच्या वेळेला तिला मशिन वापरायला सांगितलं आणि बर्‍यापैकी केस कापल्यानंतर तिला कोणता नंबर वापरला ते विचारलं.. तीन आणि पाच .. म्हणजे कानावर तीन नंबर आणि टाळूवर पाच. आजतागायत नंबर बदलला नाही.

चिमणराव Thu, 24/09/2015 - 01:02

शनिवार बेफिकीरपणे साजरा करणे,केस मागे मानेनेच भिरकावल्यागत सगळ्या विवंचना मागे टाकून मज्जा करणे आणि आनंदात असणे वगैरे ललित छानच जमलय.केस कापणे एक बहाणा आहे.पगारानंतरची सुटी ,स्वातंत्र्य यावर मोठी लेखमाला लिहूनही शक्य झाले नसते ते दीड पानात पोहोचवले.

आम्ही उगाचच गंभीरपणे कौल कशाला देऊ-
१)तुम्हाला न्हाव्याकडे जाताना आनंद वाटतो का?
२)न्हाव्याला टीप द्यावी असे तुम्हाला वाटते का?
३)केस कापणे, आकार देणे वगैरे करून व्यक्तीमत्त्वात सुधारणा होते असे मानता का?
४)शनिवारी केस नखे कापू नये यावर तुमचा विश्वास आहे का?
जाताजाता: गेल्या अठरा वर्षांत सलूनच्या आरसात तोंड पाहिलेले नाही.

ऋषिकेश Thu, 24/09/2015 - 09:33

In reply to by चिमणराव

जाताजाता: गेल्या अठरा वर्षांत सलूनच्या आरसात तोंड पाहिलेले नाही

हे हे असेच "दुर्दैवी" बोल मी मानत नसलेल्या दैववादावर प्रश्नचिन्ह उभे करतात! ;)

विवेक पटाईत Sun, 27/09/2015 - 17:52

मी न्हाव्या कडून केस एकदम बारीक करून घेतो, नवरत्न तेलने डोक्याची मालिश सुद्धा. सर्वांचे १०० रु रोख द्यावे लागतात. बारीक पांढरे केस चेहर्याला शोभून दिसतात. काही मित्र(?) विवेक आजकाल जास्त स्मार्ट दिसू लागला आहे.