एक शनिवार - केस कापण्याचा
.
आता हा संवाद बघा. आई/बायको:
आता हा संवाद बघा.
आई/बायको: अरे जातोस का आता केस कापायला? टारलं झालंय...
आ.बा.: ... (निमूटपणे पायांत चपला सरकावून बाहेर.)
सिनारियो १: डायमंड हेयर कटिंग सलून (उच्चारी डारमण्ड), भारत
आ.बा.: (खुर्चीत जाऊन बसतो)
डारमण्डः (झगा गुंडाळून कटिंग करतो.)
डारमण्डः (नवरत्न तेलाची बाटली नाचवतो.)
आ.बा.: (मान तुकवतो)
डारमण्डः (हेडमसाज करून मान वगैरे मोडतो)
आ.बा.: (झोंबर्या डोळ्यांनी पंचावन्न रुपये देऊन घरला.)
सलूनमधले एकूण शब्दः शून्य
सिनारियो २: एका पाकिस्तानी माणसाचं सलून, राणीचा देश
आ.बा.: (खुर्चीत जाऊन बसतो) छह नंबर
पा.मा.: (झगा गुंडाळून कटिंग करतो. पाठिमागे टीव्हीवर इस्लामच कसा सर्वश्रेष्ठ आहे यावर तावातावाने चर्चा.)
आ.बा.: (सुटकेचा निश्वास टाकून तीन पौंड देऊन पलायन)
सलूनमधले एकूण शब्दः दोन
पहिल्या दोन ओळी वरीलप्रमाणेच.
पहिल्या दोन ओळी वरीलप्रमाणेच. पण सलूनमधे मात्र शांतता नसणं.
१. कपककपकप
२. लिखनेवाले ने लिख दी है, मिलन के साथ जुदाई..
३. नैन मिले, उसके बाद, फूल खिले, उसके बाद, चैन गया, उसके बाद, प्यार हुआ, उसके बाद..
४. अपना घर है, स्वर्गसे सुंदर.. स्वर्गमें कहांसे आये मच्छर..ओ मच्छर.. मच्छरभी आशिक है तुमपर क्या करुं..
५. कपकपकपकप
शेवटी सुटका. एकदीड महिन्यासाठी.
बेवफाई, जुदाई, बिदाई, बाबुल का अंगना, नैना, कंगना, यार,दीदार, इन्कार, इकरार, काजल, आंचल, वादा, कुदरत, मुद्दत असे भरपूर तत्सम शब्द गोळा करुन गुत्ता आणि कटिंगसलून (पूर्वीची) यांसाठी सामायिक वापराच्या कॅसेट्स बनवल्या जात असत.
या मंडवळींना सतत कानावर आवाज
या मंडवळींना सतत कानावर आवाज हवा असतो बहुधा
एकदा मी तिथे गेलो असता वीज गेली व इन्व्हर्टरवर टिव्ही चालेना तेव्हा त्याने केस कापायचे थांबवून कुठूनसा जाऊन (सेलवर चालणारा) ट्रान्झिस्टर आणला मग म्हणाला "उगाच चुक नको ना व्हायला"
बाकी भवताली इतका आवाज असुनही दोघांमधील प्रत्यक्ष संवादात बहुतांशवेळा शब्द मोजकेच वापरले जातात हे खरेच!
केसाने आत्मविश्वास मिळवून
केसाने आत्मविश्वास मिळवून देणार्या शनिवारचं वर्णन आवडलं. कधीतरीच पार्लर मध्ये जाते त्यामुळे गेल्या गेल्या माझा आवाज आणि पार्लरवालीचा आनंद दोन्ही जास्त असतात आणि निघताना उलटं. फक्त माझ्या केसांसाठी एवढा वेळ द्यायचा म्हणून तिचा आनंद विरघळतो तर माझा मेकओव्हर करायची लायकी असलेल्या या बाईला मी हे एवढं क्षुल्लक काम दिलं म्हणून मला उगाचच अपराधी वैगेरे वाटत असतं.
शनिवारी केस कापू नये म्हणतात
शनिवारी केस कापू नये म्हणतात ना?
-----------
एकदा इथे केस कापून घेण्याचा प्रसंग आला, आणि ते लोक किती इंच ठेवू/ किती नंबर वगैरे प्रश्न विचारायला लागले. मग म्हटलं एवढं तर आपल्यालाही करता येईल.
तेव्हा गेल्या काही वर्षांत घरीच कापतो केस. एरवी कोण आपल्या केसांवर प्रयोग करू देईल? म्हणून स्वतःच करतो.
कात्रीने स्वतःच स्वत:चे केस कापणं प्रचंड अवघड आहे, हे लक्षात आल्यापासून एक मशीन आणलं. तरीही काही एरिया डिफिकल्ट असतात यू सी.
माझा मुलगा लहान असताना
माझा मुलगा लहान असताना 'न्हावा' कडे जायचा.. त्याच्या मते मुलींचे केस कापतात ते 'न्हावी' आणि मुलांचे केस कापतात ते 'न्हावा'.
बाय द वे, न्हावी आणि डॉक्टर मी सहसा बदलत नाही. जोपर्यंत भारतात होतो तोपर्यंत एकाच न्हाव्याच्या दुकानात जायचो, मग ते दुकान बंद करून त्याने दुसरं दुकान काढलं, ते लांब असलं तरी तिथेच जायचो. प्रथम परदेशात केस कापण्याचा प्रसंग आला तेव्हा जाम टेंशन आलेलं. केस कापणारी काकू विचारत होती कसे कापू? मी काय कप्पाळ सांगणार... (आमचा देशी न्हावी कधी असले अवघड प्रश्न विचारायचा नाही). मी म्हटलं बरे दिसतील असे काप. डोळे फिरवून तिने बारा डॉलर अधिक टीप ने खिसा हलका केला आणि आमिरखानने म्हटल्या प्रमाने 'बाल भी कटे और पता भी नही चलता' असलं डोकं घेऊन मी परतलो. पुढच्या वेळेला तिला मशिन वापरायला सांगितलं आणि बर्यापैकी केस कापल्यानंतर तिला कोणता नंबर वापरला ते विचारलं.. तीन आणि पाच .. म्हणजे कानावर तीन नंबर आणि टाळूवर पाच. आजतागायत नंबर बदलला नाही.
शनिवार बेफिकीरपणे साजरा
शनिवार बेफिकीरपणे साजरा करणे,केस मागे मानेनेच भिरकावल्यागत सगळ्या विवंचना मागे टाकून मज्जा करणे आणि आनंदात असणे वगैरे ललित छानच जमलय.केस कापणे एक बहाणा आहे.पगारानंतरची सुटी ,स्वातंत्र्य यावर मोठी लेखमाला लिहूनही शक्य झाले नसते ते दीड पानात पोहोचवले.
आम्ही उगाचच गंभीरपणे कौल कशाला देऊ-
१)तुम्हाला न्हाव्याकडे जाताना आनंद वाटतो का?
२)न्हाव्याला टीप द्यावी असे तुम्हाला वाटते का?
३)केस कापणे, आकार देणे वगैरे करून व्यक्तीमत्त्वात सुधारणा होते असे मानता का?
४)शनिवारी केस नखे कापू नये यावर तुमचा विश्वास आहे का?
जाताजाता: गेल्या अठरा वर्षांत सलूनच्या आरसात तोंड पाहिलेले नाही.
किती प्रांजळ आणि प्रामाणिक
किती प्रांजळ आणि प्रामाणिक !
लेख आवडलेला आहे .
नवीन हेअर कट बघण्यास उत्सुक :)
हे बाकी भारी आहे :)