Skip to main content

ध्यान - कोणाला अनुभव आहे का?

.

प्रकाश घाटपांडे Sun, 08/11/2015 - 12:33

माईंड डायव्हर्टिंग टेक्निक म्हणून या गोष्टींचा उपयोग होतो माणूस सदा सर्वदा शारिरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी असत नाही. त्यावेळी अनेक अंधश्रद्ध वाटणार्‍या गोष्टीसुद्धा मन शांत ठेवायला मदत करतात. मनाच्या अनेक भरार्‍यांमधे अंधश्रद्धा वाटणार्‍या कल्पना असतात.ध्यानधारणा नामस्मरण कोणाला अंधश्रद्धा वाटेल तर कुणाला मानसिक आरोग्य राखण्याचे साधन वाटेल.

.शुचि. Sun, 08/11/2015 - 22:23

In reply to by प्रकाश घाटपांडे

माणूस सदा सर्वदा शारिरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी असत नाही

ह्म्म निरामय असत नाही. म्हणजे अगदी रोगच नसतो पण क्वचित एखादी कुरबुर असते. जी फार लॉंग लास्टिंग नसतेही. अशा वेळी ध्यानाने बरे वाटत असेल

अॅरागॉर्न Sun, 08/11/2015 - 12:58

मला मेडिटेशनचा थोडाफार अनुभव आहे, यात नामस्मरण किंवा धार्मिक बाबतीचा संबंध नाही. मेंदूची तुलना संगणकाच्या सीपीयूशी केली तर समजायला सोपं जातं. संगणकात जर एकाच वेळी अनेक गोष्टी चालू असल्या तर तो मंदावतो किंवा क्रॅश होतो. फक्त एक मिनिट आपल्या श्वासावर लक्ष केंद्रीत केलं तरी मेडीटेशनमुळे आपल्या मेंदूत एकाच वेळी किती गोष्टी चालू आहेत याची झलक बघायला मिळते.

मारवा Sun, 08/11/2015 - 16:34

यात एखादी सुंदर काहीही उदा. गुलाबांच फुल कींवा अस काहीतरी घ्यावं म्हणजे अशा झाडासमोर शांतपणे बसाव मग त्या फुलाकडे एकटक पाहत राहायच. मग काही वेळाने अशी कल्पना करायची की ते फुल च तुमच्याकडे बघत आहे. अस रीव्हर्स इमॅजीनेशन काही सुंदर निवडुन करायचं फुलं सोप्पा ऑप्शन असतो. मग मुखचंद्रमा वगैरे पण चालतो पण त्यात मग ध्यान दुसरीकडेच वाहण्याची शक्यता जास्त म्हणुन निरुपद्रवी वस्तु घ्याव्यात.
अस मी केलेलं आहे.
सीरीयसली इट इज ब्युटीफुल एक्सपीरीयन्स
आणि काही काही आहेत
मला असे सुंदर ध्यानप्रयोग आवडतात.

.शुचि. Sun, 08/11/2015 - 19:19

In reply to by मारवा

वा!हा प्रयोग एकदम अभिनव आहे. शिवाय सौंदर्य या घटकामुळे मन आत वळण्यास त्वरीत मदत होत असावी असे वाटते. मी हा प्रयोग नक्की करेन.

.शुचि. Sun, 08/11/2015 - 22:25

अजुन एक आक्षेप लिहायचाच राहीला आणि हाच "लेम" आक्षेप व्यायामाबद्दलही आहे. की न जाणो आवडले अन व्यसन लागले व नंतर करता आले नाही तर चिडचिड , वैताग कुरबुर होइल का?
फारच सेल्फ-डिफीटींग आक्षेप आहे पण आहे.

.शुचि. Sun, 08/11/2015 - 23:49

In reply to by अॅरागॉर्न

होय. व्यायामाच्या बाबतीत माझी अतोनात धर-सोड असते तेव्हा काही दुष्परीणाम जाणवत नाहीत. तेव्हा नाहीच होणार असेच वाटते.

अॅरागॉर्न Sun, 08/11/2015 - 22:29

वर प्रतिसादाला प्रतिसाद देता येत नाहिये म्हणून इथे.
आरागॉर्न श्वासाबद्दल आपण लिहीले आहेत याचा अर्थ आपण प्राणायम करता का?>>
प्राणायाम वगैरे मी कधीच केला नाही. फक्त श्वास घेताना त्यावर लक्ष केंद्रित करायचं. हे थोडसं जमलं की आपल्या डोक्यात एकाच वेळी किती विचार येत असतात हे बघता येतं. बरेच सीइओ, खेळाडू वगैरे अश्या प्रकारची टेक्निक्स वापरतात असं वाचलं आहे.

चिमणराव Mon, 09/11/2015 - 06:34

माझ्या कामाचा विषय नाही म्हणून लेख उघडला नव्हता.शेवटचा परिच्छेद-
तेव्हा सर्वांनी अनुभव शेअर करावेत. अगदी नास्तिकांनीही शेअर करावेत कारण "ध्यान" फक्त ईश्वरावर केंद्रित केल्याने होते असा संकुचित नियम नाही. तुम्हाला ही तंद्री अगदी ट्रेनने कुठे दूरगावी जाताना, खिडकीबाहेर पहात पहाताही अनुभवता येउ शकते.
हे अगदी पटले.मन /विचार करण्याची क्रिया बहुतेक दोन वेगळ्या गोष्टी आहेत का एकच आहे हे कळलेले ना ही.

राही Mon, 09/11/2015 - 10:08

मला वाटते की ध्यान, शांती, हे सर्व प्रथम स्वतःच्या सुखासाठी आहे. चित्त स्थिर, धारदार, लखलखीत, जागृत होणे/राहाणे हे ते सुख. या साठी सतत विचार(पक्षी चिंता, काळजी)करण्याची सवय सुटावी लागते. यासाठी मनात विकल्प उद्भवणे टाळावे लागते. श्वासावर लक्ष्य केंद्रित करणे, किमानपक्षी श्वास घेणे/सोडणे हे जाणवून घेणे ही पहिली आणि सोपी पायरी मानता येईल. 'आत्मभान जागृत होणे हे महत्त्वाचे' हा माझा फन्डा अनेक वर्षे राहिला आहे. ईश्वरप्राप्ती/मोक्ष हे सर्व दुय्यम आहे किंवा बाय-प्रॉडक्ट असू शकेल असे म्हणता येईल. म्हणजे हे सर्व करायचे ते ईश्वरप्राप्तीसाठी असे नसून मनातल्या ईश्वराला (तो असलाच तर) जागे करण्यासाठी आहे. आपण कामात असू वा नसू, नुसतेच खुर्चीवर बसलेले असू, केव्हाही मन शांत असले पाहिजे. शांत मनामुळे एखाद्या घटनेच्या, मुद्द्याच्या, परिणामांच्या अनेक शक्यता चट्कन डोळ्यांसमोर येतात. माणसांच्या वर्तणुकीतले कंगोरे कळतात. परिस्थितीतले (याला आसमंतातले असेही म्हणता येईल) सूक्ष्म बदल लक्षात येतात. त्यामुळे आपली निर्णयक्षमता वाढते. आपल्या निर्णयाला एक भक्कम रीज़निंग मिळते. स्वतःच्या गुणवत्तेच्या/मगदुराच्या पूर्ण क्षमतेनिशी निर्णय घेता येतात. ते फसले तरी चिडचीड होत नाही कारण आपली क्षमता तितकीच होती हे आपण जाणलेले असते. भवतालाविषयी (यात कुटुंब, नातेवाईक, देहबोली, परिसर, पर्यावरण, झाडेझुडपे, पशुपक्षी, सर्व येते.) सजग असणे, जाणीव राखून असणे, भानावर असणे ही उत्तम अवस्था असते. म्हणजे चटकन राग येणे, चटकन प्रीत जडणे, अनिवार लालसा-मोह होणे, अहंमन्यता, मत्सर इत्यादि षड्विकार सोडण्यासाठी प्रयत्न करा असे संतलोक जे सतत सांगत असतात, ते हे आहे. हा स्थिरपणा आला की रागद्वेष जणू नाहीसेच होतात. आपली लपलेली प्रज्ञा आपल्याला गवसते. स्वतःला कोसणे, दूषण देणे थांबते. आत्मक्लेश, परक्लेश सगळेच थांबते. गाढ शांती प्रत्ययाला येते. या स्थितीला पोचणे हे ध्येय आहे. या पलीकडे कोणाचे दर्शन, प्रचीती घेणे हे ध्येय नसते, ती काम्य इच्छा असते.
या प्रवासात आपले नकळत उन्नयन होत असते. साध्या साध्या गोष्टींनी हे जाणता येईल. मुंबईच्या लोकल रेलफलाटावर उभे असताना गाडी दूरवरून येतानाची सूक्ष्म धडधड , वरच्या विद्युतवाहिनीचे हेलकावे आपल्याला सगळ्यात आधी जाणवतात. गाडी नेहमीपेक्षा वेगळ्या फलाटावर येत असल्याची पहिलीच उद्घोषणा कळणार्‍यांतले आपण एक असतो.
वगैरे. फार मोठा विषय आहे आणि प्रवचन झोडण्यासाठी अगदी योग्य. तेव्हा थांबलेले बरे.

.शुचि. Mon, 09/11/2015 - 19:38

In reply to by राही

प्रतिसाद आवडला. माझे असे झाले आहे की ध्यान विषयावरची पुस्तके १०० वाचली आहेत पण व्यवहारात आचरण शून्य. कोणाकडून तरी टेक्निक शिकावेसे वाटते. कारण फक्त स्वतः आंधळ्यासारखे चाचपडणे बरेच झालेले आहे. त्याचा टॅन्जिएबल फायदा झालेला नाही. इन्टॅन्जिएबल फायदा असा झालेला आहे की - काय चूका टाळाव्यात (उदा स्वतःचे स्वतः चाचपडत बसणे) हे कळले आहे.

पिवळा डांबिस Mon, 09/11/2015 - 10:37

ध्यान - कोणाला अनुभव आहे का?

हो आहे. गेल्या १४ वर्षांचा आहे.

पण ते साधायचे कसे हा प्रश्न आहे.

त्याची एक प्रोसीजर आहे जी सर्वांना मोफत उपलब्ध आहे.

हा सार्वजनिक चर्चा करण्याचा विषय नाही, तर वैयक्तिक अनुभवाचा विषय आहे.
अधिक जाणून घ्यायची इच्छा असल्यास वैयक्तिक संपर्क करावा, पुढील मार्गदर्शन केले जाईल.

पण त्यासाठी बरेच काही द्यावे लागेल. ते द्यायची इच्छा नसून नुसतीच पोकळ चर्चा करायची असल्यास हा प्रतिसाद बाद मानावा.

.शुचि. Mon, 09/11/2015 - 19:35

In reply to by पिवळा डांबिस

बरेच प्रश्न वरती मांडले आहेतच. पिडां आपल्याशी व्यनितून संपर्क साधते.
.
प्रत्येक व्यक्तीचा एक बाज असतो. स्वतःला ओळखून असल्याने, माझ्या टाइपची मला नीट कल्पना आहे. तेव्हा मला सुट होइल असे मेडिटेशन टेक्निक हवे आहे.
.
मला सध्या भरपूर रिकामा वेळ असतो व पुढेपुढे वेळ मिळाला नाही तरी आवर्जुन काढत जाइन पण एखादे (शक्यतो एकच) टेक्निक नीट शिकायचे आहे. प्रॅक्टिकल केले जाइल व जर्नलही ठेवले जाइल याची हमी देते. जर्नल का तर मूडवरती प्रचंड परीणाम होतो. उदा काल खूप श्लोक, स्तोत्रे एकाग्रतेने म्हटली, यु ट्युबवरती ऐकली. रात्री अतिशय शांत रसाचे स्वप्न पडले. बाबांबरोबर जाऊन, देवळात फुले वाहीली आहेत असे काहीसे होते. तेव्हा एक नक्की आहे की हायली सजेस्टिबल असल्याने मेडिटेशनचा माझ्यावरती त्वरीत परीणाम होतो. हा जसा फायदा आहे तशीच ही दुधारी तलवारही आहे. घरातील थोडाही स्ट्रेस लहानपणापासूनच अज्जिबात सहन होत नाही. अजिबात म्हणजे थोडाही मी कोप करु शकत नाही. पण ह्याच वीकनेसचे बलात (स्ट्रेन्थ) रुपांतर होऊ शकते हे जाणून आहे. स्वतःला ओळखते असे म्हटले ते त्यामुळेच.
.कदाचित तुम्ही मला वेळ , ज्ञान व ट्रस्ट (विश्वास) द्याल. तेव्हा ते वाया न घालविण्याची जबाबदारी माझी.